Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

येवल्यात प्रशासन सज्ज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि.२९) होणाऱ्या मतदानाची निवडणूक यंत्रणेच्यावतीने जय्यत तयारी सुरू आहे. या लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या येवला विधानसभा मतदारसंघातील विविध ३१६ मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रे व साहित्य सामग्री घेऊन मतदान कर्मचारी रविवारी सकाळी येवला तहसील कार्यालयातून मतदान केंद्रांकडे निघणार आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. २७) येवला तहसील कार्यालयाच्या इमारतीत मतदान केंद्रनिहाय आवश्यक असलेले मतदान साहित्य पेटीबंद करण्यासाठीची निवडणूक यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची लगबग दिसत होती. मतदान केंद्रावर मतदारांच्या बोटावर लावण्यासाठीची शाई, मतदान केंद्राध्यक्षांसाठीची पुस्तिका, पावती पुस्तक, बिल्ले, विविध नमुन्यातील तक्ते आदी लेखनसामग्री मतदान केंद्रनिहाय स्वतंत्रपणे बांधाबांध करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोसवेना दाह!

$
0
0

\Bरेकॉर्ड ब्रेक तापमान; पारा ४२.७ अंश सेल्सियसवर \B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे नाशिक उष्णतेने होरपळून निघाले असून शनिवारी कमाल ४२.७, तर किमान २८.६ अंश सेल्सियस नोंदविले गेले. २०१० ते २०१८ या कालावधीत एप्रिल महिन्यात तापमानाने इतका उच्चांक गाठला नव्हता. त्यामुळे यंदाचे तापमान रेकॉर्ड ब्रेक ठरले आहे. जिल्ह्यातही कडाका ‌वाढला असून मालेगावात ४४.६, तर येवल्यात ४३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मध्य व उत्तर महाराष्ट्रात १ मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

नाशिकच्या तापमानाने गेल्या चार दिवसांपासून चाळीशी ओलांडली आहे. एप्रिलमध्ये मेप्रमाणे उष्णतेचा कडाका जाणवू लागल्याने नागरिक हैराण आहेत. हवामान विभागाच्या नोंदीनुसार ४ मे २००२ मध्ये ४३.९ अंश सेल्सिसय तापमान नोंदविण्यात आले होते. सध्याचे बदलते हवामान लक्षात घेता यंदा नाशिकचे तापमान मे महिन्यात ४४ अंश सेल्सिपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. नाशिकसह जळगाव, अहमदनगर, येवला, मालेगाव या ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहणार असून तापमानाचा पारा अधिक वाढणार आहे.

\B

सिव्हिलमध्ये उष्माघात वार्ड\B

‌वाढत्या तापमानाने उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उष्माघाताचा विशेष वार्ड सुरू करण्यात आला आहे. अशक्तपणा वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जिल्हा रुग्णालयातील उष्माघात वॉर्डातून तपासणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

\Bरात्री तापमान जास्त! \B

कोकणसह गोव्यामध्ये येत्या दोन दिवसांत काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळ्याची शक्यता आहे. हवामानातील या बदलाचा परिणाम मध्य व उत्तर महाराष्ट्रात होईल. तसेच तापमान अधिक वाढेल, असे हवामान विभागाने सांगितले.

\B९ वर्षांतील सर्वाधिक तापमान (एप्रिल महिना)

वर्ष............... कमाल.......... किमान

\B२०१८........... ४०.५............. २४.८

२०१७........... ४१.०............. २२.४

२०१६........... ४१.०............. २४.०

२०१५........... ४०.६............. २५.०

२०१४........... ३९.७............. २३.४

२०१३........... ४०.०............. २३.०

२०१२........... ४०.०............. २३.०

२०११........... ४०.४............. २३.०

२०१०............ ४२.०.............२५.०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राहुल गांधींच्या विमानाचे पायलट रुसतात तेव्हा...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वैमानिकांच्या बॅगा तपासण्याच्या कारणावरून ओझर विमानतळावर शनिवारी सकाळी मानापमान नाट्य रंगले. 'एसपीजी'च्या अधिकाऱ्यांनी बॅगा तपासण्याबाबत आक्रमक भूमिका घेतल्याने वाद उद्भवला. 'एसपीजी'चे अधिकारी माफी मागत नाहीत तोपर्यंत विमानाचे उड्डाण होणार नाही, असा पवित्रा वैमानिकांनी घेतल्याने पेच निर्माण झाला होता. अखेर राहुल गांधी यांनी वैमानिकांची समजूत काढल्यानंतर हे विमान अमेठीकडे झेपावले.

जाहीर सभेच्या निमित्ताने काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी दुपारी ओझर विमानतळावर उतरले होते. तेथून ते हेलिकॉप्टरने संगमनेरला गेले. संगमनेरची सभा आटोपल्यानंतर गांधी अहमदनगर जिल्ह्यातच मुक्कामी होते. शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ते पुन्हा ओझर विमानतळावर पोहोचणार होते. तत्पूर्वी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या (एसपीजी) पथकाने गांधी यांच्या विमानाची तपासणी सुरू केली. वैमानिकांच्या बॅगाही त्यांनी तपासणीसाठी मागितल्या. परंतु, त्यांच्या या मागणीबाबत वैमानिकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे 'एसपीजी'चे अधिकारी आणि वैमानिक यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. हा वाद टोकाला गेला. 'एसपीजी'च्या अधिकाऱ्यांनी माफी मागावी, अशी मागणी करीत वैमानिक तेथून बाजूला निघून गेले. परंतु, आम्ही आमचे कर्तव्य करीत आहोत. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, असा पवित्रा 'एसपीजी'च्या अधिकाऱ्यांनी घेतला. माफी मागत नाही तोपर्यंत विमानाचे उड्डाण करायचे नाही, अशी भूमिका वैमानिकांनी घेतली. राहुल गांधी यांना निरोप देण्यासाठी विमानतळावर पोहोचलेले काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर आणि अन्य काही पदाधिकारी हा सर्व प्रकार पाहत होते. काही मिनिटांतच राहुल यांचे हेलिकॉप्टरने ओझर विमानतळावर आगमन झाले. वैमानिक दृष्टीस पडत नसल्याने त्यांनी चौकशी केली. 'एसपीजी'च्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या वादाची माहिती त्यांना काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली. त्यानंतर राहुल यांनी वैमानिकांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली. त्यानंतर वैमानिकांनी विमानाच्या उड्डाणास सहमती दर्शविली.

'एचएएल'च्या फायर ब्रिगेडशी संवाद

शुक्रवारी दुपारपासून विमान एकाच जागी थांबून होते. त्यामुळे ते सुरू होण्यास १५ ते २० मिनिटांचा अवधी लागेल, असे वैमानिकांकडून राहुल गांधी यांना सांगण्यात आले. विमानतळावर एका बाजूला 'एचएएल'च्या फायर ब्रिगेडचे पथक सज्ज असल्याचे गांधी यांनी पाहिले. त्यांनी या पथकाच्या दिशेने धाव घेतली. पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी हस्तांदोलन केले. त्यांच्याशी संवाद साधून अग्निशामक दलाच्या अद्ययावत वाहनाच्या वैशिष्ट्यांची माहिती घेतली. त्यानंतर सर्वांना अलविदा करीत ते विमानाने अमेठीकडे मार्गस्थ झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोळसा कारखान्यास सिन्नरमध्ये भीषण आग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

माळेगाव एमआयडीसीतील अंगद इंडस्ट्रीज या कारखान्याला शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. यात कारखान्यातील कोळशाच्या चारकोल पावडर कंपनीचे शेडचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कामगारांच्या सतर्कतेमुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही.

