Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

थंडी परतली; नाशिक @ ९.२

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरासह जिल्ह्यात थंडी परतली असून, शुक्रवारी किमान तापमान ९.२ अंश सेल्सियस ऐवढे नोंदविले गेले. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात गारठा जाणवू लागल्याने आरोग्याच्या तक्रारींचा सामनाही नागरिकांना करावा लागत आहे. या आठवड्यात किमान तापमान सात अंशांपर्यंत खाली येऊ शकते, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. संक्रांतीच्या दरम्यान वातावरणातील गारवा कमी होत गेला. परंतु, आता तो वाढू लागला आहे. शुक्रवारी जिल्ह्यात कमाल तापमान २६.६ अंश सेल्सियस तर किमान तापमान ९.२ अंश सेल्सियस ऐवढे नोंदविले गेले. त्यामुळे दिवसभर वातावरणातील हवेत प्रचंड गारवा असल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपतिपदक जाहीर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शहर पोलिस दलातील दोन अधिकाऱ्यांना मानाचे राष्ट्रपतिपदक जाहीर झाले आहे. यासंदर्भातील यादी दुपारच्या सुमारास जाहीर करण्यात आली.

पोलिस उपनिरीक्षक शेख जाकीर गुलाम हुसेन आणि सहायकउपनिरीक्षक विलास रघुनाथ मोहिते या दोघांना राष्ट्रपतिपदक जाहीर झाले आहे. उपनिरीक्षक शेख सध्या इंदिरानगर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. १९८५ मध्ये पोलिस दलात दाखल झालेल्या शेख यांनी नाशिक शहरातील नाशिकरोड, पंचवटी, देवळाली कॅम्प, यानंतर सिन्नर या पोलिस ठाण्यांमध्ये काम पाहिले आहे. टिप्पर गँगसह इराणी गँगला पकडण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला. २०१३ मध्ये खात्यांतर्गत परीक्षा देऊन ते उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचले. ३३ वर्षांच्या सेवा कालावधीत वेळोवेळच्या कामगिरीमुळे त्यांना ४५० बक्षिसे मिळाली. त्यांच्या याच उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना राष्ट्रपतिपदक मिळाले आहे. सहायक उपनिरीक्षक विलास मोहिते सध्या भद्रकाली पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. शहर पोलिस दलात त्यांनी विविध पोलिस ठाण्यांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेण्यात आली. या दोघांच्या नावाची घोषणा होताच आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौघुले, माधुरी कांगणे, सर्व सहायक आयुक्त, निरीक्षक नारायण न्याहाळादे, मंगलसिंग सूर्यवंशी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोक्सीचा २४ बँकांना गंडा

$
0
0

नाशिकच्या कंपनीवर तब्बल ३८१० कोटींचे कर्ज

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सी याने नाशिकमध्येही नाशिक मल्टी ट्रेड सर्व्हिसेस सेझ लिमिटेड ही सहयोगी कंपनी स्थापन करून २४ बँकांकडून तब्बल ३ हजार ८१० कोटींचे कर्ज घेतले आहे. त्यासाठी गहाणखत आणि करारनामेही करण्यात आले असून त्यात अॅक्टिंग ट्रस्टी म्हणून आयडीबीआय ट्रस्टशिप सर्व्हिसेस कंपनीचे नाव आहे. त्यामुळे या सरकारी कंपनीवर या कर्जाचा भार येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

जानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहुल चोक्सी याने स्थापन केलेल्या या सहयोगी कंपनीत अनेक बनावट कंपन्या असून त्यातील ९ सहयोगी कंपनी व उपकंपन्याचा पत्ता एकच आहे. त्यातील २० कंपन्यामधील एकच ट्रस्टी अनेक कंपन्यावर आहे. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी जानी यांनी केली. नाशिक मल्टी ट्रेड सर्व्हिसेस सेझ लिमिटेड कंपनीने इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे बळवंतनगर येथील जागा आयसीआयसीआय बँकेकडे गहाण ठेवली होती. पण, कर्ज थकल्यामुळे बँकेने नॅशनल कंपनी ट्रिब्युनलमध्ये दावा दाखल करून सदर जागेचा ताबा मिळवला. तसेच ही जागा एसबीआय बँकेकडे गहाण ठेवल्याचेही कंपनीच्या २०१५ च्या ऑडिट रिपोर्टमध्ये आहे. ५.०३ हेक्टर असलेल्या या जागेतून वर्किंग कॅपिटलची सवलत मिळवण्यात आली. त्यानंतर ५२ कोटी चार्जेस रजिस्टार ऑफ कंपनीकडे वर्ग केले. तसेच अतिरिक्त ८४.१३ एकर जमीन गहाणखतासाठी देऊन ३२८० कोटीचे वर्किंग कॅपिटल घेण्याची कंपनीची तयारी होती. पण, त्याचे कागदपत्र तयार झाले नसल्याचे ऑडिट रिपोर्टमध्ये म्हटल्याचेही जानी यांनी सांगितले.

सेझमध्ये जमीन मंजूर

केंद्राच्या वाणिज्य विभागाने गितांजली जेम्स लिमिटेडलाला सेझमधून नांदेड येथे जेम्स व ज्वेलरीसाठी ५० हेक्टर, औरंगाबाद येथे १०२ हेक्टर, नागपूर येथे मल्टी प्रॉडक्टसाठी १००० हेक्टर, नाशिक येथे मल्टी सर्व्हिसेसाठी १०० हेक्टर जागा मंजूर केल्याचे म्हटले आहे. पण, त्याचे पुढे काय झाले, याबाबत माहिती उपलब्ध नसल्याचेही जानी यांनी सांगितले.

