Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

घरपट्टीसाठी प्रत्यक्ष होणार पाहणी

0
0
महापालिकेने सुधारित घरपट्टीसाठी नोटिसा बजावल्यानंतर मिळकतधारकांनी शेकडो तक्रारी केल्यात. यासंदर्भात हरकतींची सुनावणी घेतल्यानंतर आता प्रत्यक्ष जागेवर जाऊन मिळकती मोजल्या जाणार आहेत.

लाइफस्टाईल - ब्रॅण्डिंग

0
0
आजकाल माणसाला नाही इतकं महत्व ब्रॅण्डला आलं आहे. माणसाला प्रत्येक गोष्ट ब्रॅण्डेड हवी असते आणि ते वापरण्यात हल्ली आपल्याला एक वेगळंच भूषण वाटू लागलं आहे. थोडक्यात काय तर ब्रॅण्डेड वस्तू वापरणं ही आजच्या युगातली आपली नवीन लाइफस्टाइल होऊन बसली आहे. आपण कोणत्या ब्रॅण्डची वस्तू वापरतो यावरून आपण किती भारी आहोत हे दिसतं, असा आजकाल आपला समज झाला आहे.

अतिरेक्यांचा खात्मा

0
0
दुपारीची वेळ. मुक्तीधाममध्ये मंद घंटानाद सुरू आहे. काही भाविक देवदर्शन करताहेत तर काही मंदिराच्या आवरात बसले आहेत. हार-नारळ विक्रेते आपल्या व्यवसायात व्यस्त आहेत. वाहनांची वर्दळ सुरू आहे.

उड्डाणपुलाखाली साकारणार लँडस्केपिंग

0
0
नाशिक शहरालगत उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या खालची जागा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आली असून या जागेवर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीकडून लँडस्केपिंगचे काम सुरू झाले आहे.

२९ ला विद्यार्थी सत्कार

0
0
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि जेलरोड येथील नगरसेवक शैलेश ढगे यांच्या वाढदिवसानिमित्त दुर्गामाता मंदिर प्रांगणात २६ ते २९ जुलै दरम्यान रक्तदान व रोगनिदान शिबिर, मिनी मॅरेथान व कीर्तन सोहळा होणार आहे.

श्रावणातील गर्दीचे नियोजन

0
0
श्रावणात श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन केले आहे. विशेषत: श्रावणी सोमवारी होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी दक्षता घेतली जाणार असल्याचेही पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

अडचणीतला मदतीचा हात

0
0
समाजातील गरजवंत विद्यार्थ्यांना मदत करण्याचा महाराष्ट्र टाइम्सचा हा उपक्रम अत्यंत स्त्युत्य आहे. ही ‘मटा’ची विश्वासार्हता आहे. दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या या विद्यार्थ्यांसमोर या पायरीवर भवितव्याचे पुढचे स्वप्न असते. आयुष्यातल्या ध्येयाची मजल गाठायची असते.

एअरपोर्टच्या धर्तीवर वॉटरपोर्ट उभारणार

0
0
देशाच्या काही भागात एअरपोर्टच्या धर्तीवर वॉटरपोर्ट उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी येथे केली.

जेएनयुआरएम अन् सिंहस्थासाठी निधी द्या

0
0
जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण (जेएनयुआरएम) योजनेच्या थकीत १०२ कोटी रुपयांसह आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारने तातडीने निधीची उपलब्धता करून देण्याची मागणी महापालिकेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.

पाण्याखालचा थरार

0
0
पक्ष्यांप्रमाणे आकाशात उंच उंच भराऱ्या घेण्याची किंवा निळ्याशार समुद्राच्या तळाशी जाऊन माशांप्रमाणे अनोख्या विश्वात अनिर्बंध विहार करण्याची इच्छा नाही असा माणूस विरळाच म्हणावा!

‘वॉटर टाईट’ प्लॅनिंग गरजेचं

0
0
शतकानुशतके अखंड वाहणारी गोदामाता कधी निश्चल, कधी शांत तर कधी रौद्ररुप धारण करीत असून, तिने आपल्या काठावर वेगळी संस्कृती निर्माण केली आहे. शहरातील नागरिकांना यशस्वी, सुखी, समाधानी व समृध्द करण्याचे कार्य ती आजही करीत आहे.

