Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

ओसाड गाळ्यांचा 'उद्योग'

$
0
0
गंगापूर गावात दहा वर्षांपूर्वी महापालिकेने २० गाळे उभारले आहेत. परंतु गाळ्यांच्या बाजूलाच स्वच्छतागृह असल्याने गावातील व्यापाऱ्यांनी गाळे घेण्यास विरोध दर्शविला होता. यामुळे अजूनही हे गाळे पडून आहेत.

भुजबळांच्या शिक्षण संस्थेत घोटाळा

$
0
0
शैक्षण‌िक अभ्यासक्रमांचे शुल्क ठरव‌िताना मुंबई एज्युकेशन ट्रस्टचे (एमईटी) संचालक छगन भुजबळ व इतर व‌िश्वस्तांनी दोन वर्षांमध्ये आठ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप या संस्थेचे माजी व‌िश्वस्त सुनील कर्वे यांनी केला.

११०० व‌िद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करा

$
0
0
सन २०११- १२ मध्ये मान्यता रद्द करण्यात आलेल्या मेडिकल कॉलेजमधील आयुर्वेद आणि युनानी शाखेच्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे.

आरोग्य व‌िज्ञान व‌िद्यापीठाची परीक्षा

$
0
0
महाराष्ट्र आरोग्य व‌िज्ञान व‌िद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांच्या ह‌िवाळी सत्र परीक्षांना मंगळवारी राज्यभरात सुरुवात झाली. परीक्षेच्या पह‌िल्या द‌िवशी राज्यातील १४५ केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडल्याची माह‌िती व‌िद्यापीठाच्या वतीने देण्यात आली.

'तळवाडे भामेर' भ्रष्टाचारप्रकरणी तत्कालिन चेअरमन, सचिव दोषी

$
0
0
बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर विविध कार्यकारी सेवा सोसायटीत तत्कालिन चेअरमन सुरेश रामदास गायकवाड व सचिव तुकाराम खैरनार यांच्यासह २५ जणांनी संगनमताने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले असून संबंधितांकडून रक्कम वसूल केली जाणार आहे.

‘नाशिक कॅम्पस’बाबतही दिरंगाई

$
0
0
उपकेंद्राऐवजी नाशिक कॅम्पस उभारण्याच्या कामाची सुरूवात सहा महिन्यांपूर्वी मोठ्या उत्साहात झाली. परंतु सहा महिने झाले तरी अद्यापही संबंधित जागेचे भूसंपादनही झालेले नसल्याचे निदर्शनास आले आहे.

कांदाप्रश्नी आंदोलन

$
0
0
कांद्याचे दर घसरल्याने बुधवारी सकाळी ११ वाजता संतप्त शिवसैनिकांनी अचानक सटाणा बसस्टॅण्डसमोर ठिय्या दिला. यावेळी आघाडी सरकारचा विरोधात घोषणा देऊन आंदोलनकर्त्या शिवसैनिकांनी निषेध केला

आदिवासीही नेट कनेक्ट!

$
0
0
विकास आणि आधुनिकतेपासून आदिवासीबांधव कोसो दूर असल्याचे सांगितले जात असले तरी आदिवासी भाग आता संपूर्ण जगाशी नेट कनेक्ट होत असल्याचे दिसून येत आहे. देवळा, कळवणसारख्या आदिवासी तालुक्यात ब्रॉडबँड वापरणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढत असून मोबाईल नेटचाही वापरही वाढत आहे.

दोन दिवसांत १४१ होर्डिंग्ज हटवले

$
0
0
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अवघ्या दोन दिवसांत पंचवटी विभागातील १४१ होर्डिंग्ज हटवले आहेत. हटवण्यात येणाऱ्या होर्डिंगची संख्या पाहिली की, पंचवटीत होर्डिंग लावण्याचे युद्ध सुरू आहे की काय? अशी शंका सर्वसामन्यांच्या मनात उपस्थित होऊ लागली आहे.

