Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

चाइल्ड गटातयजमान विजेते

$
0
0

मिनी गटात मणिपूरला विजेतेपद

राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा तलवारबाजी संघटनेतर्फे झालेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत चाइल्ड गटात यजमान महाराष्ट्राला, तर मिनी गटात मणिपूरला विजेतेपद मिळाले. ही स्पर्धा पंचवटी येथील विभागीय क्रीडा संकुलात झाली.

चाइल्ड गटात महाराष्ट्राच्या मुलांनी एकूण १६ गुणांची कमाई करून हे विजेतेपद पटकावले, तर हरियाणाला १४ गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मुलींमध्येही यजमानांनी हरियाणाला पराभूत करीत १८ गुणांसह विजेतेपद पटकावले. मिनी गटात मणिपूरच्या मुलांनी हरियाणाला मागे टाकून ३० गुणांसह विजेतेपद पटकावले. या गटात महाराष्ट्राच्या मुलांना २० गुणांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मुलींमध्येही मणिपूरने ३८ गुणांसह विजेतेपद पटकावले, तर कर्नाटक दुसऱ्या स्थानी राहिला. पंजाबला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

स्पर्धेचा निकाल (कंसात गुण) :

चाइल्ड गट

मुले : १. महाराष्ट्र संघ (१६), २. हरियाणा (१४). ३. कर्नाटक आणि उत्तर प्रदेश (प्रत्येकी ४ गुण)

मुली : १. महाराष्ट्र संघ (१८), २. हरियाणा (९), ३. तमिळनाडू (८)

मिनी गट

मुले : १. मणिपूर (३०), २. हरियाणा (२६), ३. महाराष्ट्र (२०)

मुली : १. मणिपूर (३८), २. कर्नाटक (१७), ३. पंजाब (११)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अकरावी प्रवेशासाठी आजपासून विशेष फेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अकरावी प्रवेशासाठी आजपासून विशेष फेरी राबविण्यात येणार आहे. आज (दि. ९) सकाळी १० वाजता विशेष फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील ऑनलाइन प्रदर्शित करण्यात येणार आहे. विशेष फेरीत सहभागी विद्यार्थ्यांची यादी १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.

तीनही फेऱ्यांमध्ये प्रवेशांपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी राबविण्यात येणार आहे. दि. ९ व १० ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत ही विशेष फेरी राबविण्यात येणार आहे. ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग १ व भाग २ भरून पूर्ण करणे, विशेष गुणवत्ता यादीमध्ये यापूर्वीच्या फेऱ्यांमध्ये प्रवेश न घेतलेले, यापूर्वीच्या फेऱ्यांमध्ये प्रवेश नाकारलेले, प्रवेशासाठी न गेलेले, कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालय अॅलॉट न झालेले, यापूर्वीच्या फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्याला पहिल्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय मिळाले होते पण प्रवेश न घेतलेले तसेच यापूर्वीच्या फेऱ्यांमध्ये प्रवेश रद्द केलेले सहभागी होऊ शकणार आहेत.

१४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता विशेष फेरीची गुणवत्ता यादी ऑनलाइन प्रदर्शित करण्यात येणार आहे. १६ व १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत ऑनलाइनद्वारे अॅलॉट झालेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करून घेणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४५० कोटींची उलाढाल ठप्प

$
0
0

सराफ बाजाराला फटका; व्यवहार सुरळीत होण्यास अजून चार दिवस लागणार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भांडी बाजार, कापडबाजार, सराफ बाजार येथील दुकानदारांची ४५० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली असून अद्यापही सराफ बाजार यातून सावरलेला नाही. एक आठवड्यापासून व्यवहार होत नसल्याने अनेक व्यापाऱ्यांच्या नाकीनऊ आले आहे.

सराफ बाजारात ३५० पेक्षा अधिक व्यवसायिक व पाच हजारांवर कारागीर आहेत. सराफ बाजारात रोज सुमारे ५० कोटी रुपयांची उलाढाल होते. आठ दिवसांपासून बाजारपेठ बंद ठेवावी लागत असल्याने व्यवहार मंदावले आहे. नाशिकच्या सराफ बाजारातून उत्तर महाराष्ट्रात माल पुरविला जातो. नाशिक धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार येथील छोटे व्यापारी आपल्या दुकानांना लागणाऱ्या वस्तू या भागातून घेऊन जातात. तसेच या भागातील दुकानदारांनी ऑर्डर घेतलेला माल बनवून देण्याचे काम येथील कारागीर करतात. या ऑर्डर तयार करुन देण्यासाठी जागा नसल्याने या ठिकाणच्या काम बंद आहे. तसेच जो तयार माल आहे त्याचीच विक्री केली जात आहे. चांदीच्या साखळ्या, पुजेची भांडी, रोजची वापरायची भांडी यांच्या ऑर्डर घेणे बंद आहे.

सराफ बाजारात आजपर्यंत ४५० कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. या ठिकाणाहून उत्तर महाराष्ट्रात माल जात असतो या पुरामुळे ग्राहकांसोबतच दुकानदारांचा देखील माल पाठवला जात नसून यासाठी अजून चार दिवस लागण्याची शक्यता आहे.

- चेतन राजापुरकर,

अध्यक्ष, जिल्हा सराफ असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्ड्यांवरून खडाखडी...

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सततच्या पावसामुळे संपूर्ण शहरच खड्डेमय झाले असून, त्यातून महापालिकेच्या कामांचे पितळ उघडे पडले आहे. शहरातील रस्त्यांची एकीकडे चाळण झाली असताना संकट हीच संधी हे महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाचे धोरण राहिले असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली आहे.

