Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मतदान यंत्रे सील!

0
0
जिल्ह्यातील एकूण ४,१९१ मतदान केंद्रांसाठी आवश्यक असलेल्या मतदान यंत्रांची अंतिम तपासणी आणि ते सील करण्याचे काम सोमवारपासून सुरू झाले आहे. येत्या गुरुवारपर्यंत हे काम सुरू राहणार आहे.

संवेदनशील केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर

0
0
जिल्ह्यातील ६४ संवेदनशील मतदान केंद्रांवर (क्रिटीकल) सीसीटीव्हीची नजर आणि सूक्ष्म निरीक्षकांची हजेरी राहणार आहे. तसेच, या केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार असून, केंद्रीय राखीव पोलिस दलाची तुकडीही याठिकाणी तैनात राहणार आहे.

‘नारपारचे पाणी पळविण्याचा घाट’

0
0
खासदार हरिश्चंद्र चव्हाणांनी नांदगाव व येवल्यात आपल्या खासदार निधीतून पाच-पंचवीस लाख रुपयांच्या पलिकडे कोणती विकासकामे केली आहेत, असा सवाल उपस्थित करीत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नारपार योजनेतील पाणी गुजरातमध्ये पळवून नेण्याच्या नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नाला त्यांची मूकसंमती असल्याचा आरोप केला.

पाण्याने पोळलेल्या गावात सारे काही शांत!

0
0
लोकसभा निवडणूक अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलीय... पण दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मोठे शहर असूनही मनमाड शहरात अद्यापपर्यंत ना कोणती मोठी सभा झाली, ना इथे व्यापक प्रमाणावर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. सारे कसे शांत शांत किंवा सब कुछ लागे सुना सुना, अशी शहराची स्थिती आहे.

अशा विकासाला आग लावा

0
0
शहराचा नव्हे, तर जमिनीचा व्यापार करणाऱ्याचा तसेच बिल्डर आणि पुढाऱ्यांच्या लॉबीचा विकास होत आहे, अशा विकासाला आगा लावा, अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

आचारसंहितेवर १२ भरारी पथकांचा वॉच

0
0
लोकसभा निवडणूक अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वच उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचार शेवटच्या टप्प्यात आल्याने आचारसंहितेचा भंग होण्याची शक्यता वाढली असून त्यावर लक्ष ठेवण्यासाठी १२ भरारी पथके शहरभर घिरट्या घालू लागली आहेत.

माणिकराव कोकाटे मनधरणी मोहीम

0
0
सिन्नरमधील एकूण मतदान व आमदार माणिकराव कोकाटे यांचा मतदारसंघातील प्रभाव पाहता राष्ट्रवादीला कोकाटे यांचे बंड परवडणारे नाही. त्यावर राष्ट्रवादीने कोकाटे यांच्या मनधरणीची मोहीम हाती घेतली आहे.

‘व‌िद्यार्थ्यांच्या व‌िकासासाठी सर्व घटकांचे योगदान हवे’

0
0
व‌िकासाच्या वाटेची स्वप्न रंगव‌िताना व‌िद्यार्थी हा केंद्रब‌िंदू आहे, हे व‌िसरून चालणार नाही. व‌िद्यार्थ्याच्या व‌िकासासाठी प्रशासनासह समाजातील सर्वच घटकांचे योगदान मोलाचे आहे, असे प्रत‌िपादन महापाल‌िका श‌िक्षण मंडळाच्या श‌िक्षणाध‌िकारी क‌िरण कुंवर यांनी केले.

‘डॅमेज कंट्रोल’साठी राष्ट्रवादी सरसावली

0
0
सिंधुदुर्ग इफेक्टमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची नाशिकमध्ये झालेली कोंडी पाहता राष्ट्रवादीतर्फे डॅमेज कंट्रोल मोहीम हाती घेण्यात आली असून, आज (मंगळवार) काँग्रेससह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सिन्नरमध्ये मेळावा घेत आहेत.

आजपासून मतदान चिठ्ठी वाटप

0
0
मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी मतदानाच्या दिवशी होणारी झुंबड लक्षात घेऊन यंदापासून मतदार यादीतील नावाची चिठ्ठी मतदाराला मंगळवारपासून घरपोच दिली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक केंद्रावरील बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) घरोघरी जाणार असून, नव्याने यादीत आलेल्या मतदारांना त्यांचे निवडणूक ओळखपत्रही दिले जाणार आहे.

