Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

रस्ते कामांना प्राधान्य?

$
0
0

रस्ते कामांना प्राधान्य?

सत्ताधाऱ्यांनी या अखर्चित निधीतून रस्ते कामांचाही बार उडवण्याची तयारी केली आहे. तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या काळात नगरसेवकांना खुश करण्यासाठी २५७ कोटींची रस्ते योजना मार्गी लावली होती. परंतु, मुंढेंनी या रस्ते योजनेला ब्रेक लावून सर्व कामे गुंडाळून ठेवली होती. याउलट नागरी हिताच्या कामांना प्राधान्य दिले होते. परंतु, आता पुन्हा निधी शिल्लक असल्याचे सांगत, भाजपकडून रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्याची चाल खेळली जात आहे.

रस्त्यांचे प्रस्तावही तयार आहेत, तर नगरसेवकांचीही मागणी असल्याचे सांगत, हा विषय पुढे रेटला जाणार आहे. त्यासाठी नगरसेवकांकडून पुन्हा रस्ते कामांचे प्रस्ताव मागवले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी नागरिकांना कामे दाखवावी लागणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियेतून गेलेले रस्त्याचे प्रस्तावच मदतीला धावणार आहेत.

गेले दोन वर्षे महापालिकेत सत्ता येऊनही नगरसेवकांची कामे मार्गी लागत नाहीत. त्यामुळे ही कामे मार्गी लावून जनतेची सहानुभूती मिळविण्याचा भाजपचा डाव असून त्यासाठीची तयारी केली जात आहे. परंतु, याला प्रशासन किती प्रतिसाद देईल यावरच भाजपच्या रस्ते योजनेला यश येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रा. पं. सदस्यावर टांगती तलवार

$
0
0

नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राखीव जागांवर विजयी होऊनही मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास जिल्ह्यातील सुमारे दोन हजार ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. याबाबतच्या नोटिसा बजावण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना नामांकन दाखल करताना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. सदस्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाणार असून, फेब्रुवारीत या सदस्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केल्याचा पुरावा देणे अपेक्षित आहे. तसे न झाल्यास अशा सदस्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेत बॉम्ब अन् सर्वांचीच दाणादाण!

$
0
0

हटिया एक्स्प्रेसमध्ये बॉम्बची अफवा

....

- सोलापूर रेल्वे सुरक्षा दल कंट्रोलला निनावी फोन

- कोपरगाव स्थानकात थांबवली रेल्वे

- दोन तास कसून तपासणी

- प्रवाशाही भयभीत

...

म. टा. वृतसेवा, मनमाड

पुण्याहून हटिया येथे जाणाऱ्या धावत्या एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा निनावी फोन बुधवारी दुपारी सोलापूर रेल्वे कंट्रोल ऑफिसला आला. त्यांनी तत्काळ मनमाड रेल्वे लोहमार्ग पोलिसांना सतर्क केले. यामुळे ही रेल्वे कोपरगाव स्थानकात थांबविण्यात आली. मनमाड लोहमार्ग पोलिस, कोपरगाव स्थानिक पोलिस व शिर्डी येथील बॉम्ब शोधक पथक यांनी संपूर्ण रेल्वेची कसून तपासणी केली. मात्र रेल्वेत बॉम्ब असल्याची अफवा निघाल्याने प्रवाशांसह पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.

पुणे हटिया धावत्या एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा निनावी फोन सोलापूर रेल्वे सुरक्षा बल कंट्रोलला आला होता. ही माहिती सोलापूर कंट्रोलने मनमाड येथील लोहमार्ग पोलिस ठाण्यास चार वाजेच्या सुमारास देत सतर्क केले. यामुळे मनमाड रेल्वेचे पोलिस निरीक्षक नवनाथ मदने हे दहा पोलिस कर्मचाऱ्यांची कुमक घेऊन तातडीने कोपरगाव येथे रवाना झाले. कोपरगाव रेल्वे पोलिसांच्या स्टाफला याबाबत कळविण्यात आले आणि सदर रेल्वे कोपरगाव रेल्वे स्थानकात थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

शिर्डी येथून बॉम्ब शोध पथक व श्वान पथक मागविण्यात आले. हटिया एक्स्प्रेसच्या एसी डब्यासह सर्व बोगीतील प्रवाशांना कोपरगाव स्थानकात खाली उतरविण्यात आले. रेल्वेत बॉम्बच्या संभाव्य कल्पनेने प्रवाशीदेखील घाबरून गेले. रेल्वे पोलिसांनी दोन ते अडीच तास गाडीचा ताबा घेत संपूर्ण गाडी कसून तपासली. मात्र बॉम्ब काही सापडले नाही. रेल्वेत बॉम्ब ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे प्रवाशी व पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.

...

अडीच तासांनी हटिया एक्स्प्रेस मार्गस्थ

दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी थांबविण्यात आलेली हटिया एक्स्प्रेस सायंकाळी पावणे सात वाजता कोपरगावहून पुढे मार्गस्थ करण्यात आली. मात्र रेल्वेत बॉम्ब याचीच मनमाड-जळगाव दरम्यान रेल्वे

प्रवासात चर्चा रंगली.

..

हटिया एक्स्प्रेस मनमाड स्थानकात आल्यानंतर देखील कसून तपासली जाण्याचे संकेत रेल्वे पोलिस प्रशासनाने दिले होते. मात्र, कोपरगाव येथे हटिया एक्स्प्रेस पिंजून काढल्यानंतर पुन्हा रेल्वे तपासण्याचा निर्णय रहित करण्यात आला.

- नवनाथ मदने, लोहमार्ग पोलिस निरीक्षक, मनमाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदा एकच अंगारकी योग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदा फक्त एकदाच अंगारकी चतुर्थीचा योग असून, सप्टेंबर महिन्यात १७ तारखेला ती आहे. आज (दि. २४) वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी असून, चंद्रोदय ९ वाजून ५३ मिनिटांनी होणार आहे. आज सकाळपासून शहरातील गणेश मंदिरात भाविकांची गर्दी होणार आहे.

