Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘ती’ निवड कायदेशीरच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सावाना नागरिक शिक्षक गौरव समितीच्या अध्यक्षपदी शिक्षण क्षेत्रातील रमेश देशमुख यांची निवड बेकायदेशीर असल्याच्या सावानाचे माजी कार्यवाह मिल‌िंद जहागिरदार यांच्या प्रतिक्रियेला प्रमुख कार्यवाह श्रीकांत बेणी यांनी उत्तर पाठवले असून, ही निवड कायदेशीरच असल्याचे पत्रात म्हटले आहे.

पत्रात नमूद केले आहे की, सावाना नागरिक शिक्षक गौरव समितीच्या बैठकीमध्ये विषय क्रमांक ६ अन्वये समितीची नियमावली मंजूर करण्यात आली आहे. या नियमावलीत समितीच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती करावयाची याचा निर्णय सावाना कार्यकारी मंडळाने घ्यावा, असे नमूद करण्यात आले आहे. २०१२ पासून ही नियमावली लागू होती. या नियमावलीनुसार आपण काम केलेले नाही. पाच वर्षांच्या कार्यकालात या नियमावलीची अंमलबजावणी केल्याचे आढळून येत नाही. नागरी समिती कामासंदर्भात सदस्य कोण आहेत, बैठकीसाठी कुणाला बोलवायचे यासंदर्भात भोंगळ कारभार असल्याने माझ्या कार्यकालात कामकाजाची निश्चित दिशा ठरविण्यात आली. त्यानुसार आपण काम केलेले नाही. किंवा नियमावली रद्दही केलेली नाही. मी केलेल्या नियमावलीनुसार रमेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली असून इतर निवडीचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत. रमेश देशमुख यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे म्हणत असताना प्रा. रा. शं. गोऱ्हे यांची २०१५ च्या सावाना नागरिक शिक्षक समितीच्या अध्यक्षपदी निवड केल्याचे इतिवृत्तात कोठेही पहायला मिळत नाही. या संदर्भात कार्यकारी मंडळाची बैठक झाल्याचेही इतिवृत्तात नाही. त्यामुळे त्यांची निवड कशी झाली याचा खुलासा आपण करावा. इतकेच नाही तर ३ सप्टेंबर २०१५ च्या समितीच्या बैठकीत मागील वर्षांचे हिशेब मंजूर केल्याचेदेखील आढळून येत नाही.

सावानाचे विद्यमान कार्यकारी मंडळ पूर्वी झालेल्या चुका विचारात घेऊन काळजीपूर्वक काम करून घटनेतील नियमांचे, शासकीय नियमांचे कोणतेही उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेऊन कामकाज करीत आहे. त्यामुळे आपण संस्थेच्या कामात कितीही अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, तरी त्यावर मात करून संस्थेचे प्रलंबित सर्व प्रश्न सोडविण्याचा कार्यकारी मंडळाचा निर्धार आहे, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

गायधनी यांनाही उत्तर

न्यायालयाने बेणी यांना समन्स बजावल्याचे कारण सांगत श्रीकांत बेणी यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सुरेश गायधनी यांनी सावाना अध्यक्षांकडे केली होती. त्याला बेणी यांनी पत्राने उत्तर दिले आहे. माझ्यापर्यंत समन्स पोहचलेच नसल्याने त्याविषयी वृथा गवगवा करण्याचे कारण काय, असे पत्रात विचारण्यात आले आहे. मंडळाचा सभासद घटनेतील एखाद्या नियमाचे उल्लंघन करू लागल्याचे निदर्शनास आल्यास कार्यकारी मंडळाचे अगर त्या सभासदाचे काम थांबवून ठेवण्याचा अधिकार संस्थेच्या अध्यक्षांना आहे. तेव्हा मी कोणत्या नियमाचे पालन केले नाही हे पाहून अध्यक्षांना कळवावे, असेही पत्रात म्हटले आहे. अधिकार नसताना आपण नाट्यगृह सचिव या नात्याने प्रशांत जुन्नरे यांच्याकडून रोख रक्कम स्वीकारली व त्याच्या पावत्या जुन्नरे यांना दिल्या नाही, याची तक्रार सावानात दाखल झाली होती. प. सा. नाट्ययज्ञ उपक्रमातील हिशेबाचा गोंधळ अद्याप मिटलेला नाही. त्यामुळे आपण इतर विषयावर बोलू नये असेही पत्रात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगाव शहर हागणदारीमुक्त

$
0
0

राज्य समितीचा पाहणी दौरा, अहवालानुसार घोषणा; पंधरा कोटींचे अनुदान खर्च

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत मालेगाव महापालिकेकडून शहर हागणदारीमुक्त मोहीम हाती घेण्यात आली होती. पालिका प्रशासनाच्या या मोहिमेला यश आले आहे. राज्य समितीच्या पाहणी दौरा व अहवालानुसार राज्य शासनाने मालेगाव महानगरपालिका हागणदारीमुक्त घोषित केली असल्याची माहिती महापालिका आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली.

महापालिका सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत आयुक्तांनी वरील माहिती दिली. गेल्या दोन महिन्यांपासून शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी मनपा प्रशासनाकडून युद्धपातळीवर कार्यवाही सुरू होती. शहर हागणदारीमुक्त झाल्याचा अहवाल आयुक्त संगीता धायगुडे यांनी राज्य शासनास पाठविल्यानंतर सोमवारी सायंकाळी राज्यस्तरीय पाच सदस्यीय समिती पाहणीसाठी शहरात दाखल झाली होती.

या समितीने सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी पाहणीदौरा करून आपला अहवाल राज्य शासनाकडे पाठविला होता. या अहवालानुसार नगरविकास विभागाचे उपसचिव सुधाकर बोबडे यांनी मालेगाव शहर हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर केले.

मालेगाव शहर हागणदारीमुक्त करण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे होते. मात्र नागरिकांचे सहकार्य व प्रशासनाने घेतलेली मेहनत यामुळेच शहर हागणदारीमुक्त करण्यात यश आले. यासाठी महापौर रशीद शेख, उपमहापौर सखाराम घोडके, सर्व नगरसवेक, नागरिक, पालिका प्रशासन, पोलिस प्रशासन, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय यांचे आयुक्तांनी आभार मानले. तसेच, शहरात राबविण्यात आलेल्या हागणदारीमुक्त मोहिमेबद्दल यावेळी त्यांनी प्रेझेंटेशन सादर केले. हागणदारीमुक्त करण्यात आलेली ठिकाणे कायमस्वरूपी हागणदारीमुक्त राहावित यासाठी त्या ठिकाणी वृक्षारोपण, क्रीडांगण, उद्याने अशा उपाययोजना भविष्यात करण्यात येणार आहेत.

स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाचे अभिजीत पवार यांनी प्रेझेंटेशनद्वारे राबविण्यात आलेल्या मोहिमेची सविस्तर माहिती दिली. यावेळी उपायुक्त कामारुद्दीन शेख, विलास गोसावी, अंबादास गरकल, राजू खैरनार, नगरसचिव राजेश धसे आदींसह सर्व विभागप्रमुख, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

केंद्राला अहवाल पाठविणार

राज्यस्तरीय समितीच्या पाहणीदौऱ्यानंतर केंद्र शासनास याबाबत राज्य शासनाला अहवाल सादर करणार आहे. लवकरच केंद्राची क्यूसीआय समिती मालेगाव शहरात पाहणीसाठी येणार असून, या क्यूसीआय समितीद्वारेदेखील शहर हागणदारीमुक्त घोषित व्हावे, यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील राहणार असल्याचे आयुक्त धायगुडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुम्ही जेनेरिक औषधंच घेताय ना!

