Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नववर्षात भाविक सप्तशृंगीचरणी लीन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्या शक्तीपीठाचे महत्त्व असलेल्या श्री सप्तशृंग निवासिनी देवी गडावर रविवारी (दि. ०१) नवीन वर्षाच्या स्वागतासह सुखद शुभारंभानिमित्त लाखो भाविकांनी भगवतीचे दर्शन घेतले. शनिवारसह या दोन दिवसांत रात्री उशिरापर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी दर्शन रांगेत मोठी गर्दी केली होती. तासनतास बारीमध्ये उभे राहून त्यांनी देवीचे दर्शन घेतले. दोन दिवसांची गर्दी पाहून मंदिर यात्रोत्सवाप्रमाणे २४ तास उघडे ठेवण्याचा निर्णय देवस्थानने घेतला होता.

२०१६ या सरत्या वर्षाला निरोप देत नूतन वर्षाचे स्वागत अनेकांनी रंगीत संगीत पार्ट्या, नाचगाणे करत मनमुरादपणे केले. मात्र याठिकाणी लाखो भाविकांनी आई भगवतीचे दर्शन घेत आध्यात्मिक व पर्यटन यांच्यात समन्वय साधत नूतन वर्षाचे स्वागत केले. यावेळी गायिका अनुराधा पौडवाल यांनीही गडावर येत दर्शन घेतले. त्यांचे स्वागत ग्रामपंचायत सदस्य राजेश कोळी यांनी केले. भाविकांना जे सहकार्य देवस्थानमार्फत केले जाते त्या धर्तीवर या दोन दिवसांत सहकार्य केल्याची माहिती देवस्थानचे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, भिकन वाबळे यांनी दिली.

जल्लोषात स्वागत

मनमाड : मनमाडसह नांदगाव व चांदवड तालुक्यात नववर्षाचे उत्साहात व जल्लोषात स्वागत करण्यात आले. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन परिसरात करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालखेडच्या पाण्याने भरले ३३ बंधारे

$
0
0

शेतकऱ्यांच्या आंदोलनाची फलनिष्पत्ती; परिसरातील जलस्रोताचा पिकांना होणार फायदा

म. टा. वृत्तसेवा, येवला

पालखेड पाटबंधारे विभागाने डाव्या कालव्यामार्फत रब्बी हंगामातील शेती सिंचनासाठी सोडलेल्या पाणी आवर्तनातून बंधारे भरून द्यावेत, या मागणीसाठी आक्रमक होत काही दिवसांपूर्वी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले होते. त्याची दखल पालकमंत्र्यांनी घेत पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाची फलनिष्पत्ती झाली असून अखेर बंधारे पाण्याने भरले गेले आहेत.

या सर्व प्रकरणात आंदोलनकर्त्यांच्या तीव्र भावनांची पालकमंत्र्यांनी घेतलेली दखल, पाणी सोडण्याचे दिले गेलेले आदेश अन् पालखेडच्या अधिकाऱ्यांकडून पाणी तत्काळ सोडण्याची झालेली कार्यवाही यातून तालुक्यातील पालखेडच्या वितरिका क्रमांक ४६ ते ५२ या लाभक्षेत्रात येणारे तब्बल ३३ बंधारे नुकतेच भरले गेले आहेत.

परिसरातील वितरिकांमधून बऱ्याच कालखंडानंतर खळाळलेलं पालखेडचं पाणी अन् त्यातून भरले गेलेले बंधारे याने परिसरातील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधानाच्या स्पष्ट छटा दिसत आहेत.

पालखेड पाटबंधारे विभागाच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून पालखेड डाव्या कालव्यामार्फत येवला तालुक्यातील रब्बी हंगामासाठी शेती सिंचनाचे पाणी आवर्तन सोडले आहे.

या आवर्तनास प्रारंभ होताना त्यात तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील क्रमांक ४६ ते ५२ या पालखेडच्या वितरिकांचा समावेश केला गेला नव्हता. त्यामुळे या भागातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते. परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी सोडलेल्या पाणी आवर्तनातून या भागातील सर्वच्या सर्व बंधारे भरून देण्याच्या आग्रही मागणीसाठी शेकडो शेतकऱ्यांनी पालखेडच्या येवला उपविभागीय कार्यालयासमोर बेमूदत उपोषणाचे हत्यार उपसले होते.

पाणी सोडल्याशिवाय माघार नाही, असाच ठाम पवित्रा त्यानीं घेतला होता. यानंतर हे ग्रामस्थ मागे हटत नसल्याने आंदोलनाची अखेर दखल घेतली गेली.

याबाबतचे वृत्त ‘मटा’ने प्रकाशित केले होते. यानंतर ही बाब जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या दरबारी पोहोचविण्यात आली होती. त्यांनी या आंदोलनातील उपोषणकर्त्यांच्या भावनांची दखल घेतली. तसेच त्यांनी दिलेल्या आदेशानुसार पालखेड पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाणी सोडण्याची कार्यवाही सुरू करणयात आली. यामुळेच येवला तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे तब्बल ३३ बंधारे पाण्याने भरले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेवाळीजवळ गांजाची अवैध शेती

$
0
0

सेवेकरीसह पाचजणांना अटक

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेवाळी गावाच्या शिवारातील एका डोंगरावर मंदिराच्या आवरात गांजाची शेती करीत अवैधरित्या नशेचा काळा कारभार करणाऱ्या सेवेकरीसह पाच जणांना साक्री पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी (दि. ०१) मध्यरात्री याठिकाणी छापा टाकून पोलिसांनी सेवेकरी आणि पाच जणांना रंगेहाथ पकडली. त्यावेळी गांजाचा साठा, मोटारसायकली, मोबाइल असा एकूण एक लाख ४३ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या कारवाईने साक्री तालुक्यात खळबळ उडाली आहे.

साक्री तालुक्यातील शेवाळी गावाच्या शिवारातील डोंगरावर शिवमंदिर परिसरात राहणाऱ्या बन्सीलाल धाकू पगारे हा मंदिर व त्याठिकाणच्या मोकळ्या जागेत गांजाची शेती करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावर पोलिसांनी रविवारी मध्यरात्री डोंगरावरील मंदिर व परिसरात छापा टाकला. या वेळी पाच जण एकत्र बसून गांजा पित असल्याचे आढळून आले. प्रसंगी बन्सीलाल पगारेसह अन्य चार जणांना पोलिसांनी अटक केली असून त्याठिकाणाहून पाच किलो ३०० ग्रॅम वजनाचे हिरवी गांजाची झाडे ताब्यात घेण्यात आली. याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात पाच आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई साक्री पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश सोनवणे, कन्हैयालाल दामोदर, प्रेमनाथ ढोले आदींनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनोद्यान संवर्धनाचे शिवधनुष्य पेलवणार का?