महापौर रंजना भानसी आणि शहरातील तीनही आमदारांना आपत्ती काळात प्रशासनाकडून काम करून घेण्यात अपयशी ठरल्याचा हल्लाबोल करीत पावसाळ्यापूर्वी नालेसफाई नव्हे, तर हातसफाई करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. शहरातील पूरस्थिती हाताळण्यात सत्ताधारी भाजपला आलेले अपयश आणि पावसामुळे शहर खड्ड्यात गेल्यानंतर बोरस्ते यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि प्रशासनाच्या कामकाजावर हल्लाबोल केला. शहरात आता रस्ते शोधण्याची वेळ आली आहे, असे सांगत महापालिकेच्या रस्त्यांची गुणवत्ता का ढासळली, असा सवाल बोरस्तेंनी उपस्थित केला आहे. शहरात वाडे पडत असताना केवळ नोटिसा पाठवूनही महापालिका जबाबदारी झटकत आहे, असे सांगत हे वाडे तातडीने खाली करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

३८ कोटींचे काय झाले?

महापालिकेने रस्त्यांच्या डागडुजीसाठी ३८ कोटींचा ठेका दिला आहे. परंतु, आता हे ठेकेदार कुठे आहेत, असा सवाल बोरस्तेंनी केला. ३८ कोटींच्या निविदा काढताना जेवढी तत्परता दाखवली तेवढीच तत्परता प्रशासनाने या ठेकेदाराकडून काम करून घेताना का दाखविली नाही, असा जाब विचारत ३८ कोटींचे काय झाले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. प्रशासनाने तातडीने ठेकेदारांवर कारवाई करून खड्डे बुजविण्याचे काम हाती घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

हात की सफाई!

शहर जलमय झाल्यानंतर साथींचे विकार डोक वर काढत असताना आपत्कालीन विभागाने युद्धपातळीवर काम करणे अपेक्षित होते. परंतु, या आपत्तीतून महापौर, आमदार आणि प्रशासन संधीची वाट पाहत असल्याची टीकाही बोरस्तेंनी केली. महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून भुयारी आणि पावसाळी गटार योजना राबविली आहे. परंतु, या योजनेवर कोट्यवधी खर्च होऊनही शहर जलमय झाले आहे. पावसाळापूर्व कामांवरही कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. परंतु, आता या कामांचे पितळ उघडे पडले असून, पावसाळापूर्व सफाई नव्हे, तर हात की सफाई असल्याचा आरोपही बोरस्तेंनी केला.

सभापती खड्ड्यांसाठी रस्त्यावर

सातपूर विभागात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असताना प्रशासन मात्र बेफिकीर झाले आहे. खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाला वारंवार सांगूनही बांधकाम विभागाचे अधिकारी ऐकत नाहीत. त्यामुळे सातपूर प्रभाग समितीचे सभापती संतोष गायकवाड हे स्वत:च खड्डे बुजविण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तांबे-पितळाच्या भांड्यांनाही तडाखा

$
0
0

महापुरात अतोनात नुकसान

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तांबे-पितळाच्या भांडेविक्रीत आमची पाचवी आणि सहावी पिढी कार्यरत आहे. नाशिक हे तीर्थक्षेत्र असल्याने श्रावण महिन्यात आमच्या व्यवसायाला चांगली सुरुवात होते. पण यंदा पुराच्या तडाख्याने दुकानातले आहे-नाही तेवढे मोडीत देण्याची वेळ आमच्यावरच आली आहे, असा विदारक अनुभव भांडे व्यापारी राजेश आंबेकर यांनी मांडला.

पूराचा जोर ओसरल्यानंतर दुकानाची अवस्था बघताना आंबेकर यांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या होत्या. दुकानात तांबे अन् पितळाच्या भांडे व वस्तू असल्या तरीही फर्निचर, रंगरंगोटीचे नुकसान झाले आहे. पितळ व तांब्यांच्या अनेक वस्तूही पुराच्या पाण्याने अल्पायुषी ठरणार असल्याने त्यांना बाजारात आता मोडीतल्या मूल्यानेच विक्री करून काढून टाकावे लागणार आहे.

आंबेकर कुटुंबियांची या व्यवसायात सहावी पिढी प्रवेश करते आहे. केवळ दुकानेच नाही तर भांड्यांची गोदामेही पुराच्या पाण्याने आठवड्याच्या सुरुवातीस तुडूंब भरली होती. नाशिक हे क्षेत्राचे ठिकाण असल्याने येथील भांडीबाजारातून तांबे व पितळाच्या वस्तूंनाही मोठी मागणी आहे. येथे परराज्यातून या वस्तू आयात केल्या जातात. या वस्तूंचीही शहरात मोजकीच मोठी दुकाने आहेत. यातही भांडी बाजारात या वस्तूंची चार ते पाच दुकाने आहे. तांबे-पितळामुळे दुकानाचे वैविध्य जपणाऱ्या या व्यापाऱ्यांनाही पुराने मोठा तडाखा दिला आहे. या मालातील काही वस्तू पॉलिश करून पुन्हा बाजारात आणता आल्या तरीही त्यांचे आयुर्मान कमी झालेले असते. काही नाजूक वस्तूंना या पाण्याच्या स्पर्शाने विशिष्ट कालावधीनंतर आपोआप तडा जाऊ शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नुकसानीचे पंचनामे करा’

$
0
0

'नुकसानीचे पंचनामे करा'

शहरात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली असून, त्यामुळे असंख्य व्यावसायिक, नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसानभऱपाई द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे छोटे-मोठे अपघात वाढल्याने हे खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की गोदावरी नदीला महापूर आल्याने, तसेच पावसाच्या पाण्याने शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक व नागरिकांचे नुकसान झाले. अशा पूरग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करून त्यांना नुकसानभरपाई दिली जावी. शहरात साथींचे आजार पसरू नयेत याबाबत त्वरित उपयोजना राबविण्यात यावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदिरे अद्यापही अर्धी पाण्यात

$
0
0

गोदाकाठची स्थिती; रामसेतूला प्रवाहाचा फटका

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील पुराचे प्रमाण मोजण्याच्या पारंपारिक खुणा मानली जाणारी दुतोंड्या मारुतीची मूर्त आणि श्री यशवंतराव देवमामलेदार महाराज यांचे समाधीमंदिर यांसह गोदाकाठची सर्व जुनी मंदिरे पूर ओसरल्यानंतर चार दिवसांनीही अद्याप निम्मी पाण्यातच आहेत. गंगापूरसह जवळपास सर्वच धरणांची सरासरी यंदा ९० टक्क्यांच्या आसपास असल्याने धरणातील विसर्ग टप्प्या-टप्प्याने सुरूच आहे.