‘कॅप्रिहन्स’तील कामगारांचे आंदोलन सुरू

$
0
0
कॅप्र‌िहन्स इंडीया लि. कंपनीतील कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांला निलंबित केल्याने बुधवारी दिवसभर प्रवेशद्वारावर काम बंद आंदोलन केले. दरम्यान कामगार उपायुक्त आर. एस . जाधव यांनी कामगार युनियन पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

जनलक्ष्मी बँकेच्या खातेदारांची गैरसाय

$
0
0
जनलक्ष्मी सहकारी बँकेची जेलरोड शाखा अंतर्गत समस्येमुळे गेल्या दोन आठवड्यांपासून बंद असल्यामुळे खातेदारांचे हाल होत आहे. विशेषतः व्यापारी वर्गाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

बेकायदेशीर फी विरोधात छात्र भारतीची निदर्शने

$
0
0
शहरातील कॉलेजेसमध्ये सरकारच्या न‌ियमांची सर्रासपणे पायमल्ली होत असून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर फी लाटली जाते, सरकारचे न‌िर्देश असतानाही श‌िक्षण विभागाकडून यावर हेतूपुरस्सर न‌ियंत्रण ठेवले जात नाही असे आरोप करीत छात्रभारतीने बुधवारी ज‌िल्हाध‌िकारी कार्यालयासमोर न‌िदर्शने केली.

रस्त्यात चालले १४ कोटी

$
0
0
अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन तडजोड पध्दतीने भूसंपादन करू पाहणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ८० लाख रूपयांचा खर्च १४ कोटी रूपयांपर्यंत पोहचवला असल्याचा गंभीर आरोप स्थायी समितीचे सदस्य अॅड. शिवाजी सहाणे यांनी केला आहे.

‘माय स्टॅम्प’चे दीडशे चाहते

$
0
0
टपाल विभागाने सुरू केलेल्या माय स्टॅम्प योजनेला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तीन दिवसांत दीडशे जणांनी स्वत:च्या फोटोचे स्टॅम्प बनवून घेतले असून हा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतच आहे.

५० बँकांत २४४ कोटी

$
0
0
विविध बँकांमध्ये पैसे पडून असताना महापालिकेला कर्ज उभारावे लागत असल्याने यापुढे महापालिकेच्या मुदत ठेवी मोजक्याच बँकेत ठेवण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.

रस्त्यात चालले १४ कोटी

$
0
0
अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन तडजोड पध्दतीने भूसंपादन करू पाहणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ८० लाख रूपयांचा खर्च १४ कोटी रूपयांपर्यंत पोहचवला असल्याचा गंभीर आरोप स्थायी समितीचे सदस्य अॅड. शिवाजी सहाणे यांनी केला आहे.

सप्तशृंगी गडावर सुविधा नाही

$
0
0
ख्रिसमसच्या सुट्या आणि वर्षअखेर जवळ आल्याने सप्तशृंगीच्या गडावर आता भाविकांचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरू होईल. मात्र तरीही परिसरात अनेक सोयी सुविधांचा अभाव आहे.

अंगणवाड्यांसाठी अवघे २ लाख

$
0
0
महाराष्ट्र सरकारने अंगणवाड्यांसाठी विशेष निधीची तरतूद केली असतांना महिला व बाल विकास विभागामार्फत नाशिक जिल्ह्यातील अंगणवाड्यांसाठी अवघे दोन लाख खर्च करण्यात आले आहेत. तर नंदूरबार, जळगाव या जिल्ह्यात मिळालेले तुटपुंजे अनुदानही खर्च होत नाही, अशी परिस्थिती आहे.

३५० कोटींचे व्यवहार ठप्प

$
0
0
वेतनवाढीच्या मुद्यावर सर्व राष्ट्रीयीकृत आणि काही खासगी बँकांच्या कर्मचारी संघटनांनी बुधवारी एकदिवशीय संप पुकारल्यामुळे दिवसभर बँकांचे कामकाज बंद होते. विविध बँकांच्या जिल्ह्यातील ३५० शाखांमधून सुमारे ३५० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती.

'नोटा'चा प्रचार होणार मोठा

$
0
0
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 'वरीलपैकी कोणालाही मत नाही' म्हणजेच 'नोटा' चा पर्याय निवडणूक यंत्रात समाविष्ट करण्यात आले असल्याने आगामी निवडणूकांचा विचार करता राज्य निवडणूक आयोगाने त्याचा प्रचार सुरू केला आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images