Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

ओझर विमानतळ सुरक्षेत त्रुटी

$
0
0
ओझर येथील विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (बीसीएएस)चे पथक आले असता त्यांना अनेक त्रुटी आढळून आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यामुळेच याठिकाणी विविध सुरक्षा उपाययोजना करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले असून हे पथक पुन्हा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाहणीसाठी येणार आहे.

कोकाटे भुजबळांच्या प्रचाराला

$
0
0
राजकारणात विकासाचा मुद्दा महत्त्वाचा असून, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे लोकसभेचे उमेदवार छगन भुजबळ हे कर्तृत्ववान व कार्यक्षम मंत्री आहेत. त्यांच्या विजयासाठी मागील निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्यापेक्षा अधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही काँग्रेसच आमदार माणिकराव कोकाटे यांनी गुरुवारी दिली.

इलेक्शनचा भार एसटीवरच!

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाकडे ४४० बसेसची मागणी केली आहे. त्याअनुषंगाने महामंडळाकडून नियोजन सुरू असून, अजूनही महामंडळाच्या काही आगारांना कोणत्या मार्गांवर या बसेस जाणार याची माहितीच मिळालेली नाही.

लढाई अस्तित्वाची

$
0
0
दहा वर्षांपासून ताब्यात असलेला नाशिक लोकसभा मतदारसंघ कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचे राज्यस्तरीय नेते छगन भुजबळ यांना मैदानात उतरविल्याने राष्ट्रवादीसाठी यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची आहे.

चिमुकल्यांसाठी ऑनलाइन पुस्तकांचा खजिना

$
0
0
उन्हाळ्याच्या सुट्या म्हणजे अभ्यासातून मुक्ती, समर कॅम्प रपेट, मामाच्या गावची सफर अन् अगदी वेगळं काही करू पाहणाऱ्यांसाठी सायन्स कॅम्प अन् गणिताची शिबिरं आहेतच. पण, या सगळ्यात एक गोष्ट कॉमन असते. ती म्हणजे पुस्तके !

ॐ नमो नम:

$
0
0
निवडणुकांमध्ये आपला पक्ष सोडून इतरांची तळी उचलायची ठरवली तर ते किती अडचणीचे असते याचा प्रत्यय आलेल्या एका नेत्याचा हा किस्सा. लोकसभा निवडणुकीचे वा‌तावरण पूर्णपणे मोदीमय झालेले दिसत असताना इतर पक्षांमध्येही तो कुतुहलाचा विषय ठरत आहे.

अंध करणार डोळस मतदान

$
0
0
अंध मतदारांना कुणाचीही मदत न घेता हव्या त्या उमेदवाराला मतदान करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनवर ब्रेल लिपीतील स्टिकर लावण्यात आले असून त्याचा उपयोग करून मतदान कसे करायचे, यासंदर्भात शुक्रवारी कार्यशाळा घेण्यात आली. त्यामुळे अंध स्वंतत्ररित्या मतदान करू शकतील आणि मतदानाचा टक्काही वाढेल, असा विश्वास जिल्हाधिकारी प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.

काँग्रेस काळात भ्रष्टाचार शिखरावर

$
0
0
देशात भ्रष्टाचार उच्च शिखरावर पोहोचला असून काँग्रेस सरकारने देशाची लूट केली आहे. देशाचे पंतप्रधानपद हे खूप महत्त्वाचे आहे. पंतप्रधान विदेश दौऱ्यावर असताना त्यांच्याच पक्षाचे शहजादे पंतप्रधानांवर टीका करतात, ही कसली संस्कृती म्हणावी, अशी सणसणीत टीका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता कळवण येथील थ्रीडी प्रचार सभेत केले.

विवेकानंदांच्या दृष्टिकोनात विज्ञान अन् अध्यात्माचा समन्वय

$
0
0
व‌िज्ञान आण‌ि अध्यात्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मात्र, या व‌िषयांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन पूर्वग्रहदुषित क‌िंवा अपूर्ण माह‌ितीवर आधारीत असतो. या दृष्टिकोनाला स्वामी व‌िवेकानंदांच्या मजबूत मांडणीने छेद द‌िला. व‌िज्ञान आण‌ि अध्यात्म यांच्यातील समन्वय मांडून त्यांनी जगाच्या ऊर्जा प्रवाहाला द‌िशा द‌िली, असे प्रत‌िपादन व‌िज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन सच‌िव जयंत सहस्त्रबुद्धे यांनी केले.

यंगीस्तानला झिंग ‘व्हर्च्युअल’ची

$
0
0
व्हर्च्युअल जग...रमण्यासाठी तरूणाईचे आवडते ठिकाण. मोबाइलवर व्हॉटसअॅपच्या रूपाने ‘जगाची खिडकी’च खुली झाल्यामुळे यंगीस्तानला अस्मान ठेंगणे झाले आहे. परंतु या आभासी जगात झिंगण्याच्या सवयीमुळे त्यांना नात्यागोत्यांनी वेढलेल्या र्खऱ्या जगाचे महत्त्व तितकेसे रहिलेले नाही.

