Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

भागवत कथा सोहळा

$
0
0

नाशिक : कालिकानगर येथील मयूरेश्वर गणेश मंदिराच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त श्रीमद्भागवत कथा सोहळ्याचे शुक्रवार, दि. १ फेब्रुवारीपासून आयोजन करण्यात आले आहे. नाशिक येथील इस्कॉन ब्रह्मचारी श्रीमान जानकीनाथ दास कथेचे वाचन करणार आहेत. शुक्रवारी (दि. १) सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून, दुपारी ३.३० वाजेपासून ६.३० पर्यंत कथा सोहळा होणार आहे. दररोज दुपारी ३.३० ते ६.३० या वेळेत कथा सोहळा होणार आहे. मंगळवारी (दि. ५ फेब्रुवारी) महाआरतीने कथा सोहळ्याचा समारोप होणार असून, सायंकाळी ७.३० पासून महाप्रसादाचे आयोजन केले आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाऊसाहेब सोनवणे, मेघ:श्याम मोरे, विकास बागूल, मधुकर वाणी, राजेंद्र पाटील, यशवंत नेरकर आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार

$
0
0

आमदार बच्चू कडू यांचा इशारा

म. टा. वृत्तसेवा, येवला

राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न तत्काळ न सोडविल्यास, आम्ही राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे राज्यव्यापी अधिवेशन घेवून त्यात येत्या विधानसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेवू. तसेच मतदान केंद्रांवर कांदा ठेवून निषेध नोंदवू, असा इशारा प्रहार शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी येवल्यात दिला.

प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने येवल्यात आयोजित शेतकरी मेळाव्यासाठी सोमवारी (दि. २८) आलेल्या आमदार बच्चू कडू यांनी मेळाव्यापूर्वी येवला शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कांदा प्रश्नावर शेतकऱ्यांची बाजू मांडतानाच आमदार कडू यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

कांदा प्रश्नाबाबत कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी प्रस्ताव तयार करण्याची गरज असताना या बाबतीत राज्य सरकारची उससिनता दिसून आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकारला कुठलेही गांभीर्य नाही. तातडीचा निर्णय म्हणून अनुदान वाढवून देताना त्याची मुदत वाढवून दिली पाहिजे, असे यावेळी बच्चू कडू म्हणाले.

कांद्याचे भाव वाढले होते, तेव्हा भाजपचे सरकार पडले होते. याची सरकारला भीती वाटते. मात्र, आता कांद्याचे भाव पडले आहेत. म्हणून तुमचे खासदार पडले, हे आम्हाला दाखवून द्यायचे आहे, असी पुस्ती कडू यांनी जोडली. सरकारच्या आयात-निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळे आज शेतकरी मरतोय. कांदा जीवनावश्यक वस्तूत कसा मोडतो? हे सरकारने एका तरी उदाहरणासह दाखवून द्यावे. एक जरी उदाहरण दिले तरी हा बच्चू कडू आमदारकीचा राजीनामा देईल, असेही ते म्हणाले.

दानवेंचा पराभव हेच 'लक्ष्य'

लोकसभा निवडणुकीत जे काय व्हायचे ते होईल. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पराभव हेच आमचे लक्ष्य असणार आहे. दानवे यांच्याशी माझे कुठलेही वैर नाही. परंतु त्यांनी शेतकऱ्यांना 'साले' म्हंटले होते. कुठलाही राजकारणी ज्यांची मते घेतो त्यांना 'साले' म्हणत असेल तर त्यास धडा शिकविणे हे आमचे कर्तव्य आहे, असे सांगत दानवे उभे राहोत अथवा नाहीत, कुणाला तरी मदत करून त्यांचा पराभव करणे हेच आमचे उद्धिष्ट आहे, असा निश्चय कडू यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समजावून घेत सोडवा इंग्रजीची कृतिपत्रिका!

$
0
0

सायली महाजन यांचा दहावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भाषा विषयांची कृतिपत्रिका विद्यार्थ्याला चांगले गुण मिळवून देऊ शकते. इंग्रजीही त्याला अपवाद नाही. पण कृतिपत्रिका व्यवस्थित समजावून घेऊन सोडविणे गरजेचे आहे. याशिवाय यात घोकंपट्टी उपयोगाची नाही. स्वमत प्रकटीकरण करणे या कृतिपत्रिकेत विशेष महत्त्वाचे आहे, असे मार्गदर्शन इंग्रजी विषयतज्ज्ञ आणि रचना विद्यालयाच्या शिक्षिका सायली महाजन यांनी केले.

महाराष्ट्र टाइम्स व रेषा एज्युकेशन सेंटर यांच्यातर्फे 'समजावून घेऊ या कृतिपत्रिका' या उपक्रमांतर्गत आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. दहावीचे विद्यार्थी यंदा कृतिपत्रिकेवर आधारीत परीक्षा पद्धतीस सामोरे जात आहेत. या पार्श्वभूमीवर आयोजित मालिकेत महाजन यांनी इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थी व पालकांना १०० गुणांसाठी सर्व कृती सोडवण्याकरिता वेळेचे नियोजन कसे करावे, या कृतींचा सराव परीक्षेपूर्वी कसा करावा, प्रत्येक सेक्शन सोडवताना काय काळजी घ्यावी, या मुद्द्यांवर त्यांनी प्रकाशझोत टाकला.

इंग्रजीच्या कृतिपत्रिकेत सेक्शन एकमधील लँग्वेज स्टडी सोडविताना दक्षतेने सूचना वाचून कृती सोडवावी. सेक्शन दोन व सेक्शन चारमधील पठीत व अपठित परिच्छेदांवरील कृती सोडवतांना कृती व त्यांच्या सूचना काळजीपूर्वक वाचून वाचनाच्या स्किमिंग किंवा स्कॅनिंग पद्धतींनी त्या सोडवाव्यात खात्री करूनच उत्तरे लिहावी. एखाद्या कृतीबद्दल मनात संभ्रम असल्यास पुढची कृती सोडवावी. नंतर पुनर्विचार करून ,संभ्रम दूर झाल्यावर ती कृती सोडवावी. सेक्शन तीनमध्ये कवितांवरील प्रश्नांच्या कृती समजावून घेतल्यावर स्वतःच्या वाक्यांमध्ये प्रश्नांची उत्तरे लिहावी. कवितांच्या ओळी जशाच्यातशा कॉपी-पेस्ट करू नये. कवितांच्या यमक जोड्या, यमकयोजना, अलंकार, कल्पना विस्तार या मुद्द्यांचा काळजीपूर्वक सराव केला तर १५ पैकी अधिकाधिक गुण मिळू शकतात, असेही महाजन यांनी सांगितले.

