Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पासपोर्टची छपाई पुन्हा सुरू

$
0
0
गेल्या दीड महिन्यांपासून पासपोर्टसाठी लागणाऱ्या साहित्याची वानवा असल्याने नाशिकरोडच्या इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये ठप्प झालेली पासपोर्ट उत्पादनाची प्रक्रिया अखेर कार्यन्वित झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यामुळे देशातील अनेक पासपोर्ट केंद्रांना असलेली पासपोर्टची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.

रंगणार संत गाडगे महाराज साहित्य संमेलन

$
0
0
मानवता हाच आपला धर्म मानणाऱ्या गाडगे बाबांच्या विचांरांची अगाधता, गरीबांसाठी त्यांच्या मनात असलेली करूणा आजच्या पीढीला समजून घेता यावी या दुसऱ्या संत गाडगे महाराज साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

'छावा'चे राज्यस्तरीय अधिवेशन नाशिकमध्ये

$
0
0
मराठा आरक्षणाच्या आग्रही मागणीसह राज्यातील विविध प्रश्नांसंबंधी राज्य सरकारला जागे करण्यासाठी छावा संघटनेतर्फे राज्यस्तरीय अधिवेशन भरविण्यात येत आहे. दोन मार्चला नाशिकमध्ये होणाऱ्या या अधिवेशनासाठी सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आल्याची माहिती अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष विलास पांगारकर यांनी दिली.

बजेटचा फुगविलेला फुगा

$
0
0
प्रशासनाने २०१४-१५ या आर्थिक वर्षाकसाठी सादर केलेल्या अर्थसंकल्पास स्थायी समितीने दुरूस्ती सूचनांसह नुकतीच मंजुरी दिली. आगामी ​सिंहस्थ, महापालिकेचे घटलले उत्पन्न आ​णि विस्तारीत होत असलेले शहर असा अनेक कांगोऱ्यांचा विचार करता, कोणतीही करवाढ नसलेला हा अर्थसंकल्प ​​नाशिककरांच्या अपेक्षांची पूर्ती करणारा ठरणार का?

किचेनची कमाल

$
0
0
शहरातल्या मोक्याच्या ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांचा नेहमीच बंदोबस्त असतोच. त्यामुळे जरा चूक व्हायचा अवकाश हे मामा लोक त्या वाहनचालकाला चांगलाच धडा शिकवतात.

संशोधक वृत्तीतच प्रगतीचा मार्ग

$
0
0
‘भारतीयांमध्ये संशोधक वृत्ती प्रकर्षाने दिसून येते. परदेशातील प्रमुख संशोधनांमध्ये भारतीय महत्त्वाची पदे भूषविताना आढळतात. या संशोधक वृत्तीमध्येच प्रगतीचा मार्ग दडलेला आहे’, असे मत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अरुण जामकर यांनी व्यक्त केले.

बिटको हॉस्पिटलच्या रखवालदारास मारहाण

$
0
0
नाशिकरोडच्या बिटको हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या पेशंटच्या नातेवाईकांनी बुधवारी ड्युटीवर असलेल्या रखवालदारास मारहाण केली आहे. याबाबत नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये मारहाण करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रामशेजच्या ‘बांधकामा’ला होकार!

$
0
0
मराठे आणि मुगल साम्राज्यातील युद्धाचा साक्षीदार असलेल्या रामशेज किल्ल्याच्या विकासाला अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने होकार दर्शविला आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत या किल्ल्याचे विकासकाम सुरू होण्याची शक्यता आहे.

‘डॉक्टर रक्षणाय’ पोलिसांचा जागर

$
0
0
रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याची गंभीर दखल घेण्याचे आदेश हायकोर्टाने राज्याच्या गृह विभागाला दिले आहेत. यात पोलिसांना यासंदर्भातील कायद्याचा अभ्यास पोलिस प्रशिक्षणात समावेश करा आणि कार्यशाळांद्वारे जनजागृती करा, अशा सूचनाही राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.

