Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

खराब हवामानाचा द्राक्षांना फटका

$
0
0
जगभरात नावलौकिक असलेली नाशिकची द्राक्षे फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत नाशिककरांसाठी बाजारात दाखल होतात. यंदा फेब्रुवारीचा तिसरा आठवडा सुरू होऊनही द्राक्षांची पुरेशी आवक नसल्याने सर्वसामान्य नाशिककर घरच्या द्राक्षांची प्रतीक्षेत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली निसर्गातील अनियमिततेमुळे चांगल्या द्राक्षांसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

पाणीपट्टी-घरपट्टी दरवाढ फेटाळली

$
0
0
महापालिका प्रशासनाने अंदाजपत्रकात सुचवलेली घरपट्टी आणि पाणीपट्टीतील वाढ स्थायी समितीने अखेर फेटाळून लावली. महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नाला अनेक फाटे फुटले असून त्यांना रोखा, असा आदेश देत स्थायी सभापती रमेश धोंगडे यांनी सूचना आणि दुरुस्त्यांसह १ हजार ८७५ कोटी ६९ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी दिली.

वसतीगृहातून १७ मुली फरार

$
0
0
नाशिकमधील सावकरनगर परिसरातील वात्सल या शासकीय वसतीगृहातून १७ मुली आज (बुधवार) पहाटे फरार झाल्याचे समोर आले आहे. यामुळे वसतीगृह प्रशासनाचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. १७ मुलींपैंकी ८ मुली सापडल्या असून ९ मुली अद्यापही बेपत्ता असल्याचे समजते आहे.

नाशकात बारबाला पसार

$
0
0
सुरक्षारक्षकावर मिरचीपूड फेकून १७ बारबालांनी धूम ठोकल्याचा प्रकार बुधवारी पहाटे अशोकस्तंभजवळील शासकीय वात्सल्य वसतीगृहात घडला.

नाट्यगीतात रमले नाशिककर

$
0
0
संस्कारभारती आयोजित ‘नाट्य संगीत’ कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिककरांची बुधवारची संध्याकाळ स्मरणीय झाली. निमित्त होते भरतमुनी जयंतीचे. संस्कार भारतीच्या सहा उत्सवांपैकी एक असलेल्या भरतमुनी जयंती उत्सव साजरा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अधिकारी नवे, पण गुन्ह्यांचे काय?

$
0
0
पोलिस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच तीन वर्षांच्या नियमानुसार बदल्या झाल्या आहेत. त्यात नाशिकरोड आणि उपनगर या पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. दरवर्षी बदल्या होतात, अधिकारी येतात तेवढ्यापुरती परिस्थिती सुधारते. परंतु काही दिवसातच पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती होते.

मोबाइलची कबुली

$
0
0
आपल्या स्टेटस प्रमाणे मोबाइल वापरण्याची पध्दत सध्या मूळ धरु लागली आहे. मोबाइल ऑपरेट करता येत नसेल तरी चालेल. तो जवळ बाळगण्यात धन्यता मानणारे अनेक महाभाग आहेत. अशाच एका अधिकाऱ्याने नवीन मोबाइल घेतला.

अनुदानावरून सावळा गोंधळ

$
0
0
कांदा टंचाईवर महत्त्वपूर्ण उपाय ठरलेल्या कांदा चाळींच्या अनुदानाची योजना राज्य शासनाने पणन मंडळाकडून कृषी विभागाकडे हस्तांतरित केली आहे. मात्र, नवीन प्रस्ताव स्विकारण्याबाबत कृषी खात्याला कुठलेही अधिकृत निर्देश मिळालेले नाहीत, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे.

खंडेराव बर्वे यांचा अपघातात मृत्यू

$
0
0
नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर जवळील चिंचोली शिवारात शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख व डूबेरेचे उपसरपंच खंडेराव बर्वे यांचा अपघातात मृत्यू झाला. पाठीमागून येणाऱ्या खासगी बसने दुचाकीला घडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

कमी उंचीचे दुभाजक‌ बनले धोकेदायक

$
0
0
नाशिक-पुणे या अत्यंत वर्दळीच्या महामार्गावर उंच दुभाजकांची गरज आहे. व्दारका ते सिन्नर फाटा या दरम्यान दुभाजकांची दुरवस्था झाल्यामुळे अपघात होत आहेत. अनेक बेशिस्त वाहनधारक अचानक दुभाजक ओलांडून विरुद्घ दिशेच्या रस्त्यावर वाहन नेतात.