पाणी विसर्गाची तीव्रता चार दिवसांच्या तुलनेत आज कमी असली तरीही विसर्ग सुरूच असल्याने गोदेचे पात्र वाहते आहे. परिणामी, गोदाकाठच्या अनेक मंदिरापर्यंत जाण्याचे मार्गही सद्यस्थितीत बंद झाले आहेत. अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याच्या लाटेसोबत वाहून आलेल्या वस्तू, झाडे, लाकडे आदी वस्तूही गोदेच्या पात्रात नजरेस पडत आहेत. रामसेतू पुलावरील काही भागासही या पाण्याच्या वेगवान प्रवाहाचा फटका बसला असून काही भागात पडझड झाली आहे. गोदेच्या चारही दिशांना पुनर्वसनाचे कार्य सुरू आहे. स्वच्छतेसाठी जेसीबी मशिन, ट्रॅक्टर आदी साधनांद्वारे स्वच्छता कर्मचारी दिवस अन् रात्र झटत आहेत.

नागरिकांकडूनही मदतकार्य

शहरातील काही संवेदनशील नागरीक आणि स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनीही गोदाकाठच्या आश्रितांसाठी मदतकार्य चालविले आहे. पूराच्या फटक्यामुळे इतस्तत: भरकटलेल्या नागरिकांना अन्न अन् वस्त्राची सुविधा देण्यासाठी माणुसकी असलेल्यांचे हात पुढे येत आहेत. अद्यापही काही पूरग्रस्तांची व्यवस्था परिसराती शाळा आदी ठिकाणी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वराज यांचे कर्तृत्व प्रेरणादायी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या तथा माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या स्पष्ट वैचारिकता असलेल्या सुस्वभावी नेत्या होत्या. स्वकर्तृत्वाने त्यांनी राजकारण आणि समाजकारणात मोठी उंची गाठली होती. त्यांचे नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व सर्वांसाठी प्रेरणादायी होते. त्यांच्या जाण्याने राजकारण व समाजकारणाची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भाजपतर्फे वसंतस्मृती कार्यालयात गुरुवारी सर्वपक्षीय शोकसभा झाली. शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप अध्यक्षस्थानी होते. महापौर रंजना भानसी, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्‍त्या डॉ. हेमलता पाटील, आमदार प्रा. देवयानी फरांदे, स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे, उपमहापौर अजिंक्‍य गिते, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, माजी महापौर दशरथ पाटील, नगरसेवक गुरुमित बग्गा, जगदीश पाटील, हिमगौरी आहेर-आडके, भाजपचे गोपाळ पाटील, शिवसेना गटनेते विलास शिंदे, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा अनिता भामरे, माजी आमदार निशिगंधा मोगल, दत्ता गायकवाड, श्रीकांत बेणी, श्रीधर फडके, प्राचार्य प्रशांत पाटील, योगेश हिरे, सुहास फरांदे, तानाजी जायभावे, सतीश शुक्‍ल यांच्यासह विविध पक्षांचे नेते, पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. स्वराज यांनी आपल्या आयुष्यातील मोठा काळ विरोधी पक्षांत व्यतित केला. मात्र, विरोधात असतानाही आपल्या पक्षाच्या ध्येयधोरणांवर त्यांची निस्सिम श्रद्धा होती, अशा शब्दांत माजी उपमहापौर बग्गा यांनी श्रद्धांजली वाहिली. भारतीय राजकारणातील आदर्श व्यक्तिमत्त्व हरपल्याची खंत मविप्रच्या सरचिटणीस पवार यांनी व्यक्त केली. देशाच्या राजकारणात संस्कारांची पेरणी करणाऱ्या ज्येष्ठ नेत्या हरपल्याची खंत माजी महापौर दशरथ पाटील यांनी व्यक्त केली.

महिलांसाठी होत्या आयडॉल...

दिवंगत सुषमा स्वराज यांच्या आठवणी सांगताना अनेकांचा कंठ यावेळी दाटून आला होता. अगदी छोट्या वयात आमदार, खासदार, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आदी पदे त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मिळविली. केंद्रीय परराष्ट्रमंत्री असताना ट्विटरद्वारे लोकांचे प्रश्न सोडविण्याचा त्यांचा उपक्रम अत्यंत स्तुत्य होता. अगदी सामान्य माणसापर्यंत त्यामुळे पोहोचणे त्यांना शक्य झाले होते. महिलांसाठी त्या आयडॉल होत्या, आशा शब्दातंही मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. भाजपचे पवन भगूरकर यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिटू संघटनेतर्फे पूरग्रस्तांना मदत

$
0
0

पंचवटी : पंचवटी अमरधामचे पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले. या अमरधामजवळ असलेल्या घरांची पडझड झाली. त्यांना 'सिटू'तर्फे १५ हजार रुपयांची मदत करण्यात आली. चार पिढ्यांपासून पंचवटी अमरधाम येथे अंत्यविधी सेवा पुरवणाऱ्या सुनीता पाटील, राजेंद्र पाटील व त्यांच्या आई पार्वताबाई रामचंद्र हिरवे यांची घराची पडझड झाली. संसारोपयोगी साहित्य व धान्य वाहून गेले. त्यांच्यावर उघड्यावर रहाण्याची वेळ आली आहे. 'सिटू' या कामगार संघटनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष सीताराम ठोंबरे, 'माकप'चे माजी नगरसेवक व गटनेते तानाजी जायभावे, 'सिटू'चे जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर देशपांडे, जिल्हा सरचिटणीस देविदास आडोळे व ललित चौधरी यांच्या हस्ते ही मदत देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाडा पडला

