Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

भुर्दंडाने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी

$
0
0
घरगुती गॅसची सबसिडी थेट बँक खात्यात जमा करण्याच्या नव्या प्रणालीमुळे ग्राहकांना सुमारे सव्वाशे रुपयांचा भुर्दंड बसत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

आरोग्य परीक्षा; उद्याच्या बैठकीकडे लक्ष

$
0
0
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्य विद्यापीठातील अधिकाऱ्यांची बैठक बुधवार, २० नोव्हेंबर रोजी होत आहे.

सुरक्षेसाठी थेट पोलिस महासंचालकांना पत्र

$
0
0
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुरक्षेप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्राकडे नाशिकच्या पोलिस आयुक्तांनी कानाडोळा केल्याने आता हा प्रश्न थेट पोलिस महासंचालकांकडे जाणार आहे.

LED प्रकरणात ‘MIC’ची चांदी

$
0
0
राष्ट्रकुल घोटाळ्यातील कथीत सहभागामुळे बदनाम झालेल्या तसेच दिल्ली महापालिकेने काळ्या यादीत टाकलेल्या एमआयसी कंपनीला एलईडी बसवण्याचा ठेका महापालिकेने दिला आहे.

मराठा आरक्षणाचा अहवाल निवडणुकीपूर्वी

$
0
0
‘मराठा आरक्षणाबाबत आम्ही आमचा अहवाल लोकसभा निवडणुकीपूर्वीच राज्य सरकारला देऊ. मात्र, त्यावर निर्णय घ्यायचा अधिकार सरकारवर अवलंबून असेल’, असे सांगत मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष तथा राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीतही मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरण्याचे संकेत दिले.

गरजूंना 'आरोग्य'दायीचा दिलासा

$
0
0
पहिल्या टप्प्यात सहा जिल्ह्यांमध्ये राबविली जात असलेली राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना येत्या शनिवारपासून राज्यभर राबविली जाणार आहे. या योजनेचा शुभारंभ युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते नागपूरमध्ये २१ नोव्हेंबरला होणार आहे.

युवकांना मिळणार कौशल्याधारित संधी

$
0
0
कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची बाजारपेठेची वाढती गरज लक्षात घेऊन अडीच महिन्यांच्या प्रशिक्षणाची संधी शहरातील युवकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नाशिक एज्युकेशन सोसायटी आणि कोठारी फाऊंडेशन यांच्यातर्फे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

कार्यकर्त्यांनी जागृत रहावे

$
0
0
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जातीयवादी पक्षांना दूर सारण्याचे आव्हान काँग्रेससमोर असेल. तसेच नव्याने साकारण्यात येणाऱ्या शहर विकास आराखड्यातही आपल्या शेतजमिनीवर आरक्षण टाकले जाऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी जागृत राहण्याचे आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. आकाश छाजेड यांनी केले.

'भरती'च्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी

$
0
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उच्च व तंत्रशिक्षण विभागात ड्रेस डिझायनिंग व गारमेंट मॅन्युफॅक्चरींग विषयातील अधिव्याख्याता पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

उत्सुकता, उत्साह आणि वाद

$
0
0
एरवी किरकोळ वर्दळ वगळता शांत असलेला सरकारी विश्रामगृह परिसर सोमवारी मराठा आरक्षण समितीच्या बैठकीमुळे पोलिसांसह संघटनांच्या गर्दीने गजबजला होता. समितीसमोर कुठलाही गोंधळ होऊ नये म्हणून पोलिस तैनात होते. तर, काहीही करुन समितीत्या सदस्यांना भेटायचे यासाठी नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते.

चांगल्या कामाचं बक्षीस... चॉकलेट

$
0
0
बेरोजगार तरुणाई आणि बँक यांचा काय संबंध? मात्र, तो अनेक अर्थाने आहे. सध्या अगदी साध्या शिपायापासून ‘यूपीएससी’पर्यंतची कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, अर्ज दाखल करण्यापासून सर्व प्रक्रिया ऑनलाईन झालेली आहे. तसेच परीक्षा शुल्क राष्ट्रीयीकृत बँकेद्वारेच भरले जाते.

