Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पेठ परिसरात सौम्य भूकंप

$
0
0
पेठ तालुक्यात गुरुवारी मध्यरात्री आणि शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य हादरे बसले. तीन रिश्टर स्केलच्या आसपास या भूकंपाची नोंद झाली असून कुठलेही नुकसान किंवा जीवितहानी झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

निकालासाठी NCP चा ठिय्या

$
0
0
पुणे विद्यापीठातर्फे तीन महिन्यांपूर्वी घेण्यात आलेल्या द्वितीय वर्षाचे रखडलेले निकाल त्वरित लावावेत, या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. पुणे विद्यापीठाच्या विभागीय कार्यालयासमोर शुक्रवारी दुपारी केलेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

डोनेशनविरोधात आंदोलन

$
0
0
डोनेशन घेण्यास कायद्याने बंदी असतानाही या नियमाचे कॉलेजकडून सर्रास उल्लंघन होते. डोनेशन घेणाऱ्या कॉलेजची तपासणी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी छात्रभारती संघटनेने जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

बोगस मतदार वगळा

$
0
0
जळगाव शहराच्या मतदार यादीत आढळलेले ६६,७३३ बोगस मतदार वगळावेत, यासाठी महापालिकेची निवडणूक तीन ते चार महिने पुढे ढकलावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. विविध राजकीय पक्षांनी या मागणीचा फॅक्स आणि ई-मेल निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे.

मारा उडी अन् चुकवा खड्डे

$
0
0
पावसामुळे शहरातील रस्त्यांची दैना झाली असताना महापालिकेतील सत्ताधारी सुस्त बसल्याचा आरोप करत शुक्रवारी शिवसेनेने खड्डयांवरुन लांब उडी मारण्याच्या अनोख्या आंदोलनाद्वारे मनसेच्या कारभाराचा निषेध केला.

इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबचा बहुमान नाशिकला

$
0
0
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटची (सीपीआरआय) पश्चिम भारतातील आंतरराष्ट्रीय दर्जाची लॅबोरेटरी नाशिकजवळील शिलापूर येथे होणार आहे.

कारागृहाच्या आवारात पोलिस शिपायावर हल्ला

$
0
0
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्याने उपचाराहून परत येताना कारागृहाच्या आवारात पोलिस शिपयावर जीवघेणा हल्ला केला.

ओझर विमानतळासाठी ३०० कोटींचा प्रस्ताव

$
0
0
मुंबई विमानतळावरील वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून नावारुपाला येणा-या ओझर विमानतळाच्या विकासासाठी तब्बल ३०० कोटी रुपयांचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

द्वारका भुयारी मार्ग खुला

$
0
0
द्वारका चौकातील वाहतुकीमुळे पादचाऱ्यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी बांधण्यात आलेला पंचमुखी भुयारी मार्ग शनिवारी खुला करण्यात आला.

नाशकात आयटीचा सिक्सर

$
0
0
आयटी परफेक्ट डेस्टिनेशन असलेल्या नाशिकमध्ये येण्यासाठी सहा कंपन्यांनी इच्छा दर्शविली असून येत्या वर्षभरात त्या नाशकात येऊ शकणार आहेत.

काविळीने होणारा कॅन्सर बरा होतो

$
0
0
काविळीमुळे होणारा लिव्हर कॅन्सर हा दुर्धर आजार नसून तो योग्य उपाचाराने बरा होऊ शकत असल्याचे निदर्शनास येत आहे.

'शिवाजी अंडरग्राऊंड...' बंद करा

$
0
0
दोन धर्मांमध्ये दरी पाडण्याचे काम शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला हे नाटक करत असून त्यावर बंदी घालावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिस आयुक्तांकडे केली.

बालकाला मिळाला आधार

$
0
0
साईनगर एक्स्प्रेसमध्ये सोडून दिलेल्या एका पाच महिन्यांच्या बालकाला मनमाड रेल्वे पोलिसांच्या मदतीमुळे नाशिकच्या आधारश्रमाचे नवे घर मिळाले.

सिंहस्थासाठी ५३६ कोटींचे रस्ते

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक शहर परिसरासह जिल्ह्यातील सुमारे ५३१ कोटी रुपयांची रस्त्याची कामे होणार आहेत.

नाशिक, मालेगावचा डंका हैदराबादेत

$
0
0
आयटीसाठी परफेक्ट डेस्टिनेशन असलेले नाशिक आणि टेक्स्टाइल उद्योगाचे माहेरघर असलेल्या मालेगावचे प्रमोशन आता परराज्यात केले जाणार आहे.

बाजार समितीतून ग्रामपंचायत सदस्य हद्दपार

$
0
0
राज्यातील बाजार समितीच्या संचालक मंडळातून ग्रामपंचायत प्रतिनिधी हद्दपार होणार असून, त्याऐवजी विकास सोसायट्यांच्या प्रतिनिधींना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांपासून याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळामध्ये सर्व प्रतिनिधी शेतकरी असावेत, यासाठी सरकार हा महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहे.

'चणकापूर कालव्यात पाणी सोडा!'

$
0
0
देवळा तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर उजव्या कालव्यात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी देवळ्याचे माजी सरपंच जितेंद्र आहेर, विजय पगार यांनी केली आहे.

किकवारी खुर्द शाळा जिल्ह्यात प्रथम

$
0
0
राज्य सरकारच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत बागलाण तालुक्यातील किकवारी खुर्द प्राथमिक शाळेने जिल्ह्यात व तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. तर याच कार्यक्रमांतर्गत बागलाण तालुक्यातील नवे रातीर या शाळेने व्दितीय व श्रीपुरवडे शाळेने तृतीय क्रमांक पटकावला.

चोरट्याकडून सात तोळे सोने जप्त

$
0
0
विंचूर येथे तीन महिन्यांपूर्वी पडलेल्या दरोड्यातील एका आरोपीला पकडण्यात लासलगाव पोलिसांना यश आले असून त्याच्याकडून पोलिसांनी सुमारे सात तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.

१० लाखांची रोकड लंपास

$
0
0
हॉटेल रसोईजवळ पार्क करण्यात आलेल्या चारचाकीमधील १० लाखांची रोकड चोरांनी लंपास केली​. ही घटना शनिवारी दुपारी सव्वाच्या सुमारास इंदिरानगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images