Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पुरामुळे पोलिसांच्या सुट्यांवर ‘पाणी’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील पूर परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासनाने तयारी केली असून, शहर पोलिस दलातील सर्व पोलिसांच्या साप्ताहिक सुट्या रविवारपासूनच बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे सुटीवर असलेल्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना लागलीच कर्तव्यावर हजर व्हावे लागले. पोलिसांचा मोठा बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला असून, तो सोमवारी आणि पुढे परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत कायम राहणार आहे.

शहरातील गोदावरी नदीवरील होळकर, कन्नमवार पूल, नंदिनी नदीवरील मुंबई नाका आणि पुढे पौर्णिमा बस स्टॉप जवळील पूल वगळता इतर सर्वच पूल पुराच्या पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारची शहर पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची साप्ताहिक सुटी रद्द करण्यात आली. तसेच मुख्यालय सोडून जाण्यास मनाई केली आहे. पुर परिस्थिती पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत हा निर्णय कायम राहणार असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी घेतलेल्या आढावा बैठकीदरम्यान जाहिर केले. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह सर्व अधिकारी आणि पोलिस दिवसभर पुर आणि पावसाच्या पाण्यामुळे निर्माण झालेले प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत होते.

पुलांवर दक्षता

नाशिक : गोदावरीवरील पूल, कन्नमवार पूल, नंदिनी नदीवरील मुंबई नाका आणि पुढे पौर्णिमा बस स्टॉप जवळील पुलावरून पाणी वाहू लागल्याने अनेक ठिकाणी पोलिसांनी दोन्ही बाजूने बॅरकेडिंग टाकून रस्ते बंद केले होते. तिथे पोलिस बंदोबस्त कायम करण्यात आला आहे. रविवारी रात्री तसेच सोमवारी हा बंदोबस्त कायम राहणार असून, आवश्यकतेनुसार त्यात वाढ करण्यात येणार आहे. दरम्यान, रविवारच्या बंदोबस्ताबाबत बोलताना परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त अमोल तांबे म्हणाले, 'आपत्तकालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. प्रशासन आणि नागरिकांनी मिळून या परिस्थितीला तोंड दिल्यास कमीत कमी नुकसान होऊ शकते.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सर्व कॉलेजांना आज सुटी जाहीर

$
0
0

नाशिक : राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव खबरदारीचा उपाय म्हणून सर्व कॉलेजांना सोमवारी (दि. ५) सुटी जाहीर करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यालयासह विद्यापीठातील शैक्षणिक विभाग, नाशिक व अहमदनगरातील उपकेंद्रे आणि जिल्ह्यातील सर्व कॉलेजांना व संलग्नित संस्थांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भात सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्याचे आदेश विद्यापीठाने सायंकाळी कॉलेजांना दिले. या आदेशान्वये सोमवारी राज्यातील विद्यापीठाशी संलग्नित सर्व कॉलेजांना सुटी असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणची व्यवस्था कोलमडली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

शनिवारी आणि रविवारी नाशिक जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने नद्यांना आलेल्या पुरामुळे महावितरणची वीज पुरवठ्याची सेवा कोलमडली. सुरक्षेच्या कारणास्तव ग्रामीण भागासह नाशिक शहरातील विविध ३३/११ केव्ही उपकेंद्रांतून निघणाऱ्या काही वाहिन्या बंद ठेवण्यात आल्याने शहरातील ३०, तर निफाड उपविभागातील नांदूर मध्यमेश्वर परिसरातील ७८ अश एकूण १०८ रोहित्रांवरील वीजपुरवठा खंडित झाला. गोदावरी, दारणा, कादवा या नद्यांना आलेल्या मोठ्या पुराचा फटका वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामाला बसला. काही रोहित्रे पुराच्या पाण्यात बुडाली होती. नाशिकरोडमधील दत्तमंदिर परिसरातील रोहित्रावर झाड पडले, तर सिन्नरमध्ये प्लिंथ निघाल्याने २०० केव्हीचे रोहित्र कोसळल्याची घटना घडली.

जिल्ह्यातील ज्या भागातील पूर पाण्याचा प्रभाव कमी झाला, त्या भागातील रोहित्रावरील वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता ब्रीजपालसिंह जनवीर यांनी दिली. नाशिक शहर उपविभाग -१ मधील ११ केव्ही वाहिनीवरील गोदावरीच्या पात्राजवळील काही रोहित्र पेटी पाण्याखाली गेल्यामुळे व काही भागांमधून तक्रारी आल्यामुळे ११ केव्ही गोदावरी फीडर बंद ठेवण्यात आला. गोदावरी नदीच्या काठावरील जवळपास ३० रोहित्रे बंद ठेवावी लागली. सीबीएस, पिनॅकल मॉल, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मिनी पिलर बंद ठेवले आहेत. डीजेपीआय सेक्शनमधील एका ठिकाणी एक डीटीसी स्ट्रक्चर झुकलेले आहे. ११ केव्ही सिटीमधील मोठे झाड वाहिनीवर पडल्याने फीडर अंशतः बंद पडला. सदर पुरवठा सुरळीत करण्याचे कार्य सुरू होते. द्वारका उपविभागात पाण्याची पातळी वाढल्यामुळे इंदिरानगर भागातील भारत नगर व खोडेनगर येथील पुरवठा बंद पडला होता. अंबड २ या ३३/११ केव्ही उपकेंद्रच्या नियंत्रण कक्षात पाणी शिरल्याने या उपकेंद्रातून निघणाऱ्या ११ केव्हीच्या १० वाहिन्यांवरील वीज पुरवठा खंडित करण्यात आला.

