Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मनोरुग्ण महिलेची दगडफेक

$
0
0
सीबीएस येथील भरचौकात वाहनांवर दगडफेक करीत एका मनोरुग्ण महिलेने धुमाकूळ घातला. सोमवारी दुपारी बारा ते साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. यामुळे परिसरात वाहतुकीची कोंडी झाली तसेच काही वाहनांच्या काचाही फुटल्या.

नगराध्यक्षांना लॉटरी

$
0
0
राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील सहाही नगरपालिकांच्या नगराध्यक्षांना सहा महिने मुदतवाढ मिळाली आहे. यामुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.

चौघा भावंडांना मिळाली दृष्टी

$
0
0
नाशिकमधील एका कुटुंबातील तीन भाऊ अन् एक बहिण यांचे सगळे काही सुरळीत सुरू असताना ऐन तारुण्यात काही वंशिक आजाराच्या तक्रारी उद्भवल्या. त्यामुळे त्यांना कॉर्निअल डिस्ट्रोफी झाला.

खवय्यांसाठी ‘खाऊ गल्ली’

$
0
0
महाराष्ट्र टाइम्सच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त नाशिकच्या खवय्यांसाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे ‘खाऊ गल्ली’ ही आगळीवेगळी मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत ५ ते १५ जूनदरम्यान नाशिकच्या वेगवेगळ्या रेस्टॉरण्टमध्ये मिळणाऱ्या स्वादिष्ट भोजनावर आकर्षक सूट मिळणार आहे.

मतदार नोंदणीला सुरुवात

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, मतदार नोंदणी मोहिमेलाही सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे या मोहिमेत सहभागी होऊन मतदारांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी केले आहे.

दुचाकींसाठी व्हावा अंडरपास

$
0
0
द्वारका येथील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी पंचमुखी अंडरपास साकारण्यात आला असला तरी त्याचा वापर पादचाऱ्यांकडून होत नाही. परिणामी, वाहतुकीची कोंडी दिवसेंदिवस वाढतच असल्याने हा अंडरपास दुचाकींसाठी उपलब्ध करुन देण्याची मागणी होऊ लागली आहे.

टोल धोरणाचं काय? राज ठाकरे

$
0
0
राज्य सरकारने सोमवारी ४४ टोलनाके रद्द करण्याची घोषणा केली हा निर्णय योग्य असला तरी आधी ६६ टोल नाके रद्द करण्यात येणार होते त्या यादींचं काय? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. राज ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर असून एका पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली.

माईकचा हव्यास

$
0
0
कधी न व्यासपीठ मिळालेल्या लोकांची एक डोकेदुखीच असते, काही लोक कोणत्या तरी नाटकात पोस्टमनचे काम करतात व आयुष्यभर नट म्हणून मिरवतात. स्वतःची ओळखही ते नाटककार म्हणून द्यायला कचरत नाही.

कनिष्ठ महाविद्यालयास अंदरसूल येथे परवानगी

$
0
0
तालुक्यातील अंदरसूल येथे अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाच्या मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. हे महाविद्यालय सन २०१४-१५ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे. ही माहिती संस्थेचे सरचिटणीस अॅड. सुभाष सोनवणे व सल्लागार मकरंद सोनवणे यांनी दिली.

फेसबुकप्रकरणी चांदवडला बंद

$
0
0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची फेसबुकवर अवहेलना करण्यात आल्याच्या निषेधार्थ मंगळवारी चांदवड येथे बंद पाळण्यात आला. भारीप बहुजन महासंघातर्फे घटनेचा निषेध करून चांदवड बंदची हाक देण्यात आली होती.

वर्तमानाच्या विचारातूनच विद्यार्थ्यांची जडणघडण

$
0
0
विद्यार्थ्यांनी भूतकाळ किवा भविष्यकाळाचा विचार न करता वर्तमानाचा विचार करावा, कारण यातूनच भविष्य घडत असते, असे प्रतिपादन मातोश्री शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी कुणाल दराडे यांनी केले.