चतुर्थीनिमित्त शहरातील गणेश मंदिरांत पूजाविधींचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यंदा फक्त एकच अंगारकी योग असल्याने संकष्टीचे व्रत सुरू करण्यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत भक्तांना वाट पहावी लागणार आहे. शुक्ल पक्षातील ज्या मंगळवारी चतुर्थी ही तिथी असते, तेव्हा अंगारकीचा योग येतो. यंदा २०१९ मध्ये असा योग फक्त सप्टेंबर महिन्यात आहे. विशेष म्हणजे, यंदाची अंगारकी चतुर्थी भाद्रपद महिन्यात असल्याने त्याला विशेष महत्त्व असणार आहे. तसेच गणेश चतुर्थी २ सप्टेंबर (सोमवार), तर अनंत चतुर्दशी १२ सप्टेंबर (गुरुवार) रोजी आहे. त्यामुळे यंदा बाप्पांचा मुक्काम ११ दिवसांचा असणार आहे. भाद्रपद महिन्यातील अंगारकीचा योग गणेशभक्तांसाठी महत्त्वाचा असेल, असे पुरोहितांनी सांगितले.

ज्या गणेश भक्तांना संकष्टीच्या व्रताला प्रारंभ करायचा असेल. त्यांच्यासाठी यंदा एकच अंगारकी चतुर्थीचा योग आहे. त्यामुळे गणेश भक्त संकष्टीच्या व्रताला सप्टेंबर महिन्यात प्रारंभ करू शकतात. हा योग भाद्रपद महिन्यात आल्याने यंदा याचे महत्त्व अधिक आहे.

- अभिषेक काण्णव, पुरोहित

\Bया वर्षातल्या संकष्टी चतुर्थी\B

दिनांक............... वार......... चंद्रोदयाची वेळ

२२ फेब्रुवारी........ शुक्रवार..... ९.३६

२४ मार्च............. रविवार...... १०.१४

२२ एप्रिल............ सोमवार..... ९.५३

२२ मे................. बुधवार....... १०.२३

२० जून............... गुरूवार....... ९.५२

२० जुलै............... शनिवार....... ९.५१

१९ ऑगस्ट............ सोमवार....... ९.३७

१७ ऑक्टोबर.......... गुरूवार........ ८.४८

१५ नोव्हेंबर............ शुक्रवार........ ८.२३

१५ डिसेंबर............. रविवार......... ९.०९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगा, बोटाचे ठसे उमटतील कुठं!

$
0
0

येथे येत आहेत नागरिकांना अडचणी

- टपाल कार्यालये, बँकांमध्ये बोटांचे ठसे जुळविण्यात अडचणी

- आधार केंद्रांकडून दुरुस्तीला टाळाटाळ

- थंब मशिन व आय स्कॅनरसारखी मशिनरी उपलब्ध नसल्याची कारणे

- जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार सेंटरवर काम ढकलण्याचे प्रकार

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साहेब, बोटाचे ठसे उमटत नसल्यामुळे रेशन दुकानदार कुरकूर करतो. यंदा धान्य न देताच त्यानं मला पिटाळून लावलं. आधार सेंटरवर जाऊन बोटाचे ठसे देऊन ये म्हणाला. मी गणेशवाडीतील पोस्ट ऑफिसमध्ये गेले. इथं नाही होतं. कलेक्टर ऑफिसला जा, असे सांगत तिथल्या आधार सेंटरवाल्या पोरानं पाठवून दिलं. साहेब ते माझे बोटाचे ठसे कुठं उमटतील. मला या महिन्याचं रेशन तर मिळंल ना हो? ६४ वर्षे वयाच्या शारदाबाई राजपूत यांचा हा उद्विग्न सवाल. आधार दुरुस्ती, बायोमेट्रिक अपडेशनच्या कामास टाळाटाळ करून आधार सेंटरचालक नागरिकांच्या अडचणी वाढवित असल्याचे लक्षात आणून देण्यास पुरेसा आहे. शारदाबाईंची व्यथा हे एक उदाहरण झाले. अनेकांना अशा दिव्यातून जावे लागते आहे.

आधार दुरुस्ती व बायोमेट्रिक अपडेशनची कामे टाळण्याचे आणि ती जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार सेंटरकडे ढकलण्याचे प्रकार शहरात वाढू लागले आहेत. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषत: टपाल कार्यालये आणि बँकांमध्ये नागरिकांना बोटांचे ठसे जुळविणे व तत्मस कामांत प्रकर्षाने अडचणी भेडसावत असून, आता आम्ही कुणाचे उंबरे झिजवायचे असा सवाल नागरिकांकाकडून केला जाऊ लागला आहे. आधार ही सर्वमान्य ओळख ठरत असून, प्रत्येकालाच आधारकार्ड जवळ बाळगणे अनिवार्य झाले आहे. परंतु, चुकांरहित आधारकार्ड मिळविणे नागरिकांसाठी दिव्य ठरते आहे. गणेशवाडीसारख्या काही ठिकाणच्या आधार केंद्रांवर नागरिकांची बायोमेट्रिक अपडेशनसारखी कामे नाकारली जात आहेत. थंब मशिन व आय स्कॅनरसारखी मशिनरी उपलब्ध नसल्याची कारणे त्यासाठी ऑपरेटर्सकडून दिली जात आहेत. ही मशिनरी नाही तर नवीन आधार नोंदणी कशी केली जाते असा सवाल संतप्त नागरिक त्यामुळे उपस्थित करू लागले आहेत.