माळेगाव औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नंबर, डी ५४ मधील अंगद कारखान्याला दुपारच्या सुमारास अचानक भीषण आग लागली या कारखान्यात दगडी कोळसा पासून चारकोल पावडरची निर्मिती करण्यात येते. अचानक लागलेल्या आगीत दगडी कोळशाचे व चारकोल पावडरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पत्र्याचे शेडही जळून खाक झाले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच माळेगाव औद्योगिक वसाहतीतील बंबासह नाशिकरोड व इंडिया बुल्स येथील चार बंबाच्या सहाय्याने ही आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. दुपारी साडेबारा वाजता लागलेली आग सायंकाळी साडेपाच वाजता आटोक्यात आली. यावेळी चारकोल पावडर आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन बंबाचे फायर ऑफिसर पी. आर. घोलप, पी. के. चौधरी, पी. पी. पाटील, पी. एस. वाखारे, एन. टी. पदिर यांनी परिश्रम घेतले. मुसळगाव पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कथा, पटकथा, दिग्दर्शनाचे मिळाले धडे

$
0
0

केदार शिंदे यांनी केले बहुमोल मार्गदर्शन

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चित्रपटाची कथा कशी लिहिली जाते, पटकथा म्हणजे काय, दिग्दर्शनासाठी कोणते सायास करावे लागतात याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले ते सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी. निमित्त होते स्पंदन मीडिया ॲण्ड इव्हेंट्स आणि विश्वास ग्रूप आयोजित कलारंभ कार्यशाळेचे.

केदार शिंदे यांनी चित्रपट बनवण्याचे काही किस्से, भरत जाधव तसेच मोहन जोशी यांच्याबाबत घडलेले काही किस्से सांगितले. गलगले हे पात्र भरतला कसे सुचले याबाबतची मोठी रंजक गोष्ट त्यांनी सांगितली. एका हॉटेलमध्ये असलेला वेटर हे सर्व बोलत असतो, गलगले आले, गलगले गेले त्यातून निरीक्षणाने भरतने हे पात्र शोधले. अनेकांना ते करून दाखवले मात्र कुणीही तितकीशी दखल घेतली नाही परंतु, शिंदे यांच्याकडे हे पात्र आल्यावर त्यांनी त्याचे सोने केले.

या कार्यशाळेत वाचिक अभिनय म्हणजे काय, दिग्दर्शनाच्या काही टिप्स, काही एक्सरसाइज, लिखाणाच्या काही टिप्स शिंदे यांनी सांगितल्या. दोन बॅचेसमधे ही कार्यशाळा झाली. नाटक, सिनेमा वा टेलिव्हिजन क्षेत्रात काम करताना काय दृष्टिकोन कलाकाराकडे असावा याबद्दल सकाळच्या सत्रात मार्गदर्शन करण्यात आले. दुपारच्या सत्रात प्रात्यक्षिकासह लेखन, दिग्दर्शन अभिनय यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

..

आज कार्यशाळा; व्हा सहभागी

नाशिकमधील तरुण कलाकारांसाठी अभिनय, लेखन, दिग्दर्शन, कॅमेरा व इतर तांत्रिक विभागांत काम करू इच्छिणाऱ्या कलाकारांसाठी मास्टर क्लास विथ केदार शिंदे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र टाइम्स या कार्यक्रमाचे कल्चरल पार्टनर आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता केदार शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. आज (२८ एप्रिल) सकाळी ९ ते १ आणि दुपारी ४ ते ८ या वेळेत विश्वास क्लब हाऊस, गंगापूर रोड येथे ही कार्यशाळा होणार आहे. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या सदस्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी १५०० रुपये, तर इतरांसाठी २००० प्रवेश शुल्क आहे. याच शुल्कात चहा व उपहारही समाविष्ट आहे. कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. रजिस्ट्रेशनसाठी ९९२२९९५९३२ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांचा खडा पहारा

$
0
0

तीन हजाराची कुमक तैनात; परराज्यातूनही मागविले बळ

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर आणि परजिल्ह्यातील असा तीन हजाराहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रविवारी सकाळी मतदान केंद्रांचे वाटप सुरू झाल्याबरोबर या पोलिसांचे काम सुरू होणार आहे.

शहरात एकूण एक हजार २१७ मतदान केंद्रे आहेत. संवेदनशील मतदान केंद्र तसेच कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याच्या दृष्टिकोनातून बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. मतदानाबरोबर ईव्हीएम मशिन्स ठेवण्यात येणाऱ्या अंबडच्या वेअर हाऊस येथेही बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. ४६ सीसीटीव्ही, ७ वॉच टॉवर्स, ६ क्युआरकोड सिस्टिम यासाठी वापरण्यात येणार आहे. २३ मेपर्यंत येथील सुरक्षाव्यवस्था कायम राहणार आहे. संवेदनशील मतदान केंद्राची माहिती देताना आयुक्त नांगरे पाटील म्हणाले की, आडगाव व नाशिकरोड येथे प्रत्येकी एक तर सरकारवाडा हद्दीत १५, भद्रकाली १७, अंबड ११ आणि उपनगर ३ असे ४८ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. त्याठिकाणी मध्य प्रदेश पोलिसांची एक कंपनीच तैनात करण्यात आली आहे. निवडणुककाळात सत्तर टक्के पोलिस अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर प्रत्यक्ष बंदोबस्तात असतील असे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी आयुक्तालय पोलिस वगळता अन्य ठिकाणाहून अधिकाऱ्यांसह ६६६ पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या जोडीला सीआरपीएफच्या २ प्लॅटून, मध्य प्रदेश पोलिसांच्या तीन कंपन्या आणि एसआरपीएफच्या २ कंपन्या आणि एक प्लॅटून असा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यामुळे एकूण २५७५ शिपाई रस्त्यावरच्या बंदोबस्तात तैनात राहणार आहेत.

बंदोबस्ताचे स्वरूप

पद पोलिस आयुक्तालय बाहेरील बंदोबस्त एकूण

पोलिस आयुक्त १ ० १

पोलिस उपायुक्त ३ १ ४

एसीपी ३ ६ ९

पोलिस निरीक्षक ३५ ९ ४४

एपीआय/पीएसआय १०० ६० १६०

कर्मचारी २०१५ ५५० २५७५

होमगार्ड्स ०० ६६६ ६६६

--

मध्य प्रदेश पोलिस-तीन कंपनी

सीआरपीएफ-दोन प्लाटून

एसआरपीएफ-दोन कंपनी आणि एक प्लाटून

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हनुमान चालिसा’वर चिन्मय मिशनतर्फे प्रवचने

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

चिन्मय मिशनच्या नाशिक शाखेतर्फे दि. १ ते ७ मे या कालावधीत नाशिक शाखेचे आचार्य परमपूज्य स्वामी अद्वैतानंद यांची 'हनुमान चालिसा' या विषयावर हिंदीतून प्रवचने आयोजित करण्यात आली आहेत.

