Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

रेडिरेकनरमध्ये झाली छुपी वाढ

$
0
0
नुकत्याच जाहीर झालेल्या रेडिरेकनरबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. खुल्या जागांमध्ये झालेल्या दरवाढीबाबत सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, काही छुपी दरवाढ देखील करण्यात आली आहे. फूटनोटमधील ही दरवाढ मागे न घेतल्यास कोर्टात जाण्याचा इशारा क्रेडाईचे अध्यक्ष जयेश ठक्कर यांनी दिला आहे.

द्राक्ष, कांद्याची निर्यात घटणार?

$
0
0
अवकाळी पाऊस व गारपिटीतून द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागा वाचवणाऱ्या शेतकऱ्यांपुढे आता निसर्गाने नवे आव्हान उभे केले आहे. कडाक्याच्या थंडीत दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाच्या हलक्या सरी, ढगाळ हवामान आणि धुके अशा विचित्र हवामानात द्राक्ष, डाळिंबाच्या बागांसह रब्बीची पिके सापडली आहेत.

सुरक्षा काढल्याने भुजबळ नाराज

$
0
0
राज्याच्या गृह विभागाने मागील आघाडी सरकारमधील मंत्र्यांची सुरक्षा कमी करण्याच्या निर्णयावरून माजी मंत्री छगन भुजबळ दुखावले गेले आहेत. त्यांनी या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

आंदोलन मुंबईत फटका नाशिकला

$
0
0
भारतात पसरलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होत असून, उत्तर भारतातून मुंबईकडे येणाऱ्या सर्व गाड्या विलंबाने धावत आहेत. गाड्यांचे वेळापत्रक पूर्णता कोलमडले असून, प्रवाशांना तासनतास गाड्यांची वाट पहावी लागत आहे.

प्रदर्शनातून संदेश पर्यावरण रक्षणाचा

$
0
0
पर्यावरणाचा ऱ्हास टाळून निसर्गाचा समतोल साधता यावा यासाठी हरितकुंभ योजना राबविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महात्मा फुले कलादालनात नाशिकच्या विभागीय शिक्षण उपसंचालक व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कला संघातर्फे पोस्टर व रांगोळी चे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. २ ते ६ जानेवारी दरम्यान हे प्रदर्शन खुले राहणार आहे.

नीतिमूल्यांच्या पेरणीतून घडेल भव‌िष्य

$
0
0
आपण इत‌िहास तर बदलू शकत नाही पण श‌िक्षण आण‌ि नीत‌िमूल्यांच्या पेरणीतून आशावादी भव‌िष्य नक्कीच घडवू शकतो,’ अशी उमेद बौध्द धर्मगुरू दलाई लामा यांनी जागव‌िली.

बलात्कारप्रकरणी १० वर्षे कारावास

$
0
0
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या तसेच तिच्यावर बलात्कार करणाऱ्याला न्यायालयाने १० वर्षे कारावास आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. महत्त्वाचे म्हणजे एक वर्षाच्या आतच गुन्हेगाराला शिक्षा सुनावण्यात आली.

४६१ कोटींची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर

$
0
0
चालू आर्थिक वर्षातील मागील नऊ महिन्यात १७९ कोटी रुपयांची विविध विकासकामे पूर्ण झाली आहेत. २८२ कोटी रुपये कामांच्या वर्कऑर्डर प्रशासनाने दिल्या असून, काही महिन्यात ही कामे पूर्ण होण्याचा दावा केला जात आहे.

१५ वर्षांनंतर तिनं ऐकला स्वत:चा आवाज

$
0
0
कानाच्या आजारामुळे वयाच्या तिशीत पूनम सिंग (वय ४५) यांना ऐकू येणे बंद झाले होते. मात्र, डॉ. पुष्कर लेले यांनी केलेल्या कॉक्लीयर इन्प्लांट शस्त्रक्रियेनंतर पूनम सिंग यांनी पंधरा वर्षांनंतर स्वत:चा आवाज ऐकल्याची भावना व्यक्त केली.

