Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

श्रमिक हॉल प्रेस कामगारांच्या विस्मृतीत!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोडच्या इंडिया सिक्युरिटी प्रेस कामगारांच्या वैचारिक व सांस्कृतिक प्रगल्भतेच्या विकासाचा एकेकाळचा साक्षीदार असलेला येथील श्रमिक हॉल सध्या प्रेस कामगारांकडूनच विस्मृतीत गेल्याची स्थिती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या श्रमिक हॉलला कामगारांच्या लगबगीची प्रतीक्षा असल्याचे दिसून येत आहे.

येथील क्रांती चौकाजवळील शास्त्री पथावर इंडिया सिक्युरिटी प्रेस कामगारांच्या श्रमिक हॉलची तीन मजली वास्तू आहे. एकेकाळी या वास्तूत प्रेस कामगारांच्या पाल्यांच्या लग्नांपासून, तर कामगारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असायची. याशिवाय कामगार संघटना नेते व कार्यकर्त्यांच्या सभा आणि बैठकांचाही हा श्रमिक हॉल साक्षीदार आहे. कामगारांच्या हिताच्या प्रश्नांवर याच श्रमिक हॉलच्या भिंतींच्या साक्षीने चर्चा, ठराव या हॉलमध्ये होत असत. कामगारहिताच्या चळवळीला गती देण्यासाठी याच श्रमिक हॉलचा वापर होत असे. कामगारांच्या वैचारिक, सांस्कृतिक व सामाजिक विकासात या श्रमिक हॉलचा सिंहाचा वाटा राहिला आहे. आज मात्र हा हॉल कामगारांच्या प्रतीक्षेत आहे.

व्यावसायिक वापरावर भर

श्रमिक हॉलच्या तळमजल्यावर १५ व्यावसायिक गाळ्यांची उभारणी केलेली असल्याने या गाळ्यांचा तेवढा व्यावसायिक वापर होत आहे. मात्र, वरील मजल्यांचा वापर सध्या बंद झाला आहे. दि. ११ जून १९८० रोजी राष्ट्रीय कामगार नेते बगारामजी तुळपुळे यांच्या हस्ते या श्रमिक हॉलचे उद््घाटन झाले होते. दुसऱ्या मजल्याचे उद््घाटन दि. ४ मे १९८७ रोजी भानुमती कुलकर्णी यांच्या हस्ते झाले होते.


दरवाजे मोडकळीस

श्रमिक हॉलला गेल्या १५-२० वर्षांत अनेक पर्याय निर्माण झाल्याने श्रमिक हॉलकडे कामगारवर्ग फिरकेनासा झाला आहे. सध्या या हॉलच्या खिडक्या दरवाजे, जिने, पंखे, वीजपुरवठा व्यवस्था, शौचालये आदींची प्रचंड दुरवस्था झाली आहे. ध्वनिक्षेपक व्यवस्थाही उपलब्ध नाही. पूर्वीसारखा या हॉलचा वापर कामगारवर्गाकडून होत नसल्याने या हॉलचा बकालपणा वाढला आहे.


सध्या या हॉलचा वापर पूर्वीसारखा होत नाही. जिमखाना, नेहरूनगर, गोरेवाडी येथील सरकारी हॉलचा वापर वाढला आहे.

-ज्ञानेश्वर जुंद्रे, कार्याध्यक्ष, आयएसपी मजदूर संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सावाना’ पोहोचणार वाचकांच्या दारी

$
0
0


सार्वजनिक वाचनालय नाशिकची निवडणूक नुकतीच झाली. त्याद्वारे ग्रंथमित्र पॅनलने एकाचा अपवाद वगळता एकहाती सत्ता मिळवून वर्चस्व सिद्ध केले. या यशामागे अनेक जण आहेत. त्यापैकीच एक श्रीकांत बेणी यांची रणनीती निवडणुकीत प्रभावी ठरली. वाचनालयाच्या भविष्यातील योजना आणि त्यांची मतमतांतरे याविषयी सार्वजनिक वाचनालयाचे नवनिर्वाचित प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांच्याशी केलेली ही बातचीत...


•वाचकांचा विश्वास सार्थ करण्यासाठी आपण काय करणार आहात?

➤ वाचनालयाचे वाचक, सभासद, हितचिंतक आणि सार्वजनिक वाचनालयाचे पदाधिकारी, कार्यकारी मंडळ यांच्यातील गेल्या वर्षातील थांबलेला संवाद सर्वप्रथम सुरू करणे आवश्यक आहे. किंबहुना तातडीने असा संवाद सुरू करून नाशिककरांच्या ‘सावाना’कडून असलेल्या अपेक्षा समजावून घेऊन त्यांची परिपूर्ती करणे गरजेचे आहे. सार्वजनिक सुटीच्या दिवशी ‘सावाना’चा पुस्तक देवघेव विभाग सुरू ठेवावा, अशी अपेक्षा प्रमुख सचिव झाल्यानंतर काही वाचकांनी मला शुभेच्छा देताना व्यक्त केली. सांगायला आनंद वाटतो, की महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाचनालयाच्या कार्यालयास सुटी असली, तरी पुस्तक देवघेव विभाग सुरू ठेवण्यात आला आहे. फक्त दिवाळी सुटीचा अपवाद वगळता अन्य सर्व सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी ‘सावाना’चा पुस्तक देवघेव विभाग सुरू ठेवून वाचकांची गैरसोय दूर करण्यात येईल. लवकरच लायब्ररी ऑन व्हील हा प्रकल्प कार्यान्वित करून ‘सावाना’ वाचकांच्या दारी पोहोचणार आहे.

•वाचकांसाठी मुक्तद्वार कधी खुले होणार?

➤ मुक्तद्वार विभाग तातडीने स्व. माधवराव लिमये सभागृहामध्ये सुरू करण्यात आला असून, सध्या दररोज २०० ते २५० वाचक त्याचा लाभ घेत आहेत. येत्या दोन महिन्यांत आवश्यक त्या सुधारणा करून अधिक प्रशस्त व्यवस्था मुक्ताद्वारच्या वाचकांसाठी करण्यात येणार आहे. लिमये सभागृहामध्ये बालवाचक विभाग स्थलांतरित करून बालवाचकांना अधिक चांगली सुव्यवस्था करून देण्यात येणार आहे. पुस्तक मित्रमंडळाची व्याख्यानेदेखील तेथे आयोजित करण्यात येतील. जिल्ह्यातील साहित्यिकांच्या पुस्तकांचे कायमस्वरूपी प्रदर्शनही तेथे मांडण्याचा मनोदय आहे.

•पुस्तक खरेदीबाबत आपले धोरण काय राहील ?

➤ जिज्ञासू वाचकांचा समावेश असलेली समिती स्थापित करून पुस्तके खरेदी केली जातील. त्यासाठी अशा समितीच्या नियमित बैठका होतील. मराठीबरोबरच हिंदी व इंग्रजी भाषेतील ताजी प्रकाशित झालेली व चर्चेत असलेली पुस्तके तातडीने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील. प्रसंगी प्रकाशकांकडून मिळणारे कमिशन सोडून देण्यात येईल. कारण, वाचकाच्या दृष्टीने पुस्तक महत्त्वाचे आहे, कमिशन नाही.

•‘सावाना’बाबतची न्यायालयीन लढाई बंद करण्यासाठी काय केले पाहिजे?

