Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

ऋतुरंग भवनात आज एकपात्री नटसम्राट

$
0
0
वि. वा. शिरवाडकर यांच्या सिद्ध हस्त लेखणीतून साकारलेल्या नटसम्राट नाटकाच्या अजरामर संहितेला ६० मिनिटांच्या कालावधीत एकपात्री अभिनयाद्वारे सादर करण्याचा प्रयत्न डॉ. राजेश आहेर यांनी केला आहे. आज (दि. २१) ऋतुरंग भवन, नाशिक रोड येथे सायंकाळी ६.३० वाजता हा अभिनव प्रयोग सादर होणार आहे.

मालेगावमध्ये समावेशास चांदवड, कळवणचा विरोध

$
0
0
प्रस्तावित मालेगाव जिल्ह्यात समाविष्ट होण्यास चांदवड व कळवण तालुक्यातून विरोध होत आहे. कळवणला आदिवासी जिल्हा निर्माण करण्याची तर चांदवडकरांची नाशिक जिल्ह्यातच राहण्याची मागणी आहे.

क्रीडा प्रबोधिनीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

$
0
0
ग्रामीण भागातील खेळाडू शोधून त्यांना महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनीतर्फे तंत्रशुध्द प्रशिक्षण देण्यात येते. या क्रीडा प्रबोधिनीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुला व मुलींना प्रवेश दिले जात आहेत.

जातपंचायतीची दाहकता लघुपटातून

$
0
0
जातपंचायतीच्या विरोधात अंधश्रध्दा निर्मूलन समितीने उभारलेल्या लढ्याची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचली आहे. या लढ्याची दखल एका आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्याने घेतली असून याच विषयावर लघुपट बनविणारे त्यांचे पथक गुरुवारी नाशकात येऊन गेले. या लघुपटात सहा देशांमधील अशा घटनांची हकीकत मांडली जाणार असून नाशकातील कुंभारकर कुटुंबाची व्यथाही चित्रीत करण्यात आली आहे.

आमदार हिरे सोडविणार शिक्षकांच्या अडीअचणी

$
0
0
शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या, अडीअडचणी संदर्भात व शिक्षकांच्या वैयक्तीक, शैक्षणिक मागण्यांसंदर्भात आमदार डॉ. अपूर्व हिरे हे नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्हा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. ही मा‌हिती महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा. श्याम पाटील यांनी दिली आहे.

अकरावी प्रवेशप्रक्रियेला २६ जूनपासून सुरुवात

$
0
0
दहावीचे निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना आता महाविद्यालयीन प्रवेशाचे वेध लागले आहेत. अकरावी प्रवेशासाठीची प्रवेशप्रक्रिया २६ जूनपासून राबविली जाणार आहे. त्याचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे.

समृद्धनगरचा रस्ता बनला `घात रस्ता`

$
0
0
त्र्यंबकरोडवरील समृद्धनगरमध्ये मुख्य रस्त्यावर असलेला कॉर्नर अपघाताचे केंद्र बनले आहे. तेथील खाजगी विहीर रस्त्याला लागून असल्याने नागमोडी वळण तयार झाले आहे. नेमके याच वळणात अपघात घडत असतात. अमृतागार्डन हॉटेल ते महिंद्र मेटिरियल गेटदरम्यानच्या रस्त्यावर आजवर अनेकांचा बळी गेला आहे. या भागातील अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा करण्याची मागणी रहिवाशी व वाहनचालकांनी केली आहे.

भारनियमनाविरोधात मनमाडला कडकडीत बंद

$
0
0
मनमाड शहरात सुरू असलेल्या सक्तीच्या भारनियमनाविरोधात शुक्रवारी शहरातील व्यापारीवर्गाने एकजुटीचे दर्शन घडवत मनमाड बंद व धरणे आंदोलन केले. शहरातून कँडल मार्च काढून भारनियमन कायमस्वरूपी बंद झालेच पाहिजे, अशी मागणी व्यापारीवर्गाने केली.

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची बँकेकडून अवहेलना

$
0
0
मार्च महिन्यात तालुक्यात गारपिटीने अतोनात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणाऱ्या मदतीसाठी जिल्हा बँकेच्या स्थानिक शाखांमध्ये अवहेलनेला सामोरे जावे लागत आहे.

दाभोलकरांचे मारेकरी शोधा

$
0
0
अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष नरेद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा त्वरित शोध लावावा, अन्यथा संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकरांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात निर्घूण हत्या करण्यात आली. दहा महिने पूर्ण होऊनही खून करणारे व सूत्रधारांचा शोध लागलेला नाही.