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सिडको

महापालिकेने पुढाकार घेऊन वन विभागाच्या व टाटा ट्रस्टच्या सहकार्याने पांडवलेणीमागील जवाहरलाल नेहरू औषधी वनोद्यानाचा चांगल्या प्रकारे विकास केला आहे. मात्र, आता त्याची निगा प्रशासनाकडून कितपत राखली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरात यापूर्वीही अनेक वास्तूंची निर्मिती झाली असली, तरी त्यांची उपयुक्‍तता नाशिककरांना झाली नसल्याचे दिसून येत आहे. महापालिका, वन विभाग व टाटा ट्रस्टने तयार केलेल्या या उद्यानाचे सिनेकलाकारांनी तोंडभरून कौतुक केले आणि या उद्यानाची जपणूक करण्याची खरी जबाबदारी नाशिकरकांची असल्याचे स्पष्ट मतही मांडले गेले. मात्र, महापालिकेच्या यापूर्वीच्या काही महत्त्वाच्या प्रकल्पांची झालेली दुरवस्था पाहता वनोद्यान संवर्धनाचे हे शिवधनुष्य महापालिकेला पेलवणार का, असा सवाल नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे.

पेलिकन पार्कची वाट

यापूर्वी शहरात प्रथमच सिडकोने विकसित केलेल्या नवीन नाशिक विभागातील १७ एकरचा भूखंड सिडकोने महापालिकेला देऊन तो विकसित करण्याची संधी दिली होती. महापालिकेनेसुद्धा खासगी विकसकाकडून या ठिकाणी पेलिकन पार्क उभारले, पार्कचा उद्‌घाटन सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. मात्र, आज हे पार्क बंद होऊन न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेले दिसत आहे. या पार्कची जागा म्हणजे सध्यस्थितीत एक कचरा डेपोच होऊन परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

महापालिकेने विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राची माहिती व्हावी, या हेतूने तारांगणाची उभारणी केली. मात्र, ते सध्या बंद आहे, की सुरू याची माहितीच बहुसंख्य नाशिककरांना नाही. त्यानंतर आता लगेचच महापालिकेने वन विभागाकडून मिळालेल्या जागेवर जवाहरलाल नेहरू उद्यान विकसित करण्यासाठी टाटा ट्रस्टची निवड केली आणि हे उद्यान साकारले खरे, पण आता पुढे याची निगा राखून आहे त्या पद्धतीत ठेवण्यासाठी प्रशासन खरोखरच लक्ष देणार की नाही, असा प्रश्न नाशिककरांनी उपस्थित केला आहे. लोकार्पण सोहळा झाला, की त्याकडे बघायचेच नसते, असा जणू नियमच महापालिका प्रशासनाने केला आहे की काय, असा प्रश्न नाशिककरांनी उपस्थित केला आहे. या उद्यानात उभारण्यात आलेली यंत्रणा सर्वार्थाने सुंदर असली, तरी त्याची निगा राखण्याची नवनिर्माणकर्त्यांबरोबरच अन्य राजकीय नेत्यांचीसुद्धा येणार असल्याचे, तसेच यापूर्वीच्या प्रकल्पांचीसुद्धा देखभाल करण्याची गरज असल्याचे मत नाशिककरांनी व्यक्‍त केले आहे.


फाळके स्मारकाचा धडा

महापालिकेने पांडवलेणीच्या पायथ्याशी भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके नावाने स्मारक उभारले. त्याच्या उद््घाटनावेळीसुद्धा अनेक सिनेकलाकारांनी हजेरी लावली होती. येथे सिनेमांचे चित्रीकरण करण्यात येईल, अशी घोषणाही त्यावेळी करण्यात आली होती. प्रथमच येथे चित्रपट दाखविण्याची, तसेच संगीत कारंजाची उभारणी करण्यात आली होती. त्यामुळे नाशिककरांना या स्मारकाची ओढ लागली होती. मात्र, हळूहळू हे स्मारक म्हणजे केवळ प्रेमीयुगुलांचा अड्डाच बनले असून, येथील सुरुवातीच्या सुविधाही कार्यरत नाहीत. सिनेमाच काय, पण साध्या जाहिरातीचे चित्रीकरणसुद्धा येथे होणे शक्य नसल्याची स्थिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५७ जणांवर गुन्हे; २८ जण अटकेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील हिंमतनगर भागात दोन गटांत शनिवारी मध्यरात्री व रविवारी झालेल्या हाणामारीप्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी ५७ जणांवर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, २८ जणांना अटक करण्यात आली आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप दुनगहू यांच्या फिर्यादिवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कॅम्प भागातील हिंमतनगर मारुती मंदिराजवळ शनिवारी (दि. ३१) मध्यरात्री प्रकाश हौसिंग सोसासटी येथे राहणाऱ्या १० ते १२ जणांच्या जमावाने शिवीगाळ व मारहाण करून दंगल घडवल्याप्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी १० ते १२ जणांना ताब्यातदेखील घेण्यात आले होते. अप्‍पर पोलिस अधीक्षक राकेश ओला, पोलिस उपाधीक्षक अजित हगवणे यांनी धाव घेत शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र रविवारी पुन्हा एकदा दिवसभर या परिसरात संतप्त नागरिकांकडून दगडफेकीचा प्रकार झाल्याने तणावाचे वातावरण कायम होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेचे संचालक मंडळ धोक्यात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा बँकेच्या अध्यक्षांसह संचालक मंडळाच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. जिल्हा बँकेतील वादग्रस्त नोकरभरती, तिजोरी खरेदी प्रकरण, बेकायदा नेमणुका केल्याप्रकरणी सहकार विभागाने अध्यक्षांसह संचालक मंडळावर ठपका ठेवला आहे. अध्यक्षांसह संचालकांनी बँकेचे आर्थिक नुकसान केल्याचे सहकार विभागाने केलेल्या चौकशीत समोर आले असून, नुकसानीच्या वसुलीची जबाबदारी संबंधितांवर निश्चित करण्यासाठी विभागीय सहनिबंधकांनी प्राधिकृत चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.