मेहुल फरार; संचालक मोकाट

मेहुल चोक्सी फरार आहे. परंतु, त्याला आर्थिक गुन्ह्यात साथ देणारे संचालक अजूनही मोकाट आहे. गितांजली जेम्सच्या संयोगी व उपकंपन्यांनी हजारो कोटीचे कर्ज, लेटर ऑफ क्रेडिटची सुविधा घेतलेली आहे. त्यावर अद्याप काहीही कारवाई झाली नाही. चोक्सीचा घोटाळा पंजाब नॅशनल बँक पुरता मर्यादित नाही. तर सरकारी, पीएसयू बँके यात सामील आहे.

बँकेतील डिपॉझिटमध्ये जनतेचा पैसा आहे. त्याला भविष्यात बाधा निर्माण होणार नाही. यासाठी काळजी सरकार, रिझर्व्ह बँकेने घ्यावी, 'ईडी'ने दोषींवर त्वरित कारवाई करावी.

- देवांग जानी, सामाजिक कार्यकर्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंडोरीत रविवारी पोटनिवडणूक

$
0
0

दिंडोरी : येथील नगरपंचायतीच्या वॉर्ड क्र १५ च्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी दि.२७ रोजी मतदान होत असून काट्याची तिरंगी लढत होत आहे. मनसेचे नगरसेवक सुनील भवर यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे. सुनील भवर यांचे पुत्र धनराज भवर हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न झाले. मात्र त्यात अपयश आले. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसेने उमेदवार न देता भवर यांना पुरस्कृत केले आहे. स्वतंत्र मजदूर संघाने भवर यांना पाठिंबा दिला आहे. तर भाजपने राकेश गुलाब गांगोडे यांना तर शिवसेनेने श्रीकृष्णा बाळू शेवरे यांना मैदानात उतरवले आहे. तिनही उमेदवार प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचत मताचे दान मागत आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, भाजप व शिवसेनेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून नेतेही प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. प्रशासनाने निवडणुकीची तयारी केली असून, रविवारी मतदान तर सोमवारी मतमोजणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उघड्यावर मांसविक्रीला प्रतिबंध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका कार्यक्षेत्रात उघड्यावर होणाऱ्या मांसविक्रीला प्रतिबंध घालण्यासह मांसविक्रीसाठी स्वतंत्र परवाना धोरण ठरवण्याचा निर्णयाला स्थायी समितीने दुरुस्तीसह मंजुरी दिली. त्यामुळे शहरात आता बंदिस्त ठिकाणीच मांसविक्रीला परवानगी मिळणार असून, उघड्यावर मांसविक्री केल्यात दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

कत्तलखान्यांच्या ठिकाणीच मांसविक्री व्हावी, अशा सूचना सदस्यांनी केल्या आहेत. त्यानुसार शहरातील सहा विभागांत कत्तलखाने सुरू करण्याचे आदेशही स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी दिले आहेत. शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत महापालिका कार्यक्षेत्रात मांस, चिकन, मासळी विक्री दुकानांना व खाटिक व्यवसाय करीत असलेल्या व्यक्तांनी परवाना देण्यासंदर्भातील प्रस्ताव चर्चेला आला. स्थायीच्या सदस्यांनी विषय समजून न घेताच या विषयाला विरोध करण्यास सुरुवात केली. शहरात उघड्यावर मांसविक्री होत असल्याने मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता निर्माण होऊन दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे धोरण राबवू नये, अशी मागणी दिनकर पाटील यांनी केली. अगोदरच मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. त्यात उघड्यावर मांसविक्रीला परवानगी दिल्यास त्रास वाढेल, अशी मागणी केली, तर उद्धव निमसे यांनी बंदिस्त ठिकाणीच मांसविक्री व्हावी, अशी मागणी केली. रस्त्याच्या कडेला, चौकांमध्ये मांसविक्रीला परवानगी न देता ज्यांच्याकडे गाळा असेल व परवाना असेल त्यांनाच परवानगी देण्याची मागणी केली. मुशीर सय्यद यांनी या प्रस्तावाचे जोरदार समर्थन करीत कत्तलखाने वाढविण्याची मागणी केली. शहारातील ६० ते ७० टक्के जनतेशी निगडित हा विषय आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था होईपर्यत या प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणी त्यांनी केली. स्मार्ट सिटीत कत्तलखाने वाढविण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. भागवत आरोटे यांनी मात्र या प्रस्तावाला विरोध करीत मांसविक्री बंदिस्त ठिकाणीच व्हावी, अशी मागणी केली. उघड्यावर मांसविक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मागणी केली, तर संतोष साळवे यांनी प्रस्तावाचे समर्थन केले. संगीता जाधव, सुषमा पगारे यांनी प्रस्तावाला विरोध केला. त्यामुळे दिनकर पाटील यांनी सदरचा प्रस्ताव बेकायदेशीर असल्याचे सांगत विरोध कायम ठेवला. परंतु, आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी याबाबत स्पष्टीकरण देत सदरचा प्रस्ताव बंदिस्त ठिकाणीच मांसविक्री करण्यासाठी धोरण ठरविण्याचा असल्याचे सांगत उघड्यावर मांसविक्री होणार नाही, अशी ग्वाही सदस्यांना दिली. कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, तसेच अन्य महापालिकांप्रमाणेच मांसविक्रीचे नियमन करता यावे यासाठी प्रस्ताव असल्याचे स्पष्ट केले.

परवाना राहणार बंधनकारक

आयुक्तांप्रमाणेच अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ यांनीही उघड्यावर मांसविक्री होऊ नये यासाठी हा प्रस्ताव असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर सभापती आहेर-आडके यांनी सदरच्या प्रस्तावात सदस्यांच्या सूचनांचा समावेश करीत बंदिस्त ठिकाणीच मांसविक्री करण्याच्या धोरणाला मंजुरी दिली, तसेच शहरात सध्या पूर्व आणि सातपूर या दोन विभागांतच कत्तलखाने असून, त्यात सातपूरचा कत्तलखाना बंद आहे. त्यामुळे सहा विभागांत कत्तलखाने कार्यान्वित करण्याचे आदेशही त्यांनी दिले. स्थायीच्या मंजुरीनंतर आता महापालिका क्षेत्रात उघड्यावर मांसविक्री बंद होणार असून, मांसविक्रीसाठी शुल्क भरून महापालिकेचा परवाना घेणे बंधनकारक राहणार आहे.