जिग्नेष राजगुरू यांच्या मुलाचा दहावी परीक्षेचा अर्ज भरावयाचा आहे. त्याच्याही आधार कार्डचे बायोमेट्रिक अपडेशन करणे अनिवार्य ठरते आहे. अपडेशनची कामे आम्ही करीत नाही सांगत त्यांनाही जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यास सांगण्यात आले. तेथेही प्रचंड गर्दी व नागरिकांची झुंबड उडाल्याने मुदतीत हे काम मार्गी लागणार का याची चिंता राजगुरू यांना सतावते आहे. वैष्णवी शिंदे या विद्यार्थिनीलाही बायोमेट्रिक अपडेशनअभावी स्कॉलरशीपचा अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे पॅन आणि आधारकार्ड लिंक करण्यास अडथळे निर्माण होत असून, अपडेशनची कामे न करणाऱ्या सेंटरचालकांवर कुणाचा वचक नाही का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होऊ लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजेटचा ‘ताळा’ चुकणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या सन २०१८-१९ या वर्षाच्या बजेटमध्ये तब्बल दोनशे कोटींचा निधी अखर्चित राहिला असतानाच, आता यावर्षी जमा बाजूत अवास्तव फुगवेल्या आकड्यांचा फुगा फुटला आहे. आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतलेल्या आढाव्यात दोन हजार कोटींपर्यंत फुगवलेल्या बजेटमधून १९८४ कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित असताना डिसेंबरअखेर ९३६ कोटी रुपयेच तिजोरीत जमा झाले आहेत. आज घडीस १०४७ कोटींची तूट येत असल्याने प्रशासनाचीही कोंडी झाली आहे.

महापालिका प्रशासनाकडून सध्या एकाच वेळी सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे बजेट तयार करण्यासह सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या बजेटचाही आढावा घेतला जात आहे. परंतु, सत्ताधाऱ्यांनी बजेटमध्ये अवास्तव फुगविलेल्या विकासकामांमुळे अर्थसंकल्पाची पूर्ण वाट लागल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी तत्कालिन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी १४२० कोटी रुपयांचे प्रारूप अर्थसंकल्पीय बजेट स्थायीला सादर केले होते. परंतु, त्यापूर्वीच त्यांची बदली झाल्यानंतर आलेल्या तुकाराम मुंढे यांनी पुन्हा बजेटची मोडतोड केली. नागरी सुविधांना प्राधान्य देत, मोठ्या प्रमाणावर महसूल वाढविण्याचे धोरण स्वीकारले. त्यानुसार घरपट्टीत मोठी वाढ सुचविण्यात आली. मुंढे यांनी स्थायी समितीला १७८५ कोटींचे बजेट सादर केले होते. स्थायी आणि महासभेने त्यात वाढ करीत हे बजेट तब्बल २०३१ कोटींपर्यंत फुगवले होते. महासभेने मंजूर केलेल्या बजेटमध्ये २०१८-१९ या आर्थिक वर्षात महापालिकेला १९८४ कोटी ४४ लाख रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा होती. परंतु, मुंढे यांची बदली होताच, पालिकेतील सगळी आर्थिक गणिते बदलली. घरपट्टी वाढ रद्द करण्यात आली तर, नगररचना विभागाकडून अपेक्षित निधी वसूल झाला नाही. त्यामुळे त्याचा थेट परिणाम उत्पन्नावर झाला आहे. गमे यांनी चालू वर्षाच्या बजेटचा आढावा घेतला असता अपेक्षित महसुलाच्या तुलनेत तब्बल एक हजार ४७ कोटी रुपयांची महसुली तूट असल्याची धक्कादायक बाब समोर आली. १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०१८ या नऊ महिन्यांच्या कालावधीत पालिकेला विविध स्रोतांच्या माध्यमातून जेमतेम ९३६ कोटी रुपयांचाच महसूल मिळाला असून, त्यात जीएसटी अनुदानाच्या ६५० कोटींचा समावेश आहे. उर्वरित तीन महिन्यांत जेमतेम तीनशे कोटींचे उत्पन्न पालिकेला अपेक्षित असले तरी, घरपट्टी वसुलीला लागलेला 'ब्रेक' आणि नगररचनातील पेच सुटत नसल्याने ही तूट कायम राहणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकीकडे कामे मंजूर असताना दुसरीकडे निधी मिळणार नसल्याने पालिकेचा स्पीलओव्हर मोठ्या प्रमाणावर वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

मंजूर खर्चातही कंजुषी

विशेष म्हणजे पालिकेला मिळालेला निधीही खर्च करण्यात अधिकाऱ्यांना अपयश आले आहे. ९३६ कोटी रुपये तिजोरीत जमा झाले असले तरी, प्रत्यक्षात खर्च मात्र ७४९ कोटी रुपयांचाच खर्च झाला आहे. सद्य:स्थितीत १८७ कोटींचा निधी अखर्चित आहे. २०३२ कोटींच्या बजेटची तुलना केली तर हा खर्च जेमतेम ३५ ते ४० टक्क्यांपर्यंतच झाला आहे. तीन महिन्यांत उर्वरित १२८३ कोटी रुपये खर्च कसे होणार, असा प्रश्न आहे. हा आकड्यांचा जुमला आता अधिकाऱ्यांनाही पेलवत नसल्याचे चित्र आहे.

