Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पिंपळगावातही 'कॅम्पा कोला'

$
0
0
पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीच्या हद्दीत केवळ बेकायदा बांधण्याचाच उद्योग सक्रीय झालेला नाही तर येथील ग्रामपंचायतीने थेट जिल्हाधिकाऱ्यांच्याही अधिकारावर अतिक्रमण केल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळेच ग्रामपंचायतीने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अधिकारांना डावलून बांधकाम करण्याचे परवाने वाटले आहेत.

भुजबळ लोकसभेवर जाणार?

$
0
0
काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण गरम होण्यास सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, मनसेसह आम आदमी पार्टीमुळे आगामी लोकसभा निवडणूक चौरंगी होणार हे निश्चित असले तरी यात उमेदवार कोण असतील ही सर्वाधिक उत्सुकतेची बाब आहे.

ताण-तणावावर खेळाने मात

$
0
0
ताण-तणावांचा सामना करण्यासाठी खेळ हा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे, असे प्रत‌िपादन महाराष्ट्र आरोग्य व‌िज्ञान व‌िद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरूण जामकर यांनी केले.

एसएमआरके, धूम जमाके!

$
0
0
सौंदर्य आणि व्यक्त‌िमत्त्व यांची सांगड घालत साठ स्पर्धकांमधून श्रेया गायधनी ही व‌िद्यार्थिनी ‘म‌िस एसएमआरके’ ठरली. ‘फर्स्ट रनर अप’ म्हणून मालव‌िका वागळे आण‌ि ‘सेकंड रनरअप’ म्हणून न‌िकिता जोशी यांनी पारितोषिक पटकावले.

शेतक-यांनी घेतली ‘डीपी’ची धास्ती

$
0
0
प्रस्तावित विकास आराखड्यात (डीपी) शेतीवर पडलेल्या आरक्षणामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांचे डोळे नवीन विकास आराखड्याकडे लागले आहेत. डोळ्यांसमोर फुललेली शेती अन् पुढे काय होणार, ही धाकधूक यामुळे शेतकऱ्याच्या मनात डीपीची धास्ती भरल्याची स्थिती नाशिक महापालिका क्षेत्रातील २३ खेड्यांतील शेतकऱ्यांमध्ये पहायला मिळत आहे.

बनावट खाते उघडून ३२ लाखांचा अपहार

$
0
0
नाशिकरोडच्या झुलेलाल नागरी पतसंस्थेत बनावट खाते उघडून ३२ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी बँकेचे संचालक राम साधवाणी व मोहन मुखी यांना कोर्टाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सफाई कामगारांचे ठिय्या आंदोलन

$
0
0
सफाई कामगारांच्या प्रश्नाबाबत महापालिका प्रशासन ठोस भूमिका घेत नसल्याचा आरोप करीत बाल्मिकी, मेघवाळ तसेच मेहतर समाज संघर्ष समितीच्या सफाई कर्मचाऱ्यांनी गुरुवारी आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले.

‘नोटा’चा प्रचार होणार मोठा

$
0
0
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ‘वरीलपैकी कोणालाही मत नाही’ म्हणजेच ‘नोटा’ चा पर्याय निवडणूक यंत्रात समाविष्ट करण्यात आले असल्याने आगामी निवडणूकांचा विचार करता राज्य निवडणूक आयोगाने त्याचा प्रचार सुरू केला आहे.

कर्षण मशिन कारखान्याच्या नोकरभरतीत भ्रष्टाचार

$
0
0
नाशिकरोड येथील रेल्वेचे इंजिन तयार करणाऱ्या कर्षण मशिन कारखान्यात खलाशी पदाची भरती करतांना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून पात्रता नसलेल्या उमेदवारांना भरती केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

‘सृजन’ने द‌िले कौशल्याचे धडे

$
0
0
अभ्यासक्रमातून म‌िळणारे कौशल्य अन् व्यावहारिक जीवन यांची सांगड कशी घालावी, याचा आदर्श ठरणारे अभ्यास प्रकल्प ‘एसएमआरके’च्या व‌िद्यार्थिनींनी सादर केले. न‌िम‌ित्त होते ‘सृजन २०१३’ महोत्सवाचे.

होम‌िओपॅथीक डॉक्टरांचे आंदोलन

$
0
0
गेल्या तीस वर्षांपासून प्रलंब‌ित असणाऱ्या मागण्यांसाठी होमिओपॅथी डॉक्टरांनी नागपूर येथे उपोषणाला बसले आहेत. मात्र मंत्र‌िमंडळाकडून डॉक्टरांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या न‌िषेधार्थ ज‌िल्हाध‌िकारी कार्यालयासमोर नाशिक होम‌िओपॅथीक डॉक्टरांच्या संघटनेने आंदोलन केले.

