Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

... तरीही भुजबळांचा ' दबदबा ' कायम

$
0
0
गेली १५ वर्षे राज्यात एकमेकांच्या हातात हात घालत सत्ता गाजविणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सरकार गेलं. आघाडी सरकार पायउतार होतानाच गेली १० वर्षे पालकमंत्री अन् राज्यातील महत्त्वाची खाती सांभाळणारे छगन भुजबळ यांचंही मंत्रीपद राहिलं नाही.

न्हाई, कंत्राटदाराला नोटीस

$
0
0
मुंबई-आग्रा महामार्गातील गोंदे ते वडपे या दरम्यान असलेली रस्त्याची दुरवस्था आणि फुकटच्या वाहनांची शहानिशा या प्रकरणी मुंबई हायकोर्टाने नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (न्हाई) व रस्ता कंत्राटदाराला नोटीस बजावली आहे.

डॉक्टरांची काश्मीरमध्ये रुग्णसेवा

$
0
0
जम्मू-काश्मिर राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी शहरातील बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशनसोबत २० डॉक्टरांचे एक पथक नुकतेच रवाना झाले. या मदत पथकाला महापौर अशोक मुर्तडक यांनी आयुर्वेद कॉलेजच्या प्रांगणातून हिरवा झेंडा दर्शवला.

दलित संघटना उतरल्या रस्त्यावर

$
0
0
‘हो रहे दलितोंपे अत्याचार, क्यूँ सो रही गूंगी सरकार’, ‘अरे का झाले षंढ, करा अन्यायाविरुध्द बंड’, यासारख्या आक्रमक घोषणांद्वारे हजारो दलित बांधवांनी नाशिक शहर दणाणून सोडले. अहमदनगरच्या पोलिस अधीक्षकांना निलंबित करा, दलित अत्याचाराचे खटले जलदगती न्यायालयामध्ये चालवा यांसारख्या अनेक मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.

ट्रक चालकाला लुबाडले

$
0
0
मी पोलिस निरीक्षक असून, तू मला चुकीच्या बाजूने ओव्हरटेक केला आहे, असे सांगत ट्रक चालकाजवळील लायसन, मोबाईल आणि रोख रक्कम असा १३ हजारांचा मुद्देमाल लांबविण्यात आला. ना‌‌शिक-पुणे महामार्गावर दारणा पूल ते नाशिकरोड यादरम्यान रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला.

... तरीही महापौर कायम

$
0
0
मनसेचे माजी आमदार वसंत गिते यांनी सोमवारी प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला. यानंतर गिते यांच्यासह पक्षाचे १५ ते १७ नगरसेवक भाजपाच्या वाटेवर असल्याच्या वृत्ताने महापालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले.

नगरसेवकांनीच फोडला गितेंचा फुगा

$
0
0
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या तोंडावर सरचिटणीसपदाचा राजीनामा देवून ठाकरेंवर दबाव टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या वसंत गितेंच्या प्रयत्नांना त्यांच्या समर्थकांसह पक्षातील नगरसेवकांनी खीळ घातली आहे.

बुडत्या जहाजातून उड्या...

$
0
0
बुडत्या जहाजातून उड्या मारण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते. सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जे काही चालले आहे ते या नैसर्गिक प्रवृत्तीशी नेमके मेळ साधत आहे. लोकसभा निवडणुकीपासून मनसेची पीछेहाट सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत तर पक्ष संपत चालल्याचीच चाहूल लागली आहे.

चर्चा भाजप प्रवेशाची

$
0
0
वसतं ग‌िते व त्यांच्या समर्थकांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.‌ भाजपाचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक विजय साने यांनी ग‌ितंेसह अठरा नगरसेवक भाजपाच्या संपर्कात असल्याची माह‌िती प्रसारमाध्यमांना दिली.

राज ठाकरेंच्या दौऱ्याबाबत अनिश्चितता

$
0
0
मुलीच्या अपघातानंतरही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा नाशिकचा दौरा निश्चित होता. मात्र, वसंत गितेंच्या बंडामुळे ठाकरेंचा दौरा आता लांबणीवर पडला असून, या दौऱ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. मुलगीच्या अपघातानंतरही ठाकरेंनी आपण ५ तारखेपासून नाशिकच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे जाहीर केले होते.