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

‘आमीर आणि किरण, तुम्हाला स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे कळले. तुमची काळजी वाटू लागली. महापालिकेच्या अनक हॉस्प‌िटल्समध्ये बघितले पण तुम्ही दिसून आले नाहीत. तुम्ही एका सेव्हन स्टार हॉस्प‌िटलमध्ये उपचार घेत आहात, हे समजलं. हे सगळं मान्य आहे, पण तुम्ही या दवाखान्यात जेनेरिक औषधेच घेत आहात ना?’ असा सवाल करत मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान व त्याची पत्नी किरण रावच्या आजारपणावर भाष्य करणारी खोचक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

आमीर आणि त्याची पत्नी किरण यांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. उपचारासाठी दोघे एका मल्ट‌िस्पेशालिटी हॉस्प‌िटलमध्ये भरती झाले आहेत. समाजातील ज्वलंत विषयांवर कार्य करणारा म्हणून आमीर फेमस आहे. ‘सत्यमेव जयते’ म्हणत आमीरने अनेक चुकीच्या गोष्टी जगासमोर आणल्या आहेत. अनेकदा तो शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहीला आहे. शिवाय दुष्काळावर उपाय योजना करण्यासाठी तो पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून चांगले करत आहे. सरकारी दवाखान्यांमध्ये उपचार घ्या, असे त्याने सत्यमेव जयतेसारख्या कार्यक्रमातून अनेकदा सांगितले आहे. विशेष म्हणजे, मोठ्या हॉस्पिटल्समध्ये ब्रॅण्डेड कंपन्यांची औषधे विकली जातात. या कंपन्यांचे डॉक्टरांशी लागेबंधे असतात. या प्रकरणाचा खुलासा आमीरने त्याच्या ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमात केला होता. ब्रॅण्डेड कंपन्यांची औषधे आणि डॉक्टरांचे साटेलोटे याचे चित्रीकरण या कार्यक्रमात दाखवण्यात आले होते. असे असूनही आमीर आणि किरण मल्ट‌िस्पेशालिटी हॉस्प‌िटलमध्ये उपचारासाठी का दाखल झाले, असा सवाल नेट‌िझन्स करत आहेत. आमीरचा निर्णय चुकला असल्याचं म्हणत या प्रकरणावर मिश्क‌िल टीका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘ब्रॅण्डेड औषध कंपन्यांचे डॉक्टरांशी साटेलोटे असते. याचा पर्दाफाश तुम्ही केला आहे. आता हे खरं की खोटं तुम्हाला माहीत. पण हे खरं असेल तर निदान तुम्ही तरी जेनेरिक औषधे घ्यायला हवीत.’ असं नेट‌िझन्स आमीर व किरणला सुचवत आहेत. सोबतच ‘आमीर व किरण, तुम्ही आजारपणात जेनेरिक औषधे घेतली नाहीत. याचा अर्थ, तुम्ही तुमचा शो टीआरपी आणि कमर्शिअल फायद्यासाठी केला, असं आम्हाला वाटेल. सर्व जनतेला तुम्ही खरे आहात, हे पटवून द्या. अन्यथा अगोदरच मेडिकल फिल्डबाबत लोकांचा संभ्रम आणखी वाढेल.’ असा उपदेशही नेट‌िझन्स आपल्या पोस्टमधून करत आहेत.

मुक्तीसाठी नवस करू नका

विशेष म्हणजे, ‘तुम्ही स्वतः जेनेरिक औषधे आजारपणात खा. शक्य असल्यास कस्तुरबा हॉस्प‌िटलमध्ये उपचारासाठी दाखल व्हा. आणि हो, तुमच्या एका सिनेमात दाखवल्याप्रमाणे कोणत्याही देवाला आजारपणातून मुक्तीसाठी नवस मागू नका. आम्ही नवस मागू तुमच्यासाठी.’ या शब्दांत आमीरला त्याच्या कार्याची आठवण करुन दिली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. गस्तींचे नाशिकशी जवळचे नाते

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

समरसता साहित्य परिषदेचे अध्यक्ष भीमराव गस्ती यांचे कोल्हापूर येथे निधन झाले. गस्ती यांचा नाशिकशी अगदी जवळून संपर्क होता. ते नेहमीच नाशिकला येत आणि येथील समरसता साहित्य परिषदेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत असत.

नाशिक येथे २०११ मध्ये झालेल्या १३ व्या समरसता साहित्य संमेलनाप्रसंगी त्यांची नाशिककरांना विशेष ओळख झालेली होती. कर्नाटक सीमेवरील बेळगाव जवळील यमुनापूर हे त्यांचे मूळ गाव व तेच कार्यक्षेत्र होते. नाशिकमध्ये एचपीटी कॉलेजला वार्षिक स्नेहसंमेलनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते आले होते. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा मानाचा गोदागौरव पुरस्कार त्यांना त्यांच्या कार्याची पावती म्हणून मिळालेला होता. एचपीटीचे माजी प्राचार्य डॉ. भास्कर गिरीधारी यांनी डॉ. भीमराव गस्तींच्या कार्याचा आलेख स्थानिक वर्तमानपत्रात लेख लिहून नाशिककरांसाठी सादर केला होता. डॉ. भीमराव गस्ती यांना कर्नाटक सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेऊन एक लाख रुपये पुरस्कार देखील प्रदान केलेला होता. त्यांनी देवदासी नाशिक येथे २०११ साली झालेल्या संमेलनातील अभिरूप न्यायालयात त्यांची न्यायाधिशाची भूमिका योग्य न्याय देऊन गेली.

सामाजिक समरसता मंचचे कुशल मार्गदर्शन हरपले आहेत. एमएस्सी फर्स्ट क्लास असतानाही शास्त्रज्ञ होण्याची संधी त्यागून त्यांनी समाजासाठी काम केले. देवदासींना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.

- नाना बच्छाव, जिल्हा कार्यवाह, साहित्य समरसता मंच

सामाजिक समरसता मंचचे कुशल मार्गदर्शन हरपले आहेत. एमएस्सी फर्स्ट क्लास असतानाही शास्त्रज्ञ होण्याची संधी त्यागून त्यांनी समाजासाठी काम केले. देवदासींना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.

- नाना बच्छाव, जिल्हा कार्यवाह, साहित्य समरसता मंच

उच्चपदस्थ नोकरी सोडून केवळ आपल्या रामोशी समाजातील बांधवांकरिता, त्यांच्या सामाजिक सुधारणेकरिता त्याग करणारी व्यक्ती म्हणजे डॉ. भीमराव गस्ती. ते आज केवळ रामोशी समाजालाच नाही तर भटक्या विमुक्तांना पोरके करून गेले आहेत. - डॉ. भास्कर म्हरसाळे, माजी निमंत्रक, समरसता साहित्य मंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रावणच तापलाय

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ऐन श्रावण महिन्यातच नाशिककरांना ऑक्टोबर हीटचा अनुभव येत आहे. गेल्या काही दिवसांत कमाल आणि किमान तापमान वाढल्याने उकाडा सहन करण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे. तसेच, कमाल आणि किमान तापमानातील अंतर अवघे ६ ते ८ अंश सेल्सिअस इतके कमी असल्याने पावसाळ्यातच शहरवासीय उष्म्याने हैराण झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील कमाल तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे, तर किमान तापमान हे २१ ते २२ अंश सेल्सिअस आहे. ऐन श्रावण महिन्यात कमाल आणि किमान तापमानामध्ये ६ ते ८ अंश सेल्सिअसचा फरक राहत असल्याने शहरात उकाडा वाढला आहे. तापमानातील या फरकाचा परिणाम नाशिककरांच्या आरोग्यावर झाला आहे. म्हणूनच साथीचे आजार बळावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. स्वाइन फ्लू, डेंग्यू, मलेरिया, फ्लू यांसारख्या तापाच्या आजारांनी विळखा घट्ट केला आहे. ऐन पावसाळ्यातच दिवसा आणि रात्री उकाडा सहन करावा लागल्याने ऑक्टोबर हीट श्रावणातच असल्याचा भास नाशिककरांना होत आहे.