पुराच्या तडाख्याने पाच वर्षे मागे आलो

$
0
0

भांडीबाजारातील व्यापाऱ्यांची आपबीती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आमच्या पाच पिढ्यांनी जीव लावून सांभाळलेले भांड्यांचे हे दुकान जेव्हा पुराच्या पाण्याखाली होते तेव्हा घशाखाली अन्नाचा घास उतरत नव्हता. या अगोदर आलेल्या मोठ्या पुरांची वर्णने ज्येष्ठांच्या तोंडून ऐकली होती. पण माझ्या प्रत्यक्ष बघण्यातल्या मोठ्या पुरांपैकी यंदाचा एक मोठा पूर होता. या पुराने आम्ही भांडी व्यापाऱ्यांना तब्बल पाच वर्षे मागे आणून ठेवले आहे... आमच्या नुकसानाचे वर्णन करण्यास शब्द नाहीत..', ही आपबीति आहे भांडीबाजारातील व्यापारी योगेश काळे यांची.

गोदाकाठाजवळ भांडीबाजाराच्या दुतर्फा असलेली दुकाने रविवारी गोदेला आलेल्या पुराने छतापर्यंत पाण्याखाली होती. पाऊस कमी झाल्यानंतर पाणी ओसरू लागले आणि परिसरातील रहिवासी, व्यापाऱ्यांचा जीव भांड्यात पडू लागला. त्यांनी दुकानांकडे धाव घेऊन नुकसानाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला; पण या परिसरात पुराच्या पाण्याने उभे राहिलेले गाळाचे उंचच उंच ढिगारे अन् दुकानातील चीज वस्तूंवर असणारे या गाळाचे थर या स्थितीमुळे होते नव्हते ते सर्व गेल्याची विदारक अवस्था या परिसरातील नागरीकांना अनुभवावी लागली. \B

कोट्यवधींचे नुकसान \B

पारी ओसरल्यानंतर पुराच्या खऱ्या खुणा आता दृष्टीस पडू लागल्या आहेत. उत्कृष्ट भांड्यांसाठी पूर्वीपासून सर्वदूर प्रसिध्द असलेला भांडीबाजार गेल्या रविवारी पूर्णपणे पाण्यात होता. आता या दुकानांनी मोकळा श्वास घेतला असला तरीही दुकाने पूर्वपदावर आलेली नाहीत. मिळतील तेवढी माणसे हाताशी घेऊन येथे गाळाचा उपसा गुरुवारी दिवसभर सुरूच होता. पुराचे थैमान इतके होते की अद्यापही व्यापाऱ्यांना त्यांच्या एकूण नुकसानाचा स्पष्ट अंदाज आलेला नाही.

पुराच्या धक्क्यातून अद्यापही परिसर सावरलेला नाही. भांडी बाजारातील व्यापाऱ्यांच्या नुकसानाचा एकत्रित आकडा कोटी रुपयांच्याही वर असेल. या पुराने किमान पाच वर्षे आम्हाला मागे नेले आहे. \B

- योगेश काळे, भांडे व्यापारी

\Bदुकानातील एकही कोपरा असा नाही कि जेथे पुराचे पाणी खेळले नाही. हे नुकसान न भरून येणारे आहे. सर्व भांडी बाजारातील नुकसानाचा आकडा फार मोठा येईल. आता आमचा पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न आहे.

\B- कल्पना आंबेकर, भांडे व्यापारी \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका कर्मचाऱ्यांना पैशांसाठी डांबले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंचवटी विभागातील दोन नगरसेविकांच्या नातेवाइकांनी पैशांसाठी महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांना घरी बोलावत डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. या कर्मचाऱ्यांकडील काही रक्कमही खिशातून काढून घेण्यात आल्याने हे कर्मचारी धास्तावले आहेत.

भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांच्या आधिपत्याखालील पंचवटी विभागात काही नगरसेविकांकडून महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना पैशांसाठी त्रास दिला जात असल्याने या भागात काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी पुरते वैतागले आहेत. निरोपाच्या कार्यक्रमासाठी उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यावर आर्थिक खर्चाचा भार टाकण्याचे प्रकरण ताजे असतानाच हा प्रकार घडल्याने महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

भाजपच्या महापालिकेतील सत्तेला अडीच वर्षे पूर्ण होत नाहीत तोच भाजपच्या काही नगरसेवकांनी पारदर्शकता, निष्ठा, तत्त्वे व साधनसुचिता हे शब्द खुंटीला टांगून ठेवले आहेत. सत्तेवर येण्यासाठी भाजपने ऐनवेळी आयारामांना रान मोकळे करून देत जिंकेल त्याला उमेदवारी देऊन आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला आहे. भाजपच्या काही नगरसेवकांकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे थेट पैसे मागण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. यापूर्वी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पैसे मागणे, खोटे आरोप करून महासभा, प्रभाग समितीमध्ये प्रश्‍न उपस्थित करण्याची चर्चा होती. परंतु, भाजपच्या सत्ताकाळात या चर्चा आता खऱ्या ठरू लागल्या आहेत.

पंचवटीतल्या एका पदाधिकाऱ्याने पदावरून निरोप घेताना निरोप समारंभाचा खर्च उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यावर टाकल्याची चर्चा ताजी असतानाच आमदार बाळासाहेब सानप यांच्या कार्यक्षेत्रातील दोन नगरसेविकांच्या नातेवाइकांनी थेट पैशांसाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना डांबून ठेवल्याची चर्चा महापालिका वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे. पंचवटी विभागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असून, त्या बदल्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हप्ते बांधले गेल्याच्या चर्चेच्या अनुषंगाने दोन नगरसेविकांच्या नातेवाइकांनी संबंधित कर्मचाऱ्यांना घरी बोलावून डांबून ठेवले. त्यांना थेट दम भरत पैसे मागितल्याची चर्चा सुरू झाली आहे. या दोन नगरसेविका कोण, याचा शोध सध्या भाजपमध्ये घेतला जात असून, सत्तेमुळे कर्मचारीदेखील उलट त्यांच्यावरच कारवाई होण्याच्या भीतीने थेट गुन्हे दाखल करण्यासाठी घाबरत आहेत.