नाशिक शहर -२ विभाग

या विभागात बंद करण्यात आलेल्या वाहिन्यांत विविध ३३/११ उपकेंद्रावरील ११ केव्ही वडनेर, घरकुल, सद्गुरू, कल्पतरू एफडीआर, एकलहरे, सावळी, नायगाव, जाखोरी, जोगलटेंभी, धामणगाव, कोटमगाव, एकलहरे, सामनगाव, हिंगणवेढे, पॉलिटेक्निक, शहर -५ तसेच देवळाली मधील ११ केव्ही तोफखाना वाहिनी, ३३ केव्ही अंबडवरील गिरणारे, त्र्यंबक एक्स्प्रेस, त्र्यंबक आणि गिरणारे उपकेंद्र येथील गंगा म्हाळुंगी या सर्व ११ केव्ही वाहिन्यांचा समावेश आहे.

निफाड उपविभाग-

या उपविभागांतर्गत जळगाव उपकेंद्राच्या ३३ केव्ही वाहिनीत बिघाड झाला. कर्मचारी वाहिनीवर गस्त घालत आहेत. परंतु, या वाहिनीचे खांब कादवा नदीच्या अगदी काठाच्या जवळ आहेत. कादवा नदीच्या पुरामुळे बिघाड शोधण्यात अडचण निर्माण होत होती. यामुळे सुंदरपूर, कुरडगाव व जळगाव गावठाण या ११ केव्हीच्या वाहिन्या बंद पडल्या आहेत. नांदूरमध्यमेश्वरच्या बॅक वॉटरमुळे आणि गोदावरी व कादवा नदीच्या पुरामुळे निफाड उपविभागात नद्यांच्या काठांवरील वेगवेगळ्या भागात ७८ रोहित्रे विद्युत सुरक्षा कारणास्तव बंद ठेवण्यात आली आहेत.

जिल्ह्यातील अनेक ३३ आणि ११ केव्ही वाहिन्या अजूनही सुस्थितीत असून, वीजपुरवठा सुरु आहे. पावसाचा व नदीच्या पुराचा जोर वाढल्यास सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणखी काही उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद करावा लागू शकतो.

-ब्रीजपालसिंह जनवीर, मुख्य अभियंता, महावितरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवकाने घेतली उडी! पूलावरून युवकाने घेतली उडीपंचवटी – गोदावरीला महापूर आलेला असतान

$
0
0

युवकाने घेतली उडी!

पंचवटी : गोदावरीला महापूर आलेला असताना नांदूर-जेलरोड यांना जोडणाऱ्या जनार्दन स्वामी पुलावरून एका युवकाने उडी घेतली. तेव्हा ते दृश्य बघणाऱ्यांच्या काळजाचा ठेका चुकला. पुराच्या पाण्यात हा युवक बेपत्ता झाल्याची चर्चा पसरली. मात्र, काही वेळात तो मानूरगावच्या जवळ किनाऱ्याला पोहत आला. तो पट्टीचा पोहणारा असल्याचे नंतर कळल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात चोवीस तास आपत्कालीन कक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असल्याने गोदावरीला महापूर आलेला असून, या काळात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास महापालिकेतर्फे नागरिकांसाठी प्रत्येक विभागात २४ तास आपत्कालीन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी संपर्क क्रमांकदेखील जारी करण्यात आले आहेत.

आग, अपघात, पूरपरिस्थिती, झाडे पडणे, घर पडणे व नैसर्गिक आपत्ती अशी कोणतीही आपत्तिजनक घटना घडल्यास त्वरित आपल्याजवळच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षास माहिती कळवावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. मुख्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष, राजीव गांधी भवन (०२५३-२५७१८७२, २२२२४१३, पंचवटी विभागीय कार्यालय, (०२५३,२५१३४९०), सातपूर विभागीय कार्यालय (०२५३- २३५०३६७), नाशिक पूर्व विभागीय कार्यालय (०२५३-२५०४२३३), नाशिक पश्चिम विभागीय कार्यालय, पंडित कॉलनी ( ०२५३- २५७०४९३), सिडको विभागीय कार्यालय (०२५३-२३९२०१०), नाशिकरोड विभागीय कार्यालय (०२५३-२४६१३७६), मुख्य अग्निशमन केंद्र, शिंगाडा तलाव (१०१, ०२५३-२५९०८७१), (पंचवटी अग्निशमन केंद्र (०२५३- २५१२९१९), सातपूर अग्निशमन केंद्र, त्र्यंबकरोड (०२५३- २३५०५००), सिडको अग्निशमन केंद्र, स्टेट बँक चौक (०२५३-२३९३९६१), नाशिकरोड अग्निशमन केंद्र, विभागीय कार्यालय नाशिकरोड (०२५३- २४६१३७९), पंचवटी विभागीय अग्निशमन केंद्र, के. के. वाघ महाविद्यालयाजवळ (०२५३-२६२९१०४), जेडीसी बिटको रुग्णालय, नाशिकरोड (०२५३-२४६२०५१, २४६५३५८), सावित्रीबाई फुले रुग्णालय, सिन्नर फाटा, नाशिकरोड (०२५३-२४६४०५४), इंदिरा गांधी रुग्णालय, पंचवटी (०२५३-२६२१३३१), गंगापूर रुग्णालय, गंगापूर गाव (०२५३-२३०००२९), मायको प्रसूतिगृह, सातपूर (०२५३-२३५०५९८), डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, कथडा, जुने नाशिक (०२५३-२५९००४९), श्री स्वामी समर्थ रुग्णालय, मोरवाडी, सिडको (०२५३- २३९३४२५), जिजामाता प्रसूतिगृह, मेनरोड (०२५३-२५९७९८१).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-पुणे महामार्ग पाण्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

द्वारकापासून नाशिकरोडपर्यंत जागोजागी पाणी साचल्याने या मार्गावरची वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू होती. दत्त मंदिर ते द्वारका या मार्गावरुन वाहने चालवताना वाहनचालकांच्या नाकीनऊ येत होते. हे अंतर कापण्यासाठी नागरिकांना दोन ते तीन तासांचा कालावधी लागत होता.

