Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

ट्रकच्या धडकेने मोटरसायकलस्वार ठार

$
0
0
भरधाव वेगातील ट्रकने धडक दिल्यामुळे मोटरसायकल चालकाचा मृत्यू झाला तर, त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. म्हसरूळ येथील बजाज शोरूम समोर शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला.

अनुदान लाटणाऱ्यांवर गुन्हे

$
0
0
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील विहीरीचे अनुदान लाटणाऱ्या सिन्नर तालुक्यातील एकूण ३२ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीनंतर फौजदारी कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.

अतिक्रमणावरून कुरघोडीचा प्रयत्न

$
0
0
बोरगड येथील महापालिकेच्या सुमारे २५ एकर जागेवरील अतिक्रमण हटवण्यावरून पोलिस आणि महापालिका एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलिस बंदोबस्तासाठी अनेक वेळा पत्र व्यवहार केला असून, पोलिसांकडून सकारत्मक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप महापालिका अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

हरित महाराष्ट्रात नाशिक प्रथम

$
0
0
हरित महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी अत्यंत प्रभावीपणे करणाऱ्या नाशिकच्या सामाजिक वनीकरण विभागाचा राज्यात प्रथम क्रमांक आला आहे. नाशिक विभागाने २९ हजार ४५७ रोपांचे वाटप तर १२ हजार ९२६ रोपांची विक्री केली होती.

पोलिस आयुक्तांना साकडे

$
0
0
शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे यासाठीच्या प्रयत्नांत वाहतुकीचे काटेकोर नियोजनही करावे लागेल. शहराचे बकालपण दूर करण्यासाठी रस्त्यांवरील अतिक्रमण निर्मूलनाच्या मोहिमेला पोलिसांनी मुबलक पाठबळ द्यावे, अशी अपेक्षा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्याकडे व्यक्त केली.

अनामत रक्कम ‘ऑफलाइन’च

$
0
0
कम्प्युटर विभागाने अनामत रक्कम ऑनलाइन स्वीकारण्यासाठी केलेला बदल स्वीकारण्यास प्रशासनातील इतर अधिकारी तयार नसल्याचे रविवारी पुन्हा एकदा समोर आले.

परीक्षा गेली पुढे...

$
0
0
चोवीस नोव्हेंबर रोजी सकाळी द्वितीय वर्ष इंजिनीअरिंगचे विद्यार्थी परीक्षेचा पेपर देऊन आले आणि संध्याकाळी त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून कळलं, की त्यांचे पुढचे काही पेपर्स डिसेंबर महिन्यात घेण्यात येणार आहेत.

व्यापाऱ्यांचे अकाऊंट सील!

$
0
0
एलबीटी व विविरण पत्र भरण्यास दिरंगाई करणाऱ्या आणखी १०० व्यापारी तसेच उद्योजकांचे खाते बंद करण्यासाठी महापालिकेच्या एलबीटी विभागाने सोमवारी बँकांना सु​चित केले. यापूर्वी बंद करण्यात आलेल्या ८० खातेधारकांपैकी २१ जणांनी दंडाची रक्कम भरून विवरणपत्र सादर केली आहेत.

पीएफ कार्यालयातही आधारकार्ड

$
0
0
पीएफकरीता युनिव्हर्सल खात्यासाठी कामगाराला आधारकार्डची नोंदणी आवश्यक असते. यासाठी पीएफधारकांना जागेवरच आधारकार्ड मिळावे, यासाठी आयुक्त जगदीश तांबे यांनी पीएफ कार्यालयाच्या कॅन्टीनमध्ये आधारकार्ड काढण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सायकल अन् पालखीसाठी मार्ग

$
0
0
नाशिक ते त्र्यंबक रस्त्याच्या रुंदीकरणादरम्यान सायकल आणि पालखी मार्गही साकारला जात आहे. अडीच मीटर रूंद आणि २३ किलोमीटर लांबीचे हे दोन्ही मार्ग चौपदरी रस्त्याच्या कडेला असणार आहेत.