--

अधिकारी येतील तरी कसे?

महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये या घटनेने नाराजी पसरली असून, असे प्रकार होत असतील, तर आता थेट गुन्हे दाखल करण्याची कारवाई व्हायलाच हवी, अशी भूमिका आयुक्तांकडे घेतल्याचे समजते. एकीकडे महापालिकेत अधिकारी येण्यास तयार नसताना दुसरीकडे महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचे नगरसेवकच अधिकारी व कर्मचाऱ्यांना दमदाटी करून खंडणी उकळत असतील, तर अधिकारी येणार तरी कसे, असा सवाल भाजपमधीलच काही पदाधिकारी करीत आहेत. त्यामुळे शहराध्यक्ष आमदार सानप या दोन नगरसेविकांबाबत काय भूमिका घेतात, याकडे अधिकारी-कर्मचारीवर्गाचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

..अन् संसारच गेला वाहून

$
0
0

\Bघारपुरे घाटाजवळील रहिवाशांची दयनीय अवस्था

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

\B

गोदेच्या पुराने गोदाकाठासह शहर व उपनगरातील अनेक वसाहतींना चांगलेच झोडपून काढले. घारपुरे घाटावर गोदावरी नगरमधील आठ ते दहा घरांची अतिशय छोटी वसाहतीचे छतच पुराच्या पाण्याखाली होते. या पाण्याने तेथील लोकांचे संसार नदीप्रवाहात वाहून गेले. मागे उरल्या त्या केवळ चार भिंती. सुदैवाने वेळीच ही कुटुंबे संरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आल्याने ती बचावली.

रविवारी पुराच्या पाण्याचा लोट येऊन गेल्यानंतर गुरूवारी पुरानंतरचा चौथा दिवस होता. पुराने घराच्या झालेल्या दूरवस्थेची पाहणी केल्यानंतर घरातील अनेक चीजवस्तू वाहून गेल्याचे येथील कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. या वस्तूंमध्ये टीव्ही, भांडी-कुंडी, कपडे आदी संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या. येथील घराच्या छपरापासून वर पाच फूट उंचीपर्यंत पाणीपातळी वाढली होती. या कुटुंबांना रुंग्ठा आणि परिसरातील इतर शाळांमध्ये आसरा देण्यात आला होता. नागरिक अन् प्रशासनाने दिलेल्या अन्न-वस्त्रावर पुरानंतरचे दिवस काढल्यानंतर पाण्याने विस्कटलेल्या संसाराकडे हे कुटुंबीय गुरुवारी माघारी परतले.

घराच्या छतापासून वर पाच ते सहा फुटापर्यंत रविवारी पुराच्या पाण्याची पातळी वाढली होती. घरातील चीजवस्तूही वाहून गेल्या. घरामध्ये आलेला गाळ आम्ही स्वत: स्वच्छ करत आहोत. लोकप्रतिनिधी अन् महापालिकेचे प्रशासन मात्र इकडे फिरकलेले नाही.

\B- आरती ठाकूर, रहिवासी \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहीपुलाजवळ वाडाभिंत कोसळली

$
0
0

दहीपुलाजवळ

वाडाभिंत कोसळली

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहीपुलाजवळील सोमवार पेठेतील खांदवे गणपती मंदिरासमोरील मैंद वाड्याचा काही भाग गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास कोसळला. या वाड्यात एक कुटुंब राहत होते. भिंत कोसळल्याने या कुटुंबातील चार ते पाच जण अडकले.

भिंत कोसळण्याचा मोठा आवाज झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी वाड्याकडे धाव घेतली. वेलकम सहकार्य मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले. त्याचवेळी काही जणांनी अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली. अग्निशमन विभागाचे कर्मचारीही तेथे तात्काळ दाखल झाले. तोपर्यंत अडकलेले सर्वजण बाहेर निघाले होते. यातील एक जण जखमी झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फिटनेस’ नसलेली वीस वाहने जप्त

$
0
0

'फिटनेस' नसलेली

वीस वाहने जप्त

नाशिक : फिटनेस सर्टीफिकेट नसताना रस्त्यावर उतरलेली २० वाहने नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) जप्त केली आहेत. जिल्ह्याभरात सुरू केलेल्या विशेष मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. वाहन तपासणीसाठी १ ऑगस्टपासून एक विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे. वाहनाची तपासणी झाली आहे किंवा नाही, तसेच संबंधित वाहन चालकाकडे तसे सर्टिफिकेट आहे काय हे तपासले जाते आहे. १ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट यादरम्यान सदर मोहिम राबविण्यात येणार आहे. व्यावसायिक वाहनांची फिटनेस टेस्ट अत्यावश्यक असून, वाहनचालक अथवा मालकाकडे याबाबतचे सर्टिफिकेट असणे महत्त्वाचे असते. मागील काही दिवसांत या पथकाने तीनशे वाहनांची तपासणी केली. दोषी आढळून येणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते आहे. व्यावसायिक वाहनाकडे फिटनेस सर्टिफीकेट नाही, याचा अर्थ हे वाहन रस्त्यावर फिरण्यास पात्र नाही, असा साधा अर्थ या मोहिमेचा असल्याचा आरटीओ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परीक्षक प्रतिक्रिया

$
0
0

परीक्षक प्रतिक्रिया

---

नाशिकमध्ये खूप टॅलेंट आहे त्यांना योग्य संधी मिळणं गरजेचं आहे. ती संधी 'मटा श्रावणक्वीन' या स्पर्धेतून तरुणींना मिळत आहे. मुंबईत येण्याची संधी, हिंमत या स्पर्धेतून तरुणींना नक्कीच मिळेल. जिंकणं, हरणं हे महत्त्वाचं नसून या स्पर्धेतून स्वतःचा सकारात्मक दृष्टिकोनातून व्यक्तिमत्त्व विकास घडवणं महत्त्वाचे आहे.