बजेट फेब्रुवारीतच

एकीकडे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या बजेटचा आढावा घेत असतानाच, सन २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या प्रारूप अर्थसंकल्पीय बजेटची तयारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सुरू केली आहे. सद्य:स्थितीत सर्व विभागांच्या मागणी सूचना प्राप्त झाल्यानंतर विभागनिहाय जमा-खर्चाचा आढावा आयुक्तांमार्फत सुरू आहे. आतापर्यंत बांधकाम, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, विद्युत, यांत्रिकी, नगरनियोजन या विभागांची बैठक झाली असून, त्यांनी आपल्या मागण्या प्रशासनाकडे नोंदविल्या आहेत. समाजकल्याण, महिला बालकल्याण, घनकचरा आदी विभागांची आढावा बैठक लवकरच घेतली जाणार आहे. साधारणत: फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात नवीन प्रारूप बजेट आयुक्तांमार्फत स्थायी समितीला सादर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक ‘टोल फ्री’वर आता मोबाइलद्वारेही संपर्क

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निवडणूक, मतदान आणि मतदार या विषयीची कोणतीही माहिती सहजगत्या मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेची हेल्पलाइन बुधवारपासून मोबाइलवरही कार्यान्वित झाली. सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत १९५० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नागरिक माहिती घेऊ शकणार आहेत.

मतदारांना त्यांच्या शंकाचे निरसन करवून घेता यावे, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने पहिल्यांदाच टोल फ्री सुविधा उपलब्ध करून दिली आहे. १८००२५३१९५० या टोल फ्री क्रमांकावरून नागरिक निवडणूक प्रक्रियेविषयीची माहिती जाणून घेऊ शकत होते. परंतु, ही सुविधा केवळ लँडलाइन फोनद्वारेच उपलब्ध होती. ती मोबाइलद्वारे कार्यान्वित करण्यास निवडणूक शाखेला यश आले आहे. त्यामुळे आता १९५० या चार आकडी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांना मतदान व निवडणूक प्रक्रीयेविषयीच्या तक्रारी, सूचना आणि अभिप्राय मांडणे शक्य होऊ लागले आहे. यासाठी एका प्रशिक्षित कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून या क्रमांकावर येणाऱ्या प्रत्येक कॉलचे रेकॉर्डिंग केले जाणार आहे. इतकेच नव्हे तर तक्रारीवर काय कार्यवाही झाली याबाबत ऑनलाइन पाठपुरावा तक्रारदार करू शकणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी सहा या कालावधीत नागरिक या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून मतदार आणि मतदान याविषयीची माहिती जाणून घेऊ शकणार आहेत. टप्प्या टप्प्याने हा कालावधीही वाढविण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॅफिक वॉर्डनचा प्रस्ताव महासभेवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीला महापालिकेने ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करावेत, असे निर्देश सरकारने दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने कार्यवाही सुरू केली असून होमगार्डनच्या धर्तीवर आता ट्रॅफिक वॉर्डन योजना राबवली जाणार आहे. त्यासाठी सदरचा प्रस्ताव महासभेवर सादर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

राज्य सरकारने होमगार्डच्या धर्तीवर शहरांमध्ये ट्रॅफिक वॉर्डन योजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या दालनात बैठक झाली. ट्रॅफिक वॉर्डनवर खर्च करण्यासाठी सरकारकडे लेखाशीर्ष नसल्याने महापालिकांनी खर्चाचा भार उचलण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र, महापालिकेने ट्रॅफिक वॉर्डनसंदर्भात विविध प्रश्‍न उपस्थित केले आहेत. त्यात ट्रॅफिक वॉर्डनचा विषय महापालिकेशी संबंधित नाही, ट्रॅफिक वॉर्डनकडून कायमस्वरुपी सेवेत घेण्याची मागणी होऊ शकते. त्यामुळे हा विषय धोरणात्मक असल्याचे सांगत, महासभेवर ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे महासभाच याबाबतीत अंतिम निर्णय घेणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अल्पनिविदांद्वारे लगीनघाई

$
0
0

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी दोनशे कोटी खर्चाचे लक्ष्य

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या त्रिसूत्रीमुळे भांडवली कामांसाठी मंजूर झालेला सुमारे दोनशे कोटींचा अखर्चित निधी खर्चात लोकसभा निवडणूक आचारसंहिता अडसर ठरणार आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपने अर्थसंकल्पातील अखर्चित असलेला दोनशे कोटी रुपयांचा बार आचारसंहितेपूर्वी उडवण्याची तयारी केली आहे. त्यासाठी अल्पनिविदा मागवल्या जाणार आहे. त्याद्वारे निवडणूकांपूर्वीच ठेकेदार नियुक्त करून भूमीपूजन उरकण्याची घाई सत्ताधारी भाजपने सुरू केली आहे.

महापालिका आयुक्त मुंढे यांनी महापालिकेच्या अर्थसंकल्पात एकीकडे नगरसेवक निधीला कात्री लावत, दुसरीकडे भांडवली कामांसाठी मंजूर केलेल्या खर्चालाही त्रिसूत्री लावली होती. मुंढे यांची त्रिसूत्री आणि पाणीपुरवठा, मलनिस्सारण आणि सार्वजनिक आरोग्य या तीन विभागाच्या कामांना प्राधान्य देण्याच्या धोरणाने विभागप्रमुखांनी बजेटमधील निधी खर्चाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे डिसेंबरमध्ये नूतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत बजेटमध्ये मंजूर केलेल्या एकूण निधीपैकी जवळपास सातशे कोटी रुपये खर्च झाले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गमे यांनी हा निधी तातडीने खर्च करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विभागप्रमुखांनी सध्या खर्चाचा सपाटा लावला असून काही कामे आता करण्याची योजना पूर्ण झाली आहे. त्यातही जेमतेम पाचशे कोटींचीच कामे मार्गी लागणार असून भांडवली कामासाठी असलेले दोनशे कोटी अजूनही अखर्चित राहण्याचा धोका सत्ताधाऱ्यांना आहे. त्यामुळे भाजपने हा निधीही खर्च करण्याची घाई सुरू केली आहे. हा निधी वाया जाऊ नये यासाठी अल्पनिविदा काढण्याची प्रक्रिया राबविण्याची तयारी केली आहे. लोकसभेपूर्वी अल्पनिविदा काढून कामे मार्गी लावायचे आणि निवडणुकांपूर्वी या कामांचे भूमिपूजन करण्याचा डाव भाजपने आखला आहे. त्यासाठी प्रशासनानसोबत चर्चा केली जात आहे. यातील बहुतांश कामे ही नगरसेवकांचीच धरली जाणार असल्याने नगरसेवकांनाही अच्छे दिन येणार असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रियंकांच्या नियुक्तीने काँग्रेसमध्ये जल्लोष

$
0
0

पेढे वाटून आंनदोत्सव साजरा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियांका गांधी या राजकारणात सक्रिय झाल्याने पक्षामध्ये उत्साह संचारला आहे. शहर काँग्रेसच्या वतीने कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आंनदोत्सव साजरा केला. प्रियंका गांधीच्या रुपाने काँग्रेसमध्ये नव्या युगाची चाहूल लागल्याचा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी केला.

