Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

घरफोडीत दीड लाखांचा ऐवज लंपास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

संपूर्ण कुटुंब रात्री घरात झोपलेले असताना तिघा चोरट्यानी घरात प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने ठेवलेली लोखंडी पेटी पळवल्याची घटना हिंगणवेढे (ता. जि. नाशिक) येथे रविवारी (दि.२८) पहाटे अडीच वाजता घडली. या घरफोडीत रमेश विनोबा धात्रक (वय ५८) यांच्या घरातील ७७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे १ लाख ५४ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरीस गेले आहेत.

रमेश धात्रक यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात या घरफोडीबाबत फिर्याद दिल्यानंतर नाशिकरोड पोलिसांनी अज्ञात तीन इसमांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. या घरफोडीची माहिती मिळाल्यावर नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर, उपनिरीक्षक एस. सी. सोनोने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घरापासून काही अंतरावर गेल्यावर या चोरट्यानी लोखंडी पेटी फोडून त्यातील १ लाख ४० हजार रुपये किंमतीची ७० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, ४ ग्रॅम वजनाची ८ हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी आणि ३ ग्रॅम वजनाची ६ हजार रुपयांची अंगठी असे एकूण ७७ ग्रॅम वाजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास शेळके करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धुळे, नंदुरबारसाठी आज मतदान

$
0
0

‌म. टा. वृत्तसेवा, धुळे

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान आज, सोमवारी (दि. २९) होणार असून, त्यात समाविष्ट असलेल्या धुळे व नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानास सुरुवात होईल. उन्हाच्या झळा तीव्र असल्याने नागरिक अगोदरच हैराण असून, वाढत्या उन्हाचा मतदानावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

धुळे मतदारसंघात २८, तर नंदुरबार मतदारसंघात ११ उमेदवार रिंगणात आहेत. धुळे मतदारसंघात १९ लाख चार हजार ८५९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर नंदुरबार लोकसभा मतदारसंघात १८ लाख ७० हजार ११७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. धुळ्यात युतीचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे पुन्हा रिंगणात असून, त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे आमदार कुणाल पाटील आणि बंडखोर अपक्ष अनिल गोटे यांचे आव्हान आहे. नंदुरबारमधून युतीच्या विद्यमान खासदार डॉ. हीना गावित यांनाच उमदेवारी देण्यात आली असून, त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आमदार अॅड. के. सी. पाडवी आणि अपक्ष डॉ. सुहास नटावदकर यांचे आव्हान असणार आहे. याव्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टीचे उमदेवारही रिंगणात असून, मतदार आपल्या मतदानाचे दान कोणाच्या पारड्यात टाकतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सविस्तर वृत्त...२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासनाची मतसज्जता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे व नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज (दि. २९) सकाळी सात वाजेपासून मतदान सुरू होणार आहे. धुळे मतदारसंघातून २८,तर नंदुरबारमधून ११ उमेदवारांचे भवितव्य आज, सोमवारीमतदान यंत्रात बंद होईल. यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासन पूर्ण सज्ज झाले असून, पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रविवारी (दि. २८) सकाळी ९ वाजता धुळे व नंदुरबार शहरातील क्रीडा संकुलात मतदान केंद्रांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रांसह इतर साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी मतदार केंद्रांपर्यंत जाण्यासाठी परिवहन महामंडळाच्या बस व खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.

धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, सटाणा अशा सहा ठिकाणी एकूण १९४० मतदान केंद्रे असून, त्यावर ११ हजार मतदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी ६७७ वाहनांचा वापर करण्यात येणार असून, त्यासर्व वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. तसेच संवेदनशील मतदान केंद्रांचे थेट प्रेक्षपण दिसणार आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात प्रशासनाकडून मतदारांना मतदान केंद्र शोधण्यासाठी 'वोटर सर्च'हे मोबाइल ॲप कार्यान्वित करून देण्यात आले आहे.

धुळ्यासाठी १९४० केंद्रे

धुळे लोकसभा मतदारसंघात या वेळी १७२ मतदान केंद्रे वाढली आहेत. त्यामुळे एकूण मतदान केंद्रांची संख्या आता १ हजार ९४० झाली आहे. आयोगाच्या सुचनेनुसार मतदान केंद्रांत पाणी, वीज, शौचालय, रॅम्प आदी सुविधा पुरवाव्या लागणार आहेत. तर दिव्यांग मतदारांसाठी वाहनांची व्यवस्थादेखील केली जाणार आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात सन २०१४ च्या तुलनेत मतदारांच्या संख्येत वाढ झाली असून, मतदान केंद्रांची संख्यादेखील १ हजार ७६८ वरुन १ हजार ९४० झाली आहे. एका केंद्रावर सुमारे १ हजार ४०० मतदारांना मतदान करता येईल. मतदारांच्या सोयीसाठी ३ हजार २०० स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे.