- नयना मुके, अभिनेत्री

मराठी नाटक, चित्रपट, मालिका या क्षेत्रात पाऊल ठेवण्याची 'मटा श्रावणक्वीन' ही एक प्रकारची नांदी आहे, असे मला वाटते. मराठी टॅलेंटला ग्लॅमर क्षेत्रात संधी मिळवून देण्याच काम श्रावणक्वीनच्या माध्यमातून होत आहे. या माध्यमाचा तरुणींनी व्यक्तिमत्त्व विकासासाठी जास्तीत जास्त फायदा करून घ्यायला हवा.

- किरण भालेराव, अभिनेता

नाशिकमध्येही खूप टॅलेंट आहे. त्या टॅलेंटला वाव देण्यासाठी तरुणींसाठी 'मटा श्रावणक्वीन' हे एक उत्तम व्यासपीठ आहे. नाशिकच्या तरुणींमध्येही खूप गुणवत्ता आहे. ती गुणवत्ता, कलागुण या स्पर्धेतून नक्कीच पुढे येतील. या स्पर्धेत टॅलेंटबरोबरच बुद्धिमत्तेचाही कस लागणार आहे, त्यामुळे ही स्पर्धा तरुणींसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.

- डॉ. प्रकाश पाटील, सह्याद्री हॉस्पिटल

ग्लॅमर क्षेत्रच नाही तर कोणत्याही क्षेत्रात काम करताना आत्मविश्वास, संवाद कौशल्याची गरज असते. स्वतःचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी तसेच व्यक्तिमत्त्व विकासासाठी 'मटा श्रावणक्वीन' हे एक उत्तम माध्यम आहे. या माध्यमाचा तरुणींना भविष्यात नक्कीच उपयोग होईल.

- डॉ. समीर फुटाणे, सह्याद्री हॉस्पिटल

श्रावणक्वीनचा दर्जा उंचावत चालला आहे. खूप नवनवीन टॅलेंट या स्पर्धेतून समोर येत आहे. यावर्षीही नाशिकचे उत्तमोत्तम टॅलेंट बघायला मिळाले. नाशिकच्या तरुणींसाठी मटा श्रावणक्वीन हे एक उत्तम व्यासपीठ आहे. यावर्षी मुंबईफिनालेसाठी नक्कीच जोरदार तयारी करून नाशिकच नाव मुंबई फिनालेमध्ये गाजवू.

- नवीन तोलानी, नृत्यदिग्दर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संसार रुळावर आणतोय...

$
0
0

पांझरा पूरग्रस्तांनी मांडली भावना

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहराच्या मधोमध वाहणाऱ्या पांझरा नदीला आलेल्या महापूरामुळे नदी काठच्या शेकडो रहिवाशांना मोठा फटका बसला. अनेक घरांमध्ये पाणी शिरून रहिवाशांचे संसार पाण्यात वाहून प्रचंड नुकसान झाले. आता विस्कटलेल्या संसाराची घडी बसविण्यासाठी रहिवाशी झटत आहेत. पुन्हा आपल्या संसाराचा गाडा रुळावर आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याची भावना रहिवाशी व्यक्त करीत आहेत. त्यांना भेटण्यासाठी गुरुवारी खासदार डॉ. सुभाष भामरे हे गेले असता त्यांनी पूर्ण मदतीचे आश्वासन पूरग्रस्तांना दिले.

रहिवाशांच्या या संकटात आवश्यक ते सहाय्य उपलब्ध करण्यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी गुरुवारी पूरग्रस्त भागात पाहणी दौरा केला. या वेळी लोकांना धीर देत त्यांच्या सर्व प्रकारच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेतल्या. सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन देत यासंदर्भात आज (दि. ९) दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना डॉ. भामरे यांनी दिले आहेत.

शहरात ४ ऑगस्ट रोजी अक्कलपाडा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने पांझरा नदीला महापूर आला. या महापूरात नदीकाठच्या भागातील रहिवाशांचे प्रचंड नुकसान झाले. यात २७० हून अधिक घरांचे तसेच दुकाने, मंदिरे, पूल यांना क्षती पोहचली. महापालिकेसह सर्वच राजकीय पक्षांनी, सामाजिक संस्थांनी या पूरग्रस्तांना रात्रीच तत्काळ मदत केली. तसेच नुकसानीचे पंचनामे करण्याचेही काम प्रशासनाद्वारे युद्धपातळीवर राबवले गेले आहे. आता पूर ओसरत असला तरी नदीकाठच्या रहिवाशांना आपल्या घरांमध्ये परत आपला संसार बसवण्यात असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व परिस्थितीतून आम्ही मार्ग काढत आहोत आणि संसार रुळावर आणतोय, अशी आर्त भावना रहिवाशी बोलून दाखवत आहेत.

