Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सी प्लेनला आळंदी, वालदेवीचा पर्याय

$
0
0
सी प्लेनसाठी वादात सापडलेल्या गंगापूर धरणाऐवजी आळंदी किंवा वालदेवी धरणाचा पर्याय पुढे आला आहे. यासंदर्भात नाशिकमधील संघटनांनी पुढाकार घेत नाशिकला सी प्लेन सेवा सुरू करण्यासाठी आग्रह धरला असून यामुळे नाशिकच्या पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची चिन्हे आहेत.

शहरात प्रीपेड रिक्षा सेवा

$
0
0
येत्या सिंहस्थापूर्वी शहरात मीटर व टेरीफ नुसार, प्रीपेड सेवा व शेअर रिक्षा प्रमाण‌ित भाड्यानुसार मिळावीत म्हणून नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीतर्फे शहराचे पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांना मागणी केली होती.

डासांसाठी दिवसाला ६३ हजारांचा फवारा

$
0
0
आकाराने किरकोळ समजल्या जाणाऱ्या डासांना रोखण्यासाठी महापालिका पाण्याप्रमाणे पैसे खर्ची घालत आहे. मागील १२ महिन्यांच्या कालावधीत प्रशासनाने दिवसाला ६३ हजार ३३३ रूपयांप्रमाणे महिन्याला १९ लाख तर वर्षात अडीच कोटी रूपये ठेकेदारांच्या घशात घातले.

शिवाजी स्टेड‌ियम ताब्यात घेण्याच्या हालचाली

$
0
0
जिल्हा परिषदेकडून जिल्हा क्रिडा संकुल समितीकडे वर्ग करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी स्टेड‌ियम जिल्हा परिषदेच्या ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नवनिर्वाचीत अध्यक्षा विजयश्री चुंभळे यांनी स्टेड‌ियमसह जिल्हा परिषदेच्या गाळयांची माह‌िती मागीतली आहे. त्यामुळे पुन्हा स्टेड‌ियमसह गाळ्यांवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

गोंदे टोलवसुली बंद होणार?

$
0
0
मुंबई-आग्रा हायवेच्या चौपदरीकरणाअंतर्गत गोंदे येथे होत असलेली टोल वसुली बंद होण्याची दाट शक्यता आहे. गोंदे ते वडपे यादरम्यान हायवेची स्थिती अत्यंत दयनीय असल्याने याप्रकरणी दाखल जनहित याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.

`एटी` थकले; पाटलांची पराभवाची हॅटट्रिक

$
0
0
राष्ट्रवादीचे ए. टी. पवार यांनी नऊ वेळा विधानसभेत प्रतिनिधीत्व केले. मात्र, त्यांचा शेवट पराभवाने झाला आहे. वयाची साथ न राहिल्याने त्यांच्याकडे आपल्या वारसांना बळ देण्याशिवाय कोणताही पर्याय नाही.

अतिरिक्त शिक्षकांच्या नजरा सरकारकडे

$
0
0
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतरांचे लक्ष आता नूतन सरकारच्या निर्णयाकडे लागले आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या इतर समस्या देखील सोडवण्यास सरकारने प्राधन्य द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दोन दिवसात १४५९ जणांची परीक्षा

$
0
0
वन विभागाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या वनरक्षकाच्या १0३ जागांसाठी भरतीसाठी गेल्या दोन दिवसात १४५९ जणांनी परीक्षा दिली आहे. सोमवारी शारी‌रिक चाचणीचा अंतिम दिवस असून त्यास ७०० ते ८०० परीक्षार्थी हजर राहण्याची शक्यता आहे.

जिल्हा बँकेचे संचालक मोकाट?

$
0
0
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चौकशीच अडथळ्यांची शर्यत उभ्या करणाऱ्या माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जाता जाता भ्रष्ट संचालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तीन वर्षाचा फेरलेखापरिक्षण अहवाल हर्षवर्धन पाटील यांनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच रद्द केल्याचा प्रकार समोर आला आहे.

‘चोपडी’त मिळतात हरवलेली नाती

$
0
0
विवाहयोग सुरु झाला की गोत्र, नाडी याबरोबरच गणगोताचाही शोध सुरू होतो. घरात वडिल मंडळी नसेल तर आजोबा, पणजोबा कधी, कधी खापरपणजोबा यांचे नाव शोधण्यासाठी मदत घेतली जाते ती विधी पार पाडणाऱ्या ब्रह्मवृंदाची. आडनावाची माहिती घेऊन आपल्या खापरपणजोबांपर्यंतचा इतिहासच ते सांगतात.

