Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

दातृत्वाचे ऋण नक्कीच फेडू

$
0
0

गौतमी धोकटेचे नाशिककरांना भावनिक आवाहन

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'दहावीपर्यंत कसेबसे शिक्षण घेतले, आता पुढे कसे शिकायचे या काळजीतच असताना 'मटा हेल्पलाइन'ची जाहिरात पाहण्यात आली. मार्कशीटची झेरॉक्स 'मटा' कार्यालयात नेऊन दिली. परंतु मनात धाकधूक होती, काय करावे. या विवंचनेत असताना 'मटा'ने मला हेरले. मला २०१४ ची मटा हेल्पलाइन मिळाली आणि आज कोणतीही आर्थिक अडचण न येता मी शिकतेय. मटा थँक्स.' हे शब्द आहेत गौतमी धोकटेचे.

गौतमी म्हणते, की आम्हाला मदत मिळाली, परंतु त्या मदतीचा सदुपयोग झाला पाहिजे ही जाणीव ठेऊन पैशांची एफडी केली आणि त्या व्याजावर आज शिक्षण सुरू आहे. मला वाटते आम्ही सर्वांनी देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घेतले पाहिजे. वडील म्हणायचे तू शिक, पैशांची चिंता करू नको', परंतु मला कळत होते. दहावीनंतर माझे शिक्षण करणे त्यांच्या आवाक्याबाहेरची बाब आहे, पण ऐनवेळी 'मटा' मदतीला धावून आला आणि आज हेल्पलाइनमधून मिळालेल्या पैशांवरच माझे शिक्षण सुरळीत सुरू आहे. 'आज मनासारखे शिक्षण घेत आहे ते केवळ 'महाराष्ट्र टाइम्स'च्या माध्यमातून समाजाने केलेल्या मदतीमुळेच. 'मटा' तुम्हालाही इतरांना मदत करण्यासाठी समर्थ बनवेन, असे तिला वाटते. गौतमी काम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा करीत आहे.

वडिलांचा भाजी विकण्याचा व्यवसाय असल्याने त्यातून हवे तितके अर्थार्जन होत नाही. अशात संसाराचा गाडा चालवायचा की मुलांचे शिक्षण करायचे या द्विधा अवस्थेत असतानाच 'मटा'ने गौतमीला हुडकून काढले. 'मटा'ने मदतीची हाक दिली असता, समाजातील सत्प्रवृत्तींनी साद दिली. आज ती तिचे आवडीचे शिक्षण घेत इतरांनाही मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सप्तशृंगी हिल मॅरेथॉन ऑक्टोबरमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांमध्येही आरोग्याप्रति जागरूकता निर्माण व्हावी आणि ग्रामीण व आदिवासी भागातील तरुणांना राष्ट्रीय स्तरावर धावण्याची संधी मिळावी, या हेतूने नाशिक रनर्स संस्थेतर्फे २० ऑक्टोबर रोजी सप्तशृंगी हिल मॅरेथॉन होणार आहे. या उपक्रमाची घोषणा पर्यटन विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीन मुंडावरे, श्री सप्तशृंगी देवी संस्थानचे विश्वस्त नाना सूर्यवंशी आणि संस्थेचे अध्यक्ष नारायण वाघ यांनी शुक्रवारी केली.

थत्तेनगर येथील संस्थेच्या कार्यालयात ही पत्रकार परिषद झाली. पाच, दहा आणि २१ किलोमीटर अशा तीन टप्प्यांत ही मॅरेथॉन होणार आहे. नांदुरी गडाच्या पायथ्यापासून सकाळी ६.३० वाजता स्पर्धेला प्रारंभ होईल. नांदुरी गड ते शीतकड्यापर्यंत आणि परत पायथ्यापर्यंत हा मॅरेथॉनचा संपूर्ण मार्ग २१ किलोमीटरचा आहे. वेगवेगळ्या अंतरामुळे यात आबालवृद्धांना सहभागाची संधी मिळणार आहे. स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष असून, यापूर्वीच्या दोन्हीही मॅरेथॉनप्रमाणेच आताही उदंड प्रतिसाद लाभेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या उपक्रमात सहभागासाठी एक ऑगस्टपासून नावनोंदणी सुरू होईल. पत्रकार परिषदेप्रसंगी संस्थेचे रेस डायरेक्टर तथा आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे, सचिव महिंद्र छोरिया,नरेन अय्येर, डॉ. मनीषा रौंदळ, सुजित नायर, सुनील देव उपस्थित होते. नावनोंदणीसाठी मेट्रो ९९, येस बँक इमारत, थत्तेनगर, कॉलेजरोड किंवा साई स्पोर्ट्स, कॅनडा कॉर्नर येथे संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणवेशासाठी गुरुजी ‘कामाला’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी नवीन गणवेश मिळाले असतानाच यंदा पुन्हा गणवेश खरेदीचा बार उडविण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी महापालिका शाळांमध्ये कार्यरत असलेल्या एका शिक्षकानेच मुंबईतल्या ठेकेदाराला हाताशी धरून गुलाबी रंगाचा गणवेश विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याचे उद्योग सुरू केले आहेत.

विशेष म्हणजे या शिक्षकाच्या तालावर शिक्षण विभागातील पदाधिकारी आणि अधिकारीही सध्या नाचत असून, मुख्याध्यापकांवर हा गणवेश खरेदीसाठी दबाव टाकला जात आहे. त्यामुळे गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही गणवेश खरेदी वादात सापडणार आहे. महापालिकेच्या प्राथमिक ९०, तर माध्यमिक १० अशा शंभर शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या २९ हजार विद्यार्थी-विद्यार्थ्यांसाठी यंदा गणवेश खरेदी केले जाणार आहेत. गेल्या वर्षी २३ हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश दिले होते. त्यासाठी प्रतिविद्यार्थी ६०० रुपयाचे अनुदान देण्यात आले होते. मुख्याध्यापक आणि शालेय व्यवस्थापन समितीमार्फत ही खरेदी प्रक्रिया राबविली होती. परंतु, त्यातही विशिष्ट नगरसेवकांनी ठेकेदारांना हाताशी धरून गणवेश खरेदी केली होती. हे गणवेश यंदाच्या जानेवारी महिन्यात विद्यार्थ्यांच्या हाती पडले होते. परंत, त्यांच्या गुणवत्तेची चौकशी सध्या सुरू असतानाच शिक्षण विभागातील पदाधिकाऱ्यांनी नवीन गणवेश खरेदीचा बार पुन्हा उडवण्याची तयारी केली आहे.

महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ या संस्थेच्या नावाखाली महापालिकेतील एका शिक्षकानेच यंदाच्या वर्षी गुलाबी रंगाचे गणवेश विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पत्नीच्या नावाने ही खरेदी प्रक्रिया राबविली जात असून, त्यासाठी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांची बैठक गुरुवारी घेण्यात येऊन त्यात एकाच ठेकेदाराकडून गणवेश खरेदी करण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे या गणवेशची गुणवत्ता तपासली नसतानाच तो खरेदीचा मोठा डाव आखला जात आहे. या खरेदीवर आणि कापडाच्या गुणवत्तेवर काही मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यांच्यावरही दबाव टाकण्यात आला आहे.

--

ठेकेदारासाठी बदलला रंग

गत शैक्षणिक वर्षात गडद निळ्या रंगाचा गणवेश वाटप करण्यात आला होता. यंदा गणवेशाचा रंग तोच कायम ठेवला असता, तर विद्यार्थ्यांना चार गणवेश वापरता आले असते. परंतु, केवळ ठेकेदाराच्या भल्यासाठी परस्पर रंग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या वेळचेच गणवेश नवे असताना आणि त्यांचा रंग निळा असताना पुन्हा गुलाबी गणवेश खरेदीच्या उद्देशावरच आता संशय निर्माण झाला आहे.

--

पदाधिकाऱ्यांची मूकसंमती

आरक्षणाखालील २३ हजार विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदीसाठी सरकारकडून एक कोटी ४० लाखांचे अनुदान महापालिकेला प्राप्त झाले आहेत. खुल्या गटातील सहा हजार विद्यार्थ्यांसाठी महापालिका ४३ लाखांचे अनुदान देणार आहे. हा निधी शालेय व्यवस्थापन समितीकडे वर्ग करण्यात येणार आहे. प्रतिविद्यार्थी सहाशे रुपये खर्च केले जाणार आहेत. महापालिका शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाच्या पत्नीच्या नावावरच ही खरेदी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे शिक्षण समितीमधील पदाधिकाऱ्यांनीही या सगळ्या प्रक्रियेला मूकसंमती दर्शविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एनबीटीच्या विद्यार्थ्यांचा उपकेंद्रात ठिय्या

$
0
0

विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुणच दिले नसल्याची तक्रार

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एनबीटी लॉ कॉलेजने २७ विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण विद्यापीठाकडे पाठविले नाहीत. यामुळे या विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात आल्याची तक्रार विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्रात करीत ठिय्या मांडला. या विद्यार्थ्यांची समस्या मार्गी लागेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशाराही यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने देण्यात आला.

अंतर्गत गुण कॉलेजकडून न देण्यात आलेले विद्यार्थी सर्व विषयांत उत्तीर्ण असूनही त्यांचे नुकसान होण्याची वेळ आल्याची तक्रार या विद्यार्थ्यांनी केली. अंतर्गत गुण भरण्यासाठी कॉलेजच्या हाती ४५ दिवसांचा अवधी असतानाही ही ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण न करण्यात आल्याने या विद्यार्थ्यांचा निकाल रखडला आहे. यामुळे या विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनाची भेट घेतल्यानंतर मूळ समस्येवर मार्गदर्शन करण्याऐवजी ड्रेसकोड व इतर गोष्टींवर प्राचार्यांनी लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांवर सूचनांचा भडिमार केल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. मूळ समस्येबाबत आश्वस्त करताना तुमचा निकाल लवकरच मिळेल असे प्राचार्यांचे विधान असले तरीही अंतर्गत गुण पाठविणाऱ्या यंत्रणेकडून हे गुण विद्यापीठास का पाठविले गेले नाहीत, याबाबत विद्यार्थ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. याशिवाय आणखी 'इव्हीडन्स' या विषयात अंतर्गत गुण न देता गैरहजर दाखविण्यात आले असल्याचीही तक्रार आहे. याप्रश्नी प्राचार्यांवर विद्यापीठाने कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अॅड. अजिंक्य गिते, तुषार दोंदे, स्वप्नील मोरे, निखिल भामरे, अजिंक्य देशपांडे, अभिजीत गवते, सिद्धेश लहानगी, संकेत मुठाळ, उत्कर्ष गांगुर्डे, आकाश सोनवणे, हर्षल कुलकर्णी, सूरज सिंह आदींनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सॅज्यूचा मारेकरी गजाआड

$
0
0

मुथूट दरोडा प्रकरणावर नव्याने पडला प्रकाश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुथूट दरोड्याची अगदी सुरुवातीपासून तयारी करणाऱ्या आकाशसिंह राजपूत या कुख्यात आरोपीच्या मुसक्या आवळण्यात शहर पोलिसांना यश मिळाले आहे. क्राइम ब्रँचच्या पथकाने तब्बल १६ दिवस बिहारमध्ये मुक्काम ठोकून आरोपीला अटक केली. सॅज्यू सॅम्युअलवर त्याने पाच गोळ्या झाडल्या होत्या. आकाशसिंगच्या अटकेमुळे या गुन्ह्यावर नव्याने प्रकाश पडला आहे.

मुथूट प्रकरणातील १२ जणांच्या टोळीपैकी आतापर्यंत तिघांना अटक झाली आहे. आकाशसिंह हा तिसरा आरोपी ठरला असून, कोर्टाने त्याला १२ दिवसांची कोठडी सुनावली आहे. आकाशसिंहचा भाऊ जितेंद्रसिंह राजपूत आणि परमेंदरसिंह अशा दोघांना यापूर्वीच अटक झाली असून, सध्या ते दोघे नाशिकरोड जेलमध्ये आहेत. याबाबत पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले, की क्राइम ब्रँचच्या पथकाने तब्बल १६ दिवस बिहारमध्ये मुक्काम ठोकून सराईत आकाशसिंहला अटक केली. आकाशसिंह आणि त्यांच्या साथिदारांनी १४ जून रोजी उंटवाडीरोडवरील मुथूट फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर सशस्त्र दरोडा टाकला होता. नियोजनबद्ध पद्धतीने उत्तर प्रदेश तसेच बिहारमधील सराईत गुन्हेगारांनी एकत्र येऊन प्लॅन आखला होता. या गुन्ह्याचा मास्टरमाईंड सुबोधसिंह असून, सध्या तो बिहारमधील जेलमध्ये बंद आहे. सोने लुटण्याचा उद्योग तो करतो. या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर आकाश आणि सुबोध हे कायम एकमेकांच्या संपर्कात होते. त्याने पोलिस तपासात अनेक महत्त्वाच्या बाबींचा उलगडा केल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला पोलिस उपायुक्त अमोल तांबे, लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौगुले, सहायक पोलिस आयुक्त आर. आर. पाटील यांच्यासह क्राइम ब्रँचचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पहिली रेकी ऑक्टोबर २०१८ मध्ये

मुथूट दरोड्याची तयारी या गँगने ऑक्टोबर २०१८ मध्येच केली होती. सुबोधसिंह आणि मनीषसिंह यांनी आकाशसिंह आणि अमन उर्फ तिवारी यांना हाताशी धरत मुथूट कार्यालयाची रेकी केली होती. त्यानंतर मार्चमध्ये दरोडा टाकला होता. मात्र, बिहार एसटीएफने केलेल्या एका एनकाउंटरमध्ये अमन ठार झाला. त्यामुळे पुढे दरोड्याचा प्रयत्न थेट जून महिन्यात करण्यात आला.