-----

याप्रमाणे होणार शुल्क आकारणी

--

प्रकार शुल्क (रुपयांत)

--

मांस व चिकन एकत्रित विक्री परवाना - ५०००

मासळी विक्री व्यवसाय परवाना- २५००

मांस विक्रीसाठीचा व्यक्तिगत परवाना- ५००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राचीन गोवर्धन अनुभवण्याची संधी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहराची कधीकाळी मुख्य बाजारपेठ अन् जिल्ह्याचे ठिकाण म्हणजे गोवर्धन गाव! सातकर्णीने महाराष्ट्र परकीयांच्या हातून मुक्त करण्यासाठी नहापानाशी गोवर्धन परिसरात युद्ध केले, या आठवणींना आजही पांडवलेणी साक्ष आहे. या प्राचीन गावाची सफर करण्याची संधी रविवारी (दि. २७) महाराष्ट्र टाइम्सतर्फे आयोजित 'मटा हेरिटेज वॉक'च्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. गोवर्धन, गंगापूर व जलालपूर या तिन्ही गावांची सफर हेरिटेज वॉकमधून अनुभवता येणार आहे.

पांडव लेण्यातील शिलालेखांमध्ये गोवर्धनचा उल्लेख मिळतो. यातून गोवर्धन गावाला दोन हजार वर्षांचा इतिहास असल्याचेही स्पष्ट होते. गोवर्धन जिल्ह्याचे ठिकाण असल्याचा उल्लेखही अनेक ठिकाणी मिळतो. आंध्रभृत्य नावाच्या दिवाणाचे गोवर्धन मुख्य ठिकाण होते. पांडवलेणी कोरताना त्यासाठी मोठ्या प्रमाणात महसूल व दाने याच गावातून व्यापारी मंडळींकडून मिळाल्याचा उल्लेखही आहे. सातवाहन व नहापान युद्धानंतर गोवर्धनचे नशीब पालटले. नाशिकचं जनअस्तित्व निर्माण होण्यापूर्वी गोवर्धन गावाने जगभरात आपले स्थान निर्माण केले होते. इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा आजही गोवर्धन, गंगापूर परिसरात पहायला मिळतात. हा रोमांच अनुभवण्यासाठी मटा हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. या सफरीत ज्ञानसाधना शिक्षण प्रसारचे अध्यक्ष मुरलीधर पाटील व अॅड. सुदर्शन पाटील आपल्याला गावची माहिती देणार आहेत.

हेरिटेज वॉकमध्ये काय पाहाल?

गोवर्धन गावातील ११ किंवा १२ व्या शतकातील गोवर्धनेश्वराचे महादेव मंदिर आहे. त्याच्या शेजारीच बाणेश्वराचे पेशवेकालीन मंदिर आहे. बाणेश्वर मंदिरासमोर सुंदर घाट पेशवाईतील वैभवाची आठवण करून देतो. गोवर्धनच्या प्राचीन बाजारपेठेचे ठसे आजही पहायला मिळतात. ही बाजारपेठ सध्या गंगापुरात पेठगल्ली म्हणून अनुभवता येते. गावातील देवीचे मंदिर अनोखी परंपरा उलगडते तर पाटील वाडा, पंचवाडा, सोनवणी वाडा, देशपांडे वाड्याच्या रुपाने अनोखा इतिहास अनुभवता येतो. जलालपूरचे वैभव असलेले वऱ्हारेश्वराचे सुंदर मंदिर, दगडी कारंजे अन् पहिल्या मराठी महिला चरित्रकार लक्ष्मीबाई टिळकांच्या आठवणी या हेरिटेज वॉकमधून अनुभवता येणार आहेत.

नावनोंदणी आवश्यक

गोवर्धन गावातील मटा हेरिटेज वॉकमध्ये सहभागी होण्यासाठी दे. ना. पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजसमोर सकाळी ८.५० वाजता एकत्रित जमायचे आहे. वॉक ९ वाजता सुरू होईल व साडेअकराला संपेल. नावनोंदणीसाठी रमेश पडवळ (८३८००९८१०७) यांच्याकडे आपले नाव व सोबत येणाऱ्यांची संख्या व्हॉटस् अॅप करावी.

लोगो : मटा हेरिटेज वॉक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केबल ऑपरेटरसाठी डिजिटल कंट्रोल रूम

$
0
0

शेअर घेण्याचे असोसिएशनतर्फे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा केबल ऑपरेटर्स असोसिशनच्या वतीने जिल्हाभरातील केबल व्यावसायिकांसाठी 'ना नफा ना तोटा' तत्वावर अद्ययावत डिजिटल कंट्रोल रूम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी असोसिएशनने शेअर्स फॉर्म भरून घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे. ग्राहकांच्या व स्वत:च्या फायद्यासाठी केबल व्यावसांयिकांनी शेअर फॉर्म भरून सहकार्य करावे, असे आवाहन असोसिएशनने केले आहे.

'ट्राय'ने जाहीर केलेली नवीन नियमावली आणि एमएसओंच्या जाचक अटी यामुळे केबल ऑपरेटर व ग्राहकांवर मासिक शुल्काचा अतिरिक्त भार पडणार आहे. हा भार कमी करण्यासाठी असोसिएशनने धडपड सुरू केली आहे. 'ना नफा-ना तोटा' या सहकारी तत्वावर शहरी आणि ग्रामीण भागासाठी स्वत:चा अद्ययावत डिजिटल कंट्रोल रूम सुरू करण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला आहे. त्यासाठी असोसिएशनने शेअर फॉर्म बनविले असून ते भरून घेण्यास सुरूवात केली आहे. या मोहिमेत सहभागी होऊन केबल ऑपरेटर्सने शेअर फॉर्म भरून द्यावेत व स्वत:चा व ग्राहकांचाही फायदा करावा, असे आवाहन विनय टांकसाळे आणि संजय गुजराणी यांच्यासह असोसिएशनने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गळ्यात कांदामाळा, सरकारविरोधी आवळला गळा

$
0
0

निफाडला स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, निफाड

कांद्याला प्रतिक्विंटल दोनशे ऐवजी पाचशे ते सहाशे रुपये अनुदान द्यावे, दोन हजार रुपये हमी भावाने कांदा खरेदी करावा, निफाड व रानवड साखर कारखाने सुरू करावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी आसूड मोर्चा काढला. निफाड तहसील कार्यालयावर काढलेल्या या मोर्चात शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून घोषणाबाजी केली.