अध्यक्ष नरेंद्र दराडेंसह संचालक मंडळाने सहकार विभागाचे नियम धाब्यावर बसवत बँकेचे कामकाज केल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. वादग्रस्त नोकरभरती, तिजोरी खरेदी, स्वतःच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी केलेला न्यायालयीन खर्च, बंदूकधारी सुरक्षा रक्षकांची परस्पर नेमणूक व बेकायदेशीर अन्य नेमणुकांच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या पी. एस पाटील यांच्या चौकशी समितीने अध्यक्षांसह संचालक मंडळावर ठपका ठेवला. संबंधितांनी सहकार विभागाचे नियम डावलून मनमानी पद्धतीने कामकाज केल्याचा अहवाल पाटील यांनी सादर केला आहे. त्यामुळे या संचालक मंडळावर कारवाईसाठी जनता दलाचे सचिव डॉ. गिरीश मोहिते यांनी उपोषणाचा इशारा दिला होता.

अधिकाऱ्याची नियुक्ती

अध्यक्षासंह संचालकांनी बँकेच्या केलेल्या आर्थिक नुकसानीची वसुली संचालकांकडून करण्यात येणार असून, त्या जबाबदारी निश्चितीसाठी सहकार विभागाने प्राधिकृत चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. त्यामुळे संचालक मंडळावर आता कारवाई होण्याची शक्यता असून, त्यांचे पदही धोक्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटाबंदीचा डंका पिटणार गल्लीपासून दिल्लीपर्यंत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटीबंदीचा निर्णयानंतर ५० दिवस होऊनही परिस्थिती जैसे थे असल्याने हा निर्णय पूर्णतः फसलेला आहे. या फसव्या निर्णयाविरोधात काँग्रेसने देशाव्यापी आंदोलन फुकारले असून, त्यानुसार शहर व जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ६) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन निषेध केला जाणार आहे. तसेच रविवारी काँग्रेसतर्फे थाळीनाद आंदोलन केले जाणार असल्याची माहिती जिल्ह्याचे प्रभारी आमदार भाई जगताप यांनी दिली.

दरम्यान, मनसेसोबत आघाडीची शक्यता त्यांनी फेटाळून लावली असून, राष्ट्रवादीसोबतच आघाडी करण्याचा निर्णय स्थानिक नेतेच घेणार असल्याचे त्यानी स्पष्ट केले. नोटांबदीच्या निर्णयाविरोधात काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलन करण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीत आयोज‌ित पत्रकार परिषदेत आमदार जगताप बोलत होते. नोटाबंदीच्या निर्णयावर ५० दिवस कळ सोसा, असे आवाहन पतंप्रधानांनी केले होते. त्यानुसार सामान्यांनी ५० दिवस कळही सोसली. परंतु, ५० दिवस झाल्यानंतर किती काळापैसा बाहेर आला हे सांगितले जात नाही. याचा अर्थ हा निर्णय फसलेला असून, तो सामान्यांच्या विरोधातील आहे. या निर्णयाविरोधात काँग्रेसने देशभरात आंदोलन सुरू केले आहे. नोटबंदी विरोधात देशात तीन टप्यात हे आंदोलन होणार आहे. पहिल्या टप्यात शुक्रवारी (दि. ६) जिल्हााधिकारी यांना निवेदन देऊन या निर्णयाचा निषेध केला जाईल. रविवारी (दि.८) काँग्रेसच्या सर्व फ्रंटलतर्फे थालीनाद आंदोलन करण्यात येईल, तर तिसऱ्या टप्यात बुधवारी (दि.११) दिल्लीत राष्ट्रीय आंदोलन होणार आहे. प्रभारी माजी खा. उल्हास पाटील, अविनाश रामिष्टये, सत्यजीत तांबे, डॉ. शोभा बच्छाव उपस्थित होते.

३१ डिसेंबरच्या घोषणा लॉलीपॉप
पंतप्रधान मोदी यांनी ३१ डिसेंबरला केलेल्या घोषणा केवळ शेतकरी, सामान्य यांच्यासाठी लॉलीपॉप आहे, यातून काहीही मिळणार नसल्याचा आरोप आ. जगताप यांनी यावेळी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खतप्रकल्पासाठी फेब्रुवारीची डेडलाइन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या खत प्रकल्पाचे काम सध्या सुरू असून, फेब्रुवारीअखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्णक्षमतेने कार्यरत होणार आहे. तसेच ऑक्टोबरअखेरपर्यत या प्रकल्पावरील कचऱ्याचे ढीग कमी करून कंपनीकडून नऊ महिन्यात संपूर्ण कचऱ्याचे कॅपिंग केले जाणार असल्याची माह‌िती असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली. मह‌िनाभरांनतर पालिकेचे खत प्रकल्पावरील सर्व कर्मचारी महापालिकेकडे वर्ग केले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी खत प्रकल्पाचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर प्रशासनाने खत प्रकल्पाची सद्यस्थितीची माहिती सदस्यांना दिली. खत प्रकल्पाबाबत संबंधित कंपनीसोबत करार झाला असून, कंपनीकडून खत प्रकल्पावर काम सुरू करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत येथील मश‌िनचे रिपेअरिंग सुरू असून, कंपनीकडे प्रकल्पाच्या हस्तांतरणाचे काम सुरू आहे. अजून एक महिना महापालिकेचे कर्मचारी हे संबंधित कंपनीच्या कामगारांसोबत काम करणार आहेत. सुका व ओला कचऱ्याचे दोन युनीट हे फेब्रुवारीअखेरपर्यंत सुरू होणार आहेत. हरित लवादाने सर्व अटी काढून घेतल्या असून, कोणतीही अडचण आता बांधकाम व्यवसायाला नाही असे स्पष्टीकरण आयुक्तांनी दिले आहे.

श्वान निर्बीजीकरण मंजूर

गेल्या अनेक दिवसांपासून वादात अडकलेल्या श्वान निर्बिजीकरण ठेक्याला अखेरीस सोमवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. नवोदया व्हेट सोसायटीला ययासाठी प्रतिश्वान ७२७ रुपये देण्यात येणार असून, त्यासाठी पालिकेने ९० लाखांची तरतूद केली आहे. एक वर्षासाठी कंपनीला काम दिले असून, भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण व पिसाळलेल्या कुत्र्यांवरही कारवाईची जबाबदारी या संस्थेवर आहे. दरावरून हा ठेका वादात सापडला होता. सदर काम हे शासकीय दरानुसारच देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहर काँग्रेसमध्ये पुन्हा बंडखोरी?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा उफाळून आली असून, विद्यमान शहराध्यक्षांविरोधात एक गट सक्रीय झाला आहे. राष्ट्रवादीसोबतची आघाडी व निष्ठावंतांना डावलले जात असल्याचे सांगत, काँग्रेस अंतर्गत पक्षाचे जुने व एकनिष्ठ कार्यकर्ते पुन्हा सरसावले आहेत. शहरातील सर्व निष्ठावान पदाधिकारी व कार्यकर्ते यांची एकत्रित गुप्त बैठक घेण्याची तयारी सुरू केली असून, ही बैठक आज, मंगळवारी किंवा बुधवारी होणार असल्याचे समजते.

