शहर विकासाचा प्रारुप आराखडा अन्यायकारक व चुकीचा असल्याचा दावा करत तब्बल एक हजार जणांनी त्याविरोधात हरकती नोंदविल्या आहेत. नाशिकरोड येथील नगररचना कार्यालयात हरकती अर्ज देण्याचा आज शेवटचा दिवस होता. सहाय्यक नगररचनाकार अमर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सुमारे एक हजार हरकती आल्या आहेत.
↧