अखिल भारतीय काँग्रेसच्या वतीने पक्षाच्या सरचिटणीसपदी प्रियंका गाधी यांची बुधवारी नियुक्ती करण्यात आली. तसेच त्यांच्याकडे उत्तर प्रदेशाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्या पूर्वीच काँग्रेसचे नेतृत्त्व प्रियंका गांधीकडे द्यावे, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा झंझावात प्रियंका रोखू शकतील, असा दावा कार्यकर्ते करत होते. मात्र, प्रियंका गांधी यांच्याकडून राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत मिळत नव्हते. अखेरीस बुधवारी त्यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसमध्येही चैतन्य संचारले आहे.

गांधी यांच्या नियुक्तीचा जल्लोष शहर काँग्रेस कार्यालयताही साजरा करण्यात आला. महात्मा गांधी रोडवरील पक्षाच्या शहर कार्यालयात उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एकमेकांस पेढे भरवले. यावेळी महिला काँग्रेस शहर अध्यक्ष वत्सला खैरे, ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष विजय राऊत, नगरसेवक राहुल दिवे, पंचवटी ब्लॉक अध्यक्ष उद्धव पवार, सातपूर ब्लॉक अध्यक्ष कैलास कडलग, सिडको ब्लॉक अध्यक्ष विजय पाटील, महिला उपाध्यक्ष ज्युली डिसुझा, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्नील पाटील, वंदना पाटील, उपाध्यक्ष दीपक राव, अरुण दोंदे, रामकिसन चव्हाण, भरत पाटील, आण्णा मोरे, प्रवीण काटे, उत्तमराव बडदे, शोभा भोये, शोभा गोंदणेनकर, सोफिया खान, माया काळे, अमोल सूर्यवंशी, रोहन कातकाडे, प्रसाद नागवंशी, देवेंद्र सोहेल, पवन आहेर, शिवराज पाटील, हर्षल शिंदे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजपासून ‘नाशिक आर्ट फेस्ट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'टॅलेंट ऑफ नाशिक' या संस्थेतर्फे गुरुवारपासून 'नाशिक आर्ट फेस्ट' आयोजित करण्यात आला आहे. शहरातील नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळावे, या हेतूने हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये विविध कलागुणांसह स्पर्धा व खेळांची मेजवानी नाशिककरांना अनुभवता येणार आहे.

'नाशिक आर्ट फेस्ट'चे यंदा तिसरे पर्व असून, २४ ते २६ जानेवारीत हे फेस्टिवल होणार आहेत. गंगापूर रोड येथील आसाराम बापू पूलाजवळील गोदा पार्क येथे सायंकाळी ५ ते १० या वेळेत फेस्टिवल होईल. आज, गुरुवारी (दि. २४) सायंकाळी ५ वाजता पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या हस्ते फेस्टिवलचे उद्घाटन होईल. शहरातील १५ ढोल पथकांद्वारे नाशिक आर्ट फेस्टमध्ये भव्य ढोलवादन करण्यात येणार आहे. या ढोलवादनानेच फेस्टला प्रारंभ होणार असून, ढोल ताशांच्या निनादात कलाविष्कारांच्या सोहळ्याला सुरुवात होईल. फेस्टिव्हलमध्ये नवोदित कलाकार विविध कलाविष्कार सादर करणार असून, गायन, अभियन, नृत्य कलेच्या पाश्चिमात्य छटा फेस्टिवलमध्ये सादर केल्या जाणार आहेत. त्यासोबतच चित्रकला, रांगोळी व फोटोग्राफी याच्या कार्यशाळा आणि प्रदर्शन असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कला शिक्षक ठरला अनेकांचा जीवनदाता

$
0
0

अवयवदानातून जपली मानवतेची भावना

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाच वर्षीय लेकीच्या वाढदिवसाच्या तयारीत गुंतलेल्या चाळीशीतील कला शिक्षकावर दुर्दैवाने अतिशय दुर्धर प्रसंग ओढावला. मेंदूत अचानक झालेल्या रक्तस्त्रावाच्या उपचारांसाठी त्यांना दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मेंदूमृत घोषित केले. या अनपेक्षित संकटातून सावरत त्यांच्या कुटुंबीयांनी या कुटुंबप्रमुखाचे अवयवदान करण्याचा निर्णय धैर्याने घेतल्याने या कलाशिक्षकाने मृत्यूनंतरही अनेकांना जीवदान देऊन मानवतेची भावना जपली.

सिडकोतील रहिवासी असलेले मूळचे नाशिककर असलेले राजेश अर्जुन घनघाव (वय ४२) हे १३ वर्षांपासून मुंबई महापालिकेतील एका शाळेत कला शिक्षक म्हणून कार्यरत होते. कन्येच्या वाढदिवसाची तयारी करण्यासाठी नाशिकला आलेले घनघाव घराबाहेर पडले होते. वाढदिवसासाठी पदार्थांची बुकिंग केल्यानंतर मित्रांसोबत संवाद साधत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांना दवाखान्यात तातडीने दाखल करण्यात आले. विविध आरोग्य तपासण्यांमध्ये घनघाव यांच्या मेंदूतील वाहिनीस इजा पोहचल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. तीन दिवस डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर त्यांना मेंदूमृत घोषित करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी दीपिका घनघाव व पाच वर्षीय मुलगी सांची यांच्यावर काळाने घातलेल्या संकटाने घनघाव व संसारे कुटुंबीय अस्वस्थ झाले.

