Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

धोक्याची ओलांडली पातळी

$
0
0

- जिल्ह्यात आठ तासांत ४१५ मि. मी. पाऊस

- त्र्यंबकमध्ये अतिवृष्टी, १७१ मि. मी. पावसाची नोंद

- गोदाघाटावरील मारुतीची मूर्ती पाण्याखाली

- जिल्ह्यातील दहा धरणांमधून सोडले पाणी

- सायखेडा नदीपात्रावरील पूल वाहतुकीस बंद

- हरणबारी धरण ओव्हर फ्लो

- वैतरणाला पूर, गावांना पाण्याचा वेढा

- दारणालाही पूर, शेती पाण्याखाली

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मध्यम आणि जोरदार सरींसह धुवाधार बरसणाऱ्या पावसामुळे गोदेसह तिच्या उपनद्यांनाही शनिवारी (दि. ३) पूर आला. होळकर पुलाखालून २० हजार ३७५ क्युसेक एवढ्या विक्रमी वेगाने पाणी सोडल्याने गोदेच्या प्रवाहाने धोक्याची पातळीही ओलांडली. यामुळे गोदाघाटावरील मारुतीच्या मूर्तीसह अनेक मंदिरं पाण्याखाली गेली. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार फटकेबाजी केल्याने यंदा प्रथमच तब्बल १० धरणांमधून एकाचवेळी पाणी सोडण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली. त्यावेळी नद्यांमधील पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली. जिल्ह्यात आठ तासांत ४१५ मि. मी. पावसाची नोंद झाली.

गेल्या आठ-दहा दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शनिवारी मध्यरात्री आणि पुन्हा रविवारी दिवसभर पावसाने शहरासह पाणलोट क्षेत्रात जोरदार फटकेबाजी केल्याने धरणांमधील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली. यामुळे या हंगामात पहिल्यांदाच गंगापूर, दारणासह गौतमी गोदावरी, आळंदी, भावली, वालदेवी, पालखेड, चणकापूर, पुनद, हरणबारी या १० धरणांमधून एकाचवेळी पाणी सोडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. गंगापूरमधून १७ हजार ७४८ क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आल्याने गोदावरी नदीपात्रातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे दुपारीच पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. दुपारी चार वाजता होळकर पुलाखालील पाण्याने १९,०८७ हजार क्युसेकहून अधिक वेगाने पाणी सोडण्यात आल्याने पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे गोदाघाटावरील सर्व मंदिरं पाण्याखाली गेली. पुराचे संकेत देणाऱ्या मारुतीची मूर्ती दुपारी चारच्या सुमारास पाण्याखाली गेली. गोदावरी, दारणासह नंदिनी, वाघाडी यांसारख्या उपनद्यांमधील पाण्याची पातळी वाढल्याने उपनगरांमध्येही पाणी साचण्याची भीती व्यक्त होऊ लागली. गोदावरी आणि दारणामधील पाण्याचा प्रवाह पुढे जावा, यासाठी नांदूरमध्यमेश्वर धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले. सायंकाळी येथून ८३ हजार ७७३ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू होता. यामुळे जायकवाडीतील पाणीपातळीतही लक्षणीय वाढ झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

....

धरणांवर जाण्याचे रस्ते बंद

इगतपुरी तालुक्यातील सर्व धरणांमधील पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे धरणांकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिले. दारणा आणि भावली धरणाकडील रस्ते सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

....

त्र्यंबक, इगतपुरी, पेठ, सुरगाण्यात धुवाधार

जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठपर्यंत ६७९ मि. मी. पावसाची नोंद झाली. इगतपुरीत सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत २२१ मि. मी. पाऊस झाला. त्र्यंबकेश्वरमध्ये १६४ मि. मी., पेठमध्ये ११३ मि. मी., तर सुरगाण्यात १०३ मि. मी. पावसाची नोंद झाली. शनिवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहिला. सकाळी आठ ते दुपारी चार अशा आठ तासांत ४१५ मि. मी. पाऊस झाला. त्र्यंबकेश्वरमध्ये अतिवृष्टी झाली असून, १७१ मि. मी. पावसाची नोंद झाली. तुलनेने इगतपुरीत पावसाचा जोर ओसरला. तालुक्यात ४० मि. मी. पाऊस नोंदविला गेला. पेठमध्ये ७६, तर सुरगाण्यात ७१ मि.मी. पावसाची नोंद झाली.

..

शहरात १५ मि. मी. पाऊस

नाशिक तालुक्यात शनिवारी दिवसभरात २१ मि. मी. पावसाची नोंद झाली. शहरातही १५ मि. मी. पाऊस नोंदविण्यात आल्याची माहिती हवामान विभागाने दिली. दरम्यान, शनिवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांमध्ये ३२.९ मि. मी. पाऊस झाला. म्हणजेच शुक्रवारी सकाळी साडेआठपासून शनिवारी दुपारी चारपर्यंत शहरात ४८ मि. मी. पाऊस नोंदविला गेला.

...

ठिकठिकाणी तळी

पावसामुळे शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. अहिल्यादेवी होळकर पूल, रामकुंड, कन्नमवार पूल, सोमेश्वर, तपोवन परिसरात पूर पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत होते. सायखेड्यासह नदीपात्रावरील काही पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. बघ्यांच्या गर्दीमुळे रविवारी कारंजा, अशोक स्तंभ, मालेगाव स्टँडपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.

...

शनिवारी जिल्ह्यात झालेला पाऊस

तालुका पाऊस (सकाळी ८.३० पर्यंत) (सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत)

इगतपुरी २२१ ४०

पेठ ११३.१ ७६

त्र्यंबकेश्वर १६४ १७१

सुरगाणा १०३.३ ७१

देवळा ०० ००

कळवण ३२ १.०

नाशिक ५१ २१.१

दिंडोरी २१ ३१

सिन्नर ९ ००

निफाड २.३ -

मालेगाव ०.० -

चांदवड ५.० २.०

येवला २.० ००

बागलाण ६.० २.०

नांदगाव ०.० ००

एकूण ६७९ ४१५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चाकणकर यांचा दौरा

$
0
0

चाकणकर यांचा दौरा

नाशिक : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर या रविवारी (दि. ४) नाशिक येथे येणार आहेत. राष्ट्रवादी भवन येथे दुपारी १२ वाजता त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम होणार आहे. चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्या पहिल्यांदा नाशिकमध्ये येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक: पूर पाहणाऱ्यांचा ‘महापूर’!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदावरीला आलेले पुराचे पाणी पाहण्यासाठी चारचाकी व दुचाकी घेऊन आलेल्या हजारो सेल्फी इच्छुक नागरिकांमुळे पंचवटी भागात वाहतुकीची पुरती दैना उडाली. सकाळपासून सुरू झालेल्या वाहतूक कोंडीचा संध्याकाळच्या बोऱ्या वाजला. संध्याकाळी परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरला. मात्र, तोपर्यंत सरळमार्गी जाणाऱ्या वाहनचालकांना मनस्तापास सामोरे जावे लागले.

