Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पार्कींगचा भूर्दंड

$
0
0
नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील संदीप फाऊंडेशनने सुरक्षेच्या कारणास्तव विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये दुचाकी व चारचाकी वाहने आणण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे स्वत:ची वाहने वापरणाऱ्या विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. त्यांना कॉलेजबाहेर खासगी जागेमध्ये पैसे मोजून वाहने उभी करावी लागत आहेत.

एअर कार्गोला परवानगी

$
0
0
ओझर विमानतळाच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या एअर कार्गोला केंद्रीय अर्थमंत्रालयाने चोवीस तास आणि आठवडाभर सेवा देण्यासाठीची परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच सुरू होणाऱ्या विमानसेवेबरोबरच कार्गो सेवाही सक्षमतेने कार्यरत होण्याची चिन्हे आहेत.

साधुग्रामला १० दिवसांत जागा?

$
0
0
साधुग्रामसाठी आवश्यक २५० एकर जागा येत्या दहा दिवसात उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हा प्रशासनाने अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांना दिली आहे.

रामरथ मार्ग शाही मार्ग होणार

$
0
0
गेल्या सिंहस्थात शाही मार्गामध्ये चेंगराचेंगरी घडल्याने आता त्या मार्गावरुन शाहीस्नानाला जाणार नसल्याचे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांनी स्पष्ट केले आहे.

नाशिकच्या निकालात १४ टक्के सुधारणा

$
0
0
राज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी (आयटीआय) लागू करण्यात आलेली ऋणात्मक गुणपद्धती (निगेटिव्ह मार्किंग) सध्या पुरती बाद ठरवित नव्याने निकाल लावण्यात आला आहे. यात नाशिक विभागाच्या निकालात तब्बल १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्याचाही निकाल १४ टक्के अधिक दिसून आला आहे.

बिबट्याच्या बछड्याचा करुण अंत

$
0
0
एकलहरे जवळील कोटमगाव येथील शेतकऱ्यांच्या विहिरात बिबट्याचे पिलू पडले. रात्री कडाक्याच्या थंडीला तोंड देता देता आणि पोहून थकल्यामुळे पिलाचा अखेर मृत्यू झाला. मदतीसाठी त्याची करुण हाक रात्रीच्या अंधारात कोणालाच ऐकू गेली नाही.

सिन्नर चौपदरीकरण लांबले

$
0
0
नाशिक-सिन्नर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम कुठल्याही परिस्थितीत जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात सुरू करण्याची प्रशासनाची घोषणा पोकळ ठरली आहे. आता हे काम येत्या १५ जानेवारीपासून सुरू होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

नायलॉन मांजा विक्रीवर कारवाई

$
0
0
जिल्हा प्रशासनाने नायलॉन मांज्याच्या विक्रीवर बंदी घातलेली असताना सिन्नर शहराच्या विविध भागात नायलॉन धागा विक्री सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने मांजा विक्री दुकानावर धाडी टाकत तपासणी केली. यामध्ये मुंगे गल्लीतील एका दुकानाच्या संचालकावर कारवाई करीत तीन हजार रुपये किमतीचे लहान मोठे असे २० रीळ जप्त केले.

कांदा दरात घसरण

$
0
0
गेल्या आठवड्यापासून लाल कांद्याच्या आवकेत वाढ झाल्याने बाजारभावात सातत्याने घसरण होत आहे. गेल्या आठवड्यापासून किमान ३०० ते ४०० रुपयांनी कांद्याचे दर घसरले आहेत.

गोदेचा गळा घोटणे पातकच

$
0
0
गंगा नदीपेक्षाही मोठ्या असलेल्या गोदावरीच्या उगमाजवळच तिचा घोटण्यात आलेला गळा हे अक्षम्य पातकच आहे. गोदावरीला पाईपमध्ये आणि सांडपाण्याला नदीपात्रात टाकण्याचा हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. - महंत ग्यानदास महाराज

ओवेसीची ‌विधाने पैशांसाठी

$
0
0
सनातन धर्माला मिटविण्यासाठी गेल्या असंख्य वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. अधून-मधून कुणी काही विधाने केली आणि काहीही प्रयत्न झाले तरी सनातन धर्म मिटणार नाही. खासदार ओवेसी यांची विधाने ही पैशांसाठी असून देव त्यांना सदबुद्धी देवो, असे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांनी म्हटले आहे.