गंगापूररोडवरील श्री कुर्तकोटी सभागृह शंकराचार्य न्यास येथे दररोज सायंकाळी साडेसहा ते रात्री आठ या वेळेत ही प्रवचने होतील. महाराष्ट्रात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेले भीमरुपी स्तोत्र आणि मनाचे श्लोक हे घरोघरी म्हटले जातात. त्याप्रमाणे उत्तर प्रदेशात श्री हनुमान चालिसा अत्यंत लोकप्रिय आहे. या हनुमान चालिसावर हिंदी भाषेतून प्रवचने स्वामी अद्वैतानंद देणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन चिन्मय मिशनच्या नाशिक शाखेतर्फे करण्यात आले आहे. स्वामी अद्वैतानंद हे उच्चविद्याविभूषित बीई मेकॅनिकल इंजिनीअर असून, चिन्मय मिशनचा वेदांत कोर्स करून त्याचे आचार्यपद त्यांनी भूषविले आहे. हिंदी व इंग्रजी भाषेमधील देशातील आणि विदेशात अमेरिकेतदेखील विविध केंद्रांचे त्यांनी यशस्वी संचालन केले आहे. श्रीमद् भागवत, श्रीरामायण, श्रीमद भगवद्गीता, उपनिषदे, दासबोध व संत साहित्यावर ते प्रवचने देतात. स्वतः हार्मोनियमच्या स्वरांवर सुमधुर भजने म्हणतात. या प्रवचनमालेस उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. विलास औरंगाबादकर, मिलिंद वैद्य, वृंदा राठी, जिवराम गावले आदींनी केले आहे.

---सिंगल---

शिखरेवाडी मैदानातील ग्रीन जिमकडे दुर्लक्ष

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

येथील गंधर्वनगरीतील शिखरेवाडी मैदानातील ग्रीन जिमकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याची नागरिकांची तक्रार आहे.

एरवी मोठी गर्दी होणाऱ्या शिखरेवाडी मैदानावर सुटीमुळे आणखी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. जॉगिंगपासून विविध खेळांच्या सुविधा या मैदानावर उपलब्ध आहेत. सकाळी व सायंकाळी मिळून शेकडो नागरिक, व्यायामपटू, खेळाडू या मैदानाचा वापर करतात. या मैदानावर ग्रीन जिमदेखील आहे. मात्र, या ग्रीन जिमकडे महापालिकेसह नगरसेवकांचे दुर्लक्ष झाल्याची नागरिकांची तक्रार आहे. या जिमचे व्यायामाचे साहित्य मोडकळीस आले आहे. मैदानावर कचऱ्याचीही समस्या असून, झाडांचा पालापाचोळा काढण्यासाठी या ठिकाणी नियमित स्वच्छता कर्मचारीच येत नसल्याची स्थिती आहे. येथील कचरा उचलला जात नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रीन जिमचे साहित्य दुरुस्त करून या मैदानाची नियमित स्वच्छता ठेवावी, अशी मागणी व्यायामपटू व नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकींची धडक; एक ठार, दोन गंभीर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

देवळा-कळवण मार्गावर मटाणे गावाजवळ दोन दुचाकींची शुक्रवारी (दि. २६) सायंकाळी समोरासमोर धडक होऊन एक जण ठार तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींमधील दोन जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सरस्वती वाडी (ता. देवळा) येथील बाळू खंडू वाघ हे वडील खंडू वाघ यांच्यासोबत बजाज डिस्कव्हर या दुचाकीवरून (एमएच ४१ एएफ १७३२) कळवणकडून देवळा शहराकडे जात होते. राजेंद्र रामदास माळी (वय ३०, रा. शिरसमणी, ता. कळवण) आणि बाळू गणपत गांगुर्डे (वय ४०, रा. कळमथे, ता. कळवण) हे स्प्लेंडर प्रो दुचाकीवरून (एमएच १५ डीव्ही १७६१) देवळ्याकडून कळवणच्या दिशेने येत होते. दोन्ही दुचाकींची मटाणे गावाजवळ समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला. यात बाळू वाघ (वय ५५) हे जागीच ठार झाले तर सोबत असलेले त्यांचे वडील खंडू वाघ (वय ८५) हे किरकोळ जखमी झाले. समोरील दुचाकीवरील राजेंद्र माळी व बाळू गांगुर्डे हे डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाले. त्यांना मालेगाव येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, दोन्ही दुचाकींवरील चालकांनी हेल्मेट परिधान केलेले नव्हते. त्यामुळे डांबरी रस्त्यावर पडून मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने बाळू वाघ यांच्यावर मृत्यू ओढवला तर दोघे गंभीर आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक आर. एम. राठोड व अशोक फसाले अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वातावरण तापले; प्रचार थंडावला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात गेल्या २५ दिवसांपासून सुरू असलेला निवडणूक प्रचाराचा धुरळा शनिवारी सायंकाळी अखेर शांत झाला. 'आव्वाज कुणाचा' इथपासून तर महायुती आणि महाआघाडीच्या नेत्यांमधील एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी थंडावल्या आहेत. मात्र, जाहीर प्रचार संपला असला तरी मतदारांना विविध आमिषे दाखविणे आणि मतपरिवर्तन करण्यासाठी छुप्या बैठकांना आता जोर येणार आहे. शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी शक्तिप्रदर्शनावर जोर दिल्याचे चित्र पहायला मिळाले.

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघाची निवडणूक प्रचाराची सांगता शनिवारी सायंकाळी ६ वाजता झाली. दोन्ही मतदारसंघांसाठी येत्या २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण १८ उमेदवार असले तरी, मुख्य लढत शिवसेनेचे हेमंत गोडसे, राष्ट्रवादीचे समीर भुजबळ, वंचित आघाडीचे पवन पवार आणि अपक्ष उमेदवार अॅड. माणिकराव कोकाटे यांच्यात होणार आहे. दिंडोरीत आठ उमेदवार असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनराज महाले, भाजपच्या डॉ. भारती पवार आणि माकपचे जे. पी. गावित यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. २ एप्रिलपासून नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती, तर १२ एप्रिल रोजी माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले होते. नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत मुख्य लढत रंगेल अशी स्थिती असतानाच अपक्ष माणिकराव कोकाटे आणि वंचित आघाडीचे पवन पवार यांनी निवडणुकीत रंगत आणली. गेल्या वेळच्या पराभवामुळे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे, तर शिवसेनेनेही भुजबळांचा पराभव करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. दिंडोरीतही भाजप आणि राष्ट्रवादीतल्या उमेदवारांच्या अदलाबदलीमुळे आधीच वातावरण तापले असताना, माकपच्या जे. पी. गावितांनीही रिंगणात उडी घेतल्याने लढत तिरंगी झाली आहे. गेल्या पधंरा दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, वंचित आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर या दिग्गज नेत्यांसह राज्यातील मंत्री आणि राजकीय नेत्यांच्या सभांनी जिल्ह्याचे वातावरण चांगलेच तापवले होते. मोदी, पवार, ठाकरे, फडणवीस यांनी केलेल्या एकमेकांवरील आरोपांमुळे शेवटच्या टप्प्यात का होईना, जिल्ह्यात इलेक्शन फिवर जाणवला. या सभांमुळे महायुतीची हवा निर्माण झाली असली तरी, शरद पवारांनी नाशिकमध्ये तीनदा तळ ठोकला तर, राज ठाकरेंच्या सभेने मोदीविरोधी वातावरण तयार करण्यात महाआघाडीला यश आल्याचे चित्र आहे. निवडणुकीतून विकासाचा मुद्दा बाजूला पडल्याने केवळ आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींना मतदार कसा कल देतात, याकडे लक्ष लागून आहे. शनिवारी मुख्यंमंत्र्यांनी सभा घेऊन यात रंग भरला. काल सायंकाळी सहा वाजेनंतर जाहीर प्रचाराची सांगता झाली.

