Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

प्रदर्शनातून संस्कृतीची जोपासणा

$
0
0
विविध दुर्मीळ वस्तू प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या परंपरांचा वारसा पुढे नेता येतो. तसेच, यातून आपल्याला संस्कृतीची जाणीव होते, असे प्रतिपादन महापौर अॅड. यतीन वाघ यांनी केले. प्रभाग ४० मध्ये आयोजित दुर्मीळ नाणी व वस्तूंच्या प्रदर्शनाच्या उद्‌घाटनवेळी ते बोलत होते.

किरकोळ कारणांवरून दोघांचा खून

$
0
0
शहरात खुनाच्या दोन घटना घडल्या. पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून एकाचा धारदार हत्यारांनी वार करून खून करण्यात आला. पंचवटीतील फुलेनगरमध्ये ही घटना घडली.

वाहनचोरीचे शिर्डी कनेक्शन

$
0
0
शहरातून वाहने चोरून त्यांची शिर्डी, कोपरगाव परिसरात विक्री केली जात असल्याचा प्रकार पंचवटी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून १४ मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत.

त्र्यंबकेश्वर प्रशासन झाले सज्ज

$
0
0
आद्य ज्योतिर्लींग त्र्यंबकेश्वर येथे श्रावण महिन्यासाठी मंदिर प्रशासन सज्ज झाले आहे. पाऊस लांबल्याने मध्यंतरी गर्दीचा ओघ कमी झाला होता आता. श्रावण महिन्याचा पर्वकाल लक्षात घेता भाविकांची संख्या नेहमीपेक्षा अधिक असेल असा अंदाज व्यक्त होत आहे.

नाशिकच्या दाम्पत्यास अटक

$
0
0
सुपर पॉवर इन्वेस्टमेंट कंपनीत गुंतवणूक केल्यास त्यावर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकच्या दामपत्याला ओैरंगाबाद पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली आहे. दीपक पारखे आणि द‌िव्या पारखे अशी त्यांची नावे आहेत.

विधानसभेपूर्वी सामान्यांचा कळवळा

$
0
0
विधानसभा निवडणुका जवळ आल्याचे लक्षात घेवून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सर्वसामान्यांची आठवण होऊ लागली आहे. त्यामुळेच जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ झालेल्या पेशंटला आरोग्यदायी पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्यांशी संवाद सुरु केला आहे.

CMनी आदिवासींना डावललं

$
0
0
‘केवळ नामसाधर्म्याचा फायदा घेत धनगर समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट करण्याची मागणी ही असंविधानात्मक असून, याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आदिवासी बांधवांची बाजू ऐकून घेतलेली नाही,’ असा आरोप करत आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी आघाडी सरकारवर मोर्चाद्वारे हल्लाबोल केला.

आला पावसाळा, पालिकेला उमजेना

$
0
0
पेस्ट कंट्रोल करण्याऱ्या ठेकेदारास महापालिकेने नव्याने एका महिन्याची मुदतवाढ दिली आहे. मागील दहा महिन्यांपासून ठेकेदारास मुदतवाढीचा ‘डोस’ देण्यात येत असून, ठेका देण्यासंबंधी कायमस्वरूपी निर्णय केव्हा होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

‘असंघटित कामगारांच्या वेतनासाठी आग्रही’

$
0
0
भारतीय जनता कामगार मोर्चा असंघटित कामगारांना किमान वेतन देण्यासाठी आग्रही राहणार असल्याचे प्रतिपादन कामगार मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रल्हाद पटेल यांनी केले.

