Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

फास्ट न्यूज

$
0
0

विवेकानंद केंद्रात भागवत कथा

नाशिक : अधिक मासानिमित्त विवेकानंद केंद्राच्या वतीने भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ६ ते १२ जून या कालावधीत दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत नागपूर येथील अरुणा देशपांडे या भागवत कथेचे निरूपण करणार आहेत. पंचवटी येथील रामवाडीलगतच्या कौशल्या नगरमधील विवेकानंद केंद्रात ही भागवत कथा सांगितली जाणार आहे.

-

केदारे यांची निवड

नाशिक : राज्य किसान सभेच्या नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील सुकदेव केदारे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या वनजमिनी, गायरान जमिनीधारकांच्या हक्कासाठी लढा उभारला आहे. संघटनेचे कार्याध्यक्ष राजू देसले, जिल्हाध्यक्ष भास्करराव शिंदे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.

-

वधू-वर परिचय मेळावा

नाशिक : महाराष्ट्र राज्य कहार समाजाच्या वतीने भव्य कहार समाज वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी १० जून रोजी नेवासा येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता या मेळाव्याला सुरुवात होईल. समाजातील उपवर वधू-वरांनी या परिचय मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन कहार समाज संघटनेचे रामदास बिरूटे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पान तीन फास्ट

$
0
0

मालेगावचा पारा

पुन्हा चाळिशीपार

नाशिक : मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर मालेगावचे तापमान ३२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. मात्र पावसाच्या उघडीपनंतर तापमानाचा पारा एकाच दिवसात आठ अंशांनी वाढला असून, मंगळवारी मालेगावचे कमाल तापमान ४०.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. यामुळे नागरिकांना पुन्हा उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

-

शेतीकामांना वेग

नाशिक : मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने आणि येत्या दोन तीन दिवसांत मान्सून सक्रिय होणार असल्याने शेतीकामांना वेग आला आहे. शेत नांगरणीबरोबरच खते पसरविले जात आहेत. यामुळे शेतमजुरांच्या हातांना काम मिळाले आहे. तसेच, कृषी केद्रांवरही खते व बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुक्रवारी निफाडमध्ये बैलगाडी आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर निफाड येथे शुक्रवारी (दि. ८) भरणाऱ्या आठवडे बाजारात शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस आणू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे यांनी निफाड येथे मंगळवारी झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत केले. शेतकरी संपाबाबत पुढील कार्यवाही करण्यासाठी शहरातील शेतकऱ्यांची सहकारी सेवा संस्थेच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शुक्रवारच्या आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यात आली. येथील तहसील कचेरी व प्रांत कचेरीसमोर शेतकरी बैलगाडी आंदोलन करतील. त्यानंतर शेतकरी स्वत:ला उलटे टांगून घेतील. शुक्रवारी आठवडे बाजार असून परिसरातील शेतकऱ्यांनी या आठवडे बाजारात शेतमाल विक्रीला आणू नये तसेच निफाडमधील व आठवडे बाजारासाठी येणाऱ्या व्यापारी वर्गाने व्यापार बंद ठेवून शेतकरी संपाच्या आंदोलनाला सहकार्य करण्याचे आवाहन कुंदे यांनी केले. वाल्मिक कापसे, शिवाजी ढेपले, किसन कुंदे, उत्तम गाजरे, सुरेश कापसे, राजेंद्र बोरगुडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीएचएमई निवडणूक होणार बिनविरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील जुन्या शैक्षणिक संस्थांपैकी एक असणाऱ्या सेंट्रल हिंदू मिलीटरी एज्युकेशन सोसायटीची (सीएचएमर्इ) निवडणूक बिनविरोध पार पडण्याच्या दिशेने सुरू आहे. मंगळवारी अर्ज माघारीच्या दिवशी ११ जागांसाठी ११ अर्ज आले. विरोधातील एक अर्ज नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र आहे.

सीएचएमई सोसायटीत आजवर निवडणूक प्रक्रिया बिनविरोध होत आली आहे. दरम्यान यंदाच्या निवडणुकीतील ११ कार्यकारिणी सदस्यांच्या जागांसाठी मात्र १२ अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे यंदा निवडणूक लागण्याची शक्यता काही वेळ निर्माण झाली होती. परंतु, मंगळवारी सायंकाळी अर्ज माघारीच्या दिवशी एक अर्ज मागे घेण्यात आला. त्यामुळे ही निवडणूक परंपरेप्रमाणे बिनविरोधाच्या दिशेने सुरू आहे.

सोसायटीचे राज्यभरात साडेपाचशे सदस्य आहेत. या संस्थेच्या रचनेत नाशिक विभागीय, नागपूर विभागीय आणि कार्यकारी समिती अशी कार्यकारिणी पाच वर्षांसाठी कार्यरत असते. नागपूर विभाग समितीची निवडणूकही बिनविरोध पार पडली आहे. या निवडणुकीसाठी अंतिम उमेदवारांची यादी बुधवारी (दि. ६) जाहीर होणार आहे. निवडणुकीसाठी ९ जून रोजी मतदान होऊन नव्या कार्यकारिणीची घोषणा १० जून रोजी करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मलनिस्सारण केंद्रास स्थानिकांचा विरोध

$
0
0

मलनिस्सारण केंद्रास स्थानिकांचा विरोध

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेने शहरात मलनिस्सारण केंद्रांसाठी जागा आरक्षित केल्या आहेत. परंतु, त्यातील काही मलनिस्सारण केंद्रे रहिवासी भागात येत असल्याने स्थानिकांनी विरोध केला आहे. नुकतेच गंगापूररोडवरील मलनिस्सारण केंद्राचे काम रहिवाशांनी बंद पाडले. आता खुटवडनगर भागातही माहेरघर मंगल कार्यालयाच्या बाजूला आरक्षित असलेल्या मलनिस्सारण केंद्राला स्थानिकांनी विरोध केला आहे. याबाबत नगरसेवक दिलीप दातीर, नगरसेविका अलका आहिरे यांनी महापालिकेकडे निवेदन देत मलनिस्सारण केंद्राला दुसरीकडे जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. रहिवासी भागाला लागून मलनिस्सारण केंद्र उभारल्यास त्याचा स्थानिक रहिवाशांनाच दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागेल. रहिवासी भाग नसलेल्या ठिकाणी मलनिस्सारण केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी खुटवडनगरवासीयांनी केली आहे.