यंदा पावसाळ्यात प्रथमच नदीला पूर आला. गंगापूर धरणाच्या पाटलोट क्षेत्रात झालेल्या धुवाधार पावसामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. शनिवारीसुद्धा पावसाची संततधार सुरू असल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग हळूहळू वाढविण्यात आला. प्रशासनाकडून येत असलेल्या सूचना आणि पाण्याच्या विसर्गाची स्थिती सोशल मीडियाद्वारे सर्वांपर्यंत पोहचली. पुराचे पाणी पाहण्यासाठी दुपारपासूनच नागरिकांचा ओघ गोदाघाटाकडे वळला. दुपारी रामसेतू पुलाच्या खाली पाणी होते. त्यामुळे सेल्फी इच्छुक नागरिकांनी आपला मोर्चा रामसेतूकडे वळविला. हळूहळू पाण्याचा जोर वाढल्याने रामसेतू पूल पाण्याखाली गेला. यानंतर नागरिकांची गर्दी गाडगे महाराज पुलाकडे वळली. तोपर्यंत पुराचे पाणी रामकुंडातून बाहेर पडून बुधवार बाजार आणि नंतर गणेशवाडी मार्केट असे पसरले. सेल्फी, फोटो घेण्यासाठी अनेक वाहनचालक चारचाकी तसेच दुचाकी घेऊनच पुलावर थांबले होते. त्यामुळे पाठीमागे दहीपूल, भद्रकाली, सराफ बाजार, मेनरोड अशी वाहनांची व नागरिकांची गर्दी वाढत गेली. पोलिसच नसल्याने जिथे शक्य तिथे वाहन पार्क करून नागरिक पुलापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत होते. सरदार चौक, गणेशवाडी रस्ता, टाळकुटेश्वर मंदिर रस्ता, अमरधाम पूल तसेच या परिसरात हीच परिस्थिती होती. पंचवटी पोलिसांचे एक पथक तेथे आले होते. मात्र, त्यांनी फारशी हालचाल केली नाही. दुसरीकडे आहिल्यादेवी होळकर पुलावर दुपारपर्यंत वाहतूक काहीशी सुरळीत होती. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, रविवारी सुद्धा पाऊस कायम राहणार असल्याचे भाकित वेध शाळेने वर्तवले आहे. पूर कायम राहिला किंवा त्यात वाढ झाली तर रविवारी सुटी असल्याने पूर पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढू शकते.

गाडगे महाराज पुलावर बॅरिकेडिंग

रविवार कारंजा भागात वाहनांची पार्किंग वाढत गेली. त्याचा ताण पुलावरील वाहतुकीवर झाला. यामुळे संध्याकाळच्या सुमारास येथे नागरिकांसह वाहनांचीसुद्धा कोंडी झाली. सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी या पुलाच्या दोन्ही बाजूस बॅरकेडिंग केले. यामुळे एका बाजूची वाहने थांबवून दुसऱ्या बाजूने वाहने सोडण्यात आली. पुलाच्या कठड्यावर थांबलेल्या पोलिसांनी पुलावरून पूर पाहणाऱ्या नागरिकांना बाजूला करण्याचे प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरपाईबाबत शेतकऱ्यांची थट्टा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड वावी आणि गोरठाण (ता. निफाड) येथे झालेल्या सुखोई विमान दुर्घटनेला १३ महिने उलटून गेले तरीही शेतकऱ्यांना एचएएल प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही. शनिवारी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात भरपाईबाबत झालेल्या बैठकीत एचएएलने आणलेल्या विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी कोट्यवधी रुपये नुकसान भरपाई देण्याचे ठरलेले असताना, एक ते दोन लाख रुपये नुकसान भरपाई देतो असे सांगून या बाधित शेतकऱ्यांची थट्टा केली. या प्रकरणात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी लक्ष घालावे, अशी मागणी या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे . सुखोई विमान दुर्घटनेत वावी आणि गोरठाण येथील शेतकऱ्यांच्या द्राक्ष व डाळिंब बागा, तसेच शेतात उभी असलेली काकडी, मिरची अशी नगदी पिके उद्ध्वस्त झाली. घटना झाल्यानंतर या ठिकाणी जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी या सर्वांनी भेट देऊन एचएएल व्यवस्थापनाने सर्व बाधित शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, असे निर्देश दिले. शनिवारी (दि. ३) जिल्हाधिकारी कार्यालयात नुकसान भरपाईबाबत बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, एचएएलकडून विमा कपंनी प्रतिनिधी चंद्रकांत के, विठ्ठल बनसोडे व शेतकरी सचिन निफाडे, विलास निकम आदी उपस्थित होते. एचएएलच्या वतीने विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी एक ते दोन लाख रुपये नुकसान असणाऱ्या शेतकऱ्यांना २५ ते ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आणि डाळिंब बाग उद्ध्वस्त झालेल्या विलास निकम यांना ६ कोटी ४० लाख नुकसान भरपाईऐवजी दोन लाख, तर द्राक्षबाग असणाऱ्या सचिन निफाडे यांना आणि योगेश ढोमसे यांना चार कोटी नुकसान भरपाई ठरलेली असताना एक लाख रुपये देणार असल्याचे सांगितले. यामुळे या बैठकीला आलेल्या शेतकऱ्यांना रडावं की हसावं असे झाले. एचएएल करीत असलेल्या चेष्टेबद्दल संताप व्यक्त केला. दरम्यान, शेतकऱ्यांना कृषी खात्याने सांगितलेली भरपाई द्यावी लागेल, असे खडे बोल जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधींना सुनावले. याबाबत पुन्हा बैठक होणार आहे.  विमा कंपनीकडून नुकसानीच्या एकपटही भरपाई दिली जात नाही. आमचे वार्षिक उत्पन्न आणि रोजगार बंद झाल्याने कुटुंबाचा आर्थिक भार कसा वाहायचा हा प्रश्न आहे. यावर एचएएलने आता थट्टा बंद करून कृषी विभागाने सांगितलेली नुकसान भरपाई त्वरित द्यावी. - विलास निकम, शेतकरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायखेडा, चांदोरीला धोका!