बागलाण तालुक्यात पाण्यावरून पेटला संघर्ष

$
0
0
एका गावाच्या हद्दीतून दुसऱ्या गावात शेतीसाठी पाईपलाईनने पाणी नेण्याच्या विरोधाचे लोण आता सटाणा शहरापर्यंत पोहचले आहे. शहरातील आरम नदीकाठाजवळील विहिरीतील पाणी चौगाव येथे नेण्याचा प्रयत्न शहरवासीयांनी हाणून पाडला.

रातीर-नामपूर रस्त्यावर अपघातात धुळ्याचे २ ठार

$
0
0
स्कार्पियो आणि अॅपेरिक्षा यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या दुर्घटनेत धुळे जिल्ह्यातील दोन प्रवाशी जागीच ठार झाले तर, आठ जण जखमी झाले. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी रातीर-नामपूर रस्त्यावर घडली. जखमींना उपचारासाठी नामपूर ग्रामीण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

४ दिवसाआड येवल्यात पाणीपुरवठा

$
0
0
शहरात संभाव्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवार, (दि. १५) पासून चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा समिती सभापती मुश्ताक शेख यांनी ही माहिती दिली.

उन्हाची दाहकता होईना कमी

$
0
0
मान्सूनपूर्व रोहिण्या कोरड्याठाक जातांनाच महत्वाच्या मृगाचा प्रवेश होऊनही पावसाचा पत्ताच नसल्याने येवलेकर हैराण झाले आहेत. कडक उन्हाच्या दाहकतेच्या चटक्याने तालुक्यातील जनमाणूस घामाघूम होत सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले आहे.

तांत्रिक अडचणींमुळे पाणीप्रश्न सुटेना

$
0
0
मनमाडचा पाणीप्रश्न येत्या काही महिन्यात सोडविण्याच्या दिशेने निश्चित स्वरुपाचे प्रयत्न सुरू आहेत. पाटोदा ते वाघदरडी धरण पाईपलाइन योजना आणि मनमाड शहरातील अंतर्गत पाईपलाइनचे काम पूर्णपणे कार्यन्वित झाल्यास पाणीप्रश्न सुटू शकेल.

पावसामुळे खरीपाच्या मशागतीला वेग

$
0
0
जिल्ह्यात मंगळवारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार आगमन झाले. आव्हाटी, विरगांवसह करंजाडी आणि मोसम खोऱ्यात पाऊन तास मुसळधार पाऊस झाला. पावसाच्या जोरदार आगमनामुळे बळीराजा सुखावला असून खरीपाच्या मशागतीला वेग येणार आहे.

मुख्याध्यापकांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न मार्गी लावू

$
0
0
पाचव्या आण‌ि सहाव्या वेतन आयोगाचा लाभ देताना मुख्याध्यापकांच्या वेतनश्रेणीतील त्रुटी लवकरच दूर करण्यात येतील, असे आश्वासन शालेय श‌िक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी द‌िले. संयुक्त मुख्याध्यापक महामंडळाच्या श‌िष्टमंडळाने नुकतीच त्यांची भेट घेतली.

संशयिताचा खटला यापुढे मोक्का कोर्टात

$
0
0
दरोडा, जीवे मारण्याचा प्रयत्न, खंडणी, पोलिसांना मारहाण अशा विविध गुन्ह्यात मोक्कातंर्गत सेंट्रल जेलमध्ये असलेल्या चौघा संशयितासह त्यांच्या कुटुंबियांविरोधात पोलिसांनी पुन्हा मोक्कातंर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पाच दुचाकी चोरीस

$
0
0
शहरातील पंचवटी, इंदिरानगर, आडगाव आणि भद्रकाली परिसरातून पाच दुचाकींची चोरी झाली. याप्रकरणी संबंधीत पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, वाढत्या वाहनचोरींच्या घटनांमुळे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images