➤ जरूर असा प्रयत्न करू. पदच्युत पदाधिकारी मिलिंद जहागीरदार आणि त्यांचे सहकारी यांच्यामुळे ‘सावाना’चे ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे आजवर सबळ पुराव्यानिशी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे समारोपाच्या चर्चेत मिलिंद जहागीरदार यांनी या नुकसानीची रक्कम भरून देण्याची तयारी दर्शविल्यास त्यांच्याविरुद्ध कोर्टबाजी, खटले करण्यात आम्हाला अजिबात रस नाही. तडजोड जरूर करू. मात्र संस्थेचे हित जोपासूनच.

•आपल्या पुढील योजना काय?

➤ ही योजना मांडल्यास लगेच उलटसुलट चर्चेला हितसंबंधित मंडळी सुरुवात करतील. परंतु, आज ना उद्या हे करावेच लागणार आहे. ‘सावाना’ची बाहेरील रंगरंगोटी पाहून भुलू नका, एकदा आतील भागातील इमारतीची दुरवस्था बघा, त्यानंतर काय ते ठरवा. माझ्या मते आताची संपूर्ण इमारत पाडून १२ ते १५ मजली भव्य इमारत येथे उभी राहू शकते. त्यामध्ये चार मजले पार्किंगची व्यवस्था केल्यास टिळकरोड, एम. जी.रोड आणि शिवाजीरोडवरील वाहने पार्किंगचा प्रश्न सोडविता येईल आणि त्यामुळे शासनाकडून इमारत बांधणीसाठी भरघोस निधी मिळू शकेल. या नूतन इमारतीमध्ये १००० क्षमतेचे वातानुकूलित नाट्यगृह, दोन अॅम्फी थिएटर्स, भव्य पुस्तक देवघेव विभाग, डिजिटल लायब्ररी, भांडारकर प्राच्य विद्यापिठाप्रमाणे भव्य पोथी विभाग, अद्ययावत कलादालन, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र अभ्यासिका, चांगले कॅन्टीन अशा सर्व सुविधा करता येणे शक्य आहे. त्यासाठी गरज आहे किमान २५ कोटींची. इच्छा असे तिथे मार्ग दिसे. त्यामुळे गरज आहे इच्छाशक्तीची!

(शब्दांकन : प्रशांत भरवीरकर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महिला बालकल्याण’ला नगर‌सेविकांची नकारघंटा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या मह‌लिा व बालकल्याण समितीच्या नऊ सदस्यांच्या निवडीसाठी शनिवारी महासभा होत आहे. समितीवर भाजपचे पाच तर शिवसेनेचे तीन आणि आघाडीचा एक सदस्य निवडला जाणार आहे. परंतु, मह‌लिा व बालकल्याण समितीवर जाण्यासाठी भाजपसह सर्वच पक्षांमधील नगरसेविका नाखूष आहेत. त्यामुळे पक्षांचीही डोकेदुखी वाढली असून, नव्या जुन्यांचा संगम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महापालिकेच्या अर्थकारणात या समितीला फारसे स्थान नसल्याने या समितीपासून लांब राहण्यासाठी सर्वपक्षीय मह‌लिांमध्ये स्पर्धा सुरू आहे.

महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी महासभा होत आहे. या महासभेत मह‌लिा व बालकल्याण समितीच्या ९ सदस्यांच्या नियुक्तीसह विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाणार आहे. महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने या समितीवरही भाजपचाच वरचष्मा राहणार आहे. समितीत भाजपचे ५, शिवसेनेचे ३ सदस्य नियुक्त करण्यात येणार आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीचे समान सदस्य असल्याने दोघांपैकी एकच उमेदवार जाणार आहे. मह‌लिा व बालकल्याण समितीत फारसे अर्थकारण नसल्याने या समितीवर जाण्यासाठी सदस्य फारसे इच्छुक नसल्याचे चित्र आहे. या समितीवर गेल्यास प्रभाग सभापती तसेच स्थायी समितीवरील दावा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मह‌लिा या समितीवर जाण्यास फारशा उत्सुक नाहीत. या समितीवर सर्वच पक्षांकडून मह‌लिांना संधी दिली जाते. परंतु, या समितीच्या कामकाजाची माह‌तिी असलेल्या अनुभवी नगरसेविकांनी पक्षाकडे समितीसंदर्भात नकारघंटा कळवली आहे. े.

बोरस्ते विरोधी पक्षनेते

महापालिकेत भाजप पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचे नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत. त्यामुळे शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळणार असून, शिवसेनेकडून ज्येष्ठ नगरसेवक अजय बोरस्ते यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. गेल्या महासभेतच त्यांच्या नावाचे पत्र देण्यात आले होते. परंतु, स्थगित महासभा असल्याचे कारण देत, महापौरांनी त्यांची घोषणा केली नव्हती. मात्र, शनिवारच्या महासभेत बोरस्ते यांच्या विरोधी पक्षनेतेपदावर महासभेत शिक्कामोर्तब होणार आहे. महापौरपदानंतर दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे पद सभागृहनेता हे आहे. या पदावर भाजपकडून कोणाची वर्णी लावली जाते याकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेतनासाठी शिक्षकांचा जिल्हा बँकेला अल्टिमेटम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर २०१६ ते मार्च २०१७ पर्यंतचे पगार पूर्ण केले जात नसल्याने शिक्षकांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर आंदोलन केले. चेअरमन नरेंद्र दराडे यांनी लवकरच सर्व शाळांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार खात्यावर जमा होतील, या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु, सोमवारपर्यंत पगार झाला नाही तर उपोषणाला सुरुवात करू, असा इशारा जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये शहरातील एनडीसीसी बँकेच्या माध्यमातून शिक्षकांच्या हाती एकूण पगारापैकी कसेबसे तीन ते चार हजार रुपये रोख पडत आहेत. ग्रामीण भागातील शिक्षकांची परिस्थिती यापेक्षा खडतर आहे. घराचे हफ्ते, मुलांच्या शिक्षणाचे खर्च, घरखर्च भागवता भागवता पगाराअभावी शिक्षकांच्या नाकी नव आले आहेत. त्यामुळे हवालदिल झालेल्या शिक्षकांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला. पगार वेळेवत होत नसल्याने शिक्षकांना बँकाचे हफ्ते भरणेही कठीण झाले आहे. त्यामुळे त्यांना अतिरिक्त पाचशे ते सहाशे रुपयांचा दंड भरावा लागत असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अश्विनी मोरे यांची अध्यक्षपदी निवड

$
0
0

नाशिक: समाज कल्याण कर्मचारी संघटनेची (गट-क) नाशिक विभागीय कार्यकारिणी जाहीर झाली असून, अध्यक्षपदी अश्विनी मोरे, तर सचिवपदी सदानंद नागरे यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यकरिणीत उपाध्यक्ष आर. डी. देवरे, एस. बी. त्रिभूवन, सहसचिव सुभाष फड, सहसचिव संजय सैंदाणे, कोषाध्यक्ष मनीषा गांगुर्डे, सदस्य तथा प्रसिध्दी प्रमुख सुरेश पाटील, सदस्य तथा विधी सल्लागार संतोष सरकटे, बी. एन. पाटील, हिम्मत साळुंके, ओमेश पवार, एस. टी. चौधरी, मधुकर महानोर यांची निवड करण्यात आली आहे. सदर कार्यकारिणी पुढील पाच वर्षांसाठी आहे.

