Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

भाविकांसाठी स्वतंत्र घाट

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात होणारी गर्दी पाहता भाविकांंच्या सोयीसाठी प्रशासनाने स्वतंत्र स्नानघाटाचे नियोजन केले आहे. यात दसक, टाकळीतील घाट विस्तारीकरणासह कन्नमवार पुलाजवळ दोन घाट बांधण्यात येणार आहेत.

जळगावात ६६,७३३ मतदार बोगस

$
0
0
जळगाव महापालिका निवडणुकीसंदर्भात गुरुवारी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या यादीमध्ये ६६ हजार ७३३ बोगस मतदारांची नावे असल्याचे उघडकीस आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

वृक्ष पुनर्रोपणाचा रीसर्व्हे

$
0
0
नाशिक ते त्र्यंबकेश्वर या रस्त्याच्या चौपदरीकरणाअंतर्गत करावयाच्या वृक्ष पुनर्रोपणाचे पुन्हा सर्वेक्षण करण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. त्यानुसार येत्या मंगळवारी हे सर्वेक्षण बांधकाम विभाग आणि वृक्षप्रेमींच्या माध्यमातून केले जाणार आहे.

दप्तराच्या ओझ्याला पर्याय काय?

$
0
0
ज्युनियर केजीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकडे पाहिलं की त्यांच्या पाठीवरील ओझ्याकडे पटकन लक्ष जातं. आपल्या वजनाच्या क्षमतेपेक्षा दुप्पटीने दप्तराचं ओझं वाहणारे हे विद्यार्थी अक्षरश: वाकलेले दिसतात.

त्र्यंबक कनेक्शन होणार सहापदरी

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर शहराचे कनेक्शन तब्बल सहापदरी होण्याची दाट शक्यता आहे. त्यासंदर्भात बांधकाम विभागाने अनुकुलता दर्शविली असून लवकरच त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

उंटवाडी रस्त्यावरही अतिक्रमण

$
0
0
उंटवाडीतील म्हसोबा मंदिराच्या अलिकडे भाजीपाला, फळे, फरसाण विक्रेत्यांनी रस्त्यालगत थाटलेल्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे अतिक्रमण थाटलेले असतानाही प्रशासन यावर कुठलीही कारवाई करत नाही याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ही पर्यटन व्यवसायाची हानी

$
0
0
विनीत लोणारी हे नाशिकच्या पर्यटन व्यवसायातील उद्योन्मुख व्यक्तीमत्त्व होते. त्यांच्या निधनाने नाशिकच्या पर्यटन व्यवसायाची मोठी हानी झाल्याची सहवेदना शुक्रवारी लोणारी यांच्या स्मरणार्थ आयोजित शोकसभेत व्यक्त करण्यात आली.

प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरचे आज उद्घाटन

$
0
0
महाराष्ट्र शासनाच्या नाशिक येथील भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्राचे (प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटर) उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शनिवारी होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे असतील.

निवासी शाळेला मिळणार चालना

$
0
0
रस्त्यावर राहणाऱ्या आणि भीक मागून जीवन जगणाऱ्या अनाथ मुलांसाठी वरदान ठरणाऱ्या निवासी शाळेबाबत महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. नुकत्याच मुंबई येथे झालेल्या आढावा बैठकीत याविषयी चर्चा झाली. निवासी शाळेकडे महापालिका दुर्लक्ष करीत असल्याचे वृत्त ‘मटा’ने प्रसिध्द केले होते.

कालिदासला खळ्ळ् खट्याक

$
0
0
राजकीय पक्षाचे मेळावे असेल तर कालिदासचा अक्षरश: जीव गुदमरतो. मध्यंतरी राज ठाकरे यांचे स्पर्धा परीक्षेवर मार्गदर्शन होते. कालिदास तुडुंब भरले होते. बाहेर गर्दी होती, ‌व्हिडिओ स्क्रीन लावण्यात आले होते परंतु राज ठाकरे आले व जी गर्दी उसळली ती थेट स्टेजवर.

खडी, क्रशरला अखेर मंजुरी

$
0
0
गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेले खडी, क्रशर अवघ्या काही दिवसात कार्यान्वित होणार आहेत. जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या ५३ पैकी ३५ अर्जांना मान्यता देण्यात आली आहे. तसेच, इतरही क्रशर लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे.

