Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शहर स्वच्छतेसाठी SMS हेल्पलाइन

$
0
0
'स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक' ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी नाशिक महापालिकेने एसएमएस हेल्पलाइन कार्यन्वित केली असून त्याद्वारे शहरातील कचऱ्यासंबंधातील तक्रारी सोडविण्यात येणार आहे.

ई रिटर्नमुळे करात लक्षणीय वाढ

$
0
0
ई रिटर्नमुळे करदात्यांची मोठी सुव‌िधा झाली आहे. परिणामी सरकारच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ झाली असल्याची माहिती विक्रीकर खात्याचे सहआयुक्त एस. पी. काले यांनी दिली.

स्पीड ब्रेकरच्या उंचीने अपघातात वाढ

$
0
0
नाशिकरोडच्या जुन्या सायखेडारोडवर महापालिकेच्या वतीने स्पीड ब्रेकर टाकण्यात आले असून त्याची उंची जास्त असल्याने सतत अपघात होत आहे. या स्पीडब्रेकरची उंची कमी करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

डीपी आणि कॅनॉल रोड होणार खुला

$
0
0
तिडके कॉलनीतून सिडकोकडे जाण्यासाठी मायको सर्कलला जाण्याची येत्या काळात गरज राहणार नाही. कारण, तिडके कॉलनीतून थेट दक्षिणमुखी मारुती मंदिरासमोरच्या रस्त्याला जाऊन मिळणारा डीपी रोड आणि कॅनॉल रोड करण्याचा निर्णय महापौर यतीन वाघ यांनी जाहीर केला आहे.

ग्रामपंचायतींचे लवकरच सक्षमीकरण

$
0
0
ग्रामपंचायत सक्षम करण्यासाठी शासनाने जोरदार पावले उचलली आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीला आता ग्रामसेवकाबरोबरच पंचायत विकास अधिकारी नेमण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतीचे तांत्रिक कामे विनाविलंब व्हावीत म्हणून पंचायत समितीस्तरावर स्वतंत्र अधिकारी नेमला जाणार आहे.

क-हेच्या शेतक-याने फुलवली मोसंबी शेती

$
0
0
डाळिंबाचे आगार असलेल्या कसमादेपट्टयात आता मोसंबी पिकू लागली आहे. रविवारी सटाणा बाजार समितीत प्रथमच मोसंबी विक्रीसाठी दाखल झाली. तिनशे रुपये क्रेट इतका मोसंबीला भाव मिळाला.

अनैतिक संबंधातून पतीचा खून

$
0
0
प्रजासत्ताकदिनी नांदगाव परिसरातील बेलदार वस्तीनजीक झालेल्या अज्ञात व्यक्तीच्या खुनाचा तपास करण्यात नांदगाव पोलिसांना यश आले आहे. प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

सोळा गावांना बेमोसमी फटका

$
0
0
बागलाण तालुक्यात गेल्या सप्ताहात झालेल्या बेमोसमी पाऊस आणि गारपीटमुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे.

प्राचार्यपदाची आसक्ती !

$
0
0
व‌िद्यापीठ अनुदान आयोगाच्या एका सम‌ितीने प्राचार्यपदाची कालमर्यादा पाचवरुन दहा वर्षे करण्याची श‌िफारस नुकतीच केली. २०१० सालापूर्वी प्राचार्यपदाला कालमर्यादा नव्हती. २०१० साली ‘युजीसी’ने ती पाच वर्षे केली. पाच वर्षांची मर्यादा कायम राह‌िली तर पुढील वर्षी अनेक महाव‌िद्यालयांमध्ये नेत्वृत्त्व पालट होत तरुण पिढीला संधी मिळेल.

हुश्श ....सुटलो रे बाबा

$
0
0
व‌िव‌िध प्रवृत्तींच्या समुहातून समाज आकाराला येतो. येथे तऱ्हेतऱ्हेचे लोक सापडतात. त्यातही काही प्रवृत्ती लक्षवेधी ठरतात. काही सकारात्मक अंगाने तर काही उपहासात्मक अंगाने. आत्मस्तुती प्र‌िय असणारा एक वर्ग जगाच्या पाठीवर कुठेही जा कायमच असतो.

कैलाश खेर नाईट रॉक्स...