नाशिक-नाशिकरोड मार्गावर जागोजागी पाणी साचले असून, मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सेंट झेविअर शाळेपासून पाणी साचण्यास सुरुवात झाली. या ठिकाणी गुडघ्याएवढे पाणी साचले होते. पुढे उपनगर नाका सोडल्यानंतर पाण्याची पातळी वाढून ती मांडीपर्यंत पोहचली होती. गांधीनगर परिसरात मात्र फारसे पाणी साचलेले नाही. बोधलेनगर सिग्नलपासून पाण्याचा विसर्ग होत नसल्याने या परिसरात कंबरेएवढे पाणी जमा झाले होते. या ठिकाणाहून लहान वाहने जाऊ शकत नव्हती. अनेक चारचाकी गाड्या रस्त्यात बंद पडलेल्या दिसत होत्या त्याचप्रमाणे टू-व्हीलर धक्का मारून पुढे न्याव्या लागत होत्या. या संपूर्ण मार्गावर एकेरी वाहतूक सुरू होती. त्यामुळे एक वाहन बंद पडल्यास मागील वाहनेही अडकून पडत होती. या ठिकाणी चारचाकी गाड्या बंद पडल्यानंतर परिसरातील कार्यकर्ते या गाड्या काढण्यासाठी मदत करत होते. संपूर्ण परिसरात कंबरेएवढे पाणी साचले होते. त्यात मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे अनेक वाहने या खड्ड्यांत अडकून बंद पडत होती. नाशिकरोडहून द्वारकाकडे येणारी वाहने पर्यायी मार्गावरुन जात असल्याने सर्वच रस्ते ठप्प झाले होते. द्वारकावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्याने या ठिकाणीसुद्धा वाहने चालविण्यासाठी कसरत करावी लागत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्तांना ‘फूड पॅकेट’

$
0
0

जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होताच नागरिकांकडून मदतीचा हात पुढे आला. चांदोरी येथील पूरग्रस्तांना बाराशे फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले. डॉ. शैलेंद्र गायकवाड, विक्रांत मते, भूषण मटकरी, सचिन बोधले आणि अमृता पवार यांनी या पॅकेटचे वाटप केले. रॉबिनहूड आर्मीतर्फे एरंडवाडी, चिंचबन, मालेगाव स्टॅँड परिसरातील पूरग्रस्तांना फूड वाटप केले गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भावली’ फक्त अफवाच

$
0
0

'भावली' फक्त अफवाच

नाशिक : भावली धरणाला तडा गेला असून, पूर्ण पाणी दारणा धरणात सोडणार असल्याची अफवा दुपारपासून सोशल मीडियावर व्हायरल दाखल झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. दरम्यान, जलसंपदा विभागाने ही फक्त अफवाच असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोदाकाठी वीज नाही

$
0
0

गोदावरी नदीच्या पात्रानजीकचा वीजपुरवठा सुरक्षेच्या दृष्टीने रविवारी रात्री पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. महावितरणचे अधिकारी पूरपरिस्थिती वर लक्ष ठेवत असून, ज्या भागात शक्य असेल अशा भागातला वीजपुरवठा नजीकच्या वाहिन्यांवर वळविण्यात आला आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिव, म्हाळुंगी नदीला पूर

$
0
0

सिन्नर : तालुक्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्वच नद्या तसेच धरण तुडुंब भरून वाहत आहेत. शहरातील सरस्वती, शिव नदीला पूर आल्याने या नदीचे पाणी नाशिक वेस भागातील खासदार पुलावरून पाणी वाहत आहे. शहरात आठवडे बाजार असल्याने या पुलावरून पाणी वाहू लागल्याने नागरिकांची धावपळ उडाली. देव नदी अतिवृष्टीमुळे दुथडी भरून वाहत आहे. कुंदेवाडी, मुसळगाव, खोपडी, वडांगळी, ठाणगाव, मरळ नांदूर आदी ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील चिंचोली येथील ढाब्याजवळ काही वेळासाठी रस्ता बंद करण्यात आला होता. सरदवाडी, भोजापूर, उमरदरी धरण ओसंडून वाहत होते. ठाणगाव येथील म्हाळूंगी नदीला पूर आला आहे. ब्रिटिशकालीन पुलावरून पाणी आल्याने अहमदनगर जिल्ह्यातील गावांचा संपर्क तुटला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणची व्यवस्था कोलमडली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड शनिवारी आणि रविवारी नाशिक जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने नद्यांना आलेल्या पुरामुळे महावितरणची वीज पुरवठ्याची सेवा कोलमडली. सुरक्षेच्या कारणास्तव ग्रामीण भागासह नाशिक शहरातील विविध ३३/११ केव्ही उपकेंद्रांतून निघणाऱ्या काही वाहिन्या बंद ठेवण्यात आल्याने शहरातील ३०, तर निफाड उपविभागातील नांदूर मध्यमेश्वर परिसरातील ७८ अश एकूण १०८ रोहित्रांवरील वीजपुरवठा खंडित झाला. गोदावरी, दारणा, कादवा या नद्यांना आलेल्या मोठ्या पुराचा फटका वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामाला बसला. काही रोहित्रे पुराच्या पाण्यात बुडाली होती. नाशिकरोडमधील दत्तमंदिर परिसरातील रोहित्रावर झाड पडले, तर सिन्नरमध्ये प्लिंथ निघाल्याने २०० केव्हीचे रोहित्र कोसळले. पूर पाण्याचा प्रभाव कमी झाला, त्या भागातील रोहित्रावरील वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता ब्रीजपालसिंह जनवीर यांनी दिली. नाशिक शहर उपविभाग -१ मधील ११ केव्ही वाहिनीवरील गोदावरीच्या पात्राजवळील काही रोहित्र पेट्या पाण्याखाली गेल्यामुळे व काही भागांमधून तक्रारी आल्यामुळे ११ केव्ही गोदावरी फीडर बंद ठेवण्यात आला. गोदावरी नदीच्या काठावरील जवळपास ३० रोहित्रे बंद ठेवावी लागली. सीबीएस, पिनॅकल मॉल, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मिनी पिलर बंद ठेवले आहेत. डीजेपीआय सेक्शनमधील एका ठिकाणी एक डीटीसी स्ट्रक्चर झुकलेले आहे. ११ केव्ही सिटीमधील मोठे झाड वाहिनीवर पडल्याने फीडर अंशतः बंद पडला. सदर पुरवठा सुरळीत करण्याचे कार्य सुरू होते. द्वारका उपविभागात पाण्याची पातळी वाढल्यामुळे इंदिरानगर भागातील भारत नगर व खोडेनगर येथील पुरवठा बंद पडला होता. अंबड २ या ३३/११ केव्ही उपकेंद्रच्या नियंत्रण कक्षात पाणी शिरल्याने या उपकेंद्रातून निघणाऱ्या ११ केव्हीच्या १० वाहिन्यांवरील वीज पुरवठा खंडित करण्यात आला. निफाड उपविभाग या उपविभागांतर्गत जळगाव उपकेंद्राच्या ३३ केव्ही वाहिनीत बिघाड झाला. कर्मचारी वाहिनीवर गस्त घालत आहेत. परंतु, या वाहिनीचे खांब कादवा नदीच्या