नंदुरबारला २११५ केंद्रांवर साहित्य रवाना

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, धडगाव, साक्री या सहा ठिकाणी आज (दि. २९) २११५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार आहे. यासाठी १० हजार ४७५ मतदान केंद्र अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून, उन्हाच्या झळांनी यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठीदेखील निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. या मतदारसंघात सात ठिकाणी सखी मतदार केंद्रे उभारण्यात आली असून, त्याची सर्व जबाबदारी महिला कर्मचारी पाहणार आहेत. तसेच सहा आदर्श मतदान केंद्रदेखील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शितपेयांना मागणी वाढली

$
0
0

शितपेयांना मागणी वाढली

गंगापूररोड : तापमानाने चाळीशीचा आकडा पार केल्याने उन्हापासून बचाव करण्यासाठी नाशिककर शितपेयांना पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. विविध ज्यूस सेंटर व रसगृहे गर्दीने फुलून गेली आहेत. ऊसाचा रस, मिल्कशेक, ताक, लस्सी, आईस्क्रीम, बर्फगोळे, सोडा, कोकाकोला, सरबत आदी शीतपेयांना मागणी वाढली आहे. विविध फळापासून तयार केलेल्या मिल्कशेकचे दर १०० रुपयांपासून पुढे आहेत. तर मलई आणि केसर लस्सी हे कमीत कमी २५ रुपयांना उपलब्ध आहेत. तर, ताक, लिंबू सरबत, ऊसाचा रस दहा रुपयांपासून पुढे उपलब्ध आहेत. आईस्क्रीममध्ये कसाटा, कुल्फी, चोकोबार, कॉर्नेटो, अंजीर, पिस्ता, बटरस्कोच या फ्लेवरला अधिक माागणी असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. फॅमिली पॅकलाही मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

भोजापूर धरणक्षेत्रालगत असलेल्या सांगळे वस्तीवर शनिवारी (दि.२७) मध्यरात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीन शेळ्यांचा फडशा पाडला. या घटनेमुळे परिसरात भीती पसरली आहे. धर्मेंद्र विठ्ठल सांगळे हे रात्री नेहमीप्रमाणे जनावरे गोठ्यात व शेळ्या घराशेजारच्या शेडमध्ये बांधून झोपी गेले हेाते. अशावेळी शेळीच्या ओरडण्याच्या आवाजाने सांगळे यांना मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास जाग आली. कुटुंबातील सदस्यांना झोपेतून उठवत त्यांनी घराबाहेर धाव घेतली. सांगळे यांची चाहूल लागताच शेडमध्ये असलेल्या बिबट्याने शेजारच्या शेतात धूम ठोकली. सांगळे कुटुंब शेडमध्ये आले असता त्यांना दोन शेळ्या व एका बोकडाला बिबट्याने ठार केल्याचे निदर्शनास आले. सकाळी वनकर्मचारी वसंत आव्हाड यांनी घटनास्थळी येत पाहणी केली. या घटनेत सांगळे यांचे जवळपास ३५ हजारांचे नुकसान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेक मॅसेज, अफवांवर विश्वास ठेऊ नका!

$
0
0

शिवसेना-भाजपचे संयुक्त पत्रकार परिषदेतून आवाहन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कोणत्याही फेक मॅसेज व अफवांवर विश्वास ठेऊ नका, शनिवारी (दि. २७) कोणीतरी खोडसाळपणा करून आमच्या नावाने चुकीचे मेसेज पाठवले. हा गंभीर प्रकार असून त्याबद्दल सायबर क्राइम तसेच निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली. त्याचा आम्ही पाठपुरावा करू व संबंधितांवर कडक कारवाई व्हावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती शिवसेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शालिमार येथे शिवेसना कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, माजी महानगरप्रमुख अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे उपस्थित होत्या. पत्रकार परिषदेत बोरस्ते म्हणाले, की शिवसेनेचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांचा विजय निश्चित आहे. पराभव दिसू लागल्याने विरोधक असे कारस्थान करीत आहेत. आमचे कार्यकर्ते अधिक जोमाने कामाला लागले आहे. असे फेक मॅसेज विरोधकांसाठी बूमरँग झाले आहेत. नाशिकचे मतदार सूज्ञ आहेत. त्यामुळे ते अशा फसव्या मॅसेजवर विश्वास ठेवणार नाही. पण, यामुळे आम्हाला मोठा मनस्ताप झाला, असेही ते म्हणाले.

फेक मॅसेजेसद्वारे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, युतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी एकदिलाने काम करीत आहेत, असे आमदार फरांदे यांनी सांगितले. फेक मॅसेजेसमुळे आपल्याला अनेकांचे फोन आला. त्यांना आम्ही जोमाने प्रचार करण्याचे आवाहन केले आणि हेमंत गोडसे यांना विजयी करण्याचे आवाहन केल्याचे आमदार हिरे यांनी सांगितले. या खोडसाळपणामुळे शिवसैनिक संतप्त झाले आहेत. ते अधिक जोमाने कामाला लागले आहेत. यामुळे गोडसे यांचा विजय निश्चित असल्याचा दावा जिल्हाध्यक्ष करंजकर यांनी सांगितले.

