Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

...अन् कोकाटे झाले शांत

$
0
0
राष्ट्रवादीसह काँग्रेसचे लक्ष लागलेल्या नाशिकमधील आमदार माणिकराव कोकाटे व छगन भुजबळ यांच्यातील वादावर मंगळवारी पडदा पडला. परंतु, कोकाटे व भुजबळांमधील बैठकीत नेमका काय समझोता झाला, ज्यामुळे कोकाटे यांनी भुजबळांना समर्थन दिले याबद्दलची उत्सुकता कायम आहे.

एमआयडीसी अधिकाऱ्याकडून आचारसंहिता भंगाचा ‘उद्योग’

$
0
0
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरने आचारसंहितेचे उल्लंघन करीत सुरक्षा व्यवस्थेसाठी वर्क ऑर्डर दिल्याची तक्रार त्यांच्याच वाहनचालकाने केली आहे. याप्रकरणी एमआयडीसीच्या धोरणांचेही उल्लंघन झाल्यामुळे ही बाब इंजिनिअरला महागात पडण्याची शक्यता आहे.

प्राप्तीकर विभाग घेणार ‘त्या’ रकमेचा हिशोब

$
0
0
निवडणूक काळात त्र्यंबकेश्वर येथे दोन वाहनांमधून जप्त केलेल्या पावणे नऊ लाख रुपयांची रोकड संबंधितांकडे कोठून आली याचे कोडे अद्याप पोलिस आणि प्राप्तीकर विभागाला उलगडलेले नाही. त्यामुळे प्राक्तीकर विभाग या प्रकरणाच्या मुळाशी जाणार असून संबंधितांची कसून चौकशी होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

भाजपचा ‘शिमगा घोटाळ्यांचा’

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नाशिकमधील उमेदवार छगन भुजबळ यांच्या उमेदवारीला आव्हान देतानाच त्यांच्या घोटाळ्यांवर प्रकाश टाकण्यासाठी नाशिक भाजपने ‘शिमगा घोटाळ्यांचा’ हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे भुजबळांना मतदार नाकारतीस, असा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे.

नेत्यांची निष्क्रियता भाजपच्या पथ्यावर

$
0
0
देशात मोदींचेच सरकार येणार असा आविर्भाव भाजपचे नेते बाळगून असले तरी नाशिक जिल्ह्यातील भाजप नेत्यांच्या निष्क्र‌ियतेमुळेच पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची सभा नाशिक जिल्ह्यात निश्चित होऊ शकली नाही. तसेच, इतरही भाजप नेत्यांच्या सभेबाबत अनिश्चितताच आहे.

त्र्यंबक-गोदावरीचा फैसला मे महिन्यात

$
0
0
त्र्यंबकेश्वर येथे काँक्रिटीकरण करुन गोदावरी बंदिस्त केल्याप्रकरणी येत्या १३ मेला पुण्याच्या ग्रीन ट्रिब्युनलमध्ये अंतिम सुनावणी होणार आहे. याप्रकरणी मंगळवारी सुनावणी झाली.

हाणामारीप्रकरणी चौघांना अटक

$
0
0
पत्नीस धक्का का दिला अशी विचारणा करण्यासाठी गेलेल्या तरुणावर धारदार हत्यारांनी वार करण्यात आले. नाशिकरोड परिसरात घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

पडीक विहिरी ठरताहेत धोकादायक

$
0
0
नाशिकररोड परिसरात असलेल्या पडीक वि‌हिरी दुर्घटनांना कारणीभूत ठरत आहेत. या पडीक विहिरींवर किमान संरक्षक जाळ्या बसवाव्यात, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

उच्चाधिकार समितीकडून गोदावरीची पाहणी

$
0
0
गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी हायकोर्टाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने बुधवारी गोदावरीचा पाहणी दौरा केला. यावेळी विविध विभागाचे अधिकारी या दौऱ्यात सहभागी झाले.

नुकसान कोकाटेंचेच !

$
0
0
नाशकात असा प्रकार प्रथमच घडल्याने त्याच्या परिणामांविषयी सर्वत्र मोठ्या तावातावाने चर्चा सुरू आहे. या घटनेचा लाभ अन् तोटा कोणाचा, यावर पैंजा लागल्या आहेत. झाल्या प्रकाराने भुजबळ हबकले असले तरी एक अर्थाने सावध झाले असतील. या नुकसानीची भरपाई करण्यास त्यांना आता पुरेसा वेळ मिळू शकेल.