आता छुप्या प्रचाराला जोर

शनिवारी रात्रीपासूनच छुप्या प्रचाराला जोर आला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी आमिषे दाखविण्यासह मत परिवर्तनासाठी उमेदवारांकडून फिल्डींग लावली जात आहे. शनिवार आणि रविवारी रात्री गुप्तपणे प्रचाराचा खेळ सुरू राहणार आहे. उमेदवारांकडून आणि त्यांच्या समर्थकांकडून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर जोर दिला जाणार आहे. यात नात्यागोत्यांची गणितेही मांडली जाणार आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी लक्ष्मीदर्शनावरही जोर दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाची एक दिवस आणि दोन रात्री कसोटी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवबाभळीचा बुधवारी अडीचशेवा विशेष प्रयोग

$
0
0

महाराष्ट्र दिनी रसिकांसाठी खास मेजवानी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मराठी रंगभूमीवर अढळस्थानी विराजमान झालेल्या देवबाभळी या संगीत नाटकाचा बुधवारी, १ मे रोजी महाकवी कालिदास कलामंदिर येथे सायंकाळी ५ वाजता अडीचशेवा प्रयोग होणार आहे. २०१८ मधील सर्वाधिक पुरस्कार मिळवणारे हे नाटक होय.

२०१८ वर्षातले नाट्यसृष्टीतले सर्वच पुरस्कार या नाटकाने पटकावले. सर्वाधिक ३९ पुरस्कारप्राप्त हे नाटक केवळ गेल्या वर्षातलेच नव्हे, तर शतकातले सर्वोत्कृष्ट नाटक आहे असा 'कलारजनी बोरिवली' सोहळ्यात गौरव केला गेला होता. श्रीराम लागू, विजया मेहता, भालचंद्र नेमाडे, नाना पाटेकर, अरुणा ढेरे असे अनेक सिनेनाट्य-साहित्य क्षेत्रातले दिग्गजांनी या नाटकाच्या पाठीवर शाबासकीची थाप दिलेली आहे. याशिवाय हिंदी रंगभूमीवरचे परेश रावल, अपारा मेहता, नसिरुद्दीन शाह आणि असे अनेक कलाकारांनी पण या नाटकाचा अद्भूत कलाकृती म्हणून गौरव केला आहे. हरिप्रसाद चौरासिया, देवकी पंडित, अशोक पत्की असे संगीत क्षेत्रातले कितीतरी दिग्गजांनी सुद्धा या नाटकातल्या संगीत आणि गायनाचं भरभरून कौतुक केले आहे. शरद पवार, विनय सहस्त्रबुद्धे, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, बाळासाहेब थोरात, नीलम गोऱ्हे, विश्वनाथ महाडेश्वर असे विविध पक्षातले दिग्गज राजकीय नेत्यांनाही या नाटकाने भूरळ घातली आहे.

अल्पावधीतच आता हे नाटक अडीचशे प्रयोगांचा टप्पा गाठत आहे. याबद्दल सगळीकडे त्याचे कौतुक होत आहे. महाराष्ट्र दिनाला म्हणजेच १ मे रोजी कालिदास कलामंदिर येथे सायंकाळी ५ वाजता हा अडीचशे प्रयोगाच्या उंबरठ्यावरचा हा प्रयोग साजरा होणार आहे. नाशिकच्या मातीतूनच निघालेले हे अस्सल सोनं नाशिकच्या रसिकांच्या साक्षीने पुन्हा एकदा महाराष्ट्र दिन साजरा करणार आहे. आजच्या काळात संगीत नाटकाने इतक्या कमी वेळेत अडीचशेच्या उंबरठ्यावर पोहचणे ही दुर्मिळ घटना आहे. नाट्यवर्तुळात देवबाभळीचे प्रचंड कौतुक होत आहे.

लोगो : कल्चर वार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसमध्ये महिलेच्या दागिण्यांवर डल्ला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बसमध्ये बसलेल्या कल्याण येथील महिलेच्या बॅगेतील दागिण्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना सीबीएस बसस्थानकात घडली असून, या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली.

स्मिता चिंतामण आहेर (रा. तिसगावनाका, कल्याण) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या शुक्रवारी (दि. २६) कळवण येथे जाण्यासाठी मुंबई-कळवण या बसमधून प्रवास करीत होत्या. दुपारी दीड वाजेच्या सुमारास बस जुने सीबीएस येथे थांबली असता अज्ञात चोरट्याने बसमधील गर्दीचा फायदा घेत आसनावर ठेवलेली बॅग उघडून सोन्याचा हार आणि कानातले झुबके असे ४२ हजाराचे दागिने चोरून नेले.

महिलेच्या हातातून मोबाइल पळविला

मोबाइलवर बोलत रस्त्याने पायी जाणाऱ्या सुनिता सुनील पाटील (रा. पद्मालय अपा. पंडित कॉलनी) यांच्या हातातील मोबाइल दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून घेत पोबारा केल्याची घटना पंडित कॉलनीत घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घरानजीक त्या गुरूवारी (दि. २५) रात्री फेरफटका मारीत असतांना ही घटना घडली. कृष्णा नर्सरी भागात पाठीमागून काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या हातातील साडे आठ हजाराचा मोबाइल हिसकावून धूम ठोकली.

चोरीप्रकरणी दोघांना अटक

कारखान्यातील तांब्याचा ऐवज चोरून नेणाऱ्या दोघा कामगारांना रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. अमोल अशोक सरोदे (रा. महालक्ष्मीनगर, कामटवाडा) आणि अनिल खंडू बर्डे (रा. शिवशक्ती चौक, सिडको) अशी अटक केलेल्या संशयित कामगारांची नावे आहेत. सातपूर औद्योगिक वसाहतीतील मॅकेनिकल इंजिनीअरिंग कंपनीत दोघे संशयित कामाला आहे. ते शुक्रवारी (दि. २६) दुपारी कंपनीतील २२ किलो वजनाचा व सुमारे ११ हजार रुपये किमतीचा तांब्याचा कच्चा माल आणि तांब्याचे मटेरियल आपल्या वाहनातून (एमएच १९ बीए ३९५७) चोरून नेतांना आढळून आले. या प्रकरणी डॅमीअल मायकल स्वामीनाथन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