स्वमत म्हणजे कॉपी-पेस्ट नव्हे!

मराठीत भाषांतर करताना शब्दश: भाषांतर टाळावे. एक्सपान्शन ऑफ आयडियाज या कृतीत दिलेला विषय समजावून घ्यावा आणि त्या कल्पनेचे स्पष्टीकरण स्वतःच्या भाषेत लिहावे. उदाहरणासहीत स्पष्टीकरणे द्यावीत. शिर्षक अवश्य लिहावे. जेथे स्वमत विचारलेले असेल तेथे त्या विषयासंदर्भात स्वतःचे मत, स्वतःची वाक्ये साधी,सोपी व सुटसुटीत अशा पद्धतीने लिहावीत. स्वमत हे दिलेल्या उताऱ्यातील वाक्यांची कॉपी-पेस्ट स्वरूपात मांडणी करू नये, अशा सूचनांसोबतच उर्वरित कालावधीतील अभ्यासासंदर्भात युक्त्याही महाजन यांनी सांगितल्या.

..

अशा दिल्या टिप्स

अपठित उताऱ्याचे सारांश लेखन करतांना शिर्षक अवश्य द्यावे.

उताऱ्यातील उदाहरणे व स्पष्टीकरणे टाकून मुख्य आशय एक तृत्यांश स्वरूपात स्वतःच्या वाक्यांमधून मांडावा.

वाक्ये बनवतांना स्पेलिंग व व्याकरण यांच्या चुका टाळाव्या.

सेक्शन पाचमध्ये पत्र हे मेलसारखे डाव्या बाजूनेच लिहावे.

पत्राचा आशय लक्षात घ्यावा.

शेवटच्या कौशल्य विकास सेक्शनमध्ये नेमकी काय कृती सोडवायची आहे हे नीट समजावून घ्यावे.

फॉर्म भरण्याची कृती सोडवायची असल्यास त्यात खरी माहिती न भरता काल्पनिक माहिती भरावी.

फक्त विचारलेली माहितीच भरावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊले चालती ‘धुरातली’ वाट

$
0
0

श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या यात्रोत्सवानिमित्त दिंड्या शहरातून त्र्यंबककडे मार्गस्थ होत आहेत. मात्र, या दिंडीची वाट धुरात हरवल्याचे दिसून येत आहे. त्र्यंबकरोडवरील योग विद्याधामजवळील शेतातील पीक जाळल्याने रस्त्यावर धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे वारकऱ्यांना या धुरातून वाट शोधावी लागली.

फोटो- पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंडोरी पोटनिवडणुकीत धनराज भवर विजयी

$
0
0

भाजपचे गांगोडे यांचा पराभव

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

नगरपंचायतच्या वॉर्ड क्र. १५ मधील पोटनिवडणुकीत दिगवंत नगरसेवक सुनील भवर यांचे पुत्र धनराज भवर हे विजयी झाले आहेत.

मनसे नगरसेवक सुनील भवर यांच्या निधनाने रिक्त जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र धनराज यांनी अपक्ष उमेदवारी केली होती. त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना माकपने उमेदवार न देता पुरस्कृत केले होते. रविवार मतदान होऊन सोमवारी सकाळी मतमोजणी झाली. त्यात धनराज सुनील भवर यांना २१९ मते मिळाली. तर भाजपचे राकेश गुलाब गांगोडे १३४, शिवसेनेचे श्रीकृष्णा बाळू शेवरे ६३ मते मिळाली. निकाल लागताच भवर समर्थक कार्यकर्त्यांनी फटाके फोडत, भंडारा उधळून आनंदोत्सव साजरा केला. भवर यांचे विजयासाठी आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार रामदास चारोस्कर, माजी आमदार धनराज महाले, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज ढिकले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील आव्हाड, नगराध्यक्ष रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब बोरस्ते, सचिन देशमुख, गुलाब तात्या जाधव, अविनाश जाधव, माधवराव साळुंखे आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गुजराती’ पदार्थांची खमंग मेजवानी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब'तर्फे 'गुजराती फूड मेकिंग' कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि. २ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता जेहान सर्कलजवळील 'हॉटेल करी लिव्हज्'मध्ये ही कार्यशाळा होईल.

चोखंदळ खवय्यांना गुजराती पदार्थांची चव हमखास चाखावीशी वाटते. किंबहुना अनेकदा घरी गुजराती पदार्थांची मेजवानी तयार होते. पण, हवे तसे ते पदार्थ तयार होत नाहीत. तुम्हाला गुजराती पदार्थांची योग्य पाककृती शिकण्याची संधी मिळाली, तर नक्कीच खमंग गुजराती पदार्थ तयार करू शकता. म्हणूनच, 'मटा कल्चर क्लब' तर्फे गुजराती पदार्थांची मेजवानी शिकण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कार्यशाळेत शेफ रितू मेहरा रेसिपींचे प्रात्यक्षिक दाखविणार आहेत. पानकी, लसनिया बटाटा, सेव खमणी, मुठिया, हांडवो हे पदार्थ कार्यशाळेत शिकविले जातील. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी कल्चर क्लबच्या सभासदांना १०० रुपये, तर इतरांसाठी ४०० रुपये शुल्क असेल. सहभागासाठी नावनोंदणी करणे गरजेचे असून, सकाळी ११ ते ५ या वेळेत ९४२२५१३५६९ या क्रमांकावर संपर्क साधावा. महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड येथेही प्रत्यक्ष नावनोंदणी करता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळावर आता टॅक्सी सेवा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ओझर विमानतळावर आता टॅक्सीची सेवा उपलब्ध होणार आहे. एका खासगी कंपनीने प्रस्ताव दिल्यानंतर त्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक ते ओझर विमानतळ प्रवासाची मोठी सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. येत्या १ फेब्रुवारीपासून ही सेवा सुरू होण्याची चिन्हे आहेत.

