Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शपथपत्रातील गौडबंगाल

$
0
0
आदिवासी विकासंच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी नियुक्त समितीसमोर तक्रार घेऊन येणाऱ्यांकडून शपथपत्र द्यावे लागत असल्याने तक्रारदारांनी समितीकडे पाठ फिरवली आहे.

तपोवनात हंगामी पुलासाठी चाचपणी

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळ्यात तपोवनात नदीकाठावरील गर्दी नियंत्रणासाठी हंगामी पुल (पॉन्टून ब्रिज) तयार करण्यासंदर्भात जिल्हाप्रशासनाने चाचपणी सुरू केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात समिती स्थापन केली असून, समितीच्या अहवालानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

KBC नंतर ‘SVL’चा गंडा

$
0
0
जादा व्याज आणि पैसे दुप्पट करून देण्याच्या आमिषाने फसवणूक झाल्याच्या प्रकारामुळे नाशिककर हैराण झाले असतानाच गुंतवणुकीपोटी महिन्याकाठी पाच टक्क्यांपेक्षा अधिक परतावा देण्याच्या अामिषाने ज्येष्ठांची फसवणूक करणाऱ्या एसव्हीएल कंपनीच्या एका संचालकासह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

वृक्षतोडीने लॅमरोड भकास

$
0
0
देवळाली कॅम्पच्या लॅमरोडवर प्रशासनाकडून झाडांची कत्तल सुरू असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार न पाडताच ही वृक्षतोड सुरू असल्याचा आरोप करीत पर्यावरणप्रेमींनी कोर्टात जाण्याची तयारी सुरू केली आहे.

शेनवड बु. बंधारा बनला धोकादायक

$
0
0
घोटी शहराजवळील शेणवड बु. आणि कांचनगाव शिवारात सुमारे पंधरा वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या दुरुस्ती व देखभालीकडे पाटबंधारे विभागाचे सपशेल दुर्लक्ष झाले आहे. या धरणाच्या बांधावर सुमारे तीन ते चार फुटाचे खड्डे पडले आहेत.

प्रगतीसाठी पशुधन वाढविणे गरजेचे

$
0
0
शेतीसह शेतीपुरक व्यवसायात प्रगती साधण्यासाठी पशुधनात वाढ झाली पाहिजे हा उद्देश समोर ठेवून विविध उपक्रम हाती घेतले आहेत. दूधसंघाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाकडे तालुक्यातील सर्वसामान्य ग्रामस्थ वाटचाल करीत असल्याने समाधान वाटते, असे मत आमदार निर्मला गावित यांनी व्यक्त केले.

गणरायाच्या स्वागताची तयारी अंतिम टप्‍प्यात

$
0
0
भरभर चला अन् तयारी करा, पटापट लागरे कामाला.... गणपती उत्सव आला रे आला, या गाण्याच्या ओळीप्रमाणे यंदाचा गणेशोत्सव एका दिवसावर येवून ठेपला असल्याने शहर व तालुक्यात लाडक्या गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे.

माळेगाव ग्रामपंचायत हद्दीत मोफत वायफाय सेवेचा प्रारंभ

$
0
0
सिन्नर तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायत हद्दीत मोफत वायफाय सेवेचा प्रारंभ पंचायत समितीचे सभापती बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते करण्यात आला. वायफाय सेवा पुरविणारी माळेगाव ही तालुक्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.

डेंग्यूसदृश्य नऊ रुग्‍णांचे नमूने तपासणीसाठी

$
0
0
बागलाण तालुक्यातील नवे निरपूर परिसरा पाठोपाठ मुल्हेर परिसरात चार डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळल्याने त्यांच्यासह अन्य नऊ रुग्णांचे रक्त तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी समाधान राऊत यांनी दिली.

दिगंबर देशमुख यांची शिवसेनेतून हकालपट्टी करा

$
0
0
शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर याच्यावर टीका करणाऱ्या दिगंबर देशमुख यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मिर्लेकर यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असून, देशमुख यांचा हा प्रकार शिवसेना खपवून घेणार नाही.