अल्पवयीन मुलावर चाकू हल्ला

दुचाकीवर बसण्यास नकार दिल्याने त्रिकुटाने अल्पवयीन युवकावर चाकूने हल्ला केला. जयभवानी रोड भागात ही घटना घडली. संशयितांपैकी एक सराईत गुन्हेगार असून, उपनगर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. साजन महेरोलीया, विकी मच्छर व गुड्डू लोहारिया (रा. तिघे देवळाली गाव) अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी जेलरोड भागातील अल्पवयीन युवकाने फिर्याद दिली. अल्पवयीन युवक बुधवारी (दि. २४) सायंकाळी आपल्या आजीस भेटण्यासाठी जयभवानी रोड भागातील भालेराव मळ्यात गेला होता. रात्री आठ वाजेच्या सुमारास तो आजीला भेटून आपल्या घराकडे पायी जात असतांना कदम लॉन्स भागात दुचाकीवर आलेल्या संशयित त्रिकुटाने त्यास गाठले. संशयितांनी त्याला आपल्या दुचाकीवर बसण्याचा आग्रह धरला. मात्र, त्याने नकार देताच संशयितांनी लोखंडी रॉडने मारहाण करीत धारदार चाकूने त्याच्यावर वार केले.

तडीपार गजाआड

हद्दपार केलेले असतांना शहरात वावर ठेवणाऱ्या वैभव उर्फ सोनू गजानन खिरकाडे (वय २०, रा. मेहरधाम, पंचवटी) यास पोलिसांनी अटक केली. क्राईम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली. किशोर सूर्यवंशी मार्गावरील ओंकार बंगल्याजवळ खिरकाडेला पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

..

औरंगाबाद रोडवर

दुचाकीस्वाराचा मृत्यू

नाशिक : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झला. हा अपघात गेल्या सोमवारी (दि. २२) औरंगाबाद मार्गावर झाला होता. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. संतोष शिवाजी काठे (४० रा. कर्मयोगी अपा., औरंगाबादरोड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. सकाळच्या सुमारास घराकडे जाण्यासाठी अ‍ॅक्टिव्हा (एमएच १५ जीके ९४९०) दुचाकीने प्रवास करीत अरिहंत मार्बल दुकानासमोर पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने काठे गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी जयश्री काठे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

लोगो : क्राइम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदानाची तयारी पूर्ण

$
0
0

धुळे, नंदुरबारला पोलिस प्रशासन सज्ज

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या मतदानासाठी अवघ्या चोवीस तासांचा अवधी शिल्लक राहिला असून, निर्भयपणे आणि खुल्या वातावरणात मतदान होण्यासाठी जिल्हा व पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. या वेळी युती आणि काँग्रेस आघाडीच्या प्रमुख उमेदवारांमध्येच लढत आहे. मात्र, धुळ्यात अनिल गोटे यांची बंडखोरी आणि नंदुरबारमध्ये डॉ. सुहास नटावदकर यांची बंडखोरी कोणाच्या पथ्यावर पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

या लोकसभा निवडणुकीसाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सेंट्रल आर्म फोर्स, राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या, पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाच्या मदतीने मतदान प्रक्रिया सुरळीत होणार आहे. असमाजिक तत्त्वांना पायबंद घालण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून दोन्ही जिल्ह्यातील २० हून अधिक जणांना हद्दपार करण्यात आले आहे. तर काहींचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दोन्ही जिल्ह्यातील पोलिस विभागाकडून देण्यात आली. धुळे व नंदुरबार लोकसभा मतदारसंघात उद्या (दि. २९) मतदान होणार आहे. यासाठी दोन्ही जिल्ह्यात तब्बल पंधराशेहून पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तर नाशिक, वाशिम, जळगाव, औरंगाबाद याठिकाणाहून पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. त्याचबरोबर दारू आणि पैशांचा महापूर रोखण्यासाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यात नाकाबंदीसह गोपनीय पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करूनच त्यांना प्रवेश देत आहेत.

युती-आघाडीत काट्याची टक्कर
धुळे व नंदुरबार लोकसभा मतदारसंघापैकी, धुळ्यातून २८ तर नंदुरबारमधून ११ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गेल्या आठवड्याभरापासून दोन्ही मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू, अॅड. प्रकाश आंबेडकर, महिला व बालकल्याण मंत्री विजया रहाटकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक सभा झाल्या. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी दोन्ही मतदारसंघातील सर्व गावांमध्ये मतदारांच्या भेटी घेत आपला प्रचार केला. आत प्रत्यक्ष प्रचार संपला असून, छुप्या पद्धतीने प्रचार सुरू झाला आहे. जिल्ह्यातील दोन्ही जागा गेल्यावेळी युतीने जिंकल्या होत्या. या वेळीही त्या जागा जिंकत आपला गड राखण्यासाठी युतीचे नेते प्रयत्न करीत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून एकेकाळी आपला बालेकिल्ला असणारा नंदुरबार मतदारसंघ मिळविण्यासाठी व्यूहरचना आखण्यात आली आहे. धुळ्यासाठीही काँग्रेस कार्यकर्ते कामाला लागले असून, दिग्गजांचे भवितव्य मतदारराजाच्या हातात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चला, बजावू मताधिकार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकशाहीचा उत्सव अर्थात, लोकसभा निवडणुकीसाठी आज, सोमवारी (दि. २९) नाशिक, दिंडोरीसह धुळे मतदारसंघात मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असून, ती सुरळीत पार पडावी यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदारांतदेखील मताधिकार बजावण्यासाठीची अधीरता रविवारी मतदानाच्या पूर्वसंध्येला दिसून आली.

चार हजार ७२० मतदान केंद्रांवर यंत्रसामग्रीसह निवडणूक कर्मचारी दाखल झाले असून, अनेक मतदान केंद्रे मतदारांच्या स्वागतासाठी सजविण्यात आली आहेत. नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला अधिक बळकट करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे. राज्यात चौथ्या टप्प्यात नाशिक, दिंडोरी, धुळे, शिर्डीसह एकूण १७ मतदारसंघांमध्ये आज निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून यंत्रणा राबत आहे. मतदान हा लोकशाही व्यवस्थेने प्रत्येक भारतीयाला प्रदान केलेला अधिकार असून, या अधिकारापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी खबरदारी घेतली आहे. जिल्ह्यात ४५ लाख ५ हजार ३२० मतदार असून, त्यामध्ये २३ लाख ५८ हजार ६६० त्रुष आणि २१ लाख ४६ हजार ५६८ महिला मतदारांचा समावेश आहे. प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रशासनाने निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवली आहे. बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट आदी यंत्रसामग्री घेऊन शनिवारी सकाळी यंत्रणा नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर रवाना झाली.

--

...तर आस्थापनेवर कारवाई

मतदान हा प्रत्येकाचा अधिकार असल्याने त्यापासून कोणीही वंचित राहू नये याकरिता कामगारवर्गाला पूर्ण सुटी किंवा किमान दोन तासांची सुटी देण्यात आली आहे. मात्र, तरीही वेळ न दिला गेल्याने मतदानाला जाता आले नाही, अशी तक्रार कामगाराने केली, तर संबंधित आस्थापनेवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला.