झेडपी सीईओ बनकरांची बदली

$
0
0
नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांची सरकारने बदली केली असून वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सिन्नर नागरी पतसंस्थेत घोटाळा?

$
0
0
मुदत ठेवीचे पैसे परत मिळत नसल्याने सिडकोतील त्रस्त ठेवीदारांनी शुक्रवारी सिन्नर नागरी सहकारी पतसंस्थेच्या सिडको शाखेतील व्यवस्थापकांना घेराव घातला. लवकरात लवकर पैसे परत न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या संतप्त ठेवीदारांनी दिला.

आज जुलूस

$
0
0
इस्लाम धर्माचे पैगंबर हजरत मोहम्मद (स.) यांची जयंती निमित्ताने जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी अंतर्गत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटेपासूनच विविध धार्मिक कायर्क्रमांना सुरुवात होईल.

साधूग्रामचा वाद

$
0
0
साधुग्रामची जागा अद्याप ताब्यात नसल्यामुळे पालकमंत्र्यांसह महंत ग्यानदास महाराज यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर प्रशासन आता खडबडून कामाला लागले आहे. त्यामुळेच कुठल्याही परिस्थितीत सोमवारपर्यंत सर्व जागा मालकांना नोटिसा देण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे.

राज फक्त आले आणि गेले

$
0
0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकचा आपला शनिवारचा नाशिकचा दौरा एका दिवसातच आटोपता घेतला. अचानक दौरा आटोपता घेतल्याची चर्चा पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकामंध्येही होती.

जनावरे मोकाट

$
0
0
नाशिक शहरातील रस्त्यावर ठाण मांडून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या मोकाट जनावरांना पकडणाऱ्या ठेक्यादारांची मुदत संपली आहे. नवीन ठेका द्यायचा की नाही, याबाबत प्रशासनाने अद्याप निर्णय घेतला नसून यामुळे दिवसांगणीक रस्त्यावरील भटक्या जनावरांची संख्या वाढत चालली आहे.

संस्कृत संमेलन

$
0
0
संस्कृतभारती या संस्थेच्या वतीने दहा द‌िवसीय संस्कृत संभाषण श‌िब‌िराला सुरुवात झाली आहे. शहराच्या व‌िव‌िध ११ व‌िभागांमध्ये या श‌िब‌िराचे आयोजन करण्यात आले आहे. हे श‌िब‌िर १० जानेवारीपर्यंत आहे. तसेच ११ जानेवारी रोजी संस्कृत संमेलन होणार आहे.

मनमाडमध्ये वानराची अंत्ययात्रा

$
0
0
मनमाडमध्ये झाडावरुन पडल्याने एका वानराचा मृत्यू झाला. या वानराची स्थानिकांनी एकत्र येऊन अंत्ययात्रा काढली. अंत्ययात्रा काढण्याबरोबरच धार्मिक विधीही करण्यात आला.

मतोबा महाराज यात्रोत्सव

$
0
0
नैताळेकरांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री मतोबा महाराज यात्रोत्सवाला आजपासून (दि.५) प्रारंभ होत असून, यात्रोत्सवामुळे परिसर गजबजून गेला आहे. यात्रोत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

२८ लाखांचा घोटाळा

$
0
0
धुळे तालुक्यातील अजंग व कासविहीर गावातील शेतजमिनीत डाळिंबाची झाडे असल्याबाबत बनावट कागदपत्रे तयार करून शासकीय अधिकाऱ्यांनी संगनमताने सरकारची २७ लाख ९३ हजार ८८३ रुपयांत फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.

दाढी, कटिंग महाग

$
0
0
सलून व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या कॉस्मॅटिक्स आणि अन्य साहित्याचे दर वाढल्याने दाढी कटींगच्या दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय सिडकोतील सलून दुकानदार चालक मालक संघटनेने घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना कटींगसाठी ५० तर दाढीसाठी ३० रुपये मोजावे लागणार आहेत.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>