सिव्हिल हॉस्पिटलवर वॉच सीसीटीव्हींचा

$
0
0
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नुकतेच अत्याधुनिक आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. विविध वॉर्डांमध्ये चालणारे कामकाज आणि विशेषत: रुग्णांना मिळणारी वागणूक यावर हॉस्पिटलमधील वरिष्ठांची नजर राहावी यासाठी या कॅमेऱ्यांची मदत होणार आहे.

आता अत्याधुनिक ‘सेतू’!

$
0
0
अलोट गर्दी, लांबच लांब रांगा आणि एजंटचा ससेमिरा यांच्या गर्तेत सापडलेल्या सेतू केंद्राचे रूपडे आता बदलणार आहे. राज्य सरकारने दिलेल्या नव्या निकषांनुसार नाशिक शहर आणि ग्रामीण भागासाठीचे टेंडर काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.

अंबडमध्ये वर्षभरात ट्रक टर्मिनस

$
0
0
अंबड औद्योगिक वसाहतीत २१,५०० चौरस मीटर भूखंडावर अद्ययावत ट्रक टर्मिनस साकारले जाणार आहे. येत्या वर्षभरात हा प्रकल्प साकारला जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात निमाचे पदाधिकारी आणि एमआयडीसीचे अधिकारी यांच्यात नुकतीच बैठक झाली.

काल गारठा, आज थंडी

$
0
0
रविवारी ९.७ अंश सेल्सिअसवर केलेल्या तपमानाने नाशिककरांना गारठ्याचा अनुभव दिला, तर सोमवारी तब्बल चार अंशांनी तपमानात वाढ झाल्याने सलग दोन दिवसात चार अंशांच्या चढ-उताराचा सामना नाशिककरांना करावा लागला.

अडचणीतील ठेवीदार लढणार

$
0
0
गैरव्यवहारांसह विविध कारणांमुळे अडचणीत आलेल्या बँक तसेच पतसंस्थांच्या ठेवीदारांचे आता संघटन होणार आहे. यामाध्यमातून ठेवी परत मिळविण्यासाठी तसेच गैरव्यवहारास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई होण्यासाठी दबावही निर्माण केला जाणार आहे.

वादग्रस्त एलईडीसाठी बनवाबनवी

$
0
0
वादग्रस्त एलईडी फिटिंगसंदर्भांत महापालिका प्रशासनाने वर्क ऑर्डर काढल्याची माहिती समोर आली आहे. विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वृत्तास दुजोरा दिला असून प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात कोर्टात अवमान याचिका दाखल करण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला आहे.

पेन्शन आमच्या हक्काची...

$
0
0
ज्येष्ठ नागरिकांच्या वयाबाबत राज्य सरकारची अट रद्द करण्यासह वाढत्या महागाईच्या तुलनेत तुटपुंजी पेन्शन वाढविण्याच्या मागणीसाठी बुधवारी सीबीएस परिसर दणाणला.

घर घालू धंदा

$
0
0
दिल्ली येथे निर्भया रेप प्रकरणसमोर आल्यानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण कमी करण्यासाठी मोठ्या शहरात किमान स्ट्रीट लाईटची संख्या वाढवण्यास प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत प्रकर्षाने पुढे आले.

शिवपदस्पर्श दिनासाठी विश्रामगड सज्ज!

$
0
0
सिन्नर तालुक्यातील पट्टागड परिसरात असलेल्या विश्रामगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी पाऊल ठेवल्याच्या घटनेला आज, २२ नोव्हेंबर रोजी ३३४ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने शिवपदस्पर्शदिनाच्या पार्श्वभूमीवर विश्रामगड विकास मंडळासह शिवप्रेमींकडून सोहळ्याची जय्यत तयारी झाली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images