Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

म्हाडा संकुलात सुविधांची वानवा

$
0
0
अंबडलिंक रोडवरील म्हाडा संकुलमधील रहिवाशांना मुलभूत सुविधा मिळत नसल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. पाणी, वीज व रस्त्यांच्या समस्यांनी ते हैराण झाले आहेत. त्यातच याठिकाणी मंजूर करण्यात आलेल्या पिण्याच्या पाइपलाइनचे कामदेखील बंद करण्यात आले आहे.

तरूणांसाठी रोजगारनिर्मिती वेबसाइट

$
0
0
राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची संख्या आहे; परंतु रोजगार संधी उपलब्ध नाहीत असेही नाही. मात्र, रोजगार संधी नेमक्या कुठे आहेत. हे माध्यम सक्षम नसल्याने तरुणांची अडचण होते. इंटरनेटच्या जगात अनेक गोष्टी सहजशक्य झाल्याने यावर तोडगा काढण्यासाठी कळवणमधील ध्येयवेड्या तरुणांनी रोजगाराच्या संधी दाखविणाऱ्या www.rojgarnirmiti.com या वेबसाइटची निर्मिती केली आहे.

'सिक्युरिटी प्रेस'ला जीआरचा जाच

$
0
0
पाणीपट्टी बिलात देण्यात येणारी सवलत कायद्यात बसत नसल्याचे कारण पुढे करीत महापालिकेने यंदा करन्सी आणि सिक्युरिट प्रेसला व्यावसायिक दराने पाणी बिले पाठविली. प्रेसच्या अधिकाऱ्यांनी मात्र सवलतीबाबत ब्रिटीशकालीन जीआर असल्याचे सांगत व्यावसायिक दराने रक्कम भरण्यास नकार दिला.

माजी नगराध्यक्षांकडून ४ लाख जप्त

$
0
0
​शिरपूरचे माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांच्याकडील चार लाख रुपये चौकशी ताब्यात घेण्यात आले आहेत. मंगळवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास स्थिर सर्वेक्षण पथकाने धुळे अमळनेर रस्त्यावर एका स्कॉर्पिओ गाडीची तपासणी केली असता या गाडीतून प्रवास करणाऱ्या चव्हाण यांच्याकडे चार लाख रुपये आढळून आले.

‘त्या’ मंडल अधिकाऱ्याची बदली

$
0
0
दिंडोरी लोकसभा मतदार संघातील उमेदवार डॉ. भारती पवार यांचा नातेवाईक असलेल्या मंडल अधिकारी एम. एल. पवार यांची अखेर प्रशासनाने बदली केली आहे. विशेष म्हणजे, क्लीन चीट देण्याचा अट्टहास करणाऱ्या प्रशासनाने एक पाऊल मागे घेत हा निर्णय घेतला आहे.

महापालिकेत ‘कहीं खुशी.. कहीं गम’

$
0
0
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी आयुक्त संजय खंदारे यांची राज्य सरकारने तडकाफडकी बदली केली. रविवारी तसेच सोमवारी महापालिकेस सुट्टी होती. त्यामुळे मंगळवारी महापालिकेत सर्वत्र आयुक्तांच्या बदलीची चर्चा सुरू होती.

काँग्रेस, भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू

$
0
0
काँग्रेस व भाजप हे दोन्ही पक्ष नाण्याच्या दोन बाजू आहेत. देशहित व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी तिसऱ्या आघाडीचे सरकार केंद्रात येणे गरजेचे असून, मतदारांनी माकपला मतदान करावे, असे आवाहन माकपचे नेते सीताराम येच्युरी यांनी केले.

खर्चाबाबत पवारांची भुजबळांवर आघाडी

$
0
0
निवडणुकीच्या खर्चात मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांनी आघाडी घेतली असून, राष्ट्रीय राजकीय पक्षाच्या उमेदवारापासून अपक्षांनीही खर्चाला सुरुवात केली आहे. तर, बिनपगारी प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या दिंडोरीच्या प्रा. ज्ञानेश्वर माळी यांनी तब्ब्ल ९९ हजार रुपये खर्च केले आहेत.

त्र्यंबकेश्वरला पकडली नऊ लाखांची रोकड

$
0
0
त्र्यंबकेश्वर तहसील निवडणूक शाखेच्या भरारी पथकाने तपासणी पथकाने दोन वाहनांमधून पावणे नऊ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. या रकमेच्या तपासणीसाठी प्राप्तीकर खात्याचे अधिकारी त्र्यंबकेश्वर येथे दाखल झाले आहेत.

