Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘इंग्रजी बंदी’ला राज यांचा विरोध

$
0
0
महाराष्ट्रातील इंग्रजी शाळा पूर्ण बंद करण्याच्या ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या भूमिकेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध दर्शवला आहे. ‘मराठी शाळा टिकवण्यासाठी इंग्रजी शाळा बंद करणं हा पर्याय होऊ शकत नाही. त्यापेक्षा मराठी शाळांतच उत्तम इंग्रजी शिकवण्याची सोय असावी,’ असं मत राज यांनी व्यक्त केलंय.

शहरात डासांची घनता धोकादायक पातळीवर

$
0
0
शहरातील सातपूर, पूर्व तसेच पंचवटी या तीन विभागात डासांची पातळी ५ किंवा त्यापेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे. ही पातळी धोकादायक मानली जाते. यामुळे महापालिका प्रशासन संबंधित विभागात काय उपाययोजना करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

होर्डिंग्जप्रकरणी तीन दिवसात सोळा गुन्हे

$
0
0
महापालिकेच्या अतिक्रमण ​विभागाने गेल्या तीन दिवसांपासून हायकोर्टाच्या आदेशानुसार अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर लावणाऱ्यांविरोधात विविध पोलिस स्टेशनमध्ये १६ तक्रारी दिल्या आहेत. पोलिसांनी संबंधितां​वर गुन्हे दाखल केले असून होर्डिंग्ज हटवण्याची कारवाई सुरूच राहणार असल्याचे उपायुक्त आर. एम. बहिरम यांनी सांगितले.

पंचनामे पूर्ण; १७ हजार हेक्टरवर नुकसान

$
0
0
अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, जिल्ह्यात १७ हजार १२१ हेक्टर क्षेत्रावर शेतपिकांचे नुकसान झाले आहे. यासंबंधीचा अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना मदत जाहीर होण्याची शक्यता आहे.

‘मुक्त’ च्या विद्यार्थ्यांना प्रवेशासोबतच पुस्तके

$
0
0
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रवेश घेतल्यानंतर एक महिन्यात पुस्तके उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यापीठाच्या शन‌िवारी झालेल्या व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

पेपरफुटीचा चौकशीनंतरच खुलासा

$
0
0
एमबीबीएसच्या तृतीय वर्ष परीक्षेच्या ईएनटी या विषयाच्या पेपरफुटीबाबत विद्यापीठामार्फत व्यापक चौकशी करण्यात येत आहे. याबाबत तातडीची बोर्ड ऑफ एक्झामिनेशनची बैठक बोलविण्यात येऊन व‌िचारव‌िनिमय झाल्याची माह‌िती कुलगुरू प्रा. डॉ. अरुण जामकर यांनी दिली.

खरे सोने दाखवून डु‌प्लिकेटची विक्री

$
0
0
खरे सोने दाखवून नंतर बनावट सोने गळ्यात मारणाऱ्या महिलेसह तीन जणांना गुन्हे शाखा क्रमांक तीनच्या पथकाने नारायणबापू चौकाजवळ शुक्रवारी अटक केली. त्यांच्याकडून साडेआठ हजाराचा ऐवज जप्त केला.

‘मिग’साठी हवाई दलाला खासगी साथ

$
0
0
मिग श्रेणीतील लढाऊ विमानांच्या आधुनिकीकरणासाठी भारतीय हवाई दलाने प्रथमच खासगी कंपनीशी करार केला असून, या विमानांच्या निर्मितीचा हा प्रकल्प ओझर एचएएलमध्ये होणार आहे. या करारान्वये येत्या तीन ते चार वर्षात जवळपास ५० विमानांचे आधुनिकीकरण केले जाणार आहे.

'नाशिकला गार्डन सिटी बनविणार'

$
0
0
नाशिकच्या विकास दिसण्यासाठी आणखीन थोडे दिवस थांबण्याचा सल्ला देत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा घोषणांचा पाऊस पाडला. नाशिकला आपण गार्डन सिटी बनविणार असून एक दीड वर्षात शहरात बदल दिसतील, अशी अपेक्षा ठाकरेंनी व्यक्त केली आहे.

‘आता मी जमिनीवर आलोय’!: राज

$
0
0
विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभव आणि पक्षातील बंडखोरी यामुळे हैराण झालेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे नरमले असून त्यांनी आता स्वतःच बदलण्याचा पर्याय स्वीकारला आहे. ‘मी आता लोकांचे ऐकून घेत असून जमिनीवर आलोय’, अशी कबुली राज यांनी नाशिक येथे पत्रकारांजवळ दिली.