०००००००

पंचवटी भागात थांबेना उघड्यावरील कचराफेक (फोटो)

पंचवटी : शहरात उघड्यावर कचरा टाकण्यास मनाई असतानाही पंचवटी परिसरात चरणपादुका रस्त्यालगत अजूनही उघड्यावर कचरा टाकला जात आहे. या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर मोकाट जनावरे चरत असतात. ती जनावरे अचानक रस्त्यावर येतात. त्यामुळे वाहनचालकांना वाहन सावरणे कठीण होते. येथे कचरा टाकणे बंद केल्यावरच मोकाट जनावरांचा वावर कमी होईल. कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

०००

रिक्षाचालकांची मनमानी

नाशिक : शालिमार परिसरात काही बेशिस्त रिक्षाचालकांनी मनमानी सुरूच असून, त्यांच्यावर शहर वाहतूक विभागाने कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. अनेक रिक्षाचालकांकडून या ठिकाणी प्रवासी मिळविण्यासाठी बेशिस्तपणे फेऱ्या मारल्या जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक केलेली असतानाही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. येथील बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

अॅड. तिदमेंची निवड (फोटो)

नाशिक : दी नाशिक डिस्ट्रिक्ट अॅडव्होकेट्स मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या चेअरमनपदी अॅड. पांडुरंग नारायण तिदमे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी गमे, माजी चेअरमन अॅड. विजया शिंदे, ज्येष्ठ नेते व संचालक अॅड. सुदाम गायकवाड, अॅड. अशोक कातकाडे आणि संचालक मंडळ उपस्थित होते.

--

'जाहीरनामा'वर कार्यक्रम

सिडको : येथील कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयातर्फे शनिवारी सुर्वे यांचा काव्यसंग्रह जाहीरनामा यावर आधारित 'गीत आणि कविता सादरीकरणाचा जाहीरनामा सुर्व्यांचा ...रिवाइंड' या कार्यक्रमाचे वाचनालयात आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या शनिवारी खास या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. यंदा शनिवार (दि. ९) जून रोजी सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. वृषाली विनायक, आदित्य दवणे, उमेश जाधव आणि गीतेश शिंदे सादरकर्ते राहणार असून, या कार्यक्रमाचा आनंद रसिकांनी घ्यावा, असे आवाहन कवी कट्ट्यातर्फे करण्यात आले आहे.

--

रस्त्यात विक्रीचा फंडा (फोटो)

सातपूर : शहरातील वाढलेले अतिक्रमण हटविण्याचे काम जोमाने हाती घेण्यात आले आहे. परंतु, मुख्य रस्त्यांच्या बाजूला व्यवसाय करणाऱ्यांचा सुळसुळाट कायम आहे. एका व्यावसायिकाने तर चक्क भर रस्त्यात वाहने अडवून साडीविक्रीचा नवा फंडा सुरू केला आहे. त्र्यंबकेश्वररोडवरील महिंद्रा सर्कलच्या बाजूला हा बहाद्दर भररस्त्यात वाहने अडवून साडीविक्री करीत आहे. एका रिक्षाचालकाने त्याच्या अंगावर रिक्षा घालून कडेला बसून विक्री करण्याचा सल्ला दिला. मात्र, रिक्षाचालक गेल्यावर त्याने पुन्हा रस्त्याच्या मधोमध उभे

राहत वाहने अडवून विक्रीचे काम सुरूच ठेवल्याने वाहनचालक बुचकळ्यात पडत आहेत.

शनिवारी स्वरसाधना

जेलरोड : नाशिकरोड येथील गुरुवर्य पं. शंकरराव वैरागकर संगीत प्रतिष्ठानतर्फे शनिवारी (दि. ९) स्वरसाधना मैफल होणार आहे. त्यात सुखदा बेहरे शास्त्रीय गायन सादर करणार आहे. जेलरोड येथील कोठारी कन्या हायस्कूलमध्ये सायंकाळी सहाला ही मैफल रंगणार असून, ती सर्वांसाठी खुली आहे. सुखदाला तबल्यावर संगीत कुलकर्णी आणि संवादिनीवर हर्षद वडजे साथसंगत करणार आहेत. रसिकांनी उपस्थिती राहावे, असे आवाहन संयोजक ओंकार वैरागकर आणि सरिता वैरागकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ समाधींची चौकशीची मागणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

येथील श्री संत जनार्दन स्वामी आश्रमाच्या जागेत असलेल्या समाध्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी भक्त मंडळ सदस्य डॉ. दिलीप जोशी यांनी केली आहे. आश्रमात दक्षिण दिशेला कोणाच्या लक्षात येणरा नाही अशा जागेवर रात्री दोन वाजता वेरूळ येथून तीन व्यक्तींचे मृतदेह आणून पुरले असल्याचे डॉ. जोशी यांचे म्हणणे आहे. तसेच यास महामंडलेश्वर शांतगिरी महाराज जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ऑक्टोबर २०१७ मध्ये येथे वेरूळच्या व्यक्तीचा मृतदेह पुरल्याचे निदर्शनास आल्यानंतर जोशी व भक्त मंडळाचे आणखी एक सदस्य अनिल काळे यांनी त्र्यंबक पोलिस ठाण्यात अर्ज दाखल करून संशय व्यक्त केला होता. त्यावेळी येथे आणखी दोन समाध्या असल्याचे निदर्शनास आले. त्र्यंबक पोलिसांनी याबाबत न्यायालयास अहवाल सादर केला असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान मागच्या महिन्यात महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांनी विष्णुगिरी आणि आणखी काही भक्तांसोबत पत्रकार परिषद घेऊन या समाध्या संतांच्या असल्याचे स्पष्ट केले आहे. अर्थात येथे तीन समाध्या असतांना केवळ दोन समाध्यांचाच उल्लेख करण्यात आला. समाधिस्त व्यक्ती या साधू आहेत असे सांगण्यात आले. तसेच या समाधींबाबत पोलिस परवानगी घेतल्याचेही त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कलासंगम’मध्ये बहरणार विविध कला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'महाराष्ट्र टाइम्स'च्या नाशिक आवृत्तीच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र टाइम्स व कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ९ व १० जून रोजी कलासंगम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कुसुमाग्रज स्मारक येथे हा महोत्सव होणार आहे. विविध कलांचे सादरीकरण करून रसिकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या या महोत्सवात कलाकारांची मांदियाळी राहणार आहे. या महोत्सवाचे उदघाटन ९ जून रोजी सकाळी १० वाजता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार प्रभाकर कोलते (मुंबई) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ज्येष्ठ शिल्पकार प्रमोद कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून लाभणार आहेत.