सुबोधसिंहचा कानावर हात

गुन्ह्याचा मास्टर माईंड सुबोधसिंह हा जेलमध्ये बसून आकाशसिंहसह त्यांच्या हस्तकांमार्फत मुथूट कार्यालयावर दरोडा टाकला होता. असे अनेक गुन्हे या टोळीने विविध राज्यांमध्ये केले आहेत. जेलमध्ये असला तरी सर्व सुविधा उपलब्ध असल्याने सुबोधसिंह हे शक्य होते. पोलिसांचे एक पथक त्याच्याकडे चौकशी गेले आहे. चौकशी दरम्यान त्याने कानावर हात ठेवला. मात्र, या गुन्ह्यातील सक्रिय सहभागाबाबत सर्व पुरावे संकलित झाले आहे. या टोळीविरुद्ध सोमवारपर्यंत मोक्का कलमानुसार कारवाई होईल, सुबोधसिंहला लवकरच नाशिक जेलमध्ये आणले जाईल, असे नांगरे-पाटील यांनी सांगितले.

सहा मोबाइल आणि लाखोंची रोकड

अटक झालेल्या आकाशसिंहकडे तब्बल सहा मोबाइल सापडले. पत्नी, सुबोधसिंह, साथिदार अशा प्रत्येकाशी तो वेगवेगळ्या मोबाइलवरून संपर्क साधत होता. जेलमध्ये असलेल्या सुबोधसिंहने आकाशला दरोड्यापूर्वी पाच लाखांची रोकड दिली होती. त्याचा वापर करीत आकाशसिंहने टेम्पो, दुचाकी खरेदी केली होती.

क्राइम ब्रँचच्या पथकाने गुन्हा घडल्याच्या पहिल्या १५ मिनिटांपासून आजवर केलेल्या प्रयत्नांमुळे एक-एक संशयित अटक होतो आहे. उर्वरित आरोपी लवकरच पकडले जातील. पोलिसांनी या गुन्ह्याचा केलेला तपास हा सर्वच गुन्हेगारासाठी इशारा आहे.

- विश्वास नांगरे पाटील,

पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुधारित वेतनश्रेणी जैसे थे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या ८३ वाहनचालकांना लागू केलेली सुधारित वेतनश्रेणी नाकारत त्याउलट वसुली करण्याच्या प्रशासनाचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द ठरविला आहे. या सर्व ८३ वाहनचालकांना लागू केलेली सुधारित वेतनश्रेणी कायम ठेवत वसुलीच्या प्रशासनाच्या भूमिकेला उच्च न्यायालयाने 'ब्रेक' लावत वाहनचालकांच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पेढे वाटून महापालिकेत आनंद साजरा केला.

वाहनचालकांच्या संघटनेने महापालिकेतील ८३ वाहनचालकांना शासनाच्या सुधारित वेतनश्रेणीचा लाभ द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार तत्कालीन आयुक्त भास्कर सानप यांच्या कार्यकाळात पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर वाहनचालकांना शासननिर्णयाच्या अधिन राहून सन २०१० पासून सुधारित वेतनश्रेणी लागू केली. आयुक्तांनी सदरचा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठविला होता. परंतु, शासनाने तरतुदी लागू होत नसल्याचे सांगत फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु, स्थानिक लेखापरीक्षणात सुधारित वेतनश्रेणीवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे प्रवीण गेडाम आयुक्त असताना पुन्हा फेरप्रस्ताव पाठविण्यात आला. मात्र, वाढीव आस्थापना खर्चामुळे फेरप्रस्ताव नाकारण्यात येऊन वाहनाचालकांकडून सुधारित वेतनश्रेणीची वाढीव रक्कम वसुलीचे आदेश दिले. त्याला वाहनचालक संघटनेने औद्योगिक व कामगार न्यायालयात आव्हान दिले होते. औद्योगिक न्यायालयानेही वाहनचालकांच्या बाजूने निकाल दिला होता. परंतु, त्याला महापालिकेने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, उच्च न्यायालयानेही औद्योगिक व कामगार न्यायालयाचा आदेश कायम ठेवल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने वाहनचालकांच्या बाजूने निकाल दिल्याचे वृत्त महापालिकेत धडकताच वाहनचालकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. अॅड. किरण बापट, अॅड. एस. डी. तांबट, अॅड. विशाल तांबट, अॅड. मुरलीधर पाटील यांनी न्यायालयात वाहनचालकांची बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिरिक्त युनिटला मंजुरी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली असून, प्रशासनाच्या मागणीनुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने नाशिक जिल्ह्यासाठी २ हजार ५९० कंट्रोल युनिट, तर २ हजार ७८० व्हीव्हीपॅट मंजूर केले आहेत. याशिवाय २८० बॅलेट युनिटही लवकरच जिल्हा प्रशासनाला प्राप्त होणार आहेत.

लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया एप्रिल-मे महिन्यात यशस्वीरीत्या पार पाडल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाची निवडणूक शाखा विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. बॅलेट पेपरवर ही निवडणूक घेण्याची जोरदार मागणी विरोधी पक्षांनी केली असली, तरी ती ईव्हीएमवरच घेतली जाईल, असे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. आगामी निवडणुकीसाठीची पूर्वतयारी म्हणून निवडणूक शाखेने अधिकच्या ईव्हीएम मशिन्सची मागणी निवडणूक आयोगाकडे नोंदविली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने बेल कंपनीचे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन्स मंजूर केले आहेत. नाशिकला बेल, पुणे यांच्याकडून २८० बॅलेट युनिट मिळणार आहेत, तर बेल, बेंगळूरू यांच्याकडून २ हजार ५९० कंट्रोल युनिट आणि २ हजार ७८० व्हीव्हीपॅट मशिन्स मिळणार असल्याची माहिती निवडणूक शाखेतील सूत्रांनी दिली. ३१ जुलैपर्यंत हे मशिन्स जिल्ह्यात घेऊन जाण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिले आहेत.