आज परिषद

नाशिक : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ आणि महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवर्य रं. कृ. यार्दी स्मृती व्याख्यानमालेंतर्गत भारतीय शिक्षणाच्या कक्षा आणि शैक्षणिक संस्थांची भूमिका नवशैक्षणिक प्रयोग आणि आव्हाने या विषयावर राज्यस्तरीय शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकरोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमधील नूतन

ऑडिटोरियम येथे सकाळी ९.३० वाजता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन होणार आहे.

रामभक्त मंत्रमुग्ध

नाशिक : वीर हनुमान आणि प्रभू रामचंद्र यांच्या विविध प्रसंगातील सुरेख वर्णन करणारी भक्तितीगीते, अभंग बागेश्रीच्या कलाकारांनी मैफलीत सादर करीत रामभक्तांना मंत्रमुग्ध केले. हनुमान जयंतीच्या उत्सवानिमित्ताने आगर टाकळी येथे बागेश्री व पारिजात भजनी मंडळाच्या वतीने मनोरमा वाडीकर यांनी रचलेल्या रामचरित गीतांजली हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम नुकताच झाला. मेघा भट, मंगला जोशी, कुर्लेकर, प्रतिभा भट या कलाकारांनी वैविध्दयपूर्ण अभंग सादर करीत श्रोत्यांची दाद मिळवली. विविध गीतांना विद्याताई अनगळ यांनी संवादिनीवर तर चारूदत्त दीक्षित यांनी तबल्यावर साथ केली. प्रभू रामचंद्र आणि हनुमानाच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंजला ‘जय भीम’चा नारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘बोलो बोलो जय भीम... प्रेमसे बोलो जय भीम...’, ‘एकच साहेब बाबासाहेब’ यांसारख्या घोषणांनी शुक्रवारी सायंकाळी आसमंत दणाणून सोडला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यंदाही जल्लोषमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. आकर्षक चित्ररथ, जिवंत देखाव्यांनी उपस्थितांच्या नेत्रांचे पारणे फेडले.

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शुक्रवारी शहरात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त सालाबादाप्रमाणे यंदाही शहराच्या मध्यवर्ती भागातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोठा राजवाडा येथील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. महापौर रंजना भानसी, आमदार जयंत जाधव, उपमहापौर प्रथमेश गिते, पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल, भक्त‌िचरणदास महाराज आदी यावेळी उपस्थित होते. मिरवणुकीसाठी २३ मंडळांनी नोंदणी केली होती. फुले तसेच रोषणाईने सजविलेले चित्ररथ या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यावर भगवान गौतम बुध्द तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ठेवण्यात आला होता.

वाकडी बारव येथून निघालेल्या मिरवणुकीत हजारो बांधव सहभागी झाले. मार्गात ठिकठिकाणी या मिरवणुकीचे स्वागत झाले. ढोल-ताशांचा गजर, डीजेच्या दणदणाटात मिरवणूक मार्गस्थ झाली. ढोल-ताश्यांच्या गजरासह डीजेवर वाजणाऱ्या भीमगीतांवर तरुणाई चांगलीच थिरकली. भद्रकालीमार्गे निघालेल्या या मिरवणुकीचा रात्री उशिरा शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समारोप झाला. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलिस आयुक्त राजू भुजबळ, पोलिस निरीक्षक सोमनाथ तांबे आदींनी चोख पोलिस बंदोबस्ताचे नियोजन केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीसाठी संघर्ष

$
0
0

नाशिक जिल्ह्यात दोन दिवस संघर्ष यात्रा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांच्या वतीने दुसऱ्या टप्प्यात काढण्यात येणारी शेतकरी संघर्ष यात्रा १७ एप्रिल रोजी नाशिकमध्ये येत आहे. ही संघर्ष यात्रा दोन दिवस नाशिकमध्ये राहणार असून, मालेगावला तिचे स्वागत केले जाणार आहे. दोन दिवसांच्या संघर्ष यात्रेत पाच जाहीरसभा ठेवण्यात आल्या असून, शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटुंबीयांची भेट घेतली जाणार आहे.

संघर्ष यात्रेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, सुनील तटकरे यांच्यासह दिग्गज नेते या यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार व काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी पत्रकार परिषदेत दिली. शेतकरी कर्जमाफीबाबत महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा शनिवार १५ एप्रिल रोजी राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेड राजा (जि. बुलडाणा) येथून प्रारंभ होऊन १८ रोजी शहापूरला समारोप होणार आहे.

या संघर्ष यात्रेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, रिपाइं, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनता दल (संयुक्त) आदी विरोधी पक्षांच्या संयुक्त विद्यमाने ही यात्रा निघत आहे. १७ व १८ एप्रिल असे दोन दिवस ही यात्रा नाशिकमध्ये थांबणार असून, त्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. जिल्ह्यातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी आमदार जयंत जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, शशिकांत उनवणे यांनी केले आहे. भाजप-शिवसेना युती सरकारला शेतकरी आत्महत्या रोखण्यात आलेले अपयश, शेतकरी कर्जमाफीसाठी केली जाणारी दिरंगाई, शेतीमालाचे कोसळलेले भाव, शासकीय खरेदीबाबत सरकारची

अनास्था आदी प्रश्नांबाबत निषेध करण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेत राज्यातील दिग्गज नेते सहभागी होणार असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे.

असा आहे कार्यक्रम

१७ एप्रिल

सकाळी १० वा. मालेगावमध्ये आगमन व जाहीर सभा, दु.१ वा. नामपूर बाजार समितीला भेट, दुपारी २ वा. सटाणा येथे जाहीर सभा, दुपारी ३.३० वा. देवळा येथे आगमन, दुपारी ४ वा. वडाळीभोई येथे स्वागत, दुपारी ४.३० वा. पिंपळगाव बसवंतला जाहीरसभा, सायंकाळी ६ वा. नाशिक-आडगाव येथे आगमन व मुक्काम.

१८ एप्रिल

सकाळी १० वा. पत्रकार परिषद, दुपारी १२ वा. शिवडे येथे भेट, दुपारी १ वा. घोटी येथे जाहीरसभा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाट पाहूनी जीव शिणला...!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

काहीवेळ टवटवीत दिसणारा पुष्पगुच्छ मंत्री महोदयांच्या प्रतीक्षेत कोमेजून गेला. आयोजकांनी दोन वेळा पाणी मारूनही बिच्चारा ताजातवाना होईना. भूम‌िपूजनाच्या मंत्रोच्चारासाठी बोलावलेल्या पूजाऱ्यांनीही वैतागून काढता पाय घेतला, अन् भूकेने व्याकुळलेल्या उपमहापौरांसह काही नगरसेवक आणि महापालिका अधिकाऱ्यांनी बसल्या जागीच पोटपूजा उरकून घेतली. भाजप सरकारमधील मंत्र्यांना जाहीर कार्यक्रमांना उशिराने पोहोचण्याची सवयच जणू. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी त्यावर आज कडी केली. पंतप्रधान आवास योजनेच्या आडगाव येथील भूम‌िपूजन सोहळ्याला महोदय चक्क पावणेतीन तास विलंबाने पोहोचले. भूम‌िपूजनाचाच मुहूर्त चुकविणारे भाजप सरकार गरीबांना घरे तरी वेळेत देणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