मनमाडच्या थिएटरमध्ये आग

$
0
0
शहरातील सर्वात जुने सिनेमागृह असा लौकिक असलेल्या अलंकार सिनेमागृहास रविवारी सायंकाळी अचानक भीषण आग लागून संपूर्ण थिएटर जळून खाक झाले. प्रेक्षकांनी तातडीने बाहेर धाव घेतल्याने जीवितहानी झाली नाही.

सटाण्यात दीड तास रास्तारोको

$
0
0
सटाणा शहरातून जाणाऱ्या विंचूर - शहादा प्रकाशा राज्य महामार्गावरील वळण रस्ता प्रलंबित असल्याकारणाने नाहक निष्पाप जीवांचा बळी जात आहे. या रस्त्याचे काम लवकर मार्गी लावण्यात यावे, या मागणीसाठी संतप्त शहरवासीयांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ दीड तास रास्तारोको आंदोलन केले.

पाणीटंचाईसाठी १८ कोटी

$
0
0
ग्रामीण भागातील पाणीटंचाईसाठी १८ कोटी रुपयांचा टंचाई कृती आराखडा सादर करण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेला तब्बल तीन स्मरणपत्रे देण्यात आली होती. आता या आराखड्यानुसार काम केले जाणार आहे.

कन्नमवार पुलाचे काम लवकरच

$
0
0
मुंबई-आग्रा महामार्गालगत गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या कन्नमवार पुलाला ५० वर्षे पूर्ण झाली असून या पुलाचा स्लॅब काही ठिकाणी धोकादायक बनल्याामुळे या पुलाचे काम लवकर हाती घेतले जाणार आहे.

वर्षभरापूर्वी खोदलेल्या रस्त्यांच्या कामांना सुरुवात

$
0
0
सातपूर कॉलनी परिसरातील वीस हजारच्या स्कीममधील वर्षभरापासून खोदून ठेवलेल्या रस्त्यांच्या समस्येबाबत ‘मटा’ने प्रकाश झोत टाकला होता. या वृत्ताची दखल घेत महापालिकेने खोदलेल्या रस्त्यांच्या कामांना सुरुवात केली आहे.

७ किलोमीटरच्या रस्त्यात २७ ठिकाणी क्रॉसिंग पॉइंट

$
0
0
नाशिक शहरातील त्र्यंबकेश्वरकडे जाणारा रस्ता बाराही महिने रहदारीचा असतो. परंतु, महापालिका हद्दीतील त्र्यंबकनाका ते पपया नर्सरीपर्यंत त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तब्बल २७ ठिकाणी रस्ता क्रॉसिंग ठेवण्यात आले आहेत.

दारात आला बिबट्या; वनविभागाकडे नाही पिंजरा

$
0
0
बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याने नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील महिरावणी गावातील लोक धास्तावलेले आहेत. रविवारी पहाटे बिबट्याच्या हल्ल्यामुळे गायीचे वासरू जखमी झाले. मात्र, बिबट्या पकडण्याचा पिंजराच उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करीत वनविभागाने जबाबदारी ढकलली आहे.

मजुरांच्या कुटुंबीयांना न्याय द्या

$
0
0
गंगापूररोडवरील सोमेश्वरजवळ महापालिकेच्या मुख्य सांडपाण्याच्या ड्रेनेज लाईनचे चोकअप काढतांना तीन मजुरांचा नुकताच मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्या, अशी मागणी कामगार कृती समितीच्या वतीने कामगार उपायुक्त आर. एस. जाधव यांच्याकडे करण्यात आली आहे.

फाळके स्मारकाला ‘CSR’ची प्रतीक्षा

$
0
0
नाशिक शहराचे भूषण असलेल्या दादासाहेब फाळके स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीच्या ठेक्याकडे ठेकेदारांनी पाठ फिरवली. अनेकदा निविदा प्रसिध्द केल्या; मात्र ठेकेदारांना या कामात रसच नसल्याचे दिसून आले.

‘इंग्रजी शाळांवरील बंदीने मराठीचा प्रश्न सुटणार नाही’

$
0
0
मराठीसाठी इंग्रजी शाळांवर बंदी घालण्याच्या जेष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमांडेच्या मागणीने मराठीचा प्रश्न सुटणार नसल्याची प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली. मराठी शाळामंध्ये उत्कृष्ठ इंग्रजी शिकवले तर मराठी शाळांचाही दर्जा सुधारेल असे सांगत त्यांनी नेमांडेच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images