Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

औद्योगिक वसाहतीत कही खुशी कही गम

$
0
0
नाशिक जिल्ह्यांतील औद्योगिक वसाहतींमध्ये कही खुशी कही गम असे चित्र पाहायला मिळत आहे. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, बॉश अशा काही मोठ्या कंपन्यांमधील पगारवाढीचे करार कामगारांच्या दृष्टीने यशस्वी झाले आहेत.

मतदार यादीत नाव आहे?

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या नाशिक जिल्ह्याच्या अंतिम आणि पुरवणी मतदार यादीतून आपले नाव आहे का? याची शहानिशा करण्यासाठी तातडीने ऑनलाईन किंवा तहसिल तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात असलेली यादी पहा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

... तर दिंडोरीत राष्ट्रवादीला सहकार्य नाही

$
0
0
कोकणातील सिंधदुर्ग लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार निलेश राणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून संपूर्ण सहकार्य मिळत नसल्याने दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांचा प्रचार न करण्याचा तसेच त्यांना सहकार्य न करण्याचा निर्णय येवला शहर व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

बंदोबस्तासाठी १,६३० मनुष्यबळाचे ‘वेटिंग’

$
0
0
निवडणूक निर्विघ्नपणे पार पाडण्याकामी पोलिसांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. नाशिक मतदारसंघामध्ये पोलिस आयुक्तांपासून शिपायांपर्यंत आणि होमगार्डपासून एसआरपीएफच्या कर्मचाऱ्यांपर्यंत एकूण २,९६० एवढ्या मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे.

उमेदवारांची मांदियाळी

$
0
0
रामनवमी, त्यानंतर महावीर जयंती आणि आजची आंबडेकर जयंती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगळ्याच ठरत आहेत. प्रचाराची संधी​ शोधत जयंती तसेच उत्सवांमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांची मांदियाळीच प्रत्येक कार्यक्रमामध्ये भरत असून, या कार्यक्रमांना यंदा वेगळाच रंग भरतो आहे.

राहुल गांधी नाशिकला करणार टाटा

$
0
0
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची अहमदनगरला सभा झाल्यानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही नगर जिल्ह्यात सभा होणार आहे. याच सभेसाठी राहुल हे ओझर विमानतळाहून जाणार असले तरी त्यांनी नाशिकला बायपास करण्याचेच नियोजन केले आहे.

टर्मिनल दर्शन झाले, आम्ही नाही पाहिले!

$
0
0
शहराच्या विविध भागातून नागरिकांना ओझरच्या विमानतळ पॅसेंजर टर्मिनलच्या ठिकाणी मोफत घेवून जाण्याच्या प्रकाराकडे प्रशासनाने जाणूबुजून डोळेझाक केल्याचे दिसून येत आहे.

आंबेडकर जयंतीचा शहरात अपूर्व उत्साह

$
0
0
नाशिकरोड परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज जयंतीच्या आदल्या दिवशी रात्री बारा वाजता नाशिकरोड बसस्थानकाजवळील बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यासाठी रीघ लागली होती.

जीआयएस लिंकिंगचे काम अंतिम टप्प्यात

$
0
0
उपग्रहीय सर्वेक्षणानुसार उपलब्ध होणाऱ्या माहितीची नोंद करण्याचे काम महापालिका प्रशासानाने हाती घेतले आहे. सर्व डेटा संकल‌ित केला जात असून हे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सुत्रांनी दिली. या उपग्रहीय सर्व्हेक्षणानंतर मिळकतींना युनिक क्रमांक दिले जाणार आहेत.

निवडणुकीनंतरच नाशिकरोड रस्त्याचे रूंदीकरण

$
0
0
नाशिक-पुणे महामार्गावरील द्वारका ते नाशिकरोड रस्त्याच्या रुंदीकरणाला निवडणूक आचारसंह‌िता संपताच सुरुवात होणार आहे. त्यामुळे वाहनचालक तसेच नाशिककरांची या रस्त्यासाठी असलेली प्रतीक्षा संपुष्टात येईल.