ओझर विमानतळावरून सध्या नाशिक ते नवी दिल्ली ही विमानसेवा सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस दिली जात आहे. तर, येत्या १ फेब्रुवारीपासून हैदराबाद आणि अहमदाबाद या दोन शहरांसाठी सेवा सुरू होत आहे. तर आणखी एका कंपनीची १४ फेब्रुवारीपासून अहमदाबाद सेवा सुरू होत आहे. या सेवेमुळे ओझर विमानतळावर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. सद्यस्थितीत नाशिकहून ओझरला किंवा ओझरहून नाशिकला येण्यासाठी कुठल्याही प्रीपेड टॅक्सी किंवा रिक्षाची सुविधा नाही. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याची दखल घेत एका खासगी कंपनीने टॅक्सी सेवा देण्याची इच्छा दर्शविली. टर्मिनल आणि विमानतळ हे दोन्ही हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून (एचएएल) सांभाळले जाते. 'एचएएल'नेही टॅक्सी सेवेच्या या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आता विमानतळ सुरक्षा प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक आहे. येत्या काही दिवसातच ही मान्यता मिळणे अपेक्षित असून येत्या १ फेब्रुवारीपासून ही सेवा मिळण्याची चिन्हे आहेत. या सेवेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पायपीट वाचणार

पॅसेंजर टर्मिनलपासून गेटचे अंतर एक किलोमीटर आहे. टॅक्सी सेवा नसल्याने प्रवाशांना रिक्षा किंवा बससाठी टर्मिनलपासून थेट गेटपर्यंत पायपीट करावी लागते. त्यातच प्रवाशांकडे बॅग असतील आणि महिला प्रवाशाच असतील तर त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. टॅक्सी सेवा सुरू होणार असल्याने सर्व प्रवाशांठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

लोगो : शुभवार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संतांचा मार्ग सामान्यांसाठी पथदर्शी

$
0
0

पं. विवेक बुवा गोखले यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वासुदेवनंद सरस्वती टेंबे महाराजांची साहित्य संपदा सामान्य व्यक्तीला मार्ग दाखवण्याचे काम करते. संतांनी ज्या मार्गाने मार्गक्रमण केले तो मार्ग सामान्यासाठी पथदर्शी राहिल्याचे प्रतिपादन पंडित विवेक बुवा गोखले यांनी केले. संस्कृत भाषा सभेतर्फे परशुराम साइखेडकर नाट्यमंदिरात आयोजित व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते.

गोखले म्हणाले, की वासुदेवानंद सरस्वती यांच्या साहित्याचा आवाका मोठा आहे, तो दोन तासात सांगणे शक्य नाही. त्यांच्या साहित्याने अनेकांचे जीवन समृद्ध झाले आहे. ते महापुरुष होते. महापुरुष ज्या मार्गाने जातात ती पायवाट सामान्यांसाठी सुखकर होते. महाराजांनी लिहीलेल्या चरित्राची भव्यता मोठी आहे. महाराजांनी ३ हजार ५०० श्लोकांचे दत्तपुराण लिहिले असून याचेच मराठीत दत्त महात्म्य नावाने भाषांतर झाले आहे. महाराजांनी हरिद्वारला जाऊन गंगेची स्तुती केली. त्यावेळी गंगाष्टक लिहीले. यात टेंबे स्वामींनी मी किती पापी आहे, याचे वर्णन केले आहे. माझ्या हातून चांगली सेवा घडू अशी ते विनवणी यात करतात. मध्य प्रदेशातील नेमावर येथे महाराजांनी नर्मदा स्तुती लिहिली आहे. या संताचे साहित्य हे जडजिवांच्या उद्धारासाठी आहे. मध्य प्रदेशातील पेटला येथे महाराजांनी दत्त लिलामृत लिहिले आहे. त्यांची साहित्यसंपदा अनेकांना पथदर्शी ठरली असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. सराफ यांचा सन्मान

विवेक गोखले यांच्या हस्ते डॉ. अभिजित सराफ यांना कै. सौ. सुधाताई बेळे पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. गोखले यांचे बंधू आनंद सराफ यांनी पुरस्कार स्वीकारला. महावस्त्र, श्रीफळ, पुष्पगुच्छ व ३ हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरुप होते. संस्कृत भाषा कार्यकारिणीच्या सदस्या मीनल पत्की यांनी प्रस्ताविक केले. स्वानंद बेदरकर यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. प्रसन्न बेळ‌े यांनी अतिथींचा सत्कार केला. मधुरा बेळे यांनी गीत गायन केले. अमित नागरे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भोपाळ दुर्घटनेसंबंधात एप्रिलमध्ये सुनावणी

$
0
0

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भोपाळ येथे १९८४ मध्ये झालेल्या गॅस दुर्घटनेतील जखमींना भरपाई देण्यासाठी युनियन कॉर्बोइड कॉर्पोरेशन कंपनीच्या उत्तराधिकारी डॉव केमिकल या कंपनीने ७,८४४ कोटी रु. एवढी अतिरिक्त रक्कम द्यावी यासाठी केंद्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एप्रिलमध्ये निकाल देण्यासाठी सहमती दर्शविली.

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्या. रंजन गोगाई आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने निकाल देताना सांगितले, 'भोपाळ दुर्घटनेतील जखमींना अतिरिक्त भरपाई मिळावी या केंद्र सरकारच्या याचिकेवर एप्रिलमध्ये निकाल देण्यात येईल.' या दुर्घटनेत विषारी वायूमुळे तीन हजारांहून अधिक कामगार मृत्युमुखी पडले होते, तर जे कामगार जखमी झाले आहेत, ते अद्यापही विषारी वायूच्या प्रभावामुळे अनेक समस्यांनी त्रस्त आहेत; तसेच त्यांच्यावरील उपचाराचा वाढता खर्चासाठी अतिरिक्त रकमेची गरज असल्याची अपेक्षा याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे.