शहर काँग्रेसची अंतर्गत गटबाजी आता सर्वश्रुत आहे. प्रदेश पातळीवरील नेत्यांनी गटबाजीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या दरबारात हा विषय झाला. मात्र, तोडग्याविनाच बैठका संपल्या. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या गटबाजीने पुन्हा डोके वर काढले आहे. सोमवारी जिल्ह्याचे संपर्क नेते याच्याकडे काहींनी ही गटबाजी बोलून दाखवली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत चारही ब्लॉकच्या बैठकीत पक्षातील एकनिष्ठ, निष्ठावान पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आवाज उठविला होता.शहराध्यक्ष विश्वासात घेत नसल्याचे सांगून काहींनी आता पुन्हा वेगळा गट तयार करण्याची तयारी सुरू केली आहे. बैठकीच्या माध्यमातून आवाज उठविणाऱ्या सर्व निष्ठावान कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेत पक्षाला वाचविण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. त्यासाठी शहरातील सर्व भागातील पक्षाच्या एकनिष्ठ जुन्या कार्यकर्त्यांना साद घातली जात आहे.ही बैठक एका मंगल कार्यालयाच होणार असल्याचे समजते. यात आगामी मनपा निवडणुका, गटबाजी यासह विविध विषयांवर चर्चा करून रणनीती ठरविली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता औद्योगिक भूखंडांचे सर्वेक्षण

$
0
0

सातपूर, अंबडमधील उद्योजकांमध्ये खळबळ

gautam.sancheti@timesgroup.com

Tweets : @sanchetigMT

नाशिक : महापालिकेने शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण सुरू केले असतानाच आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानेही सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतींतील भूखंडांच्या सर्वेक्षणाचा निर्णय घेतला आहे. प्रथमच असे सर्वेक्षण होणार आहे. दोन्ही वसाहतींतील एकूण २७८२ भूखंडांच्या मोजणीसाठी महामंडळाने दोन टीम तयार केल्या असून, या निर्णयामुळे उद्योजकांमध्ये खळबळ उडाली आहे. या सर्वेक्षणामुळे अनेक बेकायदा बाबी उघड होण्याची चिन्हे आहेत.

सातपूर व अंबड येथील औद्योगिक वसाहतींतील भूखंडांच्या सर्व्हेक्षणात औद्योगिक विकास महामंडळाच्या दोन्ही टीम विविध प्रकारची तपासणी व पाहणी करणार आहेत. या तपासणीत प्रामुख्याने भूखंडांवर झालेले अतिक्रमण, औद्योगिक कारणासाठी दिलेल्या भूखंडाचा वापर व्यापारासाठी करण्याचे प्रकार, बंद पडलेल्या उद्योगांनी अडकवून ठेवलेले भूखंड, अवैध पध्दतीने भाड्याने दिलेले भूखंड व मुदतीत उद्योग सुरू केला आहे का या बाबी तपासल्या जाणार आहेत. निवासी वापराचा मुद्दाही महत्त्वाचा राहील.या तपासणीला २ जानेवारीला सुरुवात होऊन एक महिन्यात अहवाल द्यायचा आहे. या सर्वेक्षणात २७८२ भूखंडाची पाहणी केली जाईल.

भूखंडांबाबत विविध तक्रारी होत्या, पण त्याबाबत अजूनपर्यंत कधीही संपूर्ण सर्वेक्षण करण्यात आले नव्हते. त्यामुळे महिनाभरात सर्व सर्वे केला जाईल. त्याचा अहवाल तयार केला जाणार असून, त्यातून एकूण चित्र स्पष्ट होईल.

- हेमांगी भामरे-पाटील, प्रादेशिक व्यवस्थापक, एमआयडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावांची वाटचाल कॅशलेसकडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नागरिकांनी कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य द्यावे आणि हा व्यवहार ग्रामीण पातळीपासून सुरू व्हावा यासाठी जिल्ह्यात विविध बँकांनी २२५ गावे दत्तक घेतली आहेत. त्यापैकी काही गावांमध्ये बँकांनी प्राथमिक पाहणी करून नागरिकांचे खाते उघडण्याचे काम सुरू केले आहे. स्टेट बँकेने दिंडोरी तालुक्यातील पिंपळणारे या गावी सोमवारी भेट देऊन काम सुरू केले आहे. अकाऊंट सुरू केल्यानंतर रुपे कार्ड देणे व नंतर स्वाइप मशिन देऊन गावे कॅशलेस केली जाणार आहे.

जिल्हाधिकारी यांनी बैठक घेवून सर्व बँकांना कॅशलेस गावे दत्तक घेण्याचे आवाहन केले होते. सुरुवातीला त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र हळूहळू प्रतिसाद वाढला असून या गावांची संख्या ८७ वरून २२५ पर्यंत पोहोचला आहे. सर्व बँकांना त्या शाखेमार्फत एक गाव दत्तक घेण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ५०० हून अधिक गावे दत्तक घेतले जाऊ शकतात.

पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द झाल्यानंतर बँकात पैसे भरण्यासाठी व नंतर पैसे काढण्यासाठी गर्दी होती. सुरुवातील नोटा बदलून देण्याचाही मोठा ताण आला. त्यानंतर स्थिती सुधारत असतांना पगाराची समस्या उपस्थित झाली. बँकांची व्यवस्थाही काही दिवस कोलमडली. त्यात दोन हजाराच्याच नोटा आल्यामुळे सुट्या नोटांचाही ताण वाढला. आता बँकांमध्ये कॅशशॉर्टेजच्या प्रश्न कायम असला तरी एटीएमसाठी मोठ्या प्रमाणात पैसा आला आहे. त्यामुळे बँकांमधील रांगा कमी झाल्या आहेत. त्यात आता बँकांनी दत्तक गाव कॅशलेस करण्याची मोहीम सुरू केली आहे.

