Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शहांच्या निवडीचा नाशकात जल्लोष

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘राइट हॅण्ड’ म्हणून ओळखले जाणारे अमित शहा यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे नाशिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. यावेळी पदाधिकाऱ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण होते.

नाशिकच्या विकासाला रेल्वेने द्यावी गती

$
0
0
रेल्वे अर्थसंकल्पात नाशिककरांच्या वाट्याला निराशा आली आहे. बजेट रेल्वेचे असो की, जनरल असो, सर्वात जास्त महसूल महाराष्ट्राकडूनच मिळतो. तरीही प्रत्येकवेळी महाराष्ट्रावर अन्याय केला जातो. बजेटमध्ये उपसूचनांव्दारे तरतूद करुन नाशिकचा विकास करुन न्याय देता येऊ शकतो.

सीसीटीव्ही बसवा अन् सुरक्षारक्षक नेमा

$
0
0
सर्व बँकानी आठ दिवसांच्या आत आपल्या प्रत्येक शाखेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. तसेच, बँकेमध्ये सुरक्षा रक्षकांची नेमणूक करायलाच हवी, अशा स्पष्ट सूचना बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत.

तेल व्यावसायिक धास्तावले

$
0
0
प्रत्येक ऑईल मिलमध्ये स्वतंत्र प्रयोगशाळा स्थापण्यासह तेलाचे डबे पुन्हा न वापरण्याचा फतवा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) काढल्याने तेल व्यापारी धास्तावले आहेत.

सिमेंटचे दर २५ रुपयांनी वाढणार?

$
0
0
सिमेंटच्या अवास्तव दरवाढीच्याविरोधात नाशिक जिल्ह्यातील बांधकाम व्यावसायिकांनी खरेदी बंद आंदोलन सुरु केले असतानाही सिमेंट कंपन्यांनी गुरुवारच्या केंद्रीय बजेटच्या पार्श्वभूमीवर सिमेंट गोणीचे दर तब्बल २५ रुपयांनी वाढविण्याचा घाट घेतल्याचे सांगितले जात आहे.

जिल्ह्यातील ११ पर्जन्यमापक बोगस

$
0
0
जिल्ह्यात गेल्या वर्षी बसविण्यात आलेल्या ९२ पर्जन्यमापक यंत्रांपैकी तब्बल ११ यंत्रे बोगस असल्याची बाब उघडकीस येत आहे. विशेष म्हणजे, वर्षभराच्या आत झालेल्या बिघाडानंतरही या यंत्रांच्या दुरुस्तीसाठी हजारो रुपयांचा खर्च करण्याच्या हालचाली केल्या जात आहेत.

मालोजीकाका मोगल अनंतात विलीन

$
0
0
निफाड तालुक्याचे माजी आमदार, निसाकाचे माजी अध्यक्ष, सहकार व शिक्षण क्षेत्रातील महान तपस्वी, नाशिक जिल्ह्यातील अत्यंत चतुर नेतृत्व व हजारो कार्यकर्त्यांचे श्रद्धास्थान मालोजीराव (काका) मोगल (वय ८८ ) यांचे मंगळवारी मध्यरात्री वृद्धापकाळाने निधन झाले.

पाच नवीन पोलिस स्टेशन

$
0
0
गृह विभागाने राज्यभरात ६४ नवीन पोलिस स्टेशन निर्माण करण्यास हिरवा झेंडा दाखविला असला तरी त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागाच्या वाट्याला अवघी पाच पोलिस स्टेशन्स आली आहेत.

कैद्याचा संशयास्पद मृत्यू

$
0
0
जेलरोड येथील मध्यवर्ती कारागृहातील पाण्याच्या टाकीत एका कैद्याचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

नाशिककरांचे ‘बजेट’ बोल

$
0
0
या अर्थसंकल्पात महागाई कमी करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना नाहीत. बेरोजगारी कमी करण्यासाठी कुठलीही दिशा दिसत नाही. सर्वसामान्य जनतेला डोळ्याआड करून सादर केलेल्या या अर्थसंकल्पाने अच्छे दिन कसे येतील ?

प्रशिक्षण विद्यार्थ्यांना उपयुक्त

$
0
0
दहावी नंतर विद्यार्थ्यांना शिक्षण-नोकरी-उच्चशिक्षण यातील ताळमेळ बसविण्यासाठी विद्यार्थ्यांनी जर दहावीनंतर तंत्रशिक्षण घेतले तर विद्यार्थ्यांची पर्यायाने त्याच्या कुटुंबाची आर्थिक तसेच शैक्षणिक बाजू बळकट होते, असे प्रतिपादन उद्योजक हरिष संघवी यांनी केले.

नाकाबंदी, वाहन तपासणी

$
0
0
पुण्यामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसही अलर्ट झाले आहेत. शहरातमध्ये असा अनुचित प्रकार घडू नये यासाठी दुपारपासून शहरातील गर्दीची ठिकाणांची तपासणी सुरू करण्यात आली.

वृक्षतोडीचे गुन्हे दाखलच होत नाही

$
0
0
शहरातील अवैध वृक्षतोडीप्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केल्यास अधिकारी थारा लागू देत नाही. त्यामुळे तक्रार दाखल होत नसल्याचे स्पष्टीकरण विभागीय अधिकाऱ्यांनी वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत दिले.

वाजपेयींनी दिले, मोदींनी का नाही?

$
0
0
अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) सरकारने गेल्या कुंभमेळ्यासाठी निधीची तरतूद केली होती. मात्र, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने २०१५ मध्ये नाशिकमध्ये होत असलेल्या सिंहस्थासाठी निधी का दिला नाही, असा सवाल नाशिककरांनी केला आहे.

अच्छे दिन आ रहे है...

$
0
0
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पद्वारे ‘अच्छे दिन’ येण्याचे संकेत मिळाल्याचा सूर ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे आयोजित ‘अर्थसंकल्प महाचर्चा’ मध्ये मान्यवरांनी व्यक्त केला.

घोटीचा पाणीपुरवठा पूर्ववत

$
0
0
घोटी शहरावरील भीषण पाणीटंचाईचे संकट दूर व्हावे यासाठी आमदार निर्मला गावित यांनी मुख्यमंत्र्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून घोटीसाठी भावली धरणातून पाणी सोडण्यात आले असून घोटीचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाला आहे.

तहसीलदांराच्या खुर्चीला घातला नोटांचा हार

$
0
0
संजय गांधी निराधार योजनेतर्गंत दोघा अपंगाचे अर्ज पात्र असतांना देखील केवळ पैशांच्या मागणीसाठी त्यांना लाभापासून वंचित ठेवले असल्याचा आरोप करत डॉ. माधुरी बाफना व सहकाऱ्यांनी या विभागाच्या तहसीलदारांच्या खुर्चीलाच नोटांचा हार घालून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला.

राष्ट्रवादीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा

$
0
0
मोदी सरकारच्या अच्छे दिनाला दाद न देता आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

मोदी सरकारकडून जनतेची निराशा

$
0
0
नरेंद्र मोदींनी अच्छे दिनाचे स्वप्न दाखवत अब की बार ने जनतेला भुरळ घातली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जनतेने मोठ्या अपेक्षेने भाजपला निवडून दिले.

कमोदनरगवासीयांचा जिवाशी खेळ

$
0
0
कमोदनगरमधील रहिवाशांसाठी मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपूल मोठी डोकेदुखी ठरत आहे. पलीकडे जाण्यासाठी नागरिकांना जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडावा लागतो.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images