मोर्चाप्रसंगी युवा स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली. उन्हाळ कांद्याच्या पाठोपाठ लाल कांदाही मातीमोल बाजार भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च निघणे अवघड झाले आहे. तोटा सहन करून कांद्याची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे, कुटुंब कसे चालवायचे असा प्रश्न बळीराजा पुढे उभा आहे. मात्र सरकार कांदा उत्पादकांकडे दुर्लक्ष करीत आहे. सरकारने कांद्याला पाचशे ते सहाशे रुपये अनुदान द्यावे, तसेच दोन हजार रुपये हमी भावाने कांद्याची खरेदी करावी अशी मागणी वडघुले यांनी केली. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली २८ फेब्रुवारी रोजी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही वडघुले यांनी सांगितले. निफाड येथील मार्केट कमिटी आवारातून तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. साहेबराव मोरे, संदीप जगताप, सोमनाथ बोराडे, सुधाकर मोगल, संजय पाटोळे आदींसह शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हिरे आर्किटेक्चर कॉलेजने उमटविला ठसा

$
0
0

रौप्य महोत्सवी वर्धापनदिनी मंत्री रावल यांचे गौरोवोद्गार

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राज्याचे माजी शिक्षणमंत्री स्वर्गीय डॉ. बळीराम हिरे यांनी स्थापन केलेल्या आर्किटेक्चर कॉलेजने गेल्या २५ वर्षाच्या वाटचालीत शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तेच्या जोरावर विद्यापीठस्तरावर जसा आपला स्वतंत्र ठसा उमटवला; तसाच वास्तुशास्त्रातही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला नावलौकीक निर्माण केला. स्वर्गीय डॉ. हिरे यांच्या कार्यकर्तुत्वाप्रमाणे संस्थेचा लौकिकही असाच वृद्धिंगत होत जावो, अशा शुभेच्छा राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या.

मुंबई बांद्रा येथील डॉ. बळीराम हिरे आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिन सोहळ्यात मंत्री रावल बोलत होते.

व्यासपीठावर आर्किटेक्चर कौन्सिलचे अध्यक्ष आर्कि. विजय गर्ग, कलाभूषण पुरस्कार विजेते गायक श्रीकांथन नारायणन, संस्थेचे अध्यक्ष प्रसाद हिरे, संस्थेच्या विश्वस्थ तथा समन्वयक गीतांजली हिरे, प्राचार्य आर्कि. सुनील मगदुम, युवानेते परीक्षित थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.

रावल यांनी आपले आजोबा दादासाहेब रावल व डॉ. हिरे यांच्या मैत्रीपूर्ण स्नेहसंबंधाचा उल्लेख करून हिरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वाटचालीत आपले सदैव सहकार्य असेल अशी ग्वाही दिली. संस्थेचे अध्यक्ष प्रसाद हिरे म्हणाले, महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी विद्यापीठात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील शोधनिबंध, पुस्तक प्रकाशन, डॉक्युमेंटरी प्रेझेंटेशन, 'मिराकी २०१७' या आंतरराष्ट्रीय परिषदेचेही यशस्वी आयोजन केले. विजय गर्ग यांनी मार्गदर्शन केले. गायक श्रीकांथन नारायणन यांनी गीतगायनातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी 'पॉईंट-२०१९' या वार्षीक नियतकालिकांचे व ई-मॅगेझिनचे प्रकाशन आणि वास्तुकला प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रणव भट, अनिल गांधी, परेश कपाडीया, अनिल परब, टी. आर. वेंकटरमण, सुलभा, उमेश मोरे, नाना अहिरे, सुनील खैरनार, हेमंत वाघ, तानाजी सुतार, दीपक जाधव आदींना महाविद्यालयाच्या २५ वर्षातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्यवरांना चैतन्य पुरस्कार प्रदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या व नाशिकचा लौकिक जागतिक स्तरावर वाढविणाऱ्या मान्यवरांना रविवारी चैतन्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चेतना जागृती मंचच्या वतीने हा सोहळा गंगापूर रोडवरील आकाशवाणी केंद्राजवळ असलेल्या समर्थ जॉगिंग ट्रॅकवर पार पडला.

या कार्यक्रमाला डॉ. मो. स. गोसावी, आमदार सीमा हिरे, नगरसेवक योगश हिरे, महेश हिरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. नगरसेवक योगेश हिरे यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. त्यानंतर डॉ. सुधीर संकलेचा यांनी पुरस्कारार्थींचा परिचय करून दिला. संगीत क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या पं. रामभाऊ (दादा) धुमाळ, गणित विषयात संशोधन करून भरीव कामगिरी करणारे दिलीप गोटखिंडीकर, साहित्य व पत्रकारिता क्षेत्रासाठी डॉ. वृंदा भार्गवे, क्रीडाक्षेत्रासाठी इराणच्या महिला कबड्डी संघाच्या प्रशिक्षिका शैलजा जैन, मानव संसाधन क्षेत्रात कामगिरी करणारे प्रशांत खंबसवाडकर, दिव्यांग खेळाडू हंसराज पाटील, धावपटू दुर्गा देवरे यांना डॉ. मो. स. गोसावी यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी चेतना जागृती मंचच्या वतीने आयोजित आनंद मेळ्याचा समारोप करण्यात आला. या मेळाव्यात विविध गृहोपयोगी वस्तू, खाद्य पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. तीनही दिवस मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. पहिल्या दिवशी जादूगार ए. सी. सरकार यांचे जादूचे प्रयोग दाखविण्यात आले. दुसऱ्या दिवशी शनिवारी रागिणी कामतीकर यांचे गायन व शालेय विद्यार्थ्यांचा देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम झाला. तिसऱ्या दिवशी रविवारी पुरस्कार वितरणानंतर मंगेश पंचाक्षरी यांचा राशीभाव हा कार्यक्रम पार पडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ दोघांची निर्दोष मुक्तता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अन्नधान्याची अफरातफर केल्याच्या आरोपातून अनिरुद्ध जयराम चव्हाण व प्रभाकर पुंजाजी आहेर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