नाशिकमधील लोककला, डिजिटल आर्ट, परफॉर्मिंग आर्ट, गायन, वादन, शिल्प, नृत्य, नाट्य, चित्र, फोटोग्राफी सादर करणाऱ्या कलाकारांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलेचा प्रचार व प्रसार व्हावा आणि नाशिककरांना नवनवीन सांस्कृतिक प्रयोग पाहण्याची संधी उपलब्ध व्हावी, हा कलासंगम महोत्सवाचा उद्देश आहे. महोत्सवात नाशिकच्या सप्तकन्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर उभरत्या कलाकारांचे संबळवादन ठेवण्यात आले आहे. चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य, गायन, वादन व फोटोग्राफी या सात कलांवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय फोटोग्राफी, चित्रकला, वारली या विषयांतील विविध प्रदर्शने होणार आहेत. मान्यवर कलाकारांचे डेमोन्स्ट्रेशनही यावेळी होईल. नाशिकच्या कलावंतांचा समावेश असलेली आर्टिझन्स फिल्म यावेळी दाखविण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी हौशी कलाकारांचे तबलावादन, गायन व नृत्य, तसेच काही डेमो होणार आहेत. त्यांच्यातील कलाविष्कार पाहण्याची संधी नाशिककरांना उपलब्ध होणार आहे. नाशिककरांनी या 'आर्ट फेस्ट'ला नक्की हजेरी लावावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या फेस्टसाठी हॅण्ड फाऊंडेशनचे सहकार्य लाभत आहे.

शस्त्रास्त्रे व दुर्मिळ नाणी प्रदर्शन

'महाराष्ट्र टाइम्स'च्या वर्धापन दिनानिमित्त नाशिककरांसाठी विविध कार्यक्रमांचा खजिना खुला होणार आहे. ९ व १० जून हे दोन्ही दिवस कुसुमाग्रज स्मारकात शस्त्रास्त्रे व नाणी प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. यात दुर्मिळ नाणी, तसेच शस्त्रास्त्रे नाशिककरांना बघायला मिळणार आहेत.

प्रभाकर कोलते

प्रभाकर कोलते हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार आहेत. ते मूळ रत्नागिरी जिल्ह्यातील नेरूरपार येथील असून त्यांचे चित्रकला क्षेत्रात प्रचंड योगदान आहे. कोलते यांनी नवी दिल्ली ललित कला अकादमी, नवी दिल्ली नॅशनल गॅलरी मॉडर्न आर्ट यांच्या समितीमध्ये काम केलेले आहे. बॉम्बे सोसायटीचे ते गोल्ड मेडलिस्ट असून राज्य सरकारचा पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. त्यांना दुर्गा भागवत अॅवार्ड तसेच कवी कुसुमाग्रज अॅवार्डनेदेखील सन्मानित करण्यात आलेले आहे.

प्रमोद कांबळे

कांबळेंचे वडील आणि परिवारातील इतर लोक हे कला क्षेत्रातील असल्यामुळे त्यांना हे कलागुण लहानपणापासुनच मिळाले. वडील कला महाविद्यालयात मुख्याध्यापक होते. त्यामुळे प्रमोद कांबळे यांच्या कलाशिक्षणास लहानपणीच सुरुवात झाली. ७ वी इयत्तेत असताना त्यांना मूर्तिकलेच्या शिक्षणासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली. त्यांनी अहमदनगरच्या प्रगत कला महाविद्यालयातून फाऊंडेशन कोर्स आणि कला शिक्षक डिप्लोमा कोर्स पूर्ण केला. मूर्तिकार बनण्याची त्यांची प्रबळ इच्छा त्यांना जे जे स्कूल ऑफ आर्टला घेऊन गेली. तेथे त्यांनी मूर्तिकलेचा आणि मॉडेलिंगचा डिप्लोमा मिळवला. शैक्षणिक काळात त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. याच काळात त्यांनी विविध कला दिग्दर्शकांसोबत कामही केले. नंतर त्यांनी अहमदनगरला येऊन आपला स्टुडिओ सुरू केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वयंरोजगारासाठी १०९ चारचाकी वाहन

$
0
0

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचा उपक्रम

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने स्वयंरोजगारासाठी मागास वर्गातील नागरिकांना चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येते. मात्र, अनेक तालुक्यांमधील लाभार्थ्यांना अद्याप अनुदान वितरित करण्यात आले नसल्याची बाब जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी उपस्थित केली होती. याबाबत आढावा घेण्यात आला असता जिल्ह्यातील १३३ पैकी १०९ लाभार्थ्यांनी चारचाकी वाहन खरेदी केले असून त्यांना १०० टक्के अनुदान देण्यात आले आहे. तर २४ लाभार्थ्यांनी वाहन खरेदी केलेले नसल्यामुळे त्यांना अनुदान देण्यात आलेले नाही.

जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्य महेंद्रकुमार काळे व अन्य जिल्हा परिषद सदस्यांनी याबाबत प्रश्न उपस्थित करून विचारणा केली होती. याची दखल घेत डॉ. नरेश गिते यांनी किती लाभार्थ्यांना अनुदान वाटप केले किती लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले याबाबत खात्री करून उर्वरित सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करून अहवाल सदर करण्याचे निर्देश दिले. तसेच याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन गट विकास अधिकारी व सहायक गट विकास अधिकाऱ्यांचा आढावा घेतला. त्यातून जिल्ह्यातील १३३ पैकी १०९ लाभार्थ्यांनी चारचाकी वाहन खरेदी केले असून त्यांना १०० टक्के अनुदान देण्यात आले आहे. तर २४ लाभार्थ्यांनी वाहन खरेदी केलेले नसल्याने त्यांना अनुदान देण्यात आलेले नसल्याचे आढळून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एसटीची पगारवाढ फसवी

$
0
0

आकडेवारीचा खेळ केल्याचा इंटक अध्यक्ष छाजेड यांची टीका

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची एकतर्फी घोषणा परिवहन मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी मोठा गाजावाजा करून केली. पण, प्रत्यक्षात ही पगारवाढ फसवी असून आकडेवारीचा खेळ आहे. वेतनवाढ मान्य न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्याची धमकी वजा मुभा देऊन हिटलरशाहीचे प्रदर्शन केले आहे. त्यामुळे फसवी पगारवाढ कामगारांनी नाकारून फॉर्म भरून द्यावे व अंतिम न्यायहक्काच्या लढाईसाठी सज्ज व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे अध्यक्ष व माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी केले आहे.

एकतर्फी वेतनवाढीच्या काढलेल्या परिपत्रकाचा अभ्यास केला असता महामंडळाच्या हुकूमशाही अवतरली की काय? असा प्रश्न निर्माण झाल्याचेही छाजेड यांनी म्हटले आहे. सदर घोषणा करतांना ४ हजार ८४९ कोटी रुपयांचा फुगीर आकडा दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या रक्कमेत वेतन, भत्ते व अनुषंगिक वित्तीय भार अंतर्भूत केलेली असल्याने प्रत्यक्षात ७५० कोटी रुपये प्रतिवर्ष देण्यात येणार आहेत, असे सांगितले आहे.

अल्पवेतन वाढ

१७ व २० ऑक्टोबरदरम्यान झालेल्या संपाच्या दरम्यान ३१ मार्च २०१६ चे मूळ वेतन १,०७६ कोटी रुपये प्रति वर्ष वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव दिली होता. आात केवळ मूळ वेतनात २.५७ गुणक वापरून वेतन निश्चिती केल्याने अल्पवेतन वाढ होते. कनिष्ठ वेतनश्रेणीमध्ये ५ वर्षे व ३ वर्षे काम केलेल्या कामगारांना ३१ मार्च २०१६ च्या असुधारित वेतनावर अनुक्रमे ४ व २ वार्षिक वेतनवाढी देऊन त्यावर २.५७ गुणक लागू राहील. मुळात ४-२ वार्षिक वेतननवाढीने फार वेतनवाढ होणार नसून तुटपुंज्या पगारात काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा अपमान आहे, अशी बोचरी टीका छाजेड यांनी केली.

थकबाकी मिळणार नाही

एक एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१८ पर्यंत या काळात वाढीव वेतन वाढीची थकबाकी मिळणार नाही. घरभाडे भत्त्यांचा दर १०, २०, ३० टक्के ऐवजी ७, १४, २१ टक्के करण्यात आल्याने अनुक्रमे ३ टक्के ६ व ९ टक्के नुकसान होणार आहे. वार्षिक वेतनवाढीचा दर तीनऐवजी दोन टक्के प्रतिवर्ष केल्याने सेवानिवृत्तीपर्यंत १ टक्के प्रमाणे आर्थिक नुकसान होणार असून त्याचा परिणाम उपदान व भविष्य निर्वाह निधीवर सुद्धा कायमस्वरुपी होणार आहे.

थकबाकीची रक्कम ४८ हप्त्यांमध्ये

३१ मार्च २०१६ रोजी २ वर्षे ११ महिन्यापर्यंत कनिष्ठ वेतनश्रेणीत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना कनिष्ठ वेतनश्रेणीमध्ये काम केल्याचा कोणताही लाभ मिळणार नाही. एक एप्रिल २०१६ ते ३१ मे २०१८ या महिन्यांच्या थकबाकीची रक्कम पुढील ४८ हप्त्यांमध्ये म्हणजेच कराराची मुदत संपल्यानंतरही जुलै २०२२ पर्यंत तुकड्या तुकड्यात अदा करण्यात येणार आहे. असेही छाजेड यांनी सांगितले.

शनिवारपर्यंत फॉर्म भरून द्या

एसटी कर्मचाऱ्यांची एकतर्फी केलेली वेतनवाढ ही अन्यायकारक, प्रचंड आर्थिक नुकसान करणारी तसेच सेवानिवृत्तीपर्यंत दीर्घकालीन परिणाम होणारी असल्याने कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या न्यायहक्कासाठी सदरची पगारवाढ नाकारावी. त्यासाठी शनिवार, ९ जूनपर्यंत फॉर्म भरून द्यावेत. फॉर्म भरून दिलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची जबाबदारी व त्यासाठी संघर्ष करण्याची जबाबदारी संघटनेची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोड कारागृहात कैद्यांनी घातला धुमाकूळ

$
0
0

तुरुंगाधिकाऱ्यास खुनाची धमकी

प्रशासन-बंदिवान संघर्ष ऐरणीवर

परिस्थिती नियंत्रणात आणताना नाकीनव

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

विनापरवानगी सहबंद्याच्या दालनात गेलेल्या बंदीवानावर कायदेशीर कारवाई केल्याचा राग उफाळून आल्याने नाशिकरोड कारागृहात बुधवारी (दि.६) सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान सागर उर्फ चन्या अशोक बेग व त्याच्या सहकारी बंद्यांनी तुरुंगाधिकाऱ्यास खून करण्याची धमकी देत मध्यवर्ती कारागृहात पाऊण तास धुमाकूळ घातला. त्यांना इतर बंदिवानांनीही साथ दिल्याने कारागृह प्रशासनाची पाचावर धारण बसली होती.

