Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पुरस्कार जाहीर

$
0
0
संत गाडगे महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने स्वर्गीय डॉ. वसंतराव गुप्ते यांच्या नावाने त्यांच्या २६ व्या स्मृतीदिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या शहरातील अकरा डॉक्टरांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

देवळाली व्यापारी बँकेच्या नव्या शाखेचा शुभारंभ

$
0
0
नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या देवळाली कॅम्प शाखेचे उद्घाटन उत्साहात झाले. बँकेच्या डेटा सेंटर आणि एटीएम सेवेचा शुभारंभही यावेळी करण्यात आला.

प्लास्टिक अन् कचरा मुक्तीचा निर्णय

$
0
0
सटाणा शहर प्लास्टिक व कचरा मुक्त करण्यासाठी १५ ऑगस्टपासून काटेकोरपणे कार्यवाही करण्याचा पालिका प्रशासन व शहरातील महिला मंडळाच्या वतीने सामूहिक निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुलोचना चव्हाण होत्या.

इगतपुरी धरणावर दल लेक!

$
0
0
महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपूरी तालुक्यातील भावली धरणाचा नयनरम्य परिसर विकसित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने कंबर कसली आहे.

‘मद‌िना’ला अतिक्रमणाचा वेढा

$
0
0
मुंबई नाका ते सारडा सर्कल दरम्यान येणाऱ्या मदिना चौक परिसराला अतिक्रमणाने विखळा बसला आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने ट्रक, डंपर, प्रवासी वाहने, बसेस, अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरच उभी केली असल्याने येथून जाताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

बोगस कंपन्यांची राजधानी

$
0
0
पश्चिम बंगाल पाठोपाठ आता महाराष्ट्र बोगस चिटफंड कंपन्यांची राजधानी बनला आहे. गेल्या काही वर्षांत अशा ४१ कंपन्यांनी १० लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची सुमारे ५० हजार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.

सिंथेटीक ट्रॅक डिसेंबर अखेर

$
0
0
नाशिकमधील अॅथलेटिक्सच्या खेळाडूंना सिंथेटीक ट्रॅक नसल्याने सरावासाठी मुंबई पुण्याला धाव घ्यावी लागत होती. ही गरज ओळखून विभागीय क्रीडा संकुलात सिंथेटीक ट्रॅक तयार करण्यात येत असून, हा ट्रॅक डिंसेबरअखेर नाशिककरांच्या सेवेत दाखल होणार आहे.

थोडा है, थोडे की, जरूरत है

$
0
0
सरकारवाड्याच्या वास्तूचे नूतनीकरण सुरू झाले आहे. ब्रिटिशांनी येथे तयार केलेल्या छोटेखानी तुरुंगाची दुर्दशा झाली आहे. वाड्याचा दर्शनी भाग व आतील काही भागाची रंगरंगोटी तसेच सफाईवर पुरातत्त्व विभागाने खर्च केला आहे. उर्वरित कामासाठी निधीची आवश्यकता आहे.

‘हर हर महादेव’चा जयघोष

$
0
0
श्रावण महिन्याला सणांचा राजा असे म्हटले जाते. धार्मिक दृष्टीने श्रावण पवित्र महिना मानला जात असून शिवाची पूजा केली जाते. या महिन्यातील प्रत्येक दिवसाचे महत्व वेगवेगळे आहे. यामुळे पहिल्या श्रावण सोमवारी ना‌शिक शहरासह जिल्ह्यातील शिवमंदिर भाविकांच्या गर्दीने गजबजली होती.

पावसासाठी मुस्लिम बांधवांचे साकडे

$
0
0
येवला शहर व तालुक्यात 'रमजान ईद' मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. ईद निमित्त येवला शहरातील प्रसिद्ध लक्कडकोट इदगाह मैदान व कोर्ट जवळील वलीबाबा इदगाह मैदान या दोन ठिकाणी मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण केले.

इगतपुरीत मुसळधार

$
0
0
इगतपुरी शहरासह तालुक्यात गेल्या ३६ तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या ३६ तासांत सुमारे ३४० मिलिमीटर पाऊस झाला असून एकाच दिवसात २५६ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

दारणा, भावली, भाम, वाकी नद्यांना पूर

$
0
0
इगतपुरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीमुळे जलसाठ्यात व नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील वाहतूक ठप्प

$
0
0
त्र्यंबकेश्वर रस्त्यावर महिरावणी गावाच्या पुढे हॉटेल किनारा व दाते लॉन्स येथे पावसाचे पाणी साचल्याने तब्बल तीन तास रस्ता बंद होता. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांनी नाली खोदून पाणी बाहेर काढले. पाण्यातून वाहने काढताना चालकांची चांगलीच कसरत पहायला मिळाली.

पावसासाठी मुस्लिम बांधवांचे साकडे

$
0
0
येवला शहर व तालुक्यात 'रमजान ईद' मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. ईद निमित्त येवला शहरातील प्रसिद्ध लक्कडकोट इदगाह मैदान व कोर्ट जवळील वलीबाबा इदगाह मैदान या दोन ठिकाणी मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण केले.

सटाण्यात ईद उत्साहात

$
0
0
सटाणा शहरासह तालुक्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात व शांततेत साजरी झाली. येथील ईदगाह मैदानावर सकाळी १० वाजता मुस्लिम समाज बांधवानी मौलाना हाजी नुरी यांच्या उपस्थितीत नमाज पठण केले.

सिंहस्थाबाबत दिशाभूल करू नये

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळ्याचा उल्लेख हा त्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळा असा झाला पाहिजे. तसेच, २०१५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणारच आहे, असे तपोनिधी निरंजनी आखाड्याचे राष्ट्रीय सचिव १०८ ​श्रीमहंत नरेंद्रगिरी महाराज यांनी ठामपणे जाहीर केले.

राष्ट्रवादीचे ‌विलास बच्छाव भाजपच्या वाटेवर

$
0
0
नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे माजी उपसभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष तसेच काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. विलास बच्छाव हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असून लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

विधानसभेसाठी कामाला लागा

$
0
0
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत यश मिळवायचे असून, त्यादृष्टीने कामाला लागावे, अशा सूचना भाजपचे खासदार अशोक नेते यांनी केले. भाजपा आदिवासी आघाडीच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत ते बोलत होते.

मरगळ झटकून कामाला लागा

$
0
0
लोकसभा निवडणुकीतील अपयशाने खचून न जाता कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामाला लागावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी केले.

मिळकतधारकांना एसएमएसची प्रतीक्षा

$
0
0
गेल्या काही वर्षात घरपट्टी तसेच नळपट्टी बिलांच्या वाटपात घोळ असल्याच्या तक्रारी येत असल्याने महापालिका प्रशासनाने २०१४-१५ या आर्थिक वर्षापासून एसएमएस सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>