इंटरनेटच्या माध्यमातून मॅसेज

बीएसएनएलचे इंटरनेट वापरून संबंधित टेक्स्ट मॅसेज मोबाइलधारकांना पाठवण्यात आले आहेत. त्याबाबत एक फेक नाव समोर आले आहे. पण, त्याचा अधिक तपास सायबर क्राइमचे अधिकारी करीत आहे. त्यातून खोडसाळपणा करणाऱ्याचे नाव समोर येईल, असे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विरोधी पक्षांच्या कुबड्याची गरज नाही’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माझ्या नावाने शनिवारी कुणीतरी खोडसाळपणा करत मॅसेज व्हायरल केले. विरोधी पक्षातील नेत्यांची नावे टाकून मला मते द्या, असे त्यात म्हटले आहे. मी बदनाम होईल, असा प्रयत्न यातून झाला आहे. पण, आम्हाला विरोधकांच्या कुबड्यांची गरज नाही, असे सांगत मॅसेज पाठवण्यावर कारवाई व्हावी, असी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांनी केली.

या फेक मॅसेजबाबत समीर भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विचाराने चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्यांचे शिक्षण घेऊन आम्ही विकासाची वाटचाल करत आहोत. त्यामुळे असा खोडसाळपणा ज्यांनी केला त्याविरुद्ध कडक कारवाई होणे गरजेचे आहे. या प्रकरणात पोलिसांकडे एफआयआर दाखल झाला आहे. त्याचा तपास करण्यात येऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी भुजबळ यांनी केली.

शिवसेना-भाजपच्या नेत्यांची नावे टाकून राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांना मतदान करा असे आवाहन शनिवारी मॅसेजद्वारे करण्यात आले होते. त्यामुळे त्यातून शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली. ज्यांच्या नावाने मॅसेज व्हायरल झाले त्यांनी त्याबद्दल तक्रार दाखल केली. त्यानंतर भुजबळांनी या प्रकरणात खोडसाळपणा असल्याचे सांगत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ मॅसेजेसवरून घमासान

$
0
0

\Bवेगवेगळे तीन गुन्हे दाखल; सायबर पोलिसांकडून तपासाला गती

\B

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार समीर भुजबळ यांना मतदान करण्याचे आवाहन करणारे व्हायरल झालेल्या टेक्स्ट मॅसेजेस प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्याचा तपास सायबर पोलिस करीत आहे.

नाशिक मतदार संघातील निवडणूक प्रचार शनिवारी, २७ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता संपुष्टात आला. यानंतर उमेवादवारांचा छुपा प्रचार सुरू झाला. रात्री ८ वाजेनंतर शहरातील वेगवेगळ्या भागात ब्लक मॅसेजचा जोर वाढला. राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांना निवडून देण्याचे काही मॅसेज व्हायरल झाले. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास याच मॅसेजमध्ये शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नावे घेण्यात आली. विधानसभा मतदार संघनिहाय आलेल्या मॅसेजेसमध्ये देवयानी फरांदे, सीमा हिरे, अजय बोरस्ते, विजय कंरजकर, राजाभाऊ वाजे यांच्यासह अनिल मटाले आणि राहुल ढिकले अशा नावांचा समावेश होता. यामुळे राजकीय पातळीवर खळबळ उडाली. कोण कोणाला पाठिंबा देतोय आणि हे मॅसेज खरे आहेत काय, याबाबत मतदारांमध्ये तर्कवितर्क सुरू झाले. अनेकांनी संबंधीत पदाधिकाऱ्यांना फोन कॉल्स सुद्धा केले. एकाच वेळी शहरात हा प्रकार घडल्याचे समोर आल्याने युतीच्या पदाधिकाऱ्यांनी सायबर पोलिस ठाणे गाठले. इंटरनेटच्या माध्यमातून बीडब्ल्यू - नाशिक या सेंटर आयडीवरून नागरिकांना हे मॅसेज मिळाले. या प्रकरणी दोन्ही आमदारांसह बोरस्ते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूद्ध आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. या तिन्ही तक्रारींचा अधिक तपास पोलिस निरीक्षक कमलाकर जाधव करीत आहेत.

याबाबत सूत्रांनी स्पष्ट केले की, गुन्ह्याचा तपास सुरू आहे. काही तांत्रिक घटकांच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात येईल. मात्र, दोन ते तीन दिवसांचा कालावधी यासाठी लागतील. दरम्यान, 'राष्ट्रवादी'चे उमेदवार समीर भुजबळ यांनी देखील हा खोडसाळपणा असल्याचे सांगितले. त्या मॅसेजेसशी संबंध नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.

आचारसंहिता विभागाकडेही तक्रार

अन्य उमेदवाराला मतदान करा, असे आवाहन करणारे बल्क मेसेज शहर आणि जिल्ह्यातील राजकीय पदाधिकाऱ्यांकडून पाठविले जात असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयातील आचारसंहिता विभागाला प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. ही तक्रार शहानिशेसाठी पोलिस आयुक्तांकडे पाठविण्यात आली आहे. सायबर सेलकडून या प्रकाराचा छडा लावला जात असल्याचे आचारसंहिता कक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


छुप्या प्रचारातून मतदानाचे आवाहन

$
0
0

रात्रभर उमेदवार घेत होत गाठीभेटी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची मुदत शनिवारी (दि. २७) संपल्यानंतरही छुपा प्रचार सर्वच ठिकाणी सुरू होता. सार्वजनिक प्रचार संपला असला तरी रात्री काही उमेदवारांनी व पदाधिकाऱ्यांनी मतदारांच्या घरी जाऊन भेटी घेतल्या.

सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाच्या ४८ तास अगोदर प्रचार बंद केला जातो. त्यानंतर उमेदवार मतदानाची तयारी करत असतो. पण, ही तयारी कार्यकर्तेच करत असल्यामुळे उमेदवारांनी या संधीचा फायदा घेतला. शनिवारी व रविवारी तर मध्यरात्री पर्यंत हे छुप्या प्रचाराचे काम काही ठिकाणी उमेदवार तर काही ठिकाणी त्यांचे समर्थक करत होते.

नाशिक जिल्ह्यात नाशिक, दिंडोरी हे दोन मतदार संघ आहे. त्यात धुळे लोकसभेत तीन विधानसभा जिल्ह्यातील आहे. या सर्व ठिकाणी छुप्या प्रचाराने शनिवारी रात्रीच रंगत आली. काही ठिकाणी मतदारांच्या छुप्या पद्धतीने पार्ट्या ठेवण्यात आल्या होत्या. तर काही ठिकाणी जथ्थ्यांनी एखाद्या ठिकाणी प्रमुख लोकांना बोलावून त्यांना मतदान करण्याचे आवाहनही केले जात होते. हा छुपा प्रचार करतांना कोठेही त्याची फारशी वाच्यता होऊ नये किंवा त्या कॅमेरामध्ये कैद होऊ नये याची काळजी उमेदवार, पदाधिकारी घेत होते.

प्रत्यके लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र असल्याने सगळ्यांना भेटणे अवघड काम असते. काही ठिकाणी उमेदवार आलेच नाही, काही ठिकाणी कार्यकर्ते नाराज असे प्रकार समोर आल्याने उमेदवारांनी त्यांच्याशी काही ठिकाणी प्रत्यक्ष तर काही ठिकाणी फोनवरून संपर्क साधून त्यांची मनधरणी केली.

फोनाफोनीवर जोर

एकाच वेळी सर्वांना भेटणे शक्य नसल्याने फोनच्या माध्यमातून पदाधिकारी, मतदारांशी संपर्क करण्यात आला. याद्वारे त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले जात होते. तर काही ठिकाणी मेसेजचा वापरही केला जात होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कडक उन्हाने वाढविला उमेदवारांचा ताप

$
0
0

मतदानाची टक्केवारी घसरण्याची धास्ती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या दोन दिवसापासून उन्हाचा पारा वाढल्याने उमेदवारांची चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी उन्हामुळे कमी मतदान झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सर्वच पक्षांचे उमेदवार चिंतेत पडले आहे. सकाळच्याच वेळी अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या जात आहे.

नाशिकमध्ये आतापर्यंत निवडणुकीत तापमान सर्वसाधारण असल्याने या अगोदर याबाबत कधीही चिंता करण्यात आली नाही. पण, पहिल्यांदा आता काळजी घेण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसात उन्हाचा पारा ४२ अंशच्या पुढे गेल्याने सोमवारी तो किती असतो यावर बरंच काही अवलंबून आहे. पण, गेल्या दोन दिवसाचा पाराच असेल असा अंदाज बांधून राजकीय पक्षांनी त्याची खबरदारी घेतली आहे.

कडक उन्हाचा फटका अनेक राजकीय पक्षांनी घेतलेल्या सभांना अगोदरच बसला आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी झाली तर त्यातून निकालाचे गणितही बदलू शकते. त्यामुळे जास्तीत जास्त मतदार मतदानासाठी बाहेर कसे पडतील, यासाठी विविध योजनांही राजकीय पक्षांनी केला आहे. या उपाययोजना करतांही आचारसंहितेचा कुठे भंग होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.

घरोघरी जाणार कार्यकर्ते

लोकसभेच्या निवडणुकीत कार्यकर्ते फारसे लक्ष देत नाही. पण, यावेळेस घरोघरी कार्यकर्ते जाऊन मतदारांना सकाळी मतदान करण्यासाठी सांगणार आहे. काही ठिकाणी तर रविवारीच हे निरोप देण्यात आले आहे. त्यामुळे सकाळी रांगाही सर्वच मतदान केंद्रावर जास्त दिसणार आहे.