वाघाडीत दारू गुत्ते उद‍्ध्वस्त

0
0
वाघाडी परिसरातील गावठी दारूच्या गुत्त्यांवर सोमवारी सकाळी छापा टाकण्यात आला. त्यामध्ये १५०० लिटर रॉकेल आणि २०० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली असून हजारो लिटर रसायन पोलिसांनी नष्ट केले. गुन्हे शाखा युनिट एक आणि दोनच्या पथकांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

क्रीडा स्पर्धांसाठी ऑनलाइन अर्ज

0
0
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धांसाठी यापुढे शाळांना ऑनलाइन अर्ज भरणे सक्तीचे केले असून त्याबाबत शाळांच्या क्रीडा शिक्षकांना एक जूनपासून विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

लग्नसराई, सहलींसाठी STला पसंती

0
0
राज्य मार्ग प‌रिवहन महामंडळातर्फे देण्यात येणाऱ्या विविध सवलती आणि सुरक्षिततेची हमी यांमुळे एसटीच्या प्रासंगिक करार योजनेला प्रवाशांचा प्रतिसाद वाढतो आहे. डिसेंबर ते मार्च या हंगामात २०७ बसेस करारावर देण्यात आल्या. त्यातून महामंडळाच्या नाशिक शहर आगाराला ४७ लाख ३२ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे गतवर्षीपेक्षा हे उत्पन्न १८ लाख रुपयांनी वाढले आहे.

अनिल गोटेंची भाजपशी दिलजमाई

0
0
लोकसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांनी महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. सोमवारी सकाळी डॉ. भामरे, आमदार जयकुमार रावल यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गोटे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन पाठिंब्याची अपेक्षा व्यक्त केली होती.

नाशिकचा उमेदवार अपघातात जखमी

0
0
नाशिक मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार मकसूद इलियास खान हे अपघातात गंभीर जखमी झाले असून या दुर्घटनेत त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. भोपाळ-इंदूर हायवेवर अष्टा गावाजवळ सोमवारी हा अपघात झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

मीच तुझा उमेदवार

0
0
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला असून, उमेदवारासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची दमछाक होते आहे. मात्र, यादरम्यान गमतीजमतीही होत आहेत. सिन्नरमधील प्रचारात असाच एक किस्सा झाला. सध्या तेथील वातावरण सिंधुदुर्गाप्रमाणेच तापलेलं आहे.

एलबीटी तपासणीसाठी मूळ कागदपत्रे बंधनकारक

0
0
एलबीटी अर्थात लोकल बॉडी टॅक्सबाबत रिर्टन्स सादर केल्यानंतर खरेदीची बिले आणि भरलेला एलबीटी महसूल यात तफावत आढळल्यास महापालिकेचे अधिकारी संबंधित व्यवसायिकांची मूळ कागदपत्रे तपासणार आहेत. त्यामुळे रिर्टन्स भरताना मूळ बिलांची आवश्यकता नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राजस्थान कॉटन फेबला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
0
नाशिककरांना एकाच छताखाली कॉटनच्या असंख्य व्हरायटी उपलब्ध करण्यासाठी शहरातील नवीन गंगापूर नाका येथील ब्रम्हेचा इस्टेट ग्राउंडमध्ये राजस्थान कॉटन फेब २०१४चे आयोजन करण्यात आले आहे. या ऑल इंडिया हॅण्डलूम आणि हॅण्डिक्राफ्ट या फेबला नाशिकमधील ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

म. बा. यांच्या स्मृती प्रेरणादायीच

0
0
आयुष्यभर ज्ञानाची कठोर उपासना करीत डॉ. म. बा. कुलकर्णी यांनी एक आदर्श अभ्यासू व्यक्त‌िमत्त्व समाजापुढे ठेवले. त्यांचे कर्तृत्व आण‌ि व‌िचार हे नव्या प‌िढ्यांसाठी प्रेरणादायीच आहे, असे प्रत‌िपादन डॉ. अशोक मोडक यांनी केले.

मुखेड फाट्यावर अपघातात

0
0
नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील मुखेड फाट्यावर मंगळवारी दुपारी स्विफ्ट कार उलटी होऊन झालेल्या भीषण अपघात आई व मुलगा ठार झाला. आशालता विश्वासराव आहेर (वय ७०) व सुनील विश्वासराव आहेर (वय ५०, रा. मुखेड) अशी मृतांची नावे आहेत.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images