नाशिकरोडला ऑफ स्ट्रीट पार्किंग

$
0
0
वाहतूक कोंडीच्या बजबजपुरीला वैतागलेल्या नाशिककरांना दिलासा मिळू शकेल असे पाश्चात्य देशांमधील पार्किंग व्यवस्थेप्रमाणे असलेले राज्यातील पहिले ऑफ स्ट्रीट पार्किंग नाशिकरोडला साकारणार आहे.

थकबाकीसाठी प्रशासनाची कसरत

$
0
0
चालू आणि मागील अशी मिळून २५ हजारापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या २ हजार ५३३ मिळकतधारकांना घरपट्टी विभागाने नोटी​सा बजावल्या आहेत. यातून तब्बल २५ कोटी १० लाख रुपयांची वसुली होणे महापालिका प्रशासनाला अपेक्षित आहे.

नियमावलीचा ‘उतारा’

$
0
0
शहरातील मोकळ्या भूखंडावरील अस्वच्छता रोखण्यासाठी आरोग्य विभाग नियमावली तयार करीत असून लवकरच ती मंजुरीसाठी महासभेला सादर करण्यात येणार आहे.

नाशिककरांना भरणार हुडहुडी

$
0
0
नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. त्यासंबंधीचे पत्र विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. नाशिकचा पारा सध्या १२ अंश सेल्सिअसच्या आसपास असून त्यात आणखी घसरण होऊन तो निच्चांक गाठणार का, याबाबत उत्सुकता आहे.

फोटो झाले, कृती कधी?

$
0
0
एखादी मोठी मोहीम राबवायची असेल तर त्यासाठी सर्वांगीण प्रयत्नांची आणि झोकून देऊन काम करण्याची गरज असते. आपला देश सर्वांगसुंदर असावा यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठ्या महत्वाकांक्षेने स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली.

औद्योगिक बससेवा : कौतुकास्पद उपक्रम

$
0
0
नाशिकची मदर इंडस्ट्री असलेल्या महिंद्रा कंपनीने कामगारांसाठी बससेवा सुरू केली आहे. वायू प्रदूषण, कामगारांची सुरक्षितता, इंधनांचे ज्वलन आणि वेळेची बचत या सर्वच स्तरांवर औद्योगिक क्षेत्रात बससेवा अत्यंत प्रभावी आहे.

मनमाड-इंदूर रेल्वे साकारणार

$
0
0
गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग साकारणार असल्याची ग्वाही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे. यासंदर्भात धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी प्रभू यांची नवी दिल्लीत भेट घेतली आहे.

नियतीच्या नोबॉलचा ‘ह्युज’ब्लो..!

$
0
0
ज्या क्षणी आपल्या भावाइतक्याच जवळच्या असलेल्या मित्राला बॅटींग करतांना गंभीर दुखापत झाल्याचे कळले, त्याच क्षणी त्याचेही चित्त अस्वस्थ झाले. पुढच्याच मिनिटाला एससीजीवरील प्रेसबॉक्सला फोन करून त्याने हॉस्पिटलचे नाव विचारले आणि क्षणार्धात भरगाव वेगाने त्याची कार सेंट व्हिन्सेंट हॉस्पिटलच्या परिसरात दाखल झाली.

शिक्षकावरील कारवाई चुकीची

$
0
0
नाशिक महापालिकेच्या वडाळा गावातील शाळा क्रमांक १८ मधील शिक्षक शाह मुस्ताक सांडू यांच्यावर झालेली कारवाई अन्यायकारक आहे. याबाबत फेरचौकशी करावी, अशी मागणी विविध ११ शिक्षक संघटनांनी केली आहे.

सुरक्षारक्षक युनियनचे बेमुदत उपोषण सुरू

$
0
0
महाराष्ट्र सुरक्षा रक्षक युनियनच्या वतीने कामगार उपायुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास मंगळवारपासून सुरुवात झाली. हिन्दुस्तान नॅशनल ग्लास कंपनीत कामावरून कमी करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे, अशी मागणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उत्तमराव भोसले यांनी केली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images