Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘कॅप्रिहन्स’च्या आंदोलनाला स‌िटूचाही पाठिंबा

$
0
0
कॅप्रिहन्स कंपनीतील युनियन पदाधिकाऱ्यांचे निलंबन केल्याने कामगारांचे दोन दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी सिटूचे कामगारनेते डॉ. डी. एल. कराड यांनी कॅप्रिहन्स कंपनीच्या प्रवेशद्वारावर कामगारांची भेट घेत आंदोलनाला पाठिंबा दिला.

आता ग्रामीण भागात उंच इमारती

$
0
0
प्रादेशिक योजना (आरपी) लागू झालेल्या १५ विभागांसह राज्यातील २४६ नगर परिषदांच्या विकासाला चालना देणाऱ्या सुधारित प्रमाणित विकास नियंत्रण नियमावलीला नगरविकास विभागाने मागील महिन्यात मंजुरी दिली आहे.

‘साधुग्राम’ सुनावणी आठवड्याभरात

$
0
0
तपोवनातील नो डेव्हलपमेंट झोन म्हणून आरक्षित असलेल्या १६३ एकर जमिनींवर राज्य सरकारने साधुग्रामसाठी आरक्षण टाकले आहे. त्यासंबंधी राज्य सरकारने नगररचना विभागामार्फत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या होत्या. हे काम पूर्ण झाले असून २६ व २७ डिसेंबर रोजी अंतिम सुनावणी होणार असल्याची माहिती नगररचना विभागाचे सहसंचालक प्रकाश भुक्ते यांनी दिली आहे.

स्वच्छता कराचा प्रशासनाला विसर

$
0
0
खतप्रकल्पावर कोट्यवधी रुपये खर्च होत असल्याची ओरड करून प्रशासनाने या प्रकल्पाचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव तयार केला असून यात स्वच्छता करापोटी वर्षाकाठी तीन कोटी ५३ लाख रुपये मिळत असल्याचे सांगितले जाते आहे.

लोकसहभागातून तयार होणार डीपी

$
0
0
शहर विकास आराखडा (डीपी) बनवताना लोकसहभाग नसेल तर त्या प्रक्रियेचा कोणताही फायदा शहराला होणार नाही. विकास आराखडा शहराच्या हितासाठी बनवण्यात येणार असल्याने या प्रक्रियेत जास्तीत जास्त लोकसहभाग वाढवण्यात येणार असल्याचा दावा नगररचना विभागाचे सहसंचालक प्रकाश भुक्ते यांनी केला आहे.

मंदिरातील दिव्यामुळे भाजून वृद्धाचा मृत्यू

$
0
0
मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या वृद्धाचा तेथील पेटत्या दिव्यामुळे जबर भाजल्याने मृत्यू झाला. पंचवटीत गुरुवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ज्येष्ठांसाठी एसटीची ई-तिकीट सुविधा सुरू

$
0
0
एसटीच्या तिकीट आरक्षणासाठी रांगेत उभे राहाण्याच्या कटकटीपासून ज्येष्ठ नागरिकांची सुटका झाली आहे. त्यांच्या गैरसोयीची दखल घेऊन महामंडळाने शुक्रवारपासून ई- तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

जातिवाच‌क शिवीगाळ : ६ जणांवर गुन्हा

$
0
0
जातिवाचक शिवीगाळ केली जात असल्याची तक्रार एका महिलेने नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये दिली असून त्यानुसार सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑगस्टमध्ये जेलरोड येथील ईश्वर कोऑपरेटिव्ह सोसायटीत हा प्रकार घडला होता.

उत्पन्नवाढीसाठी उद्योगांचे सर्वेक्षण

$
0
0
महापालिकेचे उत्पन्न वाढावे यासाठी सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योगांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार हे सर्वेक्षण सुरू झाले असून आगामी १५ दिवसांत ते पूर्ण केले जाणार आहे. मात्र या सर्वेक्षणामुळे अनेक उद्योगांचे धाबे दणाणले आहे.

बोनस TDR मध्ये व्यवहार्यता नाही

$
0
0
शेतकऱ्यांना आकर्षक टीडीआर (हस्तांतरीय विकास हक्क) किंवा सवलत देण्यात यावी, अशी राज्य सरकारची सूचना असून महापालिकेच्या नगररचना विभाग मात्र कायद्यालाच हरताळ फासून अव्यवहार्य टीडीआर योजना राबवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप अपक्ष आघाडीचे गटनेते गुरमीत बग्गा यांनी केला आहे.