साथीचे आजार वाढले

वातावरणातील अचानक झालेल्या या बदलांचा मोठा परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. सर्दी, खोकला आणि ताप याचा प्रादुर्भाव अधिक असल्याचे निदर्शनास येत आहे. लहान मुले, गर्भवती महिला आणि वृद्ध यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिका, सरकारी आणि खासगी हॉस्पिटल्समध्ये तापाच्या पेशंटसची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.


पावसाची विश्रांती

जुलैच्या अखेरीस दमदार हजेरी लावलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. शहर परिसरातील अस्वच्छता, ठिकठिकाणी साचलेले पाणी आणि त्यातच तपमानात झालेली वाढ या साऱ्यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पावसाचे आगमन ऑगस्टच्या अखेरीस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे महिना अखेरीपर्यंत नाशिककरांना अशा त्रासदायक हवामानाचा मुकाबला करावा लागणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


दुर्लक्ष करू नका

सर्दी, ताप किंवा खोकला याचा त्रास सुरू झाला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तातडीने डॉक्टरांकडे तपासणी करावी आणि योग्य ते वैद्यकीय उपचार घ्यावेत, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. ये-जा करणारा तापही दुर्लक्षिण्यासारखा नाही. तसेच, मानवी प्रतिकारक्षमतेवरही याचा परिणाम होत असल्याचे वैद्यक क्षेत्रातील व्यक्तींचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक मोक्का कोर्टाचा भार कमी करा!

$
0
0

हायकोर्टाचे जिल्हा कोर्टाला आदेश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विशेष मोक्का कोर्टाकडे इतर खटल्यांचे काम सोपवले जाते. मोक्का कोर्टावर कामाचा ताण वाढल्याने केसेस प्रलंबित होण्याचे प्रमाण वाढले असून, या सर्वांचा आढावा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिशांनी घ्यावा, असे मुंबई हायकोर्टने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल गुन्ह्यांचे खटले विशेष मोक्का कोर्टात चालवले जातात. नाशिक शहर, नाशिक ग्रामीण, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार अशा सहा ठिकाणांवरील खटले जिल्हा कोर्टांतर्गत येणाऱ्या दोन विशेष कोर्टात चालवले जातात. अशाच प्रकरणातील संपत नामदेव घोरपडे आणि ज्ञानेश्वर दशरथ घुले या दोघा संशयितांनी मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी सुरू असताना न्यायमूर्ती टी‍. व्ही. नलावडे यांनी मोक्का कोर्टावरील ताण कमी करण्याचे आदेश दिले.

दोनपैकी एक कोर्ट सुरू नसल्याने त्याचीही तजवीज करून विशेष कोर्टाकडे दिले जाणारे इतर खटले कमी करावेत, असे हायकोर्टाने स्पष्ट केले. याबाबत बोलताना सूत्रांनी सांगितले, की आजमितीस विशेष कोर्टाकडे १७ केसेस आहेत. मात्र या कोर्टात खटल्यांची सातत्याने सुनावणी होत नाही. अनेकदा बचाव पक्षाकडूनच पुढील तारखेची मागणी केली जाते. मोक्का कोर्टाचे कोणतेही काम नसेल त्यावेळी इतर खटले सुनावणीसाठी पाठवले जातात. मात्र, हे प्रमाण खूपच कमी असल्याचा दावा जिल्हा कोर्टातील सूत्रांनी केला.

विशेष कोर्टावर ताण कमीच!

विशेष कोर्टाकडे १५ ते १६ केसेस असून, २०१४-१४ मधील सर्व केसेसची नियमित सुनावणी होत आहे. एवढेच नव्हे तर २०१६ मधील काही केसेसची सुनावणी सुरू झाली असून, ही बाब निश्चितच कामाचा ताण नसल्याचे स्पष्ट करते, असे संबंधितांने स्पष्ट केले. मोक्का केसेसमध्ये ठोस पुरावे असतात. त्यामुळे विशेष कोर्टात जामीन मंजूर होत नाही. आपल्याकडे दोन कोर्ट असून, एका कोर्टाचे कामकाज काही दिवस बंद होते. मात्र, १५ दिवसांपासून तेही सुरळीत झाले असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्डेदुरुस्तीला लाभेना मुहूर्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शहर परिसरासह शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गाबरोबरच सर्व्हिसरोडवरही खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या भागात रस्त्‍यांवर खड्डे आहेत, की खड्ड्यांमध्ये रस्ते आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. इंदिरानगर भागातदेखील अशीच स्थिती असून, सध्या पावसाची उघडीप असल्याने खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातून होत आहे.

शहरातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था ही सर्वश्रुत आहे. त्यामुळे किमान शहरातून जाणारा महामार्ग तरी चांगल्या पद्धतीचा असावा, अशी अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. मात्र, त्याचीही वाट लागल्याची स्थिती आहे. महामार्गावर उड्डाणपूल उभारल्यानंतर या महामार्गाचे व सर्व्हिसरोडचे नूतनीकरण करण्यात आले होते. त्यामुळे या रस्त्यांवर वाहतुकीचे प्रमाणही वाढले. मात्र, आता या रस्त्यांवर खड्डेच खड्डे असल्याने वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी रस्ता खचत चालल्याची स्थिती निर्माण झालेली असून, काही दिवसांत अशा ठिकाणांवरदेखील आणखी खड्डे निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

अवजड वाहनांची वर्दळ

शहरातील रस्त्यांपेक्षा महामार्गावरून किंवा लगतच्या सर्व्हिसरोडवरून कायमच अवजड वाहने जात असतात. त्यामुळे या रस्त्यांवर तरी खड्डे नसावेत, अशी अपेक्षा वाहनचालकांकडून व्यक्‍त होत असते. मात्र, शहरात त्याबाबतची स्थिती गंभीरच असल्याचे दिसून येत आहे. महामार्गावर व सर्व्हिसरोडवर असलेल्या खड्ड्यांवरून वाहने चालविणे अत्यंत जिकिरीचे झाले असून, हे खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.

पंचवटीत वाहनचालक त्रस्त

आडगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील के. के. वाघ कॉलेजसमोर, मीनाताई ठाकरे स्टेडियम, औरंगाबाद नाका येथील सर्व्हिसरोड या ठिकाणीदेखील मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहे. रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यांचा अंदाजच येत नसल्याने खड्ड्यात वाहने आदळून वाहनांचे नुकसान होण्यासह वाहनचालकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. औरंगाबाद नाका, मीनाताई ठाकरे स्टेडियम या ठिकाणी ड्रेनेज चेंबरदेखील छोटे-मोठे व रस्त्याच्या मधोमध असल्यामुळे वाहनचालकांना अडथळा होत आहे, तर काही ठिकाणी चेंबरदेखील तुटलेले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. या परिसरातील खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.


मिनिटभरावर खड्डे!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मिळून शेकडो लहान-मोठे खड्डे दिसून येत असून, या रस्त्यावर सुमारे अर्धा ते एक मिनिट अंतर जात नाही तोपर्यंत दुसरा खड्डा तयारच असतो, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या खड्ड्यांमधून मार्ग काढताना किरकोळ अपघात वाढले असून, मोठी दुर्घटना झाल्यावरच यंत्रणेला जाग येईल का, असा सवाल त्रस्त नागरिकांकडून केला जात आहे. काही ठिकाणचे खड्डे कसेतरी बुजविण्यात आलेले असून, रस्त्याचा मोठा भाग अद्यापही खड्डेमयच असल्याचे चित्र आहे. येथील रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामदास स्वामींच्या स्मारकाचा संकल्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समर्थ रामदास स्वामींच्या टाकळी येथील तपोभूमीची ओळख भारतभर व्हावी, समर्थांची कीर्ती नवीन पिढीपर्यंत पोहोचावी या उद्देशाने टाकळीतील नदीपात्रात कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याच्या धर्तीवर संत रामदास स्वामींचा पूर्णाकृती पुतळा अाणि मारुती देवस्थान उभारण्याचा संकल्प राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी ट्रस्टतर्फे करण्यात आला आहे. समर्थांच्या कर्मभूमीत त्यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी भाविकांकडून होत असून, त्यासाठी शासकीय परवानगी मिळविण्याचे प्रयत्न सध्या सुरू अाहेत.