--

मोबाइल नेणे टाळाच

मतदान केंद्रावर मोबाइल घेऊन जाण्यास प्रशासनाकडून मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे मतदानाला जाताना कोणीही मोबाइल सोबत घेऊन न जाणेच सोयीचे ठरणार आहे. मतदान केंद्राच्या चारही बाजूस २०० मीटरच्या आत मोबाइलसह सेल्युलर फोन, कईडलेस फोन, मोबाइल फोन, वायरलेस सेट व तत्सम साधने, ज्वलनशील पदार्थ, अग्निशस्त्रे, घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. अनधिकृत व्यक्ती आणि वाहनालाही प्रवेशबंदी राहणार आहे.

--

चिन्हांच्या भाषेचा वापर

मतदानस्थळी गेल्यानंतर काय करावे याचे केवळ सुशिक्षितांनाच नव्हे, तर अशिक्षितांनाही सुयोग्य पद्धतीने मार्गदर्शन मिळावे याकरिता यंदा चिन्हांच्या भाषेचाही अत्यंत कल्पकतेने वापर करण्यात आला आहे. काय करावे, काय करू नये याबाबत सहज समजेल अशा भाषेत मार्गदर्शन करतानाच चिन्हांद्वारेही ते निरक्षरांनाही समजू शकेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी निवडणूक शाखेने विविध रंगसंगतीमध्ये मार्गदर्शक फलक बनवून घेतले असून, ते प्रत्येक मतदान केंद्राबाहेर दर्शनी भागात लावण्यात आले आहेत.

--

दिव्यांगांसाठी हेल्पलाइन

जिल्ह्यात दिव्यांग, दृष्टिबाधित, मुकबधिर व इतर व्यंग असलेल्या मतदारांची संख्या १२ हजार ९४८ आहे. या दिव्यांग बांधवांना मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी प्रशासनाने वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. केंद्रावर व्हीलचेअरचीदेखील व्यवस्था असणार आहे. ज्या दिव्यांग मतदारांना वाहन व व्हीलचेअरची मदत लागणार असेल त्यांनी १९५० या हेल्पलाइन क्रमांकावर किंवा समाजकल्याण विभागाचे अधिकारी नीलेश पाटील यांच्याशी ८८३००४९२२८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी केले आहे. दृष्टिबाधितांसाठी मतदान केंद्रांवर ब्रेललिपीतील मतपत्रिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

--

वाहतुकीवर साडेतीन कोटी खर्च

निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रसामग्रीच्या वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ४८६ बसेस, १ हजार १९८ जीप, ११ टेम्पो ट्रॅव्हलर, ३८ ट्रक आणि अन्य ३६२ वाहने अशा तब्बल २ हजार ९५ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. यंत्रसामग्रीला मतदान केंद्रांवर घेऊन जाण्याची आणि मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर पुन्हा या सर्वांना नेमून दिलेल्या ठिकाणावर घेऊन येण्याची जबाबदारी या वाहनव्यवस्थेकडून पार पाडली जाणार आहे.

--

मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली आहे. विविध प्रकारच्या सुविधा पुरवून नाशिककरांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न यंत्रणेने केला आहे. नाशिककर मोठ्या संख्येने मतदान करतील असा विश्वास आहे. मतदानापासून वंचित राहावे लागू नये याकरिता सायंकाळी सहाची प्रतीक्षा न करता नागरिकांनी वेळ मिळेल त्याक्षणी मतदानाचे कर्तव्य पार पाडावे.

-अरुण आनंदकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदारराजासाठी सारंकाही...

$
0
0

मतदारराजासाठी सारंकाही...

--

-मतदारांसाठी १९५० हा हेल्पलाइन क्रमांक

-मतदार प्ले स्टोअरवरील Voter Helpline अॅपद्वारे घरबसल्या मतदारयादीत नाव पाहू शकतात. www.ceo.maharashtra.gov.in, www.nvsp.in या वेबसाइट्सवरही मतदार आपले नाव शोधू शकतात.

-मतदान स्थळाजवळ बुथ लेव्हल ऑफिसर, पोलिंग एजंट राहणार असून, त्यांच्या मदतीने नागरिक आपले नाव मतदारयादीत शोधू शकतील.

-----

ओळखपत्र म्हणून हे पुरावे चालणार नाहीत...

-निवडणूक आयोगाने दिलेल्या व्होटर स्लिप

-रेशनकार्ड

-खरेदीखत

-शस्त्र परवाना

------

मतदान केंद्रांवर हे फोटो ओळखपत्र ठरणार ग्राह्य

मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, कामगार मंत्रालयाचे हेल्थ इन्शुरन्स कार्ड, वाहनचालक परवाना, केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनीतील ओळखपत्र, बँक तथा पोस्टाद्वारे वितरित छायाचित्र असलेले पासबुक, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रारअंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, मनरेगांतर्गत निर्गमित जॉब कार्ड, श्रम मंत्रालय, भारत सरकारअंतर्गत निर्गमित हेल्थ इन्श्युरन्स स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तिवेतन कागदपत्र, खासदार तथा आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र

--------------

मतदान केंद्रांवर राहणार या सुविधा

-मतदार मदत केंद्र

-मतदारांच्या मदतीसाठी स्वयंसेवक

-पिण्यासाठी शुद्ध पाणी

-स्वच्छतागृह

-दिव्यांगांसाठी रॅम्प, व्हीलचेअर

-वैद्यकीय सहायक

-उन्हापासून बचावासाठी मंडप

-बालकांसाठी पाळणाघराची व्यवस्था व प्रशिक्षित सहायक

-------

नाशिकमध्ये दुसऱ्या बॅलेटवर 'नोटा'चा पर्याय

नाशिक लोकसभा मतदारसंघात १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एका बॅलेट युनिटवर अधिकाधिक १५ उमेदवारांची नावे आणि 'नोटा'च्या एका पर्यायाची व्यवस्था असते. परंतु, १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने एका बॅलेट युनिटवर १६ उमेदवारांची नावे राहणार आहेत, तर दुसऱ्या बॅलेट युनिटवर अन्य दोन उमेदवारांची नावे आणि 'नोटा'चा पर्याय राहणार आहे.

-----------

ज्येष्ठ, दिव्यांगांना थेट प्रवेश

मतदान केंद्रांवर पुरुष आणि महिलांची स्वतंत्र रांग राहील. दोन महिला आणि एक पुरुष याप्रमाणे मतदान केंद्रात मतदारांना सोडले जाईल. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांना रांग नाही, त्यांना मतदान केंद्रात थेट प्रवेश.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदानापूर्वी मालेगावी पोलिसांचे संचलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

धुळे लोकसभा मतदारसंघात सोमवारी २९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव बाह्य व मध्य या विधानसभा मतदारसंघात येथील पोलिस दलाकडून पथसंचलन करण्यात आले. मतदान प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी अपर पोलीस अधिक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली हे संचलन पार पडले. यावेळी पोलिस उपअधीक्षक अजित हगवणे, रत्नाकर नवले यांनी या पथसंचालनाचे नेतृत्व केले. या संचालनात सर्व पोलिस ठाण्याचे अधिकारी, एक राज्य राखीव पोलिस दल तुकडी, एक मध्य प्रदेश पोलिसांची बटालियन, दोन आरसीपी प्लाटून यासह सुमारे ५०० होमगार्ड यात सहभागी झाले होते. शहरातील शहीदों की यादगार या किडवाई रोड वरील चौकातून या पथसंचालानास सुरुवात झाली. तर शहर पोलिस ठाण्यातील नियंत्रण कक्षात समारोप झाला. यावेळी नागरिकांनी भयमुक्त वातावरणात मतदान करावे असे आवाहन पोलिस दलाच्या वतीने करण्यात आले.