लासलगावात आता डाळिंब लिलाव

$
0
0
लासलगाव व परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी २९ ऑगस्टपासून गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लासलगाव बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर डाळिंब लिलाव सुरू होणार आहेत. ही माहिती लासलगाव बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील व उपसभापती इंदुताई तासकर यांनी दिली आहे.

८ शिक्षकांवर कारवाईचा बडगा

$
0
0
बागलाण तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता विकास कृती कार्यक्रमाच्या पाहणी दौऱ्यात ताहाराबाद येथील मुले व मुलींच्या प्राथमिक शाळेतील कामकाजात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत.

१० तहसीलदारांना नोटिसा

$
0
0
दैनंदिन पावसाची आकडेवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर न करणाऱ्या जिल्ह्यातील दहा तहसीलदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मंडल अधिकाऱ्यांकडून पावसाची इत्यंभूत माहिती घेवून जिल्हाधिकारी कार्यालयाला दररोज सकाळी माहिती पुरविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

वनव‌िभागाचे कर्मचारी बेमुदत संपावर

$
0
0
व‌िव‌िध मागण्यांच्या पूर्ततेसाठी नाश‌िक ज‌िल्ह्यातील सुमारे चारशेवर वनकर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. नाश‌िक वनवृत्तातील वनरक्षक आण‌ि वनपाल या पदांवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा या संपात सहभाग आहे. व‌िभागीय कार्यालयासमोर या कर्मचाऱ्यांनी ठ‌िय्या द‌िला आहे.

मानस रिसॉर्टच्या वाढीव बांधकामावर हातोडा?

$
0
0
इगतपुरी नगरपरिषदेच्या हद्दीत असलेल्या मानस रिसॉर्टच्या अतिरिक्त बांधकामप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेला नोटीस बजावली आहे. रिसॉर्टच्या बांधकामाला स्थगिती देवून आतापर्यंत झालेले बांधकाम तत्काळ पाडण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

पर्यावरण मंजुरीवरून ग्रामस्थ हातघाईवर

$
0
0
सिन्नरच्या प्रस्तावित मल्टीप्रॉडक्ट विशेष आर्थिक क्षेत्रातील नव्या औष्णिक प्रकल्पाच्या पर्यावरण परवानगीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जाहीर जनसुनावणीत प्रकल्पाच्या मंजुरीवरून ग्रामस्थांमध्येच दोन गट पडले.

नाश‌िक कॅम्पससाठी जागा अखेर ताब्यात

$
0
0
प्रशासकीय परवानग्यांच्या औपचारिकतेचा रखडलेला टप्पा पूर्ण करीत अखेर साव‌ित्रीबाई फुले पुणे व‌िद्यापीठाने नाश‌िक कॅम्पससाठीची जागा ताब्यात घेतली. या टप्प्यामुळे बहुप्र‌त‌ीक्ष‌ेत असणाऱ्या नाश‌िक कॅम्पसच्या कार्याला प्रत्यक्षात गती म‌िळणार आहे.

विनापरवानगी स्टॉल लावणाऱ्यांवर गुन्हा

$
0
0
महापालिकेची परवानगी न घेता रस्त्यावर अनधिकृतपणे स्टॉल लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या मंडप डेकोरेटर्सवर सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डिगोरे मंडप डेकोरेटर्स आणि मे. जोसारभाई डेकोरेटर्स अशी त्यांची नावे आहेत.

जाधव, शेख यांच्यात महापौरपदासाठी चुरस

$
0
0
नाशिक महापालिकेच्या महापौरपदाची सोडत जाहीर झाल्यानंतर सर्वपक्षीय इच्छुक कामाला लागले आहेत. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर महापौर आपल्याकडे ठेवण्यासाठी मनसेनही ताकद पणाला लावली आहे. सभागृह नेते शशिकांत जाधव आणि नगरसेवक सलिम शेख यांच्यातच आता स्पर्धा आहे.

नाशिक मध्य अन् पूर्व मतदारसंघावर NCP चा दावा

$
0
0
विधानसभा निवडणुकीतील नाशिक जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती बुधवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडल्या. जिल्ह्यातून ग्रामीणच्या १२ जागांसाठी ४४, तर शहराच्या तीन जागासांठी १६ अशा ६० इच्छुकांनी बुधवारी मुलाखती दिल्या.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images