या प्रकाराबाबत तुरुंगाधिकारी प्रदीपकुमार ज्ञानेदव बाबर यांनी सरकार पक्षातर्फे नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकारामुळे कारागृह सुरक्षायंत्रणा आणि बंदिवान यांच्यातील सुप्त संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. बुधवारी सकाळी झालेल्या या प्रकारामुळे मोक्का आरोपी सागर उर्फ चन्या अशोक बेग याच्या टोळीने कारागृहात दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याचेही उघड झाले. विशेष म्हणजे त्याच्या समर्थनार्थ इतर काही बंदिवानांनीही यार्डाच्या फाटकांतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्याने नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह प्रशासनाची पाचावर धारणा बसली आहे. बुधवारी बंदिवानांतील राग उफाळून आल्यावर बंदिवानांची समजूत काढण्यात कारागृहात उपस्थित वरिष्ठ तुरुंगाधिकांच्या नाकी नऊ आले होते. विशेष म्हणजे बंदिवानांचा गोंधळ वाढल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने लाठीचार्ज करण्याच्या विचारावर सुरक्षा यंत्रणा येऊन पोहचली होती. परंतु, वरिष्ठ तुरुंगाधिकाऱ्यांना बंदिवानांची समजूत काढण्यात अखेरच्याक्षणी यश आल्याने नाशिकरोड कारागृहातील मोठा अनर्थ टळला.

- सविस्तर वृत्त...२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टाला रिपोर्ट केल्याचा राग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

मे महिन्यात सागर उर्फ चन्या बेग हा बंदिवान विनापरवानगी त्याच्या सहबंद्यांच्या यार्डमध्ये गेला होता. ही बाब लक्षात आल्यावर तुरुंगाधिकारी प्रदीपकुमार बाबर यांनी चन्याविरोधात कोर्टाला रिपोर्ट केला होता. तेव्हापासून सागरच्या मनात बाबर यांच्याविषयी राग होता.

सागर व त्याचे साथिदार संघर्ष बाळासाहेब दिघे, गोरख उर्फ मुन्ना विजय जेधे, नीलेश बाळासाहेब परदेशी, जयप्रकाश उर्फ सोन्या अशोक बेग आणि अंकुश रमेश जेथे या सर्वांनी एकत्र येत कारागृहात धुमाकूळ घातला. जयप्रकाश हा स्वतःचा बिछाणा दुसऱ्या बंद्याकडे देऊन खाली उतरल्याचे बुधवारी सकाळी साडे सहावाजेच्या दरम्यान तुरुंगाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. याबद्दल त्यांनी बेगकडे विचारणा केली असता त्याने नकार देत त्यांच्याशीच पुन्हा हुज्जत घालून शिवीगाळ केली. यावेळी अंकुश जेधे यानेही या वादात उडी घेत शिवीगाळ केल्याने या दोघाही बंदिवानांना तुरुंगाधिकाऱ्यांनी चौकशीकामी मंडळ कार्यालयात बोलावले. यावेळी धुळे येथील गुड्ड्या खून प्रकरणातील आरोपी असलेले सागरचे नातेवाईक मंडळ कार्यालयापुढे जमा झाले. तुरुंगाधिकारी बाबर यांच्यावर धावून जात मारहाण करण्याच प्रयत्न केला.

…खुनाची धमकी

सागरने तुरुंगाधिकारी बाबर यांना त्यांच्या पुण्यातील घरात घुसून खून करण्याची धमकी दिल्याने प्रकरण आणखी चिघळले. यावेळी तुरुंगाधिकारी पी. आर. पाटील, डी. बी. पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सागर व त्याचे सहकारी बंदिवान त्यांच्यावरही धावून गेल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. नियंत्रण कक्षास या प्रकाराची माहिती दिल्यावर वरिष्ठ तुरुंगाधिकारी संपत आढे यांनी या ठिकाणी येऊन सागर व त्याच्या साथिदारांना शांत करण्यासाठी मंडळ क्रमांक सातच्या परिसरात हलविले. यावेळी सागरच्या समर्थनार्थ इतर यार्डांतील बंदिवान यार्डांच्या फाटकावर जमा होऊन फाटक जोरजोरात वाजवून बाहेर येण्याचाही प्रयत्न केला. वरिष्ठ तुरुंगाधिकारी कारकर यांच्या दालनात या बंदिवानांना हजर केले असता तिथेही या बंद्यांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न सोडला नाही. शेवटी त्यांना पुन्हा त्यांच्या मंडळ परिसरात नेऊन कारागृहातील सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्र येत या बंद्यांचे समुपदेशन केल्याने कारागृहातील धुमाकूळ थांबला. यापूर्वीही भूषण लोंढे या गुंडाच्या सहकाऱ्यांनी नाशिकरोड कारागृहात प्रकारचा धुमाकूळ घातला होता. बुधवारच्या या प्रकाराबाबत आता वरिष्ठ काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा हजार मागासवर्गीयांना रोजगार प्रशिक्षण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या समाजकल्याण विभागातर्फे शहरातील सहा हजार मागासर्गीय महिला व तरुणांना रोजगाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेअंतर्गत बेरोजगारांना प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यासाठी सात कोटींचा खर्च येणार आहे. शिक्षक मतदारसंघाची निवडणूक संपल्यानंतर येत्या महासभेवर हा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. प्रशिक्षणाचे काम सरकारी संस्थेलाच दिले जाणार असल्याने या प्रशिक्षण योजनेतील बनवेगिरीला चाप बसणार आहे.

महापालिकेच्या वतीने मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना राबविला जातात. अपंगांसह मागासवर्गीयांसाठी निधीही राखीव ठेवला जातो. महापालिकेकडून आतापर्यंत मागासवर्गीयांचा हा निधी फारसा खर्च केला जात नव्हता. परंतु, आयुक्तपद म्हणून पदभार घेतल्यानंतर तुकाराम मुंढेंनी ज्या विभागाचा आरक्षित निधी असेल, तो त्याच विभागावर खर्च करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार समाजकल्याण विभागाच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे प्रस्ताव ठेवण्यात आला होता. परंतु, या प्रस्तावात खानपानाच्याच प्रशिक्षणाचा समावेश असल्याने मुंढेंनी तो फेटाळून लावला होता. त्यामुळे समाजकल्याण विभागाने नव्याने प्रस्ताव तयार केला असून, सहा हजार मागासवर्गीय महिला व तरुण बेरोजगारांना प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेअंतर्गत रोजगाराचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी ७ कोटींचा निधी आरक्षित आहे. यात तीन हजार महिला व तीन हजार तरुणांचे स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी रोजगारक्षम प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी येत्या महासभेत प्रस्ताव ठेवला जाणार आहे. महासभेच्या मंजुरीनंतर या योजनेला सुरुवात केली जाणार आहे.