मुदत उलटूनही सर्वेक्षण सुरूच

$
0
0
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेले सर्वेक्षण दिलेल्या मुदतीत पूर्ण होऊ शकलेले नाही. पुढील आठवड्यात ते पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आचारसंहितेपूर्वी या सर्वेक्षणाचे निष्कर्ष आणि आरक्षणाची घोषणा याचा ताळमेळ बसणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कुलसच‌िवपदी डॉ.गर्कळ

$
0
0
महाराष्ट्र आरोग्य व‌िज्ञान व‌िद्यापीठाचे व‌िद्यमान कुलसच‌िव डॉ.आद‌ीनाथ सूर्यकर हे या मह‌िन्याच्या अखेरीला न‌िवृत्त होत असल्याने या पदावर डॉ.के.डी.गर्कळ यांची न‌िवड करण्यात आली.

भाषेच्या पेपरला १२ कॉपीबहाद्दर

$
0
0
परीक्षांचे अर्ज भरण्यापासून तर तर रिसीटमधील गोंधळापर्यंतच्या अडचणी पार करीत बारावीच्या परीक्षेला गुरुवारी सुरुवात झाली. या परीक्षेच्या पह‌िल्याच द‌िवशी मराठी भाषेच्या पेपरला नाश‌िक व‌िभागातून १२ कॉपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आली.

आपल्यांकडून मिळालेली जिलेबी!

$
0
0
रोज गोड खाल्ले की अजीर्ण होते. परंतु एखाद्याच दिवशी जिलेबी मिळाली की छान वाटते. प्रा. वसंत कानेटकर यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार म्हणजे आपल्या माणसांकडून मिळालेली जिलेबीच आहे, असे प्रतिपादन अभिनेता व रंगकर्मी प्रशांत दामले यांनी केले.

राज ठाकरे नाशकात

$
0
0
गोदापार्क या आपल्या ड्रीम प्रोजेक्टला नवा लूक देण्यासह विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. गुरूवारी संध्याकाळी राज नाशिकमध्ये दाखल झाले असून शनिवारी त्यांच्या उपस्थितीत नव्याने साकारण्यात येणाऱ्या गोदापार्कचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.

नाशिकमध्ये लोडशेडिंग सुरू

$
0
0
नाशिक परिसरात गेल्या काही दिवसात सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत असून गुरुवारी दुपारी नाशिक व नाशिकरोडच्या काही भागात वीज पुरवठा खंडीत झाला होता. केंद्रीय विद्युत यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे तात्पुरते लोडशेडिंग करावे लागत असल्याचे महावितरणने कळवले आहे.

मग विद्यमान खासदारांचे काय?

$
0
0
लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आल्याने सर्वांची उत्सुकता उमेदवारांच्या घोषणेकडे आहे. त्यातच 'व्हॉट्सअप'सह 'सोशल मीडिया'त 'राष्ट्रवादी काँग्रेस'तर्फे नाशिकमधून पालकमंत्री छगन भुजबळ उमेदवारी करणार असल्याचे मेसेज फिरत असल्याने तर्कवितर्कांसह प्रश्न व चर्चांना जोर चढला आहे.

श्रद्धांजलीऐवजी लावणी वाजली

$
0
0
एका ज्येष्ठ कवीला श्रद्धांजली वाहण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. ठरलेल्या वेळेवर जवळपास सर्वच लोक कार्यक्रमस्थळी जमले. कार्यक्रम म्हटलं की थोडासा उशीर होणारच.

‘वाकी-खापरी’चे काम रोखले

$
0
0
नांदुरमध्यमेश्वर प्रकल्पांतर्गत इगतपुरी तालुक्यात वाकी-खापर धरणाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने पाटबंधारे विभागाने घळभरणीचे काम सुरू केले होते. मात्र, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अजूनही रखडले आहेत. यामुळे धरणग्रस्तांनी धरणावर धाव घेत आक्रमकपणे काम रोखले.

धुमाळ पॉईंट रस्ता वाहतुकीसाठी बंद

$
0
0
शहरातील मुख्य बाजारपेठेतील महत्वाचा भाग समजल्या जाणाऱ्या सांगली बॅंक सिग्नल ते धुमाळ पॉईंट मार्गावर पाइपलाईन आणि काँक्रिटीकरणाचे काम सुरू होणार आहे.

पंचवटीत भोंदूबाबाचा भांडाफोड

$
0
0
पैशांचा पाऊस पाडून पैसे दुप्पट करून देतो, सर्व आजार बरे करतो असे सांगून लोकांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या भोंदूबाबा विरोधात पंचवटी पोलिसांना तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी चौकशीसाठी त्याला शुक्रवारी ताब्यात घेतले.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>