उन्हाचा फटका व्हीव्हीपॅटला

उन्हाचा फटका नव्याने आलेल्या व्हीव्हीपॅट मशिनलाही बसण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. तिसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानात काही ठिकाणी या मशिन बंद पडल्याची चर्चा आहे. त्यामुळे उमेदवारांप्रमाणेच निवप्णूक यंत्रणेची चिंता वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उष्म्याचा उच्चांक कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

होरपळलेल्या नाशिकच्या तापमानाचा उच्चांक रविवारीदेखील कायम राहिला. शहरात कमाल ४२.८, तर किमान २५.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. जिल्ह्यातील तापमानातही उच्चांकी वाढ होत असून, मालेगावात ४४.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. २९ एप्रिलपर्यंत मध्य व उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम असेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पाच दिवसांपासून शहराचे तापमान चाळीशी पार आहे. त्यामुळे एप्रिल अखेरीस उष्णतेच्या तीव्र झळा नागरिकांना बसू लागल्या आहेत. त्यामुळे थंड हवेचे ठिकाण असलेले शहर तप्त झाल्याचे दिसून येत आहे. हवामान विभागाच्या अभ्यासानुसार उन्हाळ्यात शहराचे कमाल तापमान ३७.६ अंश सेल्सियस इतके असणे योग्य आहे. पण, सध्याच्या बदलत्या हवामानानुसार तापमानाने गाठलेला उच्चांक रेकॉर्ड ब्रेक करणारा ठरला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २९ एप्रिलपर्यंत नाशिकसह पुणे, अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. त्यामुळे मे महिन्यातील उष्णतेचा उच्चांकही शहरातील तापमान मोडणार का, अशी चिंता नागरिकांना सतावत असल्याचे दिसून येत आहे. सकाळपासूनच उष्णतेच्या झळा बसत असल्याने नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगरांतील रस्त्यांवरही शुकशुकाट दिसून येत आहे. मेनरोड, रविवार कारंजा, शालिमार या मुख्य बाजारपेठेसह उपनगरांतील बाजारपेठाही ओस पडल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गितेंच्या सुरांची भुरळ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक दर महिन्याला घेण्यात येणाऱ्या अक्षर मानव नाशिक शाखेच्या 'अड्डा' कार्यक्रमात सुप्रसिद्ध गीतकार संगीतकार संजय गिते यांच्यासोबत गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गीते यांची ओळख करून देताना त्यांचे बालपणीचे मित्र व अक्षर मानव संविधान राज्य प्रमुख मनोहर अहिरे म्हणाले की, संगीताच्या क्षेत्रातील नाशिकमधल्या दिग्गजांपैकी एक असे संजय गीते यांनी महाराष्ट्रातल्या सर्वच गायक संगीतकारांसोबत काम केले आहे आणि तरी सुद्धा कुठलाही अहंपणा न बाळगता आपला व्यवसाय आणि सामाजिक कार्य सतत करत आले आहे. यावेळी गिते म्हणाले की, आपल्याला स्वतःला सांभाळण्यासाठी प्रत्येकाला कुणी तरी हवं असत आणि शब्दांनी, सुरांनी आपलं जीवन सांभाळलं असं ते म्हणाले. बालपणाच्या संस्कारतून मला माझ्यातलं संगीत सापडलं. महाविद्यालय जीवनात कवितेला चाली लावण्यापासून त्यांनी सुरुवात केली. मग कवी शोधून कविता गात गेलो. यावेळी त्यांनी 'ते आयुष्य तेच आहे' ही गझल गाऊन दाखवली. उपाध्यक्ष नरेंद्र सोनवणे यांनी कार्यक्रमाची सांगता करताना गाणे म्हणून आभार मानले. कवी भीमराव कोते यांना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाला विजय निपानेकर, गणेश शिंदे, प्रसाद देशपांडे, सुदाम दीक्षित, आरती शिरवाडकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारागृहातील कैदी मतदानापासून वंचित

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक व दिंडोरी लोकसभेसाठी सोमवारी (दि. २९) मतदान होत आहे. परंतु, कारागृहातील कैद्यांना मतदान करता येणार नाही. कारागृहात असेपर्यंत कैद्यांचा मतदान अधिकार कायद्याने गोठवलेला असतो.

कैद्यांमध्ये शिक्षा झालेले (पक्के कैदी) आणि कोर्टात खटला सुरू असलेले (कच्चे कैदी) असे दोन प्रकार असतात. नाशिकरोड कारागृहात साडेतीन हजार कैदी आहेत. त्यामध्ये कच्च्या कैद्यांची म्हणजे न्यायलयीन बंद्याची संख्या जास्त आहे. कैदी पक्का असो की कच्चा, त्याला मतदानाचा अधिकार नसतो. त्यामुळे कोणत्याच कारागृहातील कैद्यांना मतदान करता येणार नाही.