भ्रष्टाचाराला आळा

महापालिकेत यापूर्वी प्रशिक्षणाच्या योजना या भ्रष्टाचारामुळेच गाजत होत्या. प्रत्यक्ष लाभार्थीऐवजी ठेकेदाराचीच चंगळ होत असलेल्या योजना राबविल्या गेल्या आहेत. परंतु, मागासर्गीयांना दिल्या जाणाऱ्या रोजगाराचे प्रशिक्षण हे सरकारी संस्थेकडूनच करण्यात येणार आहे. त्यामुळे शासकीय संस्थेला हा निधी देऊन त्यांच्यामार्फत प्रत्यक्ष रोजगाराचे प्रशिक्षण देऊन रोजगार मिळण्यासाठीचेही प्रयत्न केले जाणार आहे. त्यात शिवणकाम, वाहनचालक, कौशल्य विकास उपक्रम, मोबाइल रिपेअर यांसह अनेक रोजगारांचा समावेश असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तवली फाटा उद्यानाचे लोकार्पण मोदींच्या हस्ते

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अमृत योजनेअंतर्गत मखलमलाबाद येथील तवली फाट्यावर महापालिकेच्या वतीने २१ एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या उद्यानाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केले जाणार आहे. सध्या या उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात असून, शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता संपल्यानंतर मोदींच्या हस्ते ई-लोकार्पण केले जाणार आहे. त्यासाठीची तयारी महापालिकेकडून केली जात आहे. अमृत योजनेअंतर्गत या उद्यानाचे काम केले जात असून, नैसर्गिक साधनांच्या वापराद्वारे हे उद्यान विकसीत केले जात आहे. हे उद्यान डोंगरावर उभारण्यात आले असून, त्यात लहान मुले, वृद्ध व तरुणांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात आली आहे. आचारसंहिता संपताच, अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण मोदींच्या ई-लोकार्पण केले जाणार आहे.त्यासाठीची तारीख निश्चित केली जाणार आहे.

सविस्तर वृत्त -४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांच्या बदल्यात द्या ५१ एकर जागा

$
0
0

लष्कराच्या प्रस्तावास महापालिकेचा नकार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकरोडसह देवळाली परिसरात महापालिकेकडून लष्कराच्या जागेवर रस्ते उभारणी केल्यानंतर लष्कराने आता या रस्त्यांच्या जागेच्या मोबदल्यात थेट जमिनीची मागणी महापालिकेकडे केली आहे. लष्करी हद्दीत उभारण्यात आलेल्या रस्त्याच्या मोबदल्यात ५१ एकर जागा महापालिकेने द्यावी, अशी मागणी करण्यात आली असून त्यावर राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात महापालिकेने कायद्यात अशी तरतूद नसल्याचे सांगत, पर्यायी जमीन देण्यास नकार दिला आहे. नाशिकसह अहमदनगर, पुणे महापालिकांमध्येही असाच वाद असल्याने आता यावर राज्यसरकारच्या वतीने तोडगा काढला जाणार आहे.

नाशिकरोड परिसरात आर्टिलरी सेंटर, देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डचा परिसर हा लष्कराच्या ताब्यात आहे. या भागात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती असल्याने त्यांना महापालिकेच्या वतीने सुविधा पुरविल्या जातात. लष्करी हद्दीत महापालिकेच्या वतीने रस्त्यांची उभारणी करण्यात आली असून त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. या रस्त्यांचा वापर स्थानिक नागरिकांसह लष्कराकडूनही केला जातो. या रस्त्यांचे बांधकाम महापालिकेने केले असले तरी, या रस्त्यांची मालकी ही लष्कराकडेच आहे. त्यामुळे लष्कराने या रस्त्यांच्या बदल्यात महापालिकेकडे स्वतंत्रपणे ५१ एकर जागेची मागणी केली आहे. परंतु महापालिकेने आपल्याकडे एवढी जमीन उपलब्ध नसल्याचे सांगत, या रस्त्यांच्या वापर नागरिकांसोबतच लष्कराकडूनही केला जात असल्याचे सांगत, मागणी फेटाळून लावली होती. रस्त्याच्या बदल्यात जमीन देण्याची कोणताही तरतूद कायद्यात नाही, असा पवित्रा महापालिकेने घेतला होता. परंतु, अशा प्रकारची मागणी लष्कराने अहमदनगर, पुणे, पिंपरी चिंचवड महापिलेकडे केली होती. मात्र, या महापालिकांनाही नकार दिल्यानंतर लष्कराने थेट राज्य सरकारकडे धाव घेतली होती.

लष्कराच्या मागणीनुसार, बुधवारी राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन यांच्याकडे लष्करी विभागाशी निगडीत असलेल्या महापालिकांच्या आयुक्तांची बैठक झाली. त्यात महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी हजेरी लावली. या बैठकीत लष्कराने नाशिकमध्ये महापालिका वापरत असलेल्या रस्त्यांच्या बदल्यात ५१ एकर जागा द्यावी, अशी मागणी केली. परंतु महापालिकेने आपला पूर्वीचाच पवित्रा कायम ठेवत अशी कायद्यात तरतूद नसल्याचे सांगत तसेच जमीनही उपलब्ध नसल्याचा दावा करत लष्कराची मागणी फेटाळून लावली. अशाच प्रकारची भूमिका अन्य महापालिकांनी घेतल्याने राज्य सरकारने या संदर्भात तोडगा काढण्यासाठी वेळ मागून घेतला आहे.