या अवयवांचे केले दान

रुग्णालयात स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधी जिगिषा यादव यांनी कुटुंबियांचे समुपदेशन करत अवयवदान करण्याचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत कुटुंबियांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हृदय, यकृत, त्वचा, डोळे, हाडे दान करण्यात आले. मुलूंडच्या खासगी रुग्णालयात हृदयाच्या प्रतिक्षेत असलेल्या एका ४८ वर्षीय महिलेवर हृदय प्रत्यारोपण करताना पूनर्जीवन घनघाव कुटुंबियांच्या या निर्णयामुळे मिळू शकले. अशा बिकट परिस्थितीत घनघाव कुटुंबाने धैर्याने घेतलेला निर्णय मानवतेचे उदाहरण ठरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्नेहसंमेलनाला सामाजिक कोंदण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बीवायकेच्या स्नेहसंमेलनाला यंदा सामाजिकतेचे कोंदण लावत, 'धान्य संकलन' उपक्रम राबवत राबविण्यात आला. 'कॉलेज डेज'च्या उत्साहात सामाजिक बांधिलकी म्हणून संकलित करण्यात आलेल्या सुमारे ७०० किलो धान्याचे बुधवारी वाटप करण्यात आले.

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बीवायके कॉलेज ऑफ कॉमर्सच्या विद्यार्थी विकास समितीतर्फे स्नेहसंमेलनात सामाजिक उपक्रम घेण्यात आले. यामध्ये विद्यार्थी व प्राध्यापकांकडून गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, डाळी हे धान्य संकलित करण्यात आले. १२ ते १८ जानेवारी या कालावधीत झालेल्या स्नेहसंमेलनात हा उपक्रम राबविणय्ता आला. उपक्रमातून २५० किलो तांदूळ, २५० किलो गहू संकलित झाले. तसेच १५० किलो ज्वारी व बाजरी आणि ५० किलो डाळींचे संकलन झाले. सुमारे ७०० किलो धान्याचे बुधवारी शाळा व बालाश्रमात वाटप करण्यात आले. कृषिनगर परिसरातील महापालिकेच्या शाळेत २०० किलो, तर त्र्यंबकेश्वर येथील खंबाळे गावातील बालाश्रमात २५० किलो धान्य देण्यात आले. आज अशोकस्तंभ येथील अनाथाश्रमात २५० किलो धान्य देण्यात येणार आहे. स्नेहसंमेलनाच्या उत्साहासोबतच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक दातृत्व रुजावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी आणि विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. बी. बी. गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी प्रतिनिधी कमलेश काळे, अनिरुद्ध लोंढे, मृणाल पाटील, तेजस कुमावत, मयूर आहेर यांसह इतर विद्यार्थ्यांनी उपक्रमाचे संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावरकरनगरला घरफोडीत आठ लाखांचे दागिने चोरीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर रोडवरील सावरकरनगर परिसरातील एका बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे आठ लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. गंगापूर पोलिसांनी या प्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. या घरफोडीमुळे परिसरातील रहिवाशी भयभीत झाले असून, परिसरात पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

सावरकरनगरमधील शारदानगर येथे शिल्प बंगला असून, तेथे प्रतीक सुशील चक्रनारायण (वय ३६) कुटुंबीयांसह राहतात. १८ ते २१ जानेवारी या कालावधीत घराला कुलूप लावून ते बाहेरगावी गेले होते. यावेळी चोरट्याने त्यांच्या बंगल्याच्या मागील किचनच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटे तोडून तिजोरीतील सात लाख ६० हजारांचे दागिने व ५० हजारांची रोकड असा आठ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला. याबाबत गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एफडीए’ची विशेष मोहिम १ पासून

$
0
0

परवान्यासह नोंदणीची होणार तपासणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बेकायदेशीरपणे होणारी अन्न विक्रीला चाप लावण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) १ फेब्रुवारीपासून तीन दिवस परवाना व नोंदणी पडताळणी विशेष मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. या मोहिमेमुळे जिल्ह्यातील अन्न विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची संख्याही समोर येणार आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हॉटेल व विविध खाद्य पदार्थ विकणारी दुकाने सुरू झाली आहेत. पण, यातील काहींनी अन्न सुरक्षा मानदे कायद्यानुसार परवाना व नोंदणी केलेली नाही. अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार वार्षिक उलाढाल १२ लाखापेक्षा जास्त आहे. त्यांनी एक वर्षासाठी दोन हजार रुपये भरून परवाना घेणे आवश्यक आहे. तसेच १२ लाखांपेक्षा कमी वार्षिक उलाढाल असणाऱ्या व्यावसायिकांनी १०० रुपये शुल्क भरून नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे ही नोंदणी व परवाना आता सर्वांकडे उपलब्ध असावा यासाठी ही मोहिम आहे.

ऑनलाइन खाद्यपदार्थ विकणाऱ्या काही कंपन्यांना परवाना नसणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांकडून माल खरेदी न करण्याचे निर्देश 'एफडीए'ने दिले होते. त्यामुळे विनापरवाना विक्री करणाऱ्या हॉटेलचालकांना याचा दणका बसला होता. अन्न सुरक्षितता ही महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने गेल्या काही दिवसापासून त्याकडे संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे.