शेतकऱ्यांना वाळीत टाकणार नाही

$
0
0
शहर विकास आराखडा करताना शेतकऱ्यांना वाळीत टाकणार नाही, बिल्डर सांगतील ते मान्य करणार, मात्र दोघांवर अन्यायही होऊ देणार नाही, अशा शब्दांत नगरविकास खात्याचे सहसंचालक प्रकाश भुते यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

हैदराबादहून मतदान यंत्रांची आयात

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील मतदानासाठी लागणारे मतदान यंत्र हैदराबाद आणि बीड येथून आयात करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सुरळीत मतदान पडणार असून, दिंडोरीचे मतदान यंत्र अंतिम तपासणीतून सील करण्यात आले आहेत.

पांढरेंची उमेदवारी रद्द करा!

$
0
0
नाशिक लोकसभा मतदारसंघातील आम आदमी पार्टीचे उमेदवार विजय पांढरे यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार करत नाशिकमधील अपक्ष उमेदवार देविदास सरकटे यांनी पांढरे यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली आहे.

अब की बार `जाहिरात वॉर`

$
0
0
निवडणुकाजवळ आल्या की टीव्हीवरील जाहिरातींचाही ज्वर वाढू लागतो. या वर्षीही टीव्हीवरील जाहिराती लक्षवेधी ठरल्या आहेत. सर्वच पक्षांनी विकास, रोजगार, महिला सुरक्षा, पाणी, शेतकरी व तरुणांना आकर्षित करण्या-या जाहिराती बनविल्या.

मोदींची नाशिक सभा वेटिंगवरच

$
0
0
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची नाशिक जिल्ह्यातील सभा अद्यापही अनिश्चिततेच्याच फेऱ्यात असल्या तरी जळगाव, धुळे आणि नंदुरबारमधील सभा निश्चित करण्यात आल्या आहेत. येत्या २० तारखेला मोदी यांची जळगावला, तर २२ तारखेला धुळे आणि नंदुरबार येथे स्वतंत्र सभा होणार आहेत.

जिल्ह्यात ९ हजार पदे रिक्त

$
0
0
सर्वसामान्य नागरिकांची सरकारी कार्यालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वेळेवर कामे होत नसल्यामागे या ठिकाणी असलेली रिक्त पदे कारणीभूत असल्याची बाब समोर येत आहे. जिल्ह्यातील विविध कार्यालयांमध्ये एकूण ९ हजार २७८ पदे रिक्त असून त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या कामकाजावर होत आहे.

जिल्ह्यातून २० गुंड तडीपार

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील नाशिक, दिंडोरी आणि धुळे मतदारसंघांमधून २० गुंडांना तडीपार करण्यात आले आहे. तर विविध कारवायांमध्ये २५ लाखांचे मद्य जप्त करण्यात आले आहे. याखेरीज चार गावठी कट्टे हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

कोकाटेंच्या सभेत मोदींचा जयकार!

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी मंगळवारी बोलविलेल्या मेळाव्यात सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या समर्थकांनीच सभा उधळून लावण्याचा जोरदार प्रयत्न केला.

करायला गेले मारुती, झाला गणपती!

$
0
0
कार्यकर्त्यांना पेटवणे सोपे... पेटलेल्या कार्यकर्त्यांवर भक्कम मांड ठोकणे किती कर्मकठीण असते, याचा अनुभव सध्या सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे घेत आहेत. मंगळवारी समर्थकांच्या मेळाव्यात जो काही प्रकार घडला त्यातून आ. कोकाटेंची कार्यकर्त्यांवरील घट्ट पकड सैल झाल्याचे तर दिसलेच; पण करायला गेले मारुती अन् झाला गणपती, अशी अवस्थाही त्यांनी ओढवून घेतली.

अवकाळी पावसाची सटाणा तालुक्यात हजेरी

$
0
0
महिन्याभरानतंर अवकाळी पावसाने पुन्हा बागलाण तालुक्यात थैमान घातले आहे. बुधवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाने पश्चिम भागाला झोडपले.

महापालिका प्रशासनाचे वरातीमागून घोडे

$
0
0
महापालिकेच्या अजब-गजब कारभारावराचे नमुने समोर येत असतात. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने असाच एक कारभार समोर आला. आचारसंहिता लागू होताच कुठल्याही विभागातील सरकारी किंवा निमसरकारी कर्मचा-याने निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होऊ नये, असा आदेश काढला जातो.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images