धोरणात्मक निर्णय घेणार

संबंधित विषय हा एका महापालिकेपुरता मर्यादित नसून राज्यात लष्करी छावणी जिथे आहेत, त्या ठिकाणचा हा प्रश्न आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या बदल्यात लष्कराला जमीन द्यायची की, मोबदला द्यायचा याबाबतचा अंतिम धोरणात्मक निर्णय राज्य सरकारच घेणार आहे. लष्करी क्षेत्रात रस्त्यांच्या वापरासंदर्भात सरकारकडून एक निश्चित धोरण ठरवले जाणार आहे. त्यांनतर मधला मार्ग काढून दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वय साधून दिला जाणार आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या मोबदल्याबाबत राज्यसरकार काय निर्णय घेते, याकडे महापालिकेचे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेहेर ते सीबीएस रस्ता आजपासून बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अशोकस्तंभ ते सीबीएस रस्ता स्मार्ट बनविण्यासाठीची कार्यवाही प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. बुधवारी मेहेर सिग्नल ते सीबीएस रस्ता काही वेळासाठी बंद करून प्रात्यक्षिक घेण्यात आले. आजपासून मेहेर चौक ते सीबीएस मार्गाचे काम सुरू करण्यात येणार असून त्यासाठी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

सीबीएस ते अशोक स्तंभ हा शहरातील अत्यंत महत्त्वपूर्ण मार्ग असून, येथे मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. येथील वाहतूक व्यवस्था सुटसुटीत व्हावी यासाठी हा रस्ता स्मार्ट करण्यात येणार आहे. या रस्त्याचे काम सुरू करता यावे यासाठी पोलिसांनी अलिकडेच अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार सुरुवातीला अशोक स्तंभ ते सीबीएस हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. सीबीएस ते अशोक स्तंभ या मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू राहणार आहे. बुधवारी ट्रायल म्हणून सकाळी १० पासून मेहेर चौक ते सीबीएस हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. दुपारी हा रस्ता खुला करण्यात आला. परंतु, सिटूने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केल्याने या परिसरात वाहतुकीचा फज्जा उडाला. गुरुवारी पुन्हा या परिसरात दोन आंदोलने होणार आहेत. उद्या मेहेर चौक ते सीबीएस या रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. आज पुन्हा येथे आंदोलने होणार असून त्यामुळे वाहतुकीचा फज्जा उडण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नेहरू गार्डनजवळ अतिक्रमण काढले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने बुधवारी 'नो हॉकर्स झोन' असलेल्या नेहरू गार्डन परिसरात हातगाडी वाल्यांचे अतिक्रमण काढण्यात आले. यामुळे परिसरातील नागरिकांसह वाहनचालकांना समाधान व्यक्त केले आहे.

नेहरू गार्डन परिसरात विक्रीला बंदी असतानाही येथे मोठ्या प्रमाणावर हातगाड्या लावून व्यवसाय केला जातो. त्यामुळे रस्त्याची कोंडी होते. त्यामुळे अतिक्रमण विभागाच्या वतीने बुधवारी येथे उभ्या असलेल्या हातगाड्या जप्त करण्यात आल्या. विशेष म्हणजे येथील हातगाड्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. या कॅमेऱ्यांसह महापालिकेने हातगाड्या जप्त केल्या आहेत. सोबत कालिका मंदिराच्या मागे एका घराचेही अतिक्रमण महापालिकेने जमीनदोस्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दाखले वितरणात नाशिकच अव्वल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑनलाइन प्रक्रियेद्वारे महिनाभरात विविध प्रकारचे तब्बल ५९ हजार ९७० दाखले वितरित करण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्याने दाखले वितरणात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून तो कायम ठेवण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाला आगामी काळात पेलावे लागणार आहे. दाखले वितरणात अहमदनगर दुसऱ्या क्रमांकावर असून पुणे तिसऱ्या क्रमांकावर आहे.

महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेसाठी विविध प्रकारच्या दाखल्यांची गरज असते. दाखल्यांअभावी विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये याकरीता जिल्हा प्रशासनाने आपले सरकार सेवा केंद्राद्वारे ऑनलाइन दाखले वितरित करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी तब्बल ८३ केंद्रही सुरू करण्यात आली आहेत. शिवाय महाविद्यालयांमध्येही लवकरच आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. राज्यात नाशिक जिल्ह्याने दाखले वितरणामध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. १ ते ३१ मे या ३१ दिवसांमध्ये नाशिक महसूल विभागाने तब्बल ५९ हजार ९७० ऑनलाईन अर्ज वितरीत केले आहेत. त्याखालोखाल अहमदनगरमध्ये ५१ हजार ५९६, पुणे ४२ हजार ५७९, यवतमाळ ४० हजार ८४०, सोलापूर ३४ हजार ३१९ दाखले वितरीत करण्यात आले आहेत. नाशिक जिल्हा प्रशासनाने वितरीत केलेल्या ५९ हजार ९७० दाखल्यांमध्ये उत्पन्नाचे ३१ हजार ९२९, जातीचे दाखले ९ हजार ९१३, वय व अधिवास प्रमाणपत्र ८ हजार ९९६, नॉन क्रिमेलियर ६ हजार ५३८, प्रतिज्ञापत्र ११४४, रहिवास दाखले १७६, महिला आरक्षण ८१ अशी विविध प्रकारचे दाखले वितरीत करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जखमी सायकलस्वार बालकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरधाव दुचाकीने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या सायकलस्वार बालकाचा मृत्यू झाला. हिरावाडीतील कमलनगरमध्ये २४ मे रोजी हा अपघात झाला होता. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

समीर तुकाराम राऊत (वय १०, रा. फडबाई चाळ, शक्तीनगर, हिरावाडी) असे मृत्यू झालेल्या सायकलस्वाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी सहाच्या सुमारास समीर हा कमलनगर येथील मंथन स्वीट्स समोरून सायकलवरून जात होता. मागून भरधाव आलेल्या दुचाकीने त्याला धडक दिली. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. कुटुंबीयांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

स्कॉर्पिओसह दुचाकीची चोरी

नाशिक : शहरात वाहनचोरीचे प्रकार सुरूच असून सिडकोतून स्कार्पिओ तर रामवाडीतून दुचाकी चोरीस गेली. याप्रकरणी अंबड आणि पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नीलेश गोविंदराव गायकवाड (रा. लक्ष्मीनगर, कामटवाडा रोड) यांची स्कार्पिओ (एमएच १८ बीसी २९९५) सोमवारी रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केली होती. ती चोरट्यांनी चोरून नेली. दुसरी घटना रामवाडीत घडली. जयेश गणेश लोढा (रा. स्नेहल अपार्टमेंट, साळुंखे क्लासेस शेजारी) यांची दुचाकी २८ मे रोजी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमधून चोरट्यांनी चोरून नेली.