यापूर्वी भरपाईसाठी देण्यात आलेली ४७ कोटी अमेरिकी डॉलर ही रक्कम पुरेशी नसून अतिरिक्त ७,८४४ कोटी रुपये युनियन कॉर्बोइड आणि संबंधित कंपन्यांनी द्यावेत, असे याचिकेत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राचार्य निकम यांना पुरस्कार

$
0
0

मालेगाव : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्याल निमगावचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांना भूगोलशास्त्र विषयातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल 'डॉ. प्रवीण सप्तर्षी पुरस्कृत आदर्श भूगोलशास्त्र अध्यापक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे आयोजित महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषद पुणे एस. पी. डी. एम.महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ३६ वे वार्षिक आंतराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सदर परिषदे दरम्यान प्राचार्य डॉ.निकम यांना सदर पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रक कॅबिनमधून पडून क्लिनरचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ट्रकच्या कॅबिनमधून पडल्याने क्लिनरचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी सिन्नर येथे घडली असून, झोपेतून उठल्यानंतर तोल गेल्याने हा प्रकार झाला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली.

सुरेश कमलाकर शिंदे (३८ रा.गुजरंगा ता. निलंगा जि. लातूर) असे मृत क्लिनरचे नाव आहे. चालक शिवानंद मुगळे (जि.लातूर) आणि क्लिनर शिंदे आपल्या ताब्यातील मालट्रक घेवून सिन्नर मार्केट यार्डात आले होते. माल भरण्यास अवधी असल्याने सकाळी क्लिनर मालट्रकवरील कॅबिनमध्ये झोपला. दहा वाजेच्या सुमारास अचानक झोपेतून उठून उभा राहिला. यावेळी तोल जावून तो जमिनीवर कोसळला. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने चालक मुंगळे याने त्यास सिन्नर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल केले. यानंतर त्यास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.

लोखंड पडल्याने

कामगाराचा अंत

नाशिक : वजनी लोखंडी जॉब डोक्यात पडल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना वाडिवऱ्हे औद्योगिक वसाहतीत घडली. या प्रकरणी वाडिवऱ्हे पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

विजयकुमार सुरेशराम (१९, रा. वाडिवऱ्हे) असे मृत कामगाराचे नाव आहे. वाडिवऱ्हे शिवारातील इंडियन ऑटो इंडस्ट्रीज या कारखान्यात विजयकुमार कामास होता. विजयकुमार हा सोमवारी (दि.२८) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास काम करीत असतांना ही घटना घडली. वजनी लोखंडी जॉब क्रेनने उचलला जात होता. जॉब अचानक निसटला आणि तो विजयकुमारच्या डोक्यावर पडला. यात गंभीर जखमी झालेल्या विजयकुमार यास चुलतभाऊ विनोद कुमार रामनरेशराम यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. ही घटना समजताच कंपनी व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांसह कंपनी कामगारांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गर्दी केली.

बांधावरून पडल्याने

शेतमजुराचा मृत्यू

नाशिक : शेतात काम करीत असतांना बांधावरून पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सुरगाणा तालुक्यातील पळसन येथे घडलेल्या या घटनेप्रकरणी सुरगाणा पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली. सोनू मोतिराम गवळी (४९, रा. पळसण ता. सुरगाणा) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सोनू गवळी शनिवारी (दि. २६) सायंकाळी आपल्या शेतात काम करीत असतांना ही घटना घडली. बांधावरून जात असतांना अचानक तोल गेल्याने ते उंचावरून खाली कोसळले. या घटनेत त्यांच्या छाती आणि तोंडास दुखापत झाली. कुटुंबीयांनी त्यांना सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयात तत्काळ दाखल केले. अधिक उपचारासाठी त्यांना रविवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना सोमवारी (दि. २८) त्यांचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुधारित आकृतिबंधावर शिक्षकेतरांची नाराजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील सर्व खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतिबंध लागू करण्याचा शासननिर्णय सोमवारी राज्य शालेय शिक्षण विभागाच्या वेबसाइटवर झळकला. परंतु, हा निर्णय अन्यायकारक असल्याची भूमिका शिक्षकेतर संघटनांनी घेतली आहे.

२३ ऑक्टोबर २०१३ रोजीच्या शासननिर्णयानुसार तत्कालिन उच्चस्तरीय समितीने ठरविल्यानुसार शिक्षकेतर पदांचा सुधारित आकृतिबंध निश्चित करण्यात येणार होता. या आकृतिबंधाकडून शिक्षकेतरांना मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु, विद्यार्थी संख्येनुसार ठरविण्यात येणाऱ्या पदसंख्येबाबत अन्याय झाल्याचे मत शिक्षकेतरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यात आकृतिबंध समिती सदस्यांनी ७०० विद्यार्थी संख्येला पूर्णवेळ ग्रंथपाल पदाची केलेली शिफारस परस्पर बदलून त्यापूर्वीची एक हजार विद्यार्थी संख्येला पूर्णवेळ ग्रंथपाल पदासाठी शिफारस केली आहे. याशिवाय, दोन शाळांमिळून पूर्णवेळ ग्रंथपाल करण्याच्या आश्वासनाची पूर्तताही केली नसल्याने अनेक अर्धवेळ ग्रंथपाल पूर्णवेळ होण्यापासून वंचित राहतील, अशी भीती पुन्हा निर्माण झाली आहे.

खाजगी शाळांतील शिक्षकेतरांवरील अन्याय आहे तसाच सुरू ठेवणारा शासननिर्णय आहे. युती सरकारच्या १९९८ पर्यंतच्या कालावधीत, अंमलात असलेल्या निर्णयाचा विपर्यास, तेच शासन करीत आहे. २००३ ते २०१३ या काळात विरोधी पक्ष नेता या नात्याने अन्यायकारक म्हणून विरोध करणारे त्यावेळचे विरोधक व आजचे शिक्षणमंत्री विनोद तावडेच या अन्यायकारक निर्णयाचे समर्थन करीत आहेत. या व अशा जाचक निर्णयामुळेच सत्तांतर झाले आहे, याचे विस्मरण होऊ नये.

