Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

भाजपचे शिष्टमंडळ आज राज ठाकरेंना भेटणार

$
0
0
नाशिकचे महापौरपद भाजपला द्यावे, या मागणीसाठी भाजपचे एक शिष्टमंडळ गुरूवारी (२८) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. प्रदेशाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली भाजपचे स्थानिक नेते या शिष्टमंडळात सहभागी होणार आहेत.

भूमीहिनांसाठी RPI चे आंदोलन

$
0
0
देशातील रिक्त जमीन भूमीहिन दलितांना वाटप करावी, जमिनीचे राष्ट्रीयकरण करावे आदी मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षाने नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय महसूल कार्यालयापुढे आंदोलन करण्यात आले. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना निवेदन देण्यात आले.

१० जणांना कुत्र्याचा चावा

$
0
0
शहरातील विविध भागांमध्ये कुत्र्याने दहा जणांना चावा घेतला आहे. यापैकी पाच घटना मखमलाबाद परिसरात, तर तीन घटना अंबड लिंकरोड परिसरात घडल्या आहेत. याखेरीज जिल्ह्यात ६ जणांना सर्पदंश झाला असून, या सर्वांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

‘भीमज्योत’ ब्रेल लिपीतून

$
0
0
परिवर्तन-क्रांतिगीतांचा आंबेडकरी गीत संग्रह ‘भीमज्योत’ हा पहिल्यादांच ब्रेल लिपीतून प्रसिध्द झाला आहे. वामनदादा कर्डक यांच्या ४३ गीतांचा हा संग्रह लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानचे संस्थापक कार्याध्यक्ष प्रा. शरद दिनकर शेजवळ यांनी संपादित केला आहे.

२४ आमदार, ४ खासदार ‘मौनी’बाबा

$
0
0
आदिवासी विकास विभागातील भ्रष्टाचारावर जाहीरपणे बोलणाऱ्या आणि सभागृहात सतत प्रश्न विचारणारे लोकप्रतिनिधीही चौकशी समितीपासून लांब असल्याचे चित्र आहे. विभागातील योजनामधील भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात गेल्या दहा वर्षांत विधानसभेत सर्वपक्षीय आमदारांनी तारांकित प्रश्न विचारले आहेत.

दाम्पत्याला ३ लाखांना लुटले

$
0
0
कार खरेदीसाठी दाम्पत्याने एचडीएफसी बँकेतून काढलेली तीन लाखांची रोकड एक्झ्युकीटीव्ह म्हणून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेली. पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावरील तिबेटीयन मार्केटजवळ बुधवारी दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला.

‘एनए’साठी पूर्वपरवानगी नकोच

$
0
0
विकास आराखडा तयार असलेल्या महापालिका आणि नगरपालिकांच्या हद्दीत जमिनींच्या बिगर शेतीसाठी (एनए) पूर्वपरवानगीची अट रद्द करावी, असा आदेश राज्य सरकारने द‌िला आहे.

गणेशोत्सवातही भारनियमनाचे ‌‌विघ्न

$
0
0
नाशिक परिमंडळातील वीजगळती व थकबाकी असलेल्या काही भागात भारनियमन सुरू असून हे भारनियमन सुरुच रहाणार आहे.

सहा हजार हॉकर्सचा सर्व्हे पूर्ण

$
0
0
शहरातील ६ हजार १३१ हॉकर्सचे बायो मॅट्रीक सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून शहराच्या कानाकोपऱ्यातील हॉकर्सची नोंद पूर्ण होईपर्यंत हे काम सुरू राहणार असल्याची माहिती उपायुक्त डी. टी. गोतीसे यांनी दिली.

घंटागाडी कर्मचाऱ्यांचे उपोषण

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर घंटागाडी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत वर्ग करण्यात यावे, या मागणीसाठी १६ जानेवारीपासून धरणे आंदोलन करणाऱ्यां कर्मचाऱ्यांनी गुरूवारी उपोषणाचे हत्यार उपसले.