सिंहस्थाची कामे रुळावर

$
0
0
मध्य रेल्वेने अगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर करण्यात येणाऱ्या कामाची टेंडर प्रक्रिया सुरू केली असून, १२ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

मंडल अधिकाऱ्याला क्लीन चिट

$
0
0
कळवण तालुक्यातील मोकभणगी येथील मंडल अधिकारी एम. एल. पवार हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांचा प्रचार करीत असल्याच्या तक्रारीत तथ्य आढळून न आल्याने त्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. यासंदर्भात कळवण प्रांत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला आहे.

बोलो भगवान महावीर की जय !

$
0
0
जैन सेवा कार्य समितीतर्फे भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्त रविवारी शहरातून भगवान महावीरांची मिरवणूक काढण्यात आली दहिपूलाहून सुरु झालेल्या मिरवणुकीत शहरातील समस्त जैन बांधव सामील झाले होते.

आयुक्त खंदारेंची अखेर बदली

$
0
0
आचारसंहिता लागू झाल्यानंतर विवादास्पद निर्णय घेऊन चर्चेत आलेल्या आयुक्त संजय खंदारे यांची अखेर बदली करण्यात आली. त्यांचा पदभार सोमवारपासून आदिवासी विकास आयुक्त संजीवकुमार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा आजपासून

$
0
0
क्रीडा भारती नाशिकच्या वतीने व जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने २६वी किशोर व किशोरी अजिंक्यपद कबड्डी व निवडचाचणी स्पर्धा आजपासून सुरू होणार आहे. यशवंत व्यायामशाळेत ही स्पर्धा रंगणार आहे.

सोळा तास अभ्यास करून अभिवादन

$
0
0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील ग्रामीण चित्रकला महाविद्यालयात सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सलग १६ तास अभ्यास करून विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले.

सिन्नर पालिकेच्या रुग्णालयाचे स्थलांतर

$
0
0
सिन्नर शहरातील नगरपालिका रुग्णालयाचे नूतन इमारतीचे बांधकाम करण्यात येणार असून वर्षभरात हे काम पूर्ण होणार आहे. तो पर्यंत नागरिकांच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरुपात हे रुग्णालय नगरपालिकेच्या चौदा चौक वाड्यातील शॉपिंग कॉम्प्लेक्समधील सिन्नर केअर हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे.

नाशिकनगरीत अवतरला भीमसागर

$
0
0
ज‌िवंत तसेच आकर्षक देखाव्यांनी सजविलेले चित्ररथ, ढोलताशा-डीजेच्या दणदणाटासह फटाके व शुभेच्छांच्या वर्षावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२३वी जंयती सोमवारी जल्लोषात साजरी करण्यात आली. शहरातील मुख्य मिरवणुकीसह ठिकठिकाणी डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

‘एचएएल’च्या कुर्मगतीची ‘सार्वजनिक बांधकाम’ला झळ!

$
0
0
अवघ्या वर्षभराच्या गतिमान कालावधीत सार्वजनिक बांधकाम विभागाने ओझर येथील विमानतळ टर्मिनल पूर्ण केले असले तरी आता त्यांना या टर्मिनलच्या सांभाळणीचा भार सहन करावा लागत आहे. एचएएलने टर्मिनलचा ताबा घेण्याची विनंती बांधकाम विभागाने केली असली तरी त्यांच्या संथ कारभारामुळे किमान महिनाभर तरी बांधकामलाच टर्मिनलचा सांभाळ करावा लागणार आहे.

विकासवारी एक रुपयावरी

$
0
0
निवडणुकीच्या निमित्ताने ऐन उन्हाळ्यात अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. प्रत्येक पक्षाच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांची (भाडोत्री) मोठी फौज लागत आहे. तसेच, घरोघरी प्रचारपत्रके वाटण्यासाठीही या कार्यकर्त्यांची गरज भासत आहे. ‘विकासवारी’साठी एक रुपया, एका हजार प्रचारपत्रकांसाठी पाचशे रुपये या दराने या कार्यकर्त्यांना रोजगार मिळाला आहे. यामुळे कमाईचा मोठा सोर्स उपलब्ध झाला आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images