कैदेतून बाहेर आलेल्यांना सरकारी नोकरीदेखील मिळू शकत नाही. कारण या नोकरीत जाण्यापूर्वी पोलिस पडताळणी आवश्यक असते. कैद्याच्या नावे गुन्हा लागलेला असल्याने त्याला सरकारी नोकरी मिळू शकत नाही. मात्र, तो स्वतःचा व्यवसाय-उद्योग, खासगी नोकरी करू शकतो. कारागृहात कैद्यांच्या पुनर्वसनासाठी विविध व्यवसाय प्रशिक्षणाच्या योजना आहेत. योगा, शिक्षण आदी त्याला मिळू शकते. त्यासाठी खासगी संस्थाही मदत करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांसाठी 'ग्रीनथॉन'

रंगीत ओळखपत्रांचे आकर्षण

$
0
0

रंगीत ओळखपत्रांचे आकर्षण

पंचवटी : येथील मधुबन कॉलनी परिसरात नवमतदारांना ओळ्खपत्राचे वाटप झाले आहे. काही नवमतदारांनी ऑनलाइन अर्ज भरले होते. त्यांना कमी वेळेतच मतदार ओळखपत्र प्राप्त झाले आहे. मला ओळखपत्र मिळाले असून मी पहिल्यांदाच मतदान करणार आहे. त्याची मला मोठी उत्सुकता आहे, असे परिसरातील रहिवासी पार्थ अवधूत या नवमतदाराने सांगितले आहे. तसेच, परिसरात जुन्या मतदारांनाही नव्या रंगीत ओळ्खपत्रांचे वाटप करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रशासनाची मतसज्जता

$
0
0

धुळ्यात २८, तर नंदुरबारला ११ उमेदवार रिंगणात; पोलिस प्रशासनाची करडी नजर

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे व नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज (दि. २९) सकाळी सात वाजेपासून मतदान सुरू होणार आहे. धुळे मतदारसंघातून २८ तर नंदुरबारमधून ११ उमेदवारांचे भवितव्य आज मतदाऩ यंत्रात बंद होईल. यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासन पूर्ण सज्ज झाले असून, पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रविवारी (दि. २८) सकाळी ९ वाजता धुळे व नंदुरबार शहरातील क्रीडा संकुलात मतदान केंद्रांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रांसह इतर साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी मतदार केंद्रांपर्यंत जाण्यासाठी परिवहन महामंडळाच्या बस व खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.

धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, सटाणा अशा सहा ठिकाणी एकूण १९४० मतदान केंद्रे असून, त्यावर ११ हजार मतदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी ६७७ वाहनांचा वापर करण्यात येणार असून, त्यासर्व वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. तसेच संवेदनशील मतदान केंद्रांचे थेट प्रेक्षपण दिसणार आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात प्रशासनाकडून मतदारांना मतदान केंद्र शोधण्यासाठी ‘वोटर सर्च’ हे मोबाइल ॲप कार्यान्वित करून देण्यात आले आहे.

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण ११ हजार अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यातील ९ हजार ७०० जणांना केंद्रांवर कार्यान्वित करण्यात आले आहे. तर उर्वरित १ हजार ४५५ कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. उन्हामुळे किंवा अन्य कारणामुळे कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर त्यांना निुयक्त करण्यात येणार आहे. मतदान केंद्रापर्यत अधिकारी कर्मचारी तसेच दिव्यांग मतदारांना आणण्यासाठी ६७७ वाहनांची व्यवस्था प्रशासनाने केली आहे.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय एक याप्रमाणे ६ दिव्यांग व ६ सखी मतदान केंद्रे असणार आहेत. धुळे लोकसभा मतदारसंघात २४८७ ईव्हीएम असून, या मतदारसंघात १८१ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. त्या केंद्रांवर नजर ठेवण्यासाठी १८२ झोनल अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्याठिकाणी कोणतीही अनूचित घटना होऊ नये यासाठी प्रशासनाकडून सज्जता ठेवण्यात आली आहे.

धुळ्यासाठी १९४० केंद्रे
धुळे लोकसभा मतदारसंघात या वेळी १७२ मतदान केंद्रे वाढली आहेत. त्यामुळे एकूण मतदान केंद्रांची संख्या आता १ हजार ९४० झाली आहे. आयोगाच्या सुचनेनुसार मतदान केंद्रांत पाणी, वीज, शौचालय, रॅम्प आदी सुविधा पुरवाव्या लागणार आहेत. तर दिव्यांग मतदारांसाठी वाहनांची व्यवस्थादेखील केली जाणार आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात सन २०१४ च्या तुलनेत मतदारांच्या संख्येत वाढ झाली असून, मतदान केंद्रांची संख्यादेखील १ हजार ७६८ वरुन १ हजार ९४० झाली आहे. एका केंद्रावर सुमारे १ हजार ४०० मतदारांना मतदान करता येईल. मतदारांच्या सोयीसाठी ३ हजार २०० स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे.

विधानसभानिहाय मतदान केंद्रे
धुळे ग्रामीण - ३७३
धुळे शहर - २९८
शिंदखेडा - ३४०
मालेगाव मध्य - ३१६
मालेगाव बाह्य - ३२९
बागलाण - २८४

धुळे लोकसभा मतदारसंघ
एकूण मतदार - १९ लाख ४ हजार ८५९
पुरुष मतदार - ९ लाख ९३ हजार ९०३
महिला मतदार - ९ लाख १० हजार ९३५

नंदुरबारला २११५ मतदान केंद्रांवर साहित्य रवाना
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, धडगाव, साक्री या सहा ठिकाणी आज (दि. २९) २११५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार आहे. यासाठी १० हजार ४७५ मतदान केंद्र अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून, उन्हाच्या झळांनी यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठीदेखील निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. या मतदारसंघात सात ठिकाणी सखी मतदार केंद्रे उभारण्यात आली असून, त्याची सर्व जबाबदारी महिला कर्मचारी पाहणार आहेत. तसेच सहा आदर्श मतदान केंद्रदेखील आहेत.