$
0
0
‘महाराष्ट्र टाइम्स’ आयोजित कैलाश खेर नाईट कार्यक्रम शनिवारी नाशिककरांनी एन्जॉय केला. कैलाशच्या गाण्यांवर तरुणाई थिरकली तर सारे नाशिककर कैलाशमय झाले होते. यानिमित्ताने कैलाशच्या चाहत्यांनी या कार्यक्रमाविषयी व्यक्त केलेल्या भावना.

कैलाश फिर आएगा...!

$
0
0
स्टेजवरचे लाइट वेगाने फिरू लागतात...‘तो आला.. तो आला’ म्हणत तरुणाईकडून आरोळ्या ठोकल्या जातात, तब्बल वीस हजारांपेक्षा अधिक असलेले उत्सुक प्रेक्षक जागेवर उठून उभे राहतात... स्टेजवर कुणी दिसत नाही त्यामुळे जरासा अपेक्षाभंग होत सर्वजण खाली बसतात. डोळ्यात प्राण आणून ही वाट पाह‌िली जात असते सुफी गीतांचा बादशहा, दैवी स्वरांचा सरताज कैलाश खेर याची.

...तर सत्तेची स्वप्ने पाहू देणार नाही

$
0
0
महाराष्ट्र सरकारने येत्या निवडणुकीअगोदर मराठा आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास सत्तेची स्वप्न पाहू देणार नाही, असा इशारा शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिला. बी. डी. भालेकर मैदानात झालेल्या मराठा आरक्षण इशारा महामेळाव्यात ते बोलत होते.

९७० पैकी ६८१ पोलिस तंदुरुस्त!

$
0
0
ढेरपोटे पोलिस चेष्टेचा आणि टीकेचा विषय ठरतात. असे पोलिस काय कायदा आणि सुवव्यवस्था राखणार आणि गुन्हेगारी रोखणार, असा प्रश्न कायम विचारला जातो. परंतु नाशिक शहर पोलिस दलातील पोलिस मात्र अन्य शहरांच्या तुलनेतील पोलिसांपेक्षा तंदुरुस्त असल्याचे दिसून आले आहे.

'सिम्बॉयसिस'ला महापालिकेने दिली बेकायदा जमीन

$
0
0
भूसंपादन प्रक्रीया सुरू असताना आरक्षित भूखंड महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीररीत्या सिम्बॉयसिसला समावेशक आरक्षणांतर्गत (एआर) विकसित करण्यास देण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी केला आहे.

बजेट : आचारसंहितेची टांगती तलवार

$
0
0
महापालिकेच्या बजेटबाबत सोमवारी महापालिका प्रशासनाची बैठक पार पडणार आहे. मात्र, या बजेटवर आचारसंहितेची टांगती तलवार कायम असल्याची शक्यता वर्तवली जात असून आतापर्यंत मंजूर कामाचे कार्यादेश मिळविण्यासाठी नगरसेवकांची लगीनघाई सुरू झाली आहे.

नाशिक पैठणीची पुणे, मुंबईलाही भुरळ

$
0
0
फॅशनच्या जमान्यतही आपलं नावलौकिक ‌टिकवून ठेवणारी साडी म्हणजे पैठणी. नाजूक, सुंदर व आकर्षक अन् जरीची बुटी आणि काटपदरची पैठणी महिलांना हवी असते ते तिच्या देखणेपणामुळेच. येवल्याची पैठणी नावारुपाला आली आहे. मात्र, आता नाशिकमध्येच आपल्या आवडीची पैठणी मागणीनुसार तयार करून मिळू लागली आहे.

...येथे रोजच होतो जिवाशी खेळ

$
0
0
मुंबई-आग्रा हायवेवरील अमृतधाम चौफुली दिवसागणिक धोकेदायक बनत चालली आहे. वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे विद्यार्थी, वृद्घ नागरिक तसेच महिलांना जीव मूठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे.

व‌िकासाला ‘खो’ घातलाच नाही

$
0
0
लोकसभा मतदार संघाच्या व‌िकासासाठी नव्याने मंजूर झालेल्या व‌िकासकामांची माह‌िती देतानाच आम्ही कधीही व‌िकासाच्या मुद्द्याला खो घातलेला नाही. महापाल‌िकेतही व‌िकासकामाच्या कोणत्याही मुद्द्यावर राष्ट्रवादी अडसर ठरलेला नाही.

एलबीटी फरक : सरकारला साकडे

$
0
0
जकातीच्या तुलनेत एलबीटी अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उत्पन्नात घट होत असल्याने फरकाची रक्कम राज्य सरकारकडून पदरात पाडण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. तसा प्रस्ताव देखील राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images