धुळखात पडलेत फुलेनगरमधील गाळे

$
0
0
महापालिकेने पेठरोडच्या मुख्य रस्त्यावर फुलेनगर येथे उभारलेस्हक पालिका बाजाराकडे व्यावसायिकांनी पाठ फिरवल्याले २० गाळ्यांपैकी १५ गाळे पडून आहेत. फुलेनगर हा कामगार वस्तीचा भाग असल्याने महापालिकेने व्यावसायिकांना नाममात्र दरात गाळे द्यावेत अशी मागणी केली जात आहे.

नाशिककर अनुभवणार तालवैभव

$
0
0
पवार तबला अकादमीतर्फे यंदाही पं. भानुदासजी पवार स्मृती संगीत समारोह २०१३ आयोज‌ित केला असून त्यानिमित्त प्रा. अविराज तायडे यांचे शिष्य व नाशिकचे ख्यातनाम गायक आशिष रानडे यांचे गायन व पं. किरण देशपांडे व पं. सुरेशदादा तळवलकर यांचे शिष्य सुप्रीत देशपांडे यांचे एकल तबला वादन होणार आहे.

साधुग्रामच्या जागेसंदर्भांत महापौरांची भूमिका

$
0
0
आगामी सिहंस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राम निर्माण करण्यासाठी संपादीत होणाऱ्या जागेबाबत शेतकऱ्यांना बोनस टीडीआर (विकास हस्तांतरण हक्क) मिळाला पाहिजे अशी भूमिका महापौर अॅड. यतीन वाघ यांनी घेतली आहे.

दोनशे रूपये द्या; पेन्शन घ्या

$
0
0
नाशिकरोड येथील काही झोपडपट्ट्यामध्ये धुणीभांडी करणाऱ्या महिलांकडून पेन्शन योजनेच्या नावाखाली काही संस्थांचे प्रतिनिधी पैसे उकळत असून अनेक महिला या प्रलोभनाला बळी पडत आहेत. फॉर्मचे पैसे देऊनही हातात काही न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आहे.

भूमि अभिलेख कार्यालय असून अडचण नसून खोळंबा

$
0
0
कळवण तालुक्यातील मानूर येथील भूमी अभिलेख कार्यालय असून अडचण नसून खोळंबा ठरत आहे. अधिकारी कुठे आहेत हे कर्मचाऱ्यांनार्यांना माहिती नाही आणि कर्मचारी काय करतात हे अधिकाऱ्यांना माहिती नाही, असा रामभरोसे कारभार या कार्यालयात सुरू आहे.

केरसाने येथे डेंग्यूने तरुणीचा मृत्यू

$
0
0
बागलाण तालुक्यातील केरसाने येथे डेंग्यूने एका तरुणीचा बळी घेतला. बुधवारी ही घटना घडली. निकिता मोरे ही चार दिवसापूर्वी तापाने फणफणली होती. त्यामुळे तिला उपचारासाठी ताहाराबाद येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.

शाळेमधील वाढत्या शुल्काला पालकांचा विरोध

$
0
0
शहरातील वाढत्या विकासाबरोबरच नागरिकांच्या राहणीमानात बदल होताना दिसतो. त्यात भाजीविक्रेता असो किंवा रिक्षाचालक प्रत्येकाला आपला मुलगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच शिकला पाहिजे अशी इच्छा असते. परंतु दिवसेंदिवस शाळेची फी वाढत आहे. वाढत्या शुल्क वाढीला पालक आता विरोध करू लागले आहेत.

एलईडीवरील स्थगिती कायम

$
0
0
एलईडी प्रकरणी गुरूवारी हायकोर्टात सुनावणी झाली नाही. यापूर्वी हायकोर्टाने स्थगिती दिलेली असल्याने हा निर्णय पुढील सुनावणीपर्यंत कायम राहणार आहे. महापालिका प्रशासनाने एलईडी फिटींग्जबाबत संबंधित ठेकेदाराला वर्कऑर्डर दिली असून या खटल्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रलंबित अर्जाची माहिती जाहीर करा

$
0
0
नवीन गॅस कनेक्शनसाठी किंवा नाव बदलण्यासाठी गॅस कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात अर्ज येत असून ते वेळेत निकाली निघत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे किती अर्ज प्रलंबित आहेत यासंबंधीची माहिती दर्शविणारा फलक गॅस एजन्सींच्या बाहेर लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>