---

निर्बंधामुळे खबरदारी

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निकालाला निवडणुकीतील काही उमेदवारांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संबंधित मतदारसंघातील ईव्हीएम मशिन्स वापरावरही आपसूकच निर्बंध येण्याची शक्यता आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून प्रशासनाकडून अतिरिक्त मशिन्सची मागणी नोंदविण्यास प्राधान्य देण्यात आले. ही मागणी मंजूर झाली आहे.

--

अन्य साहित्यही उपलब्ध

निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी मनुष्यबळाबरोबरच मोठ्या प्रमाणावर अन्य सामग्रीचीही आवश्यकता भासत असते. या सामग्रीचाच भाग असलेल्या मतदान यंत्राच्या बॅटऱ्या, पेपर यांसारखे साहित्य जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेला प्राप्त झाले आहे. बेंगळूरू येथून हे साहित्य आल्याची माहिती प्रशासनाच्या निवडणूक शाखेने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झगडपाडा पुलाने ओलांडली धोक्याची पातळी

$
0
0

म टा वृत्तसेवा, कळवण

पावसाचे माहेरघर असलेल्या सुरगाणा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा ते झगडपाडा दरम्यान असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे झगडपाडा, खोकरविहिर, चिंचपाडा, भेनशेत, कहांडोळपाडा या गावातील विद्यार्थ्यांना, नागरिकांनासह जि. प. शाळेतील शिक्षकांना या पुलावरून ये-जा करताना जीव धोक्यात घालून मोठी कसरत करावी लागत आहे.

आदिवासी अतिदुर्गम भाग असलेल्या आंबोडा-बेडसा परिसरातील आंबूपाडा येथे शासकीय आश्रमशाळा व आयटीआय आहे. तसेच मुख्य बाजारपेठ म्हणून बार्हे येथे या भागातील नागरिक येत असतात. शासकीय आश्रमशाळा ते झगडपाडा मध्ये एक अरुंद आणि कमी उंचीचा पूल आहे. पावसाळ्यात थोडा पाऊस पडला तरी येथे पूर येत असतो आणि त्या पुलावरून वेगाने पाणी वाहत असते.

या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी परिसरातील मनोहर जाधव, सुनील महाले, हिरामण महाले, हंसराज घांगळे, हिरामण चौधरी, जयराम घांगळे, मनोहर महाले, देवीदास घांगळे आदींनी केली आहे.

चिंचपाडा (खोकरविहीर) येथे बांधलेले रुग्णालय डॉक्टर व कर्मचारी विना धूळ खात पडून आहे. त्यामुळे परिसरातील रुग्णंना याच पुलावरून मोठी कसरत करीत जीव धोक्यात घालून बार्हे येथील रुग्णालयात न्यावे लागते. त्यामुळे या रुग्णालयात डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थेट मुलाखतीद्वारे नोकरीची संधी

$
0
0

आरोग्य विभागात नाशिकमध्ये भरणार ४१ पदे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय शहरी स्वास्थ्य मिशन अंतर्गत आरोग्य विभागात ६ व ८ ऑगस्ट रोजी थेट मुलाखती घेण्यात येणार आहे. चार पदांच्या ४१ जागांसाठी ही भरती होणार असून, यासाठी उपसंचालक कार्यालयात अर्ज सादर करावे लागणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या नाशिक परिमंडळाच्या उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांनी दिली.

आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय शहरी स्वास्थ्य मिशन अंतर्गत नाशिक महापालिका कार्यक्षेत्रात पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, कार्यक्रम सहाय्यक आणि स्टाफ नर्स या चार पदांची भरती होत आहे. यासाठी थेट मुलाखती घेण्यात येणार असून, अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे भरतीच्या वेळापत्रकात नमूद करण्यात आले आहे. भरती अंतर्गत नियुक्त होणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना ४५ हजार रुपये प्रतिमहिना, फार्मासिस्टला १० हजार रुपये प्रतिमहिना, स्टाफ नर्स आणि कार्यक्रम सहाय्यकाला १२ हजार रुपये प्रतिमहिना मानधन देण्यात येईल.

वैद्यकीय अधिकारी पदासाठी एमबीबीएस, फार्मासिस्टकरिता डी. फार्मसी, स्टाफ नर्ससाठी नर्सिंग कोर्स, कार्यक्रम सहाय्यक पदासाठी कोणताही पदवीधर पात्र असेल. या भरतीसाठीचे अर्ज www.nrhm.maharashtra.gov.in/ या वेबसाइटवर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या वेबसाइटवर पदांनुसार शैक्षणिक पात्रता आणि मानधनाचा तपशील माहितीपत्रकात नमूद केला आहे. त्यातील सूचनांनुसार उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित रहावे. शालिमार येथील आरोग्य विभागाच्या उपसंचालकांच्या कार्यलयात मुलाखत प्रक्रिया होईल, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

उपलब्ध जागा

वैद्यकीय अधिकारी : २२

स्टाफ नर्स : १३

फार्मासिस्ट : ५

कार्यक्रम सहाय्यक : १

मुलाखती कधी?

६ ऑगस्ट : वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट

७ ऑगस्ट : स्टाफ नर्स, कार्यक्रम सहाय्यक

मुलाखतीचे वेळापत्रक

सकाळी ८.३० ते ११.३० : अर्ज नोंदणी व शुल्क भरणा

दुपारी १.३० : मुलाखतीसाठी पात्र उमेदवार यादी

दुपारी २.३० : मुलाखत प्रक्रियेस प्रारंभ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयटीआय’साठी मतदार नोंदणी बंधनकारक

$
0
0

jitendra.tarte@timesgroup.com

jitendratarte@MT

नाशिक : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या आधिपत्याखालील आयटीआय संस्थांमध्ये प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून मतदार नोंदणीबाबत प्रतिज्ञापत्र भरून घेतले जाऊनच प्रवेशप्रक्रिया पूर्ण होणार आहे. या कामासाठी संस्थेतील एका गटनिदेशक किंवा शिल्पनिदेशकास खास नोडल अधिकाऱ्यांच्या भूमिकेत राहावे लागणार आहे.