चुकीच्या पद्धतीच्या बंधाऱ्याने ही परिस्थिती
खासदार डॉ. भामरे यांनी भेटीदरम्यान, क्षतीग्रस्त झालेल्या कॉजवे पुलाची सर्वात आधी पाहणी केली. त्यानंतर प्रभाग क्र. ७ मधील मोगलाई परिसरातील मोती नगर, विकास कॉलनी, साईबाबा नगर तसेच गवळीवाडा या भागात जावून घरांची पाहणी केली. येथील रहिवाशांनी विशेषतः महिलांनी आपली कैफियत डॉ. भामरे यांच्या समोर मांडली. पांझरा नदीला आलेल्या पुराचे पाणी आजपर्यंत अशाप्रकारे कधीही इतके लांबपर्यंत आले नव्हते. मात्र, नदीत चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या बंधाऱ्यामुळे पाणी तुंबले आणि ते आमच्या घरात शिरून प्रचंड नुकसान झाल्याचे महिलांनी सांगितले. नदीतील हे अडथळे हटवण्याचीही मागणी यावेळी रहिवाशांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयटीआय निदेशकांच्या रक्ताने स्वाक्षऱ्या

$
0
0

प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचा कारभार दयनीय स्थितीत सुरू आहे. प्रशिक्षणाचा दर्जा खालावत असल्याने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांची कुशलता धोक्यात येत आहे. यास सरकारचे कारणीभूत असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेच्या सदस्यांनी शुक्रवारी केला. क्रांतिदिनाचे औचित्य साधत स्वत:च्या रक्ताने निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आणि त्यांची प्रत मुख्यमंत्र्यांना पाठविली.

निदेशकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये प्रशिक्षण योजनांसाठी आवश्यक निदेशकांची सुमारे ५० टक्के रिक्त पदे त्वरित भरली जावीत, यासह आणखी १४ मागण्यांचा समावेश आहे. कालबाह्य यंत्रसामुग्री निर्लेखित करून डिजिटी मानकानुसार प्रात्यक्षिकासाठी आवश्यक तो कच्चा माल पुरवठा व्हावा, सध्याच्या बाजारभावानुसार निधी उपलब्ध व्हावा, डिजिटी मानकानुसार प्रशिक्षणासाठी आवश्यक पदांचा उच्चस्तरीय फेरआढावा घेत त्वरित पदभरती केली जावी, संस्थेतील स्वच्छतेसाठी सफाईगार व वसतिगृहाच्या सुरक्षिततेसाठी रखवालदार, अधीक्षक, ग्रंथपाल आदी पदे भरावीत अशा मागण्या आहेत.

प्रशिक्षण बाह्यकामांमुळे प्रशिक्षणावर होणारा प्रतिकूल परिणाम टाळावा, विविध राष्ट्रीय योजनांमधील सर्व प्रशिक्षक संवर्गीय पदांचे कालबाह्य सेवाप्रवेश नियम सुधारित करावे, अवैध पदोन्नती धोरण न्यायसंगत करावे, अस्थायी निदेशकांना स्थायी करताना त्यांच्या मूळ नियुक्तीपासून सेवाज्येष्ठता प्रदान करावी, मिलराईट मेन्टेनन्स पदधारकांना शिल्पनिदेशक पदावर पदोन्नत करावे, शिल्पनिदेशकांना पूर्ण सेवाकालवधीत एकच पदोन्नती असूनही त्याबाबत अनेक विभागांमध्ये कार्यवाही प्रलंबित आहे; ती मार्गी लागावी, नोव्हेंबर २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, नियतकालिक बदली, विशेष विनंती आणि विभागीय अशा सर्व बदल्या पारदर्शकपणे होण्यासाठी धोरण राबवावे, शिक्षकीय पदांचे कंत्राटीकरण रद्द करून कंत्राटी पदधारकांना नियमित सेवेत सामावून घ्यावे, अशा मागण्यांचा यात समावेश आहे.

आंदोलनात नाशिक विभागाचे विभागीय सचिव संतोष बोराडे यांच्या नेतृत्वाखाली सातपूर आयटीआयमध्ये निदेशक सभासदांनी स्वतःच्या रक्ताने स्वाक्षरी केली. याप्रसंगी विभागिय सहसचिव जितेंद्र देसाई, शाखा खजिनदार योगेश थोरात, गट निदेशक प्रशांत बडगुजर आदी उपस्थित होते. तसेच दिंडोरी आयटीआयमध्ये झालेल्या आंदोलनाची धुरा संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य आर. बी. अहिरे यांच्याकडे होती.

पाच टप्प्यांमध्ये आंदोलन

संघटनेच्या वतीने पाच टप्प्यांमध्ये आंदोलन केले जाणार आहे. याचा पहिला टप्पा क्रांतिदिनापासून सुरू झाला. निदेशकांनी स्वत:च्या रक्ताने मागण्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या. सर्व शाखांमधील सभासद येत्या १५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांना निवेदन पुन्हा पोस्ट करतील. यानंतर मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाच्या प्रति सर्व शाखांचे पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना देतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयुष्यमान’चा लाभ घ्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र लाभार्थींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शुक्रवारी केले.

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थींसाठी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या पुढाकाराने महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. आहे. या महाशिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार फरांदे यांच्यासह उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर, आयुष्यमान भारत योजनेचे नाशिक विभागप्रमुख डॉ. नितीन पाटील, आयुष्यमान भारतचे जिल्हा समन्वयक डॉ. तुषार मोरे, आयुष्यमान भारतचे जिल्हाप्रमुख डॉ. विपुल चोपडा, नाशिक महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गायकवाड यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

नागरिकांच्या शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या तीन मूलभूत गरजांची पूर्तता करणे अत्यंत आवश्यक आहे. या गरजा अपूर्ण असल्या, तर देशाच्या विकासाचा वेग मंदावतो आणि या नागारिकांचा भार इतर नागरिकांवर पडतो. केंद्र सरकार सामान्य नागरिकांची प्रत्येक गरज ओळखून माणसाच्या जीवनातील प्रत्येक अंगाला स्पर्श करतील, अशा योजनांची अंमलबजावणी करीत असल्याचे सांगत आयुष्यमान भारत योजनाही त्यापैकीच असून, तिचा लाभ घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

आमदार फरांदे यांनी सदर योजनेची माहिती दिली, तसेच हलाखीची परिस्थिती आणि महागडे उपचार यामुळे जिवावर बेतणारा गंभीर आजार असेल, तरीही सामान्य नागरिकाला उपचार घेणे परवडत नाही. परिणामी उपचारांअभावी अनेक नागरिकांचे नाहक बळी जातात. नागरिकांच्या या समस्या लक्षात घेऊन पंतप्रधानांनी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आयुष्यमान भारत सुरू केली असल्याचे सांगितले.