अगदी काठाच्या जवळ आहेत. कादवा नदीच्या पुरामुळे बिघाड शोधण्यात अडचण निर्माण होत होती. यामुळे सुंदरपूर, कुरडगाव व जळगाव गावठाण या ११ केव्हीच्या वाहिन्या बंद पडल्या आहेत. निफाड उपविभागात नद्यांच्या काठांवरील वेगवेगळ्या भागात ७८ रोहित्रे विद्युत सुरक्षा कारणास्तव बंद ठेवण्यात आली आहेत.  जिल्ह्यातील अनेक ३३ आणि ११ केव्ही वाहिन्या अजूनही सुस्थितीत असून, वीजपुरवठा सुरू आहे. पाणी वाढल्यास आणखी उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद करावा लागू शकतो. -ब्रीजपालसिंह जनवीर, मुख्य अभियंता, महावितरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चणकापूर धरणाचे सातही दरवाजे उघडले

$
0
0

कळवण : कळवण तालुक्यात आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. शनिवार व रविवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे चणकापूर (७५ टक्के), पुनद प्रकल्प भरले आहे. चणकापूर धरणाच्या उजव्या कालव्यातून गिरणा नदीत १७ हजार १९१ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. चणकापूर धरणाच्या सातही दरवाजे ४ फुटापर्यंत उघडण्यात आले आहेत. तर पुनद प्रकल्पातून २ हजार ४०१ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गिरणा व बेहडी नदीला पूर आला असून, नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूर पाण्याने देवळा तालुक्यातील रामेश्वर प्रकल्प भरला आहे. त्यामुळे तालुक्यातील पाणीपुरवठा योजना जिवंत झाल्या आहेत. पुनद प्रकल्पाचे चारही दरवाजे उघडण्यात आले असून, नदीपात्रात २ हजार ४०१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. कळवण व देवळा तालुक्यातील नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चणकापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा परतेन मी...

$
0
0

"मी डोपिंगमध्ये कशी सापडले हे माझे मलाच कळले नाही. नकळतपणे घडलेली चूक मला सिद्ध करता आली नाही. असे असले तरी मी स्वत:ला दोषी मानत नाही. यामुळे मी अजिबात खचलेले नाही. आता मी सावरतेय स्वत:ला. मला खात्री आहे, की मी पुन्हा ट्रॅकवर उतरेन आणि यशाची पताका फडकवेन. माझा सराव जोमाने सुरू आहे. त्यामुळे आता माझी कामगिरीच बोलेल..." हा विश्वास आहे भारताची लांब पल्ल्याची धावपटू संजीवनी जाधवचा. उत्तेजक द्रव चाचणीत दोषी आढळल्याने आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स फेडरेशनने तिच्यावर दोन वर्षांच्या निलंबनाची कारवाई केली. त्यावर 'मटा'शी संवाद साधताना तिने आपले मन मोकळे केले.

महेश पठाडे

mahesh.pathade@timesgroup.com

डोपिंग प्रकरणाला तू कशी सामोरी गेलीस?

डोपिंगमध्ये मी कशी सापडले हे मी सिद्धच करू शकले नाही. जवळपास एक वर्ष 'वाडा'ची केस चालली. दिल्लीतील वकील मी नियुक्त केले होते. त्यांनी माझी बाजू मांडली. त्यानंतर माझे बरेच सप्लिमेंट तपासण्यात आले. मी जे व्हिटॅमिन घेत होते तेही तपासण्यात आले. त्यातही काहीही आढळले नाही. माझ्या युरिनमध्ये 'प्रोबेनेसिड' हा घटक आढळला. हा घटक माझ्या शरीरात केवळ ०.९ नॅनो ग्रॅमपर्यंत आढळला. वस्तुतः शरीरात तो किमान दोन ते पाच ग्रॅममध्ये असेल तरच त्याचा खेळाडूला उपयोग होतो; पण 'वाडा'चा नियम असे सांगतो, की 'प्रोबेनेसिड' हे उत्तेजक द्रव नसले तरी खेळातील कामगिरी उंचावण्यासाठी स्टेरॉइड म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो. मी माझी बाजू मांडली; पण त्यांनी सांगितले, की तुम्ही हे सिद्ध करून दाखवा, की हा घटक तुमच्या शरीरात कसा आला? पण मला हेच अजूनपर्यंत कळलेलं नाही, की हा माझ्या शरीरात घटक कशातून आला असेल? 'वाडा' हे जाणून होतं, की 'प्रोबेनेसिड' हा कंटेंट खूपच कमी आहे. त्याचा उपयोगही फारसा नाही. मात्र, बंदी घातलेल्या घटकांमध्ये 'प्रोबेनेसिड'चा समावेश आहे. या सर्व प्रकारानंतर मी कतारला एशियन चॅम्पियनशिपही खेळले. 'वाडा'ने मला परवानगीही दिली. मात्र, एक भीती माझ्या मनात पक्की बसली, की माझ्या व्हिटॅमिनमध्येच असा काही घटक असू शकतो. त्यामुळे कतारला जाण्यापूर्वीच व्हिटॅमिन घेणेही सोडून दिले. कतारमध्ये मी मेडलही जिंकले. तरीही 'वाडा'चा हाच मुद्दा होता, की तुमच्या शरीरात 'प्रोबेनेसिड' घटक कसा आला हे सिद्धच करून दाखवा. तेच मला सिद्ध करता आले नाही. मात्र, त्यांनी मला सहानुभूती दाखवत ज्या दिवशी ही केस दाखल झाली त्या दिवसापासून माझ्यावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई केली. त्यातील वर्ष उलटूनही गेले. आता कारवाईचे आठ-नऊ महिनेच उरले आहेत.