कौशल्याधारीत शिक्षणक्रमांना प्राधान्य देणार

$
0
0
विद्यार्थ्यांना केवळ पदवी शिक्षण देऊन न थांबता कौशल्य विकसित करणारे शिक्षण देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. पुढील शैक्षणिक वर्षापासून तंत्रज्ञानाची मदत घेऊन पारंपरिक विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या बरोबरीनेच मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यास एकाच वेळी अधिक कौशल्ये आत्मसात करणारे शिक्षण मुक्त विद्यापीठातर्फे सुरु करण्यात येतील.

नाशिक मनसेला भाजपचा सुरूंग?

$
0
0
मनसेचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी आमदार वसंत गीते यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता ते भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती हाती येत आहे. गीतेंसह मनसेचे १८ नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा भाजपने केला आहे. त्यामुळे मनसेचं 'नाशिक' धोक्यात आलंय.

येवल्यातील पूल बनला धोकादायक

$
0
0
येवला शहरातील पारेगाव रोडलगतच्या अनेक वसाहतींमधील नागरिकांसह शालेय विध्यार्थ्यांना मध्यममार्ग असलेला हुडको वसाहती जवळचा पूल गेल्या अनेक दिवसांपासून खचल्याने तेथून मार्गक्रमण करणाऱ्यांना तारेवरची मोठी कसरत करावी लागते आहे.

‘SMS’सेवेचे होणार पुनरुज्ज‌ीवन

$
0
0
शहर स्वच्छता मोह‌‌ीम परिणामकारतेने चालू ठेवण्यासाठी बंद पडलेल्या एसएमएस सेवेला गती देणे, तसेच सामाजिक संस्थाचा पुढाकार वाढवण्यासाठी प्रयत्न करणे याबाबत आज महापालिकेत झालेल्या बैठकी दरम्यान महापौर अशोक मुर्तडक आणि आयुक्त सोनाली पोंक्षे यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली.

मोकळ्या भूखंडाची अखेर महापालिकेने केली साफसफाई

$
0
0
‘मोकळे भूखंड ठरतायेत आजारांना निमंत्रण’ हे वृत्त ‘मटा’मध्ये प्रसिद्ध होताच महापालिकेच्या आरोग्य विभागाने याकडे लक्ष घालत सातपूर भागातील मोकळ्या भुखडांची साफसफाई सुरू केली आहे.

जयंत पाटलांना जामीन

$
0
0
ट्रॅव्हल्स चालकाकडून १० हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक असलेल्या उपप्रादे‌शिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्यासह एजंट सुन‌ील व्यास यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे.

त्र्यंबकला होणार ‘फायटॅरॉईड’चा वापर

$
0
0
त्र्यंबकेश्वर येथे बंदिस्त करण्यात आलेल्या गोदावरी नदीवर फायटॅरॉईड तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यासंदर्भात राष्ट्रीय पर्यावरण इंजिनिअरींग इन्स्टिट्यूट (नीरी) च्या अधिकाऱ्यांनी नाशकात येवून चर्चा केली आहे.

जुने सिडकोत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट

$
0
0
जुने सिडको परिसरातील नागरिक मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाटाने त्रस्त झाले आहेत. रात्रभर भुंकणे आणि दिवसा वाहनधारकांच्या मागे धावणे, पादचाऱ्यांवर गुरगुरणे हाच त्यांचा दिनक्रम असतो. महापालिकेने या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी त्रस्त नागरिक करत आहेत.

चौफुल्यांकडे लक्ष कोण देणार ?

$
0
0
मुंबई - आग्रा महामार्गावरील जत्रा हॉटेल चौकाबरोबरच या मार्गावरील अन्य चौफुल्यांचा प्रश्नही गंभीर झाला आहे. लोकप्रतिनिधींनी सुस्त प्रशासनाला आंदोलन करुन जागे करण्याची गरज आहे. मात्र त्यांच्याकडूनही नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सी प्लेन चाचणीकडे MTDC ची पाठ

$
0
0
सी प्लेनच्या सेवेत सहआयोजक असलेल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) सोमवारच्या चाचणीकडे पाठ फिरविल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र, शहरातील स्वयंसेवी संघटना आणि हॉटेल्सच्या पदाधिकाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे या चाचणीवेळी सहभागी होत या सेवेला पाठिंबा दिला आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images