व्यापाऱ्यांचा उद्या बंद

$
0
0
स्थानिक संस्था कर हटविण्यासाठी नाशिकसह राज्यभरातील व्यापाऱ्यांनी शुक्रवारी बंदचा नारा देतानाच मुंबईत आझाद मैदान येथे सभा घेण्याचे निश्चित केले आहे. यामुळे शुक्रवारी शहरातील व्यापार ठप्प होण्याची चिन्हे आहेत.

‘क्विक लेन’ सेंटर नाशकात

$
0
0
फोर्ड कंपनीच्या शोरूममधून कार घेतल्यानंतर त्यांना अविरत कार सर्व्हिस देण्यासाठी आशियातील चौथे आणि देशातील तिसरे ‘क्विक लेन’ सर्व्हिस सेंटर नाशिकमध्ये सुरू केल्याची घोषणा फोर्ड कंपनीचे कस्टमर सर्व्हिस ऑपरेशनचे उपाध्यक्ष पी. के. उमाशंकर यांनी केली.

फिरत्या दवाखान्यांचा सुळसुळाट

$
0
0
नाशिक-पुणे रोडवर सध्या फिरत्या दवाखान्यांचा सुळसुळाट झाला असून जागोजागी उभ्या असलेल्या दवाखान्यांमुळे सामान्य नागरिकांची फसवणूक होत आहे. या दवाखान्यांकडे कोणतेही परवाने नसून प्रशासनाने यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

अटल ज्ञान संकुलाचे लोकार्पण

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील अद्ययावत अशा अटल ज्ञान संकुलाचा व लोकमान्य उद्यानाचा लोकार्पण सोहळा शनिवारी (२२ फेब्रुवारी) भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.

‘गोदापार्क’साठी शनिवारचा मुहूर्त

$
0
0
'मनसे'अध्यक्ष राज ठाकरे यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'गोदापार्क'ला झळाळी देण्यासाठी शनिवारचा(२२ फेब्रुवारी) मुहूर्त निश्चित करण्यात आला असून राज ठाकरे यांसह 'रिलायन्स फाऊंडेशन'च्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नव्या गोदापार्कचे भूमिपुजन करण्यात येणार आहे.

ऑल द बेस्ट

$
0
0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांकडून घेण्यात येणाऱ्या एचएससी बोर्डाची (बारावी) परीक्षा आज, गुरुवारपासून सुरू होत आहे. परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट!

गुंतवणुकीचा ओढा नाशिककडे

$
0
0
सुवर्ण चौकोनाचा एक भाग असलेल्या नाशिकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेक कंपन्यांनी पुढाकार घेतला असून येत्या काळात यामुळे नाशिकच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. परिणामी, इतर कंपन्याही गुंतवणुकीसाठी नाशिकचा विचार करण्याची दाट शक्यता आहे.

मनविसेच्या कार्यकारिणीला मुहूर्त

$
0
0
मनसेची प्रमुख आघाडी असतानाही गेल्या काही महिन्यांपासून कार्यकारिणीच्या प्रतिक्षेत असलेल्या मनविसे(महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना) कार्यकारिणीला अखेर मंगळवारी मुहूर्त लागला. प्रदेशाध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी जाहीर केलेल्या या कार्यकारिणीत जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, संघटकांसह ५२ विविध पदांची घोषणा केली आहे.

वसतीगृहातून १७ बारबाला पसार

$
0
0
सुरक्षारक्षकावर मिरचीपूड फेकून १७ बारबालांनी धूम ठोकल्याचा प्रकार बुधवारी पहाटे अशोकस्तंभजवळील शासकीय वात्सल्य वसतीगृहात घडला. त्यापैकी आठ बारबालांना पकडण्यात सुरक्षारक्षक आणि पोलिसांना यश आले तर नऊ बारबाला पसार झाल्या आहेत.

क्रीडासंकुलाची ‘शोभा’

$
0
0
विद्युत पुरवठ्याच्या डोईजड भारामुळे वारंवार मान टाकणारे हायमास्ट दिवे, अतुलनीय कामगिरीचे प्रदर्शन घडविण्यासाठी तासनतास ताटकळलेले खेळाडू, अशा परिस्थितीमुळे विभागीय क्रीडा संकुलात आयोजित राज्यस्तरीय जिम्नॅस्टीक स्पर्धेचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाला.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images