--

सोळा हजार लाभार्थींना होणार कार्डवाटप

शहरातील जवळपास १६ हजार लाभार्थींना या योजनेंतर्गत कार्डचे वाटप केले जाणार आहे. बी. डी. भालेकर विद्यालयात शुक्रवारपासून सुरू झालेले हे महाशिबिर २३ ऑगस्टपर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू राहणार आहे. नागरिकांना या शिबिराचा लाभ मिळावा म्हणून या विद्यालयात ४० ई सेवा केंद्रे उपलब्ध करण्यात आली आहेत. ज्यांना पत्र मिळालेले नाही त्यांना लाभार्थींच्या यादीत आपले नावही या ठिकाणी तपासता येणार आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला वार्षिक पाच लाखांचा आरोग्य विमा मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्ड्यांसाठी अल्टिमेटम

$
0
0

दोन दिवसांत खड्डे बुजविण्याचे स्थायी समिती सभापतींचे आदेश

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे येत्या दोन दिवसांत बुजविण्याचा अल्टिमेटम स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी प्रशासनाला दिला आहे. तसेच, हे खड्डे बुजविण्याची जबाबदारी ठेकेदारांची असल्याचे ठणकावून सांगतानाच त्यांना नोटिसा बजावण्याचे आदेशही दिले. रस्त्यांवर पावलोपावली खड्डे पडले असून, संबंधित ठेकेदार कामच करीत नसल्याची वस्तुस्थिती असल्याने दोन दिवसांत खड्डे कसे बुजणार, असा सवाल उपस्थित होत आहे. महापालिकेने शहरात केलेल्या निकृष्ट रस्ते कामांची खड्ड्यांमुळे झालेली पोलखोल शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत चांगलीच गाजली.

तीन वर्षांचे दायित्व असलेले रस्त्यांचीही चाळण झाली असून, ठेकेदार कुठे गायब झालेत असा सवाल सदस्यांनी स्थायीत उपस्थित केला. रस्ते दुरुस्तीसाठी ठेकेदारांना दिलेले ३८ कोटी रुपये कुठे गायब झाले, असा संतप्त सवाल सदस्यांनी केला. शहरातील सर्वच रस्ते हे खड्डेमय झाले असून, रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी ३८ कोटी रुपयांची तरतूद असूनही पालिकेकडून रस्त्यांवरील खड्डे बुजविले जात नसल्यामुळे नाशिककरा संताप व्यक्त करीत आहेत. माध्यमांमध्ये यासंदर्भातील स्थिती येऊनही अधिकारी काम करीत नसल्याचा जाब समिती सदस्य संतोष साळवे, सुषमा पगारे, कल्पना पांडे, सुनीता कोठुळे, कमलेश बोडके, रुपाली निकुळे यांनी प्रशासनाला विचारला. रस्ते दुरुस्तीसाठी ३८ कोटी रुपयांची अंदाजपत्रकात केलेली तरतूद गेली कुठे, दायित्व असेलेले ठेकेदार गायब झालेत का, खड्ड्यांमुळे अपघातांना जबाबदार कोण, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर काय कारवाई केली, अशी प्रश्नांची सरबत्ती सदस्यांनी प्रशासनावर केली. अनेक नवीन रस्त्यांवरही खड्डे पडल्याने त्याची दुरुस्ती करणार कोण, असा सवालही यावेळी उपस्थित केला गेला. त्यावर शहर अभियंता संजय घुगे यांनी पुराची कामे सुरू असल्याचे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. सभापती निमसेंनीही यावेळी प्रशासनाला एक संधी देत, येत्या दोन दिवसात शहरातील सर्व खड्डे बुजविण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले. तसेच तीन वर्षांच्या आत तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर खड्डे पडले असल्यास संबंधित ठेकेदारास नोटिसा बजावण्याच्या सूचना निमसे यांनी दिल्या. त्यामुळे ठेकेदारांकडून आता खड्डे बुजविले जाण्याची शक्यता आहे.

...

पुरामुळे उशीर

खड्ड्यांबाबत सदस्य आक्रमक झाल्यानंतर पाऊस सुरू असल्यामुळे तूर्त मुरूम व खडी टाकून खड्डे बुजविले जातील. पाऊस उघडल्यानंतर डांबरीकरण केले जाईल, असा खुलासा शहर अभियंता संजय घुगे यांनी केला. रस्त्याच्या ठेकेदारांकडून नदीकाठावरील गाळ काढून घेतला जात असल्याचा अजब दावाही घुगेंनी यावेळी केला. मात्र संतप्त सदस्यांचे यामुळे समाधान न झाल्याने त्यांनी आरोपांच्या फैरी सुरूच ठेवल्या.

...

बारा वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुदतवाढ

महापालिकेत मानधनावर भरलेल्या १६ पैकी १२ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला. महापालिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याचा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी प्रलंबित आहे.

...

मटा भूमिका

शहरातील सारेच रस्ते खड्ड्यांच्या कचाट्यात सापडले असून, या डांबरी रस्त्यांची कामे प्रत्यक्षात किती तकलादू आहेत, याची पोलखोल झाली आहे. पावलोपावली खड्डे असल्याने वाहनचालक अन् पायी चालणाऱ्यांनाही कसरत करावी लागते आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक जण घसरून पडत असतानाही पालिकेला त्याच्याशी सोयरसूतक नसल्याची जनसामान्यांची भावना आहे. शहरातील खड्ड्यांची संख्या आणि ठेकेदारांची बेपर्वाई लक्षात घेता दोन दिवसांत खरेच खड्डे बुजतील, याबद्दल साशंकता वाटते. त्यानंतर मात्र महापालिका नेमकी कुणावर कारवाई करते, याकडे समस्त नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images