मतदार नोंदणीबाबत तरुणाईमध्ये असणाऱ्या उदासीनतेवर तोडगा काढण्यासाठी सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने हा निर्णय घेतला आहे. मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात अनेक ठिकाणी युवा मतदारांमध्ये मतदार नोंदणीबाबत मोठी उदासीनता दिसून आली. राज्यात बहुतांश ठिकाणी जिल्ह्याच्या युवासंख्येच्या तुलनेत दहा टक्क्यांखाली नवमतदार नोंदणीची नोंदविण्यात आलेली संख्या या स्थितीवर स्पष्ट प्रकाश टाकणारी आहे. ठिकठिकाणी युवा मतदारांचे अर्ज भरून घेण्यासाठी निवडणूक यंत्रणेला कसरत करावी लागली, तरीही ही आकडेवारी समाधानकारक नव्हती. राज्यातील काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना तर युवा मतदारांचा टक्का वाढविण्यासाठी राज्यातील विद्यापीठांना पत्र पाठवून सहभाग वाढविण्याची विनंतीही करावी लागल्याचा अनुभव गेल्या लोकसभा निवडणुकीने दिला. ज्या विद्यार्थ्यांच्या वयाची अठरा वर्षे पूर्ण नाहीत त्यांच्यासह ज्यांची अठरा वर्षे पूर्ण आहेत त्यांनाही हे मतदार नोंदणीबाबतचे प्रतिज्ञापत्र प्रवेशाच्या वेळी सादर करणे बंधनकारक असणार आहे. ही सर्व प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 'आयटीआय'च्या प्राचार्यांनी त्यांच्या स्तरावर गटनिदेशक किंवा शिल्पनिदेशकांवर जबाबदारी निश्चित करावी, अशा सूचना कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

\B...यामुळे नोंदणीवर परिणाम

\Bनवमतदार म्हणून वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याच्या टप्प्यावर बहुतांश युवक हे शिक्षणाच्या निमित्ताने गावाबाहेर पडताहेत. अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेण्यासाठी हे विद्यार्थी गावांमधून बाहेर पडून जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणी निवासी राहतात. घरापासून दूर राहताना आपापल्या मतदारसंघात मतदार नोंदणी करणे त्यांना शक्य होत नसल्याचा मोठा परिणाम युवा मतदारांच्या नोंदणीवर होत आहे. त्यामुळे निवडणूक प्रशासन प्रत्येक निवडणुकीच्या वेळी शाळा-महाविद्यालयांमध्ये नवमतदारांसाठी मोहीम राबविते. मात्र, तिलाही युवकांचा प्रतिसाद अत्यल्प असल्याची प्रशासनाची निरीक्षणे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'एनबीटी'च्या विद्यार्थ्यांचा विद्यापीठ उपकेंद्रात ठिय्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एनबीटी लॉ कॉलेजने २७ विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण विद्यापीठाकडे पाठविले नाहीत. यामुळे या विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात आल्याची तक्रार विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्रात करीत ठिय्या मांडला. या विद्यार्थ्यांची समस्या मार्गी लागेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

असल्याचा इशाराही विद्यार्थ्यानी दिला आहे. अंतर्गत गुण कॉलेजकडून न देण्यात आलेले विद्यार्थी सर्व विषयांत उत्तीर्ण असूनही त्यांचे नुकसान होण्याची वेळ आल्याचीतक्रार या विद्यार्थ्यांनी केली. अंतर्गत गुण भरण्यासाठी कॉलेजच्या हाती ४५ दिवसांचा अवधी असतानाही ही ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण न करण्यात आल्याने या विद्यार्थ्यांचा निकाल रखडला आहे. यामुळे या विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनाची भेट घेतल्यानंतर मूळ समस्येबाबत आश्वस्त करताना तुमचा निकाल लवकरच मिळेल असे प्राचार्यांचे विधान असले तरीही अंतर्गत गुण पाठविणाऱ्या यंत्रणेकडून हे गुण विद्यापीठास का पाठविले गेले नाहीत, याबाबत विद्यार्थ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. याशिवाय आणखी 'इव्हीडन्स' या विषयात अंतर्गत गुण न देता गैरहजर दाखविण्यात आले असल्याचीही तक्रार आहे. याप्रश्नी प्राचार्यांवर विद्यापीठाने कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अॅड. अजिंक्य गिते, तुषार दोंदे, स्वप्नील मोरे, निखिल भामरे, अजिंक्य

देशपांडे, अभिजीत गवते आदींनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिशन येमेन

