Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मुकणे योजनेसाठी ३ वर्षांचा कालावधी

$
0
0
शहरासाठी उपयुक्त ठरणाऱ्या मुकणे पाणी पुरवठा योजनेला पूर्णत्वास जाण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी खर्ची पडणार आहे. वाढत्या शहराची गरज भागविण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या योजनेला मंगळवारी केंद्र सरकारने मंजुरी दिली होती.

वैमानिक व्हायचं ठरवलंच होतं...

$
0
0
आपणही वैमानिक व्हायचं असा निश्चिय निर्मलाने आधीच केला होता. दहावीला चांगले मार्क्स मिळवत निर्मलाने कोपरगाव कॉलेजमध्ये अकरावीला सायन्सला प्रवेश घेतला. बारावीला चांगले मार्क्स मिळवत तिने एव्हिएशनचा कोर्स करण्याचे ठरविले.

न्यायप्रविष्ट पाण्यावर सभागृहात निर्णय नको

$
0
0
नागपूर येथे सुरू असलेल्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनात गुरुवारी मराठवाड्याच्या आमदारांनी पाणी सोडण्याची मागणी केल्यावर आमदार जाधव यांनी त्यास हरकत घेतली. संबंधित मुद्दा न्यायप्रविष्ठ असल्याने सभागृहात त्यावर निर्णय होऊ नये, अशी भूमिका जाधव यांनी घेतली.

स्वरयात्रेचा संगीत प्रवासी हरपला

$
0
0
ज्येष्ठ कलासाधक आणि प्रसिद्ध हार्मोनियमवादक दादासाहेब ऊर्फ भास्करराव गोपाळराव भातंब्रेकर (८५) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

दहा लाखांचा दंड वसूल

$
0
0
नाशिक शहर परिसरात गौण खनिजांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात नाशिक तहसील कार्यालयाने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळेच गेल्या १३ दिवसांत जवळपास दहा लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

अवघ्या एकाच ठेक्याचा लिलाव

$
0
0
गेल्यावर्षी सपशेल अपयशी ठरलेली वाळूचे ई-ऑक्शन यंदाही फसणार असल्याची दाट चिन्हे आहेत. जिल्ह्यातील २३ ठिकाणांपैकी अवघ्या एका ठेक्याचाच लिलाव गुरुवारी झाला आहे.

प्लॉटचे क्लबिंगही बेकायदाच!

$
0
0
पिंपळगाव बसवंत येथे केवळ अनधिकृतरित्या इमारतींचे बंगले उभे राहत नसून एकाहून अधिक प्लॉट एकत्र करून (क्लबिंग) विनापरवाना इमारती उभ्या केल्या जात आहेत. ग्रामपंचायतीतील मूखंड याप्रकरणी मूग गिळून बसल्याने पिंपळगावकरांनीच अखेर निफाडच्या प्रांतांकडे यासंदर्भात दाद मागितली आहे.

‘छावा’तर्फे अमेरिकेचा निषेध

$
0
0
अमेरिकेच्या भारतीय दूतावासातील उच्चाधिकारी देवयानी खोब्रागडे यांना देण्यात आलेल्या अवमानकारक वागणुकीचा निषेध दिवसेंदिवस तीव्र होत असून यात गुरुवारी नाशिकमधील छावाच्या कार्यकर्त्यांनी अमेरिकेचा पुतळा दहन केला.

नव्या अभ्यासक्रमासाठीची वाटही खडतर?

$
0
0
सन २०११- १२ मध्ये मान्यता रद्द करण्यात आलेल्या मेड‌िकल कॉलेजमधील आयुर्वेद आण‌ि युनानी शाखेच्या व‌िद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी नव्या अभ्यासक्रमाचा पर्याय न‌िवडण्यासाठी सरकारपातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.

आर्किटेक्ट काळ्या यादीत नाहीत!

$
0
0
आर्किटेक्टला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्याचा अधिकार महापालिकेला नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई हायकोर्टाने नुकताच दिला आहे. कोर्टाने दिलेल्या या निकालामुळे आर्किटेक्ट व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

खेड्यातल्या निर्मलाची आकाशभरारी

$
0
0
घरची परिस्थिती बेताची.. त्यात सहा जणांचं कुटुंब. उदरनिर्वाहासाठी केवळ शेतीचा सहारा... अशा परिस्थितीतही मनातली जिद्द पूर्ण करण्याची आस बाळगत कधी काळी सायकलवरून कॉलेजला जाताना हवेत दिसणाऱ्या विमानांना गवसणी घालण्याचं स्वप्न पाहणारी निर्मला खळे आज पायलट (वैमानिक) झाली आहे.