मुख्यमंत्र्यांसाेबत चर्चा

ट्रस्टतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी, तसेच बांधकाम व पर्यटन विभाग यांच्यासोबतही चर्चा सुरू आहे. सरकारतर्फे गेल्याच वर्षी टाकळी मठास महाराष्ट्र पर्यटन विभागाचा ‘क’ दर्जा देण्यात आला आहे. पुतळा आणि स्मारकाच्या कामाला परवानगी मिळाल्यास येथील पर्यटनाला व रोजगारालादेखील चालना मिळणार असून, नाशिकच्या विकासास हातभार लागणार असल्याची भावना भाविकांकडून व्यक्त केली जात आहे.

बलोपासनेचे केंद्र म्हणूनही ओळख

समर्थ इसवी सन १६२0 ते १६३३ दरम्यान टाकळी गावात राहिले होते. येथेच त्यांनी तपश्चर्या व कठोर साधना केली. गोदावरी-नंदिनीच्या संगमात उभे राहून जप करून त्यांनी मानसिक आणि शारीरिक शक्तीचा विकास साधला. तरुणांनी शरीर कसे घडवावे याचे मार्गदर्शन केले. त्यामुळे टाकळी बलोपासनेचे केंद्र म्हणूनही ओळखले जाते. ट्रस्टतर्फे येथील गोदावरी-नंदिनीच्या संगमस्थानी पुलाच्या पश्चिमेला नदीपात्रात खडकावर समर्थांचा सूर्याला अर्घ्य देतानाचा पुतळा उभारणे आणि स्मारक करणे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

--

नैसर्गिक बाबी अनुकूल

येथील अभिनव स्मारकासंदर्भात लागणाऱ्या विविध बाबींची पूर्तता करण्याचे काम सध्या सुरू अाहे. पाण्याचा प्रवाह मोजणे, पूर आल्यास स्थिती काय असेल, नदीपात्रातील संबंधित ठिकाण पुतळा उभा करण्याच्या क्षमतेचे आहे की नाही आदी बाबी तपासण्यात आल्या असून, नैसर्गिक बाबींची अडचण नसल्याचे आढळून आले आहे. अगदी भूकंपाचे धक्केही सहन करू शकेल अशा क्षमतेचा दगड येथे असून, आता शासनाने याबाबत परवानगी द्यावी आणि हे काम लवकरात सुरू करावे, अशी इच्छा भाविकांमार्फत व्यक्त करण्यात येत आहे.

....

समर्थांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारल्यास ते सहज शक्य होईल. हा अत्यंत चांगला उपक्रम असून, त्यासाठी शासनाने लवकरात परवानगी द्यावी

-वैभव क्षीरसागर

--

गेल्या ३५ वर्षांपासून मी मठात येते. रामदास स्वामींचे स्मारक येथे उभारले जाणार हे ऐकून खूप आनंद झाला. तसे झाल्यास आपल्या गौरवशाली इतिहासाचे जतन होण्यास मदतच होणार आहे.

-प्राजक्ता जोशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिखरेवाडीत १० खेळांची १२ मैदाने!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

शिखरेवाडी येथील मैदानावर दहा खेळांची बारा मैदाने साकारण्यात येत आहेत. सध्या या कामास गती मिळाली असून, क्रिकेटसाठी दोन पिच व बास्केटबॉल, व्हॉलीबॉल व खो-खो या खेळांच्या मैदानांची कामे पूर्ण झाली आहेत. येत्या दिवाळीपर्यंत या ठिकाणची मैदाने खेळाडूंसाठी उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने क्रीडाप्रेमींची गैरसोय दूर होणार आहे.

शिखरेवाडी येथे महापालिकेचे मोठे मैदान आहे. मात्र, या मैदानावर कोणत्याही खेळासाठी अद्ययावत सोयी-सुविधांनी युक्त असे मैदान नाही. याशिवाय या मैदानावरील पाणी, सपाटीकरण, पथदीप आदींसंदर्भातील समस्यांनी नागरिक व खेळाडू त्रस्त झाले होते. येथील समस्यांप्रश्नी नगरसेवक संभाजी मोरुस्कर यांनी आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार आमदार सानप यांनी सरकारकडून एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामासाठी महापालिकेकडूनही एक कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.

जॉगिंग ट्रॅकचीही सुधारणा

दोन कोटी रुपयांच्या निधीतून शिखरेवाडी मैदानावर दहा खेळांची बारा अद्ययावत मैदाने व इतर मूलभूत सोयी-सुविधा उभारल्या जात आहेत. त्यात कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, टेनिस कोर्ट, क्रिकेट, नेट क्रिकेट, बास्केटबॉल, फुटबॉल या सांघिक खेळांसह गोळाफेक व लांब उडी या मैदानी खेळांच्या मैदानांचा समावेश आहे. कबड्डी व व्हॉलीबॉलची प्रत्येकी दोन मैदाने उभारण्यात येणार आहेत. याशिवाय जॉगिंग ट्रॅकचीही सुधारणा केली जाणार आहे. चिल्ड्रन्स प्ले एरिया, ग्रीन जिम व स्केटिंग एरिया या सुविधा अगोदरच उपलब्ध आहेत.


सपाटीकरण सुरू

शिखरेवाडी मैदानाच्या सपाटीकरणाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. सपाटीकरणामुळे येथे क्रिकेटसह फुटबॉलसारख्या खेळांना आवश्यक असणारी मोठी अद्ययावत मैदाने पूर्ण होणार आहेत. इतर मैदानांची कामेही लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुदतीच्या आत या मैदानांची कामे झाल्यास येत्या दिवाळीपर्यंत येथील विविध खेळांची अद्ययावत मैदाने क्रीडाप्रेमींसाठी उपलब्ध होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नरके पुन्हा जिल्ह्यातच

$
0
0

२००३ पासून नाशकातच होतेय पोस्टिंग

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पार्टी विथ डिफरन्स अशी शेखी मिरविणाऱ्या भाजप सरकारने महसूलमधील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतीत काँग्रेस आघाडीचाच कित्ता गिरविला आहे. दीडच वर्षांपूर्वी जिल्हा पुरवठा अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारणाऱ्या सरिता नरके यांची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच मुद्रांक शुल्क उपमहानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, २००३पासून नरके या नाशिक जिल्ह्यातच आहेत. तसेच, तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला नसताना आणि जिल्ह्यात रेशन दुकानदारांच्या संपामुळे पुरवठा विभागाची घडी विस्कटण्याची चिन्हे असताना नरके यांच्यावर भाजप सरकार एवढे मेहेरबान का असा सवाल उपस्थ‌ति होत आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून नरके यांनी फेब्रुवारी २०१६ च्या पहिल्या आठवड्यात पदभार स्वीकारला. ८ ऑगस्ट २०१७ रोजी हा पदभार स्वीकारून बरोबर दीड वर्ष पूर्ण झाले. तोच राज्य सरकारकडून त्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच मुद्रांक नोंदणी शुल्क उपमहानिरीक्षक म्हणून धनंजय निकम कार्यरत होते. महिनाभरापूर्वीच त्यांची शिर्डी येथे बदली झाली असून, त्यांच्या रिक्त जागेवर नरके यांची वर्णी लागली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी पदावर रूजू होण्यापूर्वी नरके नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकासच्या (म्हाडा) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. राज्याच्या महसूल विभागात डिसेंबर २००२ मध्ये नरके यांनी कामास सुरुवात केली. नगर जिल्ह्यात प्रोबेशनरी उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी अवघे पाच महिने काम पाहिले. त्यानंतर त्यांना १३ मे २००५ पासून नाशिक जिल्ह्यात देवळा तालुक्यात तहसीलदार म्हणून नियुक्ती देण्यात आली. तेव्हापासून आजतागायत नरके नाशिकमध्येच व‌वििध पदांवर कार्यरत राहिल्या आहेत.