$
0
0

his is a High Security Mission" असे मला या २०१६ च्या येमेन मिशनविषयी स्पष्ट कल्पना दिली होती. या अगोदर भारतीय म्हणून मला येमेनविषयी भारताच्या सरकारने २०१५ मध्ये "ऑपरेशन राहत" या नावाने जनरल व्ही. के. सिंग यांनी विलक्षण यशस्वी मोहीम राबवल्याचे माहिती होते. येमेनमधील भयानक यादवी युद्धात अडकून बसलेल्या हजारो भारतीय आणि शेकडो परदेशी नागरिकांना सोडवून आणले होते. परंतु, अजूनही तिथे बंडखोरी होती आणि अगोदरचे सरकार यांच्यात सशस्त्र यादवी संघर्ष चालूच होता. त्यात राजधानी सानावर हौतींनी ताबा घेतला होता. पूर्वीच्या सरकारमधील नेते मोठे बंदर असलेल्या एडेनमध्ये व त्यानंतर सौदी अरेबियात आश्रयास गेले होते. सशक्त सरकार नसल्याने अल कायदा आणि ईसीससारखे ग्रुप सक्रीय झाले होते. या यादवी युद्धात अगोदरच गरीब असलेल्या देशात लाखो लोक, महिला, मुले अगदी हताश आणि अकल्पनीय अवस्थेत होते. त्यात सौदी अरेबियाने आणखी काही देशांना (सौदी-अलायन्स) बरोबर घेऊन येमेनवर अनेक हवाई हल्ले चालू केले. एमएसएफचे हॉस्पिटल कॉ-ऑर्डिनेटस् सौदीला देऊनसुद्धा त्यावरही एअर स्ट्राइक केल्याने काही ठिकाणी एमएसएफने हॉस्पिटल्स बंदही केले. अशा धगधगत्या परिस्थितीत अडकलेल्या आणि वैद्यकीय सेवांपासून पूर्णपणे वंचित असलेल्या नागरिकांसाठी एमएसएफची वैद्यकीय सेवा काही ठिकाणी चालू होती. स्फोटक जखमांसाठी तिथे अस्थिरोगतज्ज्ञांची खूप गरज निर्माण झाली होती. माझी जायची इच्छा व्यक्त केल्यावर माझी पत्नी आणि कुटुंबियांनी मोठ्या धीराने मला परवानगी दिल्यानेच मी असे मिशन करू शकतो. हातून चांगले घडते तेव्हा, मानवतेच्या मूल्यांवर माझ्यासारखाच ठाम विश्वास असणारे माझे कुटुंबीयही माझ्या कार्यात असे सहभागी असतातच. येमेनमध्ये कोणीही असे जाऊ/प्रवेश करू शकत नाही, सौदी अरेबियाच्या सततच्या बॉम्बिंगमुळे, कोणतीही व्यावसायिक विमान कंपनी, राजधानी सानाला जात नाही. माझ्या व्हिसाची व्यवस्था होती. बंडखोरांच्या सरकारकडून झाली. प्रथम मी एमएसएफच्या जिनिव्हामधील कार्यालयात ब्रिफिंगसाठी गेलो. तेथून मला जिबोटी या आफ्रिकेच्या अगदी उत्तरेच्या टोकाला असलेल्या देशात एमएसएफने नेले. तेथे एक एमएसएफचे ८ सिटर छोटे विमान होते. एमएसएफने सौदी अरेबियाकडून चार तासाचा विंडो पिरिएड परवानगी घेतली होती. त्याचवेळेत, विशिष्ट उंचीवरून विमान नेणे आणि मी व माझे सहकारी (इटलीतील अॅनेस्थेटिस्ट धरून आणि काही जण), यांना साना विमानतळावर सोडून, परत जिबोटीला येणे गरजेचे होते. त्या छोट्या विमानात प्रत्येकी १५ किलो सामान नेण्यास परवानगी होती आणि त्याच्यात प्रत्येक प्रवाशाचे पण वेगळे वजन करून विमानातील लोडाचे गणित केले होते. एमएसएफच्या त्या छोट्याशा विमानात दोन वैमानिक सर्व मदत करत होते. जिबोटीहून या विमानाने उड्डाण केले. एवढ्या छोट्या विमानाचा सारखा धडधड आवाज येत होता. एडनची सामुद्रधुनी आणि रेड-सी ओलांडून येमेनच्या एअर-फील्डमध्ये आल्यावर वैमानिक जास्त काळजीने सौदीशी संपर्क साधून होते. साधारण दीड तासाच्या प्रवासानंतर येमेनची राजधानी सानाच्या विमानतळावर उतरले. उतरताना विमानाच्या खिडकीमधून उध्वस्त झालेल्या विमानांचे आणि हेलिकॉप्टरचे अवशेष बाजूला दिसत होते. त्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारे त्या दिवसाचे ते एकमेव विमान होते. अर्धवट उध्वस्त झालेल्या त्या विमानतळाच्या इमारतीत इमायग्रेशन झाल्यावर आम्हाला घ्यायला आलेला येमेनी सारखाचा लायेसन ऑफिसर भेटला. त्याच्या डोळ्यात, बोलण्यात, वागण्यात त्याच्या गरजू देशबांधवांना मदत करायला आलेल्या आमच्याविषयी विलक्षण कृतज्ञता दिसत होती. सानामधील त्याही रात्री तीन वेळा प्रचंड मोठे आवाज झाले. मिशनप्रमुखाला विचारले तर तो म्हणाला, सौदीचे असे एअर-स्ट्राइक रोज होतात, पण आपण डिप्लोमेटिक एरियामध्ये असल्याने या को-ऑर्डिनेट्सवर ते बॉम्ब टाकत नाही. या दिलाशावर, मी पुढच्या प्रवासासाठी सकाळची वाट बघू लागलो. धोकादायक परिस्थितीत चांगले काम करताना आम्ही एकमेकांना शुभेच्छा द्यायचो. "Take Care, Give Care". जगण्यासाठीचा काय छान मंत्र आहे हा! (क्रमश:) (लेखक डॉक्टर विदाऊट बॉर्डर्स संघटनेचे स्वयंसेवक सर्जन आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हसरूळला वाहने तोडफोड, दुचाकी जाळणारे जेरबंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीत समाजकंटकांनी सहा चारचाकी वाहने फोडल्याची घटना घडली होती. यात आकाश पेट्रोल पंपासमोरील परिसरात पाच, तर गुलमोहरनगर येथे एका चारचाकी वाहनाचे नुकसान केले होते. तसेच (१५ जुलै) तीन दुचाकी जाळल्या होत्या. या दोनही प्रकरणी तीन संशयितांना जेरबंद करण्यात आले आहे.

महिनाभरापूर्वी म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीतील आकाश पेट्रोलपंप येथील घृष्णेश्वर सोसायटी जवळील शिवाजी महाराज उद्यानालगत आपापल्या बंगला व सोसायटीसमोर पार्क केलेल्या चारचाकी वाहनांना लक्ष करीत (दि. १४ जून) रात्रीच्या सुमारास समाजकंटकांनी फोडल्याची घटना घडली होती. तसेच, १५ जुलै रोजी रात्रीच्या वेळी तीन दुचाकी जाळल्या होत्या. या दोनही गुन्ह्यांचा तपास सुरू असताना, गुरुवारी (दि. २५) म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय सांगळे यांना खबऱ्याकडून गाड्या फोडणारे व दुचाकी जाळणाऱ्या संशयितांची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाने संशयित परेश उर्फ भावड्या दिलीप पाटील (वय २३, रा. घर नं. ४५, शिवाजी चौक, म्हसरूळ), आकाश मोहन इंगळे (वय १९, रा. सूर्यवंशी गल्ली, म्हसरूळ), नितीन रमेश चतुर (वय १९, रा. मारुती मंदिराजवळ, म्हसरूळ) यांना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता, दोन्ही गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली. या तीनही संशयिताना अटक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संगीत सभेत सतारीचा निनाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारी बहारदार नाशिक संगीत सभा झाली. या कार्यक्रमात युवा कलावंत अथर्व वैरागकर यांचे गायन आणि उत्तरार्धात डॉ. उद्धव अष्टूरकर यांचे सतारवादन रंगले.