तू या निर्णयाविरुद्ध अपील करू शकली असतीस...

मी बाजू मांडू शकले असते; पण 'वाडा'ने मला सांगितलं, की तुम्ही ही केस पुढे लढूही शकता. मात्र, ज्या दिवशी तुमच्याविरुद्ध निकाल लागेल त्या दिवसापासून बंदीची कारवाई लागू होईल. तसं त्यांनी मला दिलेल्या पत्रात नमूद केलं होतं. त्यामुळे ही दोन वर्षांची बंदी आणखी दोन-चार वर्षांनी पुढे लागली तर माझे करिअर संपेल. कदाचित बंदीची कारवाई चार वर्षांपर्यंतही लागू शकली असती. कारण 'प्रोबेनेसिड' माझ्या शरीरात कसं आलं, ते मी सिद्धच करू शकले नसते.

यामागे कोणाचं षडयंत्र असू शकतं का?

हे कसं घडलं असेल, हा प्रश्न मला अनेकदा पडला. हजार प्रश्न माझ्या मनात घोळत होते. मी यावर काहीच सांगू शकत नाही. यामागे कदाचित षडयंत्रही असू शकेल; पण माझ्याकडे पुरावाच नसल्याने मी काहीच बोलू शकत नाही. माझे सप्लिमेंट वगैरे सगळ्या बाबींचा मी तपास केला. माझ्या शरीरात जे प्रोबेनेसिड आढळलं, त्यामागे भरपूर कारणे असू शकतात. वजन वाढवण्यासाठी, कमी करण्यासाठी किंवा जॉइंटचा त्रास कमी करण्यासाठी घेतलं जाऊ शकतं. त्यामुळे सांगता येत नाही, की नेमकं कशातून हा घटक आला असेल. हे व्हिटॅमिन वगैरे मी आता एकदीड वर्षापासून सुरू केले. कारण मोठ्या स्तरावर कामगिरी उंचवायची असेल तर व्हिटॅमिन घ्यायलाच लागते. कारण अन्नातून तेवढे व्हिटॅमिन मिळत नाहीत.

यातून तू कशी सावरतेस?

मला स्वतःला माहीत आहे, की मी दोषी नाहीच. सरकारला मी हे माझ्या कामगिरीनेच सिद्ध करून देणार आहे, की मी असे काही केलेले नाही. माझा सराव नियमित सुरू आहे. माझ्याकडून नकळतपणे जे काही घडलंय, ते मला सिद्ध करता आले नसले तरी माझ्या कामगिरीने मी पुन्हा यशाची पताका फडकवेन. माझी कामगिरीच आता बोलेल.

पुढची दिशा काय असेल?

कारवाईतून मी सावरत आहे. त्यामुळे आता मी आगामी स्पर्धांची तयारी सुरू केली आहे. २०२१ मध्ये एशियन चॅम्पियनशिप, तर २०२२ मध्ये एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ आहे. या स्पर्धांवर मी लक्ष केंद्रित केलं आहे. मला विश्वास आहे, की मी या स्पर्धांमध्ये नक्कीच मेडल जिंकेन.

प्रशिक्षकांशी बोललीस का?

खरंच आमच्या ग्राउंडवर असं काही चालत नाही. या ग्राउंडवर कविता राऊत, मोनिका आथरेसारख्या धावपटू घडल्या आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मेडल दिले. त्यामुळे या डोपिंग प्रकरणाचा मी असा विचारही करू शकणार नाही. मी असं करणारच नाही, याचा विश्वास त्यांनाही आहे. त्यामुळे हे जे घडलं त्याची त्यांनाही माहिती नव्हती. स्टेरॉइड घेणारे खेळाडू अचानक परफॉर्मन्स देतात. मी मात्र सातत्याने कामगिरी उंचावतेय. त्यामुळे माझ्याबाबतीत हे असं होणं शक्यच नाही.

आईवडिलांची काय भावना होती?

या संपूर्ण प्रकारात माझे आईवडील माझ्या पाठीशी राहिले. त्यांनासुद्धा माहिती आहे, की मी असं काही करूच शकत नाही. कारण त्यांनी मला लहानपणापासून पाहिलं आहे. यात माझा भाऊ माझ्यामागे खंबीरपणे राहिला. त्याने मला खूप मोठा दिलासा दिला. ज्या वेळी माझ्यावर बंदीची कारवाई लादली, त्या वेळी मला अनेक खेळाडूंचेही फोन आले. अर्थात, मी असं करणार नाही याची खात्री सर्वांना होती. त्यामुळे त्यांनी मला धीरच दिला. कविता राऊत, ललिता बाबर यांचेही फोन आले. त्यांनी मला धीर देताना सांगितलं, की तू हे करू शकत नाही, याची आम्हाला खात्री आहे. हा विश्वास मला उभारी देणारा आहे.

