Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शहरावर डेंग्यूचे संकट जैसे थे

$
0
0
महापालिका हद्दीतील १०५ घरांमधील १६९ भांड्यामध्ये डेंग्यू आजाराच्या फैलावास कारणीभूत ठरलेल्या डासांच्या अळ्या आढळून आल्या असल्याची बाब समोर आली आहे. वैद्यकीय विभागाने गत सप्ताहात केलेल्या सर्व्हेक्षणात डेंग्यूचा फैलाव जोमाने होत असल्याचेही दिसून येते.

डेंग्यू आता विशेष महासभेत!

$
0
0
आयुक्त आणि आरोग्य अधिकारी हजर नसल्याचे सांगत गुरूवारी महासभेत सादर झालेल्या डेंग्यूवरील लक्षवेधीवर कोणतीही चर्चा झाली नाही. विरोधी पक्षाने याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला; मात्र विशेष महासभेचे आयोजन करण्याचे आश्वासन देत महापौर अशोक मुर्तडक यांनी हा विषय गुंडाळून टाकला.

आधुनिक भारताची पायाभरणी नेहरूंकडूनच

$
0
0
आधुनिक भारताची पायाभरणी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी केले. नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

`थँक्यू सर!`

$
0
0
व्हॉटस अॅपच्या एका नवीन ग्रुपचे आमंत्रण आले. मी खुश होऊन ते स्वीकारले. ग्रुप होता आमच्या सिरियलचा. पण कलाकारांचा नाही तर मेकअपवाला फिरोज, कॉश्चुमवाला राजू, असिस्टंट डायरेक्टर अक्षय, हेअर ड्रेसर सदफ आणि स्पॉटवाले पंडितजी यांचा.

कर्मयोगींवर निबंध स्पर्धा

$
0
0
यशवंतराव देवमामलेदार महाराजांच्या १२७ व्या पुण्यत‌िथीच्या न‌िम‌ित्ताने व कै. जयवंतराव कुलकर्णी यांच्या स्मृतीप्र‌ित्यर्थ माध्यम‌िक व‌िद्यालयाच्या व‌िद्यार्थ्यांसाठी न‌िबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

शिक्षण मंडळ समितीसाठी ठरणार धोरण

$
0
0
शिक्षण मंडळाऐवजी शिक्षण समिती स्थापन करण्याचे आदेश सरकारने दिले असून, या समितीची निर्मिती करण्यासह धोरण ठरवण्यासाठी लवकरच विशेष महासभेचे आयोजन केले जाणार आहे. महापालिका शिक्षण मंडळ रद्द करण्याच्या निर्णयाबाबत महापालिकेला सरकारचे पत्र प्राप्त झाल्यानंतर गुरूवारी त्यावर चर्चा झाली.

रखडलेल्या प्रकल्पांसाठी खासदारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

$
0
0
राज्यातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीत नाशिक जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी सिंहस्थ निधीच्या प्रश्नांसह रखडलेल्या प्रकल्पांचा पाढा मुख्यमंत्र्यासमोर वाचला.

उपायुक्त पगारांना महासभेचा रेड सिग्नल

$
0
0
प्रतिनियुक्तीवर प्रशासन उपायुक्त म्हणून रूजू झालेल्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत राज्य सरकारने एक आदेश दिलेला असताना प्रशासनाने परस्पर हा आदेश फिरविल्याची बाब महापौर अशोक मुर्तडक यांनीच सभागृहाच्या निर्दशनास आणून दिली.

शिंदे, कदम करणार नुकसानीची पाहणी

$
0
0
नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी राज्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे आणि माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम शुक्रवारी (ता.२१) नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

अवघड दुखणं

$
0
0
अतिक्रमण मोहीम राबविणे, भंगार बाजार हटवणे, खतप्रकल्पात सुधारणा करणे, घरकुलातील भ्रष्टाचार अशा अवघड दुखण्यांवर महापालिकेला अद्यापपर्यंत रामबाण उपाय सापडलेला नाही. नूतन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी देखील सिंहस्थालाच प्राधान्य देण्याचे सूतोवाच केले आहे.

नाशिक कारखान्याची चाके यंदाही बंदच

$
0
0
नाशिक तालुक्याला एकेकाळी वैभव प्राप्त करून देणाऱ्या नाशिक सहकारी साखर कारखान्याची चाके यंदाही बंदच राहणार आहेत. कर्जामुळे बुडलेला हा कारखाना सुरू होणार नसला तरी संचालक मंडळ निवडणुकीच्या तयारीला लागले आहे.