आधार सिडिंगमध्ये राज्यात पिछाडीवर असलेल्या नाशिक पुरवठा विभागाला त्यांनी पहिल्या क्रमांकावर आणले. पुरवठा विभागाचे कामकाज गतिमान करण्यासाठी त्यांनी कार्यप्रणालीत अनेक बदल केले असून, त्यास यशही येत आहे. निकम यांच्या बदलीनंतरच त्यांनी मुद्रांक शुल्क उपमहानिरीक्षक या पदावर नियुक्तीसाठी प‍्रयत्न सुरू केल्याची महसूलच्या वर्तुळात चर्चा आहे. गेल्या १४ वर्षांपासून नरके यांना सातत्याने नाशिकमध्ये वेगवेगळ्या पदांवर नियुक्ती मिळाली असून, अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता नसल्याने भाजपचा पार्टी विथ डिफरन्सेसचा नारा फोल ठरू लागला आहे.

असा आहे कार्यकाल

उपविभागीय अधिकारी इगतपुरी (२००३-०४), विशेष भूसंपादन अधिकारी दुष्काळ क्र. २ (जून २००४ ते मे २००७), उपजिल्हा निवडणूक अधिकारी नाशिक (मे २००७ ते जून २०११), रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी (जून २०११ ते मे २०१२), उपविभागीय अधिकारी निफाड (मे २०१२ ते ऑगस्ट २०१३) असा त्यांचा यापूर्वीचा कार्यकाळ राहिला आहे. २७ ऑगस्ट २०१३ पासून ६ फेब्रुवारी २०१६ पर्यंत त्यांच्याकडे नाशिकमध्येच म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी होती. त्यानंतर त्या जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून रूजू झाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंग्रजी तासिका कपातीने गुरुजी नाराज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने चालू शैक्षणिक वर्षापासून शालेय विषयांच्या तासिकांत मोठे बदल केल्याने शिक्षकांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. शिक्षकांच्या संभ्रमावस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनावरही परिणाम होण्याची भीती शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. माध्यमिक स्तरावर इंग्रजी भाषेच्या तासिकांत कपात केल्याने विद्यार्थ्यांची अक्षरशः फरफट सुरू झाल्याचे चित्र शाळा-शाळांतून दिसून येत आहे.

चालू शैक्षणिक वर्षापासून माध्यमिक शाळांतील नववी व दहावीच्या वर्गांसाठी इंग्रजी विषयाच्या दोन तासिका केल्या आहेत. मात्र, पूर्वीच्या तीस मिनिटांच्या कालावधीच्या तासिका नवीन बदलानुसार पस्तीस मिनिटांच्या करण्यात आल्या आहेत. नवीन बदलांनुसार दोन तासिका कमी करुन प्रत्येक तासिकेसाठी पाच मिनिटांचा वेळ वाढवून दिला असला, तरी पूर्वीच्या वेळापत्रकाचा विचार करता एका तासिकेच्या वेळेची घट नवीन वेळापत्रकात झाली आहे. या तासिका घोळांमुळे शिक्षक मात्र संभ्रमावस्थेत सापडले आहेत.

शिक्षकांपुढे आव्हान

नवीन अभ्यासक्रम सीबीएसई बोर्डाच्या धर्तीवरील असल्याने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने या अभ्यासक्रमाची काठिण्यपातळी वाढली आहे. दुसरीकडे मात्र तासिकांत कपात करण्यात आल्याने खासकरुन इंग्रजी भाषा शिक्षकांपुढील आव्हान अधिक मोठे झाले आहे. विद्यार्थ्यांचे आकलन आणि अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यासाठी शिक्षकांची कसोटी लागणार आहे.


संघटनकौशल्याचा अभाव

इतर विषय शिक्षकांप्रमाणे इंग्रजी भाषा विषय शिक्षकांत संघटनकौशल्याचा अभाव असल्याने अद्याप या निर्णयाविरोधात इंग्रजी भाषा शिक्षक मूग गिळून आहेत. विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता समान नसतात. त्यामुळे आकलन क्षमतेतही तफावत दिसते. त्यामुळे कमी वेळेत उच्च दर्जाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या विचाराने शिक्षक संभ्रमित झाले आहेत.


शालेय शिक्षण विभागाने माध्यमिक स्तरावर इंग्रजी विषयाच्या तासिका कमी करण्याचा घेतलेला निर्णय अयोग्य आहे. सीबीएसई दर्जाच्या अभ्यासक्रमाचे अनुकरण बदललेल्या अभ्यासक्रमांत असल्याने इंग्रजी भाषेच्या अभ्यासक्रमाची काठीण्यपातळी वाढली आहे. त्यामुळे तासिका पुरेशा पाहिजे असतांना त्यात आणखी कपात केल्याने विद्यार्थी शाळेला पर्याय शोधत आहेत.

-उत्तम कदम, पालक

इंग्रजी भाषेची काठिण्यपातळी जास्त असूनही तिन्ही भाषांना वेळापत्रकात समान दर्ज देणे चुकीचे आहे. केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा फार्स उरकण्यास शिक्षक प्राधान्य देतील. कित्येक शाळांनी जादा तासिका सुरू केल्या आहेत.

-पी. एस. ठोके

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फायनलिस्टची ‘क्वीन’च्या दिशेने वाटचाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत ‘महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन’ पॉवर्ड बाय ‘सोनी पैठणी’ स्पर्धेचे तिसरे ग्रुमिंग सेशन ब्यूटी टिप्स, रॅम्पवॉकची प्रॅक्ट‌िस अन् वेस्टर्न ड्रेसची निवड यांनी रंगले. मंगळवारी सकाळी दहा वाजता ब्यूटी टिप्सच्या ग्रुमिंग सेशनला सुरुवात झाली. श्रावणक्वीन स्पर्धेचे ब्यूटी पार्टनर जॉय एन जॉय, हेअर अॅण्ड ब्यूटी केअर अकॅडमीच्या संचालिका दिलशाद हमीद यांनी फायनलिस्टना सौंदर्याचे गमक सांगितले. यानंतर नवीन तोलानी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रँड फिनालेसाठीचा रॅम्पवॉक, इंट्रोडक्शन राउंड तसेच परफॉर्मन्सची जय्यत तयारी तरुणींकडून करून घेण्यात आली. सायंकाळी मीनू धाम यांच्या बुटिकमध्ये श्रावणक्वीनच्या फिनालेसाठी स्पर्धकांनी वेस्टर्न ड्रेसची निवड केली.

ग्रुमिंग सेशनच्या तिसऱ्या दिवशी स्पर्धकांची फिनालेच्या दिशेने तयारी सुरू झालेली दिसून आली. रोज होणाऱ्या विविध ग्रुमिंग सेशनमधून तरुणी फिनालेसाठी सज्ज होताना दिसत आहेत. तीन दिवसांत सर्व तरुणींचे तयार झालेले मैत्रीचे नाते एकमेकींचा उत्साह वाढवत आहे. एकमेकींना ब्यूटी टिप्स देणे, परफॉर्मन्ससाठी सजेस्ट करणे, ड्रेस निवडण्यात मदत, मार्गदर्शकांना एकत्रितपणे प्रश्न विचारणे, दिलेला टास्क एकत्रित पूर्ण करणे अशा धमाल मस्तीच्या वातावरणात स्पर्धक मॉडेलिंग क्षेत्रासाठी ग्रूम होत आहेत. ‘ग्रुमिंग सेशनमधून आम्हाला खूप काही शिकायला मिळत आहे. गेल्या तीन दिवसांतच आमच्या पर्सनालिटीत बदल होत आहे. आम्हाला मिळत असलेल्या टिप्समुळे आम्ही आणखीन परफेक्ट होत आहोत. वेगवेगळ्या सेशन्समधून आमचा आत्मविश्वास वाढवत आहे. सेलिब्र‌िटी विश्वातल्या एका सौंदर्यवतीप्रमाणे आम्हाला फिलिंग येत आहे. या ग्रुमिंग सेशनमुळे आमची नवी ओळख मिळत आहे.’ असे मत श्रावणक्वीन फायनलिस्टनी ग्रुमिंग सेशनदरम्यान व्यक्त केले. यासोबतच स्क‌िन, हेअर याबाबतीत घ्यायची काळजी, फिनालेसाठीचे इंट्रोडक्शन, कॉस्च्युम, ड्रेस निवडताना नेमके कशाला प्राधान्य द्यायचे यासंदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तरे ग्रुमिंगमधील एक्सपर्टसना विचारत स्पर्धक स्वतःला ट्रेन करत परफेक्शनिस्ट होत आहेत.