प्रत्येकाला हक्काचे घरकुल मिळायला हवे यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना कार्यान्वित केली. या योजनेचा भूम‌िपूजन सोहळा आडगावात पार पडला. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना निमंत्रित केले होते. त्यासाठी मोकळ्या मैदानावर शामियाना उभारण्यात आला होता. दुपारी साडेबारा ही रणरणत्या उन्हाची वेळ कार्यक्रमासाठी निश्चित करण्यात आल्याने सर्वांच्याच कपाळावर आठ्या होत्या. आडगाव ग्रामस्थ आणि घरकुल लाभार्थींनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. गर्दी दिसावी यासाठी महापालिका तसेच अन्य विभागांचे अधिकारी कुटुंबीयांसह कार्यक्रमस्थळी हजर झाले. उपमहापौर प्रथमेश गिते, नगरसेवक उद्धव निमसे यांच्यासह काही नगरसेवक दुपारी साडेबारा ते एक या कालावधीत कार्यक्रमस्थळी पोहोचले. परंतु, त्यांनाही मंत्री महोदयांची प्रतीक्षा करावी लागली. दुपारी साडेबाराची वेळ टळून गेली. एक, दीड, दोन, अडीच वाजले तरीही मंत्र‌िमहोदयांचे कार्यक्रमस्थळी आगमन होईना. त्यामुळे लोक अक्षरश: वैतागले. मंत्र‌िमहोदयांमागे कामाचा व्याप असतो हे खरेच! परंतु, लोकांनी किती वेळ प्रतीक्षा करावी याबाबतच्या चर्चेला कार्यक्रमस्थळी उधाण आले. येथे सभामंडपात कुलरची व्यवस्था असूनही उकाड्याने लोक हैराण झाले. कार्यक्रमासाठी बोलावण्यात आलेल्या पूजाऱ्यांपैकी दोघे मंत्र‌िमहोदय येण्यापूर्वीच वैतागून निघून गेले. गुलाबाच्या फुलांचे गुच्छही सुकू लागले. पाणी मारून त्यांना पुन्हा टवटवीत करण्याचा केविलवाणा प्रयत्न आयोजकांनी केला. परंतु, तो निरर्थक ठरला. भूकेमुळे व्याकुळलेल्या उपमहापौरांसह काही नगरसेवक आणि महापालिका अधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळीच खाद्यपदार्थ मागवून त्यावर यथेच्छ ताव मारला. साहेबांचे लवकरच आगमन होत आहे, असे सांगणाऱ्या निवेदिकेनेही नंतर नंतर अशी ‘खोटी’ उद््घोषणा करणे बंद केले. अखेर तब्बल पावणेतीन तास उशिराने डॉ. भामरे यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. येण्यास विलंब झाला म्हणून दिलगिरी व्यक्त करून त्यांनी अवघ्या दहा मिनिटांत भाषण आटोपते घेतले. एका रटाळ आणि मनस्ताप देणाऱ्या कार्यक्रमाचा अनुभव घेऊन नागरिक घरी परतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भूमिपूजनावर आडगावकरांचा बहिष्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चेनंतर म्हाडा प्रकल्पास विरोध करणारे आंदोलन मागे घेत असल्याचे गुरूवारी काही ग्रामस्थांनी जाहीर केले होते. मात्र, चार लोक गावाचा निर्णय कसा घेऊ शकतात, असे म्हणत गावकऱ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय झालेला नसल्याने ग्रामस्थांनी विरोध कायम ठेवत भूमिपूजन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते म्हाडाच्या गृहप्रकल्पाचे भूमिपूजन झाले. यावेळी आमदार व भाजप शहराध्यक्ष बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी व स्थानिक नगरसेवक उ‌पस्थित होते. मात्र, याव्यतिरिक्त गावातील भाजप कार्यकर्त्यांनीदेखील कार्यक्रमाला न येणेच पसंत केले. कार्यक्रमस्थळी स्थानिकांची उपस्थिती तोकडी असल्याने अर्ध्यांहून जास्त खुर्च्या रिकाम्या होत्या. म्हाडाचे अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय आणि पोल‌िसच कार्यक्रमाला दिसत होते.

आडगावच्या न्यू इंग्लिश स्कूलजवळील जागा शाळेलाच द्यावी अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यासंदर्भात पाठपुरावा सुरू असताना प्रशासनाने सर्व्हे १५६०/१ ही जागा म्हाडाकडे वर्ग केल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आणि बैठकांचा जोर सुरू झाला. बुधवारी निषेध करण्यासाठी कडकडीत बंददेखील पाळण्यात आला. पण गुरुवारी गावातील काही निवडक मंडळींची पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेसाठी वाढीव एफएसआय आणि २० गुंठे जागा देण्याचे तोंडी आश्वासन दिले व आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली.

घरकुल योजना गरजूंपर्यंत पोहोचवा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गरीब दुर्बल घटकांतील प्रत्येकाला स्वत:चे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून देशात तीन कोटी घरकुले उभारण्यात येणार आहेत. ही योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नाशिक येथील आडगाव मध्ये ४४८ सदनिकांच्या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ भामरे यांच्या हस्ते शुक्रवारी झाला. यावेळी महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, आमदार बाळासाहेब सानप, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिल‌िंद शंभरकर, म्हाडाचे मुख्याधिकारी रमेश मिसाळ, सुरेशबाबा पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ. भामरे म्हणाले, आज एकाच वेळी राज्यातील २० प्रकल्पांतील ४२ हजार सदनिकांच्या कामाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर येथे झाला. देशाला स्वातंत्र्य मिळून २०२२ मध्ये ७५ वर्षे पूर्ण होतील. त्यावेळी देशातील प्रत्येक गरीबाला पिण्याचे स्वच्छ पाणी, शौचालय व पोहोच रस्ता यासह पक्के घर देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत असल्याचे डॉ. भामरे यावेळी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्लड बँका स्पॅम लिस्टेड!

$
0
0



सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर
नाशिकच्या अनेक ब्लड बँकांचे नंबर काही रक्तदात्यांनी स्पॅम लिस्टमध्ये जोडल्याचे ऑनलाइन मोबाइल अॅप्सच्या रिपोर्टनुसार आढळून येत आहे. परिणामी ब्लड बँकेतून जरी फोन आला, तरी त्याची रिंग वाजत नाही व व्यस्त असल्याचे समोरच्याला सांगण्यात येते. त्यामुळे रक्तपेढ्या व रुग्णांच्या नातेवाइकांना रक्त मिळविण्यासाठी मोठी यातायात करावी लागत असल्याची स्थिती आहे. अतिदक्षता विभागात असणाऱ्या रुग्णांना रक्ताची गरज असताना मदतीसाठी जर काही रक्तदाते हात झटकत असतील, तर स्मार्ट सिटीऐवजी अशा नाशिककरांनी प्रथम स्मार्ट होणे गरजेचे आहे, असे मत रुग्णांच्या नातेवाइकांकडून व्यक्त केले जात आहे.

रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असे म्हणत रक्तदान करा, अशी जनजागृती समाजात कायम करण्यात येते. अनेक महत्त्वाच्या सण-समारंभांवेळी रक्तदान शिबिरेदेखील होतात. त्यावेळी अनेक रक्तदाते रक्तदान करतात. अनेकदा रक्तपेढीत जमा झालेले रक्त संपते आणि पुन्हा रक्ताची गरज भागविण्यासाठी या रक्तदात्यांना ब्लड बँकेतून रक्त हवे आहे, रक्तदान कराल का? असा प्रश्नवजा विनंती करणारा फोन केला जातो. दर तीन महिन्यांनी हे फोन रक्तदात्यांना येत असतात. मात्र, काही रक्तदात्यांना हे फोन डोकेदुखी ठरत असल्याची बाब समोर आली असून, त्यांनी अनेक ब्लड बँकांचे स्पॅम लिस्टमध्ये जोडले आहेत. परिणामी ब्लड बँकांचे फोनच रीसिव्ह होत नसल्याची स्थिती आहे.