प्राथमिक माहिती देणार

कॅशलेस गावात जाऊन तेथे ज्यांचे बँकांत अकाऊंट नाही त्यांचे अकाऊंट उघडणे हे प्राथमिक काम आहे. त्यासाठी फोटो काढण्याची यंत्रणाही बँकांनी बरोबर ठेवली आहे. त्याचप्रमाणे अर्ज भरून घेण्यासाठी यंत्रणा आहे. हे झाल्यानंतर त्यांना रुपे कार्डही देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेकेदाराकडून परस्पर वृक्षतोड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राज्य शासनाकडून एकिकडे वृक्ष लागवडीसाठी विविध योजना राबवून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. दर दुसरीकडे काही विकासाच्या नावाखाली वृक्षतोड केली जात आहे. शहरातील आयेशानगर भागातील कब्रस्थानमध्ये पथदीप लावण्यासाठी गरज नसतांना ४० डेरेदार वृक्ष संबंधित ठेकेदाराकडून रातोरात तोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी कब्रस्थानचे मुख्य संचालक अब्दुल रशीद अब्दुल करीम यांनी मनपा आयुक्त रवींद्र जगताप यांच्यासह वनअधिकारी व अपर पोलिस अधीक्षक यांना निवेदन देऊन संबंधिताविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

आयेशानगर भागात असलेल्या कब्रस्थानमध्ये सध्या पथादीप लावण्याचे काम सुरू आहे. हे काम करीत असलेल्या ठेकेदाराने यासाठी कब्रस्थान परिसरातील नीलगिरी, लिंब यासारखी डेरेदार वृक्ष ट्रस्ट किंवा मनापाची पूर्व परवानगी न घेता मुळासकट कापून रातोरात लंपास केली. दुसऱ्या दिवशी सकाळी कब्रस्थान ट्रस्टचे संचालक यांना हा प्रकार समजला. संचालक अब्दुल रशीद यांनी उद्यान विभागाकडे याबाबत तक्रार केली.

प्रशासनाकडून डोळेझाक

परिसरात जतन केलेली झाडे अशी कुठलीही परवानगी न घेता तोडली गेली. याबाबत जागरुकपणे मनपाच्या उद्यान विभागात रशीद यांनी तक्रार केली. मात्र प्रशासनाकडून याची कोणतीही दखल घेतली गेली नाही, अरे रशीद यांनी निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसहभागातून धागुरमध्ये स्वच्छता अभियान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

तालुक्यातील धागुर गावात नवीन वर्षाचे स्वागत ग्रामस्वच्छता अभियानाने करण्यात आले. गावातील सर्व नागरिक, परिसरातील काही सामाजिक संस्था, मंडळांनी या अभियानात सहभाग घेतला. धागुर हे नाशिक आणि दिंडोरी तालुक्याच्या सीमेवर वसलेले साधारणतः बाराशे लोकवस्तीचे आदिवासी गाव आहे.

परिसर शेती विकासात आघाडीवर असला तरी गावात फारसा विकास झालेला नाही. जानेवारी २०१७ पासून ‘लोकसहभागातून विकासाकडे’ चा नारा देत विकासाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राबविण्यात आलेल्या या अभियानामुळे गावाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच गावातील समस्या या शासकीय निधी आणि लोकसहभागातून सोडवल्या जाणार आहेत. त्यासाठी मानस फाऊंडेशन, नेचर क्लब, दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान या सामाजिक संस्थांची मदत घेतली जाणार आहे.

लवकरच वेबसाइट

सरपंच वर्षा निंबेकर, उपसरपंच भास्कर बुरुंगे, सदस्य संगीता पडवळे, लक्ष्मण कुंदे, ग्रामविकास अधिकारी श्रीमती गवारे यांच्यासह ग्रामस्थांनी या अभियानात सहभाग घेतला. तसेच गावाची www.gramdhagur.com ही वेबसाइट लवकरच सुरू केली जाणार आहे, असे सामाजिक कार्यकर्ते विजय घोटे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समको’तील गैरव्यवहार प्रकरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सटाणा मर्चटस् को. ऑप. बँकेतून जून २००४ साली आठ संचालकांनी सेबीकडे नोंदणी नसलेले रोखे अवास्तव भावात खरेदी केले असून, चौकशी अधिकारी सहाय्यक निबंधक अभिजीत देशपांडे हे दोषींना पाठिशी घालत असल्याच्या निषेधार्थ बँकेचे माजी चेअरमन डॉ. विठ्ठल येवलकर यांच्या नेतृत्वाखाली माजी संचालकांनी विभागीय सहनिबंधक यांचे कार्यालयासमोर उपोषणासाचे हत्यार उपसले. दरम्यान १५ जानेवारीपूर्वी या प्रकरणी निकाल देण्याची ग्वाही सहनिबंधकांनी दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

येथील विभागीय सह निबंधक कार्यालयाच्या आवारात सटाणा मर्चटस् को. ऑप बँकेचे माजी चेअरमन डॉ. विठ्ठल येवलकर, माजी संचालक यशवंत येवला, शामकांत बागड, मंगला मेणे, प्रतिभा येवलकर, विजय भांगडीया, मनोज अमृतकर आदी सकाळी उपोषणास बसले होते. जून २००४ मध्ये रिझर्व बँकेच्या नियमांना धाब्यावर बसवत ८ संचालकांनी सेवीकडे लिस्टेड नोंदणी नसलेले रोखे अवास्तव भावात खरेदी केले होते. याप्रकरणाचा चौकशी करण्यासाठी सहाय्यक निबंधकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र चौकशी अधिकारी वेळकाढूपणा करत दोषींना पाठिशी घालत आहेत. विनाकारण चौकशी लांबवित आहेत. त्यांच्या या काराभाराविरोधात तसेच दोषींवर त्वरित कारवाई करावी यासाठी उपोषण सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान विभागीय सहनिबंधक भालेराव, जिल्हा उपनिबंधक करे यांनी उपोषणार्थीची उपोषणस्थळी भेट घेतली. प्राधिकृत अधिकारी अभिजीत देशपांडे यांनी १५ जानेवारीपूर्वी चौकशी अहवाल सादर करण्याचे ठोस आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गड सावरण्यासाठी पवार मैदानात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूम‌ीवर उफाळून आलेली गटबाजी व पक्षाची डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वतः नाशिकच्या मैदानात येणार आहेत. पवार हे गुरुवारपासून दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत पिंपळगाव बसवंत येथे शेतकरी मेळावा तर नाशिक येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार व शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली.