सिलिंडरच्या व्हॅटचा भुर्दंड ग्राहकांनाच

$
0
0
घरगुती गॅस सिलिंडर महागल्याप्रकरणी व्हॅटची रक्कम ही ग्राहकालाच अदा करावी लागणार असल्याची भूमिका गॅस कंपन्यांनी घेतली आहे. याचा भुर्दंड ग्राहकांना सहन करावा लागणार आहे.

एमबीएच्या परीक्षेत ​मिसमॅनेजमेंट?

$
0
0
काही दिवसांपूर्वी सर्व्हर डाऊन असल्याच्या तांत्र‌िक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आलेली एमबीए परीक्षा दोन द‌िवसांपूर्वी पुन्हा सुरू झाली. प्रारंभीचे दोन पेपर सुरळीत झाल्यानंतर गुरुवारच्या पेपरमध्ये पुन्हा अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारले गेल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.

आ. जयंत जाधव यांनी गाजवले सभागृह

$
0
0
एकीकडे मराठवाड्याचे आमदार नाशिक-नगरमधील पाण्यावर दावा करत असताना सभागृहात उपस्थित नाशिकचे एकमेव आमदार जयंत जाधव यांनी उपस्थितांचा दावा खोडून काढत जोरदार किल्ला लढविला.

गाळ्यांमध्ये गर्दुल्यांचा धुमाकूळ

$
0
0
महापालिकेने गोदावरीलगतच्या रामसेतू पुलासमोर उभारलेल्या गाळ्यांमध्ये गर्दुल्यासह मद्यपी व टवाळखोरांचा धुमाकूळ दिवसरात्र सुरू असतो. यामुळे व्यापाऱ्यांनी या गाळ्यांकडे पाठ फिरविल्याने येथील गाळे व सभागृह धुळखात पडले आहेत.

वि‌विध स्पर्धांनी गजबजले एसएमआरके

$
0
0
सृजनशीलतेला आव्हान देणाऱ्या व‌िव‌िध स्पर्धांच्या आयोजनासोबतच आनंदाला उधाण आणणारा गरबा महोत्सव एसएमआरके कॉलेजमध्ये शुक्रवारी पार पडला. माजी विद्यार्थिनींच्या सहभागामुळे या उत्सवात आणखी रंगत आली. तर दिवसभर सुरू असलेल्या विविध स्पर्धांनी एसएमआरके गजबजले होते.

अमेरिकेचा निषेध अन् महासभा तहकुब

$
0
0
वाणिज्य दूतावासातील अधिकारी डॉ. देवयानी खोब्रागडेंवरील अन्यायकारक कारवाईचा निषेध करीत तसेच भारतरत्न आणि शांतीदुत नेल्सन मंडेला यांच्यासह दिवंगत मान्यवरांना श्रध्दांजली वाहत शुक्रवारी महासभा तहकुब करण्यात आली.

द बिगेस्ट टर्मिनल रुफ

$
0
0
ओझर येथील विमानतळाच्या ठिकाणी प्रगतीपथावर असलेल्या पॅसेंजर टर्मिनलसाठी देशातील सर्वाधिक लांबीचे (१२१.६ मीटर) रुफ (छप्पर) साकारण्यात येत आहे. वीजेची बचत करण्यासह अत्याधुनिक काल्झीप तंत्रज्ञानावर हे रुफ सात थरांनी उभारण्यात येत आहे.

आवक-जावक नोंदीत ‘गाळलेल्या जागा’!

$
0
0
पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीच्या मूखंडांच्या नाकर्तेपणामुळेच बेकायदा बांधकामांचा घाट घातला जात असतानाच ग्रामपंचायतीच्या आवक-जावक रजिस्टरमध्ये गाळलेल्या जागा भरण्याचेही ‘उद्योग’ सर्रास सुरू आहेत.

डॉमिनोझ, मॅकडोनल्डजवळ पोलिस गस्त वाढविली

$
0
0
भारतीय दूतावासातील राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्याशी गैरव्यवहाराच्या कृत्याबद्दल विविध स्तरांतून संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर मॅकडोनल्ड, डोमिनोज अशा अमेरिकन खाद्यपदार्थांच्या आऊटलेट असलेल्या शहरातील परिसरात शुक्रवारी पोलिस गस्त वाढविण्यात आली.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images