अनेकदा अपघातांत जखमी झालेल्यांना किंवा एखाद्या शस्त्रक्रियेवेळी रुग्णांना अतिरिक्त रक्ताची गरज भासते, तेव्हा डॉक्टर्स रुग्णांच्या नातेवाइकांना ब्लड बँकेतून रक्ताच्या पिशव्या आणायला सांगतात. अनेकदा हवे त्या रक्तगटाचे पुरेसे रक्त किंवा रक्तपेशी उपलब्ध होत नाहीत. त्यावेळी ब्लड बँकादेखील रक्त मिळविण्यासाठी तीन महिने अगोदर रक्तदान करून गेलेल्या रक्तदात्यांना पुन्हा रक्तदान कराल का, अशी विनंती करण्यासाठी फोन करतात. ही परिस्थिती वरचेवर उद्भवत असते. रक्तदात्याचा संपर्क होईपर्यंत वारंवार फोन केले जातात. वेळोवेळी रक्तदात्याला रक्तदानाची आठवणही ब्लड बँक करून देते. मात्र, काही रक्तदात्यांनी ब्लड बँकांचे नंबरच स्पॅम लिस्टमध्ये टाकल्याने या अतिनिष्काळजीपणाचा त्रास मात्र अनेक रुग्णांना अन् त्यांच्या नातेवाइकांना मृत्यूसोबत झुंज करायला भाग पाडत आहे.


कुणावरही येऊ शकते वेळ...

अपघातात, शस्त्रक्रियेदरम्यान अथवा एखाद्या उपचारावेळी कुणाच्याही नातेवाइकाला रक्ताची गरज भासू शकते. त्यावेळी वेळेत रक्त उपलब्ध न झाल्यास रुग्णास जीव गमवावा लागू शकतो. त्यामुळे ब्लड बँकांचे फोन स्पॅममध्ये जोडण्यापेक्षा रक्तदानाचा हक्क बजावत जीवनदान करणे हे कर्तव्य समजून अशा रक्तदात्यांनी सामाजिक भान राखायला हवे, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस वसाहतीत ‘अव्यवस्था’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

पाथर्डी फाट्यावरील पोलिसांच्या वसाहतीतील अनेक समस्या वर्षानुवर्षे जैसे थे असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. या वसाहतीत महापालिकेच्या मूलभूत सुविधाही अनेक वर्षांपासून मिळत नसून, तक्रारी करूनदेखील महापालिकेचे अधिकारी लक्ष देत नसल्याचा, तसेच अधिकारांसंदर्भात टोलवाटोलवी केला जात असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.

पाथर्डी फाटा येथील वासननगर भागातील पोलिस वसाहतीत महापालिकेकडून पुरेशा सुविधा मिळत नसल्याने पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत असतात. या वसाहतीतील समस्या सोडविण्यासाठी सिडको विभागीय कार्यालयात तक्रारी दिल्या, तर अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे स्थानिक रहिवाशांनी आमदारांच्या येथील पाहणी दौऱ्यात सांगून, आता तरी या वसाहतीच्या समस्या सुटतील, अशी आशा व्यक्त केली.

पोलिस कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या वसाहतीचे सर्व काम पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येत असल्याने हे काम महापालिका प्रशासन करणार नसून, ते पाटबंधारे विभागानेच करायला हवे, असे उत्तरही यावेळी देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

याबाबत आहेत तक्रारी

महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय नेते येऊन मतांचा जोगवा मागतात. मतदान करण्यासाठी वसाहतीत प्रचार केला जात असला, तरी सुविधांप्रश्नी महापालिकेकडून होणाऱ्या टाळाटाळीच्या विषयावर कोणीच भाष्य करीत नसल्याची खंत रहिवाशांनी व्यक्‍त केली. सध्या वसाहतीत पाणी, पथदीप, रस्ते, ड्रेनेज आदी मूलभूत समस्यांचीदेखील वानवा असून, वसाहतीत कधीही स्वच्छता कर्मचारी येत नाहीत किंवा घंटागाडीसुद्धा येत नसल्याच्या तक्रारी महिलांनी केल्या आहेत.

आंदोलनाचा मार्ग

पोलिस वसाहतीतील महिलांनी मागील वर्षी पाण्याच्या समस्येसाठी थेट रास्ता रोको आंदोलनाचा मार्ग अवलंबला होता. त्यानंतर ही समस्या तात्पुरती सुटली असली, तरी अद्याप येथील सर्व समस्या सुटल्या नसल्याची तक्रार महिलांनी केली. शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांच्याच वसाहतीकडे महापालिका दुर्लक्ष करीत असल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये आश्चर्य व्य‍क्त करण्यात येत आहे.


‘समस्या निकाली काढणार’

पोलिस वसाहत पाटबंधारे विभागाने बांधली असली, तरी सुविधा या महापालिकेने दिल्या पाहिजेत. त्यामुळे या दोघांमध्ये चर्चा घडवून हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याचे आश्वासन आमदार सीमा हिरे यांनी यावेळी दिले. यावेळी प्रभागाच्या नगरसेविका पुष्पा आव्हाड, साहेबराव आव्हाड, एकनाथ नवले आदींसह पोलिस वसाहतीतील महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीटभट्टी व्यावसायिकांचे १८ एप्रिलला मुंबईत धरणे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्था यांच्या नेतृत्वाखाली वीट व्यावसायिकांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर १८ एप्रिलला एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ही माहिती नाशिकचे विभागीय संपर्कप्रमुख कचरू वैद्य व युवक अध्यक्ष ज्ञानेश रसाळ यांनी दिली. हे धरणे आंदोलन सकाळी ११ ते ६ या वेळेत होणार आहे.

या आंदोलनासाठी अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्था यांच्याकडून राज्यातील कुंभार समाजातील सर्व नागरिकांना संघटित करण्यात येत आहे. या आंदोलनात कुंभार समाजाच्या वीटभट्टी व्यावसायिकांकडून अकृषिक एनए (एन.ए.) व माती उखन्नन यावर २०१० पासून आकारलेल्या अनाठायी दंडाचे पैसे परत मिळावेत, सर्व तालुक्यात समान वीटभट्टी धोरण राबवण्यात यावे, कुंभार समाजावर तलाठी, तहसीलदार यांच्याकडून बळजबरीने वसूल करण्यात येणारी दंडाची रक्कम त्वरित परत करण्यात यावी, तसेच गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्र मातीकाम कलाकारी रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट स्थापन करण्यात यावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत.

या आंदोलनास नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त कुंभार समाज बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक विभागीय पदाधिकारी कचरू वैद्य, ज्ञानेश्वर भागवत, अंबादास गारे, विजय चव्हाण आदींनी केले आहे. अधिक माहितीसाठी कचरू वैद्य (९३२६११३७९४), ज्ञानेश रसाळ (७२७६००६०६५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमध्ये एप्रिलअखेरीस रंगणार बोहाडा नृत्य

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

दशावतारी सोंगाची प्रतीक्षा संपली असून, त्र्यंबकेश्वर सेवा सम‌ितीने येत्या २८ आणि २९ एप्रिल रोजी बोहाड्याच्या सोंगांचा कार्य्रकाम आयोज‌ित केला आहे. शहरात काही वर्षांपूर्वी कलगीवाले आणि तुरेवाले यांचे बोहाडे झाले. त्यानंतर काही सेवा समीतीने दशावतारी सोंगे नाचवली होती.