अथर्व वैरागकर याने राग यमनमधील 'साँज भई पिया घर नाही आये सखीरी' हा बडा ख्याल सादर केला. त्यानंतर 'सुगम रूप सुहाने सलोने माई' हा तीनतालातील छोटा ख्याल, 'येरी आली पिया बिन' हा तीनतालातील तर 'दौरी दौरी जान पिया से मिलनको', त्यानंतर वाचे विठ्ठल गाईन हे संत तुकडोजी महाराजांचे भजन सादर केले. या भजनाला पंडित शंकरराव वैरागकर यांनी संगीत दिले आहे. तबल्यावर ओंकार वैरागकर, संवादिनीवर सागर कुलकर्णी तर तानपुऱ्यावर शरयू विंचूरकर यांनी साथसंगत केली.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात डॉ. उद्धव अष्टुरकर यांनी सतारवादन सादर केले. त्यांनी राग पुरिया कल्याण आलाप जोड झाला त्यानंतर भैरवी धून सादर केली. त्यांना तबल्यावर नितीन पवार यांनी साथसंगत केली. प्रारंभी प्रतिष्ठानचे कार्यवाह पंडित मकरंद हिंगणे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, नाशिकमधील गायक, वादक कलावंतांना प्रतिष्ठानचे व्यासपीठ मिळावे म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यापूर्वी अखंड ख्याल संकीर्तनाच्या निमित्ताने सर्व कलाकार एकत्र येत होते या नव्या उपक्रमामुळे कलावंतांच्या सादरीकरणासाठी स्वतंत्र वेळ मिळणार आहे. प्रतिष्ठानचे सल्लागार लोकेश शेवडे यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसीपींची खिचडी; पोलिस झाले बिहारी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हत्या, दरोडा अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये कधी सहजच गुन्ह्याचे पदर उलगडत जातात तर कधी तपास प्रक्रिया क्लिष्ट तसेच प्रदीर्घ ठरते. मुथूट दरोड्याचा तपास हे देखील मोठे आव्हान ठरले. मात्र, पोलिसांनी मोठ्या प्रयत्नाअंती एक-एक आरोपींना पकडले. गत १६ दिवसांपासून आरोपीच्या शोधार्थ बिहारमध्ये तळ ठोकला होता. थेट बिहारी पेहराव आणि तोडकीमोडी भाषेचा लहेजा शिकून या पथकाने आकाशसिंगपर्यंत पोहचण्याचा मार्ग प्रशस्त केला. वेळ प्रसंगी एसीपींनी तांदळाची खिचडी तयार करून आपल्यासह पथकातील सहकाऱ्यांच्या पोटाची सोय करावी लागली.

मुथूट गुन्ह्यातील आरोपी बिहारमध्ये दडून बसले आहेत. दरोड्याचा गुन्हा घडला म्हणजे १४ जूनपासून बिहार तसेच उत्तर प्रदेशचे कनेक्शन पोलिसांच्या तपासात समोर येत होते. पोलिसांनी सातत्याने तिथे पोहचून प्रयत्न सुद्धा केले. मात्र, आरोपी सतत चकवा देत होते. आकाशसिंह हा मुख्य आरोपी बिहारमधील आरा (जि. भोजपूर) या गावात असल्याची माहिती शहर पोलिसांना समजली. त्यानुसार पोलिस आयुक्तांनी क्राइम ब्रँचची युनिट दोन आणि अंबड पोलिस ठाणेचे पथक यांना बिहारकडे रवाना केले. विशेष म्हणजे आरोपीला पकडायचे ही खुणगाठ बांधून सहायक आयुक्त आर. आर. पाटील हेही सोबत गेले. पोलिस असल्याचा संशय कोणालाही येऊ न देता या पथकाला आकाशसिंहपर्यंत पोहचयाचे होते. त्यामुळे पथकातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बिहारी वेशभूषा परिधान केली. स्थानिक नागरिकांशी मैत्री करीत दोन दुचाकींचा बंदोबस्त केला. आरासह आजुबाजूच्या परिसरात दिवसरात्र आकाशसिंहचा शोध घेतला गेला. याच गावातील विष्णूनगर येथे आकाशसिंहची कार उभी असल्याची माहिती पोलिसांना समजली. सर्वांच्या जीवात जीव आला. आकाशसिंग सुटणार नाही, अशा पद्धतीने या पथकाने नियोजन केले. एक-दोन नव्हे तर सात दिवस पथक डोळ्यात तेल घालून तेथे पहारा देत होते. मात्र, आकाशसिंह फिरकलाच नाही. यानंतर पोलिसांनी आकाशसिंहच्या एका मित्राचा शोध घेतला. त्याच्या घराजवळ घर भाड्याने घेऊन मुक्काम केला. पण, उपयोग होईना. हे पथक चांदी गावात पोहचले. तिथे त्यांना खबऱ्यामार्फत आकाशसिंहचे लोकेशन मिळाले. विष्णूनगर येथे उभी असलेली कार घेण्यासाठी तो येणार असल्याचे समजताच पथक सर्तक झाले. मात्र, दोन्ही गावातील अंतर तब्बल ३० किलोमीटर होते. पण, आकाशसिंहला पकडायचे अशी खुणगाठ बांधलेले पथक वाऱ्याच्या वेगाने विष्णूनगरला पोहचले. पोलिस समोर बघताच आकाशसिंह पळू लागला. एक भिंती ओलांडण्याच्या तयारी असताना त्याला पोलिसांना पकडले. यावेळी गावकरी जमा झाले. 'माझे अपहरण होत असून, पोलिसांना बोलवा', अशी आवई आकाशसिंहने उठवली. मात्र, पोलिसांनी स्थानिकांना विश्वासात घेऊन पुढील अनर्थ टाळला.

कारवाईत यांचा समावेश

आकाशसिंहला पकडण्यासाठी गेलेल्या पथकामध्ये गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त आर. आर. पाटील, निरीक्षक विजय ढमाळ, सहायक निरीक्षक अभिजीत सोनवणे, पीएसआय रवींद्र सहारे, महेश इंगोले, अंबड ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील पीएसआय तुषार चव्हाण, नाईक अविनाश देवरे, शिपाई मनोहर कोळी, हेमंत आहेर, गौरव गवळी, योगेश सानप तसेच पोलिस मित्र राहुल जाधव यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वे कर्मचाऱ्यास प्रचार भोवला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या सेवेत नोकरीला असूनही लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या एका रेल्वे कर्मचाऱ्यावर रेल्वे विभागाने शिस्तभंगाची कारवाई केली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यावर कारवाई होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी, असा अंदाज जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने वर्तविला आहे.

सरकारी सेवेत नोकरीस असलेल्या व्यक्तीला कुणाच्याही निवडणूक प्रचारात सहभागी होता येत नाही. त्याबाबतच्या स्पष्ट सूचना निवडणूक काळात अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या जातात. या सूचना आणि नियमांचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक असते. एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत एका प्रबळ उमेदवाराच्या प्रचारात रेल्वेचे मुख्य पार्सल क्लर्क जितेंद्र जाधव सहभागी झाले होते. याबाबतची तक्रार आणि पुरावे जिल्हा निवडणूक शाखेला प्राप्त झाले. ही बाब जिल्हा प्रशासनाने रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत कारवाईच्या सूचना दिल्या. सुरुवातीला रेल्वे अधिकाऱ्यांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. परंतु, याबाबत जिल्हा प्रशासनाकडून मध्य रेल्वेकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने जाधव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. रेल्वेसेवा नियम १९६६ अन्वये त्यांच्यावर शास्तीची कारवाई करण्यात आल्याचे भुसावळचे वरिष्ट मंडळ वाणिज्य प्रबंधक आर. के शर्मा यांनी जिल्हा प्रशासनाला पत्राद्वारे कळविले आहे.