नाशिकरोड येथील सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशनमध्ये कार्यरत असलेले वेअर हाऊस मॅनेजर प्रभाकर आहेर व गोडाउन सहायक अनिरुद्ध चव्हाण यांनी धान्यसाठ्यात घोटाळा केल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्या विरुद्ध कलम ४०९, ४२० व ४३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. आर. यादव यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी पार पडली. खटल्यात संशयितांच्या विरोधात सबळ पुरावा न मिळाल्याने न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयात संशयितांच्या बाजूने अॅड. जितेंद्र चौहान यांनी युक्तिवाद लढविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीमॅट’, ‘जीपॅट’ परीक्षा आज

$
0
0

नाशिक : एमबीए आणि फार्मसी अभ्यासक्रमांसाठी अनुक्रमे घेण्यात येणाऱ्या 'सीमॅट' आणि 'जीपॅट' परीक्षा आज (दि. २८) होणार आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटी) वतीने ही परीक्षा घेण्यात येत आहे. एनटीने यंदा जेईई मेन परीक्षेचे निकाल विक्रमी वेळेत जाहीर केल्यानंतर याच संस्थेद्वारे आता या दोन्ही परीक्षा होणार आहेत. परीक्षांचे हॉल तिकीट एनटीच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना ओळखपत्र म्हणून आधारकार्ड सोबत ठेवायला ठेवावे लागणार आहे. शहरात केव्हीएन नाईक कॉलेज, गुरू गोविंद सिंग पॉलिटेक्निक, संदीप फाउंडेशन, सपकाळ कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, आयओन डिजिटल झोन, वडाळा, इंदिरानगर या केंद्रांवर परीक्षा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नव्या युगाबरोबर अपडेट झाले पाहिजे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

युवकांनी वक्तृत्व, क्रीडा,कला,अभिनय क्षेत्रात उज्ज्वल यशाची शिखरे गाठली की आपली, आपल्या संस्थापक कर्मवीरांची स्वप्ने साकारतील, असे प्रतिपादन मविप्र संचालक सचिन पिंगळे यांनी केले.

त्र्यंबक येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक गुणगौरव सोहळ्यानिमित्त पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र सेवक संचालक नानासाहेब दाते, नंदुरबारचे सुप्रसिद्ध कथाकथनकार डॉ माधव कदम, स्वामी सागरानंद सरस्वती आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे माजी शिक्षणाधिकारी व विद्यमान संचालक नानासाहेब दाते यांनी महाविद्यालयाच्या स्थापनाकाळातील आपले अनुभव सांगून, विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडवावे, आईवडिलांचा व संस्थेचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन केले. तसेच गुणवंतांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, कथानकथनकार डॉ. माधव कदम यांनी विद्यार्थ्यांना प्रथम खळखळून हसविले, नंतर श्यामची आई मधील, श्यामची जडणघडण कशी झाली, हे एकपात्री आपल्या साभिनय व्याख्यानातून सांगत सांगत, आईबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या श्यामने सर्वांनाच गंभीर केले. श्यामची ही कथा ऐकतांना श्रोत्यांना आपले अश्रू आवरणे कठीण झाले. प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

प्रा. माधव खालकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा चंद्रकांत खैरनार व प्रा. अमोल तिसगे यांनी यांनी अहवालवाचन केले. प्रा. प्रवीण गोळे, प्रा. विक्रम पोटे यांनी यशस्वी, गुणवंत प्राध्यापक व बक्षीसपात्र विद्यार्थी यांच्या यादीचे वाचन केले. डॉ. छाया शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. समाधान गांगुर्डे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्योतिषाने सर्वांगीण समुपदेशन करावे