सिंहस्थ कामांना मंजुरी

$
0
0
सिंहस्थातील सर्व कामे तसेच प्रशासकीय मान्यता मिळालेली पंरतु वर्कऑर्डर अभावी प्रलंबित असलेल्या कामांना आवश्यकतेनुसार मंजुरी देण्यात येईल, अशी भूमिका महापालिकेच्या प्रभारी आयुक्त सोनाली पोंक्षे-वायंगणकर यांनी घेतली आहे.

दीड लाख खात्यांचे उद्दिष्ट

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या महत्वाकांक्षी पंतप्रधान जन धन योजनेचा जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी औपचारिक शुभारंभ झाला. जिल्हाधिकारी विलास पाटील, महाराष्ट्र बँकेचे विभागीय व्यवथापक राजन लोंढे आणि खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत योजनेचा शुभांरभ करण्यात आला.

नाशिकरोडला इको फ्रेन्डली गणेश

$
0
0
सुखकर्त्या-विघ्नहर्त्या गणेशाच्या आगमनाची जय्यत तयारी नाशिकरोड व परिसरातील नागरिकांनी केली आहे. जेलरोडवर बिटकोचौकाजवळ छोट्या मोठ्या शंभरावर व्यावसायिकांनी व्यवसाय थाटले आहेत.

परताव्याच्या आमिषाने फसवणूक

$
0
0
जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात गुंतवणूक केल्यास दरमहा बक्कळ पैसे देऊ, असे आमिष दाखवून एकाला १५ लाख रुपयांना फसविण्यात आले. सारडा सर्कल जवळील आर. के. इन्वेस्टमेंट या कंपनीवर भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

चला रे, गणेश आणू घरा!

$
0
0
गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात शुक्रवारी गणेशाचे घरोघर आगमन होणार असून, घरातील सजावटी बरोबरच बहुतांश सार्वजनिक मंडळांची तयारी पूर्ण झाली आहे. बाप्पाच्या आगमनासाठी संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण आहे.

पुन्हा तीन लाखांची रोकड लंपास

$
0
0
चोरट्यांवर पोलिसांचा वचक राहिलाय की नाही, असा प्रश्न कुणीही उपस्थित करावा, अशी परिस्थिती शहरामध्ये निर्माण झाली आहे. गुरूवारी पुन्हा एकदा पैशांनी भरलेली बॅग पळविण्याची घटना घडली असून, एका व्यापाऱ्याने ३ लाखांची रोकड गमावली आहे.

राज यांनी उडवली टर

$
0
0
स्थायी समितीचे सभापतीपद हुकल्यानंतर आता महापौरपद पदरात पाडण्यासाठी भाजपच्या पदाधिका-यांनी धडपड सुरू केली असून, बुधवारी भाजपच्या पदाधिकऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची कृष्णकुंजवर भेट घेतली.

महापौर निवडणुकीला आदेशाची प्रतीक्षा

$
0
0
महापौरपदांसाठी आरक्षण काढून नामनिराळे झालेले राज्य सरकार पुढील प्रक्रिया राबवण्याचे आदेश कधी देणार याची प्रतीक्षा महापालिका प्रशासनाला लागली आहे. महापौरपदाची निवडणूक १४ ऑगस्टपर्यंत घेणे गरजेचे असल्याने आजपर्यंत (दि. ३०) सरकारचे लेखी आदेश प्राप्त झालेले नाहीत.

निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांची जमवाजमव

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा कधीही होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनही निवडणूक तयारीच्या कामाला लागले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याने या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे.

मोटरसायकस्वारास लुटले

$
0
0
मोटरसायकलस्वाराला लाथ मारून खाली पाडत चोरट्यांनी १३ हजारांची रोकड हिसकावून नेली. गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास कॉलेजरोड सारख्या वर्दळीच्या रस्त्यावर हा प्रकार घडला. वाहनचालकांना जखमी करून ऐवज लुटण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेल्याने पैसे घेऊन फिरणेही जोखमीचे ठरू लागले आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images