Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पाणी चोरांवर कठोर कारवाई

$
0
0
मनमाड आणि येवला येथे पाण्याच्या टंचाईची बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने पालखेड धरणातून शेवटचे आवर्तन सोडण्यात आल्यामुळे या पाण्याची चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर अत्यंत कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

प्रदेशाध्यक्षांना आवरेना झोप...

$
0
0
माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची नव्याने जबाबदारी येऊन पडलेली आहे. रविवारी जेडीसीसी हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात पक्षाच्या निर्धार मेळाव्यात तर त्यांची चक्क डुलकीच घेतली.

‘मनसे’चा नाराज ‘वसंत’ फुलला

$
0
0
नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती पदाच्या निवडणुकीपासून नाराज असलेले मनसेचे वजनदार नेते, आमदार वसंत गिणते ‘राजशिष्टाई’नंतर अखेर ‘राजी’ झालेत. आपण पक्षावर नाराज नसल्याची ग्वाही त्यांनी दिली असून, त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची डोकेदुखी तूर्त तरी दूर झाली आहे.

तहानलेल्या मनमाडला दिलासा

$
0
0
पालखेड डाव्या कालव्यातून मनमाड शहरासाठी आवर्तन सुटल्याने पाणीप्रश्नाने बेजार झालेल्या मनमाडकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र, या हंगामातील हे शेवटचे आवर्तन असल्याने येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर, मनमाड शहरावर भीषण पाणीटंचाईची टांगती तलवार कायम आहे.

पावसाच्या आगमनाने ताडपत्री खरेदीला वेग

$
0
0
महिनाभर दडी मारून बसलेला पाऊस बरसू लागल्याने शेतकऱ्यां घर, शेतमाल, खते, बियाणे यासाठी तर व्यावसायिकांनी मालाचे नुकसान होवू नये, यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

नाशिककरांना पुन्हा ठेंगा

$
0
0
रेल्वे अर्थसंकल्पात नाशिककरांच्या तोंडाला पाने पुसण्याची परंपरा यंदाही कायम राहिली आहे. नाशिक-पुणे, नाशिक-वापी, नाशिक-डहाणू सारख्या मार्गांसाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात आली नाही. टर्मिनन्स किंवा नवीन गाड्यांचीही घोषणा झाली नाही.

कृष्णनगर कचऱ्याच्या कचाट्यात

$
0
0
नगरसेवक बाळासाहेब सानप यांच्या प्रभागात अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, येथे घंटागाडी वेळेवर येत नसल्याची येथील नागरिकांची तक्रार आहे. अनेकदा तक्रारी करूनही महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.

तारांकीत हॉटेलच्या घरपट्टीत वाढ

$
0
0
तारांकीत हॉटेलच्या घरपट्टीत १० टक्के, मद्य आणि सिगारेटवर प्रत्येकी दोन टक्के वाढ करण्याबरोबर औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये असलेल्या भाडेकरूंकडून वाणिज्य पध्दतीने कर आकारणीचा निर्णय महापौर अॅड. यतीन वाघ यांनी घेतला.

महिला डॉक्टरचा विनयभंग

$
0
0
कोर्टाच्या आवारात महिला डॉक्टरचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी घडला. महिलेच्या वडिलांना तसेच भावाला मारहाण करण्यात आली. सरकारवाडा पोलिसांनी सासरे तसेच चुलत सासऱ्यांवर विनयभंगाचा तर तिच्या पतीवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

तुम्हीही यशाचे धनी व्हा!

$
0
0
घरात अठरा विश्व दारिद्र्य असले तरीही रूपेश मात्र मुळातच हुशार. पहिलीपासून दहावीपर्यंत त्याच्या हुशारीचा वारू वेगाने धावतोय. त्याचे वडील विश्वास सातपूर पट्ट्यावर रिक्षा चालवतात.

जिल्हा रुग्णालय पुन्हा गजबजले

$
0
0
गेले सात दिवस पुकारलेल्या संपानंतर सरकारी वैद्यकीय अधिकारी पुन्हा कर्तव्यावर रूजू झाले आहेत. संप मिटल्याचे समजताच रुग्णांनी सरकारी हॉस्पिटल्समध्ये उपचारासाठी गर्दी केली.