\B- सतीश नाडगौडा, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खासगी शाळा शिक्षकेतर संघटना\B

समितीच्या शिफारशीत परस्पर बदल केला असून, याची समिती सदस्यांची संमती घेतलेली नाही. त्यामुळे आकृतिबंध समितीचा फक्त फार्स तयार करून आकृतिबंध जाहीर करण्यास चार वर्षाचा विलंब केला आहे. १९९४ मध्ये निश्चित झालेले विद्यार्थी संख्येचे यावेळी परिस्थितीनुसार बदलणे आवश्यक होते.

\Bविलास सोनार, प्रांत अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संलग्न ग्रंथालय शिक्षण विभाग\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फनिक्युलर ट्रॉलीवर ग्रामसभेत आगपाखड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सप्तशृंगी गडावरील फनिक्युलर ट्रॉलीविरोधात २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामस्थेत गडावरील व्यापाऱ्यांसह किरकोळ विक्रेत्यांनी आवाज उठविला. सरपंच सूमनबाई सूर्यवंशी याच्या अध्यक्षतेखाली गडावर मराठी शाळेच्या पटांगणात सकाळी अकरा वाजता ही ग्रामसभा पार पडली.

सभा सुरू होताच ग्रामस्थांनी फनिक्युलर ट्रॉलीविषयी प्रश्नांचा भडिमारच सुरू केला. येथील ८० डोलिधारकांचा प्रश्न गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून ऐरणीवर असून रोपवेचे व्यवस्थापक राजीव लुंबा हे मनमानी करीत असल्याचा आरोप डोलीधारकांनी केला. ट्रॉली व्यवस्थापकाने फक्त ३० डोलीधारकांनाच कामावर घेतले आहे. तर उरलेले डोलीधारकांच्या रोजगाराचे असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. तसेच ज्या डोलीधारकांना कामावर घेतले आहे, त्यांना अद्याप नियुक्तीपत्र दिलेले नाही. नियुक्तीपत्र मिळावे व उरलेल्या डोलीधारकांना रोजगार द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा फनिक्युलर ट्रॉली प्रशासनाविरोधा उपोषण करू असा इशारा देण्यात आला. अनेक नियमांचे उल्लंघन सुरू ट्रॉली प्रशासनाडून सुरू आहे. या ग्रामसभेला दीड हजार ग्रामस्थ उपस्थित होते. आदिवासी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. किरकोळ दुकानदार, मोठे व्यावसायिक यांनी विरोध दर्शविला. रेखा जोशी यांनी राजीव लूबां यांना हात जोडून विनंती केली की या रोपवे मूळे सर्वच ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे. येथील व्यापारी वर्ग चितांतून झाला असून किराणा, हॉटेल, पुजेचे साहित्य, प्रसाद दूकाने, तत्सम व्यवसायिकांना आर्थिक फटका बसला आहे. कोणी बँकेचे कर्ज, गृहकर्ज काढले आहे. ते फेडायचे कसे, मुलांचे शिक्षण कसे करायचे, असा सवाल व्यावसायिकांनी यावेळी उपस्थित केला. ग्रामस्थ बाबूराव गवळी यांनी ट्रॉलीसाठी २४ एकर जमीन दिली असून ती जमीन आपल्याला परत मिळावी अशी मागणी त्यांनी केली. उपसरपंच राजेश गवळी यांनी पाच ते सहा दिवसात सर्व विषयांवर निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.

ट्रस्टचे व्यवस्थापक सूदर्शन दहातोंडे यांच्याकडेही ग्रामस्थांनी गाभारा दर्शन बंद करण्यात यावे, अशी मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोटीत हरिनामाचा जप

$
0
0

घोटी : इगतपुरी तालुक्यातील अनेक दिंड्या त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातूनही अनेक दिंड्या माऊलींच्या जयघोषात घोटीमार्गे ब्रह्मगिरीकडे रवाना होत आहेत. घोटीत अनेक दिंड्या आल्याने घोटीलाच यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आज जवळपास हजारो वारकरी घोटीत आल्याने गल्लोगल्लीत हरिनामाचा गजर निनादला जात होता. ठिकठीकाणी दिंड्यांचे स्वागत होत असून पावलोपावली चहापाणी व भोजनाच्या पंगती दिल्या जात आहेत. नगर व ठाणे जिल्ह्यातून आलेल्या दिंड्याचा घोटीत संगम झाल्याने घोटी शहर वारकऱ्यांनी गजबजले आहे. इगतपुरी येथील जोग महाराज मठातील दिंडीही रवाना झाली. मठाधिपती ह. भ. प. माधव महाराज घुले यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी रवाना झाली. आज घोटी शहरात साई पालखीची वर्दळ तर दुसरीकडे वारकरी बांधवाची वर्दळ यामुळे घोटीत मोठ्या प्रमाणात गर्दी होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून ‘रिले’ प्रथम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सोळाव्या राज्य बालनाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या 'रिले' या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केली आहे.