तडीपार गुंड गजाआड

नाशिक : शहर पोलिसांनी तडिपार केले असतानाही शहरात वावरणाऱ्या सोन्या उर्फ वैभव गजानन खिरकाडे (रा. मेहरधाम, पेठरोड) यास पोलिसांनी अटक केली आहे. दिंडोरी रोडवरील एका दारू दुकानाजवळ तो आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैभव खिरकाडे याच्या विरुद्ध शहरातील विविध पोलिस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यास पोलिसांनी दोन वर्षासाठी शहर व जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. मात्र, तडिपारीच्या कारवाईनंतरही तो शहरात वास्तव्यास होता. दिंडोरी रोडवरील एका वाईन शॉपजवळ मंगळवारी (दि. ५) सायंकाळी त्याला पकडण्यात आले.

विषारी कीटक चावल्याने तरुणीचा मृत्यू

नाशिक : कॉलेजच्या आवारात काम करताना विषारी किटक चावल्याने २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. रासबिहारी शाळेजवळील एका कृषी महाविद्यालयाच्या आवारात ही घटना घडली. म्हसरूळ पोलिसांनी मृत्युची नोंद केली आहे.

उषा नारायण तरोटे (रा. सिद्धिविनायक टाउनशिप, हिरावाडी) असे मृत झालेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरोटे ही मंगळवारी (दि. ५) कृषी महाविद्यालय आवारात काम करीत असताना ही घटना घडली. विषारी किटकाने तिच्या उजव्या हातास चावा घेतला. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान असताना तिचा मृत्यू झाला. अधिक तपास हवालदार पगार करीत आहेत.

..

बँक ऑफ इंडियाला ४४ लाखांचा गंडा

नाशिक : बनावट दस्तऐवज सादर करून बँक ऑफ इंडियाला तब्बल ४४ लाखांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी दोन दाम्पत्यांसह महिला वकिलावर सरकारवाडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

धनंजय रोहिदास पगार, विजयश्री धनंजय पगार, कविता विश्वास थोरात, विश्वास वसंत थोरात यांसह दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये एका महिला वकीलाचा समावेश आहे. २०१२-१३ मध्ये हा फसवणुकीचा प्रकार घडला. संशयितांनी वेगवेगळे दोन बनावट साठेखत व खरेदीखत बनवून हा गंडा घातल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही दाम्पत्याच्या नावे वेगवेगळी कर्ज काढण्यात आली आहेत. संशयितांनी बनावट दस्तऐवज आणि खोटा सर्च रिपोर्ट बँक ऑफ इंडियाच्या शिवाजी उद्यान शाखेत सादर केला. त्याआधारे प्रत्येकी २२ लाख रुपयांचे कर्ज घेतले. कर्जाचा परतावा न झाल्याने या घटनेचा उलगडा झाला असून याप्रकरणी सहा जणांविरुद्ध सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेस्ट्र कंट्रोलच्या बहाण्याने दागिने लंपास

नाशिक : पेस्ट कंट्रोलच्या बहाण्याने घरात घुसलेल्या महिलेच्या कानातील दागिने हातोहात लांबविण्यात आले. गोविंदनगर भागात हा प्रकार घडला. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्योती नंदकिशोर कोठावदे (रा. न्यू इरा स्कूलजवळ, गोविंदनगर, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. ज्योती कोठावदे या शनिवारी (दि. २) दुपारी घरात एकट्या होत्या. संतोष केरबा कांबळे हा संशयित एका साथीदारासह त्यांच्या घरी आला. यावेळी त्याने मोफत पेस्ट कंट्रोल करून देतो, असे म्हणत बळजबरीने घरात प्रवेश केला. कोठावदे यांनी काम करण्यास मनाई करूनही संशयितांनी साफसफाईचे काम हाती घेतले. यानंतर काही वेळाने दोघांनी पिण्यासाठी पाणी मागितल्याने त्या स्वयंपाक घरात गेल्या. त्याचवेळी टीव्हीजवळ काढून ठेवलेले सुमारे नऊ हजार रुपयांचे दागिने संशयितांनी हातोहात लांबविले.

क्राइम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेनसाठी चौकट

$
0
0

वाहनतळावर अस्वच्छता

त्र्यंबक नगरपालिकेच्या वाहनतळावर असलेल्या अस्वच्छतेने भाविक हैराण झाले आहेत. अधिक महिना आता शेवटच्या चरणात आला आहे. भाविकांची गर्दी उसळली असतांना त्र्यंबक नगरपालिकेने वाहनतळाबाबत स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे. वाहनतळाच्या विकसित झालेल्या लगतच्या जागेवर कचऱ्याचे ढिगारे पडले आहेत. तेथेच माळा रूद्राक्ष शंख विकणाऱ्यांनी झोपड्या-पाल उभे केले आहेत. प्रवासी भाविक वाहने उभी करतात आणि या जागेतून वाट काढत मुख्य रस्त्याला येतात. येथे माळा विक्रेत्यांमध्ये कधीकधी हाणामाऱ्या होतात. ते आपसात एकमेकावर दगडही भिरकावतात. येथील अस्वच्छता आणि बकालपणा यांचे बिभित्स चित्र भाविकांपुढे उभे राहत आहे. वाहनतळ फी म्हणून पालिका वाहनाप्रमाणे कर आकरते. यामध्ये ३० रुपयांपासून १०० रुपये आकारणी होत असते. यातून गेल्या पंधरवड्यात पालिकेला दिवसाकाठी ४० हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. जून महिन्यापासून वाहनतळाचा ठेका देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच कर्मचाऱ्यांना बजावल्या नोटिसा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेतील पाच कर्मचाऱ्यांनी आपले जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना आयुक्त संगीता धायगुडे यांनी नोटीस बजावली आहे. पालिकेतील संजय ठाकूर, कमल सुरसे, बाबुराव जाधव, जगदीश बडगुजर, शेख शकील अह. कमरूद्दीन अशी त्या पाच कर्मचाऱ्यांची नावे आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांनी नेमणूक आदेशानुसार सहा महिन्याच्या आत आपले जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे होते. कागदपात्रांची पूर्तता केली नसल्याचे समितीच्या पत्रातून स्पष्ट झाले होते. त्यामुळे त्यांना सात दिवसात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे अन्यथा नेमणूक आदेशातील अटी शर्तीचा भंग केल्याने त्यांच्या सेवा संपुष्टात आण्यात येतील अशी नोटीस बजावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images