Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

गोदाघाटासाठी प्रशासनाची ‘धावपळ’

$
0
0
गोदाघाटाच्या कामाबाबत सुरू असलेल्या दिरंगाईवर ‘मटा’ने प्रकाश टाकताच जिल्हा प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे. ‘मटा’च्या वृत्ताची दखल जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर यांनी संबंधितांची कानउघडणी केली.

कलंदरांनी गाजवला सुलाफेस्ट !

$
0
0
कृष्णा मराठेचं सुमधूर बासरीवादन... बेसिटी लाईट्स आणि डब पिस्टोल्सचा रॉकिंग परफॉर्मन्स... सर्वांनाच आपल्या तालावर नाचविण्यासाठी खास ब्राझीलहून आलेली डीजे अॅना ! आजवर गोवा, मुंबई किंवा बेंगलोरसारख्या शहरातील 'लाईव्ह म्युझिक फेस्टिव्हल' गाजविणाऱ्या या कलंदरानी रविवारी नाशिकमध्ये आपली धमाल अदाकारी सादर केली.

बिल घेतलं का ?

$
0
0
नव्याने घेतलेली विजेची इस्री बिघडली आणि संदीपसमोर जणू एक मोठे संकट उभे राहिले. एखादी जागतिक समस्या निर्माण झालेली असावी अशा पद्धतीने तो माझ्याकडे आला. ‘कधी घेतली होती ही इस्त्री ?’, मी त्याला विचारले.

असाही धसका

$
0
0
राजकीय पक्ष म्हटलं, की हांजी-हांजी करणारे आलेच. स्वार्थासाठी ही मंडळी एखाद्याचे पाय धरायलाही (चरणस्पर्श) कमी करत नाही. काही दिवसांपूर्वी या पाय धरण्यावरून जोरदार राजकारण तापले होते. त्यावरून टीकेची झोड उठल्याने सर्वच राजकीय पक्षाचे नेते जागरूक झाले.

२ कोटी रुपये प्रति एकर भाव द्या

$
0
0
नाशिक ते पुणे या हायवेच्या रुंदीकरणांतर्गत प्रस्तावित असलेल्या सिन्नर शहराला वळसा घालणाऱ्या बायपासच्या भूसंपादनात प्रति एकर २ कोटी रुपये दर द्यावा, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

निवडणुकीची संघटनात्मक तयारी

$
0
0
काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयारीत उतरलेल्या राजकीय पक्षांतर्फे संघटनात्मक बळकटीवर जोर देण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) व राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शहर कार्यकारिणी जाहीर केली आहे.

५ वर्षाच्या मुलीवर अत्याचार

$
0
0
शहरातील रमजानपुरा भागात एका नराधमाने आपल्याच मित्राच्या पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची अमानुष घटना घडली अाहे. या प्रकरणी पेेलिसांनी त्या नराधमाला अटक केली आहे. तोहर अहमेद मोहसीन अहेमद हे त्या नराधमाचे नाव आहे.

अपघातात विरगावच्या तरुणाचा मृत्यू

$
0
0
आयशरने मोटरसायकला जबर धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत बागलाण तालुक्यातील विरगांव येथील युवक जागीच ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही दुर्घटना रविवारी रात्री 12 वाजेच्या दरम्यान हायवेवर वडाळीभोई नजीक झाली.

सौर उपकरणांचा भारनियमनावर तोडगा

$
0
0
वीज टंचाई व वाढत्या भारनियमनामुळे ग्रामीण भागात विविध पर्यायांचा अवलंब केला जात आहे. यात सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांना अधिक पसंती दिली जात आहे. सौर ऊर्जेवर चालणारी वीज उपकरणे, इन्व्हर्टर खरेदीकडे तालुक्यातील ग्रामस्थांचा कल वाढत असून मागणीही वाढली आहे.

पीपल्स रिपब्लिकनचा नाशिकरोडला मोर्चा

$
0
0
नाशिकरोडसह परिसरातील टपरीधारक आणि फेरीवाल्यांची अतिक्रमणे हटवू नयेत, या मागणीसाठी आज पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे नाशिकरोडला मोर्चा काढण्यात आला. महापालिकेच्या विभागाय कार्यालयावर मोर्चा नेऊन आंदोलन करण्यात आले. युवा जिल्हाध्यक्ष शशिकांत उन्हवणे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका अधिका-यांना निवेदन देण्यात आले.