या स्पर्धा नाशिकच्या परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झाल्या. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावच्या भारदे हायस्कूलने सादर केलेल्या 'तुझ्या जागी मी असते तर' या नाटकाला द्वितीय पारितोषिक जाहीर झाले आहे. दोन्ही नाटकांची अंतीम फेरीसाठी निवड झाली आहे. दिग्दर्शनाचे पहिले पारितोषिक 'रिले' या नाटकासाठी धनंजय वाबळे यांना, तर द्वितीय पारितोषिक 'प्रोजेक्ट मैत्रीबंध' नाटकासाठी उर्मिला लोटके यांना जाहीर झाले. प्रकाश योजनेसाठीचे प्रथम पारितोषिक 'सेल' नाटकासाठी चैतन्य गायधनी यांना, तर द्वितीय पारितोषिक 'पाझर' नाटकासाठी मनोज पाटील यांना जाहीर झाले आहे. नेपथ्यासाठीचे प्रथम पारितोषिक 'देवाचे दान' नाटकासाठी कार्तिकेय प्रतीक यांना, तर द्वितीय पारितोषिक 'तुझ्या जागी मी असते तर' या नाटकासाठी नीलेश विधाते यांना जाहीर झाले आहे. रंगभूषेसाठीचे प्रथम पारितोषिक 'च्या बही' या नाटकासाठी अश्विनी भलकार यांना, तर द्वितीय पारितोषिक 'प्रोजेक्ट मैत्रीबंध' नाटकासाठी सोनाली दरेकर यांना जाहीर झाले आहे. उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक 'वासुदेव आला रे' या नाटकासाठी प्रथमेश राजपूत यांना व 'देवाचं दान' नाटकासाठी सृष्टी पंडीत यांना जाहीर झाले आहे. अभिनयासाठीचे गुणवत्ता प्रमाणपत्र खुशी पाटील (अभिष्टा), कृतिका मुळे (झपाटलेली चाळ), साक्षी बारी (पोपट आणि आम्ही), श्रद्धा पाटील ( कुसू आणि तात्या), युगा कुलकर्णी (थेंबाचं टपाल), पंकज पाटील ( मु. पो. कळमसारा) चैतन्य चंदनशे (एलियन्स द ग्रेट), इशान कुलकर्णी (वॉटर भिशी), शुभम कापरे (हुतात्मा), ऋषिकेश मांडे (माँ) यांना जाहीर झाले आहेत. १५ ते २५ जानेवारी या कालावधीत भैय्यासाहेब गंधे नाट्यगृह, जळगाव व परशुराम साईखेडकर नाट्यगृह नाशिक येथे झालेल्या या स्पर्धेत ५३ नाटके सादर झाली होती. परीक्षक म्हणून जुई बर्वे, स्वाती वेदक, प्रमोद काकडे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयुक्तांचे नाव, इनोव्हाची साऱ्यांना हाव!

$
0
0

लोगो- चर्चा तर होणारच!

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या नवीन खरेदी केलेल्या वाहनांना अवघे दीड वर्ष झाले आहे. मात्र, पुन्हा या पदाधिकाऱ्यांना नव्या इनोव्हा कारचे वेध लागले आहेत. आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या नादुरुस्त झालेल्या टोयोटो करोला या वाहनाचा आधार घेत, त्यांच्या नावाखाली तब्बल सहा इनोव्हा कार खरेदीचा बार उडवण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी सुरू केली आहे. या वाहनांवर सव्वा कोटींची उधळपट्टी होणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेले शहर एकीकडे भकास होत असताना, दुसरीकडे भाजप पदाधिकाऱ्यांना पालिकेतील सत्ता आल्यापासून अच्छे दिन आले आहेत. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून सत्ताधारी भाजपने पदांची भारंभार निर्मिती केल्यानंतर आता त्यांना सोयीसुविधाही देण्यासाठी आपले सर्व बळ वापरले आहे. पदाधिकाऱ्यांसाठी नवी वाहने खरेदी करण्याचा हा प्रकार मनसेपासून भाजपच्या सत्तेतही सुरूच आहे. भारंभार समित्यांची निर्मिती केल्यानंतर सहा महिन्यांतच भाजपने पदाधिकाऱ्यांची हौस भागवण्यासाठी तब्बल सहा स्विफ्ट डिझायर आणि तीन मारुती सियाझ गाड्यांची खरेदी केली होती. त्यावेळी महापौर व उपमहापौर वगळता सभागृहनेता, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता आणि प्रभाग समित्यांसाठी नव्याने वाहने घेण्यात येऊन त्यावर एक कोटीची उधळपट्टी करण्यात आली होती. आता पुन्हा नव्याने याच पदाधिकाऱ्यांना इनोव्हा कारमधून फिरण्याची हौस आली आहे. नूतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांची टोयोटा करोला ही कार नादुरुस्त झाली असून, ती दुरुस्तीला देण्यात आली आहे. परंतु, या गाडीचे इंजिनच खराब झाल्याने त्यांच्यासाठी नवीन वाहन खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला आहे. आयुक्तांना नवीन गाडी द्यायची तर, महापौरांनीही आपला हट्ट भागवून घेत दोन इनोव्हा क्रेटा खरेदी करण्याची तयारी केली असून, तसा प्रस्ताव स्थायीकडून करून घेतला आहे. महापौर आणि आयुक्तांनाही नवीन वाहने मिळत असतील, तर आपणही मागे का रहावे, यासाठी आता पदाधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. महापौर आणि आयुक्तांना नवीन इनोव्हा गाडी द्यायची असेल तर आम्हालाही द्या, असा हट्ट धरत उपमहापौर, सभागृहनेता, स्थायी समिती सभापती आणि विरोधी पक्षनेत्यांसाठीही इनोव्हा गाडी घ्यावी अशी उपसूचना नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या पत्रावर देण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेत सहा इनोव्हा कार खरेदीची घाई सुरू झाली आहे.

नवी वाहने तरीही, उधळपट्टी

महापालिका आयुक्तांची टोयोटो करोला ही गाडी संजय खंदारे आयुक्त असताना २०१२ मध्ये घेण्यात आली आहे. महापौर रंजना भानसी यांच्याकडे असलेली इनोव्हा अशोक मुर्तडक महापौर असताना घेण्यात आली आहे. या गाडीला अवघी चार वर्षे झाली आहेत. सभागृहनेता दिनकर पाटील, स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासाठी गेल्याच वर्षी सियाझ गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा याच पदाधिकाऱ्यांना इनोव्हाचे वेध लागले असून, त्यासाठी सव्वा कोटींची पुन्हा उधळपट्टी केली जाणार आहे.