त्र्यंबकेश्वर येथे बोहाड्यातील सोंगांची खास परंपरा आहे. विश‌िष्ट सोंगे नाचविण्याची खास‌ियत असलेले वयोवृद्धांप्रमाणेच नव्या पिढीतील युवकही आहेत. सायंकाळी सात वाजता सुरू होणारा हा दशावतारी सोंगांचा खेळ दिवस उजाडेपर्यंत सुरू असतो. कुशावर्त तीर्थ ते लक्ष्मीनारायण चौक आणि पुन्हा कुशावर्त चौक असा गंगेच्या काठी होणारा हा उत्सव शेकडो वर्षांची परंपरा जोपासणारा आहे. सेवा सम‌िती अध्यक्ष लक्ष्मीकांत थेटे, महेश लोहगावकर, गिरीश जोशी आदींसह कुशावर्त चौकातील नागरीक गंगा मंदिरात झालेल्या नियोजन बैठकीस उपस्थित होते. सेवा सम‌ितीने बोहाड्यातील सोंगाच्या तयारीस सुरुवात केली आहे. ग्रामीण भागातून वाजंत्री पथक निवडण्यात आले आहे. त्यासाठी सरावही सुरू झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्धीची लढाई सिंगूरप्रमाणे लढू!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

समृद्धी महामार्गाच्या नावाखाली मुंबई ते नागपूर दरम्यानच्या दहा जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचे वाटोळे करण्याचा प्रयत्न सरकारने चालवला आहे. आज जे सुपात आहेत ते उद्या जात्यात असतील. आता सिंगूरच्या लढाईप्रमाणेच समृद्धीची लढाई स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून लढू, अशा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी आपल्याच सरकारला दिला आहे.

विश्वासात न घेता शेतकऱ्याची जमीन घेणार असाल तर पुढील परिणामांची तयारी सरकारने ठेवावी, असा सज्जड दमही त्यांनी भरला आहे.शेतकऱ्यांची कळ काढली तर काय होत हे अजित पवाराकडून जाणून घेण्याचा सल्लाही शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

शेट्टी यांनी राज्य सरकारसह अधिकाऱ्यांवर चांगलीच तोफ डागली. मावळमध्ये जबरदस्तीने पाणी आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तत्कालीन सरकारने कांताबाई ठक्कर या महिलेचा बळी घेतला. ज्यांनी हे पाप केले त्यांना आता सरकारविरोधात संघर्षयात्रा काढण्याची वेळ आली आहे, याचा बोध फडणवीस सरकारने घ्यावा. शेतकरी खवळला तर तुमची खुर्ची जायला वेळ लागणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी या वेळी दिला. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.

‘सरकारशी असहकार पुकारा’

कायदा शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. तुमच्या संमतीशिवाय शेतात कुणालाही पाय ठेवता येणार नाही. मोजणी तर दूर राहिली! जिल्हाधिकाऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, असा सल्ला त्यांनी दिला. शेतकऱ्यांचा बळी घेऊन विकासाचे स्वप्न पूर्ण होणार नाही. विकासच करायचा असेल तर आधी लोकांना विश्वासात घ्यावे लागते. त्यासाठी दडपशाही नको, असे खासदार शेट्टी म्हणाले. शिवडेकरांनी एकत्र येऊन लढा द्यावा, कुणी बाजूला जाऊन चालणार नाही. आम्ही सोबत आहोत. यापुढील काळात सरकारशी असहकार पुकारा. एकाही सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्याला गावात फिरकू देऊ नका, असे खासदार शेट्टी यांनी बजावले.

राधा, कृष्णची तोडफोड

शिवडेतील शेतकऱ्यांवर जबरदस्ती करणाऱ्या जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांचाही समाचार घेतला. शेतकऱ्यांच्या नादी लागू नकोस असा सल्ला देत,शेतकऱ्यांच्या नादी लागलास तर,राधाकृष्ण या नावातील राधा कुठे आणि कुष्ण कुठे जाईल हे ही कळणार नाही असा टोला लगावला.सरकारे येत जात राहतात.त्यामुळे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात काम करू नये असा सल्ला त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला.२६ तारखेच्या आंदोलनात आपण सहभागी होणार असल्याचे सांगत, जिल्हाधिकाऱ्यांना थेट आव्हान दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलनापूर्वीच ‘जिंदाल’ची माघार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

मुंढेगावजवळील जिंदाल कंपनीकडून परिसरातील कामगारांवर होत असलेला अन्याय तसेच प्रदूषण, जमिनीचा गैरवापर या पार्श्वभूमीवर मनसेने जिंदाल कंपनीला निवेदन देऊन शनिवारी आंदोलन करण्याबाबत इशारा दिला होता. या इशाऱ्याची कंपनी प्रशासनाने धसका घेत आंदोलनापूर्वीच जिल्हाधिकारी, कंपनी प्रशासन व मनसे पदाधिकारी यांची शुक्रवारी बैठक घेतली. या बैठकीत कामगारांच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाली. मनसेच्या जवळपास सर्वच मागण्या कंपनी प्रशासनाने मान्य केल्या.

मनसे शनिवारी कंपनीसमोर आंदोलन करणार होती. त्या आधी शुक्रवारीच जिल्हाधिकारी कार्यालायात निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या दालनात मनसे पदाधिकारी व कंपनी प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक पार पडली. मनसेचे नेते डॉ. प्रदीप पवार, माजी महापौर अशोक मुर्तडक, राहुल ढिकले, अॅड. रतनकुमार इचम, उपजिल्हाप्रमुख संदीप किर्वे, मूळचंद भगत यांच्यासह कंपनीचे प्रतिन‌िधी बॅनर्जी व शिंभूही बैठकीस उपस्थित होते. बैठकीत मनसेने निवेदनात केलेल्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. मागण्यांबाबत तातडीने अंमलबजावणी कराची असे खेडकर यांनी कंपनीला सूचित केले. कंपनीसमोर होणारे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती किर्वे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...म्हणे, जिल्ह्यात नाही सावकारी!

$
0
0

नाशिक : खासगी सावकारीचे प्रकार नाशिक जिल्ह्यात सर्रास सुरू असतांना राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्ह्यात सावकारी व्यवसायाचे प्रमाण कमी असल्याची माहिती सहकार अधिकाऱ्यांनी दिली. त्यांनी वर्षभरात केवळ खासगी सावकारीच्या चार तक्रारी आले असल्याचे सांगत हा प्रकार जिल्ह्यात नसल्याचे सांगितले. खासगी सावकारीतून कामगार, शेतमजूर व शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत असतांना जिल्ह्यात त्याचे प्रमाण कमी कसे झाले, असाही प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

नाशिक जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात सुध्दा खासगी सावकारीचा धंदा बिनबोभाट सुरू आहे. त्यातून अनेकांची पिळवणूक होत असतांना सहकारच्या अधिकाऱ्यांनी राज्यात इतर भागात खासगी सावकार आहे पण जिल्ह्यात नाही असे सांगून मंत्र्याचीही दिशाभूल केली. या आढावा बैठकीत बेकायदेशीर सावकारी प्रकरणाचा आढावा घेतांना अधिकाऱ्यांनी सांगितले, की सहकार विभागाकडे एकूण ४ प्रकरणे दाखल झाली. त्यात कालबाह्य प्रकरण, न्यायालयीन प्रकरण, उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेले प्रकरण, उपनिबंधक व सहाय्यक निबंधक यांच्याकडे चौकशीसाठी एकही प्रकरण नसल्याचे सांगितले. तसेच जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सुनावणी सुरू असलेली प्रकरणही असल्याचे म्हटले आहे. त्यापैकी एकाचाही निकाल लागला नाही. जमीन परत केलेली प्रकरण व विभागीय निबंधकाकडे दाखल केलेले एकही प्रकरण नसल्याचे म्हटले आहे.

