Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

दिनकर पाटलांचा अखेर भाजपात प्रवेश

$
0
0
काँग्रेसचे बंडखोर नेते व प्रभाग १७ चे माजी नगरसेवक दिनकर पाटल यांनी अखेर रविवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार गिरीश महाजन उपस्थित होते. हा प्रवेश सोहळा साधेपणाने झाला असला तरी पाटील समर्थक मोठ्या संख्येने हजर होते.

निधी अन् टीडीआरला बगल

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधीत इतर मुद्द्यांचा आढावा घेण्यासाठी शनिवारी संध्याकाळी मलबार हिल येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीत महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीबाबत तसेच साधुग्रामच्या प्रलंबित भूसंपादनाबाबत चर्चा होणे अपेक्षित होते.

कामांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

$
0
0
आगामी पावसाळा आणि विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या उर्वरित प्रमुख कामांच्या निविदाप्रक्रिया तत्काळ पूर्ण करून सिंहस्थ कामांना गती द्या, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.

सिंहस्थासाठी पैसा आला, पण यंत्रणा काही हलेना

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निधी नसल्याची ओरड होत असली तरी प्रत्यक्षात ज्या विभागांना निधी उपलब्ध झाला आहे, त्यांचीही कामे कागदावरच असल्याची बाब समोर आली आहे.

व्यावसायिकाचा स्वत:च्याच अपहरणाचा बनाव

$
0
0
व्यावसायासाठी घेतलेले १५ लाख रुपये जवळच्या नातलगाला परत करण्यासाठी तरुणाने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचला. मात्र शहरातील चाणाक्ष पोलिस अधिकारी आणि सायबर सेलने अवघ्या दोनच दिवसांत हा बनाव उघडकीस आणून त्या तरुणाला दिल्लीहून नाशिकमध्ये आणले.

पोलिस भरतीसाठी मिळणार अनुपस्थितांनाही संधी

$
0
0
पोलिस भरतीसाठी दिलेल्या तारखेला अनुपस्थित राहाणाऱ्या उमेद्वारांनाही संधी दिली जाईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. एकदा गेलेली संधी पुन्हा चालून येत नाही, असे म्हणतात. पोलिस दलामध्ये प्रवेश करण्यास अनेक तरुण इच्छुक असतात.

हवाई दल प्रमुखांकडून सुखोईची पाहणी

$
0
0
देशाचे हवाई दल प्रमुख अरुप रहा यांनी ओझर येथील हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये (एचएएल) होत असलेल्या सुखोई या विमानाच्या निर्मिती शनिवारी पाहणी केली. रहा यांच्या हस्ते एचएएलच्या अत्याधुनिक वेअर हाऊसचेही उद्‌घाटन करण्यात आले आहे.

‘एलईडी’साठी ६ महिन्यांची प्रतीक्षा

$
0
0
मुंबई हायकोर्टाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केल्यानंतर जुन्या पथदिपांच्या ऐवजी एलईडी लाईटस बसवण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शहरातील सुमारे ६९ हजार पथदिपांच्या फि‌टिंग्ज बदलण्यात येणार आहे. मात्र, यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

दाखल्यांसाठी सेतूंमध्ये गर्दी

$
0
0
शैक्षणिक कारणांसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी शहरातील पाचही सेतूंमध्ये मोठी गर्दी सुरु झाली असून, नियोजित वेळेत दाखले देण्यासाठी अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

वाघेरा घाटात काजव्यांची शाळा

$
0
0
काजवा... निसर्गातील एक अदभूत कीटक. लहानपणी आपण लाइटचा किडा म्हणत त्याच्यामागे धावायचो तोच काजवा हौशी फोटोग्राफर्ससाठी एक हटके विषय होऊ शकतो हे फोटो सर्कल या हौशी फोटोग्राफर्स असलेल्या संस्थेने दाखवून दिले.