ग्रँड फिनालेची ओढ

श्रावणक्वीनच्या अंतिम फेरीत दाखल झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला ग्रँड फिनालेची ओढ लागली आहे. ग्रुमिंग सेशनच्या तिसऱ्या दिवशी फिनालेसाठीचा परफॉर्मन्स, ड्रेस, परीक्षकांच्या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठीच्या ट‌िप्स, सौंदर्य खुलवतांना घ्यायची काळजी याची माहिती घेताना स्पर्धकांमधील फिनालेबाबतची कमालीची उत्कंठा जाणवत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासींनी घडविले रॅलीद्वारे संस्कृती दर्शन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस म्हणून ९ ऑगस्ट जगभर साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनानिमित्त साक्री तालुक्यात मंगळवारी (दि. ८) आदिवासी बांधव व विद्यार्थ्याची रॅली काढण्यात आली. या रॅलीत आदिवासी बांधवांनी आदिवासींची परंपरा व जीवन दर्शविणारी सांस्कृतिक नृत्ये सादर केली. मंगळवारी साक्री शहरातून आदिवासी बांधव व विद्यार्थ्यांची शहरातील शासकीय विश्रामगृहापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. प्रमुख मार्गावरून रॅली मार्गस्थ होत गेल्याने आदिवासी बांधवांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.

आदिवासी बांधवांनी या रॅलीत वेगवेगळ्या प्रांतातील आदिवासी अस्मिता जपणारे जगप्रसिद्ध झालेले डांगी नृत्य, तारपा नृत्य, सोहोंगी नृत्य, ढोल नाच, तुर नाच, घोच नाच इत्यादी नृत्ये सादर केली. ९ ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. परंतु, या दिवसाचे महत्त्व खेड्यात तसेच डोंगरदऱ्यात राहत असलेल्या आदिवासी समूहांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. त्यामुळे या दिवसाचे आयोजन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोप-प्रत्यारोपांची उडतेय राळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संस्थेला केवळ कुटुंब केंद्रित करण्यात प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी धन्यता मानली आहे. समाजाची संस्था समाजाच्याच हाती राखायची असेल, तर समाजहिताला प्राधान्य देणाऱ्या आणि चारित्र्यवान उमेदवारांच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन निफाड तालुक्यातील सभेत समाज विकास पॅनलच्या वतीने करण्यात आले. संस्थेमध्ये प्रस्थापितांचा भर केवळ घटनाबाह्य कामांवर असल्याचे टीकास्त्रही यावेळी विरोधकांनी सोडले.

समाज विकासच्या वतीने मंगळवारी निफाड तालुक्यातील प्रचारावर लक्ष केंद्रित करण्यात आले. मविप्रच्या निवडणुकीतील बालेकिल्ला असणाऱ्या निफाडमध्ये दिवसभर गाठीभेटींवर भर देण्यात आला. अॅड. नितीन ठाकरे आणि माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी यावेळी सभासदांशी संवाद साधला.

प्रस्थापितांनी कारभारातील देणगीराज, बेकायदेशीर, घटनाबाह्य कामांना प्राधान्यक्रम, कुटुंबीयांच्या आर्थिक-राजकीय प्रगतीसाठी संस्थेचे विद्यार्थी सेवकांचा वापर, संस्थेत काम करणाऱ्यांना दिली जाणारी मानहानीकारक वागणूक, शतक महोत्सवी वर्षात कर्मवीरांच्या वारसांना डावलून संस्थाबाह्य व्यक्तींना दिलेले महत्त्व, ज्येष्ठ-वयोवृद्ध व्यक्तींना ताटकळत ठेवण्याची वृत्ती असे मुद्दे या सभेत मांडण्यात आले. यावेळी यतीन कदम, एन. डी. मोगल, शिवाजीराव निफाडे, डॉ. विलास बच्छाव, राजेंद्र मोगल, नानासाहेब बोरस्ते, दिलीप मोरे, रवींद्र पगार, विजय. के. मोरे, राजेंद्र मोरे, डी. बी. मोगल व सभासद उपस्थित होते.

...तर राजकीय संन्यास घेऊ!

नाशिक : हिरे कुटुंबीयांनी महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी आणि आदिवासी संस्था या स्वमालकीच्याच बनविल्या आहेत. या संस्थांमध्ये बोटावर मोजण्याइतकेच विश्वस्त आहेत. या दोन्ही संस्था हिरेंनी मालेगावकरांच्या नावावर केल्यात तर मी राजकीय संन्यास घेईल, असे आवाहन ग्रामविकास मंत्री दादा भुसे यांनी प्रगती पॅनलच्या सभेत केले.

मविप्र निवडणुकीसाठी प्रगती पॅनलच्या वतीने उमराणे येथे पार पडलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी काका देवरे होते. व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विलास देवरे, पंचायत समितीचे सदस्य धर्मा देवरे, सतीश ठाकरे, पंढरीनाथ देवरे आदी होते. समाज विकास पॅनलसोबत असलेले हिरे कुटुंबीयांवर सत्ताधाऱ्यांच्या वतीने टीका केली जात आहे. यावेळी नीलिमा पवार म्हणाल्या, की देवळा तालुक्यातील आहेर कुटुंब पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर आले.

सभासदांच्या मागणीप्रमाणे उमराण्यात महाविद्यालय उभारणीसाठी प्रयत्न केले जातील. केदा आहेर, धर्मा देवरे यांनी सभासदांना मतदान करण्याचे आवाहन केले. मविप्रतील लोकशाहीचा आदर्श घेऊन मालेगावकरांनी स्वत:च्या संस्थांमधील घराणेशाही संपवावी, अशी टीका डॉ. तुषार शेवाळे यांनी विरोधकांवर केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटदारांचा निविदांवर बहिष्कार

$
0
0

जीएसटीमुळे बिल्डर असोसिएशन आक्रमक

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सध्या सुरू असलेल्या शासकीय कंत्राटी कामांसह नवीन निविदांवरही १८ टक्के जीएसटी लागू करण्यात आल्याने यांचा कंत्राटदारांवर मोठा भुर्दंड पडणार आहे. त्यामुळे शासकीय कंत्राटदार ठेकेदार संघटना आक्रमक झाले असून, याबाबत सकारात्मक निर्णय होत नसल्याने सर्व शासकीय कामे ठप्प झाली आहेत. तर नवीन निविदांवरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय शासकीय कंत्राटदार संघटना व मालेगाव बिल्डर असोसिएशन, इंडिया सेंटर असोसिएशनने घेतला आहे.