$
0
0

म. टा. खास. प्रतिनिधी, नाशिक

गोदावरीच्या पुराच्या पाण्याची पातळी वाढल्याने सायखेडा व चांदोरीला पाण्याचा वेढा बसण्याचा धोका वाढला आहे. रात्री उशिरापर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता. निफाड तालुक्यातील सायखेडा येथील गोदावरी नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने येथील पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय सायखेडा पोलिसांनी दुपारी चार वाजता घेतला. सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी ही माहिती दिली. यामुळे पुलावरून नियमितपणे होणारी वाहतूक विस्कळीत झाली. इगतपुरी तालुक्यात शेणीत आणि धरणोली येथील पूल पाण्याखाली गेले.

...

६५ कुटुंबे केले स्थलांतरीत

सायखेड्यातील गंगानगर परिसरातील ४५ कुटुंबे सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली. चांदोरीतील कोळीवाडा येथून २० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली. कोठुरे, करंजगाव दरम्यान फरशीवरील पुलावर पाणी असल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. बागलाण तालुक्यात मोसम आणि गिरणा नदीमधील पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

...

पेठमध्ये १२ घरांची पडझड

वाघेरे हरसूल येथे दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाल्याची माहिती तहसीलदार दीपक गिरासे यांनी दिली. दरडीचा कोसळलेला भाग बाजूला करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करून देण्यात आला. पेठ तालुक्यात उंब्रद ते बोंदारमाळ या गावांदरम्यानच्या पुलाचे कठडे तुटले. त्यामुळे रस्ता पूर्णपणे उखडला. पेठ तहसीलदार हरिष सोनार यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये संबंधित उपअभियंत्यांना नोटीस बजावली आहे. दरम्यान, अंशत: घरे पडल्याच्या १० ते १२ घटना पेठ तालुक्यात घडल्या आहेत.

...

आपत्ती व्यवस्थापनचे आवाहन

गोदाघाटावर पूरस्थिती निर्माण झाल्याने आपत्ती व्यवस्थापने प्राधिकरणाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. नदीकाठी, पुलांवर गर्दी करू नये तसेच पूर पाहण्यासाठी घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांच्याकडून करण्यात आले.

......

टप्प्याटप्प्याने वाढविलेला विसर्ग (क्युसेकमध्ये)

गंगापूर

सकाळी ७ : ७,८३०

सकाळी ८ : ८,९७३

सकाळी ९ : ११,३५८

सकाळी ११ : १३,०२३

दुपारी २ : १३,०२३

...

दारणा

पहाटे ४ : १६,६८८

सकाळी ७ : १९,००२

सकाळी ११ : २३,१९२

दुपारी २ : २३,१९२

सायंकाळी ६ : २३,१९२

-

भावली

सकाळी ७ : ९४८

दुपारी २ : १,५०९

-

आळंदी

सकाळी ७ : ६५१

दुपारी २ : ६८७

-

पालखेड

दुपारी १२ : २,२८३

दुपारी १ : ५,३०७

दुपारी २ : ६,०६८

सायंकाळी ६ : ६,०६८

-

वालदेवी

दुपारी २ : ५०२

-

नांदूरमध्यमेश्वर येथून होणारा विसर्ग

सकाळी ९ : ४७,०६६

दुपारी १२ : ६३,०६०

दुपारी १ : ८३,७७३

सायंकाळी ६ : ८३,७७३

-

होळकर ब्रीज

सकाळी ७ - १२,३००

सकाळी ९ - १२,३००

सकाळी १० - १३,८०५

दुपारी १२ - १३,८०५

दुपारी १ - १४,९७१

दुपारी २ -१४,९७१

दुपारी ३ : १६,९८४

रात्री ८ : २१,२५४

-

चणकापूर

दुपारी २ : ७,३०७

-

पुनद

दुपारी २ : २,८९५

-

हरणबारी

दुपारी २ : ५६

-

गौतमी

सायंकाळी ६ : ६,२२५

काश्यपी : ८४४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील सहा धरणे ओव्हरफ्लो

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यावर मेहेरबान झालेल्या पावसाने रित्या धरणांनाही वरदान दिले असून, शनिवारी गौतमी गोदावरी, भोजापूर आणि हरणबारी धरणेही ओव्हरफ्लो झाली. या पावसामुळे जिल्ह्यातील एकूण धरणांमधील पाणीपातळी ६० टक्क्यांच्या पुढे गेली आहे. यापूर्वी आळंदी, भावली, वालदेवी ही धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत.

-

धरणनिहाय पाणीसाठा

धरण पाणीसाठा (टक्केवारी)

गंगापूर ८७

दारणा ८८

भावली १००

कश्यपी ८४

गौतमी १००

आळंदी १००

मुकणे ६४

वालदेवी १००

कडवा ८९

पालखेड ६८

ओझरखेड १८

वाघाड ८१

हरणबारी १००

गिरणा ११

करंजवण ६२

पुणेगाव ६४

तिसगाव ००

नागासाक्या ००

केळझर ५१

पुनद ६२

माणिकपुंज ००

एकूण ६०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात कोसळ'धार', अनेक जिल्ह्यांत पूर परिस्थिती

$
0
0


गोदावरी धोक्याच्या पातळीवर; राज्यात तीन तरुणींसह पाच जणांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्याची स्थिती

- सायखेडा पूल वाहतुकीसाठी बंद

- इगतपुरी तालुक्यात शेणीत आणि धरणोली येथील पूलही पाण्याखाली

- सायखेडा, चांदोरी परिसरातील ६५ कुटुंबे स्थलांतरित

- पेठमध्ये १२ घरांची पडझड

राज्यातील स्थिती

- खेड तालुक्यातील चासकमान, भामा आसखेड आणि कळमोडी ही तिन्ही धरणे पूर्ण भरली आहेत.

- पनवेलमध्ये तीन तरुणी, तर मराठवाड्यात दोन जण बुडाले.

- महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीमसी असून, शनिवारी धरणात ९०.४६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

- कोल्हापूर जिल्ह्यातील ८४ बंधारे पाण्याखाली; महापुराचा धोका

टीम मटा

नाशिकसह राज्यभरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात या हंगामात पहिल्यांदाच तब्बल ११ धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे. मध्यरात्रीपासून हा विसर्ग सुरू होता. यामुळे जायकवाडीत पाण्याचा ओघ वाढला आहे. सायखेड्यातील गंगानगर परिसरातील ४५, तर चांदोरीतील कोळीवाडा येथून २० कुटुंबे हलविण्यात आली, पेठ तालुक्यात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली, तर १२ घरांची पडझड झाली आहे. मराठवाड्यात नांदेड, हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दोन जण वाहून गेले, तर पनवेलमध्ये पांडवकडा परिसरात तीन तरुणी वाहून गेल्या. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, पुण्यात मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे, तर तळकोकणात अनेक अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गोदावरीला पूर आला असून, जिल्ह्यातील ११ धरणांतून प्रथमच पाणी सोडण्यात येत आहे. भाम, भोजापूर, गौतमी धरणे १०० टक्के भरली असून, गंगापूरसह आळंदीतून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. नाशिक शहरात दुपारी दीड वाजता रामसेतू पूल पाण्याखाली गेले आहे, तर गोदाघाटावरी अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. पुराचे परिमाण म्हणून गणला गेलेला दुतोंड्या मारुती शनिवारी दुपारी चार वाजता पाण्याखाली गेला.

रत्नागिरी : तळकोकणात मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. मुख्यत्वे समुद्रकिनारा व खाडीलगतची दुकाने व घरांमध्ये कंबरेइतके पाणी भरल्याने प्रचंड नुकसान झाले. अनेक ठिकाणी बंधारे फुटल्यामुळे सखल भागातील शेतीला मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे आर्थिक हानी प्रचंड झाली आहे.

मुंबई-गोवा महामार्ग १० तास बंद

खेड : सातत्याने कोसळणारा पाऊस व त्यामुळे निर्माण झालेली पूरस्थिती यांमुळे शनिवारी मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांचे अतोनात हाल झाले. पोलादपूर येथे दरड कोसळल्याने व कशेडी घाटात रस्ता खचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला, तर खेड येथे जगबुडी नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने महामार्गावरील वाहतूक सुमारे १० तास बंद होती.

जायकवाडीत पाण्याचा ओघ

औरंगाबाद : नाशिक जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून, जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली आहे. ऊर्ध्व भागातील धरणातून ३९ हजार ३५८ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. जायकवाडीत सध्या जिवंत पाणीसाठा २२१.१५६ दलघमी आहे. नांदूरमध्यमेश्वर (८३,७७३ क्युसेक्स), नागमठाण (४३,५००), दारणा (२३,१९२), गंगापूर (१७,७४८), कडवा (७,७५६), ओझर वेअर (४५७), पालखेड (६०६८), वालदेवी (५०२), भावली (१५०९) प्रकल्पातून विसर्ग सोडण्यात आला आहे. सध्या ३९ हजार ३५८ क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे. त्यात वाढ होण्याची शक्यता असल्याचे कडा प्रशासनाने सांगितले.

कोल्हापुरात शेती पाण्याखाली

कोल्हापूर : संततधारेमुळे राधानगरीसह जिल्ह्यातील बुहतांश धरणे व लघु पाटबंधारे प्रकल्प ओसंडून वाहू लागले आहेत. नद्या पात्राबाहेर वाहू लागल्याने जिल्ह्यातील ८४ बंधारे, तर हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. महापुराचा धोका वाढल्याने जिल्ह्यातील ५४ कुटुंबांतील २१० व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले.

नांदेड, हिंगोलीमध्ये अतिवृष्टी

औरंगाबाद : नांदेड, हिंगोली जिल्ह्याच्या काही भागात अतिवृष्टीची नोंद झाली असून, दोन जण वाहून गेल्याचे वृत्त आहे. परभणी, लातूर, जालना जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. मराठवाडा-विदर्भाच्या सीमेवर पैनगंगा नदीवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा मुसळधार पावसामुळे भरभरून वाहत आहे. मराठवाड्यातील या पट्ट्यात दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकात पावसाचा कहर; शाळांना उद्या सुट्टी जाहीर

$
0
0

नाशिक: नाशिक शहर आणि ग्रामीण भागात मुसळधार पावसाने कहर केला असून गोदावरी नदीलाही पूर आला आहे. संततधार पावसामुळे नाशिकमधील जनजीवन विस्कळीत झाले असून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

नाशिकमध्ये आज दिवसभर पावसाचा जोर कायम असून, सर्वच रस्ते जलमय झाले आहेत. पावसामुळे नाशितक-मुंबई आणि नाशिक-औरंगाबाद मार्गांवर वाहनांचो खोळबा झाला आहे. त्याच प्रमाणे नाशिक-त्र्यंबक आणि नाशिक-पेठ मार्गांवरही वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.

नाशिकमध्ये आतापर्यंत विक्रमी पावसाची नोंद

नाशिकमध्ये आतापर्यंत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. नाशकात गेल्या २४ तासांमध्ये ११८९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच त्र्यंबकेश्वरला ३१५, तर इगतपुरीत २२० मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

नाशिकमधील प्रसिद्ध नवश्या गणपती मंदिरातही पाणी शिरले असून नवश्या गणपतीची मूर्तीही बुडाली आहे.

सोमेश्वर, त्रंबकेश्वर, गंगापूर परिसरसह दुगारवाडी, भावली धबधबा, पहिने, पेगलवाडी नेकलेस धबधबा या ठिकाणी पर्यटनाला बंदी.

गोदावरी नदीला पूर आला असून नासर्डी नदीनेह धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदी काठावरील नागरिकांना धोक्याचा इशारा इशारा देण्यात आला असून नागरिकांना बाहेर न पडण्याचे पालिकेने आवाहन केले आहे.

पूर पाहण्यास गर्दी केल्यास गुन्हे दाखल होणार

दरम्यान, नाशिकमध्ये गोदावरी नदीला आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी जमा होणे सुरू झाल्यानंतर प्रशासनाने याची गंभीरपणे दखल घेतली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. शिवाय पूर पाहण्यास गर्दी केल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशाराही प्रशासनाने नागरिकांना दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकमध्ये आठ तासांत १०४ मिमी पाऊस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरासह तालुक्यामध्ये सकाळी आठ ते दुपारी चार या आठ तासांमध्ये तब्बल १०४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. याच काळात नाशिक जिल्ह्यामध्ये ११३९ मिमी पाऊस झाला असून, सर्वाधिक पाऊस त्र्यंबकेश्वरमध्ये १९९ मिमी, तर त्याखालोखाल इगतपुरीत १८९ मिमी पावसाची नोंद आहे.