या प्रकरणातून धडा घेत तू इतर खेळाडूंना काय सांगशील?

उत्तेजक द्रव टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकार उपक्रम राबवत असतेच. मीदेखील नाशिकमध्ये तालुका क्रीडाधिकारी म्हणून काम करीत आहे. त्यामुळे नकळतपणे अशा प्रसंगांना खेळाडूंना सामोरे जावे लागते. त्यासाठी प्रबोधन कार्यशाळा घेण्याची खरंच गरज आहे. आमचे विभागीय आयुक्तही मला भेटून गेले. त्यांनी मला सांगितलं, की यावर काही कार्यशाळा घ्यायला हव्यात. आहाराविषयी खेळाडूंना माहिती देणे गरजेचे आहे. काहीही माहिती नसताना सप्लिमेंट वगैरे घेऊ नये याबाबत खेळाडूंना माहिती दिली जाणे आवश्यक आहे. जी लोक स्टेरॉइड घेतात त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. मात्र, नकळतपणे खेळाडू डोपिंगचा शिकार होतो, तेव्हा त्यावर नक्कीच कार्यशाळा व्हायला हव्यात.

तू कुस्तीच्या आखाड्यातून सिंथेटिक ट्रॅकवर आलीस. काय सांगशील या प्रवासाबाबत?

तसे मी दोन्ही इव्हेंट करायचे. कुस्ती आणि रनिंग दोन्हींना मी वेळ द्यायचे. शाळेत असताना तसे मी सगळेच खेळ खेळले; पण कुस्तीकडे वळण्याचं कारण माझे वडील. ते कुस्तीपटू होते. गावातील जत्रेत ते कुस्त्या खेळायचे. त्यांना वाटायचं, की आपल्या घरातून कोणी तरी कुस्तीपटू व्हावं. चांगलं नाव कमवावं. त्यामुळे मी कुस्तीकडे वळले. मात्र, मी रनिंगही करायचे. पाचवी ते दहावीपर्यंत मी धावण्याच्या शर्यतीत पहिला क्रमांक सोडला नाही. कुस्तीचे ट्रेनिंग थोडे वेगळे असते. दहावीनंतर कुस्ती खेळायची म्हंटली तर चांगल्या प्रशिक्षकाची गरज आहे. नाशिकमध्ये मला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाणारा कोच नव्हता. त्यामुळे मी कुस्तीचा विचार सोडला आणि रनिंगवरच लक्ष केंद्रित केलं. विजेंदरसिंग यांचं नावही ऐकलं होतं. त्यामुळे मी दहावीनंतर रनिंगकडे वळले. मला ते सोपं वाटलं. वडीलही म्हणाले, की रनिंगच योग्य आहे. अकरावीला असताना राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सिल्व्हर घेतले. त्यानंतर बारावीला एशियन स्कूल स्पर्धेत, त्यानंतर वर्ल्ड स्कूलमध्ये सिल्व्हर मेडल घेतल्याने माझा आत्मविश्वास दुणावला. त्यानंतर मी मागे वळून पाहिलेच नाही.

संजीवनी म्हणाली...

- माझ्या शरीरात 'प्रोबेनेसिड' हा घटक कसा आला हे मी सिद्धच करू शकले नाही. या कारवाईविरुद्ध मी लढलेही असते; पण मला निर्दोषत्व सिद्धच करता न आल्याने पुढे हीच कारवाई आणखी लांबली असती.

- मी स्वत:ला अजिबात दोषी मानत नाही

- कदाचित यामागे षडयंत्रही असू शकेल

- मी कुस्तीतही करिअर केले असते, पण कोचविना ते कसं शक्य झालं असतं?

- आईवडिलांबरोबर माझा भाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे राहिल्याने मला उभारी मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुलावरील वाहतूक बंद

$
0
0

नाशिकरोड : वालदेवी नदीला रविवारी आलेल्या पुरामुळे गुलाबवाडी ते बागूलनगर दरम्यानच्या पुलाच्या दोन्हीही बाजू ढासळल्याची घटना घडली. पुराच्या पाण्यामुळे या पुलाला धोका निर्माण झाल्याने पोलिसांनी हा पूल वाहतुकीसाठी बंद केला. त्यामुळे सोमवारी या पुलावरील वाहतूक मालधक्कामार्गे देवळाली गाव अशी सुरू होती. वालदेवी नदीला रविवारी पूर आला. पुराच्या पाण्यामुळे मालधक्का परिसरातील गुलाबवाडी येथील रेल्वे गेटजवळून विहितगावातील बागूलनगर झोपडपट्टीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाच्या दोन्हीही बाजूंकडील माती खचली. त्यामुळे या पुलाच्या दोन्ही बाजूंकडील रस्त्याखालील मातीचा भराव वाहून गेला. पुलाला दोन्ही बाजूने जोडणारा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने पोलिसांनी रविवारी रात्रीच या पुलाच्या दोन्हीही बाजूस दोर बांधून हा पूल रहदारीसाठी बंद केला. या मार्गावरील वाहतूक मालधक्कामार्गे देवळाली गाव अशी वळविण्यात आली. या पुरामुळे वालदेवी नदीकाठावरील महापालिकेच्या भूमिगत गटार योजनेचे ठिकठिकाणचे चेंबर्सदेखील वाहून गेले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चव्हाण प्रतिष्ठानतर्फे कवी संमेलनाचे आयोजन

