Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

तळेगावजवळ अपघातात २ ट्रकचालक ठार

$
0
0
नांदगाव रोडवरील तळेगावजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही ट्रकचालक ठार झाले, तर एक जण जखमी झाला. शनिवारी रात्री एकच्या सुमारास ही घटना घडली.

जखमींच्या प्रकृतीत सुधारणा

$
0
0
मंगला एक्सप्रेस अपघातातील जखमी मायलेकींची प्रकृती अद्याप चिंताजनक असून नाशिकरोड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

वैद्यकीय विभागाला मिळणार ४९० कर्मचारी

$
0
0
आगामी कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला ४९० कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून तसा प्रस्ताव वैद्यकीय विभागाने तयार करून मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला होता.

मुलीच्या अपहरणाचा पित्यावर गुन्हा

$
0
0
मतिमंद आणि अंध मुलीचे अपहरण केल्याच्या आरोपावरून एका पित्याला पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर केले असता २० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

सुगंध असेल तर दरवळणारच!

$
0
0
फुलात सुगंध असेल तर त्याचा दरवळ पसरल्याशिवाय राहात नाही. कलेचेही तसेच आहे. कला कोणतीही असो, जीव ओतला की ती सजीव होते. चैतन्याने बहरते.

नियमित घरपट्टी वाल्यांना दिलासा!

$
0
0
नियमितपणे घरपट्टी भरूनही दोन टक्के दंड आकारल्या गेलेल्या घरमालकांना महापालिकेने दिलासा दिला आहे. एप्रिल ते सप्टेंबर या काळात घरपट्टीतून घेतली गेलेली दोन टक्के शास्तीची (दंड) रक्कम पुढील वर्षीच्या घरपट्टीत जमा केली जाणार आहे.

भंगार बाजार हटवा

$
0
0
अंबड लिंकरोडवरील विवादास्पद तसेच अनाधिकृत भंगार बाजार हटवण्यासंबंधी महापालिका प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, असे निवेदन माजी नगरसेवक दिलीप दातीर यांनी आयुक्त संजय खंदारे यांना दिले आहे.

यंत्रमाग बंदमुळे कोट्यवधींचा फटका

$
0
0
वाढीव वीजदरवाढीच्या निषेधार्थ गेल्या मंगळवारपासून सुरू असलेल्या मालेगाव शहरातील यंत्रमाग बंद आंदोलनामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे.

एकलहरेत पर्यावरण नियमांची ‘राख’!

$
0
0
केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाच्या अनेक नियमांची एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राकडून ‘राख’ केली जात असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.

आरोग्यच्या परीक्षा पुढे ढकलल्या

$
0
0
गेले काही दिवस सुरू असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध मेडिकल अभ्यासक्रमांच्या परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

क्रेसिंगची परवानगी नाकारली

$
0
0
देवळा तालुक्यातील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या क्रेसिंगला पुण्याच्या साखर आयुक्तांनी परवानगी नाकारल्याने खळबळ उडाली आहे.

आर्द्रतेच्या अटीमुळे मका उत्पादकांचे नुकसान

$
0
0
आधारभूत किमतीने मका खरेदी करण्यासाठी सरकारने मक्यात १४ टक्क्यांपेक्षा कमी आर्द्रतेची अट घातल्यामुळे नाइलाजास्तव शेकडो क्विंटल माल कमी दराने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढवली आहे.

‘मंगला एक्स्प्रेस’ अपघात अहवाल ६ महिन्यांत

$
0
0
मंगला एक्स्प्रेसला झालेल्या अपघाताची मध्यरेल्वेच्या समितीकडून चौकशी सुरू झाली आहे. चौकशीचे काम विशेष समितीकडे सोपविण्यात आले असून त्यासंदर्भातील अहवाल १८० दिवसांत सादर केला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेतील सूत्रांनी दिली आहे.

पॅरोलवरील दोघांवर गुन्हा

$
0
0
खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झालेले आणि संचित रजेवर नाशिकमध्ये आलेले कैदी सुटीचा कालावधी संपूनही पुन्हा कारागृहात न परतल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘त्या’ निर्दयी बापावर खुनाचा गुन्हा

$
0
0
अपहृत मतिमंद आणि अंध मुलीचा मृतदेह सापडल्याने तिच्या निर्दयी पित्यावर पंचवटी पोलिसांनी सोमवारी रात्री खुनाचा गुन्हा दाखल केला. एपीआय पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास सीताराम कांबळे (३३, रा. माडसांगवी, मूळगाव यवतमाळ) असे त्याचे नाव आहे.

शहरात दोघांची आत्महत्या

$
0
0
शहरात दोन दिवसांत दोघांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. कामगारनगर परिसरात योगिता रावसाहेब धात्रक (२३) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

मी संगमनेरमध्येच बरा...

$
0
0
‘मी संगमनेरमध्येच बरा आहे!’ असे सांगत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ते औरंगाबादमधून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चेला विराम दिला आहे.

मराठा आरक्षणाबाबत आर्थिक निकष चुकीचा

$
0
0
काही लोक मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण देण्यासंदर्भात भूमिका मांडत आहेत. मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार ते शक्य नसून आरक्षणासाठीचा आर्थिक निकष चुकीचा असल्याचे सांगत आमदार विनायक मेटे यांनी केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.

डेंग्यूमुळे पंचवटीतील तरुणाचा मृत्यू

$
0
0
शहरात उच्छाद मांडलेल्या डेंग्यूने सोमवारी एका २२ वर्षीय तरुणाचा बळी घेतला. वर्षभरातील डेंग्यूचा हा दुसरा बळी. धक्कादायक बाब म्हणजे पंचवटीतल्या एकाच प्रभागात १५ हून अधिक डेंग्यूचे संशयित पेशंट आढळून आले आहेत.

आदिवासी संशोधन संस्थेला स्वायत्तता

$
0
0
राज्याच्या आदिवासी संशोधन संस्थेच्या कार्याला गती देण्यासाठी तिला स्वायत्तता देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी केली.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images