धुळे लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान होते आहे. यासाठीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून रविवारी सीलबंद झालेले मतदानयंत्र व व्हीव्हीपॅट यंत्र मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात रवाना झालेत. मालेगाव बाह्य मध्ये ३२९ तर मध्य मतदारसंघात ३१६ मतदान केंद्रांवर सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडेल. दोन्ही विधानसभा मतदारसंघात एकूण ६ लाख २१ हजार मतदार उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद करतील. शनिवारी प्रचार तोफा थंडावल्यानंतर रविवारी शहरातील शिवाजी जिमखाना येथून मालेगाव मध्य तर तालुका क्रीडा संकुल येथून मालेगाव बाह्य मतदारसंघातील मतदान केंद्रांवर मतदानयंत्र वाटप करण्यात येऊन वाहनाद्वारे रवाना करण्यात आली. प्रांत विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. मतदान केंद्रनिहाय उपस्थित कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप व आवश्यक सूचना यावेळी देण्यात आल्यात.

दिव्यांग मतदारांसाठी वाहन व्यवस्था

प्रशासनाकडून दिव्यांग मतदारांना त्यांचा हक्क बजावत यावा यासाठी खास वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. बाह्य व मध्य दोन्ही मतदारसंघात एकूण १८८ दिव्यांग मतदार आहेत. त्यांना घरापासून मतदान केंद्रावर आणणे व परत सोडणे यासाठी दहा वाहने असणार आहेत. तसेच ८० व्हीलचेअर असणार आहेत. मालेगाव बाह्य व मध्य मतदारसंघात अनुक्रमे 9 व 14 संवेदनशील मतदान केंद्र आहेत. तर क्रिटिकल मतदानकेंद्र इतकेच आहेत. 60 हुन अधिक मतदान केंद्रांवर थेट वेबकास्टिंग केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऑनलाईनचा आधार

$
0
0

ऑनलाईनचा आधार

नाशिक : अनेकांनी आपले नाव ऑनलाइन शोधण्यास प्राधान्य दिले. www.ceo.maharashtra.gov.in आणि www.nvsp.in या वेबसाइटवर तसेच Voter Helpline या अॅपद्वारे मतदार यादीतील नाव शोधणे शक्य होत आहे. तसेच, आपले मतदान कुठल्या केंद्रावर आहे त्याची माहितीही ऑनलाईन उपलब्ध होत आहे. त्यामुळे मतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढाबा बंद करण्यावरून राडा

$
0
0

पोलिस निरीक्षकावर ग्राहकांचा आरोप

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ढाबा रात्री १० वाजता बंद करण्याच्या कारणावरून शनिवारी रात्री राडा झाला. हॉटेल चालकाचा दोष असताना आम्हाला त्रास का असे म्हणत ग्राहकांनी पोलिसांना धारेवर धरले. तसेच पोलिस निरीक्षकाने मद्यपान केल्याचा गंभीर आरोप देखील ग्राहकांनी केला. नियमानुसार कारवाई होत असताना त्याला खोडा घालण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचे इंदिरानगर पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणी सहायक पोलिस आयुक्तांकडे चौकशी सोपविण्यात आली.

मतदानाच्या दोन ते तीन दिवसांपूर्वी देशी दारूच्या विक्रीत १३० टक्के वाढ झाली. हाच धागा पकडून पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी हॉटेल्स व ढाब्यांच्या वेळेबाबत कठोर धोरण ठेवण्याचे आदेश दिले. शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास इंदिरनगर पोलिसांनी याबाबत कार्यवाही सुरू केली. पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका ढाब्याजवळ पोलिस वाहन थांबले. तिथे हॉटेल बंद करण्याबाबत पोलिसांनी सूचना केल्यात. मात्र, या बदलेल्या वेळेबाबत माहिती नाही तसेच हॉटेलमध्ये मोठ्या संख्येने ग्राहक असल्याचे ढाबाचालकाने सांगितले. नवीन ग्राहक न घेता तासाभरात हॉटेल बंद झाले पाहिजे, असे सांगत पोलिस तेथून निघून गेले. तासाभराच्या अंतराने पोलिस निरीक्षक अनिल पाटील व त्यांचे सहकारी पुन्हा आले असता ढाबा सुरू होता. त्यामुळे पोलिसांनी आत घुसून ग्राहकांनाच बाहेर काढण्याची सुरुवात केली. यावेळी तिथे असलेल्या ग्राहकांनी यास विरोध दर्शवला. उलट ग्राहकांनी पोलिसांनी मद्य प्राशन केले असल्याचा दावा केला. हा वाद वाढल्याने पोलिसांनी ढाबा चालकास ढाबा बंद करण्याच्या सूचना केली. मात्र, पन्नासहून अधिक ग्राहकांनी पोलिस वाहनालाच गराडा घातला. दहा मिनीटे हा गोंधळ सुरू असल्याने पीआय पाटील यांनी नियंत्रण कक्षास कॉल करून मदत मागितली. यावेळी पोलिस आयुक्त नांगरे पाटील इंदिरानगर पोलिस ठाण्यातच होते. त्यामुळे ते लागलीच घटनास्थळी पोहचले. इतर ठिकाणाहून बंदोबस्त तेथे पोहचला. या प्रकरणी पाटील यांच्या चौकशी करण्याबाबतचे आदेश देण्यात आले असून, ही चौकशी डिव्हीजनचे सहायक पोलिस आयुक्त करीत आहेत. दरम्यान, इंदिरानगर पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. ग्राहकांमध्ये काही मद्यपी होते. त्यांनी हा प्रकार केला असून, उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवल्याप्रकरणी ढाबा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले.

--

संशयास्पद चुप्पी

प्रोफेशनल पोलिसींगचा पाढा वाचणाऱ्या शहर पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी प्रोफेशनल पोलिसींगलाच फाटा देण्याचा प्रकार सुरू केला आहे. शहरात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी, गुन्हे, घटना याबाबत संशयास्पद चुप्पी साधली जाते आहे. पोलिस ठाण्यापासून वरिष्ठांपर्यंत सर्वत्र एकमेकांकडे बोटे दाखवून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करीत असल्याने सर्वसामान्यांच्या त्रासात भर पडते आहे. निवडणुकीच्या तोंडावर सर्वत्र बंदोबस्त असताना चेन स्नॅचिंग, घरफोडी, वाहन चोरीच्या घटना सातत्याने होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमधून ७५१ मतदारांचे टपाली मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारी सेवेतील नोकरदारांच्या टपाली मतदानास सुरुवात झाली असून, नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत ७५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती निवडणूक यंत्रणेने दिली.