$
0
0

चव्हाण प्रतिष्ठानतर्फे कवी संमेलनाचे आयोजन नाशिक : आपल्या देशासाठी स्वातंत्र्य दिन म्हणजे अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवनाचे रान करणाऱ्या व आयुष्य वेचणाऱ्या सैनिकांना आदरांजली वाहण्याचा हा दिवस. या निमित्त 'स्वातंत्र्याचे गीत नव्याने गाऊ' या अभिनव कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात कवींनी 'स्वातंत्र्य' या विषयावरील स्वलिखित किंवा इतर कवींच्या कवितांचे सादरीकरण करायचे आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक यांच्यावतीने १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड येथे हा कार्यक्रम होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


क्लस्टरसाठी चार एफएसआयचा प्रस्ताव

$
0
0

आयुक्त राधाकृष्ण गमे यांची माहिती

धोकादायक वाड्यांचा पुनर्विकास होणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जुने नाशिक, पंचवटीतल्या गावठाण भागात यंदा मोठ्या प्रमाणावर वाडे कोसळले आहे. त्यामळे यात मनुष्यहानी झाली नसली तरी ही धोक्याची घंटा असून, या भागाचा तातडीने पुनर्विकास करणे आवश्यक आहे. गावठाणचा पुनर्विकास करण्यासाठी मुंबई आणि ठाण्याच्या धर्तीवर क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेअंतर्गत अतिरिक्त चार एफएसआय (चटईक्षेत्र निर्देशांक) मंजूर करावा, असा प्रस्ताव सरकारकडे पाठवल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्पष्ट केले आहे. क्लस्टर डेव्हलमेंटसाठी या भागातील लोकांनी पुढे यावे, असे आवाहन करीत आघात मूल्यमापनासाठी निविदा काढल्याचे गमे सांगितले.

यंदाच्या पावसाळ्यात जुने नाशिक आणि पंचवटीत वाड्यांची मोठी पडझड झाली. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात धोकादायक ७२३ वाडे आणि इमारती आढळल्या आहेत. यंदाच्या पावसाळ्यात वाडे मोठ्या प्रमाणावर कोसळले असले तरी सुदैवाने मनुष्यहानी झालेली नाही. या भागातील नागरिक वाडे रिकामे करीत नसल्याने महापालिकेची अडचण वाढली आहे. त्यामुळे क्लस्टर डेव्हपलमेंटच्या माध्यमातून या भागाचा पुनर्विकास करावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. त्यासाठी अधिक एफएसआयची गरज आहे. सरकारने या भागात अतिरिक्त एफएसआय दिल्यास या भागात पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. मात्र, नवीन शहर विकास नियंत्रण नियमावलीत या भागाचा एफएसआय वाढवण्याऐवजी सरकारने तो दोनपेक्षा कमी केला आहे. त्यामुळे जादा एफएसआयवरून क्लस्टरचा प्रश्न रखडला आहे. मात्र, गेल्या आठवड्यात मुख्य सचिव भूषण गगरानी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या भागातील क्लस्टर डेव्हलपमेंटचाही प्रश्न उपस्थित झाला. त्यात नाशिकमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी चार एफएसआय मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली असून, तसा प्रस्तावही पाठवल्याचे आयुक्त गमेंनी आज स्पष्ट केले. या बैठकीनंतर आघात मूल्यमापनासाठी निविदाही काढण्यात आल्या असून, गावठाणातील क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्रश्न मार्गी लागेल, असा दावा त्यांनी केला आहे.

नाल्यांचे सर्वेक्षण सुरू

नैसर्गिक नाल्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याने या नाल्यांचे पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे रस्तेही जलमय झाले आहेत. अनेक ठिकाणी नैसर्गिक नाल्यांवर इमारतीच उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे नैसर्गिक नाले कुठे कुठे बुजवले गेले, त्याचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश आपण नगररचना विभागाला आधीच दिल्याचे आयुक्तांनी या वेळी स्पष्ट केले. या सर्वेक्षण अहवालानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाचे तीन बळी

$
0
0

नाशिक : सतत पडणाऱ्या पावसामुळे दुगांव येथे पडीक घराची भिंत अंगावर पडून एका आठवर्षीय बालिकेचा करुण अंत झाला, तर लाखलगाव येथे एक व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेली. देवळालीत वाड्याची भिंत पडून तीन जण जखमी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. सोमवारी सकाळी दुगाव येथे शिवराम थेटे यांच्या पडीक घराची भिंत अंगावर पडून संगराणी रघुनाथ वाघ (वय ८) या बालिकेचा मृत्यू झाला. कालवी-लाखलगाव येथे पाय घसरून पुराच्या पाण्यात पडल्याने परसराम काशिनाथ अनवट (वय ४७) हे वाहून गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॅशटॅग ‘भारत एक है’!

$
0
0

सोशल मीडियावर जल्लोष; विनोदासह अभिनंदनाच्या पोस्ट

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जम्मू-काश्मिरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० व ७५ अ हटविण्याबरोबर जम्मू-काश्मिर व लडाख संपूर्ण केंद्रशासित प्रदेश असतील, या केंद्र सरकारच्या शिफारशीनंतर सोशल मीडियावर जल्लोष करण्यात आला. दिवसभरात लाखो पोस्ट, स्टेटस आणि मेसेजेस व्हायरल झाले. सरकारच्या अभिनंदनासह या ‌‌विषयावरील विनोदी मेसेज आणि मिम्सनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. 'भारत एक है' हा हॅशटॅग सर्वाधिक ट्रेडिंग ठरला.

केंद्रातील मोदी सरकारने सोमवारी जम्मू-काश्मिरचा भूगोल बदलून टाकणारी ऐतिहासिक शिफारस केली. यानंतर सोशल मीडियावर आनंदाचे उधाण दिसून आले. 'धारा ३७०, ३५ अ खत्म. जहाँ हुऐ बलिदान मुखर्जी, वो कश्मीर हमारा है।' 'नरेंद्र मोदी और अमित शाह इतिहास आपको हिरो की तरह याद रखेगा।' 'आप सुभाष बाबू के बाद भारत के अगले हिरो हुऐ। आप पर गर्व है।' असे मेसेज पोस्ट केले गेले. व्हॉट्सअॅप, फेसबुकसह इन्स्टाग्रामवर मोदी व शहा यांच्यासाठी अभिनंदनाचे पोस्ट अपडेट करण्यात आल्या.