लाडक्या प्रवीणची गरूडझेप

$
0
0
शेतकरी कुटुंबातून आलेला आणि अगदी साध्या पेहरावात असूनही आपल्या बीजगणित व विज्ञानातील हुशारीने तसेच नवे ज्ञान आत्मसात करण्याच्या जिज्ञासेतून एके काळी शिक्षकांनाही अचंबित करणारा मनमाडचा प्रवीण दराडे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्वीय सहाय्यक म्हणून मोठ्या पदावर गेल्याने मनमाडच्या लौकिकात भर पडली आहे.

नाशिकला महिन्याभरात विमानसेवा

$
0
0
बहुप्रतिक्षीत असलेली विमानसेवा नाशिककरांना येत्या महिन्याभरात मिळण्याची दाट शक्यता आहे. पुढील आठवड्यात विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांची एचएएलमध्ये होत असलेली बैठक आणि सी प्लेनची सोमवारी झालेली चाचणीच नाशिकच्या विमानसेवेचे संकेत देत आहे.

आत्महत्या नसून विवाहितेचा खूनच

$
0
0
रविवार कारंजा येथील निवासी घरामध्ये झालेला विवाहितेचा मृत्यू गळफासामुळे नव्हे तर गळा आवळल्यामुळे झाला आहे. त्यामुळे या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी मृत विवाहितेच्या पतीसह सासरकडील मंडळींवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक केली आहे.

वाडकरांवर गुन्हा दाखल करा

$
0
0
खोट्या करारनाम्याच्या आधारे मिळकतीचे महसूल बेकायदेशीरपणे लावून तसेच दस्ताचा गैरवापराद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी गायक सुरेश वाडकर यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करा, असे आदेश न्यायालयाने उपनगर पोलिसांना दिले आहेत.

'राज'गड ढासळला

$
0
0
दिवाळीनंतर मनसेत अपेक्षेप्रमाणे फटाके वाजायला सुरुवात झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ना‌शिक दौऱ्यापूर्वीच नाट्यमय घडामोडी घडल्या असून प्रदेश सरचिटणीस वसंत ग‌िते यांच्यासह जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश दायमा यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

ग्रंथ पोहोचणार नेदरलँड दारी

$
0
0
कुसुमाग्रज प्रतिष्ठानने वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी सुरू केलेला ‘ग्रंथ तुमच्या दारी’ हा उपक्रम महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, कर्नाटक, सिल्व्हासामार्गे दुबई, ओमान, बहारिनमध्ये पोचला असतानाच, हा उपक्रम आता त्यापुढचे पाऊल टाकण्यास सज्ज झाला आहे.

इगतपुरी तालुक्यात वनराई बंधाऱ्यांची उभारणी

$
0
0
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात अनेक ग्रामपंचायतींनी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन वनराई बंधारे उभारले आहेत. बेलगाव त-हाळे, धामनगाव, खेड, मोडाळे, शिरसाठे, शेवगेडांग व वाडीवर्हे या ग्रामपंचायतींनी मोठ्या संख्यने बंधारे बांधून नदीक्षेत्रातील पाणी अडविले आहे.

शॉर्टसर्किटमुळे आग लागून कळवणला ट्रकचे नुकसान

$
0
0
कळवण शहरातील संभाजी नगर (गावठाण) येथे मंगळवारी रात्री एक वाजेच्या सुमारास कुमार जंगम यांच्या मालकीच्या माल ट्रकला वाहनातील शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सोबतच शेजारी उभ्या असलेल्या किशोर जंगम यांच्या मालट्रकचेही आगीमुळे नुकसान झाले.

व्यावसायिकांचे पंतप्रधानांकडे गाऱ्हाणे

$
0
0
पार्किंग आणि तत्सम परवाना नसलेल्या व्यावसायिकांनी जबरदस्तीने दुकाने बंद ठेवण्यास पोलिसांकडून भाग पाडले जात आहे. पोलिसांच्या या अरेरावीला शहरातील व्यावसायिक वैतागले असून ही समस्या सुटावी यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच साकडे घातले आहे.

३५० कोटींच्या कर्जावर शिक्कामोर्तब

$
0
0
महापालिकेच्या कर्ज उभारणीच्या प्रस्तावावर अखेर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. सिंहस्थ कामे तसेच घरकुल योजनेसाठी महापालिका ३५० कोटी रूपयांचे कर्ज घेणार आहे. दिर्घकालीन कर्जापोटी महापालिका ६० कोटी रूपयांचे व्याज द्यावे लागणार आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images