गुरुवार (दि. ५) जानेवारी रोजी सकाळी १० वाजता पिंपळगाव बसवंत येथील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी मेळावा होणार आहे. तर नाशिक शहर राष्ट्रवादीच्या वतीने दुपारी १ वाजता नाशिक येथील रावसाहेब थोरात सभागृहात कार्यकर्ता मेळावा होणार आहे. या मेळाव्यांना

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनिल तटकरे, जिल्हा प्रभारी आ. जितेंद्र आव्हाड हे उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चंदनपुरी, दाभाडी, गाळणेचे रुपडे पालटणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील श्री क्षेत्र खंडेराव महाराज मंदिर, चंदनपुरी, श्री क्षेत्र रोकडोबा हनुमान मंदिर, दाभाडी व श्री क्षेत्र गुरू गोरक्षनाथ शिवपंचायतन मंदिर, गाळणे या तीर्थक्षेत्रांना मबम वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मंजूर झाला आहे. त्यामुळे या तिनही तीर्थक्षेत्रांचे रुपडे लवकरच पालटणार आहे. या तिनही मंदिर परिसर विकास कामांसाठी ५ कोटी ४१ लाख रुपये मंजूर झाल्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी सांगीतले. या तीर्थक्षेत्रांना आधी ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा असल्याने याठिकाणी भक्तांच्या सोयीसुविधांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नव्हता. मंत्री भुसे यांनी नागपूर अधिवेशन दरम्यान या तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा मंजुरीसाठी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. चंदनपुरी, दाभाडी, गाळणे येथील ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रांच्या प्रस्तावास ग्रामविकास विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे.

ही विकासकामे होणार

या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी एकूण ५ कोटी ४१ लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून तीर्थक्षेत्र ठिकाणी भक्त निवास बांधणे, संरक्षण भिंत बांधणे, पथदीप बसविणे, परिसर सुशोभीकरण करणे, पिण्याच्या पाण्याची टाकी व त्याअनुषंगीक कामे करणे, स्नानगृह बांधणे, काँक्रेट रस्ता तयार करणे, पेवर ब्लॉक बसविणे, वाहनतळ तयार करणे इ. विकासकामे होणार आहेत. चंदनपुरी, दाभाडी, गाळणे या तीर्थक्षेत्रास्थळी वर्षभरात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. या तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मंजूर झाल्याने मोठ्या प्रमाणात ग्रामविकास विभागामार्फत निधी मंजूर करण्यात आल्याचे भुसे यांनी सांगीतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रौप्य महोत्सवी राज्य कला प्रदर्शन आजपासून धुळ्यात

$
0
0

प्रा. जी. बी. चौधरींचा राज्य कला पुरस्काराने गौरविणार

म. टा. वृत्तसेवा,धुळे

महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाच्या रौप्य महोत्सवी कला प्रदर्शनापासून महाराष्ट्रातील ज्येष्ठ व थोर कलावंतांचा सत्कार करण्याची प्रथा सरकारने सुरू केली आहे. यंदाच्या धुळे येथे होणाऱ्या ५७ व्या विद्यार्थी विभागाच्या राज्य कला प्रदर्शनाच्या निमित्ताने या सत्कारासाठी कला संचालनालयाने धुळ्यातील ज्येष्ठ चित्रकार प्रा. जी. बी. चौधरी यांच्या नावाची एकमताने शिफारस केली आहे. अशा प्रकारचा सन्मान लाभलेले ते जिल्ह्यातील एकमेव व पहिले चित्रकार आहेत.

५७ व्या राज्य कला प्रदर्शन विद्यार्थी विभागाचे उद््घाटन, पुरस्कार वितरण समारंभ व प्रा. चौधरी यांचा सत्कार समारंभ आज (दि. ४) हिरे भवन येथे होणार आहे. या प्रदर्शनाचे उद््घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, आमदार अनिल गोटे, कुणाल पाटील, महापौर कल्पना महाले, प्रधान सचिव सीताराम कुंटे, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे आदी मान्यवर उपस्थित राहतील.

आलंकारिक शैलीतील चित्रकार

प्रा. जी. बी. चौधरी हे भारतीय आलंकारिक शैलीत काम करणारे प्रसिद्ध असे चित्रकार आहेत. त्यांचा जन्म १ जून १९४५ रोजी पिंपळनेर येथे झाला आहे. त्यांचे शिक्षण जी. डी. आर्ट, एम. ए., कलानिकेतन, नाशिक येथे झाले. विद्यार्थी दशेपासून ते भारतीय कलेचे चाहते असून, त्याचे विविध प्रयोग आपल्या चित्र शैलीतून त्यांनी व्यक्त केले आहेत. १९७३ पासून ते निवृत्तीपर्यंत श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या स्कूल ऑफ आर्टमध्ये कार्यरत होते. प्रा. चौधरी यांनी सृष्टी आर्ट गॅलरी, औरंगाबाद, बडोदा, जहाँगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे त्यांनी आपल्या चित्रकृतींचे प्रदर्शन मांडले आहे. याशिवाय ललित कला अकादमी मेळा (बंगळूर), ललित कला अकादमी मेळा (कोलकाता), दक्षिण- उत्तर विभाग सांस्कृतिक केंद्र (नागपूर), ठाणे फेस्टिव्हलमध्ये त्यांच्या चित्रांचा प्रामुख्याने समावेश राहिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिकाम्या हातांना मिळणार काम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील बेरोजगार युवकांना कौशल्य प्रशिक्षणाद्वारे रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी ठेवलेल्या प्रस्तावाला स्थायी समितीने ग्रीन सिग्नल दिला आहे. शहरातील पाचशे बेरोजगार युवकांना हॉस्प‌िटॅलिटी, हेल्थ केअर, ऑटोमोबाइल, बांधकाम क्षेत्रासंदर्भातील प्रशिक्षण देण्यासाठी स्थायीने एक कोटी रुपयांना आर्थिक मंजुरी दिली आहे.

मुंबईतल्या प्रथमेश एज्युकेशन फाऊंडेशने दरवर्षी प्रतिविद्यार्थी २० हजार रुपयांचा दर दिल्याने या संस्थेसोबत महापालिका आता करार करणार असून, पुढील वर्षापासून या कौशल्य प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. आयुक्तांच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे दरवर्षी पाचशे तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी मिळणार असून, त्यांना प्रशिक्षणानंतर रोजगार उपलब्धतेसाठीही पालिका प्रयत्न करणार आहे.

महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी महापालिकेमार्फत शहरातील बेरोजगार युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाअंतर्गत शहरातील पाचशे सुशिक्ष‌ित बेरोजगार युवकांची निवड करून त्यांना विविध क्षेत्राचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. महापालिकेच्या बजेटमध्ये दरवर्षी या कामासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत शहरातील पाचशे विद्यार्थ्यांना हॉस्प‌िटॅलिटी, हेल्थ केअर, ऑटोमोबाइल, बांधकाम क्षेत्रासंदर्भातील प्रशिक्षण दिले जाणार आहे. महासभेने संबंधित प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर प्रशासनाने यासंदर्भात निविदा प्रक्रिया राबविली होती.