गेल्या आठवडाभरापासून मुक्काम ठोकलेल्या पावसाने शनिवारी रात्री आणि रविवारी दिवसभरात मुक्काम ठोकला. इगतपुरी, त्र्यंबक, नाशिक आणि पेठ या भागात असलेला पाऊस रविवारी जिल्ह्यात सर्वदूर बरसला. त्यामुळेच रविवारी सकाळी ८ ते दुपारी ४ या अवघ्या आठ तासांत जिल्ह्यामध्ये ११३९.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्र्यंबकेश्वरमध्ये १९९, इगतपुरीत १८९, पेठमध्ये १८७, दिंडोरीत १३१, नाशिकमध्ये १०४, सुरगाण्यात ८०.१, कळवण ४६, बागलाण २९, मालेगाव १६, नांदगाव ९, येवला २४, देवळा ५, चांदवड २७, सिन्नर ६७ आणि निफाड तालुक्यात २६.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळेच गोदावरीसह तिच्या सर्व उपनद्यांना पूर आला होता.

जुलैत सर्वाधिक नोंद

नाशिक शहरात २००४ पासून आतापर्यंत जुलै महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद यंदा झाली आहे. या वर्षी जुलैत तब्बल ४९७ मिलीमीटर पाऊस पडला आहे. यापूर्वी २०१६ मध्ये जुलै महिन्यात ४८१ मिलीमीटर पाऊस झाला होता. तर, २०१७ मध्ये २८४ मिलीमीटर पावसाची नोंद आहे. तर, इतर वर्षी दीडशे ते सव्वा तीनशे मिलीमीटर पावसाची नोंद आहे. त्यामुळे या वर्षी जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस झाल्याचे स्पष्ट होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२००८पेक्षा अधिक विसर्ग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर धरणातून २००८ साली ४२ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले होते. काल, रविवारी दुपारी ३ पर्यंत ते ४२ हजार ४८६ क्सुसेक या वेगाने पाणी सोडण्यात आले. २००८ साली होळकर पुलाखालून ७४ हजार ४८० क्युसेक वेगाने पाणी वाहत होते, यावेळी ८१ हजार ९२६ क्युसेक वेगाने धावत होते.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने गंगापूर धरणाचे सर्व १२ दरवाजे ११ फुटांपर्यंत उघडण्यात आले आहेत. पाणी पातळी वाढत गेली, तसतसे हे दरवाजे उघडण्यात आले. धरणातून येणारे, पावसाचे व शहरातील पाण्यामुळे होळकर पुलाखालील पाण्याचा वेग वाढला. नांदूरमध्यमेश्वर धरणात गंगापूर धरण समूह, पालखेड धरण समूह व दारणा नदीतून पाणी येते. त्यानंतर हे पाणी जायकवाडी धरणासाठी सोडण्यात येते. गेल्या काही दिवसांत दर तीन तासांत एक टीएमसी पाणी सोडण्यात आले. दारणा धरणातून ४५ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले, तर भावलीतून २१५२, आळंदी व कश्यपी धरणातून १० हजार, पालखेड धरणातून ५७ हजार ७०६, वाघाड ९८९६, पुणेगाव ४१३१, गौतमी गोदावरीतून १५ हजार ४८६ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. नांदूरमध्यमेश्वरचा विसर्गाचा २०१६ साली २ लाख ८४ हजार क्युसेक वेगाचा विक्रम होता. तो मात्र अद्याप तुटला नाही. रविवारी १ लाख ८० हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५१५ जणांना सुरक्षित स्थळी हलवले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा आपत्ती विभागाने रविवारी तब्बल २५१५ जणांना सुरक्षित स्थळी हलवले. या सर्वांची निवास व भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. सकाळी महापुराची स्थिती निर्माण झाल्यानंतर नाशिक, चांदोरी व सायखेडा येथे आपत्ती व्यवस्थापन व एनडीआरएफच्या टीमने आपले काम सुरू केले. या टीममध्ये ३२ सदस्य असून, हे बचाव कार्यासाठी सायखेडा येथे गेले आहेत.

या टीमने निफाड तालुक्यातील सायखेडा गावातील ८१२, चांदोरी गावातून ७९७, ओझर येथून २१५, सुकेणे दिघी येथून १४१, चाटोरीतून १६२ जणांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. नाशिकच्या रोकडोबावाडी येथून २५० जणांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले. त्याचप्रमाणे जुने नाशिकमधून मांडवगणे वाडा, सराफ बाजार येथून एकाच कुटुंबातील ६ व्यक्तींना भोसला अॅडव्हेंचरच्या पथकाने सुरक्षित स्थळी नेले. आपत्ती व्यवस्थापन पथकाने कपालेश्वर, गणेशवाडी येथून सहा व्यक्तींना बाहेर काढले. आपत्ती व्यवस्थापनाने नागरिकांच्या सुरक्षितेसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष तयार केला असून, तो २४ तास सुरू आहे. येथे नागरिकांनी सूचना कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूर पर्यटन करू नका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नागरिकांनी रस्त्यांवर पुराचे पाणी पाहण्यासाठी व सेल्फी काढण्यासाठी घराबाहेर न पडता सतर्क राहावे. पूर परिस्थितीचे पर्यटन करू नये, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित केलेल्या पूर परिस्थिती आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, आमदार बाळासाहेब सानप, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. छेरींग दोरजे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, मेजर किशोरसिंग शेखावत, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, सर्व तहसीलदार व संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

महाजन म्हणाले, पूर परिस्थितीमध्ये कोणतीही जीवितहानी होणार नाही, यासाठी प्रशासनामार्फत पूर्वतयारी करण्यात आली आहे. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे. सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या मुख्यालयी हजर राहावे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पूर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सोमवारी ५ ऑगस्ट रोजी शहरी व ग्रामीण भागातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रशासनामार्फत एनडीआरएफ, नौका, लाइफ जॅकेट यासोबतच स्थलांतरित नागरिकांसाठी फूड पॅकेटस व आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत आहेत. ग्रामीण सुरक्षा दलामार्फत एकाच वेळेस ५ ते ६ हजार व्यक्तींपर्यंत सतर्क राहण्याचे व समाजमाध्यमाद्वारे पसरणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचा संदेश दूरध्वनी व भ्रमणध्वनीद्वारे देण्यात येत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत पर परिस्थिती लघुकृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यासोबतच पूर परिस्थिती लक्षात घेता एनडीआरएफ दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व आर्मी यांच्या समन्वयाने एअरलिफ्टींग, रेस्क्यू ऑपरेशन यासाठी आर्मीच्या ११० सैनिकांच्या दोन तुकड्या सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली.

पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त, जलसंपदा विभाग आदी विभागांनी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. बैठकीनंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शहरातील सराफ बाजार, काझीगढी, गणेशवाडी, वाल्मिकनगर या पूर प्रभावीत भागासोबतच चांदोरी व सायखेडा या गावातील पूर परिस्थितीची पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडला संततधार मटा वृत्तसेवा मनमाडमनमाड शहर परिसरात रविवारी सकाळपासून संततधार पाऊस सुरू असल्य

$
0
0

मनमाड : मनमाड शहर परिसरात रविवारी सकाळपासून संततधार पाऊस सुरू असल्याने आठवडे बाजारावर परिणाम झाला. संततधार पाऊस, बाजारात सर्वत्र चिखल असल्याने भाजी विक्रेत्यांना शेतीमाल व्यवस्थित ठेवणेही अवघड झाले. गेल्या काही दिवसांत मनमाड शहर परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात पाणी आले आहे. पाऊस हलक्या स्वरूपाचा असल्याने पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढलेली नाही. मनमाडच्या नद्या देखील अद्याप कोरड्या असून, रेल्वे बंधाऱ्याला मात्र काही प्रमाणात पाणी आले आहे. नांदगावमध्ये रविवारी श्रावणसरी बरसल्या. सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू होता. दुपारी काही काळ पावसाने विश्रांती घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहादा, तळोद्याला झोडपले

$
0
0

खर्डी नदीला पूर; अनेक कुटुंबांचे पुनर्वसन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदा शहरासह तालुक्यात शनिवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे सर्वत्र पूरजन्य स्थिती आहे. रविवारी दुपारनंतर खर्डी नदीला आलेला पूर कमी झाल्यानंतर शहरातले पाणी हळूहळू कमी होऊ लागले. शहादा, तळोदा शहरात कॉलेज रस्ता विद्यानगरी प्रमुख बाजारपेठ, भाजीबाजार, धान्य व्यापारी मार्केट, नवीन वसाहती व विविध सखल भागात पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.

शनिवारी रात्री बारा वाजेनंतर परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. सातपुडा भागात देखील अतिवृष्टी सारखी परिस्थिती झाल्याने सातपुडाकडून वाहणाऱ्या सर्वच नदी नाले पूरपाण्याने दुधडी भरून वाहू लागले. खर्डी नदीला लागून असलेल्या मराठा चौक, अण्णाभाऊ साठेनगर, कालिका माता मंदिर परिसर, रामदेवबाबा मंदिर परिसरातील भरवाड वसाहतीत व खर्डी नदीच्या काठावरील काही घरांत पाणी शिरून संसारोपयोगी साहित्य व घराचे नुकसान झाले.

तळोदा तालुक्यातील मोड, बोरद, तळवे, भवर व दलेलपूर याभागात देखील जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. नदी-नाले भरून वाहत आहे. तळोदे शहराचे नगराध्यक्ष अजय परदेशी, पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण, मुख्याधिकारी सपना वसावा, गौरव वाणी, सुभाष चोधरी, जालंदर भोई यांनी शहरात ठिकठिकाणी पाहणी केली. तहसीलदार पंकज लोखंडे यांनी ग्रामीण भागात ज्या-ज्या ठिकाणी पुराचे पाणी शिरले आहे.

खाकीची माणुसकी

जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने खर्डी नदीला २००६ नंतर मोठा पूर आला. किनाऱ्यालगत असणाऱ्या चौधरी कुटुंबातील वृद्धास पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी स्वतः खांद्यावर उचलून पुराच्या पाण्यातून बाहेर काढले. महिलेस गृहरक्षक दलाचे नितीन ठाकरे व तरुणांनी बाहेर काढले

विश्रामगृह परिसरातील भिंती तोडल्या

विद्यानगरी परिसरात सर्वत्र दोन ते तीन फूट पाणी साचल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले. पूर पाण्याला बाहेर पडण्यासाठी जागाच नसल्याने नाईलाजाने दखल घेत विश्रामगृह परिसरातील व विद्यानगरी परिसरातील दोन ते तीन ठिकाणी भिंत जेसीबी मशीनद्वारे पाडण्यात आली. यामुळे पुराच्या पाण्याचा निचरा होण्यास मदत झाली आहे.

लाखोंचे नुकसान

शहादा-तळोदा शहरातील कॉलेज रस्ता प्रमुख बाजारपेठ या भागात पुराचे पाणी शिरले. प्रमुख बाजारपेठ असून विविध साहित्य या दुकानात ठेवलेले असते. मात्र पुराचे पाणी शिरल्याने या भागातील व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तालुक्यात सहा तासांत अतिवृष्टी सदृश्य स्थिती झाली. तालुक्यात सरासरी ८७ मिमी पाऊस झाला.

पुनर्वसन जलमय

सततच्या मुसहधार जिल्हातील सर्वच पुनर्वसनमध्ये पाणी शिरले आहे. शहादा तालुक्यातील पुनर्वसन वसाहतील ५ ते ६ घरांमध्ये पाणी शिरले. काथरदेदिगर पुनर्वसन वसाहतील १७ घरांमध्ये पाणी शिरले. रोझवा पुनर्वसन वसाहतीतील २५ घरांतमध्ये शिरले. मोड पुनर्वसन वसाहतील ३६ घरांमध्ये पाणी शिरले. वैजाली, रेवानगर, काथरदेदीगर, वाडी, मोड येथील प्रकल्पबाधितांच्या शेतातही पाणी शिरले आहे. पिकांचे माठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तहसीलदार पंकज लोखंडे यांनी लहान मुले व स्त्रियांना सुरक्षित स्थळी मोड शाळा येथे नेले असून त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे.

शेती पाण्याखाली

अक्कलकुवा रस्त्यावरील ५० ते ६० एकर शेती क्षेत्रात पाणी शिरल्याने तलावाचे स्वरूप आले आहे. शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे. सुटीच्या दिवस असल्याने व बऱ्याच वर्षांनी नदीला पूर आल्याने नागरिकांनी खर्डी नदी, बाजारपेठ, विद्यानगरी तापी नदीतील पाणी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील हे पूल झाले ठप्प

$
0
0

हे पूल गेले पाण्याखाली

घारपुरे घाट पूल, अशोकस्तंभ

शहीद चित्ते पूल, सावरकरनगर, गंगापूररोड

चोपडा लॉन्स, गंगापूररोड

आनंदवली पूल

नंदिनी पूल, सातपूर गाव

आयटीआय पूल, सातपूर

रामसेतू पूल, रामकुंड परिसर

गाडगे महाराज पूल, रामकुंड

सिटी सेंटर मॉलजवळील दोंदे पूल, उंटवाडी

मोरवाडी पूल, उत्तमनगर

नानेगाव पूल, भगूर

भगूर-शेणीत पूल

वडाळा गाव पूल

जानोरी पूल, ओझर विमानतळ रस्ता

अण्णा गणपती पूल, विहितगाव

(दुपारी साडेतीननंतर हे पूर्ववत झाले. मात्र, रात्री उशिराच्या पावसानंतर या पुलांची स्थिती स्पष्ट केली जाणार आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यातील प्रमुख रस्ते पाण्याखाली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हाभरातील नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. त्र्यंबकेश्वरसह इगतपुरी तालुक्यातील विक्रमी पावसामुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा हायवे, नाशिक-औरंगाबाद, नाशिक-कळवण या महामार्गांवरील वाहतुकीवर दिवसभर परिणाम झाला. सायखेडा, चांदोरी, मालेगावातील मोसम नदी येथे ग्रामीण पोलिसांनी रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतले आहे. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक आरती सिंग यांनी केले आहे.