निसाकाला प्रतीक्षा गळीत हंगामाची

$
0
0
निफाड तालुक्याला खऱ्या अर्थाने संपन्नता प्राप्त करून देणाऱ्या मात्र, गत काही वर्षांपासून आर्थिक कोंडीत सापडलेल्या निफाड साखर कारखाना व रानवड साखर कारखान्याची चाके वेगाने फिरविण्याचा प्रयत्न असून, त्यादृष्टीने दोन्हीही साखर कारखान्यावर जय्यत तयारी केली जात आहे.

रावळगावचे बॉयलर पुन्हा पेटणार कधी?

$
0
0
मालेगाव तालुक्यातील गिसाका (आर्मस्ट्राँग) कारखान्याची गळीत हंगामाची तयारी पूर्ण झाली असताना तालुक्यातील दुसरा रावळगाव खासगी साखर कारखाना मात्र गेल्या तीन वर्षापासून बंद अवस्थेत आहे. या वर्षीदेखील गळीत हंगामात कारखान्याचा बॉयलर प्रज्वलित होण्याची शक्यता कमीच आहे.

वसाकाची चाके अडकली कर्जाच्या फेऱ्यात

$
0
0
तत्कालीन चेअरमन डॉ. जे. डी. पवार यांच्या हातून झालेल्या अयशस्वी शस्त्रक्रियेमुळे विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचा ऑक्सिजन पूर्णत: बंद पडल्याने कारखाना निपचित पडला आहे.

मालेगावची सिनेमागृहे झाली हायटेक

$
0
0
मालेगावात करमणुकीची साधनं कोणती? अशा प्रश्न जर मालेगावात कोणी विचारला तर त्याला पटकन उत्तर मिळेल ते म्हणजे चित्रपटगृह! सुमारे पन्नास वर्षांपूर्वीही करमणुकीच्या बाबतीत ही परिस्थिती होती अन् आजही कायम आहे.

येवला ग्रामीण रुग्णालयातील सेवा सुरळीत

$
0
0
शहरातील बहुचर्चित ग्रामीण रुग्णालयातील असुविधांबाबत रुग्ण कल्याण समितीनेच लक्ष घातल्याने अखेर रुग्णांना सुरळीत व सुलभ सेवा मिळू लागली आहे. विशेष म्हणजे केवळ वायर जळाल्याने बंद पडलेले एक्स-रे मशिन देखील आता सुरळीत सुरू झाले आहे.

नागरिकांना रस्त्यांची प्रतीक्षा

$
0
0
म्हाडाच्या कॉलनीतील वीस हजार स्किमच्या लोकवस्तीतील खोदलेले रस्ते पुन्हा नव्याने कधी दुरुस्त केले जाणार याची स्थानिक रहिवाशांना प्रतीक्षा लागली आहे. महापालिकेने गेल्या वर्षी सांडपाण्याची लाईन टाकण्यासाठी या कॉलनीतील रस्ते खोदून ठेवले.

अतिक्रमण हटविण्याबाबत स्थानिक गावकरी आग्रही

$
0
0
‘लांडगा आला रे आला’ या मराठीतील म्हणीप्रमाणे सातपूर गावातील अतिक्रमणधारक व्यावसायिक सध्या धास्तावलेल्या मनस्थितीत आहे. दोन दिवसांपासून ते व्यवसाय करण्यासाठी येतात, मात्र विक्रीचे साहित्य झाकूनच उभे राहतात.

बांधकाम विभागाच्या भांडाराला ठोकले टाळे

$
0
0
नविन नाशिक, सिडकोतील आरोग्याच्या प्रश्नाबाबत बांधकाम विभागातील भांडाराचे कर्मचारी कामच एकत नसल्याचा आरोप करीत नगरसेविका रत्नमाला राणे व डी. जी. सूर्यवंशी यांनी दिव्या अॅड लॅबसमोरील बांधकाम विभागाच्या भांडाराला गुरुवारी टाळे ठोकले.

दहशतवाद्यांविरुद्ध पोलिसांचा कृती आराखडा

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळा काळात नाशिकमध्ये दहशतवादी हल्ल्यासारखी घटना घडण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. दहशतवादी कारवायांच्या बिमोडात अग्रणी भूमिका बजावणाऱ्या फोर्स वनच्या अधिकाऱ्यांना या प्लॅनची माहिती देण्यात आली.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images