सिन्नरकडून नाशिककडे येणाऱ्या क्रेनने चिंचोली फाट्याजवळ उच्चदाब वाहिनीच्या खांबाला धडक दिल्याने शुक्रवारी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. हा पुरवठा शनिवारी संध्याकाळपर्यंत सुरळीत न झाल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. याबाबत क्रेन चालकाविरुद्ध नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे.
↧