राज्यात सावकारी मोठ्या प्रमाणात फोफावल्यामुळे २००७ मध्ये याविरूध्द कायदा करण्याची तयारी सरकारने सुरू केली त्यानंतर तब्बल ७ वर्षाने त्याची अमंलबजावणी सुरू झाली. पण या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यानेच धनधांडगे सावकार सर्वसामान्य गरजूंच्या असहाय्यतेचा फायदा घेत त्यांना वेठीस धरताना दिसतात. त्यामुळे सावकारी त्रासाला कंटाळून काहीजणांनी आत्महत्या केल्या आहे.पण त्याची कोणतीही माहिती यावेळी आढावा घेतांना देण्यात आली नाही. जिल्ह्यात गेल्या वर्षी तब्बल ८७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर या वर्षात साडेतीन महिन्यात हाच आकडा २१ झाला आहे. त्यामागे बहुतांश कारण हे खासगी सावकारीचे असल्याचेच बोलले जाते. शेतकऱ्यांच्या पिळवणूकीबरोबरच कामगार, शेतमजूर व मध्यमवर्गीय या सावकाराच्या पश्चात सहज अडकले जातात. त्यांना नंतर धमक्या दिल्या जातात. नाशिकमध्ये तर एकाचे अपहरणही करण्यात आले.

सामान्यांना बँकेच्या दारात जाणे आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे कटकटीचे वाटते. त्यामुळे ते खासगी सावकाराकडे जातात. पण सावकार त्या संधीचा फायदा घेऊन त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांची पिळवणूक करतो. या व्यवहारात कागदपत्र तयार करतांना बऱ्याच वेळा आता खरेदी खत किंवा साठे खत केल्याचे बोलले जाते. त्यामुळे तक्रार करणाऱ्यांना संधी मिळत नाही.

पुण्यात छापे; नाशकात थापा

नाशिकमध्ये सहकार विभागाचे अधिकारी थापा मारत असतांना पुणे येथे मात्र सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने गुरुवारी कात्रज येथील लेकटाउन गृहसंकुलातील एका फ्लॅटवर छापा टाकून बेकायदा सावकारी करणाऱ्या वडील आणि मुलाविरुद्ध कारवाई केली. या दोघांनी पुण्यासह कोल्हापूर आणि सांगली परिसरातील लोकांना सुमारे २० कोटी रुपये व्याजावर दिले होते. त्यांच्यावर महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ या कायद्याअंतर्गत उपनिबंधक कार्यालयाला कारवाई केली.

प्रभावी अमंलबजावणी नाही

महाराष्ट्र सावकारी अधिनियमाला सरकारने २०१० मध्ये पहिल्यांदा मान्यता दिली, मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे ते पाठविण्यात आले. राष्ट्रपती कार्यालयाकडून आलेल्या सूचना विचारात घेऊन २०१४ च्या विधिमंडळात हे विधेयक पुन्हा ठेवण्यात आले. विधिमंडळात हे विधेयक मंजूर झाल्यावर राष्ट्रपतींकडे पुन्हा मंजुरीसाठी पाठविण्यात आले. २ एप्रिल २०१४ रोजी राष्ट्रपतींनी या विधेयकास मंजुरी दिली. ४ एप्रिल २०१४ रोजी महाराष्ट्र सरकारने राजपत्रातून हा अधिनियम प्रसिद्ध करून लागू झाला. खासगी सावकारीच्या जाचातून मुक्तता होण्यासाठी शासनाने तयार केलेल्या नवीन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेहरू उद्यानाची दुर्दशा

$
0
0

नाशिकरोडच्या उद्यानात कचऱ्याचे साम्राज्य, पालिकाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड येथील वॉस्को चौकालगत असलेल्या नेहरू गार्डनची सध्या देखभालीअभावी दुरवस्था झालेली आहे. या उद्यानाच्या स्वच्छतेकडे पालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करित असल्याने या उद्यानाला कचरा कुंडीचे स्वरूप आले आहे. गेल्या काही वर्षांपासून याकडे दुर्लक्ष झाल्याने कचऱ्याचा ढीग झाला असून संरक्षक भिंतही ढासळली आहे. यामुळे परिसरातील लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यानच राहिलेले नाही. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी प्रशासनाला केली आहे.

येथील वॉस्को चौकालगतच पालिकेचे नेहरू उद्यान असून, शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले हे महत्त्वाचे उद्यान आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या उद्यानाची देखभाल पालिकेच्या उद्यान विभागाकडून होत नसल्याने या उद्यानाचे सौंदर्य लयास गेलेले आहे. आजमितीस या उद्यानात भिकारी, मद्यपी, जुगारी आणि भटकी जनावरे यांचा वावर वाढल्याचे चित्र आहे.

नेहरू उद्यान सर्वच बाजूंनी व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. काही व्यावसायिकांकडून तर या उद्यानाच्या जागेचाही वापर केला जाऊ लागला आहे. तसेच या उद्यानाची संरक्षक भींतही ढासळली आहे. अशा परिस्थितीत प्रशासन पूर्णपणे सुस्त झालेले दिसून येत आहे. तरी याकडे लक्ष देत उद्यानाची स्वच्छता करून दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

मद्याच्या बाटल्यांचा खच

या संपूर्ण उद्यानात मद्यपींचा दररोज अड्डा जमतो.त्यामुळे या ठिकाणी मद्याच्या बाटल्या इतस्ततः विखुरलेल्या दिसून येतात.या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या मंदिराचे काम गेल्या काही वर्षांपासून रखडलेले असल्याने या मंदिराच्या आश्रयाने येथे भिकाऱ्यांचाही मोठा वावर असतो. या उद्यानाच्या प्रवेशद्वारालगतच सिंहस्थाच्या काळात एक सार्वजनिक शौचालय उभारण्यात आले आहे. परिणामी, येथे कायमच दुर्गंधी असते. त्यामुळेही हे उद्यान ओस पडले आहे. या उद्यानात रेणुका देवीचे जुने मंदिर असल्याने या मंदिराच्या पावित्र्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्ताधाऱ्यांना फोडला घाम!

$
0
0

प्रभाग समित्यांच्या रचनेवरून पहिल्याच महासभेत विरोधक वरचढ

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी, प्रबळ व अभ्यासू नगरसेवकांची उणीव पहिल्याच महासभेत जाणवली. याउलट प्रबळ व अभ्यासू नगरसेवकांचे मोठे अस्र विरोधकांकडे असल्याची चुणूक दिसून आली असून, सत्ताधारी पहिल्याच सभेत घामाघूत झाल्याचे चित्र दिसले. प्रशासकीय व भौगोलिकदृष्ट्या महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या रचनेच्या प्रस्तावातील त्रुटी शोधून विरोधकांनी चक्क प्रशासनालाच दिलगिरी व्यक्त करण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे एका सदस्याने भाजपलाच घरचा आहेर दिला.