१ जुलैपासून वस्तू व सेवा कर लागू झाल्याने शासकीय कंत्राटातील रस्ते, पूल, धरण, मोऱ्या, इमारत आदी कामांवरही १८ टक्के जीएसटी लावला आहे. त्यामुळे सर्व कंत्राटदार हवालदिल झाले असून, यावर तोडगा काढण्याची मागणी कळवण येथे झालेल्या बैठकीत कंत्राटदार संघटनेने केली आहे. मात्र कोणताही सकारात्मक निर्णय होत नसल्याने सर्व कामे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परिणामी सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, नगरपालिका मधील सर्व विकासकामे ठप्प असल्याचे चित्र आहे. यासंदर्भात दि. ८ रोजी कळवण येथे मालेगाव बिल्डर असोसिएशन व इंडिया सेंटरचे अध्यक्ष धीरेन पगार यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. यात उद्यापासून दि. ९ ऑगस्टपासून ज्या ई-निविदा होणार आहेत, त्या ई-निविदा न भरण्याचा निर्णय संघटनेने घेतला असून, पूर्वीप्रमाणे ५ टक्के कर भरण्याचा नियम अंमलात आणावा, असाही निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी मजूर फेडरेशनचे संचालक हरिभाऊ वाघ, रमेश शिरसाठ, साहेबराव चव्हाण, नंदकुमार वालखेडे, विजय गुंजाळ, हेमंत पाटील, सुनील देवरे, विश्वास पाटील, वैभव पाटील गिरीश रौंदळ, दीपक खैरनार, भूषण पगार, अल्पेश शहा, प्रशांत देवरे, रवींद्र आहेर आदी सदस्य उपस्थित होते.

पूर्वी ठेकेदारांकडून रॉयल्टी, इन्शुरन्स, इन्कमटॅक्स व्यतिरिक्त ५ टक्के व्हॅट वसूल केला जात होता. मात्र शासनाने आता या व्हॅटच्या जागेवर जीएसटी १८ टक्के लावला असून यामुळे ठेकेदारांवर अतिरिक्त बोजा पडणार असून, १३ टक्के तोट्यात भर पडली आहे. त्यामुळे ठेकेदारांनी सर्व कामे बंद ठेवली आहेत.

-धिरेन पगार,

अध्यक्ष, बिल्डर असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निराधारांचा ठिय्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना या निराधारांना आर्थिक आधार देण्यासाठी असल्या, तरी लाभार्थींना वेळेवर लाभ मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यासाठीची अनेक प्रकरणे अपात्र ठरविली जात असून, या प्रकाराच्या निषेधार्थ शेकडो लाभार्थी महिलांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केले.

संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयासमोर करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनादरम्यान संबंधित लाभार्थींच्या मागण्यांची दखल घेतली गेली नाही, तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला. निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, दिव्यांग, शारीरिक व्याधीग्रस्त व निराधार विधवांना आर्थिक आधार मिळावा, त्यांना सन्मानाने जगता यावे या उद्देशाने १९८० पासून संजय गांधी निराधार योजना

सुरू करण्यात आली आहे. भूमिहीन शेतमजूर महिला, निराधार विधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी १९९१ पासून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, तर ६५ वर्षांवरील आर्थिकदृष्ट्या निराधार व्यक्तींसाठी केंद्र सरकारने २००४ मध्ये श्रावणबाळ सेवा योजना सुरू केली. यातील लाभार्थ्यांना दरमहा ६०० रुपये दिले जातात. परंतु, सध्याच्या महागाईच्या काळात हे अनुदान अगदीच तुटपुंजे ठरते. त्यामध्ये वाढ करावी, काही प्रकरणे हेतूपुरस्सर नामंजूर केली जात असून, ती तातडीने मंजूर करावीत आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयासमोर लाभापासून वंचित महिलांनी हे ठिय्या आंदोलन केले.

शहरातील फुलेनगर, गोरेवाडी, सिडको, चेहेडी, नाशिकरोड, नांदूर नाका, फुलेनगर, बजरंगवाडी, दत्तनगर आणि विडी कामगारनगर आदी भागातून शेकडो महिला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दाखल झाल्या होत्या. तेथे ठिय्या आंदोलन केल्यावर या मागण्यांची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही, तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा रतन सांगळे, मांगुलाल जाधव, गिरजा चोथे, रंजना जाधव आदींनी दिला.


प्रकरणांबाबत आरोप

ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न आहे, निराधार असल्याचा सबळ पुरावा नाही, अपंगत्वाच्या दाखल्याचा अभाव यांसारख्या कागदोपत्री त्रुटींमुळे अनेक प्रकरणे प्रशासनाकडून नामंजूर केली जातात. परंतु, सर्व कागदपत्रे सादर करूनही त्यामध्ये काही ना काही त्रुटी काढून अशी प्रकरणे अपात्र ठरविली जात असल्याचा प्रमुख आरोप आंदोलकांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्णयाविना संपली सुधार समिती बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिका शहर सुधारणा समितीची बैठक कोणत्याही ठोस निर्णयाव‌िना मंगळवारी राजीवगांधी भवन येथे पार पडली. समितीच्या सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अधिकाऱ्यांकडून समर्पक उत्तरे न मिळाल्याने पुढील सभेत माह‌िती देण्यात यावी अशी आग्रही भूम‌िका सदस्यांनी घेतली.

समितीची पहिली सभा महिला बाल विकास कल्याण समितीच्या सभागृहात बोलावण्यात आली. सभापती भगवान दोंदे व उपसभापती स्वाती भामरे यांच्या उपस्थितीत कामकाजाला सुरुवात झाली. समितीच्या सदस्या सुवर्णा मटाले यांनी शहरातील पार्किंग व्यवस्थेबद्दल अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्या म्हणाल्या की, शहरात पार्किंगची समस्या ‘आ’ वासून उभी आहे. अनेक रस्त्यांवर गाड्या लावल्या जात असल्याने नागरिकांना चालणे मुश्किल झाले आहे. शहरात पार्किंगसाठी असलेल्या जागांवर इतर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. नगररचना विभागाने रविवार कारंजा येथील यशवंत मंडई पार्किंग कामाला प्राधान्य द्यावे, अशी त्यांनी मागणी केली. रस्त्यावर वाहने पार्क होत असल्याने घंटागाडी जात नाही. आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नगरसेवक सत्यभामा गाडेकर म्हणाल्या की, या समितीच्या सदस्यांचे अधिकार आणि हक्क हे प्रत्येक सभासदाला माहित होणे गरजेचे आहे. ते माहीत झाल्यानंतर काम करता येणे शक्य होईल. त्या म्हणाल्या की, उद्योजकांकडून शहरातील वाहतूक बेटे विकस‌ित करता येणे शक्य आहे. त्यासाठी महापालिकेत उद्योजकांची बैठक बोलविण्यात यावी. शहरात किती ठिकाणी फूटपाथ करण्यात आले आहेत, किती ठिकाणी तयार करणे बाकी आहे, याची आकडेवारी सदस्यांना उपलब्ध करुन द्यावी.

प्रभाग समितीने कोणती कामे करायची आणि शहर सुधार समितीने कोणती कामे करायची याची माहिती सदस्यांना करुन देण्यात यावी. त्याचप्रमाणे शहरात दिशादर्शक फलक व्यवस्थित लावण्यात आलेले नाहीत. ते लावण्यात यावे. महापालिकेच्या आवारात महापालिकेबद्दल माहिती देणारे कियॉस लावण्यात आले होते, ते गेल्या काही दिवसापासून बंद आहेत. ते त्वरित दुरुस्त करुन लावण्यात यावेत. वाढलेल्या झाडांना विविध आकार देऊन ती सुशोभ‌ित करण्यात यावीत, अशा सूचना त्यांनी केल्या. नगरसेवक पंड‌ित आवारे म्हणाले की, महापालिकेच्या अनेक इमारती पडून आहेत. त्यांचा वापर योग्य रितीने होत नाही. त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे व त्या जागा पार्किंगसाठी उपलब्ध करुन देण्यात याव्यात. रूची कुंभारकर म्हणाले की, अनेक दुभाजकांमध्ये कचऱ्याचे साम्राज्य आहे. ते गेल्या काही दिवसांत साफ झालेले नाही. त्याची त्वरित दखल घेण्यात यावी. यावेळी रस्त्यालगतच्या साइडपट्ट्यांची सुधारणा करणे व पार्किंगचे नियोजन करणे या दोन विषयांना मंजुरी देण्यात आली.