$
0
0

ज्योतिषशास्त्राचे

उलगडले अंतरंग

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ज्योतिष विद्येचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करून सर्वांगीण समुपदेशनही ज्योतिषाने करावे असा सल्ला पुण्यातील सुप्रसिद्ध ज्योतिष तज्ज्ञ सुनील देव यांनी दिला. नाशिकमध्ये नक्षत्र ज्योतिष विद्या मंडळद्वारा वैराज कलादालनमध्ये आयोजित कृष्णमुर्ती ज्योतिष पद्धतीचे अंतरंग या विषयावर ज्योतिष शास्त्राच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. त्यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की, पत्रिकेतील प्रत्येक स्थानावर असणारा ग्रह हा काही ना काही संकेत देत असतो. त्याचा योग्य अभ्यास केल्यास योग्य भाकिते करता येऊ शकतात. काळानुरूप सर्वांच्याच आवडीनिवडी, गरजा व आवश्यकता यामध्ये बदल झाला असून त्याप्रमाणे ज्योतिषानेही आपली समुपदेशनाची पद्धत बदलली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नक्षत्र ज्योतिष मंडळाचा परिचय अध्यक्ष सुरेश जोशी यांनी करून दिला तर कार्यवाहक डॉ. अभय अगस्ते यांनी प्रवेश वर्गाची माहिती दिली. याप्रसंगी महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अनिल चांदवडकर व रवींद्र बडवे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. लक्ष्मीकांत पाठक यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकरखाली ओंजळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत असून आणखी १४ गावे आणि ३३ वाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. येवला, नांदगाव, बागलाण, सिन्नर आणि देवळा या चार तालुक्यांमध्ये नव्याने काही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण ४८६ ठिकाणी १२२ टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येत असून फेब्रुवारीत ही संख्या आणखी वाढू शकते, असे संकेत जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्याने यंदा जुलै-ऑगस्ट २०१८ पासूनच जिल्ह्याच्या काही भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण फिरण्याची वेळ येऊ लागल्याने त्या-त्या गावांमधील ग्रामस्थांकडून टँकरची मागणी होऊ लागली. जिल्ह्यात आजमितीस अनेक गावांची आणि या गावांना जोडलेल्या वाड्या-वस्त्यांवरील रहिवाशांची भिस्त टँकरवर आहे. टँकर मंजुरीचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले असून दिवसागणिक टँकरची मागणी वाढतेच आहे. त्यामुळे संबंधित ग्रामस्थांची पाण्याची गरज लक्षात घेऊन प्रशासनाकडूनही टँकरच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येते आहे. गत आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील १०९ गावे, ३३० वाड्या अशा ४३९ ठिकाणी १११ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु, या आठवड्यात आणखी काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत एकूण १२३ गावे आणि ३६३ वाड्यांवर १२२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो आहे.

टँकरची वाढती मागणी

बागलाण तालुक्यतील तीन गावांकरीता नव्याने तीन टँकर सुरू करण्यात आले आहेत. देवळा तालुक्यातही एक गाव आणि दोन वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरविण्यास सुरुवात झाली आहे. नांदगाव तालुक्यातही तीन गावे आणि चार वाड्यांसाठी दोन टँकर सुरू केले आहेत. तर सिन्नर तालुक्यातही दोन गावे आणि ११ वाड्यांवर पाणीपुरवठ्यासाठी एक टँकर वाढवून देण्यात आला आहे. येवला गावात पाच गावे आणि एका वाडीने टँकरची मागणी केली होती. येथील पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन तीन टँकर नव्याने मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे पाणी टंचाईच्या समस्येतून अशा गावांमधील सुमारे ३० हजार रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

..

टँकरद्वारे जिल्ह्यातील पाणीपुरवठा स्थिती

तालुका गावे वाड्या टँकर

बागलाण २५ २ २०

चांदवड २ १ १

देवळा ६ १० ६

मालेगाव २० ६६ २३

नांदगाव १० ८९ १३

सिन्नर १५ १६६ ३१

येवला ४५ २९ २८

एकूण १२३ ३६३ १२२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दरोड्याचा प्रयत्न उधळला

$
0
0

चौघा संशयितांना अटक

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अंबड येथील केवल पार्कजवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार संशयित दरोडेखोरांना अंबड पोलिसांनी शुक्रवारी रात्री शिताफीने अटक केली. या संशयितांकडे एक गावठी कट्टा, तलवार, दुचाकी व मिरचीची पूड असे साहित्य आढळून आले.

मोबिन तन्वीर काद्री (वय २१, साईग्राम, उपेंद्रनगर), गौरव उमेश पाटील (वय १९, माणिकनगर, उपेंद्रनगर), चेतन भागचंद बाफना (वय २६, रा. इच्छामणी चौक, पवननगर) आणि आकाश गणेश कुमावत (वय २१, रा. दत्त चौक, सिडको) अशी अटक केलेल्या चार संशयित दरोडेखोरांची नावे आहेत. अंबड पोलिस ठाण्याचे रात्रगस्तीवरील अधिकारी व पोलिस हवालदार भास्कर मल्ले यांच्यासह पथकातील कर्मचारी रात्री सव्वाअकरा वाजता गस्त घालत होते. यावेळी ते केवल पार्कजवळ असलेल्या म्हसोबा मंदिराशेजारील खान बंगल्याजवळून जात असताना त्यांना पाच ते सहा व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना आढळून आल्या. पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला; मात्र यातील चेतन बाफणा हा आपल्या पल्सरवरून पळून गेला; मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. पोलिसांनी या संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी व अंगझडती घेतली असता, मोबिन काद्री याच्या कमरेला गावठी कट्टा आढळून आला, तर गौरव उमेश पाटील याच्याकडे धारदार तलवार आढळून आली. दरम्यान, चेतन बाफना याच्याकडे (एमएच १५, डीबी ८५८८) या क्रमांकाची पल्सर मोटारसायकल आणि आकाश कुमावत याच्या खिशात शंभर ग्रॅम मिरचीची पूड आढळून आली. ते दरोडा टाकण्याच्या उद्देशाने सोबत हत्यारे बाळगून केवल पार्कच्या म्हसोबा मंदिराजवळ संशयास्पदरित्या थांबल्याची कबुली त्यांनी दिली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चौघा संशयितांना अटक करण्यात आली असून, उर्वरित दोघा संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एम. डी. म्हात्रे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सोशल’चा जोर, गंभीर कमजोर!

$
0
0

पोलिस आयुक्तांनी मांडला गुन्ह्यांचा वार्षिक गोषवारा

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिस दलाने २०१८ या वर्षात गंभीर वा मालमत्तेचे गुन्हे, गुन्हे शोध आणि गुन्हे सिद्धता अशा प्रमुख घटकांमध्ये बाजी मारली. गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवताना यश मिळविणाऱ्या शहर पोलिस दलाला सोशल गुन्हेगारीच्या घटनांनी मात्र त्रस्त केले. जीवघेण्या अपघातांत झालेली वाढसुद्धा पोलिसांसह शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरली आहे.

