Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्या

0
0
बागलाण तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. गारपिटीच्या नुकसानभरपाईपासून अजूनही काही शेतकरी वंचित असताना आता या नुकत्याच झालेल्या नुकसानीची भरपाई केव्हा मिळणार या विंवचनेत शेतकरी सापडले आहेत.

गरजू शाळांना मिळणार शिक्षक

0
0
शिक्षण विभागामार्फत कमी पटसंख्या असलेल्या २१ शाळांवरील शिक्षकांच्या समायोजनाबाबत नियोजन करण्यात आले आहे. ज्या शाळांना शिक्षकांची आवश्यकता आहे, त्या शाळांवर सदर शिक्षकांची नेमणूक करण्याबाबत महत्वपूर्ण ठराव पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत पारीत करण्यात आला आहे.

प्रधान सचिवांनी केली भातपिकांची पाहणी

0
0
इगतपुरी तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या भातपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या व्यथांची दखल घेत राज्याचे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांनी विभागीय आयुक्तांसह बेलगाव तऱ्हाळे परिसरातील नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी केली.

उत्पादन खर्च निघणेही अवघड अवकाळी

0
0
तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने द्राक्ष उत्पादकांचे अर्थकारण बिघडले आहे. वर्षभर लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या बागा उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.

भाजीपाला कडाडणार

0
0
अवकाळी पावसानंतर भाजीपाल्याच्या आवकेत दोन दिवसानंतर घट झाली असून दरात वाढ झाली आहे. सरासरी पाच रुपयांनी दर वाढले असून आगामी दिवसात दर आणखी कडाडण्याची चिन्हे आहेत.

शहरात वाहनचोरट्यांचा हैदोस

0
0
शहरात सक्रिय झालेल्या वाहनचोरांच्या टोळीला पकडणे पोलिसांपुढे आव्हान ठरू लागले आहे. नाकाबंदी व तत्सम कारवाया कुचकामी ठरत असून वाहनचोऱ्या रोखाव्यात कशा, हा प्रश्न पोलिसांना सतावू लागला आहे.

अतिक्रमण हटवून साकारणार उद्यान महिंद्रा

0
0
अशोकनगर ते कार्बननाका रस्त्याच्या बाजूला लवकरच उद्यान साकारणार आहे. महिंद्रा मटेरिअल गेटलगत काढण्यात आलेल्या जागेवर महिंद्रा कंपनीकडून उद्यान केले जात असून त्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.

एमआयडीसी कॉलनी होणार ‘सुपर क्लीन’

0
0
मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे अवकळा आलेल्या सातपूरमधील एमआयडीसी कॉलनीत बुधवारी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. या कॉलनीत मूलभूत सुविधांची वानवा असल्याचे वृत्त ‘मटा’ने प्रसिद्ध केल्यानंतर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी ही कॉलनी सुपर क्लीन केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.

भंगार बाजार हटणार का?

0
0
नाशिक महापालिकेत अनेक वर्षांनंतर चोख प्रशासन हाताळणारे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यामुळे मिळाले आहेत. यामुळे आयुक्तांकडून अनेकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातच सातपूर अंबडलिंकरोडवरील अनधिकृत भंगार मार्केट आयुक्त साहेब काढणार कधी, असा सवाल मार्केट परिसरात राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

जिद्द, मेहनतीला हवे सदिच्छांचे बळ!

0
0
भारत सरकारच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्यावतीने इंदूर येथे आयोजित चौदाव्या राष्ट्रीय पॅरालिंपिक जलतरण स्पर्धेत नाशिकच्या श्रेयस द्विवेदीने शंभर मीटर फ्री स्टाईल, बॅकस्ट्रोक, बटरफ्लाय, ब्रेस्टस्ट्रोक अशा चारही प्रकारात सर्वोत्तम कामगिरी नोंदवत चार सुवर्णपदकांची कामगिरी केली.

मेरे पास क्लायमेट है!

0
0
आज जगभर पर्यावरण व वातावरण या विषयावर जागतिक शिखर बैठका होत आहेत. विकसित देशांबरोबर विकासशील देशांमध्ये देखील याबाबत जागृकता वाढते आहे. पर्यटनासाठी पहिली बाब जी हवी असते, ती म्हणजे अल्हादायक व सुखकर वातावरण.

कॅन्टोंमेन्ट बोर्डाच्या निवडणुकीचे पडघम

0
0
देवळाली कॅन्टोंमेन्ट बोर्डाची निवडणूक ११ जानेवारीला होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. पक्षाच्या माध्यमातून नवीन उमेदवारीची चाचपणी तसेच पॅनल निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. मतदार नोंदणीसाठी इच्छुक उमेदवारांनीच पुढाकार घेतला आहे.

झपाट्याने घटतेय पारसींची संख्या

0
0
केंद्र सरकारच्या ‘जियो पारसी’ योजनेला नाशिकमध्ये फारसा प्रतिसाद मिळू शकलेला नसून जिल्ह्यात पारसी समाजाची लोकसंख्या दरवर्षी दहाने घटत असल्याचे चित्र आहे.

सचिवांना ‘पालकत्वाचा’ विसर

0
0
जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतपिकांचे अतोनात नुकसान झालेले असताना पालक सचिवांनी या नुकसानीचा धावता आढावा घेतल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे.

इंदिरा गांधींना आदरांजली

0
0
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त एमजी रोडवरील काँग्रेस कमिटी कार्यालयात आदरांजली वाहण्यात आली. शहराध्यक्ष शरद आहेर, माज‌ी आरोग्यमंत्री शोभा बच्छाव, मनपा गटनेते उत्तमराव कांबळे यांनी गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

बलात्कार प्रकरणाच्या सीआयडी चौकशीची मागणी

0
0
येवला येथे आदिवासी तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे.

सरावातून सहज शिकता येते जादू

0
0
जादू ही जगातील सर्वात सोपी कला असून अधिकाधिक सरावाने ती अवगत करता येते. या कलेतून आपला स्मार्टनेस लोकांना दाखवता येतो. जादूमधून क्षणिक आनंद मिळतो.

स्वच्छतेसंदर्भात महापालिका आक्रमक

0
0
नाशिक शहरात पसरलेल्या डेग्यूंच्या साथीची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून आयुक्तांनी शहर स्वच्छतेबाबत रोड मॅप तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत.

परंपरा जपणारी ‘तुक्याची आवली’

0
0
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ५४ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये बुधवारी गिरिश जुन्नरे ‌लिखित व सुरेश गायधनी दिग्दर्शित ‘तुक्याची आवली’ हे नाटक सादर झाले.

बॉर्डरलेस फाऊंडेशनचा वैद्यकीय सेवेवर भर

0
0
भारताचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्म‌ीरच्या खोऱ्यांने यंदा अनेक वर्षात प्रथमच नैसर्गिक आपत्तीचा दाहक अनुभव घेतला. या परिसराच्या मदतीसाठी सर्वच द‌िशेने मदतीचे ओघ आले असले तरीही मुख्यत: वैद्यकीय सेवा आण‌ि औषधांच्या क्षेत्रात नाश‌िकने महाराष्ट्रातून सर्वाध‌िक योगदान द‌िले आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images