मोठे अधिकारी हवेत

या बैठकीला निर्णय घेणारे अधिकारी उपस्थित नसल्याने सभासदांनी नाराजी व्यक्त केली. सभासद म्हणाले की, आपण चर्चा करायची आणि दुसऱ्या फळीतील अधिकारी म्हणतात की, आम्ही वरिष्ठांना माहिती देऊ, पत्रव्यवहार करू. टोलवाटोलवीची उत्तरे देतात. त्यासाठी या बैठकीला अतिरिक्त आयुक्त व सर्व खात्यांचे प्रमुख यांनी हजेरी लावावी, अशी मागणी सदस्यांनी लावून धरली.

कामांबाबतच संभ्रम

शहर विकासाची कामे करायची म्हणजे नक्की कोणती कामे करायची, याचे विशिष्ट संकेत नसल्याने सभासदांमध्ये संभ्रम आहे. प्रभाग समितीने करायची कामे आणि शहर विकास समितीने करायची कामे याचे वर्गीकरण करण्यात येऊन समितीच्या सदस्यांना अधिकार देण्यात यावेत, अशीही भूमिका सदस्यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५ ऑगस्टला रंगणार गीतलेखन कार्यशाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानतर्फे लोककवींच्या जयंतीनिमित्त दि. १५ ऑगस्ट रोजी सहावी लोकप्रबोधन गीतलेखन व सादरीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. एचपीटी कॉलेज, कॉलेजरोड येथे दुपारी १२.३० वाजता ही कार्यशाळा होईल.

पहिल्या सत्राचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, साहित्यिक प्रा. डॉ. दिलीप शिंदे यांच्या उपस्थितीत होईल. उद्घाटनपर बीजभाषण उत्तम कांबळे करणार आहेत. ‘ज्वलंत सामाजिक प्रश्न व लोककलावंत शाहीर-गीतकाराची भूमिका, जबाबदारी’ असा त्यांचा विषय आहे.

दुसऱ्या सत्रात वामनदादा कर्डक यांची गीतलेखन प्रेरणा आणि लोकप्रबोधन गीते शरद शेजवळ सादरीकरण करतील. त्यांना लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानचे कलापथक व नाशिकचे कलावंत सहाय्य करतील. तिसऱ्या सत्रात अहमदनगरचे लोकशाहीर तुळशीराम जाधव लोकप्रबोधन गीतलेखन, सादरीकरण, लोकजागर गीतलेखन, सादरीकरण कसे करावे, या विषयावर मनोगत व्यक्त करणार आहेत.

चौथ्या सत्रात मान्यवर, ज्येष्ठ व नवोदितांचे गीत, शाहिरी लेखन व सादरीकरण होणार आहे. समारोपाप्रसंगी कवी रंगराज ढेंगळे, कवी गायक सोमनाथ गायकवाड मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेला उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठान, प्रगतिशील लेखक संघ व एचपीटी कॉलेज, शरद शेजवळ, समाधान पगारे, राकेश वानखेडे, प्रमोद अहिरे आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्याय होतोय तर आमच्याकडे या - विधी केंद्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अन्याय होतोय, न्याय मिळवयाचा आहे, तर आमच्याकडे या, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण केंद्राचे सचिव एस. एम. बुक्के यांनी केले आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वी किंवा कोर्टात खटला सुरू असला तरी या केंद्रातर्फे अगदी मोफत सेवा दिली जाते. मध्यस्थाचा मार्ग स्वीकारल्यास सर्वसामान्यांच्या अनेक अडचणी वेळीच मार्गी लागू शकतात, असे बुक्के यांनी स्पष्ट केले.

सर्वसामान्यांसाठी शासन स्तरावर अनेक योजना राबवल्या जातात. मात्र, त्याचा लाभ सर्वसामन्यांना मिळतोच असे नाही. समजा एखाद्या अपंग व्यक्तीस तसे सर्टिफिकेट मिळत नसेल तर ती व्यक्ती जिल्हा विधी सेवाकेंद्राकडे न्याय मागू शकते. या व्यक्तीस सर्वतोपरी मदत करण्याची जबाबदारी हे केंद्र पार पाडते, असे बुक्के यांनी स्पष्ट केले. पती-पत्नीतील भांडणे, केस बाउन्स, पेन्शन प्रकरणे, जम‌िनीचे वाद, जादा बिल आकारणीवरून उद्भवलेले वाद अशा अनेक केसेस कोर्टात पोहचतात. यामुळे न्याय व्यवस्थेवरील ताण वाढतो. अशा केसेस जिल्हा विधी सेवा केंद्रात पोहचल्यास त्यावर तोडगा काढता येतो. यामुळे दोन्ही पक्षांचा वेळ आणि पैसा वाचतो.

पती-पत्नीचा वाद मिटवला

याबाबतचे उदाहरण बुक्के यांनी सांगितले की, नुकताच एका डॉक्टर आणि शिक्षक पत्नीमध्ये वादाचा प्रसंग उद्भवला होता. निर्णयाअंती दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणात झटपट कारवाई करीत दोन्ही पक्षांना मान्य होईल, असा तोडगा काढण्यात आला. हेच प्रकरण नियम‌ित सुनावणीसाठी गेले असते तर पैसा, वेळ यांचा अपव्यय होऊन मनस्तापच हाती आला असता. कोर्टातील प्रलंबीत खटल्यांचा भार कमी करण्यासाठी हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.

उपेक्ष‌ितांना कायद्याची माहिती

समाजातील उपेक्ष‌ित घटकांना कायद्याची माहिती व्हावी, यासाठी हायकोर्टाच्या आदेशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यापूर्वी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी कार्यक्रम घेण्यात आला. नुकताच एकटे राहणाऱ्या वृध्दांना त्यांच्याशी संबंधित कायद्यांची, योजनांची माहिती देण्यात आली. लवकरच तृतीयपंथीयांसाठी कार्यक्रम आयोज‌ित केला जाणार असून, या केंद्राच्या माध्यमातून उपेक्ष‌ित आणि माहितीअभावी अडचणींचा सामना करावा लागणाऱ्या व्यक्तींना अगदी मोफत मदत करण्यात येत असल्याचे बुक्के यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टेडियम कॉम्प्लेक्सजवळ बचतगटांना मिळणार जागा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
महात्मा गांधी रोडवर असलेल्या जिल्हा परिषदेच्या स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये बचत गटांना जागा देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. महात्मा गांधीरोडवर जिल्हा परिषदेच्या मालकीचा भूखंड आहे. त्यावर पारख इलेक्ट्रॉनिक्स यांनी अतिक्रमण केले होते. कोर्टाच्या आदेशानुसार हे अतिक्रमण काढून टाकण्यात आल्यानंतर भूखंड मोकळा झाला आहे. अतिक्रमण काढून वर्ष उलटले तरी ही जागा विना वापरात होती. व्यापाराच्या दृष्टीने मोक्याच्या जागी असलेला हा भूखंड विकसित करून ग्रामीण भागातील स्वयंम सहाय्यता गटाद्वारे निर्माण करण्यात येणाऱ्या उत्पादनांच्या विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्यास महिला सक्षमीकरणासाठी चांगला वाव निर्माण करुन देता येईल, असे मत बैठकीत मांडण्यात आले. जिल्ह्यात अनेक बचत गट उत्तम प्रकारचे उत्पादने तयार करत असून केवळ मार्केटिंग अभावी त्यांची उत्पादने बाजारात येत नाही. तसेच त्याची उत्पादने शहरात विकायला आली तर नागरिकांना घरची चव मिळेल, बचत गटांनाही नफा होईल. त्यामुळे असा निर्णय घेण्यात आला आहे. असा निर्णय घेणारी नाशिक ही महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषद ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images