ताज्या शिफारशीमुळे जम्मू-काश्मिरमध्ये जागा खरेदी व व्यवसायाला परवानगी मिळणार आहे. यावर 'कोणीही जम्मू काश्मिरमध्ये जागा घेण्याची घाई करू नये, याच्याहून स्वस्त जमीन दोन वर्षात लाहोरला मिळणार आहे, मोदी है तो मुमकीन है' हा मेसेज व्हायरल झाला. नेटिझन्सनी अभिनंदनाच्या पोस्टसह राजकीय मुद्द्यांवरून विरोधकांना ट्रोल करणारे विनोदी मेसेजेस व्हायरल केल्या.

अशा आहेत पोस्ट

- हर साल १५ अगस्त को, मुंबई, दिल्ली हायअलर्ट पर रहते थे। अबकी बार लाहोर, कराची, इस्लामाबाद हायअलर्ट पर हैं

- लाहोर व कराची पाकिस्तान का अभिन्न अंग : इमरान खान

- गेल्या अनेक वर्षांपासून आपली मागणी होती, ती आज पूर्ण होत असून काश्मिरमधील ३७० कलम हटविल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन

- ऐतिहासिक निर्णय - अखंड हिंदुस्थानाचा विजय असो

- सही लोग को वोट दिया भिडू

मिम्सद्वारे ट्रोल

जम्मू-काश्मिर संदर्भातील ऐतिहासिक निर्णय जाहीर झाल्यानंतर मोदी-शाह यांच्या विरोधकांचे काही मुद्दे आणि त्यांच्या फोटोंसह मिम्स तयार करण्यात आले. या निर्णयामुळे विरोधकांची बोलती बंद झाल्याचा सूर या मिम्सद्वारे व्यक्त केला गेला. इन्स्टाग्राम आणि व्हॉटसअॅपच्या स्टेटसमध्ये हे मिम्स अपलोड केले गेले. ट्विटरवरही हे मिम्स अपलोड करत विरोधकांना ट्रोल केले गेले. मोदी-शाह यांना कायम विरोध करणाऱ्या नेत्यांसह सिनेसृष्टीतील कलाकारांनाही मिम्सद्वारे नेटिझन्सनी ट्रोल केले.

ट्विटरवरील ट्रेडिंग हॅशटॅग

हॅशटॅग यूजर्स (हजारांमध्ये)

Article370 ४४७

#KashmirHamaraHai १८६

#370gaya ७७.८

#StandwithKashmir १०६

#JammuAndKashmir ११४

#ModiHaiToMumkinHai ३०.७

#Ladakh ११.६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा-महाविद्यालयांमध्ये शुकशुकाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोदेला रविवारी आलेल्या ऐतिहासिक पुरामुळे शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारी सुटी मिळाली. पावसाचा जोर सोमवारी सकाळनंतर ओसरला असला तरीही सुटीमुळे शाळा व महाविद्यालयांच्या कॅम्पसमध्ये शुकशुकाट होता.

शहरात रविवारी गोदापात्रातील पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने शाळेला सुटी जाहीर केली. यामुळे अनेक पालकांचा जीव भांड्यात पडला. या पाठोपाठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न कॉलेज, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासह विविध शैक्षणिक संस्था आणि कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमांना सोमवारी दिवसभर सुटी जाहीर करण्यात आली होती. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या सामनगाव शासकीय तंत्रनिकेतनमध्येही सोमवारची चाचणी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊस ओसरला, पूर कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दोन दिवसांत अतिवृष्टीमुळे शहराला झोडपून काढलेल्या पावसाचा जोर सोमवारी ओसरला. गोदावरीला आलेल्या महापुराची स्थितीही सोमवारी नियंत्रणात आली. रविवारी शहरातील पाण्याखाली गेलेल्या पुलांवरील पाणी ओसरल्याने जनजीवन सुरळीत झाले. मात्र, पुरामुळे फटका बसलेल्या रहिवाशांचे संसार सावरताना नाकी नऊ आले आहेत.

सोमवारी (दि. ५) सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत २५.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर गेल्या चोवीस तासांत शहरात १५८.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. सोमवारी सकाळी ९७, तर सायंकाळी ९० टक्के आर्द्रतेचे प्रमाण होते. सोमवारी मध्यरात्री पावसाचा जोर वाढल्याने रविवारप्रमाणेच परिस्थिती राहील, अशी शक्यता वर्तविण्यात आली. मात्र, सोमवारी सकाळपासून पावसाचा जोर मंदावला होता. दुपारी काही काळ पावसाने विश्रांती घेतली. जुने नाशिक भागातील महापुराची परिस्थिती नियंत्रणात आली असली, तरी तेथील जनजीवन अद्यापही विस्कळीत आहे. नदीकाठावरील रहिवाशांच्या घरातील सर्व वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. गोदावरी नदीची धोकादायक पातळी अजूनही कायम असल्याने काही रहिवाशांना निवासी शेडमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे शासकीय रोपवाटिकेतील लाखो रोपांचे नुकसान झाले आहे. तसेच शहरातील अनेक भागांत रविवारपासून विजेचा खोळंबा झाला आहे. ठप्प झालेल्या बाजारपेठा सोमवारी पुन्हा सुरू झाल्या.

- -

साथीच्या आजारांशी लढा

सततच्या पावसामुळे सर्दी, ताप आणि खोकल्याच्या रुग्णांत वाढ झाली असून, साथीच्या आजारांची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच जुने नाशिक भागात चिखलामुळे आणि महापुराच्या पाण्यामुळे चिखल्या झालेल्या रुग्णांत वाढ झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images