खरेदी भाजपच्या अंगलट

नूतन आयुक्तांच्या नावाखाली काही पदाधिकाऱ्यांनी पालिकेत आपली हौस भागवून घेण्याची तयारी सुरू केली आहे. नाशिककरांवर लादलेली करवाढ एकीकडे कमी होत नसल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना, दुसरीकडे मात्र सत्ताधाऱ्यांनी नाशिककरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे उद्योग सुरूच ठेवले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नाशिक विकासासाठी दत्तक घेतले की, भाजपच्या पदाधिकाऱ्यांची हौस पूर्ण करण्यासाठी, असा सवाल नागरिक करत आहेत. त्यामुळे ही वाहन खरेदी भाजपच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेलरोडला टोळक्याची दहशत

$
0
0

चंपानगरीमध्ये तरुणाची कोयत्याने हत्या

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

विवाहाच्या हळदी समारंभात भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाची दहा-बारा जणांच्या टोळक्याने कोयत्याने निघृण हत्या केल्याची घटना जेलरोडच्या चंपानगरीत घडली. हल्ल्यात अन्य एक जण गंभीर जखमी आहे. उपनगर पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले असून अन्य फरार हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

रोहित वाघ (२३, सुभाषरोड, नाशिकरोड) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. रोहितचा आतेभाऊ अविनाश विष्णू वाघ याने पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार, जेलरोड-कॅनॉलरोड लगत चंपानगरी तेथे लखन गायकवाड यांच्या घरी रविवारी (दि. २७) हळदीचा कार्यक्रम होता. रात्री नऊ वाजेच्या सुमारास रोहित पारखे, करण केदारे, विशाल जाधव, सोनू गायकवाड, बाळा केदारे, ललित वागळे, मयूर गायकवाड, सागर गांगुर्डे, समाधान आव्हाड, अमित वाघमारे, आशिष वाघमारे व इतर साथीदार चंपानगरीच्या उद्यानाच्या गेटसमोर भांडत होते. यावेळी लग्न घरातील व्यक्तींनी गोंधळ घालणाऱ्या रोहित पारखे व अन्य युवकांना हटकले आणि हळदीचा कार्यक्रम असल्याने गोंधळ करू नका, असे सांगून परत पाठवले. कार्यक्रम आटोपल्यावर रात्री साडेदहाच्या सुमारास रोहित, करण, विशाल, सोनू, बाळा, ललित, मयूर, सागर, समाधान, अमित, आशिष हे सगळे जण दुचाकींवर आले. त्यांच्यात व अन्य दोन-तीन तरुणांमध्ये उद्यानाच्या गेटजवळ पुन्हा भांडण सुरू झाले. रोहित पारखे व त्याच्या साथीदारांनी रोहित वाघ, रितेश विनायक पांडव आणि अल्केश राजू जॉन यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. छातीवर वार लागल्याने रोहित वाघ गंभीर जखमी झाला. रितेश पांडवच्या (२१) डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली. जखमींच्या मदतीसाठी लग्नघरातील व्यक्तींनी धाव घेतली. मात्र, हल्लेखोरांनी त्यांच्यावर दगडफेक केली. दोन्ही जखमींना नाशिकरोडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना रोहितचा रात्री मृत्यू झाला.

सहा जण ताब्यात

पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक आयुक्त ईश्वर वसावे, उपनगरचे वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर रायते सहकाऱ्यांसह घटनास्थळी आले. पोलिसांनी तातडीने हालचाल करत समाधान आव्हाड, विठ्ठल जाधव, बाळा केदारी, ललित बागले, सागर गांगुर्डे, अमित वाघमारे या सहा जणांना ताब्यात घेतले. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या रोहितचा शोध सुरू आहे. पोलिस निरिक्षक प्रभाकर रायते व महेंद्र चव्हाण यांनी तपास पथके रवाना केली आहेत.

तणावाचे वातावरण

रोहितवर सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास देवळालीगावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रोहित नाशिकरोडच्या महाविद्यालयात प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. त्याचे वडिल राजू वाघ हे सुभाषरोडच्या किराणा दुकानात कामाला आहेत. रोहितच्या पश्चात एक भाऊ, बहीण असा परिवार आहे. रोहित हा माजी नगरसेवक सुनील वाघ यांचा पुतण्या आहे. या घटनेनंतर सोमवारीही नाशिकरोड परिसरात तणावाचे वातावरण होते. रोहितच्या घराकडे जाणारा मार्ग रिक्षांनी अडवून रिक्षाचालकांनी हल्ल्याचा निषेध केला. सुभाषरोड भागात व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाथांच्या वाटेवरी, गोदा स्वागत करी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

त्र्यंबकेश्वर येथे भरणाऱ्या संत निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रेसाठी जिल्हाभरातील विविध ठिकाणाहून पायी दिंडी निघाल्या आहेत. मुखी ज्ञानदेव तुकारामाचा गजर करीत टाळ-मृदुंगाच्या तालात भक्तीचा गजर करीत दोन दिवसांपासून या दिंड्यांचे नाशिक शहर परिसरात आगमन होत आहे. त्यांचे ठिकठिकाणी स्वागत आणि पूजन केले जात आहे. अंत्यत शांततेत आणि शिस्तबध्दपणे मार्गक्रमण करणाऱ्या दिंड्या सध्या शहरातील आकर्षण ठरत आहेत.

प्रत्येक आकर्षक सजविलेले रथ, हाती ध्वज आणि पताका घेऊन निघालेले वारकरी व भाविक, डोक्यावर तुळशीवृंदावन, मुखी हरिनामाचा जयघोष करीत अत्यंत शिस्तबद्धपणे पायी दिंडी येत आहेत. एका-एका दिंडीत हजारोंच्या संख्येने भाविक सहभागी झालेल्या दिंड्याची रांगा लांबवर पसरलेली दिसत आहे. वेगवेगळ्या मार्गाने येणाऱ्या दिंड्यांचे सुरू असलेल्या भजनाचे सूरांनी शहर परिसरही भक्तीमय वातावरणाने भरून गेलेला आहे.