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी २०१८ या वर्षातील गुन्हेगारीचा नुकताच लेखाजोखा मांडला. सन २०१७ या वर्षाच्या तुलनेत गतवर्षी २०५ गुन्ह्यांची नोंद अधिक झाली. मात्र यामध्ये खून, दरोडा, जबरी चोरी, दुचाकी चोरी, सोनसाखळ्या चोऱ्या या गुन्हेगारी स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. दंगल, विनयभंग, मुलामुलींना पळवून नेणे (अपहरण), घरगुती वादावादी यासारख्या सामाजिक गुन्हेगारीमध्ये मात्र वाढ झाली आहे. एकाच मुलीने तीनदा घर सोडले. प्रत्येकवेळी अपहरणासारखा गुन्हा नोंदविण्यात आला. अशा मुलामुलींची संख्या १० च्या पुढे निघाली असून, त्यांच्यामुळे या प्रकारचे २४ गुन्हे दाखल झाले आहेत. बलात्काराच्या प्रकरणातसुद्धा अशा काही तांत्रिक बाबी तपासात समोर आल्या. अपघातांच्या वाढत्या घटनांबाबत पोलिस आयुक्तांनी चिंता व्यक्त केली. हत्या, हत्येचा प्रयत्न यासारख्या गुन्ह्यांपेक्षा रस्ते अपघातांत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या अधिक असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. गतवर्षी रस्ते अपघातांमध्ये २१७ जणांचा बळी गेला. सन २०१८ मध्ये शहर पोलिस दलाने गुन्ह्यांचा तपास लावण्याकडे गांर्भीयाने लक्ष दिले. त्यामुळे परराज्यातील अनेक टोळ्या जेरबंद झाल्या. यामुळे घरफोडी, चेन स्नॅचिंग यासारख्या मालमत्तेच्या गुन्ह्यांना पायबंद बसला. याच काळात पोलिस दलातील काही झारीतील शुक्राचार्य समोर आले. त्यांच्यावर शक्य ती कठोर कारवाई करण्यात आल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले. या वर्षात वाहतूक, सोशल गुन्हेगारी याकडे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे सिंगल यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेसाठी उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौघुले, माधुरी कांगणे यांच्यासह सर्व सहाय्यक आयुक्त, पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उपस्थित होते.

...

दोष सिद्धतेत नाशिक दुसरे

गुन्हेगारास शिक्षा होणे हेच पोलिस यंत्रणेचे यश मानले जाते. सन २०१८ मध्ये शहर पोलिसांनी यात बाजी मारली. तब्बल ८०.६७ टक्के गुन्हे सिद्ध झाले असून, राज्यात नाशिकचा दुसरा क्रमांक लागला आहे. गंभीर म्हणजे सात वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ शिक्षा होऊ शकतील, अशा सेशन गुन्ह्यांत हे प्रमाण २९.८८ टक्के इतके आहे. सन २०१७ च्या तुलनेत यात चार टक्के वाढ झालेली दिसते. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात चालणाऱ्या खटल्यांमध्ये हे प्रमाण ५७.४२ टक्के इतके राहिले. सेशन गुन्ह्यात २०१७ मध्ये हे प्रमाण २५.७४, २०१६ मध्ये २१.५७, २०१५ मध्ये १५.५८ तर २०१४ मध्ये हे प्रमाण अवघे ९.४० इतके होते. जेएमएफसी कोर्टात २०१७ ते २०१४ या कालावधीत उतरत्या क्रमाने ४३.४७, ३९.५८, २५.३१ तर ३२.१० असे होते.

...

रस्ता अपघातांतील मृत्यूमध्ये वाढ

सन २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये अपघाती मृत्यूमध्ये १० टक्के घट नोंदली गेली होती. सन २०१७ मध्ये १५८ जणांचा मृत्यू झाला होता. सन २०१८ मध्ये मात्र रस्ते अपघातांमध्ये मोठी वाढ झाली. सुमारे २०९ जीवघेण्या अपघातांमध्ये २१७ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये १२६ दुचाकीस्वारांचा समावेश असून, ११२ दुचाकीस्वार हे हेल्मेटअभावी बळी ठरले आहेत. चारचाकी अपघातात १५ जणांचा मृत्यू सीटबेल्ट न वापरल्याने झाला आहे. ५९ पादचारी तर ६ सायकलस्वार ठार झाले असून, अन्य घटनांमध्ये ११ जणांचा बळी गेला आहे.

...

गुन्ह्याचा प्रकार २०१८ - २०१७ - वाढ वा घट

दाखल-उघड - दाखल-उघड

हत्या ३५-३३ ४१-४० -६

हत्येचा प्रयत्न ५०-५० ३८-३८ १२

बलात्कार ५४-५१ ३६-३६ १८

दरोडा १०-१० २५-२४ -१५

चेन स्नॅचिंग ७७-३८ १०२-६३ -२५

इतर जबरी चोरी १३३-१०६ ९७-७१ ३६

दिवसा घरफोडी ५३-१३ ७२-२६ -१९

रात्री घरफोडी २०२-७४ २४७-९६ -४५

वाहनचोरी ३८९-१४३ ४२५-१३४ -३६

फसवणूक २४२-१८५ २४०-१८० २

अपहरण २६५-२३३ २२१-२०५ ४४

मारहाण/दुखापत ३३१-३१७ २६९-२५७ ६२

सरकारी कामात अडथळा ५५-५४ ५३-५२ २

विनयभंग १८०-१७५ १३२-१२३ ४८

..

गेल्या वर्षात काही गुन्ह्यांमध्ये घट झाली. मात्र रस्ता अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे या वर्षात वाहतूक, सोशल गुन्हेगारी याकडे लक्ष वेधण्यात येणार आहे.

- रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेंद्रिय भाज्यांची भावली चव!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोणत्याही रसायनाचा वापर न करता, पूर्णत: नैसर्गिक पद्धतीने तयार करण्यात आलेला भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली. शेतकरी ते थेट ग्राहक या तत्त्वावर आधारित भाजीपाला महोत्सवातील सेंद्रिय भाज्यांची 'चव' नाशिककरांनी शनिवारी चाखली.

रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त सेंद्रिय फळे व भाजीपाला विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गंजमाळ येथील रोटरी हॉलमध्ये शनिवारी सकाळी ८ ते दुपारी ४ यावेळेत हा महोत्सव झाला. प्रगतशील शेतकरी संदीप जाधव यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. महोत्सवात रसायनविरहित भाजीपाला, फळे आणि धान्य विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. त्यामुळे सकाळपासूनच ग्राहकांनी महोत्सवात खरेदीसाठी गर्दी केली. महोत्सवात सेंद्रिय शेतीच्या आधुनिक तंत्रावर आधारित पेठ, चांदवड, त्र्यंबकेश्वर, सिन्नर आणि इगतपुरी येथील शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. अतिशय चांगल्या दर्जाचा हा भाजीपाला तसेच धान्य खरेदीसाठी दुपारनंतर ग्राहकांची झुंबड उडाल्याचे दिसून आले. गायीचे शुद्ध तूप खरेदीलादेखील ग्राहकांनी पसंती दिली. सिन्नरचे अनिल शिंदे, बोरगावचे सोमनाथ दळवी, चांदवडचे संदीप जाधव या प्रगतशील शेतकऱ्यांनी महोत्सवात स्टॉल लावले होते. या महोत्सवाचे संयोजन रोटरी क्लब सदस्य हेमराज राजपूत, गौरी पाठक, मकरंद चिंधडे यांसह इतर पदाधिकाऱ्यांनी केले. बोरगाव येथील सोमनाथ दळवी यांनी सेंद्रिय पद्धतीने स्ट्रॉबेरीची शेती केली असून, तिला या महोत्सवात सर्वाधिक मागणी होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राथमिक शिक्षक संघाचे फेब्रुवारीत महाअधिवेशन

$
0
0

\Bप्राथमिक शिक्षक संघाचे फेब्रुवारीत महाअधिवेशन\B

४ ते १३ फेब्रुवारीदरम्यान पणजी येथे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघातर्फे राष्ट्रीय शिक्षण परिषद व शिक्षक महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. गोव्यातील पणजी येथे ४ ते १३ फेब्रुवारीदरम्यान हे महाअधिवेशन होणार आहे. त्यापूर्वी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने नाशिक जिल्हा महामंडळ सभा आयोजित करण्यात आली होती. वसंत स्मृती कार्यालयात ही सभा व शिक्षण मेळावा पार पडला.

सभेच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शिवाजी पाटील होते. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाच्यावतीने गोवा येथील कला अकादमीच्या कॅम्पल मैदानावर राष्ट्रीय शिक्षण परिषद व शिक्षक महाअधिवेशन होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. तसेच शिक्षण परिषद ८ फेब्रुवारीला होईल. या परिषदेत डॉ. विजय भटकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. भालचंद्र नेमाडे, एन. बी. पाटील आदी शिक्षण विचारवंत सहभागी होणार आहे. तर या अधिवेशनास देशभरातून लाखो शिक्षक सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी शिक्षक संघटनांच्या फोडाफोडीच्या राजकारणावरही त्यांनी टीका केली. जिल्हाभरातील ४०० शिक्षक मेळाव्यास उपस्थित होते. उर्वरित जिल्हा व तालुके कार्यकारिणीची निवडीचे अधिकार जिल्हाध्यक्ष सुभाष अहिरे यांना यावेळी देण्यात आले.

सभेचे प्रास्ताविक सुभाष अहिरे यांनी केले तर सूत्रसंचालन अशोक ठाकरे यांनी केले. यावेळी सुभाष साईनकर, भरत पाटील, नरेंद्र वाघ, अनिल बाविस्कर, जिभाऊ पाटील, प्रमोद पाटील, विवेक खैरनार, चंद्रकांत लहांगे आदींसह इतर शिक्षक उपस्थित होते.

नव्या कार्यकारिणीची घोषणा

यावेळी महासंघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सुभाष अहिरे यांची जिल्हाध्यक्षपदी तर अशोक ठाकरे यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. तर राज्य प्रतिनिधीपदी सुभाष साईनकर, भरत पाटील, भास्कर कापडणीस, जिल्हा प्रतिनिधी म्हणून दिलीप भामरे, प्रमोद पाटील, यशवंत भामरे, त्र्यंबक तालुकाध्यक्षपदी नरेंद्र वाघ, सरचिटणीसपदावर देवसिंग बागुल, पेठ तालुका अध्यक्षपदी रविंद्र लहारे तर महिला प्रतिनिधी म्हणून भारती भामरे यांची नियुक्ती करण्यात आली.

फोटो :पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पूर्णपणे गुरुंप्रति समर्पित व्हावे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ज्यांना गुरुस्थानी मानले आहे, त्यांचे मत तेच आपले मत हे निश्चित करावे. गुरू लाभल्यानंतर आपले असे निराळे मत नसते. त्यामुळे आपले जीवन एकदा गुरुंकडे सोपवले तर संपूर्णपणे गुरुंप्रती समर्पित व्हावे, असे प्रतिपादन कीर्तनकार विवेकबुवा गोखले यांनी केले.

श्री भागवत सेवा समिती नाशिक व सुधाताई बेळे पुरस्कार समिती नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विवेकबुवा गोखले यांच्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी (संन्यासाश्रम) विषयावर गोखले यांनी गुंफले. शंकराचार्य न्यास येथे हे व्याख्यान रविवारी सायंकाळी आयोजित करण्यात आले होते. पुढे बोलताना गोखले म्हणाले की, मोक्षासाठी गुरुंची कृपा पूर्ण असली पाहिजे. सर्व इंद्रिय, मन तुझ्याकडे अर्पण करीत आहोत, अशी भावना मनात असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

आज या व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प विवेकबुवा गोखले प. पु. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे प्रासादिक वाड:मय व दत्त स्तोत्रे या विषयावर गुंफणार आहेत. प. सा. नाट्यगृह येथे सायंकाळी ६ ते ८.३० या वेळेत हे व्याख्यान होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images