फ्लाय अॅशप्रकरणी आज पुण्यात सुनावणी

$
0
0
औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पाच्या शंभर किलोमीटर परिघात कोणत्याही बांधकामात राखेच्याच विटा वापरल्या जाव्या, असे केंद्र सरकारच्या वने आणि पर्यावरण विभागाचे आदेश आहेत. मात्र, त्याचे पालन होत नसल्याची याचिका नाशिक फ्लाय अॅश ब्रिक्स असोसिएशनचे सुनील मेंढेकर यांनी ट्रिब्युनलमध्ये दाखल केली आहे.

गंगापूर रोडची अतिक्रमणे हटवली

$
0
0
महापालिका डॉ. प्रवीण गेडाम यांनी सोमवारी शहरातील व्यावसायिक अतिक्रमण करणाऱ्यांना जोरदार झटका दिला असून सोमवारी गंगापूर रोडवरील जवळपास शंभरच्यावर व्यावसायिकांचे अतिक्रमण जमीनदोस्त केले आहे. गंगापूर रोडनंतर आता कोणाचा नंबर लागणार अशी चर्चा होती.

बनकरांच्या बदलीस विरोध

$
0
0
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्या बदली विरोधात जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांसह संघटनाही सरसावल्या आहेत. सव्वा वर्षातच बनकरांची झालेली बदली रद्द करावी, या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह उपाध्यक्ष आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांसह, पालकमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांना साकडे घातले.

लांडे केस:दोघांनी साक्ष फिरवली

$
0
0
अहमदनगर येथील बहुचर्चित अशोक लांडे खूनप्रकरणात सोमवारी तिघांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. त्यापैकी दोघांनी घटनास्थळी नेमके काय घडले हे सांगता येणार नाही, असे सांगून साक्ष फिरविली.

नेहरू वनोद्यानाचे हस्तांतरण होणार

$
0
0
पांडव लेणीजवळील वनविभागाच्या नेहरू वनउद्याचे पर्यटनस्थळ म्हणून विकसीत करण्यासाठी महापालिकेकडे हस्तांतरण करण्यास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तत्वतः मान्यता दिली आहे.

एकरी ३३ लाख भाड्याची मागणी

$
0
0
साधुग्रामसाठी भाडेतत्वावर जमीन घेण्यासाठी एकरी ३३ लाख रुपये भाडे द्यावे आणि जमीन कायमस्वरुपी घेण्याची लेखी हमी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे साधुग्राम जमिनीच्या अधिग्रहणाचा प्रश्न चिघळण्याची चिन्हे आहेत.

बनकरांची बदली रद्द होणार

$
0
0
सर्वपक्षीय दबाव आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बनकरांची बदली रद्द करण्यासंदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन अध्यक्षा चुभळे यांना दिले.

दरमहा १० जणांची लूट

$
0
0
इतरांकडील ऐवज तसेच रोकड आपल्याला मिळावी म्हणून, ऐनकेनप्रकारे ती लुटण्याचे अनेक प्रकार शहरात सुरूच आहेत. गतवर्षात बॅग लिफ्टिंग, चेन स्नॅचिंग यासारखे जबरी चोरीचे एकूण ११३ गुन्हे घडले.

मांत्रिक महिलेची आई गजाआड

$
0
0
राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या घोटी येथील अघोरी हत्याकांड प्रकरणातील मांत्रिक बच्चीबाई खडके हिची आई सनीबाई बुधा निरगुडे हिला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील सर्व दहाही आरोपींच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने नऊ जानेवारीपर्यंत वाढ केली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images