मुंबई-आग्रा महामार्ग, औरंगाबाद रोड, पेठरोड, दिंडोरी रोड या मुख्य रस्त्यांनी पंचवटी परिसरात दिंड्यांचे आगमन होत आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या या पायी दिंडींची व्यवस्थेचे नियोजन काही महिने अगोदरच केलेले जात असल्यामुळे ठराविक वेळी, ठराविक ठिकाणी या दिंड्या पोहचत आहे. त्यांचा मुक्काम, चहा-नास्ता, जेवण यांची व्यवस्था अगोदरच करण्यात आलेली आहे. मुक्कामाच्या ठिकाणी प्रवचन, भजन, कीर्तन यांचे आयोजन केले जात आहे. कडाक्याच्या थंडीतही मोठ्या भक्तीभावाने प्रेरीत झालेले भाविक वारकरी मोठ्या उत्साहाने दिंड्यांमध्ये सहभागी होत आहेत.

विविध भागातून येणाऱ्या दिंड्या या रामकुंडावर पोहचत आहेत. तेथे भाविक स्नान करून पंचवटी परिसरातील काळाराम मंदिर, सीतागुंफा, कपालेश्वर महादेव मंदिर आदी मंदिरांमध्ये दर्शन घेऊन त्र्यंबकेश्वरकडे जात आहेत.

000

'दिंडीतील चालण्याने दुगुर्ण जावेत'

\B खांडेनगरमधील दिंडी सोहळ्यात स्वामी सेवकदास योगानंद माऊलींचे प्रतिपादन\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निवृत्तिनाथांच्या दर्शनाच्या ओढीने दिंडी सोहळ्यामध्ये चालताना मानवी मनातील दुर्गुण गळून पडायला हवेत. सद्गुणांचा अंगीकार करायला हवा. तरच दिंडीमध्ये सहभागी होणे सार्थकी लागते, असे प्रतिपादन ओम श्री शिवांजनेय हरिहर दत्त सेवा आश्रमचे स्वामी सेवकदास योगानंद माऊली यांनी सोमवारी खांडेनगर येथे केले.

साईशिल्प अपार्टमेंट आणि रो हाऊसेस येथील नागरिकांच्या वतीने सालाबादाप्रमाणे याहीवर्षी नाशिक-पुणे रोडवरील शिवाजीनगर येथून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान ठेवलेल्या दिंडीचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी कीर्तन सेवेत योगानंद माऊली बोलत होते. ओम श्री स्वानंद अध्यात्मिक ध्यानधारणा केंद्र स्वामी सेवकदास योगानंद माऊली गुरूदास मंडळाच्या दिंडीचे यंदाचे १३ वे वर्ष आहे. गेल्या आठ वर्षांपासून या दिंडीला साई शिल्प अपार्टमेंट आणि रो हाऊसमधील रहिवाशांच्या वतीने अन्नदान करण्यात येते. साईशिल्प सोसायटी, गुजराणी परिवार, ओंकारेश्वर महादेव मंदिर मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

00

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भ्रष्टाचार सिद्ध केल्यास दहा लाखांचे बक्षीस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

दोंडाईचा शहरात सध्या सत्तेचा दुरुपयोग होत असून, सरकारच्या दबावाखाली प्रशासन काम करीत आहे. त्यामुळे कुठल्याही तक्रारीची शहानिशा न करता थेट गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. दोंडाईचात कुठल्याही योजनेत नाममात्रदेखील भ्रष्टाचार झालेला नसून भ्रष्टाचार सिद्ध केल्यास दहा लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांनी केली आहे. दोंडाईचा शहरातील नगरपालिकेने राबविलेल्या घरकुल योजनेसह विखरण येथील द्वारकाधी योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी सोमवारी (दि. २८) धुळ्यात पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ.रविंद्र देशमुख, गुलाबसिंग सोनवणे यांच्यासह दोंडाईचातील कार्यकर्ते उपस्थित होते.

जळगाव घरकुल योजनेत भ्रष्टाचार झाल्यानंतर तसाच भ्रष्टाचार सर्व ठिकाणी झाला असावा असा भ्रम झालेल्यांनी माझी बदनामी करण्याचा कुटील डाव आखला आहे. मनमोहन सिंग यांचे सरकार सत्तेत असताना मी प्रामाणिकपणे दोंडाईचा येथील बेघरांसाठी घरकुले असावी यासाठी प्रयत्न केले. त्यातून योजना साकारली. २००७ ते २०१५ दरम्यान गरिबांची ३८०० घरे उभी राहिली. मात्र, या योजनेत भ्रष्टाचार झाल्याची ओरड करीत गेल्या आठवड्यापासून सर्वच वृत्तपत्रातून आपली बदनामी चालविली आहे, असा आरोपही डॉ. देशमुख यांनी केला. न्यायालयात हे प्रकरण असून यासंदर्भात अंतरिम जामीन आम्हाला मिळाला आहे. माझ्या कुटूंबाने एक रूपया देखील गैरमार्गाने मिळविला असेल तर संपूर्ण प्रॉपर्टी आपण देऊन टाकू एवढेच नव्हे तर राजकीय संन्यास घेऊ असा दावादेखील डॉ. देशमुख यांनी या वेळी बोलताना केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळवणमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के

$
0
0

कळवण : बिलवाडी, देवळीवणी, चिंचपाडा, बोरदैवत, जामलेवणी, देवळीकराड, खिराड आदी भागात रविवारी सायंकाळी व रात्री तसेच, सोमवारी सकाळी १० ते ११ आणि दुपारी ३ ते ३.३० वाजेदरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के बसले. यामुळे आदिवासी बांधव भयभीत झाले असून, नागरिकांनी रविवारची रात्र घराबाहेर जागून काढली.

रविवारी रात्री व सोमवारी सकाळी मोठे तीन ते चार, तर लहान सात ते आठ धक्के बसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. बिलवाडीतील यशवंत साबळे यांच्या घराच्या पत्र्यांना तडे गेले, तर युवराज भोये व धवळू बागूल यांच्या घराच्या भिंतीला तडे पडल्याचे समजते. जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, तहसीलदार कैलास चावडे व गटविकास अधिकारी डी. एम. बहीरम यांनी ठिकठिकाणी भेटी देऊन आदिवासी बांधवांना दिलासा दिला. भूकंपकाळात घ्यावयाच्या काळजीबद्दल माहिती देऊन शासनस्तरावर याबाबत माहिती कळवू व या भागात भूकंप मापन बसविण्याची गरज असल्याचा अहवाल वरिष्ठांना देणार असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>