--

संबंधित रेल्वे कर्मचारी उमेदवाराचा प्रचार करीत असल्याची तक्रार आणि पुरावे आम्हाला प्राप्त झाले होते. त्यानुसार कारवाईसाठी आम्ही रेल्वेकडे पाठपुरावा सुरू केला. केंद्रीय कर्मचाऱ्यावर झालेली ही पहिलीच कारवाई असावी. सरकारी नोकरदारांनी विधानसभा निवडणुकीत कुणाच्याही प्रचारात सहभागी होऊ नये.

-अरुण आनंदकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात जणांची टोळी तडीपार

$
0
0

सात जणांची टोळी तडीपार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गँग तयार करून हाणामारी व दहशत पसरविण्याचे काम करणाऱ्या सात जणांच्या टोळीवर पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी तडीपारीची कारवाई केली. टोळीविरुद्ध भद्रकालीसह अन्य काही पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत.

सुमित अशोक लोट (वय २८), पवन अशोक लोट (२३), रोहित अशोक लोट (२६), राहुल अशोक लोट (१९), विशाल ऊर्फ लोणच्या सुनील बैनेवाल (२३, सर्व रा. वाल्मीक मंदिराजवळ, महालक्ष्मी चाळ, वडाळा नाका), शिवम सुरेश पवार (२१) आणि अक्षय अशोक चंडालिया (२३, दोघे रा. महालक्ष्मी चाळ, बागवानपुरा) अशी तडीपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व सराईत गुन्हेगार असून, सातत्याने शरीराविरुद्धचे गुन्हे करून दहशत पसरविण्याचा उद्योग करीत होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्याविरुद्ध तडीपार करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यास पोलिस उपायुक्तांनी मंजुरी दिली असून, वरील तडीपारांना दोन वर्षांसाठी शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. परिमंडळ एकमधील पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून १४३ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून, २७ तडीपार प्रकरणांची चौकशी सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माध्यमिक शिक्षक संघाचा आंदोलनाचा एल्गार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

शासनाच्या प्रस्तावित खासगी शाळांतील कर्मचारी (सेवाशर्ती) विनियमन अधिनियम १९७७ मधील मसुदा बदलास महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाने (फेडरेशन) तीव्र विरोध दर्शविला असून, या धोरणाचा निषेध करण्यासाठी येत्या क्रांती दिनी (दि. ९) राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयापुढे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचा ठराव संघाच्या नुकत्याच नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय कार्यकारिणी पदाधिकारी बैठकीत संमत करण्यात आला.

या मसुद्यातील नवीन बदलानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, रात्रशाळासह कनिष्ठ व अध्यापक विद्यालयांतील पूर्णकालीन व अंशकालीन मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वेतनश्रेणी या सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे वेळोवेळी ठरविण्याचा अधिकार शासनाकडे जाणार आहे. विविध स्वरूपाचे भत्ते लागू करण्यावरही शासनाचे नियंत्रण येणार आहे. मुख्य नियमांना जोडलेली 'क' सूची वगळण्यासही तीव्र हरकत नोंदवली आहे. या सर्व बदलास महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाने (फेडरेशन) तीव्र विरोध दर्शविला आहे. शासनाने या मसुदा बदलाचे धोरण रद्द करावे, अशी मागणी संघाने केली आहे. या सभेस राज्य अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे, सचिव शालिग्राम भिरूड, उपाध्यक्ष भारत घुले, सी. सी. वाणी, गुफरान अन्सारी, चांगदेव कडू, कोषाध्यक्ष राजेंद्र लांडे, आर. डी. निकम, नीलेश ठाकूर, संजय पवार, एन. डी. नांद्रे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षा जागृतीचे रोहीत्र बनले केंद्र

$
0
0

नाशिकरोड : रोहित्रांपासूनचा धोका कमी करण्यासाठी महावितरणने शहरातील वर्दळीच्या ठिकाणे असलेल्या सर्व रोहित्रांना स्टील प्लेटचे कव्हर्स बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या स्टील प्लेटचे कव्हर्सवर विद्युत सुरक्षाविषयक माहितीचे स्टिकर्सदेखील लावण्यात आले आहेत. आतापर्यंत शहरातील १६० रोहित्रांवर अशा प्रकारचे स्टील प्लेटचे कव्हर्स आणि त्यांच्यावर स्टिकर्स लावण्यात आल्याने अशा रोहित्रांवरील माहिती वाहण्यासाठी नागरिकांची पावले थबकू लागली आहेत.

शहरात महावितरणची १० हजार ३७४ रोहीत्र (डीपी) आहेत. त्यापैकी काही रोहीत्र अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी, मुख्य रस्त्याच्या कडेला किंवा चौकात आहेत. अशा प्रकारच्या रोहित्रांचा स्फोट होऊन त्यातील ऑइल सांडून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. या स्टील प्लेटच्या कव्हर्सचा खर्च १८ ते ३० हजार रुपयांपर्यंत आहे. आतापर्यंत महावितरण प्रशासनाने शहरातील १६० रोहित्रांवर स्टील प्लेटचे कव्हर्स आणि त्यांच्यावर स्टिकर्स लावले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहन जाळपोळ; तीन जणांना अटक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकी ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याप्रकरणी पोलिसांनी म्हसरूळमधील तीन जणांना अटक केली. जाळपोळीसह काही दिवसांपूर्वी वाहनांच्या काचा फोडल्याची कबुली संशयितांनी दिली आहे.

परेश उर्फ भावड्या दिलीप पाटील (वय २३, रा. शिवाजी चौक, मोराडे गल्ली), आकाश मोहन इंगळे (वय १९, रा. सूर्यवंशी गल्ली) आणि नितीन रमेश चतुर (वय २३, रा. मारुती मंदिराजवळ, म्हसरूळ) अशी संशयितांची नावे आहेत. वाढणे कॉलनी येथील भास्कर सोसायटीत १९ जुलै रोजी अज्ञात समाजकंटकांनी पार्क केलेल्या तीन दुचाकी पेटवून दिल्या होत्या. यात मोठे नुकसान झाले होते. या प्रकरणी रितेश लाटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

म्हसरूळचे वरिष्ठ निरीक्षक संजय सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. प्राथमिक चौकशीनुसार पोलिसांनी तिघा संशयितांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले. तिघा संशयितांनी काही दिवसांपूर्वी दिंडोरी रोडवरील सावरकर गार्डन भागातही काही वाहनांच्या काचा फोडल्याचे तसेच वाहन जाळपोळ केल्याची कबुली दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images