नाशिकचे माजी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनीही रविवारी मतदानाचा हक्क बजावला. सरकारी नोकरीत कार्यरत बराचसा कर्मचारीवर्ग निवडणुकीच्या कामकाजात अडकून पडतो. परिणामी त्यांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळतेच असे नाही. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाचा पर्याय दिला जातो. निवडणुकीसाठीच्या प्रशिक्षण सत्रापासूनच कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. सिडकोतील संभाजीराजे स्टेडियम, दादासाहेब गायकवाड सभागृह, विभागीय क्रीडा संकुल या ठिकाणी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. याच ठिकाणी अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी पोस्टल मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती.

२३ मेपर्यंत मतदानाची संधी!

नाशिक लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत ७५१ मतदारांनी टपाली पद्धतीने मतदान केल्याची माहिती यंत्रणेने दिली. मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच २३ मे रोजी सकाळी ७ वाजून ५९ मिनिटांपर्यंत मतदार मतदान करू शकतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील एकूण ७ हजार ३१९ सैनिक मतदारांना ऑनलाइन पद्धतीने (ईटीपीबीएस) मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. या मतपत्रिका मतमोजणीच्या दिवशी सकाळी ७ वाजून ५९ मिनिटांपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियाचा गैरवापर

$
0
0

भुजबळांसह कोकाटे यांचीही पोलिसात तक्रार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या नावाने फेक मेसेज व्हायरल झाल्यानंतर आता अपक्ष उमेदवार अॅड. माणिकराव यांच्या नावाचे पत्रही व्हायरल झाले आहे. तर छगन भुजबळ यांच्या नावाने खोटी बातमी सोशल मीडियामधून दाखवली जात आहे. या दोन्ही प्रकाराबद्दल छगन भुजबळ व अॅड. कोकाटे यांनी वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या. अॅड. कोकाटे यांच्या नावाने व्हायरल होत असलेल्या पत्रात शिवसेनेचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांना पाठिंबा दिल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे उमेदवारांची चिंता वाढली आहे.

प्रचाराची सांगत झाल्यानंतर सोशल मीडियातून अनेकांनी प्रचार सुरू केला आह. त्यात अनेक फेक मॅसेज धडकू लागले आहेत. अॅड. कोकटे यांचे व्हायरल झालेले पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले असून त्यात त्यांच्या नावाचा जिल्हा बँकेच्या लेटरपॅडचा वापर केला आहे. या पत्रात कोकटे यांची सही सुद्धा आहे. या पत्रातील मजकूरही खरा वाटावा अशी मतदारांची फसगत होण्याची शक्यता आहे.

या पत्रात शेवटच्या परिच्छेदात या पत्राद्वारे मी जाहीर करतो की महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध कोणतीही बंडखोरी किंवा अपक्ष लढण्याचा माझा विचार नाही. देशाला विकासासाठी मजबूर नव्हे तर मजबूत सरकराची आवश्यकता असल्याने सर्व कार्यकर्ते आणि नागरिकांनी गैरसमज, राजकीय मतभेद दूर ठेऊन महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनाच भरभरून मतदान करून देशात पुन्हा नरेंद्र व राज्यात देवेंद्र हे स्वप्न साकार करावे, असा मजकूर आहे.

या पत्राबाबत अॅड. कोकाटे यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. यात बनावट लेटर हेडवर माझी सही स्कॅन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने माघार घेतल्याचे बोगस पत्र व्हायरल केले आहे. याबाबत गुन्हा दाखल करावा, असे अॅड. कोकाटे यांनी म्हटले आहे.

विरोधकांचे षडयंत्र

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करून सदर बातमीत उल्लेख असलेल्या कुठल्याही प्रकारचे पत्र किंवा माफीनामा मी दिलेला नाही. निवडणुकीत गैरसमज पसरविण्यासाठी हे विरोधकांचे षडयंत्र आहे. बदनाम करण्याचे हे कारस्थान आहे. त्यामुळे कायदेशीर कारवाई करावी, असे म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता कोकाटे यांचेही पत्र!

$
0
0

\Bआता कोकाटे यांचेही पत्र!\B

छगन भुजबळ यांचीही सोशल मीडियाबाबत तक्रार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या नावाने फेक मेसेज व्हायरल झाल्यानंतर आता अपक्ष उमेदवार अॅड. माणिकराव कोकाटे यांच्या नावाचे पत्रही व्हायरल झाले आहे. तसेच छगन भुजबळ यांच्या नावाने खोटी बातमी सोशल मीडियामधून दाखवली जात आहे. या दोन्ही प्रकाराबद्दल अॅड. कोकाटे आणि छगन भुजबळ यांनी वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या. मतदानापूर्वी सोशल मीडियाच्या होणाऱ्या गैरवापरामुळे उमेदवारांची चिंता वाढली आहे.

प्रचाराची सांगता झाल्यानंतर सोशल मीडिया आणि बल्क एसएमएसद्वारे अनेकांनी प्रचार सुरू केला आहे. त्यात अनेक फेक मेसेज धडकू लागले आहेत. अॅड. कोकटे यांचे व्हायरल झालेले पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले असून त्यात त्यांच्या नावाचा जिल्हा बँकेच्या लेटरपॅडचा वापर केला आहे. या पत्रात कोकटे यांची सही सुद्धा आहे. या पत्रातील मजकूरही खरा वाटावा अशी मतदारांची फसगत होण्याची शक्यता आहे. या पत्रात पत्रात शिवसेनेचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांना पाठिंबा दिल्याचे म्हटले आहे.

पत्रातील अखेरच्या परिच्छेदात 'मी जाहीर करतो की, महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध कोणतीही बंडखोरी किंवा अपक्ष लढण्याचा माझा विचार नाही. देशाला विकासासाठी मजबूर नव्हे तर मजबूत सरकराची आवश्यकता असल्याने सर्व कार्यकर्ते आणि नागरिकांनी गैरसमज, राजकीय मतभेद दूर ठेऊन महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनाच भरभरून मतदान करून देशात पुन्हा नरेंद्र व राज्यात देवेंद्र हे स्वप्न साकार करावे', असा मजकूर आहे.

या पत्राबाबत अॅड. कोकाटे यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. यात बनावट लेटर हेडवर माझी सही स्कॅन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने माघार घेतल्याचे बोगस पत्र व्हायरल केले आहे. याबाबत गुन्हा दाखल करावा, असे अॅड. कोकाटे यांनी म्हटले आहे.

\Bविरोधकांचे षडयंत्र \B

अपक्ष उमेदवार अॅड. कोकाटे यांनी सुद्धा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करून सदर बातमीत उल्लेख असलेल्या कुठल्याही प्रकारचे पत्र किंवा माफीनामा मी दिलेला नाही. निवडणुकीत गैरसमज पसरविण्यासाठी हे विरोधकांचे षडयंत्र आहे. बदनाम करण्याचे हे कारस्थान आहे. त्यामुळे कायदेशीर कारवाई करावी, असे म्हटले आहे.

\Bक्लिप व्हायरल

\Bग्राफिक्सचा गैरवापर करून 'छगन भुजबळ यांचा जाहीर माफीनाम्यातून गौप्यस्फोट', अशा आशयाची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली गेली. मात्र, ही क्लिप बनावट असून क्लिपमध्ये उल्लेख असलेल्या कुठल्याही प्रकारचे पत्र किंवा माफीनामा मी दिलेला नसल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. ही क्लिप व्हायरल करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images