पवननगरला विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

$
0
0
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवासाचे औचित्य साधत महापालिकेचे विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांच्यातर्फे गुणवंत विद्यार्थी व जेष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

ठकसेनी जाळी

$
0
0
नाशिकमध्ये सध्या गाजत असलेल्या केबीसीच्या प्रकरणात जे ठेवीदार अडकलेले आहेत, त्यांच्या दुर्दैवी स्थितीबद्दल मला पूर्ण सहानुभूती आहे. त्यांना पद्धतशीरपणाने ठकवलेले आहे हे नक्की. पण ठकसेनांच्या जाळ्यात ते स्वतः होऊन अडकलेले आहेत हे नाकबूल करता येणार नाही. अशी अनेक जाळी आपल्या भोवती सतत विणली जात असतात.

गोळीबार करून दरोडा

$
0
0
नाशिकरोडच्या दत्तमंदिर चौकाजवळील शहाणे ज्वेलर्सवर आज भरदुपारी पडलेल्या दरोड्यात रोकड आणि सोन्याची लुट करण्यात आली.

श्रावणाच्या पहिल्या सरीत वृक्षारोपण

$
0
0
श्रावणाच्या पहिल्या सरीत बालगोपाळांसह राणेनगर परिसर मित्रमंडळातर्फे २५ दुर्मीळ झाडे लावण्यात आली. राणेनगरातील पोलिस को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या जागेतील समाज मंदिराच्या प्रांगणात ही झाडे लावण्यात आली.

`क्रीडा साधना`तर्फे कारगिल दिन साजरा

$
0
0
क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या क्रीडा साधना संस्थेतर्फे दरवर्षी २६ जुलै हा दिवस कारगिल दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. यंदाही एनसीसीच्या ७ महाराष्ट्र बटालियनला प्रशिक्षण देणाऱ्या ३५ सैनिकी अधिकारी व जवानांचा सत्कार करण्यात आला.

ठिय्या मांडलेल्या मनपा कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या

$
0
0
एकाच विभागात तीन वर्षांहून अधिक वेळ कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत आढावा घेण्याचे काम महापालिका प्रशासनाने सुरू केले आहे. १७ जुलै रोजी झालेल्या महासभेत नगरसेवक दिनकर पाटील यांनी सदर प्रश्न उपस्थित केला होता.

‘मानधनावरील नियुक्ती’ येणार स्थायीवर

$
0
0
महापालिका हॉस्पिटल्सच्या सुरक्षेसाठी मानधन तत्त्वावर १५२ कर्मचारी नियुक्त करण्याच्या प्रस्तावावर आगामी स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

मोबाईल हिसकावून पोबारा

$
0
0
पायी चाललेल्या तरुणीच्या हातातील १५ हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून चोरट्याने पोबारा केला. गंगापूररोडवर ही घटना घडली. जागृती संजय पाटील (२०, रा. सिध्दार्थ बंगला, जेहान सर्कल) यांनी गंगापूर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे.

तीन तासांत दरोडेखोर जेरबंद

$
0
0
नाशिकरोडच्या शहाणे ज्वेलर्सवर पडलेल्या दरोड्याच्या शोधासाठी शहर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागले. पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, उपायुक्त संदीप दिवाण, डॉ. डी. एस. स्वामी, अविनाश बारगळ, सहाय्यक आयुक्त हेमराजसिंग राजपूत, फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले.

आता तरी CCTV कॅमरे बसविणार का?

$
0
0
नाशिकरोडच्या दत्तमंदिर चौकाजवळील शहाणे ज्वेलर्सवर रविवारी भरदुपारी दरोडा पडल्यानंतर तरी महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार का, असा सवाल नागरिक आणि व्यावसायिक उपस्थित करत आहेत.

भय इथले संपत नाही...

$
0
0
‘मनप्पूरम गोल्ड लोन’मधून १५ किलो सोने पळवून नेल्याच्या घटनेनंतर नाशिकरोड परिसर चर्चेत आला आहे. नाशिकरोड परिसरातील पोतदार ज्वेलर्स तसेच दैवी चौकातील सराफ दुकानांतही चोरट्यांनी हात साफ करण्याच्या घटना घडल्याने व्यापारी धास्तावले आहेत.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images