खेळ साहित्य २० टक्क्यांनी महागले

$
0
0
कच्च्या मालाच्या मर्यादित पुरवठ्यामुळे खेळ साहित्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला असून साहित्याच्या किमतीत यंदा २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या मे महिन्यात खेळाचे साहित्य खरेदी करणाऱ्या नागरिकांच्या खिशाला निश्चित झळ बसणार आहे.

महिना उलटला; मदत पोहचली नाही दारी

$
0
0
धुळे लोकसभा मतदारसंघात येत्या २४ एप्रिलला मतदान होत आहे. त्यामुळे सर्वच नेतेमंडळी प्रचारात दंग आहे, तर प्रशासकीय यंत्रणा मतदार सुरळीत कसे पार पडेल, याची आखणी करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे साहजिकच प्रशासकीय कामकाजात मोठे अडथळे येत आहेत.

सिंचन विहिरींची कामे मुदत वाढवूनही अपूर्णच

$
0
0
राज्यातील सिंचन विहिरींच्या कामांची मुदत दोन वेळा वाढूनही सत्तर टक्के कामे अपुर्णावस्थेत आढळल्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा फज्जा उडाला आहे. मागील दोन वर्षात सुमारे तीस हजार सिंचन विहिरींची कामेच फक्त पूर्ण झाली. तब्बल सत्तर हजार विहिरींची कामे अपूर्ण आहेत.

जंक्शनचा चेहरामोहरा बदलणारा उमेदवार हवा

$
0
0
देशातील कोणत्याही भागात जाण्यासाठी रेल्वेचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मनमाड जंक्शनचा चेहरामोहरा बदलावा, सुविधांची वानवा असणाऱ्या जंक्शन स्थानकाला आता तरी न्याय मिळावा, अशी प्रवासी वर्गासह स्थानिक नागरिकांची इच्छा आहे. केंद्रात जाऊन रेल प्रशासनाला विकास करायला भाग पाडेल, अशाच उमेदवाराला मत देण्याचा निर्धार चाकरमान्यासह सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

कोटमगावचे सरपंच अतिक्रमणामु‌ळे अपात्र

$
0
0
शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचे सिध्द झाल्याने तालुक्यातील कोटमगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या सरंपच गयाबाई बाबासाहेब कोटमे यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. ज्ञानेश्वर लहरे यांनी त्यांच्याविरोधात विवाद अर्ज दाखल केला होता.

पांढरेंची भुजबळांना प्रश्नावली

$
0
0
राज्यात ठ‌िकठ‌िकाणी झालेल्या स‌िंचन घोटाळ्यांचा संदर्भ देत काही द‌िवसांपूर्वी अज‌ित पवारांना टीकेचे लक्ष्य करणाऱ्या ‘आप’ चे उमेदवार व‌िजय पांढरे यांनी पालकमंत्री छगन भुजबळांवर नेम साधला आहे.

१९ मतदारसंघांमध्ये महिलाराज

$
0
0
लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम राज्यात सध्या जोरात असून, या निवडणुकीत महिला अधिकाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. राज्यातील तब्बल ९ जिल्ह्यांमधील १९ लोकसभा मतदारसंघांसाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी या पदावरील ९ महिला काम पाहत आहेत.

युवराजांपुढे वाचला तक्रारींचा पाढा

$
0
0
लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात असतानाही जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील शीतयुध्द काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. राष्ट्रवादीच्या कारभारावर नाराज असलेले काँग्रेस पदाधिकारी वरिष्ठांकडे आपली खदखद सतत व्यक्त करतात.

सोनियांची मालेगावची सभा रद्द

$
0
0
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची मालेगाव येथे येत्या रविवारी होणारी जाहीर सभा रद्द झाली असून, त्याच दिवशी नंदुरबार येथील सभा मात्र होणार आहे. त्यामुळे नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे.

एसटी वाढवणार मतांचा टक्का

$
0
0
मतदान करणे हा प्रत्येकाचा हक्क असला तरी निवडणुकीच्या कामामध्ये गुंतून पडणाऱ्यांना इच्छा असूनही मतदान करता येतेच असे नाही. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही असेच घडते. मात्र, यंदा निवडणुकीसंदर्भातील कामे सोपविलेल्या चालक आणि वाहकांना मतदानाचेही कर्तव्य पार पाडता यावे, यासाठी त्यांच्या मतदान केंद्राजवळील भागातच ड्यूटी द्या, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images