महापौर रंजना भानसी यांची शनिवारी विविध विषयांच्या मंजुरीसाठी पहिलीच महासभा होती. या महासभेत लोकसंख्येचा विचार करून प्रभाग समित्यांची रचना सहावरून नऊ करण्याचा विषय सभापटलावर ठेवण्यात आला होता. सभागृहात भाजपला बहुमत असल्याने सर्व प्रस्ताव चुटकीसरशी पास होतील, अशी अपेक्षा होती. परंतु, पहिलाच विषय मंजुरीवरून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व अपक्षांनी अल्पसंख्येत असूनही घाम फोडला. अपक्ष नगरसेवक गुरुमीत बग्गा यांनी प्रशासनाच्या प्रस्तावाची चिरफाड केली. या प्रस्तावात नमूद केलेल्या लोकसंख्येत मोठी तफावत होती. प्रशासनाला गांभीर्य नसल्याचा आरोप त्यांनी केला. सुधाकर बडगुजर यांनी प्रस्तावावरून प्रशासनाचा घाम फोडला. प्रशासनाकडून कलम २६ (अ) नुसार प्रभाग समित्या विस्ताराचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु, नगररचना अधिनियमामध्ये २६ (अ) कलम अन्य विषयांसाठी असल्याचे पुरावे बडगुजर यांनी सादर केले. तेव्हा चूक झाल्याचे लक्षात आल्यावर प्रशासन उपायुक्त विजय पगार यांनी प्रीटिंग मिस्टेक असल्याचे सांगून चुक दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी प्रशासन दिलगिरी व्यक्त करीत नाही तोपर्यंत सभा चालू देणार नसल्याचा इशारा दिला. त्यामुळे विजय पगार यांच्यावर सभागृहात दिलगिरी व्यक्त करण्याची नामुष्की ओढावली.

दिनकर पाटलांचा भाजपला घरचा आहेर

मनसेच्या सत्ताकाळात आक्रमक राहिलेले नगरसेवक दिनकर पाटील भाजपच्या सत्ताकाळातही आक्रमकच राहतील, असे संकेत त्यांनी दिले. पाटील यांनी सभागृहात महापौरांसह पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. विभागीय अधिकाऱ्यांच्या अधिकारावरून त्यांनी प्रशासनासह महापौरांना जाब विचारला. प्रशासन माहिती देत नाही तोपर्यंत खाली बसणार नाही, असा इशारा दिला. तेव्हा भाजपच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पाटील यांनी आपल्याच पक्षाच्या नगरसेवकाला तडजोडी सुरू झाल्या का असा सवाल करीत खडसावले. त्यामुळे विरोधकांना आयता मुद्दा मिळत त्यांनी सभागृहात गदारोळ सुरू केला.

महापौरांनी प्रशासनाचे उपटले कान

महापौरांनी पहिल्याच सभेत दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आल्याने संतप्त होऊन प्रशासनाचे कान उपटले. यापुढे असे चुकीचे डॉकेट मांडले, तर कारवाई करू असा सज्जड दम त्यांनी भरला. पाणीप्रश्न, टाक्यांच्या सुरक्षा यावरूनही सभागृहात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. भाजपकडे प्रबळ व अनुभवी व अभ्यासू नगरसेवकांची वाणवा असल्याचा प्रत्यय पहिल्याच सभेत आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राणप्रतिष्ठेसाठी मंगळवारचा अल्टिमेटम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर मंदिर गर्भगृहातील पार्वती मातेच्या मूर्ती प्रतिष्ठापणेच्या मुद्यावर आक्रमक होत साधू-महंतांनी आता १८ एप्रिलचा अल्ट‌मिेटम दिला आहे. त्र्यंबकेश्वर येथील अन्नपूर्णा आश्रमात षड्दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत डॉ. बिंदू महाराज यांनी मांडलेला ठराव सर्वानुमते पास करण्यात आला आहे.

गर्भगृहातील पावर्तीमातेच्या खंड‌ति मूर्तीबाबत महंतांनी देवस्थान ट्रस्टकडे आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे न्याय माग‌तिला आहे. आठ दिवसाची मुदत संपली मात्र अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे महंतांनी येत्या मंगळवारी (दि. १८) देवस्थान ट्रस्टकडे असलेली नवीन पार्वतीची मूर्ती ताब्यात घेण्यात यणार आहे. त्यानंतर पुरातत्व खात्याच्या समन्वयाने आणि पुरोहितांचा सल्ला घेऊन महंत स्वतः मूर्तीची प्राणपतिष्ठा करणार आहेत.

या बैठकीत विश्वस्त ललीता शिंदे म्हणाल्या, माझा भाऊ कैलास देशमुख हा मंदिराचा पुजारी आहे. आपण गर्भगृहात गेलोलो नाही. मात्र त्याने ही मूर्ती खंड‌ति झाल्याचे आपल्या निदर्शनास आणले. त्यानंतर खूप प्रयत्न करून मी नवीन मूर्ती तयार करून आणली. मात्र ट्रस्ट त्यास साथ देत नाही. उलटपक्षी त्यांनी अनेक वेळा आपण केलेल्या मागण्या धुडकावून लावल्या आहेत. अध्यक्ष स्वामी सागरानंद महाराज यांनी शांततेने हा विधी पार पाडावा, असे आवाहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लक्षणे ओळखा, त्वरित उपचार करा’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

धोकादायक स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकारी व खासगी डॉक्‍टरांनी लक्षणे ओळखून पेशंटवर तातडीने उपचार करावेत. थुंकीचा अहवाल येण्याची वाट पाहत बसू नका, असा स्पष्ट आदेश आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज दिला.

जिल्हाधिकारी, सिव्हिल सर्जन, महापालिका वैद्यकीय अधिकारी, सर्व विभागाचे उपसंचालक, यांच्यासमवेत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी व्हिडीओ कॉन्सफरन्सद्वारे संवाद साधला. अतिरिक्त मुख्य सचिव विजय सतबीरसिंग, आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार आदी उपस्थित होते.

स्वाइन फ्लू रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत बैठकीत माहिती देण्यात आली. स्वाइन फ्लू आणि फ्लू यांची लक्षणे एकसारखी असतात. स्वाइन फ्लूच्या पेशंटला तीव्र ताप आणि तीव्र घसादुखी असते, तर साधा फ्लू असणाऱ्या रुग्णास कमी ताप व कमी घसादुखी असल्याने डॉक्‍टरांनी ही लक्षणे ओळखून तातडीने त्यावर टॅमी फ्लूच्या गोळ्या देऊन उपचार करावेत. सर्व खासगी मेडिकलमध्येही टॅमी फ्लूच्या गोळ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, संशयित पेशंटच्या थुंकीचे नमुन्यांच्या पुणे येथील प्रयोगशाळेकडील अहवालाची प्रतीक्षा न करता यापुढे लागलीच कार्यवाही करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले. पेशंटसाठी हा मोठा दिलासादायक निर्णय ठरणार आहे. दरम्यान, चालू वर्षीही राज्यात स्वाइन फ्लूने थैमान घातले असून, राज्यात पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये सर्वाधिक २६ मृत्यू झाले आहेत.


स्वाइन फ्लूच्या १५ रुग्णांवर सध्या उपचार

जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकूण ४४ हजार २४३ स्वाइन फ्लू संशयित पेशंट्सची तपासणी करण्यात आली. त्यातील ७१० जणांवर उपचार करून सोडून देण्यात आले. १६२ पेशंट्सला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यात आले. त्यापैकी १०२ पेशंट्स ठणठणीत बरे झाले. उर्वरित पेशंट्सपैकी १५ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images