तुफान बरसणाऱ्या पावसामुळे मुंबई-आग्रा हायवे तब्बल तीन तास बंद राहिला. मुंढेगावनजीक पुराचे पाणी थेट हायवेवर आले होते. जिल्ह्यातील या घडामोडींबाबत सिंग म्हणाल्या की, हायवेच्या एका लेनमध्ये सुरुवातीला पाणी भरले होते. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला. यानंतर एकाच मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू होती. मात्र, दुसऱ्या लेनमध्येही गुडघ्यापेक्षा अधिक पाणी आल्याने येथील वाहतूक बंद ठेवण्यात आली. तीन तासांनी पाणी कमी झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. सायखेडा-चांदोरी येथे पुराचे पाणी नागरी भागात घुसले. प्रशासनाने येथे रेस्क्यू मोहीम हाती घेतली आहे. संध्याकाळपर्यंत तब्बल दोन हजार नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आल्याची माहिती सिंग यांनी दिली. दरम्यान, हरणबारी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले असून, यामुळे मालेगावमधील मोसम नदीला पुराचा धोका निर्माण झाला आहे. येथे ५० कुटुंबाचे स्थलांतर झाले असून, रात्रीच्या सुमारास पाणी वाढू शकते. त्यामुळे तिथे पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाशिक कळवण रस्त्यावर ओझरखेड नदीपात्रातील पाणी वाढल्याने हा रस्ता काही काळ बंद झाला होता. मात्र, पाणी कमी झाल्यानंतर हा मार्ग पुन्हा सुरू झाला. दुपारच्या सुमारास काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने सांयकाळच्या सुमारास पुन्हा जोर धरला.

--

त्र्यंबकेश्वरमधील बंदोबस्त हलविला

इगतपुरीपासून मालेगावपर्यंत पूर परिस्थिती असल्याने श्रावणी सोमवारसाठी लावण्यात आलेला बंदोबस्त हलविण्यात आला आहे. श्रावणात त्र्यंबकेश्वरमध्ये लाखो भाविक हजेरी लावत असतात. मात्र, यंदा त्र्यंबकेश्वरमध्येच तीन वेळा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अद्याप पावसाचा जोर कायम असून, नागरिकांनी परिस्थितीचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक आरती सिंग यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मशानभूमी पाण्याखाली स्मशानभूमी पाण्याखाली,लाखलगा

$
0
0

स्मशानभूमी पाण्याखाली

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

गोदावरी, दारणा आणि वालदेवी या प्रमुख नद्यांना रविवारी आलेल्या पुरामुळे देवळालीगाव, वडनेर, विहीतगाव, चेहेडी, पळसे, चाडेगाव, सामनगाव, कोटमगाव, एकलहरे, लाखलगाव येथील स्मशानभूमी पाण्यात बुडाल्या. तर एकलहरे येथील सिद्धार्थ नगर आणि लाखलगाव येथील नदीकाठच्या नागरिकांच्या वस्तीत पुराचे पाणी घुसल्याने येथील नागरिकांचे मोठे हाल झाले. नागरिकांना प्रशासनाने त्वरित सुरक्षित स्थळी हलवले.

एकलहरेतील सिद्धार्थनगर झोपडपट्टीतही पाणी शिरले. येथे महानिर्मितीची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचले. ग्रामपंचायतीतर्फे जेसीबी आणून येथील पाणी जाण्यासाठी चार खोदल्याने येथील नागरिकांची सुटका झाली. गोदावरीचे पाणी एकलहरेतील अमृतेश्वर बांधाऱ्यापर्यंत आले होते. एकलहरे ओढा गावाचा संपर्कही तुटला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊस जोड

$
0
0

जिल्हाभरात वीजपुरवठा खंडित

नाशिक जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी आणि रविवारी मुसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील नद्यांना ओसंडून वाहू लागल्या. पुरामुळे महावितरणची वीजपुरवठ्याची सेवा कोलमडली. सुरक्षेच्या कारणास्तव ग्रामीण भागासह नाशिक शहरातील विविध ३३/११ केव्ही उपकेंद्रांतून निघणाऱ्या काही वाहिन्या बंद ठेवण्यात आल्याने शहरातील ३०, तर निफाड उपविभागातील नांदूरमध्यमेश्वर परिसरातील ७८ अशा एकूण १०८ रोहित्रांवरील वीजपुरवठा खंडित झाला. गोदावरी, दारणा, कादवा या नद्यांना आलेल्या मोठ्या पुराचा फटका वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामाला बसला. काही रोहित्रे पाण्यात बुडाले होते, तर नाशिकरोडमधील दत्तमंदिर येथे रोहित्रावर एक झाड कोसळले. सिन्नर फाटा येथे प्लिंथ निघाल्याने २०० केव्हीचे रोहित्र कोसळल्याची घटना घडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कबड्डीचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील कबड्डीचा दर्जा वाढविण्यासाठी पुढील काळात प्रशिक्षण समिती राज्यभर दौरा करून प्रयत्न करणार असल्याचा सूर कबड्डी प्रशिक्षण समितीच्या सभेतून उमटला. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या प्रशिक्षण समितीची पहिली सहविचार सभा रविवारी केव्हीएन नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या लोकनेते गोपीनाथराव मुंढे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात झाली.

नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जयंत जाधव यांच्या हस्ते समितीचे उद्घाटन झाले. या वेळी राज्य संघटनेचे सहसचिव मोहन गायकवाड, खजिनदार मंगल पांडे, समितीच्या प्रमुख शकुंतला खटावकर, सचिव राजू भावसार, व्यवस्थापकीय अधिकारी सचिन भोसले, प्रशांत भाबड आदी उपस्थित होते.