जय किसान शेतकरी संघटनेची रविवारी ना‌शिकला बैठक

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, धरणग्रस्तांचे प्रश्न, शेतमालाला मिळणारा दर व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न या प्रश्नांवर चर्चा करून न्याय देण्यासंदर्भात या निवडणुकीत कोणत्या उमेदवाराचे समर्थन करायचे, यावर विचारविनिमय करण्यासाठी जय किसान शेतकरी संघटनेची उद्या (दि. २०) नाशिक येथे वकीलवाडीत बैठक होणार आहे.

आयटीआय पुलावर अपघातांना आमंत्रण

$
0
0
नवीन नाशिक सिडकोकडे जाणाऱ्या आयटीआय पुलावर रोजच लहान-मोठे अपघात घडत असतात. हा धोका टाळण्यासाठी सिडकोकडे जाणाऱ्या आयटीआय पुलाला समांतर पूल व रस्ता रुंदीकरणाची मागणी वाहनचालक करत आहेत.

भाजपनेच घडविला ठाकरे बंधुंमध्ये राडा

$
0
0
लोकसभा निवडवणुकीत भाजपने मनसेशी छुपी युती केल्याने शिवसेनेचा संताप झाला. यातूनच राज व उद्धव या ठाकरे बंधुंमधील वाद अधिक पेटला, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी ठाकरे बंधुमधील वादाला भाजप जबाबदार असल्याचा आरोप केला.

प्रचारसाहित्य आले फॉर्मात!

$
0
0
मतदानाचा दिवस जवळ येत असल्याने निवडणूक प्रचारसाहित्याची विक्री वाढली आहे. शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दुकानांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाईं, मनसे, शिवसेना, भाजप, माकप अशा सर्वच पक्षांचे साहित्य एकत्रितरित्या पाहायला मिळत आहे. सध्या तरी राजकीय पक्षांच्या साहित्यांपेक्षा अपक्षांच्या साहित्याला अधिक किंमत मिळत असल्याचे चित्र आहे.

नाशिकमध्येही मतदारांची नावे गायब!

$
0
0
गेल्या पंचवीस वर्षापासून वास्तव्यास असताना, त्याचबरोबर यापूर्वी वेळोवेळी मतदानाचा हक्क बजावूनही राजीवनगर परिसरातील शेकडो मतदारांना यंदा मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे.

रोटेशनअभावी ४० गावांच्या पाणीपुरवठा योजना ठप्प

$
0
0
चणकापूर धरणातील रोटेशन दहा दिवस उशिराने मिळत असल्यामुळे गिरणा नदीपात्र कोरडेठाक झाले आहे. पाण्याअभावी सुमारे चाळीस गावांच्या पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. या भीषण पाणीटंचाईमुळे सटाणा आणि देवळा शहरासह चाळीस गावांना दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहेत.

आचारसंहितेने काढला उमेदवारांचा घाम

$
0
0
निवडणुका म्हटल्या की वाहनांचा ताफा, कार्यकर्त्यांची फौज, कर्णकर्कश आवाजातील लाउडस्पीकरचा गोंधळ याम‌ुळे सगळेच हैराण होऊन जातात. मात्र, यंदा निवडणूक आयोगाच्या कडक आचारसंहितेमुळे मतदारांपर्यंत पोचण्यासाठी उमेदवाराकडे प्रत्यक्ष भेटीगाठींशिवाय पर्याय राहिलेला नाही. आचारसंहितेच्या नियमांमुळे उमेदवारांना घाम फुटला असून, मतदारांना मात्र दिलासा मिळाला आहे.

मध्य रेल्वे रविवारी होणार `स्लो`

$
0
0
मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण व पनवेल ते नेरुळ या मार्गावर दुरुस्ती करण्यात येणार असल्याने रविवारी दुपारी ११ ते ४ या कालावधीत मेगाब्लॉक करण्यात येणार आहे. या मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या नसल्या तरी त्या धिम्या गतीने चालण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, मुंबईहून नाशिकरोडकडे येणाऱ्या प्रवाशांना लेट होण्याची शक्यता वर्तविला जात आहे.

मोटारसायकल गिरणीने सोडवला रोजगाराचा प्रश्न

$
0
0
गरज ही शोधाची जननी आहे, असं म्हटलं जातं. वाढत्या बेरोजगारीने शहरांबरोबरच ग्रामीण भागातही तरुणांच्या हाताला काम नाही. यामुळे बदापूर येथील तरुणाने मोटरसायकलवर गिरणी बसवून रोजगाराचा नवा पर्याय शोधून काढला. त्याच्या या प्रयत्नांना चांगले यश मिळाले असून त्याच्या रोजीरोटीची प्रश्न सुटला आहे.

मोदी विधानसभेत तोंडही उघडत नाहीत

$
0
0
गुजरात मॉडेल फसवे असल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शुक्रवारी पुन्हा नरेंद्र मोदींवर हल्ला चढविला. गुजरातमध्ये वर्षभरात फक्त दहा दिवसांचे अधिवेशन होते. या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी अभिभाषणात उत्तर देणे आवश्यक असताना नरेंद्र मोदी मात्र तोंड उघडत नाही. ही लोकशाहीची पायमल्ली असून, अशा प्रवृत्तींना वेळीच समाजाने रोखणे आवश्यक आहे, अशी टीका पवार यांनी केली.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>