डाटीही मिळणार

हॉटेलची वेळोवेळी तपासणी करणे त्यात सुधारणा करण्याच्या सूचना देणे यासारखे अनेक तपासण्या अगोदर झाल्या. पण, त्यातून हॉटेल व्यावसायिकांचा एकत्रित डाटा उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे ही मोहीम राबवून हा डाटा एकत्र केला जाणार आहे. त्यानंतर एका अॅपच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे.

तीन दिवसाची मोहिम १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. परवाना व नोंदणी करणे प्रत्येक अन्न विक्री करणाऱ्यांनी आवश्यक आहे. ग्राहकांना सुरक्षित अन्न मिळावे, यासाठी या मोहिमेनंतर ग्राहकांना अॅपद्वारे पडताळणी करता येणार आहे.

- चंद्रशेखर साळुंखे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरकुल गैरव्यवहार प्रकरणी माजी नगरसेवक अटकेत

$
0
0

न्यायालयाकडून उद्यापर्यंत पोलिस कोठडी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी दोंडाईचा नगरपालिकेचे माजी नगरसेवक गिरधारी रामराख्या यांना मंगळवारी (दि. २२) रात्रीच्या सुमारास धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांना बुधवारी (दि. २३) दोंडाईचा येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता दि. २५ जानेवारीपर्यत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

जिल्हा सत्र न्यायालयात घरकुल गैरव्यवहारातील संशयित आरोपी माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांच्यासह तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख, गुलाबसिंग सोनवणे, विक्रम पाटील यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार असून, त्यांना तात्पुरता जामिन यापूर्वीच मंजूर झाला होता. यावर आता कोर्टात हजर झाल्यानंतर जामिनावर पुढील कामकाज होणार आहे. या प्रकरणी, दोंडाईचा घरकुल गैरव्यवहाराबाबत औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशान्वये दलित, आदिवासी मातंग समाज मंडळाचे अध्‍यक्ष कृष्णा नगराळे यांच्या तक्रारीवरून दोंडाईचा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये माजी नगरसेवक गिरधारी रामराख्या हे तपासाअंती गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलिस कोठडीतून गिरधारी रामराख्या कडून पोलिस काय माहिती घेतात आणि याचे धागेदोरे कुठेपर्यंत जातात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अक्कलकुव्यात बालिकेची हत्या

$
0
0

पोलिसांकडून आरोपीस अटक; शहरात तणावपूर्ण शांतता

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहरालगत असलेल्या सोरापाडा गावातील आठ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. २२) रात्री उघडकीस आली. याबाबत अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून बालिकेवर अत्याचार करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अशी घटना प्रथमच अक्कलकुवा तालुक्यात घडल्याने या घटनमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेकडून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

या घटनेतील पीडितेचे वडील अक्कलकुवा शहरालगतच्या सोरापाडा गावात छोटामोठा व्यवसाय करतात. ते मंगळवारी सायंकाळी आपले काम आटोपून घरी आले. त्यांना आपली मुलगी घरात नसल्याचे पाहून आजूबाजूला त्यांनी तपास केला मात्र, मुलगी सापडली नाही. तेव्हा बाजूच्याने येऊन त्यांना माहिती दिली. या माहितीच्या आधारे पीडितेचे कुटूंब घटनास्थळी पोहोचले. त्यावेळेस पीडित बालिका रक्तबंबाळ अवस्थेत पडली होती. ही माहिती अक्कलकुवा पोलिसांना दिल्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक किशोर नवले, पोलिस उपनिरीक्षक मेघशाम डांगे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा तपास करून अवघ्या तासभरात पोलिसांनी कोमलसिंग करतासिंग शिकलीकर (वय ३०, रा. सोरापाडा, ता. अक्कलपाडा जि. नंदुरबार) यास अटक केली. त्याच्याविरुद्ध कलम ३०२ सह बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधिनिमियान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेनेचा तहसीलवर मोर्चा
मंगळवारी घडलेल्या घटनेमुळे नंदुरबार जिल्हा शिवसेनाप्रमुख आमश्या पाडवी, महिला आघाडीच्या वंदना पाटील, निता माळी, सुमित्रा पाडवी, यांच्यासह सोरापाडा गावातील सर्व ग्रामस्थांनी घटनेतील आरोपींला फाशीची शिक्षा देण्यात यावी, ही मागणी केली. या वेळी शहरातून मोर्चा काढण्यात आला. या घटनेमुळे बुधवारी अक्कलकुवा शहरात तणावपूर्ण शांतता होती.

जळगावातही घटनेचा निषेध
अक्कलकुवा येथे सोरापाडा भागात जो अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा हत्या करण्यात आली, या घटनेचा लोकसंघर्ष मोर्चाने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. या गुन्ह्यातील आरोपीला कठोर शासन करण्यात यावे, अशी मागणी प्रतिभा शिंदे यांनी केली आहे. गुन्ह्याची तत्काळ चौकशी करून सदर खटला हा फास्ट ट्रॅक वर घेऊन या नराधमाला शिक्षा व्हावी अशीही मागणी करण्यात आली आहे. या वेळी रामदास तडवी, झिलाबाई वसावे, रमेश नाईक, काथा वसावे, अशोक पाडवी, देवीसिंग वसावे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुडत्यांच्या देवदुताला ‘कवच कुंडले’!

$
0
0

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

विविध अपघातांतील तब्बल ७०० मृतदेह, नदीत बुडणाऱ्या ३३ जणांना जीवदान देणाऱ्या राष्ट्रपती पदक विजेत्या गोविंद तुपे यांना जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांनी एक स्कुबा डायव्हिंग सेट खरेदी करण्यासाठी अडीच लाखांचा निधी दिला आहे. नाशिक जिल्हा बिगर आदिवासी योजना २०१८-१९ अंतर्गत हा निधी वितरित करण्यात आला असून, यामुळे तुपे यांच्या कार्याला पाठबळ मिळाले आहे.