प्रशासनाने राबविलेल्या निविदा प्रक्रियेला तीन संस्थांनी प्रतिसाद दिला आहे. त्यात मुंबईच्या प्रथमेश एज्युकेशन फाऊंडेशनने प्रतिविद्यार्थी २० हजार रुपयांचा दर दिला आहे. त्यात लॉजिंग, बोर्डिंग, नाश्ता, दोन वेळा जेवण, ट्रेनिंग क्लासरूम, प्रशिक्षक यांचा समावेश आहे. संबंधित संस्थेमार्फत या सुविधा युवकांना पुरविल्या जाणार आहेत. प्रशिक्षणाचा कालावधी हा ६ ते ९ मह‌िने असणार आहे. प्रशिक्षणार्थींचा सर्व खर्च महापालिका उचलणार आहे. स्थायी समितीवर संबंधित संस्थेला काम देण्याचा व आर्थिक खर्चाला मान्यता देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्याला स्थायी समितीने मान्यता दिल्याने आता पुढील वर्षापासून शहरातील पाचशे बेरोजगार युवकांना रोजगाराचे प्रशिक्षण मिळणार आहे. शहरात जाहिरात देवून या प्रशिक्षणार्थींची निवड केली जाणार आहे.

शहरातच रोजगार

संबंधित संस्थेकडून युवकांना कौशल्य प्रशिक्षणाद्वारे रोजगाराचे प्रशिक्षण दिल्यानंतर पालिकाच या युवकांच्या रोजगारासाठी मदत करणार आहे. औद्योगिक वसाहती, हेल्थ केअरमध्ये काम करणाऱ्या संस्था, ऑटोमोबाइल्स व बांधकाम क्षेत्रातील संस्थांशी संपर्क साधून त्यांना शहरातच रोजगार उपलब्ध करून देण्याचा पालिकेचा मानस आहे. अशा प्रकारचे प्रशिक्षण सुरू करणारी नाशिक ही पह‌िलीच महापालिका असणार आहे. नागरिकांना सुविधा देण्यासह रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा हा अनोखा उपक्रम आहे.



दरवर्षी शहरातील पाचशे सुशिक्षित युवकांना या कौशल्य प्रशिक्षणाद्वारे रोजगाराचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी संस्थेची निवड करण्यात करण्यात आली असून, युवकांचीही लवकरच निवड केली जाणार आहे. या सर्वांना शहरातच रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे.

-अभिषेक कृष्णा, आयुक्त, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्किंगविरोधात क्रीडाप्रेमी आक्रमक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात असलेली क्रीडांगणेच लोकसंख्येच्या तुलनेत कमी पडत असताना नाशिक शहर वाहतूक शाखेने शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर वाहनतळ उभारण्याचा घाट घातला आहे. या निर्णयामुळे खेळाडूंमध्ये खळबळ उडाली असून, वेळ पडल्यास या निर्णयाविरुद्ध क्रीडा संस्थांकडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

लहान मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी खेळ आवश्यक असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु, शहरातील मैदानांची संख्या घटत असल्याने मुलांनी खेळायला जायचे कुठे, असा प्रश्न पालकांसमोर ‘आ’ वासून उभा आहे. शहरातील गावठाण भागात छत्रपती शिवाजी स्टेडियम हे एकमेव मैदान आहे. या मैदानावर जिल्हा पातळीवर खेळलेल्या खेळाडूंपासून ते राष्ट्रीय खेळाडूंपर्यंत अनेक जण रोज सरावासाठी येत असतात. शहरातील खेळाडूंना हे एकमेव मध्यवर्ती मैदान आहे. या ठिकाणी नुकत्याच राज्यस्तरीय निमंत्रितांच्या खो-खो स्पर्धाही झाल्या. या मैदानावर अगोदरही नाशिक महापालिकेच्या कबड्डी व महापौर चषक कुस्ती स्पर्धा झाल्या आहेत. या मैदानावरील स्पर्धांना चांगला प्रेक्षकवर्ग लाभत असल्याने इतर मैदानांच्या तुलनेत येथे होणारी स्पर्धा यशस्वी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.

मात्र, या मैदानावर वाहतूक शाखेचा डोळा असून, या ठिकाणी पार्किंग करण्याचा घाट घातला जात आहे. शहर वाहतूक शाखेने क्रीडा विभागाला दिलेल्या प्रस्तावानुसार महात्मा गांधी रोडवर असलेली दोन्ही प्रवेशद्वारे उघडून वाहनांना आत प्रवेश दिला जाणार आहे. वाहनांनी मैदानात प्रवेश केल्यानंतर काही वाहने यशवंत व्यायामशाळेच्या भिंतीलगत व काही वाहने शासकीय कन्या शाळेजवळ उभी करावीत, असे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, वाहनांच्या प्रवेशामुळे या मैदानाची नासाडी होणार आहे. या ठिकाणी वाहनांना प्रवेश दिल्यास ट्रॅकची नासधूस होण्याची चिन्हे आहेत. काही वर्षांपूर्वी या ठिकाणी पार्किंगचा प्रयोग करण्यात आला होता. मात्र, या ठिकाणी रात्री वाहने लावून त्यात अनैतिक प्रकार होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्याचप्रमाणे मद्यपींसाठी हक्काची जागा तयार झाली होती. पुन्हा पार्किंगला जागा दिल्यास खेळाडूंनी जायचे कुठे, असा प्रश्न निर्माण होणार आहे. या ठिकाणी सरावासाठी महिला खेळाडूदेखील येतात. टवाळखोरांच्या वावराने त्यांना सराव करणे अवघड होणार असल्याने येथे पार्किंग करू नये, अशी मागणी क्रीडा संस्थांनी केली आहे.

---

...तर होणार कोर्टाचा अवमान

याअगोदार काही क्रीडा संस्थांनी या मैदानाबाबत कोर्टात याचिका दाखल केली होती. या क्रीडांगणाचा वापर फक्त खेळासाठीच करावा, असा आदेश कोर्टाने दिला होता. आता या मैदानावर पुन्हा पार्किंग सुरू केल्यास कोर्टाचा अवमान होणार असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे.

---


शहर वाहतूक शाखेकडून रनिंग ट्रॅकलगत यशवंत व्यायामशाळा आणि शासकीय कन्या विद्यालय या ठिकाणी पार्किंगचा प्रस्ताव आला आहे. क्रीडा संकुल समितीसमोर तो ठेवण्यात येणार असून, समिती यावर निर्णय घेईल.