सवलतींचा पाऊस

$
0
0
नियमित कर भरणाऱ्या करदात्यांना घरपट्टी तसेच नळपट्टी बिलात लॉटरी पद्धतीने १० हजार रुपयांपर्यंत सूट, मराठी शाळांना घरपट्टी माफ, कॉलेजरोडसह प्रमुख रस्त्यांवर वायफाय सुविधा, आयटी सेंटरसाठी भरीव तरतूद, मखमलाबाद नाका येथे उड्डाणपूल तर सारडा सर्कल येथे स्काय वॉक अशा विविध सवलती आणि योजनांच्या धडाक्यात महापालिकेच्या २०१४-१५ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली.

लाभलाय ‘मटा’चा समर्थ आधार

$
0
0
अतिशय खडतर परिस्थितीमध्ये असताना ‘मटा’ने मला हात दिला. तो नसता तर दहावीनंतर मी शिकूच शकलो नसतो किंवा शिकलोही असतो तर जे माझ्या मनात होते ते शिक्षण घेऊ शकलो नसतो.

‘सीएट’चा पगारवाढीचा तिढा सुटेना

$
0
0
औद्योगिक वसाहतीतील सीएट कंपनीतील पगारवाढीचा कराराचा तिढा सुटता सुटत नसल्याने अखेर संतापलेल्या कामगारांनी मंगळवारी कामगार उपायुक्त कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली. सहाय्यक आयुक्त किशोर दहेकर यांच्या दालनात आठ तासांहून अधिक वेळ झालेल्या बैठकीतही यावर काहीच निर्णय होऊ शकला नाही.

निरलस समाज संघटक

$
0
0
मालोजीराव मोगल या नावाचा जिल्ह्याच्या राजकीय आणि सार्वजनिक जीवनात मोठा दबदबा होता. जिल्ह्याच्या सर्वच सत्तास्थानावर त्यांनी सुमारे ५० वर्षे अधिराज्य गाजवलं.

स्थानमाहात्म्य

$
0
0
आषाढीसाठी वारकऱ्यांच्या दिंड्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून मजल दरमजल करत पंढरपूर मुक्कामी पोहोचल्या. खरं तर सगळीकडेच पांडुरंग आहे असं वारकरी मानतात, तरीही पंढरीला जाऊन तिथे उभ्या पांडुरंगाचं दर्शन ते घेतातच.

सिमेंट बंधारे बनले भ्रष्टाचाराचे आगार

$
0
0
राज्यातील सिंचन घोटाळा अजूनही गाजतो आहे. त्यानुसार कळवण तालुक्यातही मोठ्या प्रमाणात सिंचन घोटाळा झाल्याचा संशय आहे. मात्र, `तेरी भी चूप मेरी भी चूप` या उक्तीनुसार तालुक्यातील सिंचन घोटाळा उघडकीस येऊ शकलेला नाही. या सिंचन घोटाळ्याचे हिमनग म्हणजेच सिमेंट प्लग बंधाऱ्याचे काम.

‘अपप्रचाराला जशास तसे उत्तर द्या’

$
0
0
सोशल मिडीयाचा देशात प्रथम राजकारणासाठी नरेंद्र मोदींनी वापर केला. तुम्ही युवकांनीही या माध्यमाचा पुरेपुर वापर करून मतदारसंघाचा झालेला सर्वांगीण विकास जनतेपर्यंत पोहचवा. वाईट अपप्रचाराला जशास तसे उत्तर द्या, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नरहरीनगरला समस्यांची गर्दी

$
0
0
नगरसेवक सुदाम कोंबडे यांच्या प्रभाग क्रमांक ५२ मधील नरहरी नगर या परिसरात इथे गेल्या अनेक वर्षांपासून पक्के रस्तेच नसल्याने नागरिकांना अडचणींचा प्रवास करावा लागतो.

अतिक्रमणाचा विळखा

$
0
0
महादेववाडीतील पदपथावर व्यावसाविकांनी व्यवसाय थाटले आहे. अतिक्रमणात अडकलेल्या या पदपथावर चालता येत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे परिसरात अतिक्रमणे वाढत असल्याची टीका नागरिकांनी केली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images