वल्हव रे नाखवा...

0
0
वॉटर स्पोर्टस् हा नाशिककरांसाठी तसा नवीन खेळ आहे. ज्या ठिकाणी पाण्याची मुबलकता आहे, अशा शहरांमध्ये हा खेळ खेळला जातो. त्या ठिकाणी तो नावारुपाला देखील आला आहे.

विमानसेवेचा मार्ग लवकरच सुकर

0
0
ओझर येथील अत्याधुनिक टर्मिनल आणि सुसज्ज विमानतळ पाहता येथून लवकरच विमानसेवा सुरू होणे आवश्यक असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्याने येथील विमानसेवेचा मार्ग सुकर होत असल्याची चिन्हे आहेत.

हायवेंचे काँक्रिटिकरण

0
0
डांबरी महामार्ग वारंवार दुरूस्त करावे लागतात. त्यामुळे नॅशनल हाय वेंचे काँक्रिटिकरण करणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. हॉटेल एक्सप्रेस इन येथे झालेल्या बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वार्षिक सभेला प्रमुख पाहुणे म्हणून गडकरी उपस्थित होते.

साकारणार स्पोर्टस् क्लब

0
0
गंगापूर धरण परिसरात साकारत असलेल्या पर्यटन महासंकुलात लवकरच अॅडव्हेंचर स्पोर्टस् क्लब सुरू होणार आहे. त्यासाठी १४.५२ कोटी रुपयांच्या निधीला केंद्र सरकारने मान्यता देण्यात आली आहे. या क्लबच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

‘इझीमनी’च्या नावाने फसवणूक

0
0
आर्थिक फसवणुकीचे एकामागे एक प्रकार उघडकीस येत असतात आणि दुसरीकडे फसवणूक करणारी मंडळी रोज नवीन मार्ग शोधून जनतेची फसवणूक करत असते. फसवणुकीचा आणखी एक प्रकार म्हणजे बिनव्याजी किंवा २ टक्क्याने कर्ज घ्या आणि त्यावर ४० ते ५० टक्के सबसिडी मिळवा.

भुजबळांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

0
0
दिल्लीतील नव्या महाराष्ट्र सदनात झालेल्या ‘चपाती राड्या’साठी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जबाबदार धरलंय. सदनाचे निवासी आयुक्त बिपीन मलिक मनमानी करत असूनही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कुठलीही कारवाई न केल्यानंच हे प्रकरण चिघळल्याचा आरोप त्यांनी केलाय.

'ब्ल्‍यू प्रिंट'मध्ये नाशिकचा बोलबाला?

0
0
राज्याच्या विकासासाठी साचेबंद कार्यक्रम असलेली ब्ल्यू प्रिंट तयार करण्याचे काम मुंबईत सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही ब्ल्यू प्रिंट लवकरच समोर आणू, असे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी सांगितले असून राज्याच्या या ब्ल्यू प्रिंटमध्ये नाशिकचा बोलबाला असण्याची शक्यता आहे.

मोर्चाने वाहतुकीचा बोजवारा

0
0
आदिवासी विकास मंत्र्यांच्या नेतृत्वाखालील आदिवासी बांधवांच्या मोर्चामुळे शनिवारी शहराच्या मध्य भागातील वाहतुकीचा चांगलाच बोजवारा उडाला. पोलिसांनी वाहतूक अन्य मार्गाने वळविली असली तरी त्याचा विशेष फायदा झाला नसल्याचेही दिसून येत होते. मात्र, मोर्चा व वाहतूक कोंडीमुळे शहराचा श्वास गुदमरला होता

मुकी झालेली घरे आज

0
0
घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती असं आपण म्हणतो. पण, आजकाल त्यातला प्रेम- जिव्हाळा कमी होत चाललेला दिसतो. घरे मोठी होत आहेत पण घरातील माणसांमधला जिव्हाळा आणि संवाद कमी होतान दिसत आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images