-संजय सबनीस, जिल्हा क्रीडा अधिकारी


आम्ही या ठिकाणी नुकतीच खो-खो स्पर्धा भरविली होती. या ठिकाणी महिला खेळाडूंचा सराव सुरू असतो. येथे टवाळखोरांचा वावर वाढल्यास आमच्या खेळाडूंना खेळता येणार नाही. प्रशासनाने विचार करून कार्यवाही करावी, नाहीतर योग्य ते पाऊल उचलू.

-मंदार देशमुख, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन


शहरातील शाळांसाठी हे एकमेव मैदान आहे. त्यामुळे येथे पार्किंग करू नये. या ठिकाणी पार्किंग केल्यास मुलांनी कुठे खेळायला जायचे, हा प्रश्न निर्माण होणार आहे. या मैदानावर अनेक खेळाडू तयार झाले आहेत. त्यामुळे पुनर्विचार व्हावा.

-प्रशांत भाबड, सहकार्यवाह, नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन


या मैदानावर पार्किंग सुरू केल्यास क्रीडा संस्था गप्प बसणार नाहीत. एकीकडे खेळाडू तयार होत नाहीत, अशी बोंब करायची व दुसरीकडे पिढ्यान् पिढ्या असलेले मैदान खेळाडूंकडून हिसकावून घ्यायचे हे योग्य नाही.

-आनंद खरे, अध्यक्ष, जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन


नाशिक शहरातील प्रत्येक मैदानावर कुणी ना कुणी अतिक्रमण केले आहे. हे एकमेव मैदान चांगल्या स्थितीत आहे. मात्र, यावरदेखील पोलिसांची वक्रदृष्टी गेली आहे. यावर अतिक्रमण झाले, तर क्रीडा संस्था आंदोलन करतील.

-नरेंद्र छाजेड, अध्यक्ष, नाशिक जिमखाना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हंडाभर चांदण्या’ गाजवणार महोत्सव

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्राच्या प्रायोगिक रंगभूमीवरचे २०१६ साल गाजवणारे ‘हंडाभर चांदण्या’ नव्या वर्षातही प्रतिष्ठेचे महोत्सव दणाणून सोडणार आहे. २०१७ च्या जानेवारी आणि फेब्रुवारीत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर होणाऱ्या रंगभूमीवर प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या नाट्य महोत्सवांमध्ये ‘हंडाभर चांदण्या’ नाटकाला सन्मानाने निमंत्रित केले गेले असून, यात पुण्यातील महाराष्ट्र कल्चरल सेंटरचा रंग महोत्सव, कोकणातील कुडाळ येथील बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सव व आजरा येथील रमेश टोपले नाट्योत्सव या महोत्सवांचा समावेश आहे. पाठोपाठ फेब्रुवारीत नवी दिल्लीतील भारंगम महोत्सव आणि एनएसडी, दिल्ली आयोजित पाटणा (बिहार) येथील राष्ट्रीय नाट्य महोत्सव येथेही ‘हंडाभर चांदण्या’ सादर होणार आहे.

चर्चेत असणाऱ्या ‘हंडाभर चांदण्या’ या नाटकाने २०१६ मध्ये नाट्यनिर्माता संघाच्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट नाटकाचा एक लाख रुपयांचा कै. मोहन वाघ पुरस्कार व लेखन दिग्दर्शनासह सात वैयक्तिक पारितोषिके पटकावून सुरुवात केली. दत्ता पाटील यांचे लेखन व सचिन शिंदे यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘हंडाभर चांदण्या’ या नाटकात पाण्याचा अत्यंत भीषण प्रश्न वेगळ्या पद्धतीने मांडला आहे. पाण्याच्या टँकरची डोळ्यात प्राण आणून वाट पाहण्यासाठी माळावर जमलेल्या मावळवाडी नावाच्या छोट्याशा दुष्काळी गावातील विलक्षण गोष्ट यात मांडली आहे. लोकसंगीताच्या प्रभावी माध्यमातून सद्यःस्थितीवर साध्या जगण्यातून उपहासात्मक आणि टोकदार भाष्य करणाऱ्या या दीर्घांकाची निर्मिती प्रमोद गायकवाड यांनी केली असून, प्राजक्त देशमुख, प्रणव प्रभाकर, गीतांजली घोरपडे, नूपुर सावजी, अरुण इंगळे, राहुल गायकवाड, राजेंद्र उगले, दत्ता अलगट, धनंजय गोसावी यांच्या भूमिका आहेत.

नाशिकच्या रंगभूमीला नवचैतन्याची झळाळी देणाऱ्या व अनेक पराक्रम करणाऱ्या ‘हंडाभर चांदण्या’ नाटकामुळे मराठी रंगभूमीच्या नाशिककडून अपेक्षा वाढल्या आहेत. नव्या वर्षातही या नाटकाची घोडदौड कायम आहे. येत्या १२ जानेवारीला मुंबई येथे यशवंत नाट्यमंदिर, १३ जानेवारीला कोकणातील कुडाळ येथील बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सव, १४ जानेवारीला आजरा येथील कै. रमेश टोपले नाट्योत्सव, २२ जानेवारीला पुणे येथील महाराष्ट्र कल्चरल सेंटरचा रंगमहोत्सव, २८ जानेवारीला शासकीय विद्यानिकेतन नाशिक-धुळे सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात विशेष प्रयोग आणि ५ फेब्रुवारीला नवी दिल्ली व ८ फेब्रुवारीला पाटणा असा केवळ महिनाभरात तब्बल ७ प्रयोगांचा राज्यात व राज्याबाहेर धडाका उडणार आहे.

---

रौप्यमहोत्सवी प्रयोगाकडे वाटचाल करणाऱ्या ‘हंडाभर चांदण्या’ या नाटकाच्या वर्षभराच्या सातत्याने नाशिकच्या नाटकांना असलेला अल्पजीवित्वाचा डागही पुसला गेला आहे. नाटकाचा दर्जा आणि प्रयोगातील सातत्य यांची अप्रतिम सांगड घातली गेल्यानेच नाशिकच्याच नव्हे, तर मराठी रंगभूमीवरही हे नाटक अजरामर ठरणार आहे.

-सचिन शिंदे, दिग्दर्शक

---

कागदावरच्या शब्दांना आपलेसे करून जीव ओतून काम करणाऱ्या या नाटकातील कलावंत आणि तंत्रज्ञांना याचे श्रेय द्यावेच लागेल. प्रतिष्ठेच्या महोत्सवांची निमंत्रणे येणे ही नाशिकची रंगभूमी समृद्धीकडे वाटचाल करीत असल्याची नांदी आहे. हे नाशिकच्या रंगभूमीचे यश आहे.

-दत्ता पाटील, लेखक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images