२४ डिसेंबरला पेट्रोलपंप बंद!

$
0
0
पेट्रोलियम मंत्रालय व ऑईल कंपन्यांकडून पेट्रोल डीलर्सच्या कमिशनवाढीकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे पेट्रोलपंप चालकांनी २४ डिसेंबर रोजी एक दिवसाचा देशव्यापी बंद पुकारला आहे.

गॅस कंपन्यांची मनमानी कशासाठी?

$
0
0
तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरचे दर नुकतेच वाढविले. गॅस सिलिंडरचा भारदेखील तेल कंपन्या ग्राहकांवर टाकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महागाईच्या माऱ्याने त्रस्त झालेल्या ग्राहकांवर यामुळे आणखी एक भार पडणार आहे. तुटपुंज्या पगारात जमा खर्चाची तोंडमिळवणी करणे अवघड झाल्याची गृहिणींची भावना झाली आहे.

नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे धरणे आंदोलन

$
0
0
नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या वतीने एकलहरा येथील कर्षण कारखान्याच्या गेटवर कामगारांच्या प्रलंबीत मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कारखान्यातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेल्वेत संप व्हावा की नाही, यासाठी मतदान घेण्यात आले.

युनियन पदाधिकाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी

$
0
0
युनियन पदाधिकाऱ्यांचे निलंबन मागे घ्यावे, यासाठी कामगार विकास मंचाच्या वतीने कामगार सहायक आयुक्त आंधळे यांना निवेदन देण्यात आले. औद्योगिक शांतता भंग होऊ नये, यासाठी कामगार उपायुक्तांनी मध्यस्थी करण्याची मागणी यावेळी ‘कामगार विकास मंच’ने केली.

अनैतिक संबंधातून एकाचा खून

$
0
0
अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून एकाचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृताच्या पत्नीच्या प्रियकरानेच हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. १५डिसेंबरला सिन्नर तालुक्यातील मोह शिवारात ही घटना घडली होती.

नव्या २५ मेडिकल कॉलेजांचा प्रस्ताव!

$
0
0
आगामी शैक्षण‌िक वर्षापासून हेल्थ सायन्स या विषयाशी संबंध‌ित अभ्यासक्रमांची नवी २५ कॉलेजे सुरू करण्याची श‌िफारस विद्यापीठाच्या वतीने सरकारला करण्यात येणार आहे. आरोग्य व‌िज्ञान व‌िद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत या मुद्द्यावर न‌िर्णय घेण्यात आला.

विद्यापीठ कॅम्पसचे अपडेट्स जानेवारीत नाश‌िककरांसमोर

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या प्रस्ताव‌ित नाश‌िक कॅम्पसचे अपडेट्स जानेवारी मह‌िन्यात नाश‌िककरांसमोर मांडण्याचे आश्वासन कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी नाश‌िकच्या विद्यार्थ्यांना द‌िले. विद्यार्थ्यांच्या प्रलंब‌ित प्रश्नांसाठी मनव‌िसेने कुलगुरूंकडे पाठपुरावा केला.

महान्यूजकडून पुन्हा घोळ!

$
0
0
राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘महान्यूज’ या अधिकृत वेबसाइटने बेरोजगार युवकांची खिल्ली उडविण्याचा विडाच उचलला असल्याचे त्यांच्याकडून सातत्याने होणाऱ्या चुकांवरू दिसते आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पूर्व परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे.

‘नॅशनल हायवे’च्या नियमांनाही ठेंगा

$
0
0
पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी आणि प्रांत यांच्या अधिकारांवर कुरघोडी केल्यानंतर नॅशनल हायवे अथॉरिटीच्या (न्हाई) नियमांनाही ठेंगा दर्शविला आहे. त्यामुळेच ‘न्हाई’चा ना हरकत दाखला घेतल्याखेरीज पिंपळगावात अनेक बांधकामांचे इमले उभारले जात आहेत.

नाशिकरोडला झाडांची कत्तल!

$
0
0
हजारोंचे श्रद्धास्थान असलेल्या जेलरोड येथील जुना सायखेडा रोडवरील म्हसोबा मंदिरातील आंब्याच्या झाडावर महापालिकेच्या ठेकेदाराने घाव घातल्याने पयार्वरणप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला. दोन दिवसांपासून नाशिकरोड परिसरात वृक्षांची बेसुमार कत्तल होत आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images