तुपे यांच्या कार्याची दखल घेत सरकारने २०१७ सालच्या महाराष्ट्र दिनी राष्ट्रपतींचे उत्तम जीवनरक्षक पदक बहाल करून त्यांचा सन्मान केला होता. जेथे जीवलग व्यक्तीच्या मृतदेहाला स्पर्श करण्यास लोक धजावत नाहीत, तेथे तुपे ६० फुटांपर्यंतच्या खोल पाण्यात उतरून मृतदेह शोधून बाहेर आणतात. असे ७०० मृतदेह गोविंद तुपे यांनी बाहेर काढले. बुडणाऱ्या ३३ जणांना जीवदान दिले. सिन्नर तालुक्यातील बेलू या गावी राहणाऱ्या तुपे यांची शेतीवरच उपजीविका चालते. गेल्या ३१ वर्षांपासून एक रुपयाही मोबदला न घेता त्यांचे हे जीवरक्षणाचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. अनेक पोलिस स्थानकातून आपत्तीच्या वेळी त्यांना सहाय्य करण्यासाठी पाचारण केले जाते. त्यांच्या या जीवरक्षणाच्या कार्याबद्दल अनेक संस्था व सरकारी स्तरावर त्यांना गौरविण्यात आले आहे. पण, अशा व्यक्तीची स्वतःची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची असल्याचे लक्षात घेत सरकारने त्यांना नुकताच जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना सन २०१८-१९ मधून १५ डिसेंबर रोजी स्कुबा डायव्हिंग सेट घेण्यासाठी २.५ लाख रुपयांचा मदत निधी वितरित केला आहे. या निधीमधून त्यांना स्कुबा डायव्हिंग सेट दिला जाणार आहे. यातून त्यांना नदी अथवा विहिरीमधून सुरक्षितपणे बाहेर येण्यास मदत होणार आहे. यासाठी त्यांनी कोल्हापूर येथे आपत्कालीन प्रशिक्षण देणारे जीवरक्षक दिनकर कांबळे यांच्याकडे त्याचे प्रशिक्षणही पूर्ण केले असून, येत्या आठवडाभरात त्यांना हा सूट प्रदान केला जाईल.

सत्कार्याचे संस्कार मुलांवरही
१९८४ मध्ये तुपे हे १६ वर्षांचे असताना त्यांची चुलती पाण्यात बुडाली. त्या एका प्रसंगावरून त्यांनी धडा घेत ‘जीवरक्षण’ करण्याचे काम सुरू केले. या कार्याला आता पुढील पिढीचीही साथ मिळणार आहे. त्यांच्या दोन मुलांपैकी लहान मुलगा आकाश तुपे (वय १८) याला त्यांनी पट्टीचा पोहणारा बनविले असून, तोही आता जीव रक्षणासाठी सिद्ध झाला आहे.

केवळ नाशिक जिल्ह्यातच नव्हे, अहमदनगर आणि ठाणे जिल्ह्यातही त्यांनी कुणाच्याही मदतीशिवाय अनेक मृतदेह बाहेर काढले आहेत. त्यासाठी त्यांना हा स्कुबा डायव्हिंग सेट कवच कुंडल ठरणारा आहे.
-अनिल पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

सरकारने स्कुबा डायव्हिंग सेट मिळवून दिला असला तरी त्याचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी त्या सेटसोबत इलेक्ट्रिक ब्रिदिंग एअर कॉम्प्रेसर घेण्यासाठी आणखी दीड-दोन लाख रुपयांची मदत खासगी अथवा दानशूर व्यक्तींनी करावी.
- गोविंद तुपे, लाभार्थी जीवरक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

accident: चांदवडमध्ये भीषण अपघात; ३ जागीच ठार

$
0
0

चांदवड (नाशिक)

मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड येथील श्री रेणुकामाता मंदिराच्या परिसरात उभ्या असलेल्या बसला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला.

चांदवड येथील श्री रेणुकामाता मंदिराच्या बाजूला बंद पडलेली एसटी बस उभी होती. मागून MH 15 EB 3067 या क्रमांकाची कार भरधाव वेगाने येत होती. भरधाव वेगात असलेल्या या कारचा अचानक टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला आणि या कारने त्याच वेगात बसला धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की कारच्या अर्ध्याहून अधिक भागात बसचा मागील भाग घुसला. कारचे बोनेट आणि छप्पर छिन्नविछिन्न झाले. या अपघातात कारमधील महेंद्रकुमार चंपालाल समदडीया (५०), वंदना महेंद्रकुमार समदडीया (४५) आणि हिमांशू महेंद्रकुमार समदडीया (२०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर हार्दिक महेंद्रकुमार समदडीया अपघातात गंभीर जखमी झाला. महेंद्रकुमारला नाशिकच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लोकसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार’

$
0
0

वृत्तसंस्था, अमेठी (उत्तर प्रदेश)

आपला पक्ष आगामी लोकसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी सांगितले. आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान जाहीर सभेत बोलताना, 'पुढील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक आम्हीच जिंकू', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राहुल गांधी बुधवार आणि गुरुवारी आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. गुरुवारी दिल्लीला परतण्यापूर्वी त्यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ उद्योगपतींनाच कर्जमाफी दिली, अशी टीका केली. चौकीदार चोर आहे हे त्यांनी सिद्ध केले असल्याचे सांगत, राहुल यांनी 'गली गली में शोर हैं, चौकीदार चोर हैं' या घोषणेचा पुनरुच्चार केला. मोदी हे देवाची शप्पथ घेऊन खोटे बोलतात. अच्छे दिन कुठे आहेत? नोटाबंदी हा सर्वात मोठा घोटाळा होता, असे सांगत, सीबीआयच्या प्रमुखांना घाईघाईत हटवण्याचे कारण काय, असा सवाल राहुल यांनी यावेळी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images