सहविचार सभेच्या प्रारंभी समितीच्या प्रमुख खटावकर यांनी समितीच्या कार्याबद्दल माहिती दिली. त्याचप्रमाणे समिती नियुक्त करण्यामागील हेतू कथन केला. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक शैलेजा जैन यांनी, महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खेळाडूंनी एनआयएस करावे, तसेच प्रशिक्षकाला अंतिम खेळाडू निवडण्याची पूर्णपणे मुभा असावी, अशी भूमिका माडंली. खेळाडूची निवड करताना वीस खेळाडूंची निवड न करता सातच्या पटीत करावी, म्हणजे प्रत्येक जागेसाठी त्या प्रमाणात खेळाडू निवडता येतील, असेही त्यांनी सांगितले. सिमरन गायकवाड यांनी आपल्या मनोगतात, प्रशिक्षकांसाठी तंत्रशुद्ध अभ्यासक्रम तयार करून त्यामध्ये एकसूत्रीपणा आणणे गरजेचे असल्याचे म्हटले. योगेश यादव यांनी खेळाडूंच्या आहाराकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, असे सांगितले. प्रशिक्षकांची वर्गवारी अ, ब, क या वर्गात प्रतवारी करणे व त्यासाठी अभ्यासक्रम तयार करून प्रशिक्षण वर्ग चालविणे व त्यानंतर त्यांना टप्प्याटप्प्याने क, ब, अ असा दर्जा बहाल करण्यात यावा, त्याचप्रमाणे शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण देण्यासठी संशोधन केंद्र उभे केले पाहिजे, असे मत भाबड यांनी व्यक्त केले. बजरंग परदेशी, डॉ. केतन गायकवाड, येवला तालुका क्रीडाधिकारी गीता साखरे-कांबळे, विजय मिस्कीन, आयूब खान, शरद पाटील, बाळासाहेब जाधव, कैलास भांगरे, भरत शिळीमकर, गोविंद अवचार आदी उपस्थित होते.

कबड्डीचे स्वमालकीचे मैदान असावे

समितीचे सचिव भावसार यांनी, ज्या पद्धतीने क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे स्वमालकीचे मैदान आहे, त्याचप्रमाणे राज्य संघटनेने बंदिस्त सभागृह उभे करण्याची सूचना मांडली. समितीच्या प्रमुख खटावकर यांनी राज्य संघ निवडताना निवड समितीमध्ये प्रशिक्षकालासुद्धा घेण्यात यावे, असा मुद्दा मांडला. त्यामुळे त्याला अपेक्षित असलेला खेळाडू निवडता येईल, तसेच प्रत्येक वयोगटाचा किमान एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग राबविला गेला पाहिजे, असे त्या म्हणाल्या. यापुढेही समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये दर्जात्मक प्रशिक्षक तयार केले पाहिजे. यासाठी प्रत्येक समिती सदस्यावर पुढील काळात जबाबदारी टाकली जाईल व एका जिल्ह्याचे पालकत्व दिले जाईल. आजकालची राष्ट्रीय स्तरावरची महाराष्ट्राच्या संघांची व खेळाडूंची समाधानकारक कामगिरी दिसून येत नाही ती सुधारावयाची असेल तर ऑलिम्पिक स्पर्धेप्रमाणे दीर्घकालीन उपक्रम राबविले पाहिजे, असा सूर या सभेतून उमटला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापुराचे महासंकट

$
0
0

- जिल्ह्यात ३२ तासांमध्ये २३२९ मिमी पाऊस

- त्र्यंबक, इगतपुरीत ढगफुटीसदृश स्थिती

- गोदावरीसह उपनद्यांना महापूर

- आजही अतिवृष्टीचा इशारा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यात ३२ तासांमध्ये तब्बल २३२९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्याने रविवारी ढगफुटीच अनुभवली. त्र्यंबकेश्वरमध्ये ५१४, तर इगतपुरीत ४०९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने गोदावरीसह उपनद्यांना महापूर आल्याने जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे, तर सोमवारीही अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नाशिकची पूरस्थिती आगामी काही दिवस कायम राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

काही दिवसांपासून मुक्काम ठोकून असलेल्या पावसाने गेल्या दीड दिवसात कहरच केला आहे. शनिवारी दिवसभर आणि रविवारी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत म्हणजेच ३२ तासांत नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या तीन तालुक्यांत धुवांधार पाऊस झाला आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरीत तर ढगफुटीच झाल्याचे दिसून येत आहे. या ३२ तासांमध्ये नाशिक तालुक्यात १८८.४, इगतपुरीत ४०९, त्र्यंबकेश्वरमध्ये ५१४, दिंडोरीत १९९, पेठमध्ये ३८७, निफाड ५१.८, सिन्नर ८९, चांदवड ३८, देवळा १७.४, येवला २७.४, नांदगाव ९, मालेगाव २१, बागलाण ४५, कळवण ७३ आणि सुरगाणा २६०.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये शनिवारी दिवसभरात ११३९.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती, तर रविवारी अवघ्या आठ तासांत ११८९.५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे ३२ तासात जिल्ह्यात २३९१.१ मिलिमीटर पाऊस झाल्याचे दिसून येत आहे.

आतापर्यंतचा पाऊस

जून महिन्यात हजेरी न लावलेल्या पावसाने जुलै महिन्यात जोरदार बॅटिंग केली. त्यामुळेच जुलै आणि ऑगस्टचे पहिले चार दिवस या कालावधीत जिल्ह्यामध्ये १३२८५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. ही टक्केवारी ८७ इतकी आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत केवळ ८६२१ मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचा जोर मोठा आहे.

अतिवृष्टीचा इशारा

नाशिक जिल्ह्यात सोमवारी ५ ऑगस्ट अतिवृष्टीचा इशारा, तर मंगळवार ते गुरुवार (६ ते ८ ऑगस्ट) या काळात साधारण पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या इशाऱ्याची दखल विविध सरकारी यंत्रणांनी घेतली असून, अतिवृष्टीशी निगडित आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत.

सविस्तर वृत्त... प्लस-१

दृष्टिक्षेपात पाऊस

तालुकानिहाय पाऊस

नाशिक : १८८.४, इगतपुरी : ४०९, त्र्यंबकेश्वर : ५१४, दिंडोरी : १९९, पेठ : ३८७, निफाड : ५१.८, सिन्नर : ८९, चांदवड : ३८, देवळा : १७.४, येवला : २७.४, नांदगाव : ०९, मालेगाव : २१, बागलाण : ४५, कळवण : ७३, सुरगाणा : २६०.१

(३२ तासांतील पाऊस मिलिमीटरमध्ये)

जिल्ह्यातील एकूण पाऊस

शनिवारी : ११३९.६ मिलिमीटर

रविवारी : ११८९.५ मिलिमीटर

(अवघ्या आठ तासांत)

एकूण : २३९१.१ मिलिमीटर (३२ तासांत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images