दत्तनगरमधील रहिवाशांना रस्त्यांची प्रतीक्षा

$
0
0
अंबड औद्योगिक वसाहतीला लागून अललेल्या दत्तनगर, दातीरनगर भागातील रहिवाशांना अनेक महिन्यांपासून रस्त्यांची प्रतिक्षेत आहेत. वाढत्या नागरी वस्त्यांबरोबर रस्त्यांची कामे मात्र होत नसल्याने केवळ माती व मुरमाच्या रस्त्यांवरुन चालताना कसरतच करावी लागते.

भंगारबाजार नव्हे, मिनी इंडस्ट्री

$
0
0
सर्वोच्च न्यायालयाने वारंवार आदेश देवूनही अद्यापपर्यंत टिकून असलेल्या अंबड-लिंकरोडवरील भंगारबाजारात कोट्यवधींची उलाढाल होत असल्याची बाब नवीन नाही. मात्र, भंगार बाजाराच्या नावाखाली येथे मिनी इंडस्ट्री आकाराला आलेली आहे. याठिकाणी व्यापाऱ्यांनी व विशेषकरुन उत्तर भारतीयांनी मोठ-मोठी शेड उभारुन तेथे उद्योग थाटली आहेत.

बाजारपेठेतील ६ रस्ते ‘वन वे’

$
0
0
गर्दीच्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील मध्यवर्ती भागातील सहा रस्ते `वन वे` करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी घेतला आहे.

कुपोषणमुक्त शहरासाठी प्रयत्न व्हावेत

$
0
0
भावी पिढी सदृढ होण्याच्यादृष्टीने राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियान सर्व स्थरांपर्यंत पोहचवणे आवश्यक असून, ही योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी सखोल प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत महापौर अॅड. यतीन वाघ यांनी व्यक्त केले.

सारडा सर्कलजवळील डीपीरोडवर ‘मार्किंग’

$
0
0
सारडा सर्कलवरील विकास आराखड्यानुसार (डीपीरोड) आरक्षित असलेल्या जागेवर झालेली अतिक्रमणे काढून टाकण्याचे आदेश महापौर अॅड. यतीन वाघ यांनी सोमवारी प्रशासनाला दिले. त्यानुसार नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्किंगचे काम संध्याकाळी उशिरापर्यंत पूर्ण केले.

कामाच्या दिरंगाईबद्दल नाराजी

$
0
0
गोदाघाटाच्या कामाबाबत नाशिक मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाण आणि पाटबंधारे विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर यांच्यातील चर्चेनंतर जिल्हाधिकारी विलास पाटील यांना गोदाघाटाच्या कामाचा जाब विचारण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी जिल्हाधिकारी व पाटबंधारे प्रशासनाच्या मोठ्या प्रमाणात बैठका झाल्या.

पत्नीचा खून; पतीसह दोघांना अटक

$
0
0
साथीदाराच्या मदतीने पत्नीचा खून करून पोलिसांची दिशाभूल करू पाहणाऱ्या पतीचे पितळ लासलगाव पोलिसांनी सोमवारी उघडे पाडले. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पत्नीशी असलेल्या वादातूनच तिचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांसमोर दिली आहे.

पक्षाचा ‘सोशल मीडिया’ बळकट करा

$
0
0
विद्यमान सरकारच्या कारभारावरून युवकांसह देशवासियांमध्ये असलेली खदखद मांडण्यासाठी सोशल मीडिया प्रभावी व्यासपीठ बनले आहे. या माध्यमाच्या सहाय्याने कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे पोहोचविण्यासह त्यांना जागरूक करावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले.

विद्यापीठ, महापालिका एकत्र येणार?

$
0
0
महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाले आहेत.

हिशोबबाह्य पाण्याचा लागणार शोध

$
0
0
आजमितीस नाशिक शहरात १ लाख ७४ हजार ८५९ नळ कनेक्शन आहेत. रेकॉर्डवरील नळ कनेक्शनसाठी महापालिका दररोज ३८० दशलक्ष घनफुट पाणी पुरवठा करते. जेवढा पाणी पुरवठा होतो, त्याच्या ४० टक्केही बिले वसूल होत नाही ही वस्तुस्थिती आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images