सखी मतदान केंद्रांसह दिव्यांगांना सुविधा
मतदान केंद्रावर साहित्य घेऊन जाण्यासाठी रविवारी (दि. २८) मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ११८ एसटी, ५०६ जीप, १५ ट्रक आणि ३ बोटींचा उपयोग करण्यात आला. बोटीद्वारे धडगाव तालुक्यातील माणबेली, चिमलखेडी, धनखेडी, मुखडी, डनेल, गमण, भादल, उडघा आणि बाभरी या मतदान केंद्रांवर मतदार अधिकाऱ्यांनी साहित्य पोहोचवले. या वेळी मतदान केंद्रांवर प्रशासनाकडून दिव्यांगांना विशेष सुविधा पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये केंद्रावर रॅम्प, व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, शौचालय, बसण्याची सुविधा असणा आहे. तसेच गरोदर महिला, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मतदान करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघ
एकूण मतदार - १८ लाख ७० हजार ११७
पुरुष मतदार - ९ लाख ४३ हजार ७४५
महिला मतदार - ९ लाख २६ हजार ३५०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खान्देशात सूर्याचा ‘ताप’

$
0
0

जळगाव, धुळ्यात कमाल पारा ४५ अंशावर

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून उन्हाचा पारा पुन्हा वाढला असून, नागरिकांना या झळा असह्य होत आहेत. शहराचे रविवारी (दि. २८) तापमान भारतीय हवामान संकेतस्थळानुसार कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर धुळे, नंदुरबारलाही कमाल तापमान ४५ अंशावर गेल्याने उन्हाच्या चटक्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. एप्रिल महिन्यातच हे तापमान असल्याने मे महिन्यात सूर्य किती तळपणार याबाबतची चर्चा सुरू आहे. तीन दिवस उष्णतेची लाट असल्याचा इशाराही सूत्रांकडून देण्यात आला असून, नागरिकांनी दुपारच्या वेळी महत्त्वाच्या कामालाच बाहेर निघावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

जळगाव शहरात सकाळपासून ऊन जाणवत असून, सकाळी १० वाजेपासून सूर्य तापायला सुरुवात होत आहे. शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांत स्मार्टफोननुसार कमाल तापमान हे ४६ ते ४७ अंशांपर्यंत गेल्याचे पाहायला मिळत आहे. चोपडा, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, जामनेर या तालुक्यात तापमानाने चाळीिशी कधीच पार केलेली आहे. याठिकाणी पाणीटंचाईच्याही झळा नागरिकांना सहन कराव्या लागत असून, आता उन्हाने त्यात भर टाकली आहे.

उद्यानात गर्दी
आता एप्रिल महिना सुरू असून, मे महिन्यात अजून परिस्थिती बिकट होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे अजून दोन-तीन आठवडे उन्हाची तीव्रता जाणवणार असून, भारतीय संकेतस्थळानुसार येत्या तीन दिवसांत कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसवर राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. वाढत्या शहरातील नेहमी गजबजणारे रस्ते सध्या ओस पडले आहेत. सायंकाळी सहा वाजेनंतरच नागरिक आपल्या कामासाठी बाहेर पडत आहेत. शहरातील अनेक उद्याने ही पहाटेपासूनच खुली करण्यात आल्याने लहानग्यांना आणि ज्येष्ठांना दिलासा मिळाला आहे. शाळांनाही सुट्या लागल्याले उद्यानात बालगोपाळ, ज्येष्ठ गर्दी करीत आहेत.

धुळे, नंदुरबारही ‘ताप’दायक
धुळे : धुळे आणि नंदुरबार शहरातही उन्हाचा पारा हा ४५ अंशांवर गेला असून, जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात तापमानाने केव्हाच चाळिशीपार केली आहे. सामान्य नागरिक महत्त्वाच्या कामानांच घराबाहेर पडत असल्याने रस्तेही निर्मनुष्य झाले आहेत. उन्हाच्या तडाख्यात दिलासा मिळण्यासाठी खंडगार पेयांना मागणी वाढली असून, चौकाचौकांत शीतपेयांची दुकाने गर्दीन फुलू लागली आहेत. ऊसाचा रस, लिंबू सरबत, कोल्ड्रिंक्सना नागरिकांनी पसंती दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वास्तव्य नाशिकला, मतदान येवल्याला!

$
0
0

प्रशासनाच्या गलथानपणामुळे तरुणी मतदानापासून वंचित

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, ते पार पाडण्यासाठी जीवाचे रान केले जाते. अपंग व्हीलचेअरवर येतात, कुणी सलाईन लावून येते तर कुणी अक्षरश: स्ट्रेचरवरदेखील येते. परंतु, आपण नाशिकला वास्तव्यास असून, मतदान दुसऱ्या गावाला गेले तर...! पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावयाचा असतो, त्यासाठी खूप तयारीही केलेली असते, पण आपले नाव यादीत नाहीच असे कळल्यावर त्या प्रथम मतदाराची काय अवस्था झाली असेल याची कल्पना न केलेलीच बरी. नाशिकमधील एका तरुणीच्याबाबत ही घटना घडली.