स्वतंत्र घाटाच्या मुद्यावरून वादाची शक्यता

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात होणारी गर्दी पाहता पर्यटकांच्या सोयीसाठी प्रशासनाने स्वतंत्र स्नानघाटाचे नियोजन केले आहे. मात्र हा निर्णय घेताना प्रशासनाने साधुमहंत आणि पुरोहित संघाला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप होत आहे.

कॉलेज निवडणुकांबाबत कही खुशी कही गम

$
0
0
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी कॉलेज प्रतिनिधींच्या निवडणुका पुन्हा सुरू करण्याची शक्यता विधानसभेत वर्तवली असल्याने शहरातील विद्यार्थी संघटनांनी त्याचे स्वागत केले आहे. मात्र विद्यार्थी तसेच प्राध्यापकांच्या मनात या निवडणुकांविषयी संभ्रमाचे वातावरण आहे.

जलसाठा ४० टक्क्यांवर

$
0
0
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत होत असलेल्या दमदार पावसामुळे जलसाठा लक्षणीयरित्या वाढत असून शुक्रवारी हा साठा ४० टक्क्यांवर पोहचला. जिल्ह्यातील तीन धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत, तर तीन धरणे अद्याप पाण्याच्याच प्रतीक्षेत आहेत.

दोनशे ठिकाणी ८०० कॅमेरे

$
0
0
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विविध भागात बसवल्या जाणाऱ्या सीसीटीव्हीचा पोलिस प्रशासनाने नव्याने प्रस्ताव सादर केला आहे. यापूर्वीच्या प्रस्तावात १ हजार ७५० कॅमेरे बसवण्यात येणार होते आणि त्यासाठी २५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता.

एसटी प्रशासनाचे आरटीओला साकडे

$
0
0
महापालिका हद्दीसह इतर ठिकाणी सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटी प्रशासन मेटाकुटीला आले आहे. त्यातच अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी खासगी बस मालकांना ठेके दिले असून संबंधित बसचालक कर्मचाऱ्यांना सोडल्यानंतर परत येताना प्रवासी वाहत आहेत.

नाशिकही आयटी हब हवे

$
0
0
विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ)च्या माध्यमातून तिरुअनंतपुरम येथील पपलीपुरम गावात सुमारे ४५० एकर जागेवर भव्यदिव्य असे इंटिग्रेटेड आयटी टाऊनशिप, आयटी इन्फ्रास्ट्रक्चर, रेसिडेन्शिअल अपार्टमेंट, शॉपिंग मॉल, मल्टिप्लेक्स, हॉस्पिटल, हॉटेल, शैक्षणिक संस्था, या सगळ्याच्या अनुषंगाने हे पार्क विकसित करण्यात आले आहे.

'धर्मादाय'ची परीक्षा दोन टप्प्यात

$
0
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी (२८ जुलै) आयोजित करण्यात आलेली अधीक्षक पदासाठीची परीक्षा लक्षात घेऊन काही पदांची परीक्षा नंतरच्या टप्प्यात घेण्यात येणार आहे. यातील निरीक्षक, जनसंपर्क अधिकारी, अधीक्षक पदांसाठीची परीक्षा उद्या (दि.२८) होणार आहे.

७ हजार तक्रारींचा खच

$
0
0
अनेक वर्षांपासून पोलिस स्टेशनमध्ये दाखल होणाऱ्या तक्रार अर्जांनी सात हजारांचा टप्पा गाठला आहे. अर्जांचा डोंगर पाहून पोलिस अधिकारीही चक्रावून गेले असून प्रलंबित तक्रार अर्जांचा आकडा कमी करण्यासाठी पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे.

लॅब असिस्टंटपदावर टांगती तलवार

$
0
0
राज्यभरात ज्युनिअर कॉलेजमधील लॅब असिस्टंटची पदे रद्द करून त्यांचा समावेश चतुर्थ श्रेणीत करावा, असा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र, हा निर्णय घेताना शालेय संहिता आणि राज्यपालांच्या आदेशांचे उल्लंघन होत असल्याची बाब काही कर्मचाऱ्यांनी उघड केली.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images