पाच महिन्यांनंतरही झूम बेदखलच

$
0
0
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर नक्की होणार अशी दीर्घ अपेक्षा बाळगल्यानंतरही आणि तब्बल पाच महिने उलटूनही जिल्हा उद्योग मित्रची बैठक (झूम) या महिन्यातही होण्याची कुठलीही चिन्हे नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांसह औद्योगिक संघटनांच्या अनास्थेमुळे जिल्ह्यातील औद्योगिक समस्या ‘जैसे थे’च आहेत.

ओझरजवळ विचित्र अपघातात ३ ठार

$
0
0
मुंबई-आग्रा महामार्गावर ओझरजवळील रिलायन्स पेट्रोलपंपासमोर रविवारी सकाळी दहा वाजता झालेल्या चार वाहनांच्या विचित्र अपघातात तीन जण ठार झाले, तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती राजन जोधराज कोचर यांचा व त्यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे.

सरकारी योजनांपासून महिला वंचित

$
0
0
‘महिला तसेच आर्थिक दुर्बल घटकांसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. परंतु त्या वंचितांपर्यंत योग्य माध्यमातून पोहोचण्याची गरज आहे. त्यामुळे लोकनिर्माण प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू असलेले हे कार्य कौतुकास्पद आहे’, असे मत महापौर यतीन वाघ यांनी व्यक्त केले. महिला हक्क अधिकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

गैरसमज आणि टेन्शन

$
0
0
भगूरच्या नगराध्यक्ष असलेल्या महिलेचे सदस्यत्वच जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले आहे. त्याविरोधात त्या कोर्टात जाणार असल्या तरी तत्पुर्वी त्यांनी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. या सभेस विरोधकांनी आक्षेप घेण्यासाठी प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.

मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते

$
0
0
मधुमेह असून त्याकडे दुर्लक्ष करणे हे चूक आहे. सध्या आधुनिक उपचारांमुळे तसेच आहार विहार, आणि व्यायाम यामुळे हा आजार बरा होवू शकतो. जीवनशैलीत थोड्याफार प्रमाणात बदल करून आजाराबद्दल माहिती मिळवून त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. असे मत अभिनेते व दिग्दर्शक सतीष कौशिक यांनी व्यक्त केले.

प्रबोधनकार ठाकरे व्यायामशाळा धुळखात

$
0
0
सिडको येथील महाराणा प्रताप चौक रोडवरील प्रबोधनकार ठाकरे व्यायामशाळेची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी बांधकाम व्यावसायिक त्यांचे साहित्य ठेवण्यासाठी जागेचा वापर करताना दिसतात.

विद्यार्थ्यांना मिळेनात वेळेवर दाखले

$
0
0
सिडको सेतू कार्यालयात मुदतीनंतर आठ दिवस उलटूनही दाखले मिळत नसल्याने नागरिक, विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. दाखला आला की नाही हे विचारण्यासाठी देखील रांगेत उभे राहावे लागते.

मनमाड पालिकेच्या स्थलांतराचा मुद्दा गाजणार

$
0
0
येथील नगरपालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. ११) होत असून मनमाड नगरपालिकेचे जुन्या जागेत स्थलांतर होणार की नाही याचा फैसला होणार आहे. तसेच पाणीपट्टीत करण्यात आलेली शंभर रुपयांची वाढ या सभेत मागे घेतली जाते की नाही, याबाबत नाग‌रिकांना उत्सुकता लागली आहे.

मतदारयाद्यांचे पुनर्निरीक्षण

$
0
0
मतदार यादीत नाव नोंदविता यावे, यासाठी निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदार याद्यांची पुनर्निरीक्षण मोहीम जाहीर केली आहे.

त्र्यंबकला दोन दिवसाआड पाणीपुरवठा

$
0
0
त्र्यंबकेश्वरला पाण्याची गंभीर परिस्थती निर्माण झाली आहे. शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या अंबोली धरणावर पंपिंगकरीता पुरेसा वीजपुरवठा उपलब्ध होत नाही म्हणून त्र्यंबकेश्वर येथे दोन दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याचे नगरपालिकेने जाहीर केले आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images