रविवार कारंजा परिसरात राहणाऱ्या वैष्णवी गायकवाड या तरुणीचे हे प्रथमच मतदान होते. त्याबाबत तिच्या खूप आशा-आकांक्षा होत्या. आता आपण मतदान करणार, लोकप्रतिनिधी निवडण्याची संधी आपल्याला संविधान देत आहे, वगैरे कल्पना सुरू असतानाच बी. डी. भालेकर केंद्रावर येऊन आपल्या नावाबाबत चौकशी केली असता, तिचे नाव येवला तालुक्यात गेले असल्याचे तिला कळाले. परंतु, नाशिकला मध्यवर्ती भागात रहात असताना नाव येवल्याला गेलेच कसे असा प्रश्न तिने अधिकाऱ्यांना केला असता, कुणीही तिला उत्तर देऊ शकले नाही. वैष्णवीने वारंवार चौकशी करूनही तिला याबाबत कुणीही समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे तिचा संताप अनावर होऊन तिने मतदान करणारच असा पवित्रा घेतला मात्र कागदोपत्री असणाऱ्या व्यवस्थेने तिला तो अधिकार दिला नाही. केवळ प्रशासनाच्या गलथानपणामुळे वैष्णवी गायकवाड हिला मतदानापासून वंचित रहावे लागले.

...

मी रविवार कारंजा परिसरात रहायला असूनही माझे मतदान येवला तालुक्यात कसे गेले हे कळतच नाही. माझे पहिले मतदान होते, त्याबाबत मला खूप आशा होत्या. मला तो हक्क बजावता आला नाही याचे मला खूप दु:ख होत आहे.

- वैष्णवी गायकवाड, मतदानापासून वंचित राहिलेली तरुणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हीव्हीपॅटमुळे मतदानास वेळ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ईव्हीएमच्या वापराबाबत होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर प्रथमच व्हीव्हीपॅट या यंत्रांचा वापर करण्यात आला. मतदाराने ज्या उमेवादवाराला मतदान केले, त्याची स्लिप यात दिसत होती. मतदारांच्या डोक्यातील ईव्हीएमचा गोंधळ यामुळे दूर झाला. मात्र, प्रत्येक मतदाराचा मतदान केंद्रातील सरासरी कालावधी यामुळे वाढला. याचा परिणाम मतदारांच्या रांगा वाढण्यात दिसून आला.

व्हीव्हीपॅट ही यंत्रणा प्रथमच वापरण्यात आली. तंत्रज्ञानाआधारित ही यंत्रणा वातानुकुलीत वातावरणात वापरण्यास योग्य ठरते. मात्र, थंड हवामान नसल्यास ही यंत्रे गरम होऊन बंद पडण्याचा धोका असतो. निवडणूक कर्मचारी याच धसक्यात होते. शहर आणि जिल्ह्यात चार हजार ७२० व्हीव्हीपॅटची आवश्यकता असताना प्रशासनाला पाच हजार ९६९ व्हीव्हीपॅट उपलब्ध करून ठेवावे लागले. सुदैवाने सोमवारी तपमान ३९.२ अंश सेल्सिअस इतक राहिले. रविवारी पारा ४२.८ इतका होता. पारा अचानक उतरल्याचा फायदा व्हीव्हीपॅट यंत्रांना झाला. या यंत्रांबाबत फारशा तक्रारी समोर आल्या नाहीत. दरम्यान, पहिल्यांदाच हा प्रयोग झाल्याने मतदारांमध्ये संभ्रम होता. मतदानासाठी गेलेल्या मतदाराने ईव्हीएमवर उमेदवारासमोरील बटण दाबले की पाच ते सात सेकंदांच्या अंतराने व्हीव्हीपॅटमध्ये स्लिप दिसून येत होती. ही स्लिप खाली पडली की पुन्हा काही सेकंदाने 'बीप' आवाज ऐकू येत होता. अनेक मतदार हा आवाज ऐकू येईपर्यंत मतदान कक्षाच्या दरवाजापर्यंत पोहचत होते. 'बीप' आवाज पूर्ण बंद होऊन मशिन दुसऱ्या मतदानासाठी तयार होत नाही, तोपर्यंत केंद्रप्रमुख दुसऱ्या मतदाराला मतदानासाठी सोडत नव्हते. बऱ्याचदा मतदार व्हीव्हीपॅटमधून स्लिप बाहेर पडते की काय, याची वाट पाहत बसले. वृद्ध मतदारांना हा आवाज पुरेसा ठरत नव्हता. व्हीव्हीपॅटबाबत मतदारांमध्ये फारशी जनजागृती नसल्याने एका मतदानासाठी सरासरी वेळ वाढला. याचा परिणाम मतदारांच्या रांगामध्ये दिसून आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा आयुक्त मतदान

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images