कांद्याला १९२० रुपये भाव

$
0
0
देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकाने पुन्हा निर्यातमूल्य लागू केले आहे. असे असूनही शुक्रवारी कांद्याने उसळी घेतली. सटाण्यात कांद्याला प्रतिक्विंटल १९२० रुपये सर्वाधिक भाव मिळाला.

येवल्यावर पाणीटंचाईचे सावट

$
0
0
येवला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नगरपालिकेच्या नवीन साठवण तलावातील पाणीसाठा संपत आला आहे. येत्या ३० जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा या साठवण तलावात शिल्लक आहे. यामुळे सध्या चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जाता आहे.

नाशिकमध्ये मतदार नोंदणी मोहीम

$
0
0
लोकसभा निवडणुकीवेळी अनेकांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याने गोंधळ उडाला. विधानसभा निवडणुकीवेळी असा प्रकार घडू नये, यासाठी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतदार नावनोंदणी मोहीम आयोजित केली आहे. २१ व २२ जून तसेच २८ व २९ जूनला ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

धार्मिक विटंबनेमुळे धुळ्यात तणाव

$
0
0
फेसबुकवर विदेशातील प्रार्थना स्थळाबाबत अक्षेपार्य छायाचित्र टाकल्याने धुळ्यातील देवपूर परिसरात गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तणाव निर्माण झाला. एकत्र आलेल्या संतप्त जमावाने जवळच्या घरांवर दगडफेक करून रस्त्यावरून जाणाऱ्या बसेसच्या काचाही फोडल्या.

क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी खासगी बसेसला पडणार महागात

$
0
0
खासगी बसेसमध्ये परवानगीशिवाय आसन क्षमतेत वाढ करणाऱ्यांवर तसेच अशा वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बस‌विणे कायदशीर गुन्हा आहे. अशा वाहनधारकांवर मोटर वाहन अधिनियमाद्वारे कारवाई करण्याचा इशारा ना‌शिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिला आहे. येत्या एक ऑगस्टपासून अशा खासगी प्रवासी बसेस तपासणीची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

प्रियंकाचे यश देशासाठी भूषणावह

$
0
0
देशात माहिती आणि तंत्रज्ञानाचा उपयोग लोकसभा निवडणुकीत दिसून आला. मतदारसंघातील १७५० बुथवरील पाच-पाच मिनिटाला मतदानाची माहिती मिळत होती. हे फक्त माहिती तंत्रज्ञानाच्या अद्ययावत पणामुळे शक्य झाले. त्याच क्षेत्रात प्रियंका डमाळे या ग्रामीण भागातील विद्यार्थीनीने ६४ देशात प्रथम क्रमांक मिळविला. ही तालुका व देशासाठी भूषणावह बाब आहे, असे गौरवोद्गार खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी काढले.

कोंडी किती दिवस सहन करायची?

$
0
0
कोर्टामध्ये कामानिमित्त येणाऱ्या पक्षकार व अन्य नागरिकांची वाहने पास नसल्यास प्रवेशद्वाराबाहेरच अडविली जातात. यामुळे सीबीएसचा निम्मा रस्ता वाहनतळ म्हणून वापरला जातो अन् दिवसभर खेळ रंगतो तो वाहतूक कोंडीचा. यातच या रस्त्यावर एखादे वाहन अचानक बंद पडल्यास या खेळात वाहतूक पोलिसही सहभागी होतात.

सिडको, सातपूरमधील ६० घरे धाेकादायक

$
0
0
पावसाळ्यात दक्षता म्हणून महापालिकेच्या सिडको व सातपूर विभागाने धोकेदायक घरांनी तसेच नदीपात्रालगतच्या घरांना नोटिसा बजावल्या आहेत. दोन्ही विभागातील एकूण ६० घरे व नदीपात्रालगतच्या ४१७ घरांनाही नोटिसा देण्यात आल्या आहेत.

महापौर परिषदेत एलबीटीवर चर्चा

$
0
0
एलबीटी अर्थात लोकल बॉडी टॅक्स की जकात अशा संभ्रमात अडकलेल्या महापालिका कमी उत्पन्नामुळे हैराण झाल्या आहेत. त्यातच राज्य सरकार पुढील निर्णय घेण्यास टाळाटाळ करीत असल्याने महापालिकांचा आर्थिक डौलरा कोलमडण्याची चिन्हे दिसून येत आहे. राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये उद्भवलेल्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र महापौर परिषदेने तातडीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. ही बैठक २३ जून रोजी अंधेरी पश्चिम येथे होणार आहे.

सिंहस्थ कामे तातडीने करा

$
0
0
पावसाळा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता अशी कुठलीही सबब न सांगता तातडीने आपल्या विभागातील सिंहस्थ कामांना प्रारंभ करा, असे निर्देश विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांनी सर्व विभागांच्या प्रमुखांना दिले.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images